आयकॉन कार शॉर्ट सर्कीटमुळे जळून खाक

Story Summary: 

पर्वरी तीन बिल्डिंगजवळ काल दुपारी २.१५ वा. आयकॉन कार शॉर्ट सर्कीटमुळे जळून खाक झाली. ही कार वेरे येथील सर्वेश नाईक यांच्या मालकीची आहे. काल ते पर्वरीहून वेरेला घरी जात असताना अचानक गाडीतून धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ते लगेच गाडी थांबवून खाली उतरले. त्याचवेळी गाडीने पेट घेतला. आग विझविण्यासाठी म्हापसा व पणजीहून बंब मागविण्यात आले होते. (छाया : शेखर वायंगणकर)