बातम्या

17-04-14

निवडणूक काळातही आयोगाने वीज खात्याची गरज लक्षात घेऊन हजारावर कर्मचार्‍यांची भरती करण्यास मान्यता दिली होती. आता पावसाळा जवळ आल्याने रस्त्यांचे डांबरीकरण, हॉट मिक्सिंग, इमारत दुरुस्ती, पुलांच्या डागडुजीचे काम, वीत्त विषयक कामे तसेच राज्याचा संबंध येत असलेली कामे हाती घेण्यास आयोगाने मान्यता देण्याचे ठरविले आहे, अशी माहिती निवडणूक अधिकार्‍यांच्या सूत्रांनी दिली.

17-04-14

आजच्या टप्प्यात नंदन निलेकणी, मनेका गांधी, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली, श्रीकांत जेना, सुप्रिया सुळे, लालूंच्या कन्या मीसा भारती हे काही नावाजते चेहरे मतदारांना सामोरे जातील. आजच्या टप्प्यात १७६९ उमेदवार रिंगणात आहेत तर १२१ मतदारसंघांत १६.६१ नोंदणीकृत मतदार आहेत.

17-04-14

 वरील प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. टपालातून येणारी मते वेगळी ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना बोलावून दि. १२ रोजी झालेल्या निवडणुकीचा आढावा घेतला असता, दक्षिण गोवा व उत्तर गोवा या दोन्ही जागा कॉंग्रेसलाच मिळतील याची खात्री पटल्याचे फर्नांडिस म्हणाले.

17-04-14

माजी न्यायमूर्ती जे. एम. पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या लवादासमोर २७ मार्च रोजी सुनावणी सुरू झाली. त्यावेळी कर्नाटकाचे ज्येष्ठ वकील फली नरीमन यांनी युक्तीवाद करताना, १७ एप्रिल रोजी कर्नाटकात निवडणुका असल्याने लवादाने कर्नाटक विरोधी निवाडा दिला तर अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे सुनावणी १७ रोजी घेण्याची विनंती केली होती.

17-04-14

६१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

६१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची काल घोषणा झाली.

यावेळी आनंद गांधी यांच्या ‘शिप ऑफ थेसस’ या फिल्मला उत्कृष्ट फिचर फिल्म म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला. ‘भाग मिल्खा भाग’ सिनेमा लोकप्रिय सिनेमा गटात उत्कृष्ट चित्रपट ठरला. प्रादेशिक गटात लक्ष्मीकांत शेटगावकर यांच्या ‘बागा बीच’ चित्रपटाला उत्कृष्ट कोकणी चित्रपट म्हणून पारितोषिक मिळाले. मराठी भाषेत ‘आजचा दिवस माझा’ सिनेमाला पुरस्कार मिळाला. इंग्रजी भाषेत गोव्यात चित्रित झालेल्या ‘कॉफिन मेकर’ सिनेमाला पुरस्कार मिळाला. हिंदीत ‘जॉली एलएलबी’ उत्कृष्ट फिल्म ठरली.

17-04-14

कृषी संशोधन मंडळाचा प्रकल्प   • प्रदूषणामुळे होतेय घट 

समुद्रातील अत्यंत स्वादिष्ट अशा ‘कालवां’चे प्रमाण पाण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणामुळे कमी झाले होते. त्याचे उत्पादन वाढविण्यासाठी भारतीय कृषी संशोधन केंद्राने प्रकल्प हाती घेतला आहे.

17-04-14

राज्यातील काही विद्यालयांनी अंतिम परीक्षेनंतर शाळेचे वर्ग बंद केलेले असतानाच काही विद्यालयांनी मात्र परीक्षा संपलेली असताना वर्ग चालूच ठेवल्याने गोंधळाचे वातावरण आहे.

अंतिम परीक्षेनंतर विद्यालयाचे वर्ग बंद करण्याचा तसेच नव्या शैक्षणिक वर्षी वर्ग सुरू करण्यासाठीच्या सर्व विद्यालयांच्या तारखा एकच असताना यंदा मात्र वर्ग बंद करण्याच्या बाबतीत विविध विद्यालयांनी वेगळे धोरण अवलंबिले आहे. काही विद्यालयांनी वर्ग बंद केल्याने त्या विद्यालयातील विद्यार्थी सुटीचा आनंद लुटत असतानाच ज्या विद्यालयांनी वर्ग बंद केलेले नाहीत त्यांना विद्यालयात जावे लागत आहे.

17-04-14

गोव्यातील लोकसभेच्या उत्तर गोवा व दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी सुमारे २७ कोटी रुपये खर्च आल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली. आतापर्यंत निवडणुकीवर १८ कोटी रुपये खर्च झाला आहे. वेगवेगळे अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलांच्या मानधनासाठी ५ कोटी रुपये निश्‍चित केले आहेत.

17-04-14

येथील गुप्तचर पोलीस विभागातील उपनिरीक्षक विश्‍वनाथ तिळवे (५९) यांचे काल दुपारी कामावर असताना कार्यालयात हृदयविकाराने निधन झाले.

17-04-14

सहकारी पत्रकार महिलेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी सध्या कोठडीत असलेले तरुण तेजपाल यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अर्जावर दि. २१ रोजी सुनावणी निश्‍चित केल्याचे वृत्त आहे. प्रथम वर्ग न्यायालय, सत्र न्यायालय व उच्च न्यायालयांनी तेजपालना जामीन नाकारला होता.