गणेश चतुर्थीसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना

राज्य सरकारने गणेशचतुर्थी सणासाठी एसओपी तयार केलेली आहे. त्या एसओपीनुसार जे कोण गणेश मूर्ती आणण्यासाठी (स्वतःसाठी अथवा विक्रीस) राज्याबाहेर जातील त्यांना एक तर स्वतःची कोरोना चाचणी करावी लागेल अथवा १४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल. जे गोमंतकीय गोव्याबाहेर राहत आहेत व सणानिमित्त राज्यात येणार आहेत, त्यांना येताना कोविडसाठीचे निगेटिव्ह वैद्यकीय प्रमाणपत्र (आयसीएमआरची परवानगी असलेल्या लॅबचे) आणावे लागेल, अथवा गोव्यात आल्यानंतर ... Read More »

विजयी सलामीसाठी इंग्लंड सज्ज

>> पाकिस्तानविरुद्धचा पहिला कसोटी सामना आजपासून पाकिस्तान व इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. विंडीजविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकल्यामुळे इंग्लंडचा संघ भरात असून यजमानांचा सध्याचा फॉर्म पाहता पाहुण्या पाकिस्तानचा त्यांच्यासमोर निभाव लागणे कठीण वाटत आहे. विंडीजविरुद्धच्या शेवटच्या दोन्ही कसोटीत दमदार प्रदर्शन केलेली इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांची फळी पाकिस्तानला लोळवण्यासाठी सज्ज झाली आहे. बेन स्टोक्स गोलंदाजी करण्यास तंदुरुस्त ... Read More »

आर्सेनलने जिंकला ‘एफए कप’

एमेरिक ऑबामेयांग याने केलेल्या दोन गोलच्या बळावर आर्सेनलने चेल्सीचा २-१ असा पराभव करत एफए करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकली. या स्पर्धेच्या इतिहासातील त्यांचे हे १४ वे विजेतेपद ठरले. सामन्याची सुरुवात आर्सेनलसाठी भयावह झाली. स्थिरावण्यापूर्वीच त्यांना एका गोलने पिछाडीवर व्हावे लागले. चेल्सीच्या ख्रिस्तियन पुलीसीस याने ५ व्या मिनिटालाच आर्सेनलचा बचाव भेदत संघाला १-० असे पुढे नेले. पहिल्या पाच मिनिटांत ०-१ असे पिछाडीवर ... Read More »

‘जीबीए’ची निवडणूक १६ रोजी

गोवा बॅडमिंटन असोसिएशनची कार्यकारी समिती निवडण्यासाठी निवडणूक १६ ऑगस्ट रोजी होणार आहे. एसआरके बाग रेसॉर्ट खांडेपार येथे होणार्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवडणूक होईल. अध्यक्ष, सचिव, खजिनदार, उपाध्यक्ष (४), संयुक्त सचिव, सहखजिनदार व सदस्य (७) या पदांसाठी ही निवडणुक असेल. निवडणुकीचे निर्वाचन अधिकारी म्हणून रोटरी क्लब पणजीचे माजी अध्यक्ष मनोज पाटील काम पाहणार आहेत तर लक्ष्मण केळेकर त्यांचे साहाय्यक असतील. ... Read More »

आत्महत्येमागील गुंता

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतागुंतीचे बनत चालले आहे. आतापावेतो जो तो या आत्महत्या प्रकरणातून स्वतःचे हिशेब पूर्ण करण्यामागे लागलेला दिसतो आहे. या आत्महत्या प्रकरणातून अनेक गोष्टी प्रकाशात आल्या. बाह्य झगमगाटाखाली दडलेले हिंदी चित्रपटसृष्टीमधील अंतर्गत खुनशी राजकारण, हेवेदावे, व्यावसायिक मक्तेदारीचे प्रयत्न याचेही विरूप दर्शन रसिकांना घडले. सुशांत आत्महत्या प्रकरणामध्ये आतापावेतो अनेक कारणे पुढे केली गेली आहेत. व्यावसायिक ... Read More »

२८६ पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

राज्यात बळींची संख्या ५६ : कुठ्ठाळीत सापडले सर्वाधिक रुग्ण; मृतांमध्ये मेरशी, सांगे, वास्कोतील रुग्णांचा समावेश राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असून सोमवारी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे निधन झाले आहे. राज्यातील कोरोना बळीची संख्या ५६ झाली आहेत. तसेच, नवीन २८६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सध्याची संख्या १८८४ झाली आहे. आरोग्य खात्याने २०८ रुग्ण बरे ... Read More »

राज्यात १.६७ इंच पाऊस

राज्यात चोवीस तासांत सर्वच भागात जोरदार वार्‍यासह पावसाने हजेरी लावली असून राज्यभरात १.६७ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पावसाची रिपरिप सुरू झाली असून येत्या ५ ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात सांगे वगळता इतर भागात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ९३.५९ इंच पावसाची नोंद झाली आहे. मुरगाव येथे सर्वाधिक २.९२ इंच ... Read More »

विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री साधणार संवाद

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत येत्या ६ ऑगस्ट २०२० रोजी संध्याकाळी ६ ते ७ यावेळेत गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावी आणि बारावीची परीक्षा पूर्ण केलेल्या सुमारे १ हजार विद्यार्थ्यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी संवाद साधण्यासाठी राज्यातील प्रत्येक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयाने आपल्या दोन विद्यार्थ्यांना नियुक्त करावे, असे शिक्षण संचालक संतोष आमोणकर यांनी जारी ... Read More »

‘नगरनियोजन’ खात्याचा कारभार ऑनलाइन करा

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सूचना नगरनियोजन खात्याचा कारभार येत्या सहा महिन्यांत ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केली. नगरनियोजन खात्याच्या ऑनलाइन इमारत बांधकाम आराखडा मंजुरी सुविधेचा शुभारंभ केल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वरील सूचना केली आहे. यावेळी नगरनियोजन मंत्री चंद्रकांत कवळेकर आणि नगरनियोजन खात्याचे अधिकारी उपस्थित होते. नगरनियोजन खात्यात नागरिकांना अनेक विविध ... Read More »

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना कोरोना

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या मुलीलाही कोरोेनाची लागण झाली आहे. तिला बंगळुरुच्या मणिपाल इस्पितळामध्ये दाखल केले आहे. येडियुरप्पा यांनी काल रात्री ट्विट करुन आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे, असे त्यांनी म्हटले आहे. Read More »