आयुष

21-05-13

डॉ. सीताकांत घाणेकर

‘‘तमसो मा ज्योतिर्गमय....’’

-देवा, मला अज्ञानाच्या अंधःकारापासून ज्ञानाच्या प्रकाशाकडे ने ......

हे ज्ञान म्हणजे पवित्र, सात्त्विक ज्ञान.

‘‘शौच या राजयोगातील नियमाला असे शुद्ध ज्ञान’’ अभिप्रेत आहे. योगसाधकाने ही गोष्ट मुद्दाम नोंद करायला हवी.

........................................................

आजचे युग विज्ञानाचे आहे. प्रत्येक क्षेत्रात त्याची प्रगती नेत्रदीपक आहे. विज्ञानामुळे भौतिक सुखाच्या उत्तमोत्तम सोयी मानवाला मिळाल्या पण तो मात्र सुखी होऊ शकला नाही. याची कारणे अनेक आहेत पण मुख्य म्हणजे सुखाची व्याख्या विज्ञानाने त्याला दिलीच नाही. खरे म्हणजे विज्ञानाचे ते कामच नाही, ते म माचे आहे. पण आज बहुतेक व्यक्ती अध्यात्माकडे वळतच नाही. धार्मिक लोक पुष्कळ आहेत. ते फक्त कर्म कांडातच गुंतलेले आहेत. त्यामागचे तत्त्वज्ञान त्यांनी जाणून घेतलेच नाही. या तथाकथित र्म पंडितांमुळे विश्‍वाचे जास्त नुकसान होत आहे. सखोल अभ्यासाअंती असे कळले की र्म आणि अध्यात्म वेगळे नाही.

21-05-13

- प्रा. रमेश सप्रे

वनवासात फिरताना पुढे राम, मध्ये सीता व शेवटी लक्ष्मण असा क्रम असायचा. लक्ष्मणाची दृष्टी अखंड रामावर (परब्रम्हावर) स्थिर असायची, एखाद्या उंचवट्यावर सीता मध्ये आली व राम दिसेनासा झाला तर लक्ष्मण उड्या मारत चालायचा, कारण परब्रम्ह राम दृष्टीआड क्षणभरही होता कामा नये. जसा राम तसाच सद्गुरूही साक्षात परब्रम्ह. कुठलंही उन्नत, उदात्त, मंगल मधुर असं ध्येय (भगतसिंगाचं स्वातंत्र्य...वैज्ञानिक मेरी क्यूरीचं रेडियम, क्रीडापटू यांचं सोनेरी स्वप्न इ.) मात्र समोर असलं पाहिजे.. खरं ना?

...........................................................

 

इंद्रजित, रावणाचा पराक्रमी पुत्र. मूळ नाव मेघनाद. जन्मत:च ढगांसारखा गडगडाटी हसला म्हणून हे नाव. त्यानं जेव्हा आपल्या युध्दकौशल्यानं इंद्राला जिंकलं तेव्हापासून सारे त्याला म्हणू लागले - इंद्रजित! रावणसंहारापूर्वी याचा मृत्यू आवश्यक होता. गंमत म्हणजे स्वतः राम याचा वध करू शकणार नव्हता. याला मारू शकतील अशा दोनच व्यक्ती होत्या - हनुमान नि लक्ष्मण! इंद्रजिताला मारण्यासाठी ‘जितेंद्रिय’ असणं आवश्यक होतं. हनुमान तर मूर्तिमंत ‘जितेद्रियं बुध्दिमतां वरिष्ठम्’ असा होता. पण लक्ष्मणाचं काय? चौदा वर्षे तो निराहार निर्निद्रा अवस्थेत होता. म्हणजे रामसेवेत विघ्न येणार नाही इतपतच आहार व विश्रांती घेत होता. एरवी रात्रंदिवस रामसीतेच्या निरागस सेवेत मग्न होता. यातून त्याला ‘जितेंद्रियत्व’ प्राप्त झाले व त्यानं इद्रजिताला मारलं.

23-10-12

- डॉ. सीताकांत घाणेकर

योगशास्त्र हे मानवाच्या उन्नतीसाठी व सृष्टीच्या संवर्धनासाठी एक उत्कृष्ट पण गहन असे उच्च प्रतीचे तत्त्वज्ञान आहे. प्रत्येक योगमार्ग व अष्टांगयोगातील एक-एक अंग व्यवस्थित समजले, अभ्यास केला व आचरणात आणले तर सृष्टीतील प्रत्येक घटकाचे निश्‍चितच कल्याण होईल. सर्वत्र सुख-समाधान दिसेल.

अष्टांगयोगातील पहिलेच महत्त्वाचे अंग यम. ह्या पाच यमातील चौथा यम अपरिग्रह (असंग्रह). प्रत्येक विचारवंत मानवाने अभ्यास करण्यासारखा हा पैलू.

23-10-12

- प्रा. रमेश सप्रे

भारत, चीन या खूप प्राचीन संस्कृती आहेत. त्यांच्यात ज्ञानानं भरलेलं खूप वाङ्‌मय आहे. समाजमनाचा अनुभव व विवेक व्यक्त होतो तो म्हणीत(प्रोव्हबर्‌‌ज) नि सुभाषितात (कोटेशन्स)! शिक्षणासंबंधी अनेक सुविचार चिनी भाषेत आहेत. उदा. ‘शिकवता काहीच येत नाही... शिकता मात्र सगळं येतं.(नथिंग कॅन् बी टॉट; बट् एव्हरीथिंग कॅन बी लनर्‌‌ट!)’

असं एखादं सूत्रमय वाक्य ऐकताना कानाला गोड वाटतं तर विचार करताना मेंदूला मधुर लागतं. या सूत्राचा अर्थ तसा उघडच आहे. पण तरीही आधी उदाहरण पाहून तो अर्थ लक्षात घेऊ या.

16-10-12

- डॉ. सीताकांत घाणेकर

जीवनात प्रत्येक प्राण्याला जगण्यासाठी व स्वतःच्या जीवन विकासासाठी विविध गोष्टींची गरज भासते. त्यामध्ये अनेक गोष्टी भौतिक आहेत. ह्यातील थोड्या पूर्व सुकृतामुळे काही व्यक्तींना प्राप्त होऊ शकतात. धन, संपत्ती, घर, जमीन... पण अनेकांना त्यासाठी परिश्रम करावे लागतात. हे परिश्रम देखील प्रत्येकासाठी वेगळे असतात. काहींना थोड्याच परिश्रमानंतर पुष्कळ काही गोष्टी सहज मिळतात तर इतरांना पुष्कळ परिश्रम करून देखील थोड्याच गोष्टी उपलब्ध होतात. ही गोष्ट देखील पूर्वकर्माप्रमाणे अनेकवेळा असते. पण एक सत्य आहे की, परिश्रमाशिवाय काहीही मिळणे शक्य नसते. त्यासाठी प्रत्येकाला कर्म करावेच लागतात.

16-10-12

- प्रा. रमेश सप्रे

स्वामी विवेकानंदांचे शिक्षणविषयक विचार खूप मौलिक आहेत. संपूर्ण समाजासाठी किंवा देशासाठी शिक्षणपद्धतीची चर्चा करताना फार प्रभावी शब्द ते वापरतात. ‘माणूस घडवणारं नि राष्ट्र उभारणारं शिक्षण (मॅन मेकिंग अँड नेशन बिल्डिंग एज्युकेशन!)’ तर शिक्षण संस्थातील शिक्षणाची म्हणजे अध्यापन-अध्ययनाची प्रक्रिया वर्णन करताना स्वामीजी म्हणतात, ‘नॉट बंबार्डमेंट बट् अनफोल्डमेंट’ म्हणजे बाहेरून माहितीचे बॉंब (भडिमार) मुलांवर टाकू नका तर त्यांना आतून फुलू द्या. ..त्यांची मनं-बुद्धी आतून विकसित होऊ द्या.

09-10-12

- डॉ. सीताकांत घाणेकर

भगवंताचे विश्‍व फार मोठे आहे. त्यात विविधतेने भरलेली सृष्टी, तर्‍हेतर्‍हेचे जीवजंतु, पशूपक्षी, नदी-नाले-पर्वत, वृक्ष-वनस्पती ह्यातील उच्च स्थानात असलेला बुद्धिमान-मानव. सृष्टिकर्त्याची इच्छा की, सर्वकाही व्यवस्थित चालावे. सर्वांनी सुख-समाधान-शांतीने राहावे. अशी अपेक्षा असते. तेव्हा काही कायदे-कानून हवेच. नाहीतर सर्वत्र अव्यवस्था होऊन अंदाधुंदीमुळे सर्वांनाच त्रास होईल. सृष्टी देखील नाश पावेल.

09-10-12

- प्रा. रमेश सप्रे

रागावलेल्या युवकांच्या नेत्यानं एकदा हा प्रश्‍न विचारला होता. प्रसंग होता आंदोलनाचा परदेशातल्या. समोर होते पालक व शिक्षकांचे प्रतिनिधी. त्यांच्या विरोधात काढलेल्या मोर्चांचे नेतृत्व तो करत होता. विरोध हा ज्येष्ठ लोकांच्या मागासलेल्या विचारसरणीविरुद्ध होता.

02-10-12

- डॉ. सीताकांत घाणेकर

हजारो वर्षांपासून मानवी संस्कृतीची वाटचाल चालू आहे. मानवाचे पृथ्वीवरील जीवन सुखी, समाधानी व्हावे व शेवटी त्याला ईश्‍वर प्राप्ती व्हावी म्हणून भारतीय महापुरुषांनी विविध व्रतें सांगितली. त्यात एक प्रमुख व्रत म्हणजे ब्रह्मचर्य व्रत.

ब्रह्मचर्य व्रताचे निष्ठेने पालन करणारे अनेक संत, ऋषीच नव्हे तर इतर अनेक मानव हर युगात जन्मले. हल्लीच्या काळात जन्मलेले एक महापुरुष मोहनदास करमचंद गांधी- म्हणजेच महात्मा गांधी. त्यांनी आश्रमवासीयांसाठी अकरा व्रतांची संहिता बनवली होती. एकादश व्रते.

02-10-12

- प्रा. रमेश सप्रे

‘जगातून मगात’.. या सूत्रातील ‘जगा’चा आपण राहतो त्या जगाशी संबंध नाही, आणि ‘‘आधी तू दात घास ‘मग’ तुला चॉकलेट देते.’’ या वाक्यातील ‘मग’शी त्याचं काही नातं नाही. तस पाह्यला गेलं तर हे शिक्षणाचं पारंपरिक सूत्रही नाही.

मग ‘जगातून मगात’ ही काय भानगड आहे? सॉरी, हे काय प्रकरण आहे? तसं काही विशेष नाही, पण आपल्या सर्व स्तरावरील शिकवण्याचा एक अभिन्न भाग बनून राहिलेली ही एक पद्धती आहे. गंमत म्हणजे सदोष असूनही ती सर्वांनाच आवडते. शिक्षकांना, विद्यार्थ्यांना अन् हो पालकांनासुद्धा!