June 2012

आषाढी एकादशी

- लक्ष्मण कृष्ण पित्रे

आषाढ हा भारतीय कालगणनेमध्ये चैत्रादि मासक्रमातील चौथा महिना आहे. त्याला ‘शुची’ असे दुसरे नावही आहे. हा महिना महत्त्वाचा अशासाठी की यामध्ये सूर्याचे कर्कसंक्रमण होते आणि मकर संक्रांतीपासून सुरू झालेला उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होतो. उत्तरायण हा देवांचा दिवस आणि दक्षिणायन ही देवांची रात्र अशी कल्पना आहे. ध्रुवप्रदेशामध्ये सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते. या वस्तुस्थितीवरून ही कल्पना आली असावी.

तेथे पंढरपूर वारी निषिद्ध

- लाडोजी परब

हातात कुठलंही शस्त्र नाही, पराक्रम केल्याच्या दंतकथा नाहीत, नवसाला पावणारा अशी ख्याती नाही. तरीही पंढरीचा विठ्ठल प्राणापेक्षा प्रिय झाला. कुठलीही अपेक्षा आणि लाभाची आशा न ठेवता लाखो वारकरी आजही पंढरीच्या दिशेने तीव्र ओढीने धावताना दिसतात. त्याचं एकमेव कारण आहे विठ्ठल. वारकरी संतांनी देवाविषयी असलेला धाक, भीती पार पुसून टाकली. त्याला आई, बाप, चुलता, सखा इतकंच नव्हे तर पती म्हणूनही संबोधलं. हे सर्व एका अलौकिक जिव्हाळ्यातून घडलं. एवढा भक्तीचा महिमा असतानाही कोकणातील काही गावांच्या परंपरा त्या भक्तीलाच आव्हान देतात. कोकणातून प्रत्येक गावातून विठ्ठलाची वारी निघते. पण तळकोकणातला कुडाळ तालुक्यातील वालावल हा गाव त्याला अपवाद आहे. येथून कुणीच विठ्ठलाच्या वारीला किंवा तीर्थयात्रेला जायचे नाही असा दंडक आहे.

अमरनाथ यात्रेच्या मार्गावर भाविकांसाठी उभारलेले तंबू

Story Summary: 

अमरनाथ यात्रेच्या मार्गावर भाविकांसाठी उभारलेले तंबू.

कर्नाटकात ८ भाजप मंत्र्यांचा राजीनामा

Story Summary: 

मुख्यमंत्री बदलण्याची मागणी

कर्नाटक भाजप सरकारमधील वादाने पुन्हा एकदा तोंड वर काढले असून काल माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांचे समर्थक असलेल्या ८ मंत्र्यांनी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले. सदानंद गौडा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्याची त्यांची मागणी आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा येडीयुराप्पांना आणण्याकरिता केंद्रीय नेतृत्वावर दबाव टाकण्याचा तंत्राचाच हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.

बड्या गुंतवणुकदारांना गोव्यात आणणार

Story Summary: 

मुख्यमंत्र्यांची घोषणा; १२ टक्के विकास दराची अपेक्षा

येत्या जुलैनंतर आपण बड्या गुंतवणूकदारांना गोव्यात आणण्यासाठी पावले उचलणार असून चालू आर्थिक वर्षअखेरपर्यंत राज्याचा विकासदर १२ टक्क्यांवर आणण्याचा आपला प्रयत्न असेल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल जाहीर केले.

गोवा लघु उद्योग संघटनेच्या सर्वसाधारण बैठकीत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पदाचा ताबा घेतला तेव्हा राज्य सरकार वेगवेगळी बिलांची रक्कम मिळून एक हजार २०० कोटी रुपये देणे होते. आपण ती देणी पूर्णपणे फेडली आहेत. त्यामुळेच आता आपल्याला विकासाचा विचार करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान बनू शकलो नाही याची खंत वाटत नाही : प्रणव

Story Summary: 

देशाचा पंतप्रधान बनू शकलो नाही याची खंत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांनी काल एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. संयुक्त पुरोगामी आघाडीने मला राष्ट्रपतीपदासाठी योग्य मानले यामुळे आपल्याला सन्मानित झाल्यासारखे वाटत असून पंतप्रधान होऊ शकलो नाही याची खंत वाटत नाही असे ते म्हणाले.

आजच्या आघाड्यांच्या राजकारणात राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवणे सोपे राहिलेले नाही अशी पुस्तीही त्यांनी जोडली. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याविषयी त्यांनी यावेळी गौरवोद्गार काढले.

कृषी उत्पादन वाढीसाठी‘एसआरआय’ची जागृती करणार

कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी कृषी खात्याने कंबर कसली असून गोव्यात एस.आर.आय. या नव्या पद्धतीचा अवलंब करण्याचे खात्याने ठरविले आहे, अशी माहिती कृषी संचालक सतीश तेंडुलकर यांनी दिली.

जीसीए अहवाल सरकारला सादर

गोवा क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव चेतन देसाई यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय समितीने जीसीएबाबत चौकशीचा अहवाल काल उत्तर गोव्याचे जिल्हा निबंधक वासुदेव हडकोणकर यांच्याकडे सादर केला. अहवाल सादर केल्यानंतर श्री. देसाई यांनी सांगितले की, असोसिएशनच्या सुरळीत कारभारासाठी अहवालात आठ शिफारसी करण्यात आल्या आहेत.

कुळे-वास्को व पाटणा-वास्को रेलगाड्यांच्या वेळेत बदल

दक्षिण - पश्‍चिम रेल्वेने कुळे -वास्को पॅसेंजर व पाटणा - वास्को साप्ताहिक रेलगाडीच्या वेळापत्रकात १ जुलैपासून बदल केला आहे.

नव्या वेळापत्रकानुसार, कुळे - वास्को पॅसेंजर कुळे येथे स. ६.३९ ऐवजी ६.४९ वाजता येईल व स. ६.४० ऐवजी ६.५० वाजता परत जाईल.

मातीशिवाय हिरवा चारा पिकणार

गेली शेकडो वर्षे जमिनीवर शेती करण्याची परंपरा पहावयास मिळते पण आताच्या नव्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात मातीशिवाय शेती करण्याची पद्धतही दिसून येत आहे. ठिकठिकाणी हिरवा चारा उत्पादनासाठी हायड्रोकेनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

’कदंब’ देखभालीसाठी निवडलेल्या कंपनीस विरोध

कदंब महामंडळाच्या बसगाड्यांची देखभाल करण्याची जबाबदारी चौगुले मजदा या कंपनीवर सोपविण्यास कदंब वाहतूक मंडळाच्या कर्मचारी संघटनेने विरोध केला आहे. वरील निर्णय घेताना संघटनेला विश्‍वासात घेणे आवश्यक होते. परंतु महामंडळाच्या व्यवस्थापनाने तो घेतला नाही.

दोन पोलीस अधीक्षकांची पदावनती

सरकारने जारी केलेल्या एका आदेशाद्वारे गेल्या चार वर्षापूर्वी हंगामी तत्त्वावर पोलीस अधीक्षकपदी नियुक्त केलेले वामन तारी व फ्रान्सिस फर्नांडिस यांची उपअधीक्षक म्हणून पदावनती केली आहे.

पाऊले चालती पंढरीची वाट

(उत्तरार्ध)

- प्रा. प्र. शं. तासे

वारकरी शुद्ध आचरणावर भर देतो. स्नान झाल्यावर तुळशीला पाणी घालून तिची पूजा करतो. गोपीचंदनाचा टिळा ज्ञानेश्‍वरीस लावतो. त्यातील थोड्या थोड्या ओव्या रोज वाचतो. नंतर विठ्ठलपूजा करून तीर्थ घेतो. आरती करतो. देवाला व संतांना भोजन घालून वंदन करतो व मग जेवतो. घास घेताना श्रीहरीचे नाम घेतो. प्रपंचातील कर्मे सचोटीने आणि प्रेमाने करतो. सायंकाळी हरिपाठ म्हणतो. रात्री भजन करतो, व प्रभुचिंतनातच झोपी जातो. - वारीतून पंढरीस गेल्यावर घोटी ‘देव प्रदक्षिणा’ करतो. महाद्वार घाटापासून आरंभ करून पुंडलिक मंदिरास भेट देऊन पुढे दत्तात्रेय, काळा मारूती, चोपळा यांचे दर्शन घेतो. शेवटी उद्धवघाटाची फेरी पूर्ण करतो. ’नगर प्रदक्षिणा’ त्या मानाने मोठी असते. उपलब्ध वेळ आणि गर्दीचे तारतम्य बघून तो एक तरी प्रदक्षिणा करतो. - ही वारकर्‍यांची आचारप्रणाली असते.

आश्वासक यश

छत्तीसगढमध्ये माओवाद्यांविरुद्धच्या कारवाईला आलेले यश सुरक्षा दलांचा आत्मविश्वास वाढवील यात शंका नाही. आजवर केवळ माओवाद्यांच्या गनिमी काव्याने होणार्‍या हल्ल्यांना बळी पडणारे जवान यावेळी प्रथमच त्या देशद्रोह्यांना कंठस्नान घालण्यात यशस्वी ठरले. जे किमान वीस माओवादी यमसदनास गेले, त्यामध्ये काही निष्पाप नागरिक असल्याचा ओरडा आता मानवतावादी करतील, परंतु मध्यरात्रीनंतर माओवाद्यांच्या छावणीमध्ये हे लोक काय करीत होते या प्रश्‍नाचे उत्तर आधी त्यांना द्यावे लागेल. माओवाद्यांविरुद्धच्या अशा आक्रमक कारवाईसंबंधी नाके मुरडणार्‍यांनी आजवरच्या त्यांच्या क्रौर्याबाबत मात्र कधी चकार शब्द काढलेला दिसला नाही. कालची चकमक जेथे घडली, त्याच परिसरामध्ये दोन वर्षांपूर्वी माओवाद्यांनी जो हैदोस घातला होता, तेव्हा त्यांचे बुद्धिवादी समर्थक चिडीचूप बसले होते. आता त्यांना कंठ फुटेल, परंतु देशापुढे कोणी मोठा नाही. माओवाद्यांची समस्या ही देशापुढील एक अत्यंत गंभीर समस्या आहे. कर्करोगासारखी ही विषवल्ली फोफावत चालली आहे. गोरगरिबांच्या कैवाराच्या बाता मारत आणि विदेशी शक्तींशी संधान साधत हे देशद्रोही रानावनांचा आसरा घेत या सार्वभौम देशालाच ललकारत राहिले आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यात सरकारला आजवर आलेल्या अपयशामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. दोन वर्षांपूर्वी तर त्यांच्या कारवायांनी कळस गाठला होता.

आसामात पुरामुळे लोकांचे स्थलांतर

Story Summary: 

आसामची राजधानी गुवाहाटीपासून काही अंतरावरील मेयॉंग गावात आलेल्या पुरामुळे एकजण आपले सामान इतरत्र वाहून नेताना. आसाममध्ये पावसामुळे पूरस्थिती भयानक बनल्याने २७ जण मुत्यूमुखी पडले असून सुमारे ९ लाख लोकांना स्थलांतर करावे लागले आहे.

पेट्रोल २.४६ रु. स्वस्त; आणखी कपात शक्य

Story Summary: 

पेट्रोल दरात काल मध्यरात्रीपासून लिटरमागे दरात रु. २.४६ कपात करण्यात आली. ही या महिन्यातील दुसरी कपात असून येत्या काही दिवसांत पेट्रोल दरात आणखी कपातीची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

दरम्यान, पेट्रोलचे १ रु.ने आणखी स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काल करण्यात आलेली कपात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाच्या किमतीचा जूनच्या पहिल्या पंधरवड्यातील आढाव्यानंतर करण्यात आली आहे. मात्र पहिल्या पंधरवड्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाचे दर आणखी ८ टक्के कमी झाले आहेत.

आणखी दोन अमरनाथ यात्रेकरूंचा मृत्यू

उच्च रक्तदाबामुळे आणखी दोन अमरनाथ यात्रेकरूंचा मृत्यू झाला असून मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांची संख्या आठ झाली आहे.

दरम्यान, ३८८० मीटर उंचीवरील अमरनाथ गुफेत शिवलिंगाचे ६० हजार पेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले.

प्रणव मुखर्जी, संगमा यांचे उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रपती निवडणूक

राष्ट्रपती निवडणुकीसाठीचे संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार प्रणव मुखर्जी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार पी. ए. संगमा यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी दोन्ही नेत्यांचे सर्मर्थक नेते उपस्थित होते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक दि. १९ जुलै रोजी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून मुळेंविरुद्धच्या अविश्‍वास ठरावास अंतरिम स्थगिती

Story Summary: 

गोवा राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रामचंद्र मुळे यांच्यावरील अविश्‍वास ठरावाला काल सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

राज्य सहकार निबंधकांनी मुळे यांच्यावरील अविश्‍वास ठरावावर चर्चेकरिता बैठक बोलावली होती ज्यात मुळेंविरुद्धचा ठराव संमत झाल्याने त्यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते. निबंधक ठरावावर चर्चेकरिता बैठक बोलावू शकत नाहीत असे सांगत त्यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळली होती.

‘गुप्तहेर म्हणूनच पाकिस्तानात गेलेलो’

सुरजीत सिंग भारतात

सुमारे ३० वर्षांनंतर पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटलेला सुरजीत सिंग काल भारताच्या भूमीवर दाखल झाले. आपण भारताची गुप्तचर संस्था असलेल्या ‘रॉ’च्यावतीने पाकिस्तानात गेलो होतो असेही ६९ वर्षीय सुरजीतनी सांगितले.

‘इफ्फी’ची धुरा पुन्हा सरकारी अधिकार्‍यांकडे

कलाकारांच्या वर्तुळात नाराजी

इफ्फीचे संचालक शंकरमोहन यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर नव्या संचालकाची नियुक्ती न करता केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने इफ्फीच्या आयोजनासाठी पाच सरकारी खात्यातील मिळून पाच अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे पुन्हा एकदा इफ्फी सरकारी अधिकार्‍यांच्या हातातील बाहुली बनण्याची शक्यता निर्माण झाली असल्याच्या प्रतिक्रिया चित्रपट क्षेत्रातील कलाकार व तज्ज्ञमंडळींकडून व्यक्त होऊ लागल्या आहेत.

शालेय बसेससाठीचे नियम मंजुरीविना अडून

बहुतेक शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आता बसमधून प्रवास करावा लागत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक खात्याने स्कूल बसेससाठी नियमतयार केले असले तरी कायदा खात्याने या नियमांना अद्याप मंजुरी दिली नसल्याने त्याची अमलबजावणी लांबणीवर पडली असल्याचे वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई यांनी सांगितले.

पाऊले चालती पंढरीची वाट

(पूर्वार्ध)

- प्रा. प्र. शं. तासे

ग्रीष्म सरला. उन्हाचा उष्मा निवाला. आभाळात कृष्ण मेघावली दाटीदाटीने उभी आहे. अवचित सरींवर सरी, मेघामेघांतून गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू होतो आहे. पाऊस बरसू लागत आहे. असे तीन-चार पाऊस होतात, हवेत गारवा, माळरानावर हिरवा आणि मनात समाधानाचा शिडकावा दाटून येतो... पाऊस धरित्रीला वर्षानंतर प्रथमच भेटतो. ऊन प्रखरपणा पाण्यात भिजवून भूमीला आश्वासित करीत असते. एकूणच वातावरणात भेटीची आस, उतट, उत्कट आणि उत्कंठ होऊन भरून राहिलेली असते. पार्थिवाला अपार्थिवाची आणि अपार्थिवाला पार्थिवाची भेट अपरिहार्य वाटू लागते. आकाश मार्गाने मेघ वारकरी होऊन वसुधेच्या भेटीस येतात आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या ओढीने गरजणार्‍या, बरसणार्‍या मेघांची तमा न बाळगता गावोगावाहून वारकरी निघतात आणि पूर्वापार चालत आलेल्या एका प्रगाढ संस्काराला या वर्षीचे गोपीचंदनाचे पावन बोट लावतात.... आपणही या वारीचे थोडे चिंतन करून हा टिळा लावून घेऊया.

रेल्वे लुटारू

एका दूरचित्रवाणी वाहिनीने रेल्वे तिकीट आरक्षणातील नव्या घोटाळ्याचा नुकताच पर्दाफाश केला. सातत्याने असे प्रकार उजेडात येऊनही भारतीय रेल्वे प्रशासन आपले कर्मचारी आणि काळाबाजारी यांच्या संगनमताने होणार्‍या या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात पूर्ण अपयशी ठरलेले आहे. परिणामी रेल्वे तिकिटे आरक्षित करू पाहणार्‍या सर्वसामान्य प्रवाशांना तासन्‌तास रांगेत राहूनही कन्फर्म्ड तिकिटे मिळू शकत नाहीत आणि विशिष्ट तिकीट एजंट आणि त्यांच्या दलालांना मात्र हवी तेवढी कन्फर्म्ड तिकिटे उपलब्ध होतात. रेल्वेने आपली तिकीट आरक्षण व्यवस्था ऑनलाइन केली तरी त्यातूनही पळवाटा काढण्यात हे ठग यशस्वी ठरलेले आहेत. गेल्या वर्षी आयआरसीटीसीच्या ज्या संकेतस्थळावरून रेल्वेचे तिकीट आरक्षण केले जाते, ती हॅक करून हवी तेवढी तिकिटे आरक्षित करून चढ्या दराने म्हणजे जवळजवळ दामदुपटीने गरजू प्रवाशांना विकणारी टोळी पकडली गेली होती. त्यासाठी खास सॉफ्टवेअरही विकसित केले गेले होते. आता रेल्वेच्या ‘तात्काळ’ तिकिटाच्या आरक्षणासाठीही हीच पद्धत वापरली जात असल्याचे आढळून आलेले आहे. म्हणजे केवळ व्यक्ती बदलल्या आहेत.

भाषा माध्यम प्रश्‍न : काही स्वैर विचार

- संजीव कामत, ९८५००४७१४९

मी कोणी भाषातज्ज्ञ नाही, किंवा मी इथे भाषा माध्यमविषयक वादामध्ये कोण बरोबर व कोण चूक याची शहानिशा करायला हा लेख लिहीत नाही. माझे असे प्रांजळ मत आहे की या राज्यातील प्रत्येक सुजाण नागरिकाला आपल्या पाल्याला कोणत्या भाषेत शिकवावे हे ठरवण्याचा अधिकार आहे व त्याप्रमाणेच सरकारने त्याच्या या अधिकाराचा आदर करून या शाळांना अनुदान देऊन आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. फक्त ती भाषा ही भारतीय अधिकृत भाषा असली पाहिजे व शाळा सुरू करताना पुरेसे संख्याबळ असले पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी व ती म्हणजे कुठल्याही राज्यात जरी एक अधिकृत राज्यभाषा असली तरी सर्व सरकारी किंवा अन्य व्यवहार हे ‘इंग्रजी’ या भाषेतूनच चालतात, व त्यामुळे सध्या तरी इंग्रजीला पर्याय नाही. १९९० सालापासून सर्व काही सुरळीत चाललेले असताना अचानक मागच्या वर्षी हा वाद का निर्माण झाला याचा उहापोह करताना मनात काही स्वैर विचार आले, त्यामुळे हा पत्रप्रपंच!

‘गोव्याचे मुख्यमंत्री एवढे स्वस्त नाहीत’

Story Summary: 

 पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर.

 

 

कापडावरील मूल्यवर्धित कर रद्द

Story Summary: 

निवृत्त कर्मचार्‍यांनाही बोनस

शैक्षणिक कर्जाच्या रकमेत वाढ

कापडावर लागू करण्यात आलेला ५ टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सचिवालयात बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

शैक्षणिक कर्जाच्या रकमेत वाढ

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देण्यात येणार्‍या कर्ज योजनेत आमुलाग्र बदल करण्याचा तसेच कर्जाची मर्यादा वाढवण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी पुढे सांगितले. विदेशात शिक्षण घेण्यासाठी पूर्वी जास्तीत जास्त ८ लाख रु. एवढे कर्ज देण्यात येत असे. ते आता वाढवून जास्तीत जास्त १२ लाख रु. पर्यंत देण्याचा निर्णय झाल्याचे, तसेच देशात शिक्षण घेण्यासाठी पूर्वी जे ४ लाख रु. एवढे कर्ज देण्यात येत असे ते आता वाढवून जास्तीत जास्त ८ लाख रु. पर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कुर्टी येथे साकवावरून बस कोसळली; १८ जखमी

Story Summary: 

काल दुपारी ४च्या दरम्यान साकोर्डे येथून फोंडा मार्गे आलेली जी. ए. ०२ टी ४६०६ क्रमांकाची सुप्रिया ही प्रवासी निनीबस येथे रस्त्यावर घसरून दोन साकवांमध्ये खोल कोसळल्याने चालक व वाहकासह एकूण १८ जण जखमी झाले. पैकी १६ प्रवाशांना गोमेकॉत दाखल केले असून एकाची स्थिती गंभीर आहे. या साकवांना कठडे नसल्याने ही दुर्घटना घडली.

याबाबत समजताच अग्नीशामक दलाच्या जवानांनी व लोकांनी मिळून बसमध्ये अडकून पडलेल्यांना बाहेर काढले. त्यांना सुरूवातीस आय.डी.इस्पितळात नेण्यात आले व तेथून १६ जणांना गोमेकॉत नेण्यात आले.

जखमींपैकी गौरेश गावकर (१९), साकोर्डे याची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.

भू-नकाशे आता ऑनलाईन

Story Summary: 

गोवाभरातील भू नकाशे ऑनलाईन उपलब्ध करून देण्याच्या ‘धरनक्ष’चे काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सचिवालयात बटन दाबून उद्घाटन केले. महसूलमंत्री फ्रान्सिस डिसोझा हेही यावेळी हजर होते.

याप्रसंगी बोलताना फ्रान्सिस डिसोझा म्हणाले की, भू-नकाशे ऑनलाईन उपलब्ध करून दिल्याने राज्यातील जनतेची फार मोठी सोय झाली आहे. अशा प्रकारे संपूर्ण राज्यभरातील भू-नकाशे ऑनलाईन जनतेसाठी उपलब्ध करून देणारे गोवा हे पहिलेच राज्य ठरले असल्याचे त्यानी अभिमानपूर्वक सांगितले.

एनआयटीमध्ये या वर्षीपासून केवळ गोव्याला ५० टक्के जागा

गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये केवळ गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी या वर्षीपासून पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यास केंद्र सरकारने आपली संमती दिली आहे. या शैक्षणिक वर्षापासूनच हा निर्णय लागू होणार आहे. यापूर्वी गोव्याबरोबरच दादरा आणि नगरहवेली, दीव व दमण तसेच लक्षद्वीपच्या विद्यार्थ्यांना मिळून पन्नास टक्के जागा राखीव ठेवल्या गेल्याने गोमंतकीय जनतेमध्ये नाराजी व्यक्त होत होती. केवळ गोव्यासाठी पन्नास टक्के जागा राखीव असाव्यात अशी मागणी त्यामुळे पुढे आली होती.

मुंबई हल्ल्यानंतर कराचीच्या नियंत्रण कक्षात जल्लोष!

अबू जिंदलची चौकशी अधिकार्‍यांपाशी कबुली

मुंबईवरील दहशतवादी हल्ला एनएसजी कमांडोंनी संपुष्टात आणला तेव्हा अवघा भारत जल्लोष करीत असताना दुसरीकडे कराचीतील दहशतवाद्यांच्या नियंत्रण कक्षात या कटाचे सूत्रधारही हल्ला सफल झाल्याबद्दल ‘‘मुबारक हो’’ म्हणत आनंद व्यक्त करीत होते, एकमेकांना मिठ्या मारत होते अशी माहिती नुकताच भारताच्या ताब्यात आलेला दहशतवादी अबू हमजा ऊर्फ अबू जिंदल ऊर्फ जुंदल याने दिली आहे. कसाब पकडला गेला त्याची थोडी खंत मात्र त्यांना वाटत होती, असेही अबूने भारतीय चौकशी अधिकार्‍यांना सांगितले.

नावेली दरोडाप्रकरणी आणखी तिघांना अटक

शिरवडे नावेली येथील श्यामकुमार महादेव जामुनी यांच्या कचेरीत घुसून दरोडा घालून २.५० लाख रुपयांना लुटल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी आणखी तिघांना काल अटक केली. राजू तलवार (खारेबांध), विजय मास्तोळी व मारुती नाईक या तिघांची नावे असून काल तिघांना अटक केली होती.

सोडलेला सुरजीत, सरबजीत नव्हे

पाकिस्तानचे वक्तव्य

कोकणी परिभाषा कोषांचे कामप्रगतिपथावर : वजरीकर

कोकणी भाषेच्या विकासाबरोबरच कोकणीतून सरकारी कामकाज करता यावे यासाठी गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयाने कोकणी परिभाषाकोष तयार करण्याचे कामहाती घेतले असून प्रशासकीय परिभाषा कोषाचे कामपूर्ण करून तो छापण्यासाठी सरकारी छापखान्यात पाठवला असल्याचे राजभाषा संचालक प्रकाश वजरीकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

मारहाण करून सोनसाखळी लांबवली

मडगाव येथील फार्मासीत कामकरणारा कर्मचारी मिनीनो फेलिक्स क्रास्टो याला नूतन जिल्हा हॉस्पिटलजवळ दोघा भामट्यांनी अडवून मारहाण केली व गळ्यातील साखळी तसेच ब्रेसलेट हिसकावून घेऊन गेले. त्याची किंमत एक लाख रुपये असल्याचे मडगाव पोलीस स्टेशनवरील दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

क्रूर थट्टा

पाकिस्तानच्या तुरुंगात गेली काही दशके खितपत पडलेल्या सरबजितसिंग याला राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारींनी फाशीच्या शिक्षेत माफी दिलेली नसून जन्मठेपेची सजा पूर्ण केलेल्या सुरजित या दुसर्‍याच कैद्याची सुटका केली जाणार आहे असे स्पष्टीकरण करून पाकिस्तानने स्वतःचे तर हसे करून घेतले आहेच, परंतु भारतीयांची ही क्रूर थट्टाही आहे. सरबजितची फाशी जन्मठेपेत रूपांतरीत केली गेल्याच्या बातम्या येताच आपले परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. एम. कृष्णा यांनी लगोलग पाकिस्तान सरकारच्या त्या निर्णयाचे ‘स्वागत’ करून कौतुकही केले होते. पण काही तासांतच पाकचा जो खुलासा आला त्याने कृष्णा यांच्या चेहराचा रंगच उडाला असेल. एखाद्या देशाच्या सरकारकडून अशा प्रकारे ‘ध’ चा ‘मा’ केला जाणे आश्‍चर्यजनक तर आहेच, परंतु नंतर ती चूक दुरुस्त करायला पाच तास का जावे लागले हेही गूढच म्हणावे लागेल. पाकिस्तान सरकारकडून खरोखरच नावात चूक झाली की सरबजितची सुटका करण्याच्या राष्ट्राध्यक्ष झरदारींच्या निर्णयाला पाक लष्कराकडून वा सरकारमधील प्रभावी घटकांकडून कडाडून विरोध झाला याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जागृती रॅली

Story Summary: 

अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त काल मडगावात जागृती रॅलीत सहभागी विद्यार्थी. (छाया : गणादीप शेल्डेकर)

नावेलीत दरोड्यात २ लाख रु. लुटले

Story Summary: 

तिघांना अटक

राजीव पै रायतुरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून लुटण्याची घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री ११ वाजता नावेलीत शिरवडे गावसिया मशिदीजवळील श्यामकुमार महादेव जामुनी यांच्या दुकानवजा कचेरीवर सात-आठ जणांनी दरोडा घालून दंडुक्यांनी प्राणघातक हल्ला केला व २ लाख रुपये पळविल्याचा प्रकार घडाला आहे. दुकानाचेही ५० हजार रुपयांचे नुकसान केले. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.

परवा रात्री श्यामकुमार जामुनी हे शिरवडे येथील कचेरीत कर्मचार्‍यांसोबत होते. रात्री अचानक ११ वाजता सात आठ जण बाटल्या दंडूके घेऊन बळजबरीने आत घुसले व दंडुक्यांनी मारहाण केली, तर काहीजणांनी जीवे मारण्याची धमकी दिली व पैसे लुटू लागले. त्या मारहाणीत जामुनी हे गंभीर जखमी झाले. चोरट्यांनी जाताना मोबाईलही पळविले. पोलिसांना वृत्त समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. जखमी जामुनी यांना त्याआधीच उपचारासाठी हॉस्पिसियु इस्पितळात दाखल केले होते.

हमजा - कसाब येणार आमनेसामने

Story Summary: 

लष्कर ए तोयबाचा महत्त्वाचा हस्तक दहशतवादी अबू जिंदाल ऊर्फ अबू हमजा या ताबा मिळविण्याची प्रक्रिया मुंबई पोलिसांनी सुरू केली असून मुंबईत आणल्यावर मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याच्यासमोर नेण्यात येणार आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ला कसा आखण्यात आला व त्याची अंमलबजावणी कशी झाली तसेच सीमापारहून त्याला मदत झाली काय याबाबत अनेक सत्ये उजेडात येणार असल्याची पोलिसांना अपेक्षा आहे.

चार दशकांची राजकीय कारकीर्द सोडून नव्या प्रवासाला : प्रणव

Story Summary: 

अर्थमंत्रीपदाचा राजीनामा सादर

राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी काल आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. येत्या १९ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत असून सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या वतीने श्री. मुखर्जी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

‘‘चार दशकांची राजकीय कारकीर्द मी सोडून चाललो आहे’’ असे भावपूर्ण उद्गार श्री. मुखर्जी यांनी यावेळी काढले.

‘‘मी घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबर असेलच असे नव्हे, परंतु मी जे निर्णय घेतले ते जनहित नजरेसमोर ठेवूनच घेतले’’ असेही श्री. मुखर्जी यांनी सांगितले. ‘‘मी नव्या प्रवासाला निघालो आहे’’ असे उद्गारही त्यांनी यावेळी काढले. संयुक्त पुरोगामी आघाडीने आपल्याला राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली आणि सप, बसप, जेडीयू, शिवसेना, माकप, फॉरवर्ड ब्लॉक आदी पक्षांनी आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल प्रणव मुखर्जी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

पाच पोलीस अधीक्षकांच्या बदल्या

पाच पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दक्षिण गोव्याचे अधीक्षक अरविंद गावस यांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे. तर किनारपट्टी सुरक्षा अधीक्षक ऍलन डिसा यांची बदली दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

भात बियाण्याच्या मागणीत यंदा वाढ

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी यावर्षी कृषी उत्पादनात ६ टक्के वाढ करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून कृषी क्षेत्रात अनेक योजना राबविण्याचे ठरविले आहे. सरकारच्या या प्रयत्नांना शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकर्‍यांनी अधिक बियाणे नेल्याची माहिती कृषी संचालक सतीश तेंडुलकर यांनी दिली.

राज्य सहकारी बँकेच्या नव्या अध्यक्षांची सोमवारी निवड

सहकार निबंधकांनी गोवा राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवार दि. २ जुलै रोजी घेण्याचे ठरविले असून त्याच दिवशी सकाळी बँकेचे उपाध्यक्ष भामानिया यांच्यावरील अविश्‍वासाच्या ठरावावर चर्चा करण्यासाठी बैठक निश्‍चित केली आहे.

‘तात्काळ’ रेल्वे तिकिटांचा काळाबाजार उघड

दूरचित्रवाणी वाहिनीने केले स्टिंग ऑपरेशन!

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची प्रवाशांची नेहमीची तक्रार आहे. यापूर्वी अनेकदा रेल्वे तिकीट विक्रीतील गैरप्रकार चव्हाट्यावर आले आहेत. मध्यंतरी देशभरात छापेही टाकले गेले, परंतु तरी आजही असे गैरप्रकार सुरूच असल्याचे सीएनएन - आयबीएन या वाहिनीच्या ताज्या स्टिंग ऑपरेशनमुळे उघडकीस आले आहे. आत्यंतिक गरजेच्या वेळी प्रवास करावा लागणार्‍या प्रवाशांसाठी रेल्वेने जी ‘तात्काळ’ योजना चालीस लावलेली आहे, त्याखालील तिकिटांचाही काळाबाजार सुरू असल्याचे या स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.

भारतीय सरबजीतची फाशी पाक राष्ट्राध्यक्षांकडून माफ

गुप्तहेर असल्याच्या संशयावरून पाकिस्तानच्या कारागृहात गेली २२ वर्षे खितपत पडलेला भारतीय नागरिक सरबजीत सिंग याची फाशीची सजा पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी कमी करून ती जन्मठेप केल्याने लवकरच त्याची मुक्तता होईल. १९९० मध्ये पाकिस्तानात येणार्‍या पंजाब प्रातांत बॉम्बस्फोट घडविल्याप्रकरणी फाशी सुनावण्यात आली होती.

सनदी अधिकारी दि. २ पासूनगिरवणार कोकणीचे धडे

गोव्यात काम करणारे आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकारी, भारतीय वन अधिकारी यांना कोकणी शिकवण्यासाठीचे वर्ग २ जुलैपासून सुरू होणार असून ते १३ ऑगस्टपर्यंत चालणार असल्याचे राजभाषा संचालनालयाचे संचालक प्रकाश वजरीकर यांनी काल सांगितले.

गोव्याची कॉंग्रेस : बुडत्याचा पाय खोलात!

- दिलीप बोरकर

बुडत्याचा खोलात पाय म्हणतात ती सध्या गोवा प्रदेश कॉंग्रेस पक्षाची गत झालेली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने स्वतःहून आपल्या पायांवर दगड मारून घेतलेला आहे, हे आता सदर पक्षातील ‘विनेबल’ नेत्यांनाही मान्य करावे लागले आहे. बहुमताने निवडून येऊन याच गोव्यावर पुढील पाच वर्षे परत एकदा सत्ता राबवू अशा गुर्मीत असलेल्या या पक्षाला एक चतुर्थांशसुद्धा जागा जिंकता न आल्याने नामुष्कीला तोंड द्यावे लागले होते. ते कमी म्हणून की काय कुठ्ठाळी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पक्षाने उरलीसुरली लाजही घालवून टाकलेली.

जिताजागता पुरावा

सन २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा एक प्रमुख सूत्रधार अबू हमजा ऊर्फ अबू जिंदल याच्या मुसक्या आवळण्यात भारतीय गुप्तचर यंत्रणेला अखेर यश आले. जिंदलचा सौदी अरेबियात माग काढून त्याला भारताकडे सोपवण्यास सौदी अरेबियासारख्या इस्लामी राष्ट्राला भाग पाडणे हे खरेच मोठे यश आहे. भारताच्या ताब्यात असलेल्या अजमल कसाब इतकाच अबू जिंदल हा या हल्ल्यातील महत्त्वाचा माणूस आहे. मुंबईवर हल्ला करणार्‍या दहा दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्यापासून त्यांना हिंदी आणि मराठीतील काही वाक्ये पढवण्यापर्यंत जिंदल याचा सहभाग तर आहेच, परंतु प्रत्यक्ष हे दहा दहशतवादी भारताकडे यायला निघाले तेव्हा त्यांना कराची बंदरावर निरोप द्यायला जे गेले होते, त्यामध्येही जिंदल होता. इतकेच कशाला, प्रत्यक्ष मुंबई हल्ला सुरू झाला तेव्हा कराचीतील नियंत्रण कक्षात बसून हल्लेखोरांला भ्रमणध्वनीवरून प्रत्यक्ष दिशादिग्दर्शन करणाराही तोच होता. जिंदल हा भारतीय नागरिक असल्याने या सार्‍या हल्ल्याच्या कटामध्ये त्याचा आयएसआयने पुरेपूर वापर करून घेतलेला दिसतो. डेव्हीड कोलमन हेडली हा अमेरिकी नागरिक असल्याने आणि जिंदल हा भारतीय असल्याने यदाकदाचित ते सापडले तर पाकिस्तानकडे अंगुलीनिर्देश करता येऊ नये याचा बंदोबस्त आयएसआयने केला होता.

योगमार्ग-राजयोग (योगसाधना : १३४) (अस्तेय - १७ )

डॉ. सीताकांत घाणेकर

समाज व्यवस्थित चालावा म्हणून पूर्वजांनी काही ठरावीक गोष्टी ठरवल्या. त्यात एक म्हणजे- कुणीही चोरी करू नये - अचौर्य, अस्तेय. विविध तर्‍हेच्या चोर्‍यांत एक चोरी विचारांती लक्षात येते ती म्हणजे- वेळेची चोरी.

मानवी जीवनात वेळेचे महत्त्व फारच आहे. कारण गेलेली वेळ केव्हाही परत येत नाही. म्हणून वेळेचा सदुपयोगच करायला हवा. म्हणून ह्या विषयाबद्दल चिंतन व संस्कार हवेत. प्रत्येक कामात नियमितता ही गोष्ट अनिवार्य आहे.

दुर्भाग्याने बहुतेक भारतीय जनता ह्या संदर्भात दक्ष नाही. पाश्‍चात्त्य लोक वेळेला फार प्राधान्य देतात. आम्ही मात्र निष्काळजीपणा

करतो. उदाहरणार्थ- आम्ही कुणालातरी अमुक वेळेला बोलावतो पण आपण त्यावेळी हजर नसतो. आपण उशीरा येतो. आपल्यामुळे त्यांचा वेळ फुकट गेला, हा साधा विचार देखील आपल्या मनात येत नाही. म्हणून अनेकांना आपल्या कृतीबद्दल पश्‍चात्ताप होत नाही. त्यामुळे ते क्षमा देखील मागत नाहीत. ह्या अशा घटना सरकारी कर्मचार्‍यांच्या बाबतीत जास्त घडतात. कारण बहुतेकजण बेजबाबदार असतात. त्यांना जाब विचारला जात नाही. त्यांना आपल्या कर्तव्याचे भानच नसते. वेळेवर न येणे हा जणू काय त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे, असे त्यांना वाटते. त्यांनी निसर्गाचा एक नियम लक्षात ठेवायला हवा की, स्वतःचा वेळ आपण व्यर्थ दवडू शकतो पण इतरांचा वेळ असा घालवणे म्हणजे पाप आहे. कुठेतरी ह्याचा जाब द्यावाच लागेल.

ही कसली शिस्त?

- प्रा. रमेश सप्रे

एक मजेदार प्रसंग. म्हणजे तसा गंभीर चिंतन करण्यासारखा. पण आपण त्याला ‘मजेदार’ म्हणू या...

एक प्रशिक्षण शिबिर महिनाभर चालू आहे. शिक्षकांना उद्बोधन (ओरिएंटेशन) सुरू आहे. वार शनिवार. सोमवारपासून शाळा सुरू. हे शिक्षक प्रथमच विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. ‘मुलांना समजून कसं घ्यायचं? त्यांच्यातलंच एक होऊनही त्यांच्यापासून निराळं कसं राहायचं?’..अशा विषयावर अखेरचं सत्र सुरू आहे. ते दुपारी एक वाजता संपून भोजनसत्र होऊन शिबिर संपणार आहे. एकमेकाचा निरोप घेऊन शिक्षक मंडळी नवी स्वप्नं.. नव्या आकांक्षा घेऊन आपापल्या घरी निघणार आहेत... अत्यंत उत्सुकता त्यांच्या मनात आहे आपल्या विद्यार्थ्यांना भेटण्याची.

प्रसिद्ध अमरनाथ यात्रेत सहभागी झालेले भाविक

Story Summary: 

परवापासून सुरू झालेल्या प्रसिद्ध अमरनाथ यात्रेत सहभागी झालेले भाविक अमरनाथ गुफेकडे जाताना.

कठीण हवामानाचा सामना करीत दरवर्षी लाखो भाविक या यात्रेत सहभागी होत असतात.

मुंबई हल्ल्याचा एक सूत्रधार अबू हमजा जेरबंद

Story Summary: 

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील एक प्रमुख आरोपी सय्यद झबिउद्दिन ऊर्फ अबू हमजा ऊर्फ अबू जिंदाल याला सौदी अरेबियातून भारतात हस्तांतरित करण्यात सरकारला यश आले असून त्याला २१ जून रोजी दिल्ली पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतल्याचे काल स्पष्ट झाले. २६ नोव्हेंबर २०१० रोजी मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला, त्यात प्रत्यक्ष सामील झालेल्या दहा दहशतवाद्यांना अबूने हिंदीचे प्रशिक्षण दिले होते इतकेच नव्हे, तर त्या हल्ल्याचा तो प्रमुख सूत्रधारही होता. त्यावेळी कराचीतील नियंत्रण कक्षात बसून तो नरीमन हाऊसमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांना मार्गदर्शन करीत होता.

हमजा याला ताब्यात घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने त्याला पंधरा दिवसांचा पोलीस रिमांड मिळवला आहे. मुंबईच्या क्राईम ब्रँचचे एक पथक येत्या काही दिवसांत त्याला ताब्यात घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहे.

बोगस जन्मदाखला प्रकरणी गणेशराजवर सहा वर्षांची बंदी

Story Summary: 

कनिष्ठ स्तरावरील स्पर्धांत बोगस जन्मदाखला वापरून खेळल्याचा आरोप असलेला युवा रणजीपटू गणेशराज नार्वेकरवर गोवा क्रिकेट असोसिएशनने सहा वर्षांची बंदी घातली आहे.

ज्युनियर संघाततर्फे खेळण्यासाठी जीसीएचे माजी अध्यक्ष दयानंद नार्वेकर यांच्या पुत्राने सादर केलेल्या बोगस जन्मदाखला प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जीसीएने नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय चौकशी समितीच्या निर्णयानंतर काल, सोमवारी हा निर्णय घेण्यात आला.

मडगावात चोरांचा वयस्कावर प्राणघातक हल्ला

Story Summary: 

एकास पकडले

आबा द फारिया रस्त्यालगत राजीव हरिनाथ पै रायतुरकर (५९) यांच्यावर प्राणघातक हल्ला करून गळ्यांतील सोनसाखळी हिसकावून पळून गेलेल्या भामट्यांपैकी एकाला लोकांनी व मडगाव पोलिसांनी स्टेशन रोडजवळ पकडण्यात यश मिळविले. मात्र त्याचा साथीदार फरारी झाला. ते दोघेही नेपाळी आहेत.

आबाद फारिया रस्ता व नानूटेल हॉटेलमध्ये जाणार्‍या मार्गावर राजीव पै रायतुरकर घरात एकटेच राहतात. ते काल रात्री घराच्या पुढचा दरवाजा खुला ठेवून घरात बसले होते. अंधाराचा फायदा घेवून दोघे आत लपून राहिले. रात्री ११.३० वा. दरवाजा बंद करण्यासाठी आलो असता दोघा भामट्यांनी त्याना पकडून चाकूने गळ्यावर वार केले व हनुवटीवरही अनेक वार केले. तोंडाखाली वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर गळ्यांतील साखळी हिसकावून घेवून चालत गेले.

टँकरला धडक; दुचाकीस्वार ठार

कुठ्ठाळीहून वास्कोच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून येत असताना सांकवाळ येथे पार्क करून ठेवलेल्या टँकरला पाठी मागून धडक बसल्याने झालेल्या अपघातामध्ये किरातळे बायणा येथे राहणारा कृष्णा पेडणेकर (२७) हा जागीच ठार झाला.

दोन अट्टल चोरटे गजांआड

४ लाखांचे सोने जप्त

दोन अट्टल चोरांना पकडण्यात फोंडा पोलिसांना यश आले. दोघांकडून जवळजवळ ४ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून अधिक चौकशीकरिता न्यायालयात उभे करून पाच दिवसांचा रिमांड घेतला आहे.

रमझान कुतुबुद्दीन शेख (२५) व हुसेन बादशहा (२२) दोघेही मूळ बसन बागेवाडी-विजापूर कर्नाटक हे गेली तीन वर्षे कुंभारजुवे-माशेल येथे राहत होते. दिवसा कुठले तरी काम करायचे व त्याचबरोबर चोर्‍या करायचे.

अपुर्‍या निरीक्षकांमुळे स्वच्छता मोहिमेवर प्रश्‍नचिन्ह

गोवा अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील उपहारगृहे व अन्य संबंधित भागातील स्वच्छतेच्या बाबतीत मोहीम सुरू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी या खात्याकडे फक्त १२ निरीक्षक आहेत व आवश्यक त्या प्रमाणात कर्मचारी वर्ग नसल्याने त्यांची तारांबळ उडत आहे.

‘वाहतूक निरीक्षक भरती प्रकरण; दाखले संशयास्पद’

बुधवारी हायकोर्टात सुनावणी

वाहतूक खात्यातील निरीक्षकांचे भरती प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असून काल ऍडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी वरील निरीक्षकांनी सादर केलेले दाखले संशयास्पद असल्याचे विधान न्यायालयात केले आहे.

वरील भरती बेकायदेशीरपणे केल्याचा दावा करणारा अर्ज अजित बकाल व इतरांनी उच्च न्यायालयात केला होता. या अर्जावरील पुढील सुनावणी बुधवार दि. २७ रोजी होणार आहे.

आज अमली पदार्थ विरोधी दिन

दरवर्षी प्रमाणे आजही राज्यात अमली पदार्थ विरोधी दिन पाळण्यात येणार आहे. गेली अनेक वर्षे किनारी भागातील अमली पदार्थाच्या गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस जोरदार मोहीम उघडल्याचे सांगतात. परंतु किनारी भागात हा गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात चालू असून तो नियंत्रणाखाली आणण्याच्या बाबतीत पोलीस अपयशी ठरले आहेत.

लोकपाल : कायदा सचिवांचा सल्ला घेणार

लोकपाल विधेयकावर विचार-विनिमयासाठी स्थापन केलेल्या राज्य सभेच्या स्थायी समितीच्या काल झालेल्या पहिल्या बैठकीत विधेयकातील कायदेशीर बाबींवर स्पष्टीकरणासाठी केंद्र सरकारचे कायदा सचिव बी. ए. अगरवाल यांना निमंत्रित करण्याचे ठरविले. लोकपाल व लोकायुक्त विधेयकाबाबत राजकीय पक्षांत सहमती निर्माण करण्याबरोबरच लोकांची मतेही अजमावण्याचे समितीने ठरविले आहे.

‘हुक्का पार्लर’विरुद्ध मोहीम तीव्र करणार

काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने खाणावळीमध्ये किंवा आवारात अशा प्रकारचे पार्लर उघडण्यास बंदी घालण्याचा आदेश पालिका प्रशासनाला दिला होता.

या पार्श्‍वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाच्या निरीक्षकांनी गेल्या शनिवारी किनारी भागातील १२ खाणावळींवर धाड घालून तपासणी केली असता निकोटीन असलेले तीन नमुने सापडल्याचे वेलजी यांनी सांगितले. या पार्श्‍वभूमीवर तपासणी मोहीम तीव्र करण्याचे ठरविले आहे.

समाज परिवर्तनाचे उद्गाते : राजर्षी शाहू महाराज

- शंभू भाऊ बांदेकर

एकोणिसाव्या शतकाच्या संपूर्ण समाज प्रबोधनातील एक महत्त्वाचा दुवा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होत. शाहू महाराजांना उणेपुरे ४८ वर्षांचे आयुष्य लाभले. या आयुष्यातील सुमारे २८ वर्षांची त्यांची कारकीर्द ही सामाजिक बांधिलकीच्या कार्याची होती. वास्तविक महाराजांचा कालखंड हा समाजसुधारणांना प्रतिकूल असा होता. चातुर्वर्ण्याचे स्तोम सर्वत्र माजलेले होते. असे असूनही प्रतिकूल परिस्थितीला आपल्या दूरदर्शी व तळमळीच्या कार्याने अनुकूल परिस्थितीत परिवर्तन करताना महाराजांनी जे महान कार्य केले, ते असाधारण व असामान्य असेच होते.

आवश्यक कारवाई

मांद्रे आणि मोरजी येथील दोन हॉटेल्सचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याच्या दिशेने चाललेल्या हालचाली पर्यावरणप्रेमी आणि सर्वसामान्य जनतेसाठी दिलासादायक आहेत. गोव्याच्या एकशे पाच कि. मी. पसरलेल्या किनारपट्टीतील मोक्याच्या जमिनी स्वस्तात खरेदी करायच्या किंवा लीजवर घ्यायच्या, तेथे आलिशान हॉटेल्स उभारायची आणि विदेशी पर्यटकांकडून प्रचंड पैसा कमवायचा हा जो प्रकार गोव्यात गेली अनेक वर्षे चाललेला आहे, त्याला कोठेतरी लगाम घालणारी ही कारवाई आहे. अर्थात, या कारवाईत न्यायालयीन अडथळे आणले जाऊ शकतात, त्यामुळे प्रत्यक्ष कारवाई होईल की नाही हे सांगता येणार नसले तरी गोवा किनारी विभाग व्यवस्थापन अधिकारिणीचा निदान थोडा वचक निर्माण होणार आहे. वास्तविक गेल्यावर्षी किनारी भागांत हॉटेल्स उभारण्यासंदर्भात कडक निर्बंध अधिसूचित करण्यात आले आहेत. समुद्रकिनार्‍यापासून दोनशे ते पाचशे मीटर अंतरावरील बांधकामांसंदर्भात कडक अटी घातल्या गेल्या आहेत. त्यांचे उल्लंघन करून ही आलिशान हॉटेल्स उभी होती. त्यातील कॉटेजीसच्या उभारणीमध्ये लाकडाचा वापर केला गेलेला असला तरी जवळजवळ पक्क्या बांधकामासारखेच त्यांचे एकंदर स्वरूप आहे. पक्क्या बांधकामात मिळणार्‍या सर्व तर्‍हेच्या सोयीसुविधा तेथे उपलब्ध आहेत.

शिवोलीतील ख्रिस्ती बांधवांचा प्रसिद्ध ‘सांजाव’

Story Summary: 

ख्रिस्ती बांधवांचा ‘सांजाव’ काल मोठ्या उत्साहात राज्यभर साजरा करण्यात आला. शिवोलीतील प्रसिद्ध सांजावात सहभागी झालेले एक पथक. (छाया : इरवीन फोन्सेका)

एमबीबीएससाठी यंदा १५० जणांना प्रवेश

Story Summary: 

सोपस्करांची फाइल मंजूर

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी ज्यादा ५० जागांना मेडिकल काऊंसिलने मान्यता दिल्यानंतर यंदापासून १५० मुलांना प्रवेश मिळणार आहे. त्यासंबंधीची फाईल मंजूर केल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले.

गोव्यात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी १०० जागा होत्या. त्यामुळे आणखी ५० विद्यार्थ्यांना प्रवेशास परवानगी द्यावी व तसे पत्र मेडिकल काऊंसिल ऑफ इंडियाकडून पाठवावे, असे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांना राज्याचे आरोग्य मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी लिहिले होते.

जीसीए आमसभेवेळी नार्वेकर समर्थक क्लबांची निदर्शने

Story Summary: 

अनेक ठराव मंजूर

गोवा क्रिकेट अकादमीची खास आमसभा काल गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सभागृहात पार पडली. यावेळी जीसीएशी संलग्न असलेल्या ११० क्लबांचे प्रतिनिधी तसेच आजीव सदस्य आमसभेत सहभागी झाले होते. आमसभेत अनेक ठराव मांडण्यात आले, त्यापैकी एक अध्यक्षपदाचा कार्यकाळ दोन वर्षे करण्यासाठी होता. त्याला मंजुरी देण्यात आली.

दरम्यान, आमसभेवेळी काही दयानंद नार्वेकर समर्थक क्लबांच्या प्रतिनिधींनी कार्यालय संकुलाबाहेर घोषणा देत निदर्शने केली. त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचे कळते. यावेळी पोलीस फौज तैनात करण्यात आली होती.

सांजाव : दोन घटनांत दोन मृत्यू

Story Summary: 

काल साजरे झालेल्या सांजावनिमित्त पाण्यात खेळताना साळगाव येथे एकाचा तर राय येथे एकाचा मृत्यू झाला.

काब्रावाडा साळगाव येथे काल दुपारी ३.३० वा. सांजाव खेळताना विहिरीत उडी मारलेल्या पिटर मास्कारेन्हस (५२) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कळंगुट पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविला.

दिल्ली, मुंबईसाठी क्षेपणास्त्र सुरक्षा कवच

क्षेपणास्त्रांपासून बचावासाठी डीआरडीओतर्फे बनविण्यात येणार असलेल्या ‘सुरक्षा कवच’ प्रणालीसाठी दिल्ली व मुंबई या दोन शहरांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय कॅबिनेट समितीच्या मान्यतेकरिता यासंबंधी सविस्तर आराखडा बनविण्यात आला असून सुरक्षा कवचासाठी दोन्ही शहरांत प्राथमिक स्वरूपाचे नियोजनही सुरू केले आहे.

चिरेखाणीत बुडून युवकाचा मृत्यू

पार्से चावदेवाडा येथील बाळगो कृष्णा पोळजी (२४) हा युवक चिरेखाणीत बुडून मरण पावला. पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडपाजवळ चावदेवाडा-पार्से येथे युवक मैदानावर दररोज सायंकाळी खेळायला जातात, सदर युवक बाळगो पोळजी हा देखील २४ रोजी फुटबॉल खेळून जाताना सायंकाळी ६ वाजता बाजूला चिरेखाणीत पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते, त्या ठिकाणी पोहायला गेला.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यालयास आग

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालतया गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या दालनापाशी काल आग लागली. मात्र यात कुणालाही इजा किंवा मोठे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले

खिडकीनजीकच्या व्हेंटिलेटरकडे ही आग सर्वप्रथम लागली. त्याबाबत काल दुपारी २.२० वा. अग्नीशामक दलास कळविण्यात आले. त्यानंतर आठ बंब दाखल झाले व २.३५पर्यंत आग विझविण्यात आली.

वास्कोत ठिकठिकाणी पाणी साचल्याने तारांबळ

शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे वास्को शहर तसेच उपनगरीतील बहुतेक रस्ते जलमय झाले होते. छोटा बाझार बायणा येथे काही गाडे व दुकानामध्ये पाणी शिरले तर एलमॉंत बोगदा येथे मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले.

सर्व पंचायत सदस्यांना प्रशिक्षण देणार

पंचायतीवर निवडून आलेल्या सरपंच, पंच सदस्याना सरकारच्या विविध योजना तसेच कर्तव्यांची व कायद्यांची माहिती नसते त्यामुळे सरकारने प्रथमच बाराही तालुक्यांतील पंचायतींतील सरपंच व पंच सदस्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम तयार केल्याची माहिती संचालक नारायण सावंत यांनी दिली.

लोकपाल : आजपासून पुन्हा नव्याने चर्चा

लोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावर राजकीय सहमती निर्माण करण्यासाठी आजपासून पुन्हा नव्याने चर्चा सुरू होणार आहे. राज्यसभेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कॉंग्रेस नेते सत्यजीत चतुर्वेदी लोकपाल व लोकायुक्त विधेयकाच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांतील मतभेद मिटविण्याच्या दृष्टीने बैठक घेणार आहेत. या १५ सदस्यीय समितीत खासदार शांताराम नायक यांचाही समावेश आहे.

शहरांनजीकच्या पंचायत क्षेत्रांत कचरा समस्या तीव

पणजी, फोंडा, मडगांव, म्हापसा, वास्को या शहरातील कचर्‍याची समस्या गंभीर होत असानाच शहराजवळ असलेल्या पंचायत क्षेत्रातही आता कचरा समस्येने डोके वर काढले असून सध्या तेथील कचर्‍याची विल्हेवाट लावणे अशक्य झाल्याने अनेक भागात दुर्गंधी व डासांची पैदास वाढू लागली आहे.

कुचेली बारमध्ये मारामारीत एक गंभीर जखमी

परवा रात्री ११ वाजता कुचेली-म्हापसा येथील सायबा बारमध्ये झालेल्या मारामारीत तिघे जखमी झाले. दोघांना म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात तर एकाला बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी तीन दुचाकी वाहनांची मोडतोड झाली. म्हापसा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

कॉंग्रेसचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी

Story Summary: 

कॉंग्रेसचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ज्येष्ठ भगिनी अन्नपूर्णा बॅनर्जी यांना चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

प्रणव मुखर्जी आज देणार अर्थमंत्रीपदाचा राजीनामा

Story Summary: 

कॉंग्रेसचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी आज केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी काल कोलकता व पश्‍चिम बंगालमधील काही ठिकाणांना भेट दिली. ‘‘ही माझी अर्थमंत्री म्हणून शेवटची कोलकता भेट आहे, कारण मी २४ रोजी पदत्याग करणार आहे’’ असे त्यांनी शनिवारी बिरभूम जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी जाण्यापूर्वी पत्रकारांना सांगितले. ‘‘त्यानंतर मी सरकार किंवा पक्षाविषयी काही बोलणार नाही’’ असेही त्यांनी मिश्कीलपणे सांगितले.

७७ वर्षीय मुखर्जी हे संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार मे २००९ मध्ये दुसर्‍यांदा सत्तेवर आल्यानंतर अर्थमंत्री बनले होते. तत्पूर्वी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या पहिल्या सरकारमध्ये ते संरक्षण व परराष्ट्र व्यवहार मंत्री होते. येत्या २८ जून रोजी ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रत्येकी पन्नास सूचक आणि अनुमोदक असलेल्या उमेदवारी अर्जांचे चार संच त्यासाठी तयार करण्यात येत आहेत.

गोमंत बालरथ योजनेखाली अर्ज केलेल्या विद्यालयांना १० दिवसात बालरथ मिळणार

Story Summary: 

शिक्षण खाते प्रयत्नशील : आवश्यक प्रक्रिया सुरू

गोमंत बालरथ या योजनेखाली बसेससाठी अर्ज केलेल्या विद्यालयांना पुढील १० दिवसांच्या आत बसेस देता याव्यात यासाठी शिक्षण खाते प्रयत्नरत असून त्यासाठीची आवश्यक ती प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली असल्याचे खात्यातील सूत्रांनी काल सांगितले.

पूर्वी समाज कल्याण खात्याकडे असलेली ही योजना शिक्षण खात्याकडे सुपूर्द करण्यात आल्यापासून आतापर्यंत ४२ विद्यालयांनी या खात्याकडे बसेससाठी अर्ज केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याशिवाय ही योजना समाज कल्याण खात्याकडे असताना त्यांच्याकडे जे अर्ज करण्यात आले होते ते अर्जही त्यांनी आता शिक्षण खात्याकडे पाठवले असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, त्या अर्जांची संख्या किती आहे त्याची छाननी अजून व्हायची असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

उच्च शिक्षण कर्ज रक्कम दुप्पट करण्याचा शिक्षण खात्याचा प्रस्ताव

Story Summary: 

शिक्षण विकास महामंडळातर्फे हुशार विद्यार्थ्यांना देश-विदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जे शैक्षणिक कर्ज देण्यात येते ते अपुरे पडत असल्याने ते दुप्पट करण्याचा महामंडळाचा विचार असून सदर प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे पाठवण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एखाद्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षण घेण्यासाठी जर विदेशात जायचे असेल तर त्याला शैक्षणिक कर्ज योजनेखाली २ वर्षांसाठी जास्तीत जास्त ८ लाख रु. एवढे कर्ज मिळते. पहिल्या वर्षासाठी ४ व नंतर दुसर्‍या वर्षासाठी आणखी ४ लाख रु. अशा प्रकारे त्याला ८ लाख रु. पर्यंतचे कर्ज वितरीत करण्यात येते.

आऊटसोर्सिंगचे प्रणेते राष्ट्राध्यक्षपदी नकोत : ओबामा

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे एक उमेदवार मिट रॉम्नी यांच्यावर काल राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘आऊटसोर्सिंग’च्या मुद्द्यावरून कडाडून ताशेरे ओढले. मिट रॉम्नी यांच्या कंपन्यांनी भारत आणि चीन आदी देशांमध्ये आपल्या कामांचे ‘आऊटसोर्सिंग’ केल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर बोलताना ओबामा यांनी ‘‘आऊटसोर्सिंगच्या प्रणेत्यांची अमेरिकी जनतेला ओव्हल ऑफीसमध्ये जरूरी नाही’’ अशी टीकेची फटकार लगावली. रॉम्नी यांच्या मालकीच्या कंपन्यांनीच सर्वांत प्रथम भारत, चीन आदी देशांमध्ये आपली कामे सोपवली होती, असे वृत्त ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिले होते. त्यासंदर्भात ओबामा यांनी फ्लोरिडातील ताम्पा येथील प्रचारसभेत ही टीका केली.

हिंदी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार राजेश खन्ना अत्यवस्थ

एकेकाळचे हिंदी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार राजेश खन्ना यांना काल प्रकृती अस्वास्थ्यामुळे वांद्रे - मुंबई येथील लीलावती इस्पितळात दाखल करण्यात आले. श्री. खन्ना गेले काही दिवस आजारी आहेत. पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना लीलावतीत दाखल करण्यात आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे त्यांची पत्नी डिंपल कापडिया आणि जावई अभिनेता अक्षयकुमार यांनी सांगितले. राजेश खन्ना यांना इस्पितळात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समजताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली.

प्रतिमा मलीन करण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप : मुळे

राज्य सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष मार्कुस डिसिल्वा यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे खोटे असून आपण भ्रष्टाचार केल्याचा आरोप रामचंद्र मुळे यांनी फेटाळला आहे.

२००५ सालापासून आतापर्यंत आपण बँक सांभाळलेली असून वेळोवेळी कर्जांची वसुलीही केली असल्याचे ते म्हणाले. सरकारी बॉण्ड्‌स व कदंब महामंडळाला दिलेले कर्ज या दोन कारणांमुळेच बँकेचे नुकसान झाले असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह चौघाजणांना अटक

खरपाल येथील काही दिवसांपासून बेपत्ता झालेल्या विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी तथा वरिष्ठ विभागीय दंडाधिकारी पराग नगर्सेकर यांनी डिचोली पोलिसांकडे केलेल्या तक्रारीला अनुसरून मयत महिलेच्या पतीसह अन्य तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांनी दिली.

सामान्यांना बंधने, मात्र उच्चपदस्थांना हवे तेवढे गॅस सिलिंडर

सामान्य माणसाला गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी वणवण करावी लागत असताना दिल्लीतील काही उच्चपदस्थांनी मात्र मनमानीपणे गॅस सिलिंडर मिळवून त्यांचा वारेमाप वापर चालविल्याचे उघडकीस आले आहे. इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या तेल कंपन्यांना दरवर्षी अनुदानित गॅस सिलिंडर विक्रीमुळे ४३ हजार कोटी रुपये नुकसान होते असे सरकार एकीकडे सांगते, तर दुसरीकडे प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी फक्त सहा सिलिंडरच अनुदानित दरात देण्याचा प्रस्ताव सरकारने विचारात घेतला आहे. असे असताना दुसरीकडे मंत्री आणि खासदार मात्र मनमानीपणे सिलिंडर मिळवीत असल्याचे एलपीजी पोर्टलवरील आकडेवारीवरून दिसून येत आहे.

पत्नीची गर्भपातासाठी छळणूक करणार्‍यास अटक

आपला पती महमद मुस्ताक आपल्यावर गर्भपात करून घेण्याची जबरदस्ती करतो व मारहाण करीत असल्याची पोलीस तक्रार श्रीमती जोहरा जमाल मुस्ताक हिने केल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी महमदला अटक केली आहे.

धावत्या रेल्वेतून तरुणाला फेकले

रांचीकडे निघालेल्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये एका युवकाला टीसीने तिकीट नसल्याने धावत्या रेलगाडीतून बाहेर फेकून दिल्याची घटना काल घडली. फतुहा या स्थानकाजवळ ही घटना घडली. राकेश कुमार या तरुणाला ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आले.

वेश्या व्यवसाय प्रकरण आणखी एकास अटक; ५ दिवसांची कोठडी

कांदोळी येथे काल पहाटे वेबसाईटच्या माध्यमातून चालणार्‍या वेश्या-व्यवसाय प्रकरणी कळंगुट पोलिसांनी सुनीत कुमार (वसंतकुंज नवी दिल्ली) या आणखी एका ग्राहकास काल अटक केली असून शुक्रवारी अटक केलेल्या चौघाही जणांना प्रत्येकी पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

मये मुक्तीचा ‘सुवर्णदिन’ उजाडो..!

- रमेश सावईकर

गोवा मुक्त होऊन ५० वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी डिचोली तालुक्यातील मये गावाला अजूनही मुक्ती मिळालेली नाही. मये स्थलांतरित मालमत्तेचा प्रश्‍न गेल्या ५० वर्षात आवश्यक प्रयत्नांअभावी म्हणा किंवा सरकारने दुर्लक्ष्य केल्यामुळे म्हणा, अजूनही सुटू शकलेला नाही. परिणामी मयेची जनता अद्यापही पारतंत्र्यातच आहे असे दुर्दैवाने आणि खेदाने म्हणावे लागते.

गोव्यात आजवर कित्येक सरकारे आली आणि गेली! पण म्हणावी तशी या प्रश्‍नाची दखल कुणीच घेतली नाही. बहुजन समाजाचे कैवार घेतलेले महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सरकारने गोव्यावर साडेसतरा वर्षे अधिराज्य केले. नंतरच्या कालावधीत कॉंग्रेस पक्षाचे सरकार आले. परंतु, मयेच्या स्थलांतरित मालमत्तेचा प्रश्‍न सुटावा म्हणून कॉंग्रेसने फारसे प्रयत्न केल्याचे काही दिसून येत नाही. आश्‍वासनांच्या झुल्यावर मयेवासीयांना झुलवत ठेवण्यापलिकडे कॉंग्रेस नेत्यांनी काहीच केले नाही. विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पूर्वीच्या भाजपाच्या अल्पकालिन राजवटीत पर्रीकरांनी हा प्रश्‍न कायदेशीररित्या सोडविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तथापि, नंतरच्या कॉंग्रेस राजवटीत या प्रक्रियेलाच खीळ बसली. आता पुनश्‍च मनोहर पर्रीकर यांचे सरकार आल्याने मयेवासीयांची समस्या दूर होईल अशी अपेक्षा लोकांनी बाळगली आहे. अपेक्षापूर्ती होते की, मयेवासीयांच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षताच मिळतात ते येणारा काळच ठरवणार आहे.

ममतांना चपराक

सिंगूर प्रकरणात कोलकता उच्च न्यायालयाने दिलेला निवाडा ममता बॅनर्जी यांच्या सरकारला बसलेला मोठा हादरा मानला जात असला, तरी या सिंगूर आणि नंदीग्रामच्या प्रकरणांनीच त्यांना डाव्यांची तीन दशकांची सत्ता उलथवून आज सत्तारूढ केलेले आहे हे विसरता येत नाही. पश्‍चिम बंगालमध्ये जे ऐतिहासिक ‘पोरिबोर्तन’ घडून आले, त्यामागे ममतांची जनताभिमुख कार्यपद्धतीच होती. नंदीग्राम आणि सिंगुरमध्ये डाव्यांच्या सरकारने जी दडपशाही चालवली होती, सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या जमिनी भांडवलदारांसाठी ज्या प्रकारे जोरजबरदस्तीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न चालवला होता, त्याविरुद्ध ममता बॅनर्जी ठामपणे उभ्या राहिल्या. एकीकडे टाटांसारखा बडा उद्योगसमूह, त्यांची पाठराखण करणारे डाव्यांचे सरकार आणि या दोन्हींच्या जोरावर दंडेलशाही करणारे माकपाचे ‘कार्यकर्ते’या तीन शक्तींपुढे पोरक्या ठरलेल्या सिंगूरच्या गोरगरीब शेतकर्‍यांना ममतांनी पाठिंबा दिला त्यातूनच तृणमूल खरोखरच तळागाळांत रुजू शकला आणि डाव्यांचे ऐतिहासिक पानीपत झाले. सिंगूरच्या ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी त्यांची इच्छा नसताना जबरदस्तीने संपादित केल्या गेल्या होत्या, त्यांना त्या परत मिळवून देण्याचे आश्वासन हे ममतांच्या जाहीरनाम्यातील एक प्रमुख आश्वासन होते.

अक्षरलेखनातला

- डॉ. सोमनाथ कोमरपंत

११ जून - बालब्रह्माची निरंतर उपासना करणार्‍या आणि अक्षर वाङ्‌मयाच्या साधनेत आयुष्यभर मग्न असणार्‍या ध्येयनिष्ठ साने गुरूजींची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला साजेशा उपक्रमाला प्रारंभ नुकताच या दिवशी रमणीय निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पिळगाव येथील आयडियल हायस्कूलमध्ये झाला. ‘सुंदर अक्षर.... आनंद निरंतर’ हे अंतःसूत्र मनाशी बाळगून ‘अक्षरमित्र’ ही संघटना त्या दिवशी स्थापन करण्यात आली. ‘हृदया उच्च ध्येय मनी धरी’ अशी आकांक्षा मनी बाळगून अक्षरलेखन ही बालपणीची सुरुवातीची प्रक्रिया..... त्यानंतरची पायरी अक्षरसाधनेची. दोहोत मूलभूत फरक असला तरी त्यांच्यामध्ये आंतरिक नातेही आहे. ‘न क्षरं इति अक्षरमं्‌|’ जे नाश पावत नाही ते अक्षर. पण रँगलर विष्णुपंत नारळीकर यांची पत्नी, डॉ. जयंत नारळीकर तसेच डॉ. अनंत नारळीकर या शास्त्रज्ञांची आई आणि संस्कृत भाषेची तज्ज्ञ असलेली सुमतीबाई नारळीकर यांनी अक्षराची अभिनव व्याख्या केलेली आहे. ‘अक्षाः यत्र रमन्ते इति अक्षरम्‌|‘ ‘डोळे जिथे रमतात ते अक्षर’ अप्रतिम कल्पना. अक्षर डोळ्यांना आल्हाद देते. अक्षर वाङ्‌मय, अक्षय आनंदाचा वर्षाव करते. वाणी आणि लेखणी याद्वारे व्यक्त होणार्‍या शब्दस्फोटाला आपण ‘अक्षर’ असे संबोधतो. उच्चारासाठी उपयोजिलेले ते चिन्ह असते. आपल्या देवनागरी अथवा नागरी लिपीत बावन्न अक्षरे आहेत. त्यांना आपण ‘वर्ण’ म्हणतो. त्यांच्या सुसंगत रचनेला आपण ‘वर्णमाला’ म्हणतो. त्या अक्षरांना परंपरेने ‘मुळाक्षरे’ असे म्हटलेले आहे. त्यांच्या संयोजनेमुळे ‘वैखरी’ निर्माण होते.

मातृभाषेतून व्यक्तिमत्त्व विकास

- प्रा. रामदास केळकर

पृथ्वीतलावर मनुष्य हा वेगळा ठरतो, त्याचे एक कारण म्हणजे विचार करण्याची शक्ती आणि भाषा निर्मितीमुळे त्याचे विचार लिखित तसेच श्रवण मार्गाने ते समजता आले. त्यातून सुसंस्कृतपणा आकार घेत गेला. या सर्व विकासात भाषेचे योगदान ङ्गार महत्त्वाचे ठरले आहे. भाषा नसती तर हे जग मुके झाले असते. जगभर अनेक भाषा बोलल्या जातात. त्यांत व्यावहारिक भाषा आणि सांस्कृतिक भाषेचा समावेश असतो. आपणा अनेकांना उदरनिर्वाहासाठी भाषा शिकावी लागते, हे जरी खरे असले तरी संस्कृतीची भाषा म्हणून मातृभाषेलाच महत्त्व दिले जाते. जगातील शिक्षणतज्ञांनी मातृभाषेलाच अग्रस्थान दिले आहे. गोव्यातील सध्याच्या भाषिक वादात न पडता आपण मातृभाषेतून व्यक्तिमत्त्वविकास कसा घडवता येईल याचा या लेखात विचार करूया.

दारूचा अभिषेक!

- लाडोजी परब

बोण्याच्या प्रसादाच्या उत्सवावेळी सिद्धाचा डोंगर गजबजलेला असतो. हा उत्सव सायंकाळी भरतो. चाळ्यावर दारूच्या बाटल्या रित्या केल्या जातात. कोंबडे, बकरे चाळ्याला वाहिले जातात. नवसासाठी आलेले कोंबडे, बकरे इथेच कापावेत व मटण करून तिथेच खावं. ते घरी नेऊ नयेत, असा पिढ्यान्‌पिढ्या समज आहे.

कोकणातल्या प्रत्येक मंदिराचे काही ना काही वैशिष्ट्‌य पाहायला मिळते. असेच एक वैशिष्ट्‌यपूर्ण मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. शिरगावपासून पाच कि. मी. अंतरावर चौकेवाडीत हे मंदिर आहे. या चौकेवाडीत ‘सिद्धाची खरी’आहे. या खरीच्या प्रांगणात एका टेकडीवर एक छोटंसं सिद्धेश्‍वराचं मंदिर आहे. या मंदिरात ‘सिद्धाचा चाळा’ या नावाने प्रख्यात असलेले पाषाण आहे. या पाषाणावर मद्याचा अभिषेक केला जातो. वर्षभरात दोन उत्सवांत या मंदिरात चक्क दारूचा नवस बोलला जातो व मद्याचा नैवेद्य दाखवला जातो. या टेकडीवर ही दारू प्राशनही केली जाते. दारू सेवन करण्याच्या या वैशिष्ट्‌यपूर्ण प्रकाराची ख्याती मोठी आहे.

भाजपच्या ‘जेल भरो’त ५१५ कार्यकर्त्यांना अटक

Story Summary: 

भाजपच्या जेल भरो आंदोलनात सहभागी झालेले पक्षाचे राष्ट्रीय नेते प्रकाश जावडेकर तसेच माजी आमदार दामोदर नाईक, विनय तेंडुलकर डॉ. विल्फ्रेड मिस्कीता व इतर कार्यकर्ते. (छाया : नंदेश कांबळी)

भाजपच्या ‘जेल भरो’त ५१५ कार्यकर्त्यांना अटक

Story Summary: 

देशातली वाढती महागाई, गैर कारभार, भ्रष्टाचार व अनेक घोटाळ्यांचा निषेध करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ५१५ कार्यकर्त्यांनी काल राजधानीत पणजीत अटक करून घेतली.

यावेळी झालेल्या सभेत केंद्र सरकारच्या जनता विरोधी धोरणांचा तीव्र निषेध करण्यात आला.

गोवा सरकारला जर पेट्रोलचा दर कमी करणे शक्य आहे तर अन्य राज्यांना ते का शक्य नाही, असे सांगून देशातील राज्यांनी गोव्याचा आदर्श नजरेसमोर ठेवावा, असे आवाहन प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी आपल्या भाषणात केले. आपल्या पक्षाचे सरकार जनतेच्या हितासाठी वावरत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुकूर आयटी पार्क प्रकरणी नार्वेकरांविरुद्ध तक्रार नोंद

Story Summary: 

सुकूर आयटी पार्क कथित घोटाळा प्रकरणात पोलीस खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाने हळदोण्याचे माजी आमदार दयानंद नार्वेकर यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली.

दरम्यान, भ्रष्टाचार विरोधी पथकाने पर्वरी येथील गोवा माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या कार्यालयास भेट देऊन सुकूर आयटी पार्कसंबंधी कागदपत्रांची दिवसभर तपासणी केली. नार्वेकर यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यानंतर काल ही तक्रार नोंदवण्यात आली. या नियोजित आयटी पार्क प्रकरणात घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.

मार्था खून प्रकरणातील कार वास्कोत सापडली

Story Summary: 

रविवारी रात्री सासमोळे बायणा येथील बंगल्यावर एकटीच राहणार्‍या मार्था डायस हिचा गळा चिरून तसेच तीक्ष्ण हत्त्याराने भोसकून खून करून संशयिताने जाताना पळवून नेलेली आय २० हुंडाय कार काल सकाळी वास्को शहरातील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या समोर वास्को पोलिसांना आढळून आल्यानंतर पंचनामा करून ताब्यात घेतली.

रविवारी रात्री मयत डायस हिचा खून करून संशयिताने जाताना डायस हिची आय २० (क्र. जीए ०६ डी ६८६३) क्रमांकाची गाडी घेऊन पलायन केले होते. त्यानंतर वास्को पोलीस सदर गाडीचा शोध घेत होते. काल शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सदर गाडी ओव्हरसीज बँकेच्या समोर सुंदा मेल स्टोरसमोर सरकारी टुरीस्ट हॉलच्या मागे इतर वाहनांबरोबर पार्क केलेल्या अवस्थेत आढळून आली.

‘मंत्रालया’स आगीच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात महत्त्वाच्या सरकारी इमारतींची तपासणी करणार

परवा महाराष्ट्राच्या मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्य सचिवांनी काल गोव्यातील सचिवालय, विधानसभा भवन व अन्य महत्त्वाच्या इमारतींची तपासणी करण्यासंबंधी अग्नीश्यामक दलाला ‘एडव्हायजरी’ पाठविली असून त्यामुळे अग्नीशामक दलाने वरील इमातींची तपासणी करण्याचे ठरविले आहे.

खरपालच्या बेपत्ता विवाहितेचा कुजलेला मृतदेह आढळला

काही दिवसांपूर्वी खरपाल येथून बेपत्ता झालेल्या विवाहितेचा मृतदेह येथील तिळारी प्रकल्पाच्या कालव्याकडे कुजलेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती डिचोलीचे पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई यांनी सांगितले.

कांदोळीत वेश्याव्यवसाय उघडकीस

रशियन महिलेसह चौघांना अटक

सहा लाख रु. जप्त

कांदोळी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत वेश्याव्यवसायाचा भांडाफोड करताना चौघांना अटक करण्यात आले असून पैकी एक रशियन महिला आहे.

देशातील अर्ध्या स्वस्त धान्याचा काळाबाजार

वितरणावर ७० हजार कोटी खर्च

केंद्र सरकार सार्वजनिक वितरण योजनेखाली धान्याचा पुरवठा करण्यासाठी ७० हजार कोटी खर्च करते. मात्र त्यातील निम्मेच धान्य वितरित केले जाते त्यामुळे शेष धान्याचे काय होते हे शोधून काढले जात असल्याचे, सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या केंद्रीय दक्षता समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती डी. पी. वधवा यांनी काल सांगितले.

विनापरवाना बंदुक बाळगल्याप्रकरणी अटक

सांगे येथे विनापरवाना बंदुकीसहीत एकास अटक करण्यात आली तर धडे सांगे येथे दुसर्‍या घटनेत एक विनापरवाना बंदुक सांपडण्याची घटना घडली.

राजा परवेझ अश्रफ पाकचे नवे पंतप्रधान

पाकिस्तानच्या सत्ताधारी पाकिस्तान पिपल्स पार्टीचे दिग्गज नेते राजा परवेझ अश्रफ यांना नवे पंतप्रधान म्हणून काल नॅशनल असेंब्लीने निवडले.

३४२ पाकिस्तान नॅशनल असेंब्लीत त्यांना २११ मते तर त्यांचे विरोधक पीएमएल-एन पक्षाचे सरदार मेहताब अहमद खान अब्बासी यांना ८९ मते मिळाली.

वाळपई पालिकेत राष्ट्रध्वजाचा अवमान?

वाळपई नगरपालिका कार्यालयासमोरच्या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज काल उलटा लावल्याचे काहींना आढळून आले. पालिकेने फडकविलेल्या तिरंग्यात केशरी रंग खाली व हिरवा वरती होता. ही बाब काही नागरिकांच्या प्रथम लक्षात आली.

भाषा माध्यम प्रश्‍नाचा गुंता सुटणार तरी कधी?

- अजित पैंगीणकर

गोवा मुक्तीनंतरची जवळजवळ पंचवीस वर्षे गोव्याची राजभाषा मराठी असावी की कोकणी यासाठीच्या भांडणात गेली. तेव्हाची युवा पिढी आज वार्धक्याकडे झुकली आहे. मराठी-कोकणीच्या वादात गोव्याच्या सांस्कृतिक एकतेला आणि धार्मिक सलोख्याला कधीही भरून न येणारा तडा गेला आहे. कोकणी - मराठीच्या झगड्यात साथीला घेतलेले उलटले आणि संधीचा बरोबर फायदा घेत त्यांनी डोके वर काढले. ज्या काळात युवकांनी चांगली स्वप्ने पहायची असतात, शिक्षण, व्यवसाय, नोकरी आणि त्यानंतर गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा असतो, त्या काळात प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्‍न उकरून काढून शांत गोवा अशांत बनवण्याचा घाणेरडा प्रकार गोव्यात चालू आहे आणि युवापिढीला रस्त्यावर आणले जात आहे. ज्यांच्या हाती उद्याचा गोवा द्यायची स्वप्ने आपण बघतो, ती युवाशक्ती अशा तर्‍हेने आंदोलने, मोर्चे काढून त्यांना आपण क्षीण बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत. युवाशक्तीचे काय चुकले? आपण नेहमीच चुका करीत राहायचे आणि जाब विचारायला गेलेल्यांनाच फाशी देण्याचाच हा प्रकार आहे.

सज्जता गेली कुठे?

मुंबईच्या मंत्रालयातील अग्निकांडात ‘आदर्श’सारख्या संवेदनशील प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे आगीत जळून खाक झाल्याने या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता बळावते. हा खरोखर अपघात की घातपात याचे उत्तर चौकशीअंती मिळेल वा कदाचित मिळणारही नाही, परंतु या दुर्घटनेच्या निमित्ताने आपत्ती व्यवस्थापनाबाबतचा कमालीचा भोंगळपणा मात्र चव्हाट्यावर आला आहे. ज्या शहरावर दहशतवाद्यांचा देशातील आजवरचा सर्वांत मोठा हल्ला झाला, त्या मुंबईच्या सर्वांत महत्त्वाच्या इमारतीमध्ये - मंत्रालयामध्ये अशी एखादी दुर्घटना घडू शकते आणि कोणत्याही कारणाने का असेना, भरदिवसा लागलेली ही आग नियंत्रणापलीकडे भडकू शकते हे सारेच सर्वसामान्य जनतेच्या आकलनापलीकडचे आहे, अविश्वसनीयच आहे. दुर्घटना कधी आधी सांगून घडत नाही हे खरे असले तरी जेथून महाराष्ट्र राज्याचा सारा राज्यकारभार चालतो, अशा एवढ्या महत्त्वाच्या इमारतीमध्ये लागलेली ही आग आहे, त्यामुळे तेथे अग्निशामक यंत्रणा निदान मुंबई हल्ल्यानंतर तरी सुसज्ज स्वरूपात असणे अपेक्षित होते. परंतु अशा आपत्तीला तोंड देण्यासाठी तेथे एक तर कोणत्याही व्यवस्था नव्हत्या आणि उद्घोषणा यंत्रणेसारख्या ज्या होत्या, त्याही पूर्ण निकामी ठरल्याचे दिसून आले.

महाराष्ट्राच्या ‘मंत्रालया’स भीषण आग

Story Summary: 

आग लागल्यानंतर महाराष्ट्र सरकारचे सचिवालय असलेल्या ‘मंत्रालय’ इमारतीतून येणारे धुराचे लोट.

महाराष्ट्राच्या ‘मंत्रालया’स भीषण आग

Story Summary: 

दोघे मृत्यूमुखी, १६ जखमी, कागदपत्रे भस्मसात

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची कार्यालये खाक

महाराष्ट्राचे सचिवालय असलेल्या सात मजली ‘मंत्रालय’ इमारतीस काल लागलेल्या भीषण आगीत तीन मजले जळून खाक झाले. यात दोघे जण मृत्यूमुखी पडले असून १६ जण जखमी झाले आहेत. आगीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांची कार्यालये पूर्णपणे जळाली. मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून त्यात अनेक ‘आदर्श’शी संबंधित कागदपत्रे असण्याची भीती व्यक्त होत आहे.

अग्नीशामक दलातील सूत्रांनुसार इमारतीच्या पुढील बाजूची आग आटोक्यात आली असून मागील बाजूने आग विझविणे चालू होते.

अग्नीशामक दलातील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार सहाव्या मजल्यावर दोन मृतदेह सापडले आहेत. या पैकी एक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयानजीक तर दुसरा समिती सभागृहाच्या खोलीपाशी आढळला.

भाजपचा संगमांना पाठिंबा जाहीर

Story Summary: 

राष्ट्रपती निवडणुकीवरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत फूट पडली असून भारतीय जनता पार्टीने काल अधिकृतपणे पी. ए. संगमा यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

मात्र, जनता दल - संयुक्त या रालोआच्या घटक पक्षाने संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. दुसरा घटक पक्ष शिवसेनेने याआधीच मुखर्जींना पाठिंबा व्यक्त केला असून त्यात कसलाही बदल होणार नसल्याचे पक्षाने म्हटले आहे.

नोकरीसाठी प्रादेशिक भाषांच्या सक्तीस कॉंग्रेसचा विरोध

Story Summary: 

इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी प्रादेशिक भाषेतून लेखी परीक्षा द्यावी लागेल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जे विधान केलेले आहे त्याला आपला आक्षेप असून या विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषेतून लेखी परीक्षा देण्यात भाग पाडले जाऊ नये, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष फ्रान्सिस सर्दिन यांनी काल पत्रकार परिषदेतून बोलताना केली.

इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषेतून लेखी परीक्षा देणे जड जाणार असून या अटीमुळे त्यांना नोकरीला मुकावे लागण्याची भीती सर्दिन यांनी व्यक्त केली. भाजप सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यकाळात खून, दरोडे, मारामार्‍या यात वाढच झाल्याचे सांगून कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप फ्रान्सिस सर्दिन यांनी केला. राज्यातील प्रार्थनास्थळांवर हल्ले होऊ लागलेले असून त्यावरही सरकारने लक्ष ठेवावे, असे ते म्हणाले.

रेशनवरील धान्याबाबत न्या. वधवा समितीकडे तक्रारी

सार्वजनिक वितरण योजनेखाली पुरविण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असते, स्वस्त धान्याच्या दुकानदारांना प्रति टन धान्यामागे अत्यंत कमी नफा मिळतो. त्यात सुधारणा करण्याची जोरदार मागणी काल राज्यातील स्वस्त धान्याच्या दुकानांचे मालक व ग्राहकांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व केंद्रीय दक्षता समितीचे चेअरमन न्यायमूर्ती पी. वधवा यांच्यासमोर केली.

‘मयेवासीयांची जमीन विकली जाणार नाही’

मयेचा स्थलांतरित मालमत्तेचा प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन आपण दिलेले आहे. योग्य पद्धतीने जनतेला पूर्ण न्याय मिळेल अशा प्रकारे अभ्यासपूर्ण तोडगा काढण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली असून ही जमीन विकण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे. जमीन विकणारा तो पोर्तुगीज नागरिक कोण? त्याचा काय संबंध अशा शद्बांत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी सरकार गंभीर असल्याचे सांगून कोणत्याही प्रकारची जमिनीची सौदेबाजी होण्याचा प्रश्‍नच उद्भवत नसल्याचे या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले मयेची मालमत्ता ही कस्टोडीयनकडे असून आपण हा प्रश्‍न सोडवण्याची प्रक्रिया सात वर्षांपूर्वी मुख्यमंत्री असताना सुरू केली होती.

भाजपचे आज ‘जेल भरो’ आंदोलन

भ्रष्टाचाराच्या विरोधात आज भाजपने जेल भरो आंदोलन करण्याचे ठरवले असून आज दुपारी २.३० वा. हे आंदोलन सुरू होणार आहे.

या आंदोलनासाठी भाजपचे अखिल भारतीय प्रवक्ते व राज्यसभेचे खासदार प्रकाश जावडेकर हे खास येणार आहेत. राज्यातील सर्व भाजप पदाधिकारी व आमदार या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

कार्यालय फोडून ३ लाख चोरले

१९ जूनची मध्यरात्र ते २० जूनची पहाट या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १८ जून मार्गाच्या बाजूला असलेल्या दुर्गा चेंबर्स येथील आपले कार्यालय फोडून रोख ३ लाख १४ हजार रु. लांबवल्याची तक्रार गौरंग सुखठणकर यांनी पणजी पोलिसात केली आहे.

विद्याप्रबोधिनीची नवी झेप : महाविद्यालय

- अरविंद बर्वे, पर्वरी.

प्रबोधन एज्युुकेशन सोसायटीची वाटचाल १९८८ साली सुरू झाली. सुरुवातीला इयत्ता ५ वी चा वर्ग सुरू केला. सामाजिकदृष्ट्या माघारलेल्या, जे काही तरी धडपड करून कसेबसे जगतात त्यांच्या मुलांचा शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात असा ही नवी शाळा सुरू करण्याचा उद्देश होता. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांतून समाजातील लोकांना सामील करून घेणे हाच प्रमुख मुद्दा समोर ठेवून त्याप्रमाणे कार्यपध्दती आखून काम सुरू झाले. वर्गशिक्षकाने विद्यार्थ्यांच्या घरी जाणे, रक्षाबंधन, मकरसंक्रमण, गुरुपौर्णिमा या सारखे नाविन्यपूर्ण कार्यक्रम आखून आजूबाजूच्या परिसरातील समाजात, मुलांनी व संपूर्ण शाळेने एकरूप होणे व शाळा हे समाज प्रबोधनाचेे प्रमुख केंद्र व्हावे असे विचार प्रत्यक्षात उतरले. या सर्वांचे फलीत म्हणजे दिवसेंदिवस विद्याप्रबोधिनीला समाजातील सर्व थरांतून वाढत चाललेला सकारात्मक प्रतिसाद हे आहे.

मुळे गेले, पुढे काय?

सरकार बदलले की सर्व संस्थांवर आपली माणसे असावीत यासाठी धडपड चालते. राज्यातील विद्यमान भाजप सरकारही त्याच मार्गाने चाललेले आहे. राज्य सहकारी बँक अध्यक्षपदावरून रामचंद्र मुळे यांची झालेली उचलबांगडी हे त्याचे ताजे उदाहरण आहे. यावेळीच नव्हे, तर गेल्या वेळी भाजपाचे सरकार राज्यात आले होते, तेव्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सोमनाथ जुवारकर यांना अटक करण्यापर्यंत सरकारने टोकाचे पाऊल उचलले होते. यावेळी ‘नाबार्ड’ ने गोवा राज्य सहकारी बँकेच्या कारभारासंदर्भात मुख्य सचिवांना सादर केलेल्या अहवालाचे कारण देत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बँकेच्या संचालक मंडळाने पदत्याग करावा असे फर्मान काढले. मात्र, मुळे यांनी त्याला जुमानले नाही. आपल्या पाठीशी सोळापैकी आठ संचालक आहेत आणि आपण मागे हटणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. त्यांनी आपले पद राखण्यासाठी न्यायालयातही धाव घेतली. परंतु सहकार निबंधकांच्या देखरेखीखाली त्यांच्यावरील अविश्वास ठराव मतदानाला घेण्यात आला आणि मुळे यांची उचलबांगडी झाली. मुळे यांनी ज्या आठ संचालकांच्या समर्थनाचा दावा केला होता, ते अविश्वास ठरावावरील बैठकीला फिरकले नाहीत आणि मुळेंना उखडले गेले. पण प्रश्न मुळे यांच्या अध्यक्षपदाचा नाही, तर ही राज्यस्तरीय शिखर बँक विद्यमान विपरीत परिस्थितीतून सावरणार आहे की नाही हा आहे.

बॉम्बच्या अफवेने ‘राजधानी’ची मडगावात कसून तपासणी

Story Summary: 

बॉम्बच्या तपासासाठी दाखल झालेले पथक व एका डब्यात सामानाची झडती घेतली जाताना. (छाया : गणादीप शेल्डेकर)

राज्य सहकारी बँक अध्यक्षपदावरून रामचंद्र मुळे यांची उचलबांगडी

Story Summary: 

अविश्‍वास ठराव संमत; आव्हान अर्ज फेटाळला

सहायक सहकार निबंधक अनिल के. एन. देसाई यांच्या उपस्थितीत काल झालेल्या गोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेचे अध्यक्ष रामचंद्र मुळे यांच्या विरुध्दचा अविश्‍वासाचा ठराव ८ विरुध्द शून्य मतांनी संमत झाला. त्यामुळे मुळे यांना बँकेचे अध्यक्षपद गमवावे लागले.

या बैठकीस मुळे गटातील सदस्य अनुपस्थित राहिले. गोवा राज्य सहकारी बँक ही बहुराज्य बँक असल्याने गोवा राज्य सहकार निबंधकांना अविश्‍वास ठराव प्रकरणी किंवा अन्य अनेक विषयांवर बँकेच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचा दावा मुळे यांनी केला होता. सरकारने मुळे यांना बँक कमकुवत बनल्याच्या कारणाखाली राजीनामा देण्यासही सांगितले होते. सरकारच्या निर्णयास मुळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर आव्हान दिले होते.

बॉम्बच्या अफवेने ‘राजधानी’ची मडगावात कसून तपासणी

Story Summary: 

राजधानी एक्सप्रेस या रेलगाडीतून बॉम्बसह अतिरेकी प्रवास करीत असल्याची सूचना मडगाव रेल्वे स्टेशनवर काल पोहोचल्याने एकच गोंधळ उडाला. राजधानी एक्स्प्रेस रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच बॉम्बची शोधाशोध करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. कसून तपास घेतल्यानंतर त्यात अतिरेकी नसल्याचे सिद्ध झाल्याने पाऊण तासानंतर रेलगाडीला पुढे जाऊ देण्यात आले व सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

काल दुपारी दिल्लीहून राजधानी एक्सप्रेस त्रिवेंद्रमकडे निघाली होती. अचानक आज सकाळी दिल्ली येथून सावंतवाडी व मडगाव रेल्वे स्टेशनवर अतिरेकी असून रेल्वे उडवून देण्याची शक्यता असल्याने सतर्क राहण्याचा इशारा मिळताच कोकण रेल्वेचे अधिकारी, रेल्वे पोलिस, गोव्याचे पोलिस, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आदी सर्व रेल्वे स्टेशनवर हजर झाले. सशस्त्र दलाने आधी प्लॅटफॉर्मवर तपास केला. तोपर्यंत पणजीहून बॉम्बशोधक पथक व श्‍वानपथक मडगाव रेल्वे स्टेशनवर येऊन दाखल झाले. रेल्वे स्टेशनवर गाडी पोहोचताच सर्व डब्यांची कसून तपासणी करण्यात आली.

‘माणसाचा हरवणारा चेहरा साहित्य टिकवू शकते’

Story Summary: 

पु. शि. नार्वेकर यांना कालिदास पुरस्कार प्रदान

माणसाचा हरवत चालेला चेहरा व आतील देवात्मा टिकविण्यासाठी साहित्य हेच एकमेव साधन आहे. पु. शि. नार्वेकरांसारखे आदर्श घेऊन नव्या लेखकांनी सातत्याने, दर्जेदार साहित्य निर्माण करायला हवे. कोकण मराठी परिषद आदर्शला ललामभूत ठरणार्‍यांचा गौरवांकीत करते याला वेगळे महत्त्व आह,े असे मत प्रथितयश साहित्यिक, आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी येथे व्यक्त केले.

आज राज्य वस्तू संग्रहालयाच्या सभागृहात कोकण मराठी परिषद, गोवातर्फे आषाढस्य प्रथम दिवसेचे औचित्य साधून प्रतीवार्षिक ‘कालिदास महोत्सव’ साजरा केला. या महोत्सवात परिषदेचा पाचवा ‘कालिदास पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक आणि २७व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पु. शि. नार्वेकर यांना श्री. वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी श्री. वाघ प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

भावाच्या खून प्रकरणी अटक

वडाळवाडा-कुंडई येथे परवा रात्री १०.३०च्या सुमारास दोन भावामध्ये झालेल्या भांडणात मोठा बंधू रत्नाकर गुरुदास नाईक (५०) याचे निधन झाल्याने धाकटा बंधू सागर गुरुदास नाईक (४५) यांच्याविरुध्द खुनाच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करून फोंडा पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली.

राष्ट्रपती निवडणूक लढवण्यासाठी संगमांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

रालोआच्या पाठिंब्याची आशा

संयुक्त पुरोगामी आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांच्याविरुद्ध लढण्यास पी.ए.संगमा यांना पक्षाने विरोध केल्यानंतर संगमा यांनी काल राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी त्यांच्या उमेदवारीस पाठिंबा देईल या आशेवरच त्यांनी वरील पाऊल उचलल्याचे समजते. त्यांनी पाठवलेला राजीनामा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तात्काळ मंजूर केला.

किळसवाण्या प्रकारानंतर फोंड्याच्या ‘त्या’ ज्युस पार्लरला टाळे

येथील एका ज्युस व आईस्क्रीम पार्लरमध्ये चाललेल्या किळसवाण्या प्रकारचा मोबाईल क्लीपमुळे वादग्रस्त ठरलेल्या त्या दुकानाला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी टाळे ठोकून चौकशी चालवल्याचे समजते.

सहकार खात्यातील भरतीतही नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका

भ्रष्टाचारविरोधी पोलिसांनी सहकार खात्यातील पंधरा हिशेब तपासनिसांच्या भरती प्रकरणी चौकशी करून वरील हिशेब तपासनितांची भरती करताना नियमावलीचे पालन न केल्याचे आढळून आल्यासंबंधिचा अहवाल सरकारला सादर केला आहे. आता सरकारच्या निर्णयावरच या हिशेब तपासनिसांचे भवितव्य अवलंबून आहे.

केंद्रीय दक्षता समितीचे अध्यक्ष गोव्यात

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व केंद्रीय दक्षता समितीचे चेअरमन न्यायमूर्ती पी. पी. वधवा यांची आज सकाळी ११ वा. गोवा राज्य वस्तुसंग्रहालयातील सभागृहात सार्वजनिक वितरण व्यवस्था या विषयावर लोकांसाठी सुनावणी होणार आहे.

खा. श्रीपाद नाईक गोमेकॉत दाखल

उत्तर गोव्याचे भाजप खासदार श्रीपाद नाईक यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना काल गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात दाखल करण्यात आले.

राजेश खन्नाची प्रकृती गंभीर

एकेकाळचे बॉलीवूड स्टार राजेश खन्ना आजारी असून गेल्या तीन चार दिवसांपासून त्यांनी जेवण घेणे बंद केले असल्याचे त्यांच्या व्यवस्थापकाकडून सांगण्यात आले.

दोन नायजेरियन कार चोरांना अटक

पर्वरीतून पळविलेल्या कारसह दोन नायजेरियन नागरिकांना कळंगुट येथे पकडण्यात पोलिसांना यश आले.

दि. १६ रोजी येथील गौरी पेट्रोल पंपानजीक देवानंद शिरोडकर यांनी पार्क करून ठेवलेली जी ए ५, बी-११२१ ही आयकॉन हुंदाय कार जेम्स पिटर आणि एडवीन चँकू यांनी दुपारी १२.४५च्या दरम्यान पळवून नेल्याचा आरोप आहे. त्यासंबंधी पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली होती.

गोव्यात इंग्रजी शिक्षणाची मुहूर्तमेढ नि:स्वार्थी सुसंस्कृतांनी रोवली

- विजय प्रभू पार्सेकर देसाई, पेडणे

आपला अग्रलेख ‘स्वागत आणि विरोध’ तसेच भारतीय भाषा सुरक्षा मंचला आपण दिलेला सल्ला यथायोग्यच आहे. मात्र या विषयाला आणखी एक आयाम आहे. आपल्या परवानगीने ‘नवप्रभा’ वाचकांशी त्याबद्दल सुसंवाद साधत आहे.

पणजीत लिसेंव्ह नॅशनल द अफॉन्स द अल्बुकर्क होते. इथे सेत्‌मान्हा म्हणजेच आर्ट, कॉमर्स आणि सायन्सचे पदवीपर्यंतचे शिक्षण मिळत असे, सेतमानिस्ट गोवा मेडीकलमध्ये पुढील शिक्षणासाठी आणि तेरसैरो ऑफिशियाल म्हणून नोकरी मिळवण्यास पात्र ठरत असे. क्विंटानिस्ट हा मॅट्रीकुलेट समकक्ष. तो ऍडज्युदान्त (एलडीसी) च्या नोकरीस पात्र ठरत असे. इतर काही कोर्स वकीलीच्या अभ्यासक्रमासह त्याला करण्याची मुभा होती. म्हापसा आणि मडगावमध्ये दोन सरकारी लिसेव्ह होते. त्यावेळी पर्रा इथे (पर्रीकरांचं मूळ गाव) एकमेव इंग्रजी शिक्षण घेणारी शाळा होती. माझे प्रिन्सिपॉल स्वर्गवासी गुंडू सीताराम, उपाख्य आपा आमोणकर हे या शाळेचे शिक्षक. माझे वडील आणि आतेकाका रघुनाथ परशुराम उपाख्य काका देशप्रभू हे त्यांचेच विद्यार्थी.

गिलानींची गच्छन्ती

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना अपात्र ठरवून त्या देशातील सत्ताधारी पीपीपी आघाडीपुढील पेचप्रसंग अधिक बिकट केला आहे. गिलानी यांच्याजागी आघाडीतर्फे नवी व्यक्ती आणली जाईल हे खरे असले तरीही न्यायालयाच्या या निवाड्यातून उभा ठाकलेला सरकार विरुद्ध न्यायपालिका हा संघर्ष यापुढील काळात पाकिस्तानला अधिक संकटांच्या खाईत ढकलू शकतो. खरे तर गेल्या तेरा जूनला जेव्हा पाकिस्तानच्या अर्थसंकल्पाला तेथील संसदेत मंजुरी मिळाली तेव्हा सरकारच्या स्थैर्याचा तो एक दाखला गणला गेला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने गिलानी यांची अपात्रता एप्रिलपासून गृहित धरल्याने त्या अर्थसंकल्पालाही आता काही अर्थ उरलेला नाही. पाकिस्तान सरकार आधीच चहुबाजूंनी घेर्‍यात अडकलेले आहे. एकीकडे नाटो फौजांची अफगाणिस्तानकडील रसद तोडल्याने अमेरिकेचा रोष तेथील सरकारने ओढवून घेतलेला आहे. लष्कर आणि आयएसआय या दोन अन्य सत्ताकेंद्रांशीही मेमोगेटसारख्या प्रकरणांत बिनसले आहे.

पावसाळ्यातही कळंगुट समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांची गर्दी

Story Summary: 

पावसाळ्याच्या दिवसांतही कळंगुट समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांची गर्दी. (छाया : प्रणव फोटो )

जमातींसाठीच्या राखीव जागा तीन महिन्यांत भरणार

Story Summary: 

आदिवासी कल्याण खात्याचेमंत्री रमेश तवडकर यांनी काल खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन दि. ३० जूनपर्यंत मागास जमातीसाठी रिक्त असलेल्या पदांचा संपूर्ण अहवाल सादर करण्यास सांगितले असून त्याचप्रमाणे ३० जून नंतर तीन महिन्याच्या आत सर्व पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले.

सध्या वेगवेगळ्या खात्यातील मिळून १६७१ पदे रिक्त असल्याचा अहवाल खात्याकडे उपलब्ध आहे. वेगवेगळ्या खात्यांतील पदाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. गेल्या ९ वर्षांपासून वरीलपदे रिक्त आहेत. वीज खात्यात ३२२, शिक्षण खात्यात २२२, आरोग्य खात्यातील २४७ पदांचा त्यात समावेश आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान गिलानी अपात्र घोषित

Story Summary: 

पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचा निवाडा

पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी हे कोर्टाच्या अवमानप्रकरणी दोषी असल्याने पदावर राहू शकत नसल्याचा निवाडा काल पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने दिला. यामुळे पाकिस्तानात नवीन राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. देशासाठी नवीन पंतप्रधान नियुक्त करावा अशी सूचनाही कोर्टाने राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांना केली.

दरम्यान, गिलानीचा पक्ष पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या काल झालेल्या तातडीच्या बैठकीत कोर्टाचा हा निकाल स्वीकारल्याचा ठराव घेण्यात आला.

युवकांमध्ये पर्यावरण जागृती करणे महत्त्वाचे : धेंपो

Story Summary: 

टेरी व धेंपो यांच्या संयुक्त जागृती उपक्रमाची सांगता

पर्यावरणासंबंधी युवकांमध्ये जागृती करणे महत्त्वाचे असून गोवा हे आरोग्यवान राज्य बनविण्यासाठी पर्यावरण सांभाळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी काल केले.

टाटा एनर्जी अँड एन्वायर्न्मेट रीसर्च इन्स्टीट्यूट (टेरी) व वासुदेवराव धेंपो क्लायमेट चेंज अवॅरनेस प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने गेली दोन वर्षे राज्यातील वेगवेगळ्या विद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी जागृती प्रकल्प आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या काल झालेल्या समारोप सोहळ्यात धेंपो बोलत होते. वरील कार्यक्रमाचे आयोजन धेंपो हाऊसमधील सभागृहात केले होते. ‘टेरी’च्या प्रकल्प संयोजक शबाना काझी व सल्तनत काझी उपस्थित होत्या.

शिवसेनेचा मुखर्जींना पाठिंबा; रालोआची लढत कठीण

राष्ट्रपती निवडणूक

घटकपक्ष शिवसेनेने प्रणव मुखर्जी यांच्या उमेदवारीस पाठिंबा देण्याबाबत अनुकूलता दर्शविल्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार उभा करण्याबाबत नवी अडचण निर्माण झाली आहे. रालोआची आज बैठक होण्याची शक्यता आहे.

माहिती आयुक्तांकडून स्पष्टीकरण मागितले

राज्य माहिती आयुक्त पदासाठी आवश्यक ती पात्रता नसताना चुकीची माहिती पुरवून पद मिळवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गोवा सरकारने पांडुरंग नाडकर्णी यांच्याकडून काल स्पष्टीकरण मागितले.

सातोडे-सत्तरीत चिकनगुनिया; आतापर्यंत तिघांना लागण

सातोडे सत्तरीत तापाची साथसुरूच असून त्या रुग्णांच्या रक्ताची तपासणी केली असता आतापर्यंत तिघांना चिकनगुनियाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

राज्यातील ६० पारंपरिक व्यवसायांपैकी अर्ध्यांनाच शासकीय योजनेचा लाभ

‘कलयकार’, ‘घाणेकार’, ‘चणेकार’ कालौघात नामशेष

राज्यातील पारंपरिक व्यवसायांना संजीवनी देण्याच्या योजनेची सरकारने यावर्षापासूनच अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. परंतु डॉ. नंदकुमार कामत यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निवडलेल्या सुमारे साठ पारंपरिक व्यवसायांतून सुमारे पन्नास टक्के व्यवसाय या योजनेतून वगळण्याचा सरकारचा विचार असून यासंबंधी लवकरच निर्णय होईल.

वाहतुकीची सोय करूनच शाळा जोडा

राज्यातील सरकारी प्रा. शाळांतील विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था तसेच शाळा जोडण्याचे काम पालक संघटना व सरपंच, पंच सदस्य यांना विश्‍वासात घेऊनच करण्याचा आदेश मुग्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शिक्षण खात्याच्या अधिकार्‍यांना दिल्याने त्यांची सध्या धावपळ सुरू झाली आहे.

दुर्गा हायस्कूल निधी गैरवापर प्रकरणी तिघांना अटक

पार्से येथील श्रीदुर्गा हायस्कूलच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी तुकाराम रामजी (विद्यानगर, पार्से), अविनाश पालयेकर (माऊसवाडा , पेडणे) व विठू रघुवीर पेडणेकर (उसकई बार्देश) या तिघांना पेडणे पोलिसांनी काल १९ रोजी अटक केली.

मार्थावर १४ वार शवचिकित्सा अहवाल

सासमोळे बायणा येथील मार्था फेलीक्स डायस मृत्यू प्रकरणी अद्यापपर्यंत कोणालाही अटक झालेली नसली तरी तपास योग्य दिशेने होत असल्याचा दावा वास्को पोलिसांनी केला आहे. शवचिकीत्सा अहवाल प्राप्त झालेला असून त्यानुसार मयत डायस हिच्या मानेवर व अंगावर एकुण १४ ठिकाणी वार केल्याचे म्हटले आहे. यातील काही वार खोलवर गेल्याचे अहवालामध्ये नमुद करण्यात आले आहे. खून करण्यासाठी वापरलेले हत्त्यावर अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती लागू शकले नाही. मात्र तपास योग्य दिशेने जात असल्याचा दावा उपअधिक्षक लॉरेन्स डिसोझा व निरीक्षक रूपेंद्र शेटगांवकर यांनी केला आहे. दरम्यान डायस यांचा विदेशातील जहाजावरील पूत्र उद्या बुधवारपर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

माध्यम बदलाची तडजोड ‘भाभासुमं’ने स्वीकारली : भेंब्रे

माध्यम बदलाविषयीचा सरकारचा निर्णय तडजोड म्हणून स्वीकारली असल्याचे भारतीय भाषा सुरक्षा मंचचे ऍड. उदय भेंबे्र यांनी काणकोण येथे बोलताना सांगितले.

भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या काणकोण शाखेची बैठक श्रीस्थळ शासकीय विश्रांतीगृहात झाली. त्याला भेंब्रे व अवधूत कामत उपस्थिथ होते.भेंब्रे पुढे म्हणाले, विद्यमान सरकारने जे दिले आहे ते प्रथम स्वीकारावे आणि बाकीच्या गोष्टी झगडून मागून घ्याव्यात मात्र आंदोलन करताना विचारपूर्वक करावे.

साबांखा कंत्राटी कामगारांचा मुख्यमंत्री निवासावर मोर्चा

सार्वजनिक बांधकाम खात्यातील सुमारे १५० कंत्राटी कामगारांनी काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी आपणाला सेवेत कायम केले जावे या मागणीसाठी मोर्चा नेला. मात्र, मुख्यमंत्री राज्याबाहेर गेलेले असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.

कॉंग्रेसचे आरोप आकसापोटी

हिंदू जनजागृती समिती

रामनाथी येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामुळे धार्मिक तणाव निर्माण होऊन शांतता भंग होईल, असा आरोप कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला आहे तो केवळ हिंदुत्ववादी संघटनांच्या आकसापोटी आणि सूडबुद्धीने केल्याचे हिंदू जनजागृती समितीचे डॉ. मनोज सोळंकी यांनी म्हटले आहे.

माध्यम प्रश्‍नावर कायमस्वरूपी तोडगा कधी?

- दिलीप बोरकर

नियमभंग करून इंग्रजी माध्यम सुरू केलेल्या शाळांतील २५ हजार विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गोंधळ उडू नये म्हणून सरकारने या वर्षी ‘त्या’ १२६ इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पण हा निर्णय अंतिम नसून, माध्यम प्रश्‍नावर अंतिम निर्णय येणार्‍या काळात स्थापन होणारी तज्ज्ञांची समिती घेईल. सध्या ज्या इंग्रजी शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो तात्पुरता आहे. त्यामुळे गोव्यातील भाषाप्रेमींनी माध्यम प्रश्‍नावर पूर्ण तोडगा निघेपर्यंत शांत रहावे अशी आवाहनवजा दवंडी सरकारतर्फे पिटली गेलेली आहे. तरी सुद्धा ‘गेट वेल सून’ गटाचे भारतीय भाषाप्रेमी युवक सरकारच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून निषेध सभा आणि मोर्चाचे आयोजन करायला लागलेले आहेत.

विरोधासाठी विरोध

विद्यमान राजकीय परिस्थितीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरण्याची आपली इच्छा नसल्याचे डॉ. अब्दुल कलाम यांनी सांगून टाकल्याने कॉंग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार उभा करण्याच्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. प्रणव यांच्या विरोधात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एक वरिष्ठ नेते पी. ए. संगमा यांच्या स्वयंघोषित उमेदवारीला पाठिंबा देण्यावाचून अन्य पर्याय सध्या तरी रालोआपाशी नाही. आधीच रालोआपाशी पुरेशी मतसंख्या नाही. त्यात शिवसेनेनेही ‘तलवार म्यानात नसताना उगाच मुठीला व वीरत्व दाखवण्याचा प्रयत्न करू नका’ अशा रोखठोक शब्दांत फटकारल्याने केवळ विरोधासाठी विरोध करणे कितपत योग्य याचा विचार खरे तर भाजपा आणि रालोआच्या नेत्यांनी करणे आवश्यक आहे. सद्यपरिस्थितीत आपल्यापाशी एक तर निवडणुकीत चुरस निर्माण करील अशी मतसंख्या नाही आणि दुसरीकडे तुल्यबळ उमेदवारही नाही अशा स्थितीत राओलाने प्रणव मुखर्जी यांच्या उमेदवारीबाबत सहमती दर्शवली तर काय बिघडेल? राष्ट्रपती हा एखाद्या राजकीय पक्षाचा राष्ट्रपती नसतो, तो देशाचा राष्ट्रपती असतो. प्रणव मुखर्जी हे आजवर निष्ठावान कॉंग्रेस नेते जरी राहिले तरी राष्ट्रपतीपदावर आरूढ झाल्यावरही ते कॉंग्रेसचीच री ओढत बसणे अपेक्षित नाही. त्या पदाची शान आणि आब यांची त्यांच्यासारख्या मुत्सद्द्याला नक्कीच कल्पना असेल. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षीय चष्म्यातून पाहण्याचे काही कारण नाही. डॉ. कलाम निवडणुकीत उतरायला राजी झाले असते तर आपल्यापाशी निदान तुल्यबळ उमेदवार असल्याने रालोआच्या विरोधाला काही अर्थ उरला असता. ज्या संगमा यांना पाठिंबा देण्याच्या हालचाली भाजपामध्ये वाढल्या आहेत, त्या संगमांना खुद्द त्यांच्याच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे समर्थन नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच संगमा यांनी उमेदवारी दाखल करू नये यासाठी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.

योगमार्ग-राजयोग (योगसाधना : १३३) अस्तेय : १६

- डॉ. सीताकांत घाणेकर

भगवंताची सृष्टी फार मोठी आहे. ती फक्त पृथ्वी नाही तर अखंड ब्रह्मांड आहे. ह्या ब्रह्मांडात अनेक सूर्यमाला आहेत. त्यात अनेक सूर्य, चंद्र, तारे आहेत. त्यातच आपली छोटीशी पृथ्वी. ब्रह्मांडात विविध तर्‍हेचे प्राणी- कृमी-कीटक, पशू-पक्षी, वृक्ष-वनस्पती... त्यात अत्यंत अल्पसंख्याक प्राणी म्हणजे मानव. एवढी विस्तृत सृष्टी चालवण्यासाठी काही कायदे-कानून पाहिजेत. त्याप्रमाणेच ती चालणार. मानव जरी कितीही बुद्धिमान असला, भगवंताची उत्कृष्ट कलाकृती असला तरी त्याचे कायदे इथे चालत नाही. जास्त करून स्वार्थाने व अविचाराने बनविलेले कायदे.

अहा, कँपस .. कँपस...

- प्रा. रमेश सप्रे

उच्च शिक्षण देणार्‍या विद्यालयांचा परिसर (कँपस) हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा घटक असतो. हो, विद्यालयांनाही व्यक्तिमत्त्व (पर्सनॅलिटी) असतं. दुर्दैवानं आपल्याकडे फारच थोड्या विद्यालयांना देखणा, प्रशस्त परिसर असतो. शहरात तर विचारायलाच नको, पण ग्रामीण भागातल्या उच्च माध्यमिक विद्यालयांना तसंच महाविद्यालयांनाही योग्य असा विकसित कँपस नसतो. या चांगल्या कँपसमागे फार दूरदृष्टी असावी लागते. जागा ताब्यात आल्यावर पहिलं काम संपूर्ण जागेचं लँडस्केपिंग करून तिथे आहेत ती झाडं, वनस्पती, एवढंच नव्हे तर मोठे मोठे दगड, खड्डे यांचाही विचार करून बांधकामाचा संपूर्ण आराखडा (प्लॅन किंवा मास्टर प्लॅन) बनवणं. प्रत्यक्ष विद्यालय एखादं वर्ष उशिरा सुरू झालं तरी चालेल पण कँपस छान तयार झाला पाहिजे हा विचार केवळ ‘पैसा मिळवण्याच्या’ हव्यासापायी तुडवला जातो. अन् उभ्या राहतात त्या सिमेंट-कॉंक्रीटच्या आत्माशून्य इमारती. कॉंक्रीट जंगल!

मुसळधार पावसाने गोव्याला झोडपले

Story Summary: 

केपे येथे पावसामुळे झालेला अपघात.

मुसळधार पावसाने गोव्याला झोडपले

Story Summary: 

२४ तासांत साडे सात इंच पाऊस; माशेल भागात चक्रीवादळ

राज्याला सलग तिसर्‍या दिवशी पावसाने झोडपून काढले असून राज्यभरात अनेक ठिकाणी झाडे घरांवर, इमारतीवर पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माशेल व कुंभारजुवे या भागांत काल पहाटे चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानेही मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. गेल्या २४ तासात साडेसात इंच पावसाची नोंद झाल्याची माहिती वेध शाळेतर्फे देण्यात आली आहे. पुढील दोन दिवसही मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पणजी शहराच्या अनेक भागांत पाणी तुडूंब भरले होते. गटारेहसी तुंबून वाहत होती. त्याचा पादचार्‍यांना तसेच वाहन चालकांना त्रास झाला. परवा रात्रीपासून मुसळधार पावसाबरोबरच वादळी वारे वाहत होते. त्यामुळे अनेक भागांत वृक्ष उन्मळून पडल्याने नुकसानी झाली आहे. राजधानीत काल सकाळपासून महापालिकेचे कर्मचारी पाण्याला वाट करून देण्याचे काम करीत होते.

बायणा येथे महिलेची हत्या

Story Summary: 

माहितगारानेच खून केल्याचा संशय

बायणा सासमोळे येथील बंगल्यामध्ये राहणार्‍या मार्था फेलीक्स डायस (६१) हिचा रविवारी रात्री अज्ञात इसमांनी चाकूने गळा चिरून खून केल्याची हृदय द्रावक घटना घडली असून जाताना खुनी इसमांने सदर महिलेची आय-१० गाडी घेऊन पळ काढल्याने यामागे माहितगाराचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृत महिलेच्या पोटात डाव्या बाजूस चार व उजव्या बाजूस एक वार झाला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर बंगल्यावर मयत मार्था ही एकटीच राहत असून तिचा २६ वर्षाचा मुलगा विदेशात जहाजावर नोकरीला आहे. रोजच्या प्रमाणे मोलकरीण घरी आल्यानंतर तिने मुख्य दरवाजाची बेल वाजवून नेहमीप्रमाणे मागील दरवाजाकडे गेली. घर मालकीण दरवाजा उघडत नसल्याचे पाहून ती चर्चमध्ये प्रार्थनेला गेल्याचा संशय व्यक्त करून आपल्या घरी परतली. एकातासाने मोकरीण पुन्हा आली व दरवाजा ठोठावला असता आतून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून तिला संशय आला. बाहेर आय-१० गाडी दिसत नव्हती तसेच बंगल्यातील सर्व विजेचे दिवे पेटत असल्याने मोकरणीचा संशय बळावला.

माध्यमप्रश्‍नी अंतिम निर्णय शिक्षण समितीचाच : पर्रीकर

Story Summary: 

शिक्षण माध्यमाच्या प्रश्‍नावर सरकारने घेतलेला निर्णय अंतिम नसून तो तात्पुरता आहे. लवकरच ऍकेडमी कौंसिलची स्थापना होणार असून हे मंडळ या प्रश्‍नावर पूर्ण अभ्यास करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री मनोेहर पर्रीकर यांनी काल येथील आझाद मैदानावर आयोजित क्रांतिदिनाच्या कार्यक्रमात सांगितले.

स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष नागेश करमली यांनी वरील विषय उपस्थित केला होता. कॉंग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या तुलनेत पर्रीकर सरकारचा निर्णय काही चांगला असला तरी तो अर्धवट आहे, असे सांगून १२६ इंग्रजी माध्यमातील शाळांना अनुदान चालू ठेवण्याच्या निर्णयावर असमाधान व्यक्त केले होते. त्याची दखल घेऊनच पर्रीकर यांनी वरील भाष्य केले. यापूर्वीही एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी वरील वक्तव्य केले होते.

गावांची पोर्तुगीज नावे बदलण्यासाठी ठराव मांडणार : वाघ

‘क्रांतीगाथा ही अपरान्ताची’चे शानदार प्रकाशन

पोर्तुगीज गेले तरी अद्याप गोव्यातील गावांची नावे पोर्तुगीज वळणाचीच असून ती बदलावीत यासाठी आपण विधानसभेत ठराव मांडणार आहोत, अशी घोषणा सांत आंद्रेचे आमदार व साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांनी काल पणजीत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात केली.

राष्ट्रपती निवडणूक लढवण्यास अब्दुल कलाम अनुत्सुक

तृणमूलच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची हवा

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारी संदर्भात तृणमूल कॉंग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडीत मतभेद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारमधील तृणमूल कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी पदांचे राजीनामे पक्षाध्यक्षांस सादर केल्याच्या वृत्ताने काल राजकीय वातावरण तापले. मात्र, अशा प्रकारे राजीनामे दिल्याचे वृत्त निराधार असल्याचा दावा तृणमूल कॉंग्रेसने केला आहे.

वळवई एकशिक्षकी शाळा प्रकरणी शिक्षण संचालकांचे कानावर हात

पालकांचा आरोप

पहिली ते चौथीच्या चार वर्गांत एकच शिक्षक असल्याप्रकरणी शिक्षण संचालकांची भेट घेण्यास गेलेल्या वळवई येथील पालकांना शिक्षण संचालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याची तक्रार वळवई येथील पालकांनी केली आहे.

कृषी बाजारपेठ विषयक अहवाल सरकारला लवकरच

पॉंडिचेरी व चेन्नई दौर्‍यात तेथील कृषी उत्पादनाच्या बाजार यंत्रणेची पाहाणी केली असून यासंबंधी लवकरच सरकारला अहवाल सादर करणार असल्याची माहिती कृषी संचालक सतीश तेंडुलकर यांनी काल दिली.

बसमालकांचे सरकारला निवेदन

राज्यातील बसमालकांमध्ये फूट पडली असून काल सकाळी माशेल बस मालक संघटना, पणजी शहर बस मालक, पणजी-फोंडा तसेच चिंबल, कुडका, नेवरा या भागातील बस मालकांनी वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांना निवेदन सादर करून वाहतूक व्यवस्थेच्या हितासाठी सरकारतर्फे घेतल्या जाणार्‍या निर्णयांस पाठिंबा देण्याचे आश्‍वासन दिले आहे.

‘भाभासुमं’ची आज काणकोणात बैठक

श्रीस्थळ काणकोण येथील शासकीय विश्रामधामात १९ जून रोजी संध्याकाळी ४ वा. भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.

संस्कृत भाषेतील कविकुलभूषण : महाकवी कालिदास

- शंभू भाऊ बांदेकर

कवी कालिदासाच्या रसिक वृत्तीचा संदर्भ देत जाणकारांनी त्यांच्याविषयी मतप्रदर्शन करताना म्हटले आहे की, ‘‘प्रतिभेसारख्या बुद्धीमती, रूपमती, गुणवती अशा कामिनीनी वरलेला हा कान्त आहे.’’

कालिदासाच्या काव्यातील प्रेम, प्रेमभंग, विरह, विद्रोह, शृंगार, रोमांच आदींनी असंख्य प्रियकर प्रेयसींना घायाळ केले असले तरी, खुद्द कालिदासांचा जन्म कुठे, कसा झाला याबद्दल मात्र आपला रसभंग होतो. शेवटी आपल्याला आश्रय घ्यावा लागतो तो दंतकथांचा. यातील पहिली दंतकथा अशीः कालिदासाचा जन्म ब्राह्मण कुळात झाला होता खरा, पण हा मुलगा जन्मतःच ‘ढ’ असल्यामुळे त्याच्या नशिबात गुराख्याचे काम करणे आले. हे काम करीत असताना एक दिवस तो रिकामपणाची कामगिरी म्हणून झाडाच्या एका फांदीवर बसून तीच फांदी मुळातून तोडू लागला. हे त्याचे अजब ‘कौशल्य’ योगायोगाने त्या राज्याच्या प्रधानाच्या नजरेत आले आणि प्रधानाच्या डोक्यात प्रकाश पडला. या प्रधानाचा त्या राज्यातील राजकन्येने अपमान केला होता. प्रधानाला तिचा सूड घेण्याची संधी आयतीच चालून आली. त्याने त्या राजकन्येचे लग्न या गुराख्याशी लावून दिले. पुढे एकांतात राजकन्येला सारा प्रकार कळून आल्यानंतर तिने त्या गुराख्याला झिडकारले. गुराखी फार कष्टी झाला. आपला अडाणीपणा घालविण्यासाठी त्याने कालीची प्रार्थना करून ज्ञान संपादन केले व तो पुढे ‘कालिदास’ झाला. आपल्या अपूर्व काव्यज्ञानाने राजकन्येचा- आपल्या पत्नीचा नक्षा आणि नखरा त्याने उतरवला.

गरजेची गोष्ट

देशातील प्रत्येक कुटुंबाचे एक तरी बँक खाते असावे यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावेत अशा सूचना अर्थ मंत्रालयाने बँकिंग क्षेत्राला दिल्या आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार आजही देशातील चाळीस टक्के कुटुंबांचे एकाही बँकेत खाते नाही. ही आकडेवारी विलक्षण बोलकी आहे. म्हणजे एकीकडे मोजक्या मंडळींपाशी पैसा एकवटतो आहे आणि दुसरीकडे या देशातील एक मोठा वर्ग विलक्षण गरिबीमध्ये दिवस कंठतो आहे याचाच हा आणखी एक सज्जड पुरावा आहे. एकीकडे एकेका धनदांडग्या व्यक्तीची अगणित खाती तर दुसरीकडे कुटुंबाचे एकही खाते नाही अशी विचित्र परिस्थिती या देशात निर्माण झाली आहे. परवा आपल्याकडे मांद्रे येथे एका तलाठ्याला लाचलुचपतीच्या आरोपाखाली पकडले गेले, त्याच्यापाशी त्याची एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल अकरा बँक खाती आढळली, म्हणजे बघा. एकीकडे उत्पन्नाच्या स्त्रोतांहून अधिक काळा पैसा एकवटू लागला की तो दडवण्यासाठी एकेका व्यक्तीची असंख्य बँक खाती; देशात हा पैसा दडवणे दिवसेंदिवस कठीण बनू लागल्याने विदेशांतील बँकांमध्ये खाती आणि दुसरीकडे समाजामध्ये असाही एक मोठा वर्ग ज्याचा कधी बँकेच्या व्यवहाराशी संबंधही आला नाही! रोजच्या पोटापाण्याचीच जिथे भ्रांत, तेथे साठवण्याइतपत पैसे येणार कुठून? त्यात निरक्षरता, वास्तव्याच्या ठिकाणाची दुर्गमता अशा अनेक कारणांनी बँकांपासून लाखो लोक आजही दूर आहेत. बँक खाते नसल्याने सारा कारभार रोखीने. म्हणजे दलालांकडून फसवणूक आलीच.

मुसळधार... पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत

Story Summary: 

दाबोळी विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्यावर साचलेले पाणी. (छाया : सुदेश भोसले)

मुसळधार...

Story Summary: 

काल दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले. येत्या ४८ तासांत असाच मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला असून समुद्र खवळलेला राहणार असल्याने समुद्रात न जाण्याचा इशाराही दिला आहे.

परवा माध्यरात्रीपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू झाला होता. काल दिवसभर तो चालूच होता. काल सकाळी ८.३० ते संध्याकाळी ६ या दरम्यान राज्यात २ इंच एवढा पाऊस पडल्याचे वेधशाळेतील सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत राज्यात १८ इंच एवढा पाऊस पडल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

माध्यमप्रश्‍नी आजपासून युवकांचे आंदोलन

Story Summary: 

इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘गेट वेल सून’ या महाविद्यालयीन युवकांच्या संघटनेने आजपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे या संघटनेचे एक नेते युगांक नाईक यानी काल सांगितले. महाविद्यालये सुरू झाल्यानंतर महाविद्यालयातून हे आंदोलन नव्याने छेडण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

आज सोमवार दि. १८ जून रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. आज सकाळी प्रथम फोंडा येथे भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याजवळ गार्‍हाणे घालण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तद्नंतर क्रांती मैदानावर मूक मोर्चा नेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

मुखर्जींना पाठिंब्याच्या मुद्द्यावर रालोआत मतभेद

Story Summary: 

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीविषयी चर्चेकरिता काल झालेल्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कालच्या बैठकीत यूपीए उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा द्यावा की दुसरा उमेदवार उभा करावा यावरून तीव्र मतभेद झाल्याने रालोआची बैठकी निष्कर्षाविना आटोपती घेण्यात आली. दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीस उभे राहू इच्छित असलेले पी. ए. संगमा यांना पाठिंबा देण्याबातही दुमत होते.

भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी काल सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीनंतर रालोआचे निमंत्रक शरद यादव यांनी सांगितले की, बैठकीत सर्व घटक पक्षांच्या प्रतिनिधींनी सविस्तरपणे मते मांडली. मात्र निर्णय झालेला नसून येत्या दिवसांत पुन्हा भेटून त्याबाबत ठरविण्यात येईल. लालकृष्ण अडवाणी रालोआच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दिल्लीबाहेरच्या अन्य नेत्यांशीही संपर्क साधला जाणार आहे.

केरी सत्तरीला वादळाचा तडाखा; लाखो रुपयाची हानी

केरी-सत्तरीला वादळाचा जबरदस्त तडाखा बसला असून बागायती तसेच सरकारी मालमत्तेची लाखो रुपयांची हानी झाली आहे.

काल दुपारी ३ वाजता मुसळधार पावसाबरोबर वादळ होऊन केरी गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकर्‍यांच्या बागायतीत केळी, सुपारी झाडाची पडझड झाली.

पुरातत्त्व दाखल्यांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; दरदिवशी २०० जणांची भेट

संग्रहात १४४८ सालचे जुने पुस्तक

नुकत्याच लखनऊ येथे भरलेल्या पुरातत्व वस्तूंच्या प्रदर्शनास चांगला प्रतिसाद लाभल्याचे सांगून पुरातत्व खाते सुमारे १० कोटी दाखल्याचा समावेश असलेली पाच लाख पुस्तकांचे योग्य पध्दतीने सरकार जतन करीत असल्याचे पाहून सर्वांनीच प्रशंसा केल्याचे संचालक मनोहर डिचोलकर यांनी सांगितले. या दाखल्यांचे सध्या येथील पुरातत्व खात्यातही प्रदर्शन मांडले आहे.

आज गोवा क्रांतिदिन

गोवा क्रांतिदिनानिमित्त मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि राज्यपाल बी.व्ही. वांछू यांनी गोमंतकीयांना शुभेच्या दिल्या आहेत.

क्रांतिदिनानिमित्त राज्यस्तरीय समारोह आज सकाळी ८.४५ वा. आझाद मैदानावर होईल. त्याला राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून तर मुख्यमंत्री सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असतील. या कार्यक्रमात सात स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात येईल.

शीला कोळंबकर यांना टागोर पुरस्कार

कोकणीतील प्रसिध्द कथाकार शीला कोळंबकर यांच्या ‘गॅर्र’ या कथासंग्रहास सॅमसंग इंडिया व साहित्य अकादमीचा टागोर पुरस्कार प्राप्त झाला असून नुकत्याच कोची येथे झालेल्या सॅमसंग इंडिया व साहित्य अकादमीने अयोजित शानदार सोहळ्यात केंद्रीय कायदामंत्री विरप्पा मोईली यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

घरफोडीप्रकरणी दोघांना अटक

बाक्रे-केपे येथील बाबूसो गावकर यांच्या घरात चोरी करून सुमारे १ लाख २० हजार रु.चा ऐवज लांबविल्याप्रकरणी अजिद महमद अली (२१) आणि मुहमद चांदसाब (२१) या दोघांना काल कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली.

केरी-फोंडा येथे अपघातात एक ठार

केरी-फोंडा येथे मुख्य रस्त्यावर आज सायंकाळी ५च्या दरम्यान झालेल्या दोन वाहनाच्या टक्करीत मोटरसायकल चालक विजयकांत गावकर (२३) राहणार निरंकाल हा जागीच ठार झाला. त्याला आय. डी. इस्पितळात आणले असता डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले.

माड कोसळून एक ठार

बेतुल येथे एकाचा माड कोसळून मृत्यू झाला. आल्फ्रेड जोकी सोझा (४२) हा साळ नदीवर काल गळ टाकून मासे पकडण्यासाठी बसला असताना तेथील एक माड मोडून त्याच्यावर कोसळला. यात तो जखमी होऊन मृत्यू पावला.

उच्च सुरक्षा क्रमांकपट्या; बसमालकांचे आंदोलन स्थगित

उच्च सुरक्षा क्रमांकपट्‌ट्यांप्रश्‍नी मुख्यमंत्री बसमालक आणि टॅक्सीचालक यांचे मन वळविण्यात यशस्वी झाल्याने आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले.

‘आऊट ऑफ बॉक्स’ची आज सांगता

गोवा करमणूक सोसायटीतर्फे गेल्या शुक्रवारपासून आयोजित करण्यात आलेल्या ‘आउट ऑफ बॉक्स’ या चित्रपट महोत्सवाचा आज संध्याकाळी (सोमवारी) समारोप होणार आहे.

फोंड्यातील सभेत विष्णू वाघ यांचा इशारा

Story Summary: 

फोंडा येथील सभेत बोलताना आमदार विष्णू वाघ. बाजूस उपस्थित भारतीय भाषाप्रेमी.

माध्यम प्रश्नावर आवाज उठवणारच

Story Summary: 

फोंड्यातील सभेत विष्णू वाघ यांचा इशारा

राजकारणापेक्षा माझी पहिली बांधिलकी ही माझ्या मातृभाषेशी व संस्कृतीशी असून माध्यमप्रश्नी आपली जी भूमिका निवडणुकीपूर्वी होती, तीच आजही आहे. आमदार विष्णू वाघांवर भले बंधने असतील, परंतु कवी व साहित्यिक विष्णू वाघांवर कसलीच बंधने नसून युवकांसमवेत पुन्हा रस्त्यावर उतरण्याची आपली तयारी आहे, माध्यम प्रश्नावर आपल्याला कोणी हायकमांड लागत नाही, असा इशारा सांत आंद्रेचे आमदार व कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू वाघ यांनी माध्यमप्रश्नी फोंड्यात ‘गेट वेल सून’ गटातर्फे काल आयोजित जाहीर सभेत दिला.

भारतीय भाषा सुरक्षा मंचाची भूमिका आपल्याला अमान्य असल्याचेही त्यांनी जाहीर केले. पर्रीकर सरकारने इंग्रजी शाळांना दिलेल्या अनुदानाच्या निर्णयाचा फेरविचार केला नाही तर दिगंबरांप्रमाणे तोंड लपवून फिरण्याची पाळी पर्रीकरांवरही येईल असेही श्री. वाघ म्हणाले.

पर्रीकरांकडून १०० दिवसात उल्लेखनीय काही नाही : देशप्रभू

Story Summary: 

मनोहर पर्रीकर सरकारने गेल्या १०० दिवसात उल्लेखनीय असे काहीही केले नसल्याचा दावा काल कॉंग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी केला.

विरोधी पक्षनेते असताना माध्यमप्रश्‍नी दिगंबर कामत सरकारवर तुटून पडणार्‍या मनोहर पर्रीकर यांना माध्यम प्रश्‍नी कायमस्वरूपी असा तोडगा काढण्यास अपयशच आल्याचे ते म्हणाले.

सार्‍यांच्या नजरा आता नव्या अर्थमंत्र्यांकडे

Story Summary: 

राष्ट्रपतीपदासाठी संयुक्त पुरोगामी आघाडीने प्रणव मुखर्जी यांची उमेदवारी घोषित केल्याने आता त्यांचे अर्थमंत्रीपद पटकावण्यासाठी मंत्र्यांमध्येच चुरस लागली आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग अर्थमंत्रीपद स्वतःकडे ठेवतील की त्या जागी दुसर्‍या मंत्र्याची वर्णी लावतील याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे. १९९१ साली डॉ सिंग अर्थमंत्रीपदी असताना त्यांनी देशाला उदारीकरणाकडे नेले होते, त्यामुळे यावेळी देशाची आर्थिक परिस्थिती डळमळीत झालेली असताना डॉ. सिंग हेच देशाला तारू शकतील असे अनेकांना वाटते.

खातेबदलाचीही चर्चा जोरात असून ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश, माजी अर्थमंत्री व विद्यमान गृहमंत्री पी. चिदंबरम यांची नावेही अर्थमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. जयराम रमेश हे अर्थतज्ज्ञ असून एमआयटी पदवीधर आहेत. चिदंबरम हे २००८ साली अर्थमंत्री होते व जागतिक आर्थिक मंदीतही भारतीय अर्थव्यवस्था त्यांनी व्यवस्थितरीत्या हाताळली होती. मात्र, यावेळी त्यांचे नाव टूजी घोटाळ्यात घेतले जात असल्याने त्यांना अर्थमंत्रीपद दिले जाईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

भीषण दुर्घटनेत ३२ भाविक ठार

शिर्डीहून हैदराबादकडे निघालेली एक बस पुलावरून खाली कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ३२ भाविक ठार झाले, तर २० जण गंभीर जखमी झाले. उस्मानाबाद जिल्ह्यात ही भीषण दुर्घटना घडली. हे सर्व भाविक हैदराबादचे असून शिर्डीत श्री साईबाबांचे दर्शन घेऊन ते परतत असताना पहाटे दोन वाजून चाळीस मिनिटांनी हा अपघात झाला.

माध्यमप्रश्‍नी शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

शिवसेनेची भुमिका सरकारविरोधी नाही, परंतु सरकारने भाषा माध्यम प्रकरणी गोमंतकातील आम जनतेचा जो विश्‍वासघात केला आहे, त्या विरोधात शिवसेना सदैव उभी राहणार आहे. आजपर्यंत सरकारने केलेल्या चांगल्या कार्याचे शिवसेनेने नेहमी समर्थन केले आहे, परंतु ज्या ज्या वेळी सरकार आम जनतेच्या विरोधी निर्णय घेणार त्या त्यावेळी शिवसेना नेहमी विरोध करीत राहणार असा इशारा शिवसेनेचे गोवा राज्यप्रमुख रमेश नाईक यानी आज येथे दिला. विद्यमान सरकारने भाषा माध्यमप्रकरणी जो निर्णय घेतला आहे. त्याचा जाहीर विरोध तसेच शिवसेनेच्या गोवा राज्य कार्यकारिणीचा पुढील कार्याची रूपरेषा ठरविण्यासाठी डिचोली येथील विशेष बैठकीत ते बोलत होते.

तोतयांकडून सात लाखांच्या फसवणूकीची तक्रार

ब्रिटनस्थित ‘ग्रीन प्लस एनर्जीस’ या कंपनीचे आपण संचालक असल्याचे भासवून सदर कंपनीत नोकरी ि’ळवून देण्याचा बहाणा करून रॉबर्ट पाबलो व फेरदिनान्ड लेरॉय या दोघा तोतयांनी आपणाला ७ लाख ६० हजार रु.ना गंडा घातल्याची तक्रार मरड-करंजाळे येथील पूनम ध्रावण श्रीवास्तव यानी पणजी पोलिसात केली आहे.

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून हटणार नाही : संगमा

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून आपण मागे हटणार नाही. वाटल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्याला काढून टाकले तरी चालेल, अशी भूमिका पी. ए. संगमा यांनी घेतली आहे. संगमा यांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दाखल करू नये अशी विनंती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना केली होती. ती संगमा यांनी धुडकावली आहे. संगमा यांनी उमेदवारी दाखल करू नये यासाठी त्यांचे मन वळवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची २१ जून रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर संगमा यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

काश्मीरमध्ये लढणार्‍या सैनिकांप्रती आत्मियता बाळगणारेच खरे देशप्रेमी : डॉ शेवडे

सार्वभौमत्वाचा आग्रह धरायचा असेल तर काश्मीरचा घटनेत समावेश नको का असा प्रश्‍न करून, काश्मीरमध्ये लढणार्‍या हुतात्म्या व सैनिकांप्रती आत्मियता व कणव बाळगणारेच खरे राष्ट्रप्रेमी असे प्रतिपादन प्रसिध्द इतिहास लेखक, वक्ते डॉ. सच्चितानंद शेवडे यांनी येथे केले.

मनात आणले तर पाक ८ सेकंदांत भारतावर अणुबॉम्ब टाकेल

पाकिस्तानी अधिकार्‍याने २००१ मध्ये दिली होती धमकी

पाकिस्तानने ’नात आणले तर भारतावर आठ सेकंदांत अणुबॉम्ब टाकू शकते, असा दावा पाकिस्तानी लष्कराच्या एका जनरलने २००१ ’ध्ये केला होता, असा दावा ब्रिटनचे ’ाजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या एका सहकार्‍याच्या डायरीत करण्यात आला आहे. टोनी ब्लेअर यांचे कम्युनिकेशन्स डायरेक्टर असलेल्या ऍलिस्टर कॅम्पबेल यांच्या दैनंदिनीं’ध्ये या घटनेची नोंद आहे.

गोमेकॉत ५० जागा वाढविण्यास मान्यता

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आणखी ५० जागा वाढवण्यास भारतीय वैद्यकीय मंडळाने काल मान्यता दिली.

त्यामुळे चालू वर्षापासून गोमेकॉत वैद्यकीय शिक्षणासाठीच्या जागा १०० वरून १५० वर जाणार आहेत. गोमेकॉतील वैद्यकीय शिक्षणासाठीच्या जागा १०० वरून १५० वर नेण्यास परवानगी देण्याची मागणी गोवा सरकारने भारतीय वैद्यकीय मंडळाकडे केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर काल मंडळाने या अतिरिक्त ५० जागांसाठी सरकारला हिरवा कंदिल दाखवला. आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यानी काल ही माहिती दिली.

हिंदू मूलतत्ववाद्यांना पर्रीकरांकडून प्रवेश : जितेंद्र

मनोहर पर्रीकर हे हिंदू मूलतत्ववाद्यांना मागीलदाराने राज्यात प्रवेश देत असल्याचा आरोप काल कॉंग्रेस प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी केला. तसेच भाजपने गोवा हे हिंदू राज्य बनवण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

आंध्र प्रदेशमधील जोडप्याची कुंडई येथे आत्महत्या

आंध्र प्रदेशहून गोव्यात आलेल्या एका तरुण जोडप्याने काल कुंडई-मडकई बायपास रस्त्याजवळील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

या जोडप्यापैकी तरुणाचे नाव मोहनश्री कुमसीकृष्ण पार्थसारथी (वय २८) असे असून अंदाजे २५ वर्षे वयाची असलेल्या तरुणीचे नाव समजू शकले नाही.

श्रीराम सेनेच्या वक्तव्याचा निषेध

राज्यात श्रीराम सेनेची शाखा सुरू करण्याच्या कृतीचा अखिल गोवा कॅथलिक अल्पसंख्य आघाडी (एजीसीएमएफ) या संघटनेने निषेध केला आहे.

१८ जून मार्ग आज ‘नोमोझो’

‘आमची पणजी’ या संस्थेने आज रविवार १७ जून रोजी येथील १८ जून मार्गावर ‘नो मोटर झोन’चे तथा ‘नोमोझो’चे आयोजन केले आहे.

त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत वरील मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या मार्गावरील सुशीला इमारत ते सालसेत फार्मसीसमोरील वाहतूक बेटापर्यंतचा मार्ग ‘नो मोटर झोन’च्या प्रभावाखाली राहणार आहे. यामुळे वरील परिसर सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

गोव्याच्या कृषीक्रांतीचे ‘मनोहारी’ स्वप्न....!

- रमेश सावईकर

आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे देशाची आर्थिक घडी कृषी क्षेत्राच्या विकासावर अवलंबून आहे. गोवा राज्य ही त्याला अपवाद नाही. खाण उद्योग शेती व्यवसाय आणि मच्छिमारी यावरती गोव्याची आर्थिक परिस्थिती अवलंबून होती व आजही आहे. मुक्तीपूर्व काळात गोव्यात खाण उद्योग चालायचा, पण तो नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करून. परंतु, मुक्तीनंतरच्या काळात खाण व्यवसाय हा गोव्याचा आर्थिक कणा आहे, असे वातावरण निर्माण करून बेकायदेशीर, बेसुमार, भूउत्खनन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. वृक्षतोडीला कोणतेच बंधन राहिले नाही. परिणामी नैसर्गिक जलस्त्रोत नष्ट झाले. शेती-बागायतीच्या जमिनीत अतिक्रमणे झाली. टाकावू खनिज मालाने शेती-बागायती गाडल्या गेल्या. या पार्श्‍वभूमीवर पारंपारिक शेती-बागायती व्यवसायाला अवकळा येऊन शेतकरी आपल्या व्यवसायापासून दूर झाले आणि आपल्या आणि कुटुंबीयांच्या उपजिविकेचे साधन म्हणून उद्योग, व्यवसाय यापेक्षाही नोकरीकडे अधिक आकृष्ट झाले. पारंपारिक शेती-व्यवसाय बण्द पडतो की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. ती बदलण्यासाठी भगीरथ प्रयत्नांची गरज आहे. सरकार, सरकारी कृषी अधिकारी शेतकरीवर्ग यांच्या संयुक्त प्रयत्नांनी या क्षेत्राला निश्‍चितपणे अधिक वाव मिळू शकतो. या क्षेत्रात प्रगती साधणे सहज शक्यही आहे. मात्र, शेती क्रांती घडवू वगैरे वल्गना करणे फजूल आहे. शेतीक्रांती घडवून आणणे म्हणजे काही कृषी योजनांची खैरात करून जादूची कांडी फिरवणे नव्हे. कालांतराने गोव्यातील परिस्थिती शेतीला अनुकूल बनवणे अशक्य नाही, एव्हढेच याक्षणी म्हणणे प्रस्तुत ठरेल.

याला काय म्हणाल?

गेले अनेक महिने स्वतःच्या सदनिकेत गेले कित्येक महिने स्वतःला कोंडून घेतलेल्या ममता आणि नीरजा गुप्ता या दोघा बहिणींचे एक प्रकरण शनिवारी दिल्लीच्या रोहिणी विभागात उघडकीस आले. अशाच प्रकारे अनुराधा आणि सोनाली बहल या बहिणींनी सात महिने स्वतःला घरात कोंडून घेतल्याचे आणखी एक प्रकरण गेल्या वर्षी उजेडात आले होते. या दोन्ही घटना धक्कादायक तर आहेतच, पण विलक्षण अस्वस्थ करणार्‍याही आहेत. अशा कसल्या जिवघेण्या दुःखाने या बहिणींना गराडा घातला होता की जीवनाकडे सपशेल पाठ फिरवून मृत्यूची अशी प्रतीक्षा करीत आला दिवस कंठावा या मनःस्थितीपर्यंत त्या आल्या? गेल्या वर्षी उजेडात आलेल्या बहल भगिनींच्या प्रकरणात त्यांच्या पित्याचा मृत्यू झाला होता. पिता लष्करात कर्नल होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जगण्यातील रस संपला होता. त्यात त्यांचा लाडका कुत्राही मृत्युमुखी पडला आणि त्यांची जगण्याची इच्छाच संपून गेली. मग सुरू झाला भयावह विजनवास. घराबाहेर पडायचे नाही. घरातच राहायचे. कधी मनात आले तर दोन - तीन दिवसांनी शेजारच्या दुकानातून पिझ्झा मागवायचा, चिप्स मागवायच्या, फार तर ज्युस मागवायचा, परंतु भात, कडधान्ये सेवन करायची नाहीत, असे करून बहल भगिनींनी सहा - सात महिने घरातच काढले. या असल्या जगण्याचे परिणाम शरीरावर स्वाभाविकपणे झालेच.

पावसाच्या बासरीचे सूर...

- डॉ. सोमनाथ कोमरपंत

बालपणापासून पाऊस मला अत्यंत आवडतो. आजही तो मला तितकाच भावतो. पाऊस नित्यनूतन आहे. पाऊस नवोन्मेषशाली आहे. पाऊस अचेतनाला सचेतनत्व देणारा आहे. पावसाने ‘सा’ लावताच अंतर्मनात अनामिक धून उठते. भावतंद्रीकडे नेणारी ती अनोखी अनुभूती. जलतत्त्वाचे हे मनोहारी रूप न्याहाळताना भान हरपून जाते. वैशाखवणव्याने म्लान झालेली सृष्टी पहिल्या पावसाने सुस्नात होताच क्षणार्धात कात टाकते. नवी कांती धारण करते... पहिल्या पावसाची सर... त्याच्या स्पर्शाने अंगांगावर पसरलेली आनंदाची लहर.... मातीच्या गंधाच्या उन्मादाने उमललेले मन.... पहिलेपणाचा प्रत्येक स्पर्श असाच गहिरा... उत्कट... भावकोमल... शीतल... अनिर्वचनीय अनुभूतीचा.... पहिल्या पावसाची ही पहिली ललकारी... सप्ताहाच्या आतच उजाड, रुक्ष माळरानावर हिरव्या स्वस्तिकचिन्हांची नक्षी उमटविणारी... अक्षतांसारखी शोभायमान झालेली तिच्यावरील पांढरीशुभ्र फुले... कधी निळी... कधी जांभळी. त्यांवर इथे-तिथे उडणारी चिमुकली पिवळसर वर्णाची फुलपाखरे.

काकस्पर्श : एक मनोवैज्ञानिक व्यथा

- रामनाथ न. पै रायकर

- चित्रपट हा पादत्राणामध्ये अडकलेल्या खड्यासारखा असावा.

- लार्स व्हॉं त्रायेर, युरोपियन चित्रपट दिग्दर्शक

भारतामध्ये चित्रे रुपेरी पडद्यावर येऊन तब्बल एक शतक उलटले, तर त्यांना वाचा फुटली त्याला आठ दशकं झाली. मात्र चित्रपट निर्मात्यांची बक्कळ फायदा मिळवून देणारे चित्रपट तयार करण्याची आस काही कमी झालेली नाही. सुदैवाने प्रेक्षकांना स्वप्नांच्या बेगडी दुनियेत गुरफटून ठेवणार्‍या अशा या सौदागरांच्या तद्दन तकलादू चित्रपटांच्या गर्दीत कधीतरी कोळशाच्या काळ्याशार खाणीत एखादा देदीप्यमान हिरा लखकन् चमकावा तसा एखादा अभिजात सिनेमा बघायला मिळतो. अलीकडेच रजतपटावर दाखल झालेला ‘काकस्पर्श’ हा मराठी चित्रपट अशीच अस्वस्थ करणारी अनुभूती देऊन जातो.

‘देव’ माणूस

- लाडोजी परब

संतांची शिकवण म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांना जोडणारा दुवा आहे. देव जैतिराची कहाणीही याला अपवाद नाही. या देवाची निर्मिती झाली जैते परब या गृहस्थांमुळे. त्यांचा जन्म १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात झाला. त्याचं नाव जैते परब असलं तरी त्यांना लोक मोठ्या बहुमानाने ‘जैतोबा’ म्हणायचे. ते एक लढवय्ये वीर होते. सावंतवाडी संस्थानच्या बांदेकोट आणि हनुमंतगड या दोन किल्ल्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी त्यांच्यावर होती. ते देवभक्त होते. त्यांच्या अंगी दैवीशक्ती होती. त्यांना एकुलती एक मुलगी होती. ती वरघाटीला (कोल्हापूर संस्थानातील पाडगावच्या बाजूस) लग्न करून दिलेली होती. सुभेदारीवरून येत असताना आपल्या मुलीस माहेरी आणावं, अशा इराद्याने ते तिच्या सासरी गेले. परंतु बरोबर कुळंबीण (सोबतीण) नसल्यानं मुलीच्या सासरच्यांनी तिला बापाबरोबर एकटी पाठवण्याविषयी नाकारलं. त्यावर ते तुळस मुक्कामी आले. तिथे त्यांनी आपल्याबरोबर गावचा नागल महार आणि कुळंबीण यांना सोबत घेतलं. त्या तिघांच्या लवाजम्यासहित ते पुन्हा मुलीच्या सासरी जाण्यास निघाले. वाटेत त्यांची (कदाचित तो रांगणाघाटाचा मार्ग असावा) वीर (भिल्ल) लोकांशी गाठ पडली. बरोबरची कुळंबीण आणि तिच्या अंगावरचे दागिने पाहून तिला पळवून नेण्यासाठी भिल्लांनी त्या तिघांना वेढून घेतलं. तेव्हा जैते परब आणि भिल्ल एकमेकांच्या समोर उभे ठाकले. तिघांचा बचाव करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. जैतोबांनी तलवारीने बर्‍याच भिल्लांना कंठस्नान घातलं. जैतोबांच्या तलवारीपुढे आपला बचाव लागत नाही, असं पाहून भिल्ल रानात पळून गेले.

प्रणव मुखर्जी संपुआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

Story Summary: 

संपुआच्या बैठकीत उमेदवारी घोषित झाल्यानंतर संरक्षणमंत्री ए. के. अँथनी, पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी आणि सोनिया गांधी.

प्रणव मुखर्जी संपुआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

Story Summary: 

पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या बैठकीनंतर यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ७७ वर्षीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी घोषित केली. त्यांच्या उमेदवारीस मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीने तसेच समाजवादी पक्षानेही मुखर्जींना पाठिंबा जाहीर केल्याने ते विजयानिकट पोचलेले आहेत.

यूपीएच्या कालच्या बैठकीला कॉंग्रेस तसेच अन्य घटक पक्ष द्रमुक, राष्ट्रीय लोकदल, राष्ट्रवादी कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि इंडियन मुस्लिम लीगचे नेते उपस्थित होते.

सरकारची बहुतेक देणी फेडली : पर्रीकर

Story Summary: 

भाजप सरकारचे १०० दिवस पूर्ण

मी मुख्यमंत्रीपदाचा ताबा घेतला तेव्हा सरकारी तिजोरीत केवळ २०० कोटी रु. होते, मात्र देणी ८०० कोटींच्या घरात होती. त्यापैकी बहुतेक देणी आपण फेडली असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या सरकारने १०० दिवस पूर्ण केल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. मागच्या सरकारने केलेल्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे एक प्रकारे राज्य दिवाळखोरीकडे चालले होते, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

वीज खात्याच्या डोक्यावर सुमारे ३०० ते ३५० कोटी रु., सार्वजनिक बांधकाम खात्याच्या डोक्यावर ३०० कोटी रु. तसेच अन्य विविध खात्यांच्या डोक्यावरही बरेच कर्ज होत,े असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कर्जापैकी बरेच कर्ज आपण यापूर्वीच फेडले असल्याचे ते म्हणाले.

ऑगस्ट महिन्याअखेरपासून उच्च सुरक्षा क्रमांकपट्ट्या बसवणार

Story Summary: 

ऑगस्ट महिन्याच्या शेवटापर्यंत राज्यात वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकपट्ट्या बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे वाहतूक मंत्री सुदीन ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

खरे तर १ जुलैपासूनच या क्रमांकपट्ट्या वाहनांवर बसवण्याचे काम हाती घेण्याचा आमचा विचार आहे. पण ते शक्य झाले नाही तर कोणत्याही परिस्थितीत ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत ते काम हाती घेण्यात येईल, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

माध्यमप्रश्‍नी विधानसभेत प्रश्‍न विचारणार : वाघ

ज्या इंग्रजी शाळांना अनुदान चालूच ठेवण्याचा जो मुद्दा आहे त्यात संधिग्दता असून आतल्या वाघाला हे पटलेले नाही, असे विष्णू वाघ यांनी काल सांगितले. ते कोकणी अकादमीच्या पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते.

स्मशानभूमीतून कवट्या खोदून काढल्याने खळबळ

दिवाडी : अल्पवयीनासह तिघांना अटक

पणजी शहरापासून १० कि. मी.च्या अंतरावर असलेल्या दिवाडी या बेटावरील पियेदाद येथील ख्रिस्ती स्मशानभूमीत अज्ञातांनी खोदकाम करून नऊ मानवी कवट्या काढून एका घरासमोर, टपाल खात्याच्या कार्यालयासमोर व एका उद्यानात ठेवण्याची घटना शुक्रवारी घडल्याने दिवाडी बेटावर काल खळबळ माजली होती.

अवैध आर्थिक व्यवहारप्रकरणी साबांखा अभियंत्यांच्या बदल्या

महिनाभरापूर्वी आत्महत्या केलेला कंत्राटदार विश्वास हरमलकर याला अवैधरित्या आगाऊ रक्कम म्हणून २९ लाख ६१ हजार रु. दिल्या प्रकरणी काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यातील तिघा अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केल्याचे कळते. या अभियंत्यांमध्ये आर. पंडित, टी. ए. केनावडेकर व ऍलन परेरा यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्याचे आश्‍वासन काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यानी पत्रकार परिषदेत दिले.

ट्रकाखाली चिरडून युवक ठार

चावडीवर १५ रोजी सकाळी झालेल्या एका अपघातात सावंतवाडा येथील रितेश राघोबा सावंत (३५) या युवकाचा दुर्दैवी अंत झाला.

मयत सावंत हा मास्तीमळ यथील श्री. मल्लिकार्जुन महाविद्यालयात वाचनालयात अटेन्डंट म्हणून कामाला होता. नेहमी प्रमाणे आपल्या जीए ०९- सी ९७६५ या दुचाकीने महाविद्यालयात जाण्यासाठी येत असताना चावडीवरील सेंट तेरेझा चर्चसमोर दोन भटके बैल झुंजत असल्याचे त्याने पाहिले व रस्त्याच्या बाजूला दुचाकी बंद करून तो राहिला.

त्या शाळांना अनुदानाचा निर्णय योग्यच : राष्ट्रवादी

माध्यम बदलून इंग्रजी केलेल्या काही प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन अनुदान चालू ठेवण्याचा सरकारी निर्णय योग्य असला तरी हे अनुदान कितीकाळ चालू राहील ते सरकारने जाहीर करावे असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे सरचिटणीस ऍड. अविनाश भोसले यांनी म्हटले आहे. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच असावे असा धोरणात्मक निर्णय घेण्याबरोबरच शिक्षणतज्ज्ञांची समिती नेमण्याचा विद्यमान सरकारच्या निर्णयाचेही स्वागत करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

धोरणी मुख्यमंत्र्यांची धोरणे चुकू नयेत

- एन. शिवदास

आशा दाखविल्यानंतर अपेक्षा असतात. विरोधी पक्षनेते असताना विद्यमान मुख्यमंत्र्यांनी जे जे व जिथे जिथे गैर होते, चुकलेले होते अथवा भ्रष्ट होते तिथे विरोधी पक्षनेता म्हणून बोट ठेवले होते. मग ते ईडीसी असो अथवा आयडीसी. तत्कालीन सरकारचे ते वाभाडेच काढत होते व त्यांच्या त्या रौद्र रुपाचे आमच्यासारख्या विधानसभे बाहेरच्यांना कौतुक वाटायचे. मग मनात विचार यायचा, हा माणूस सत्तेवर आला पाहिजे. सगळे कसे ठीकठाक, व्यवस्थित, स्थिरस्थावर करण्यासाठी सत्ता या माणसाकडे, मनोहर पर्रीकरांकडे म्हणजेच भारतीय जनता पक्षाकडे सोपवायला हवी. परंतु ही देणे, सोपविणे, न सोपविणे वगैरे जनतेच्या हाती होते. हे निवडणुकीच्या प्रक्रियेने घडणारे होते. म्हणून आमच्यासारख्यांनी सत्तेची सूत्रे मनोहर पर्रीकरांच्या हातात दिली पाहिजेत तर काही गोष्टी प्रथम घडायला हव्यात असा विचार मांडला.

राष्ट्रपतीपदाकडे...

हो नाही करता करता अखेर कॉंग्रेसने प्रणव मुखर्जी यांच्या नावावर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केले. ममता बॅनर्जी यांनी विरोधाचा सूर सध्या लावलेला असला तरी कॉंग्रेसच्या अन्य सहयोगी पक्षांमध्ये त्याबाबत सहमती दिसू लागली असल्याने प्रणवदांची पावले राष्ट्रपती भवनाच्या दिशेने पडू लागली आहेत असे म्हणायला हरकत नसावी. मुखर्जी हे देशातील एक सन्माननीय नेते आहेत. त्यांची आजवरची कारकीर्द निष्कलंक ठरली आहे आणि त्यांच्याविषयी त्यांच्या राजकीय विरोधकांतही आदराचीच भावना राहिली आहे. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारपुढे जेव्हा जेव्हा संकटे उभी ठाकली, तेव्हा तेव्हा संकटमोचक म्हणून त्यांनी लक्षणीय कामगिरी बजावली हेही विसरता येणार नाही. पण अशा या संकटकाळी धावून येणार्‍या नेत्याला एकाएकी राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीत बसवण्याच्या हालचाली कॉंग्रेस पक्षात का सुरू झाल्या हाही विचार करण्यासारखा प्रश्न आहे. देशाची आर्थिक घडी विस्कटलेली असताना आणि विकास दराचे अंदाज ढासळलेले असताना देशाच्या अर्थमंत्र्यालाच सक्रिय राजकारणातून बाहेर काढण्याच्या या हालचालींचे अनेक अर्थ निघू शकतात.

माशेलात सराफी दुकान फोडून लाखोंचे दागिने लुटले

Story Summary: 

चोरी झालेले माशेलमधील सराफी दुकान.

राष्ट्रपती उमेदवाराबाबत यूपीएची आज बैठक

Story Summary: 

कॉंग्रेसकडून मुखर्जींच्या नावावर शिक्कामोर्तब

राष्ट्रपती उमेदवाराच्या नावावर चर्चेसाठी यूपीएतील घटकपक्षांची महत्त्वाची बैठक आज बोलावण्यात आली असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यात अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काल पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॉंग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत मुखर्जी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे कळते.

माशेलात सराफी दुकान फोडून लाखोंचे दागिने लुटले

Story Summary: 

माशेलच्या पोलिस चौकीपासून अवघ्या ८० ते १०० मीटर अंतरावर हमरस्त्याच्या बाजूला असलेले कुंभारजुवे येथील लक्ष्मण (बाबू) रायकर याचे ‘साई प्रसाद ज्युवेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान भर दिवसा दुपारी २.३० ते ३.३० च्या दरम्यान फोडून चोरांनी लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम लुटली.

लग्नाचा मोसम असल्यामुळे गिर्‍हाईकांचे दागिन्यामुळे नुकसानाचा नेमका अंदाज मिळालेला नसून फोंडा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक परेश नाईक तपास करीत आहेत.

पश्‍चिम घाट क्षेत्रातील राज्यांवर भविष्यात पर्यावरणीय दुष्परिणाम

Story Summary: 

अहवालाला विरोध कराल तर पस्तावाल : गाडगीळ

पश्‍चिम घाटासंबंधीचा प्रा. माधव गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारण्यास राज्य सरकारांनी विरोध केल्यास भविष्यकाळात या राज्यांना विपरीत परिणाम भोगावे लागतील. या राज्यांतील जलस्त्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होण्याची शक्यता असल्याचे समितीचे अध्यक्ष प्रा. माधव गाडगीळ यांनी काल सांगितले.

केरळ विधानसभेत वरील अहवाल मांडण्यास विरोध केला गेला होता, या पार्श्‍वभूमीवर गाडगीळ यांना प्रश्‍न विचारला गेला तेव्हा त्यांनी वरील उत्तर दिले.

येथील मध्यवर्ती ग्रंथालयाच्या सभागृहात गाडगीळ काल गोव्यातील पर्यावरणप्रेमींना वरील अहवालासंबंधी माहिती देत होते.

अडवाणी - जयललितांची भेट; रालोआचीही आज बैठक

कॉंग्रस व यूपीएतील घटक पक्षांच्या घडामोडी घडत असतानाच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवारास पाठिंबा मिळविण्यासाठी काल भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी तामीळनाडुच्या मुख्यमंत्री व अण्णाद्रमुक पक्षाच्या अध्यक्ष जयललिता यांची भेट घेऊन चर्चा केली.

पर्वरीत वाघाचे कातडे विकताना एकास अटक

येथील ओ-कोकेरो सर्कलजवळ वाघाचे कातडे विकण्यासाठी आलेल्या एकास रंगेहाथ पकडण्यात पर्वरी पोलिसांना यश आले. या कातड्याची बाजारपेठेत सुमारे साडे चार लाख रु. किंमत आहे.

उच्च सुरक्षा क्रमांकपट्टी अंमलबजावणी लवकरच

विभागीय पातळीवर केंद्रे उघडणार

राज्यातील सर्व प्रकारच्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकपट्ट्या बसविण्याचे कंत्राट ‘उत्सव’ या कंपनीलाच मिळण्याची शक्यता असून पुढील दोन-तीन दिवसांत त्यासंबंधीचा निर्णय होईल, असे वाहतूक खात्याच्या सूत्रांनी सांगितले.

वरील कंत्राट दिल्यानंतर वाहनांना क्रमांकपट्ट्या बसविण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होण्यास पाच ते सहा आठवडे लागतील. निवडल्या जाणार्‍या कंपनीला वाहतूक खात्याच्या प्रत्येक विभागीय कार्यालयाजवळ कंपनीला क्रमांकपट्ट्या बसविण्याचे केंद्र उघडावे लागेल. त्यासाठी लागणारी जागा कंपनीला सरकारने देण्याचे मान्य केले आहे.

यूपीए ठरवेल त्याला पाठिंबा : पवार

राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीए जो उमेदवार ठरवेल त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस पाठिंबा देईल, असे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी काल कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना सांगितले.

मांद्य्रात मंदिरातील फंडपेट्या पळवल्या

आस्कावाडा मांद्रे येथील श्री रवळनाथ व भूमिका मंदिरातील अज्ञात चोरट्यांनी फंडपेटी पळवून ४ हजार रुपये लंपास केल्याची तक्रार पेडणे पोलीस स्टेशनवर महाजनांनी नोंदवली.

श्रीराम सेनेवर गोव्यात बंदीची मागणी

गोवा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे तसेच सर्वधर्म समभाव राखणारे भारतांतील एकमेव राज्य आहे. त्यासाठी भारताचे पहिले प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू यांनी ‘अजब है गोवा के लोग’ म्हटले होते. आता याच गोव्यात धार्मिक कलह माजविणारी श्रीराम सेनेसारखी संस्था येत आहे. त्यावर गोवा सरकारने बंदी घालावी अशी मागणी आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केली आहे.

मच्छिमारी बंदी लागू

आज दि. ३१पासून राज्यात मच्छिमारी बंदीचा हंगाम सुरू होत असून नियमांचे उल्लंघन करून मासे मारण्यासाठी समुद्रात उतरणार्‍या ट्रॉलरवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवल्याचे मच्छीमारी खात्याच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

‘शेतकरी बाजार’साठी अधिकारी दौर्‍यावर

गोव्यातील शेती व भाजी उत्पादन वाढविण्यासाठी सरकारने गंभीर पावले उचलली असून स्थानिक शेतकर्‍यांना रस्त्याच्या बाजूला बाजार कशा पध्दतीने उपलब्ध करून द्यावा, यावर अभ्यास करण्यासाठी कृषी संचालक सतिश तेंडुलकर व कृषी सचिव व अन्य संबंधित अधिकारी चेन्नईला रवाना झाले आहेत.

तीन तालुक्यांत खनिज ट्रकवाहतुकीस बंदी

दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी जारी केेलेल्या आदेशाद्वारे खनिज ट्रक, टिप्पर वाहतुकीस केपे, सांगे आणि धारबांदोडा तालुक्यांत बंदी घातली आहे.

राष्ट्रपतींना आरटीआयखाली माहिती देण्याचा आदेश

राष्ट्रपतींद्वारे सार्वजनिक निधीतून दिल्या जाणार्‍या देणग्या खासगी माहितीचा भाग बनू शकत नसल्याचे सांगत दिल्ली हायकोर्टाने आदेश दिला की, राष्ट्रपती निधीचा २००४ ते ११ सालापर्यंत करण्यात आलेला विनियोग जाहीर करावा. राष्ट्रपती हे पद माहिती हक्क कायद्याखाली येत असल्याचेही कोर्टाने नमूद केले.

मायकलवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

गुंडगिरी, दरोडे अशा गुन्ह्यांखाली म्हापसा न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या गुंड मायकल फर्नांडिसने बुधवारी गोळ्या प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात काल म्हापस पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला.

वारी वारी जन्म मरणां ते वारी

- राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. उदयबुवा फडके

समाजात चालीरीती सुरू झाल्या की ती मग परंपरा बनते. ही आमची परंपरा आहे असे अभिमानाने सांगणारे अनेक भेटतात, पण ती कोणीतरी, कुठेतरी, कधीतरी सुरू केलेलीच असते. ती सुरू करण्यामागे काही विशिष्ट हेतूही असतो. विशेषतः त्याचे आकर्षण किंवा ओढ हेच कारण असते. सुरूवात झाली की पुन्हा ते करावेसे वाटते. आणि असे करता करता एका पिढीकडून दुसर्‍या पिढीपर्यंत हे दायित्व पोहोचले की ती परंपरा बनते.

हिमनगाचे टोक

मांद्रे येथील एका यःकश्‍चित तलाठ्याची अकरा बँक खाती आणि लाखोंची संपत्ती पाहून जनतेेचे डोळे थोडे विस्फारले असतील, परंतु कोणाला या बेहिशेबी संपत्तीचे फारसे आश्चर्य मात्र वाटले नसेल. सरकारी प्रशासनातील सर्वांत खालच्या पातळीवरचा कर्मचारीदेखील वाममार्गाने अफाट संपत्ती गोळा करू शकतो याची एक - दोन नव्हे तर शेकडो उदाहरणे आहेत. त्यामुळे अशा प्रकारे एखाद्यावर छापे पडले, तरी त्यापासून इतर कर्मचार्‍यांना जरब बसेल आणि प्रशासनातील भ्रष्टाचार पूर्णपणे थांबेल अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. प्रशासनामध्ये भ्रष्टाचार खोलवर रुतून बसलेला आहे. खालपासून वरपर्यंत तो आहे आणि तो निपटून काढण्याचे कोणी कितीही इरादे व्यक्त केले, तरी भ्रष्टाचार्‍यांची बलदंड साखळी तोडण्याच्या धडपडीत ती तुटण्याऐवजी स्वतःच संकटात सापडण्याची शक्यताच अधिक असते. तलाठी हा ग्रामपातळीवरील सरकारचा दूत. परंतु आज जमिनीला सोन्याचे मोल आलेले असल्याने या तलाठ्याच्या हाती भल्याभल्यांची शेंडी असते. त्यामुळे जमीन विक्री व्यवहार असो वा रूपांतरणे असोत, या मंडळींना अनुकूल केल्याखेरीज अशा व्यवहाराचे पानही हलत नाही.

‘लाडली लक्ष्मी’ योजना घोषित

Story Summary: 

१४ जुलैपासून धनादेश वितरण

मुलीचा जन्म हा आई वडिलांना भार ठरू नये या हेतूने सरकारने तयार केलेली ‘लाडली लक्ष्मी’ ही महत्त्वाकांक्षी योजना दि. ३० जून पर्यंत जाहीर होईल व दि. १४ जुलैपासून लाभार्थींना एक लाख रुपये मिळतील, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

या योजनेसाठी दोन वर्ग तयार केले आहेत. १ एप्रिल २०१२ नंतर लग्न केलेल्या युवतींना त्यांच्या विवाह नोंदणीच्या दाखल्याच्या आधारे एक लाख रुपये दिले जातील, तर दुसर्‍या वर्गात १ एप्रिल २०१२ नंतर १८ वर्षे पूर्ण केलेल्यांच्या नावांवर १ लाख रुपयांचा धनादेश सरकारने निश्‍चित केलेल्या बँकामध्ये जमा केला जाईल. वयाच्या ३८ वर्षे पर्यंत लग्न झालेल्यांना व्याजासह रक्कम मिळेल, असे पर्रीकर यांनी सांगितले.

गजलनवाज मेहदी हसन यांचे निधन

Story Summary: 

‘पत्ता पत्ता, बूटा बूटा’, ‘अबके बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमे मिलें’, अशा उत्तमोत्तम व संस्मरणीय गजलांनी गेली जवळजवळ पाच दशके गजलरसिकांना मंत्रमुग्ध करून सोडणारे विख्यात पाकिस्तानी गजल गायक मेहदी हसन यांचे काल पाकिस्तानातील कराची येथील एका इस्पितळात निधन झाले.

अखंड भारतात १९२७ साली जन्मलेले मेहदी हसन मूळचे राजस्थानचे. फाळणीनंतर वयाच्या विसाव्या वर्षी ते कुटुंबासमवेत पाकिस्तानला गेले. तेथेच त्यांची गजल गायकी बहरली. पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीतही त्यांच्या गायकीने ठसा उमटवला होता. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा पाया असलेल्या मेहदी हसन यांच्या तरलमधुर गजलांनी जगभरातील गजलरसिकांना वेड लावले. जवळजवळ वीस हजार गीतांचे पार्श्वगायनही त्यांनी केले. ऊर्दूच नव्हे, तर बंगाली, पंजाबी आणि पुश्तू भाषेतील गीतेही ते गायिले आहेत.

मांद्रे पंचायतीच्या तलाठ्याच्या घरांवर छापा

Story Summary: 

रोकड, बँक ठेवी जप्त

बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने काल मांद्रें पंचायतीचे तलाठी विठ्ठल भिकाजी सावंत यांच्या दोन निवासस्थानांवर तसेच कार्यालयात छापा मारून १,२०,००० रु. रोख, तसेच १९ कायम ठेवींची पत्रे व ११ सेव्हिंग र्बॅक खात्यांचे पासबूक जप्त केले.

बँकेतील कायम ठेवी व सेव्हिंग खात्यांवरील पैसे हे सुमारे १० लाख रु. असल्याचे पोलीस अधिक्षक बॉस्को जॉर्ज यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत त्याच्याकडे २७४ टक्के जास्त मालमत्ता असल्याचे प्रथम दर्शनी आढळून आल्याचे ते म्हणाले.

नव्या ९ कोकणी-मराठी शाळा

कमी मुलांच्या शाळा जोडणार

सरकारने एकूण ९ नव्या शाळांना परवाने दिले असून पैकी ६ मराठी व ३ कोकणी माध्यमातील असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांची कमी संख्या असलेल्या २६३ शाळांचे सर्वेक्षण केले असून शिक्षकाच्या बाबतीत विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी एक महिन्याच्या आत वेगवेगळ्या शाळा एकत्र जोडून प्रत्येक शाळेत चार शिक्षकांची नियुक्ती करणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले.

ओबीसी आरक्षणावरून सुप्रीम कोर्टाचे केंद्रावर ताशेरे

आंध्र हायकोर्टाच्या निवाड्यास स्थगितीस नकार

२७ टक्के ओबीसी आरक्षण कोट्यात धार्मिक अल्पसंख्यकांना ४.५ टक्के उपकोटा देण्याच्या केंद्राचा आदेश आंध्र प्रदेश हायकोर्टाने रद्दबातल ठरवला होता. त्याला केंद्रातील यूपीए सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. मात्र काल सुप्रीम कोर्टाने काल आंध्र हायकोर्टाच्या आदेशास स्थगिती देण्यास नकार दिला. धर्माच्या आधारवर आरक्षण दिले जाते का अशी विचारणाही कोर्टाने केंद्र सरकारला केली.

‘सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळेच उच्च सुरक्षा क्रमांकपट्‌ट्या बंधनकारक’

राज्यातील सर्व प्रकारच्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकपट्ट्या बसविण्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला ३० जून २०१२पर्यंत मुदत दिली होती. या मुदतीत अंमलबजावणी न केल्यास सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होईल व त्यात मुख्य सचिवांसह सर्व संबंधित अधिकारी अडचणीत येणार होते.

कलाम, चटर्जी, पंतप्रधान यांना तृणमूल - सपची पसंती

राष्ट्रपती निवडणूक

कॉंग्रेसच्या यादीत प्रणव, अन्सारी

राष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार सूचविण्याबाबत काल झालेल्या नाट्यमय घडामोडीत कॉंग्रेनसे केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी व उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या नावांना पसंती दिल्यानंतर यूपीएतील दोन महत्त्वाचे घटक पक्ष तृणमूल कॉंग्रेस व समाजवादी पार्टीने वेगळीच नावे सूचवून त्यात पंतप्रधान मनमोहन सिंग यांचेही नाव सूचविले.

३ लाख सदस्यनोंदणीचे भाजपचे उद्दिष्ट

डिसेंबरमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड

भाजपची पक्ष सदस्यता नोंदणी मोहीम बुधवारपासून सुरू होत असून ३१ जुलैपर्यंत चालणार्‍या या मोहिमेत किमान ३ लाख जणांना सदस्य बनवण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले असल्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष व आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

कोठडीत उलट्या झाल्यानंतर गुंड मायकल इस्पितळात

म्हापसा येथील न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलेल्या मायकल फर्नांडिस (४०) या संशयित आरोपीस सकाळी ११ वा. उलट्या होत असल्याने त्याला पेडे-म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले होते. त्याठिकाणी तो बेशुद्ध झाल्याने त्याला बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

उद्यापासून मच्छीमारी बंदी

उद्या १५ जूनपासून राज्यात मच्छीमारी बंदी लागू करण्यात येणार असल्याचे खात्याचे संचालक एन्. व्ही. वेर्लेकर यानी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. उद्यापासून सुरू होणारी मच्छीमारी बंदी ४५ दिवस म्हणजेच ३० जुलैपर्यंत लागू राहणार आहे.

आठवीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

येथील खाजगी विद्यालयातील इयत्ता आठवीमध्ये शिकणार्‍या बेती येथील विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी काल सायंकाळी ६.३० वाजता गळफांस घेऊन आत्महत्या केली. उपनिरीक्षक विनय पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

लोलये स्थानकावर दोन गाड्यांना थांबा

मेंगलोर ते मडगाव आणि मडगाव-कारवार या दोन प्रवासी रेल्वे गाड्या १० जूनपासून लोलये रेल्वे स्थानकावर थांबायला लागल्या आहेत. या रेल्वे स्थानकाची उभारणी झाल्यानंतर प्रवासी रेल्वे गाड्या थांबविण्यासंबंधीचा पत्र व्यवहार माजी मंत्री इजिदोर फर्नांडिस यांनी कोकण रेल्वे महामंडळाकडे केला होता.

मेहदी हसन : अलौकिक आवाज हरपला

- मधुरा कुलकर्णी

गझलसम्राट हे बिरुद मेहंदी हसन यांना लागेपर्यंतचा त्यांचा संगीत प्रवास आजिबात सोपा नव्हता. खरे पाहता मेहदी हसन यांचा जन्म संगीताची उपासना करणार्‍या घराण्यात झाला. त्यांच्या घराण्यात पिढ्यान्‌पिढ्या संगीताचीच सेवा केली गेली. संगीत कलेशी इमान राखणारी त्यांची सोळावी पिढी होती. राजस्थानमधील झुंझूनू जिल्ह्यातील लूणा गावात त्यांचा १८ जुलै १९२७ रोजी जन्म झाला. अगदी लहानपणापासून त्यांना त्यांचे पिता उस्ताद अजीम खान आणि काका उस्ताद इस्माईल खान यांच्याकडून त्यांना गायनाचे धडे मिळाले. हे दोघेही पारंपरिक धृपद गायक होते. त्यांचे घराणे गायकांचे असले तरी मेहंदी हसन यांच्यासाठी गायक बनणे तेवढे सोपे नव्हते.

नवसंजीवनीच्या प्रतीक्षेत

वळवईतील सरकारी प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीच्या वर्गांसाठी एकच शिक्षिका असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार एका जागृत पालकाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ही केवळ वळवईची समस्या नाही. राज्यातील कित्येक प्राथमिक शाळांमध्ये एकाहून अधिक वर्गांसाठी एकच शिक्षिका आहे. गेल्या काही वर्षांत सरकारी प्राथमिक शाळांमधील पटसंख्या घटत गेली आणि मुले आणि त्यांचे पालक जवळच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वळले त्याचे कारण शिक्षण खात्याने गेली अनेक वर्षे चालविलेली उपेक्षाच आहे. गोवा मुक्तीनंतर स्व. दयानंद बांदोडकर यांनी गावोगावी प्राथमिक शाळा उघडल्या आणि बहुजनसमाजाला शिक्षणाची दारे खुली करून दिली. एक पिढी त्यामध्ये शिकली - सवरली. पण पुढच्या पिढीला मात्र त्या शाळेत शिकावेसे आज वाटत नाही याचे कारण बदलत्या काळाशी सुसंगत सोयीसुविधा नाहीत, पुरेसे शिक्षक नाहीत, परिणामी शैक्षणिक गुणवत्तेलाही ओहटी लागली आहे. गावोगावच्या सरकारी मराठी प्राथमिक शाळा हा मुलांच्या जडणघडणीचा पाया होता. परंतु मराठीच्या द्वेषाने तोच उखडण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला.

प्रसिद्ध गझलगायक मेहदी हसन यांचे निधन

Story Summary: 

प्रसिद्ध गझलगायक मेहदी हसन यांचे बुधवारी सकाळी कराचीत निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

Story Summary: 

चोरीचा प्रयत्न झालेल्या एटीएममध्ये तपास करताना. (छाया : गणादीप शेल्डेकर)

‘त्या’ शाळांच्या अनुदानाचे भवितव्य ऍकेडेमिक कौन्सिलच्या हाती

Story Summary: 

निर्णयाचे सर्वाधिकार कौन्सिलला

डायोसेसन सोसायटीच्या १२६ इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना पर्रीकर सरकारने अनुदान चालू ठेवले तरी शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार राज्यात स्थापन करण्यात येणार्‍या ऍकॅडेमिक कौन्सिलच्या निर्णयावरच सर्व काही अवलंबून असेल, असे एका शिक्षण तज्ज्ञाने सांगितले.

वरील कौन्सिलने या विषयावर अभ्यास करून निर्णय घेतल्यानंतर सरकारलाही तो निर्णय फिरवता येणार नाही, त्या कौन्सिलला माध्यम व अन्य शिक्षण विषयक प्रश्‍नांवर निर्णय घेण्यासाठी सर्वाधिकार दिले गेले आहेत. या कौन्सिलने निर्णय घेतल्यानंतर त्याचे पालन करणे सरकारवर बंधनकारक असेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पहिली ते चौथीसाठी एकच शिक्षिका

Story Summary: 

अनेक सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

शिक्षण संचालक म्हणतात शाळा जोडणे हाच उपाय

सरकारने नवे शिक्षण धोरण जाहीर केले असले तरी राज्यातील अनेक सरकारी प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकविण्याच्या प्रकारात बदल करण्याच्या बाबतीत सरकारने कोणतीही पावले उचलली नसल्याने अशा शाळांतील विद्यार्थ्यांचा मानसिक गोंधळ होत असल्याच्या तक्रारी आहेत. वळवई येथील एक पालक उदय म्हांबरे यांनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अशा शाळांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे.

वळवई येथील स. प्रा. शाळेत पहिली ते चौथी मिळून एकूण १९ विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवून तेथील एक शिक्षिका चारही इयत्ताच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ उडतो. पहिली इयत्तेतील विद्यार्थ्यांना दुसरी, तिसरी व चौथीचा अभ्यास ऐकून घ्यावा लागतो. त्यामुळे पहिलीतून दुसरीत किंवा दुसरीतून तिसरीत गेलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा कंटाळा येऊन अनेक विद्यार्थी शाळेत जाण्याचे टाळतात, असे पालकांचे म्हणणे आहे.

‘माध्यम निर्णय प्रादेशिक भाषांना नुकसानकारक’

Story Summary: 

‘भारत स्वाभिमान’चा विरोध

मनोहर पर्रीकर सरकारने माध्यमप्रश्‍नी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मातृभाषा व प्रादेशिक भाषांचे नुकसान करणारा असून तो तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणी काल भारत स्वाभिमानने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली.

कोकणी माध्यम बदलून इंग्रजी माध्यम केलेल्या डायोसेसन सोसायटीच्या १२५ शाळांना अनुदान देण्याचा मनोहर पर्रीकर सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत घातक असून या निर्णयामुळे मातृभाषेबरोबरच गोव्याची संस्कृतीही धोक्यात येणार असल्याची भीती भारत स्वाभिमानचे केंद्रीय प्रभारी कमलेश बांदेकर व पतंजली योग समितीचे डॉ. सूरज काणेकर यांनी व्यक्त केली.

स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

घोगळ येथील स्टेट बँक शाखेचे एटीएम फोडून आतील लाखो रुपयांची रक्कम लुटण्याचा अज्ञातांनी प्रयत्न केला.

परवा रात्री अज्ञातांनी एटीएममध्ये घुसून मशिनचे पॅनल फोडले व रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. त्या एटीएममध्ये २७ लाख रुपये होते. बँक शाखेचे व्यवस्थापक विद्युत अधिकारी यांनी मडगाव पोलीस स्टेशनवर याविषयी तक्रार नोंदविली आहे.

माध्यमप्रश्‍नी कृतीसाठी १६ रोजी युवक परिषद

पर्रीकर सरकारने घेतलेल्या माध्यमविषयक निर्णयाने ‘दिगंबर कामत गेट वेल सून’चे युवा कार्यकर्ते नाराज बनले असून याविषयी पुढील कृती ठरविण्यासाठी त्यांनी दि. १६ जून रोजी राज्यव्यापी युवक परिषदेचे आयोजन फोंडा येथे केले आहे, अशी माहिती युगांक नायक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रपती निवडणूक १९ जुलै रोजी

राष्ट्रपतीपदाची निवडणूक येत्या १९ जुलै रोजी जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० जून ही आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपथ यांनी ही घोषणा काल केली. विद्यमान राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल २४ जुलै रोजी संपतो. त्यामुळे मतमोजणी तत्पूर्वी म्हणजे २२ जुलै रोजी होईल असेही निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

सरकारी शाळांतील मुलांची‘कदंब’मार्फत वाहतूक

शाळांचे सर्वेक्षण होणार

सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करण्याची जबाबदारी कदंब महामंडळाला पेलणे शक्य आहे की नाही त्यासाठी महामंडळाने शाळांचे सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे. सर्वेक्षणानंतरच यासंबंधी निर्णय घेतला जाईल.

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणार्‍या, थुंकणार्‍या ७२३ जणांना दंड

जानेवारी ते मे २०१२ या दरम्यान गोवा पोलिसांनी उत्तर गोव्यात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्याप्रकरणी व थुंकल्याच्या आरोपाखाली ७२३ जणांना दंड ठोठावून ९७२०० रु. वसूल केले. पणजी पोलीस स्थानक हद्दित धुम्रपान केल्याप्रकरणी २३० जणांना तर थुंकल्या प्रकरणी ६१ जणांना, म्हापसा पोलीस स्थानक हद्दित धुम्रपान प्रकरणी २०० व थुंकल्या प्रकरणी १३९, पर्वरी धुम्रपान प्रकरणी २० व थुंकल्या प्रकरणी ६, जुने गोवे धुम्रपान प्रकरणी ८ तर थुंकल्या प्रकरणी २ तर कळंगुट धुम्रपान प्रकरणी ९९, थुंकल्या प्रकरणी ०, हणजुण धुम्रपान प्रकरणी ५१, थुंकल्या प्रकरणी ०, पेडणे धुम्रपान प्रकरणी १, थुंकल्याप्रकरणी ०, आगशी धुम्रपान प्रकरणी १२, डिचोली धुम्रपान प्रकरणी २९, कुळे धुम्रपान प्रकरणी ९, तर फोंडे येथे धुम्रपान प्रकरणी २९ जणांना दंड ठोठावण्यात आला.

आंदोलनामागे विदेशी हात नाही; अण्णांनी केंद्राला खडसावले

‘भ्रष्टाचारविरोधी भारत’च्या आंदोलनामागे परदेशी हात असल्याच्या आरोपाचा इन्कार करताना अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कोणत्या विदेशी शक्ती आहेत, त्यांची नावे जाहीर करावीत असे आव्हान दिले.

गोवा-मुंबई बस दरीत कोसळली

गोव्याहून मुंबईकडे जाणारी कालभैरव ही बस मंगळवारी पहाटे लांजानजीक २०० फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात एक ठार तर ३५ जखमी झाल्याचे वृत्त कळते. जखमींपैकी चार जण अत्यवस्थ असून त्यांना लांजा व रत्नागिरी येथील इस्पितळांत दाखल केल्याचे सांगण्यात आले.

गोव्यात कायदा हातात घेणार नाही : मुतालिक

श्रीराम सेनेची गोव्यात शाखा स्थापणार असून कायदा हातात न घेता लोकशाही मार्गाने काम करणार असल्याचे श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. शाखेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना निमंत्रण दिले जाईल, असे ते म्हणाले.

चळवळ हवी समाजबदलाची...! सरकार नव्हे

- दिलीप बोरकर

भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर येऊन शंभर दिवस पूर्ण झालेले नाहीत, तोच समाजामधून सदर सरकाराविषयी नाक मुरडण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. या नाक मुरडण्यार्‍यांमध्ये अथवा बोटे मोडणार्‍यांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना अनुदान दिल्यामुळे रागावलेल्यांचा भरणा जरी अधिक असला, तरी हाच मुद्दा एकमेव नाही. सरकार बदलल्यामुळे ज्यांना पूर्वीच्या सरकारात जसे मानसन्मान लाभायचे आणि व्यक्तिगत फायदे मिळायचे ते बंद झाल्यामुळे होणारी काही लोकांची ‘घुस्मट’ही आहे. या लोकांना सरकारच्या चुकीच्या धोरणाशी काहीच सोयरसुतक नाही. यांना फक्त सरकार बदल होऊन आपले सरकार परत सत्तेवर आलेले हवे आहे, जेणेकरून त्यांचे ‘रतीब’ परत एकदा सुरू होतील.

हिरवे स्वप्न

गेल्या २६ मार्च रोजी विधानसभेत मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एकेकाळी गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. अर्थसंकल्पात त्या दृष्टीने त्यांनी कृषी कर्जाच्या सुलभीकरणापासून पिकांच्या आधारभूत किंमतीतील वाढीपर्यंत अनेक घोषणा केल्या होत्या. त्या घोषणांच्या कार्यवाहीला गती देणारे निर्णय त्यांनी परवाच्या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहेत. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा विस्मरणात गेलेल्या नाहीत, तर त्या संदर्भात निश्‍चित काही तरी घडते आहे ही बाब तमाम शेतकरीवर्गासाठी दिलासादायक आहे. राज्यात आपले सरकार शेतीला सर्वोच्च प्राधान्य देईल याचा पुनरुच्चार मुख्यमंंत्र्यांनी केला आहे. गोवा मुक्तीवेळी राज्याची ५९ टक्के जनता शेतीवर गुजराण करीत होती. ते प्रमाण आज केवळ १५ टक्क्यांवर आलेले आहे, एवढी घसरण गेल्या पन्नास वर्षांत शेती आणि बागायतींच्या बाबतीत गोव्यात झाली. शेती खाणमातीने व्यापली, मळे बुजवून तेथे भव्य गृहप्रकल्प उभे ठाकले, कुळागरांची शान हरवली. एकूणच शेती - बागायतींची पार वाताहत झाली.

योगमार्ग-राजयोग (योगसाधना:१३२) (अस्तेय : १५)

- डॉ. सीताकांत घाणेकर

तत्त्ववेत्ते सांगतात की, प्रत्येक माणसाने चिंतन करायला हवे. सूक्ष्म चिंतनातूनच मानवाला विविध विषयांचे ज्ञान झाले. त्याने छोटेमोठे अनेक शोध लावले. योगशास्त्रज्ञ म्हणतात की, प्रत्येक साधकाने सर्व योगमार्गाचा सखोल अभ्यास करावा. ज्ञान, कर्म, भक्ती, राजयोग. तसेच राजयोग म्हणजे अष्टांग योग. त्यातील सर्व आठ पायर्‍यांबद्दल संपूर्ण माहिती करून घ्यावी. पण फक्त माहिती करून घेऊन फायदा नाही. जीवनविकास करायचा असेल तर इतर सर्व ज्ञानाचा आपल्या जीवनात उपयोग करावा. भारतातील अनेक प्रख्यात व्यक्ती असे करताना दिसतात. पूर्णपुरुषोत्तम श्रीकृष्णापासून संत ज्ञानेश्‍वर, स्वामी विवेकानंद ते महात्मा गांधीपर्यंत.

सक्षम इन् नंदनवन...

- प्रा. रमेश सप्रे

खूप आनंदात दिसला तो. ‘तू नेहमी असाच असतोस का रे?’ या अचानक विचारलेल्या प्रश्‍नानं काहीसं चकित होऊन त्यानं विचारलं, ‘असा म्हणजे कसा?’ ‘म्हणजे आनंदात रे!’ त्यानं काही म्हणण्यापूर्वी मित्रच म्हणाला, ‘हो रे, हा असा कायम आनंदात असतो.’ ‘तुझं नाव रे?’ ‘सक्षम!’ ‘अरे वा, नवीनच आहे बुवा हे नाव!’ यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करायला स्वारी होतीच कुठं तिथे? सक्षम तरंगत आला तसा उडत गेलासुद्धा.

आरोशी समुद्रकिनारा टारबॉल्सने काळवंडून गेला

Story Summary: 

आरोशी किनार्‍यावर मोठ्या संख्येने टारबॉल्स पसरल्याने हा समुद्रकिनारा काळवंडून गेला. (छाया : गणादीप शेल्डेकर)

जनावरांपासून शेती नुकसानी रोखण्यासाठी शेतकर्‍यांना शस्त्र परवाने

Story Summary: 

नुकसान भरपाईबाबतचा वनखात्याकडील अधिकार काढला

राज्यात जंगली जनावरांपासून शेती व बागायतींचे प्रचंड नुकसान होत असले तरी वन खात्याकडून त्यांना योग्य ती नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे शेतकरी आधार निधीत सुधारणा करून वनखात्याकडील यासंबंधीचा अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शेतकर्‍यांना आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी शस्त्र परवाने देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

सरकार यावर्षी शेती उत्पादनात ६ टक्के व पुढील वर्षी १० टक्के वाढ करणार असल्याची माहिती पर्रीकर यांनी यावेळी दिली. सर्व विभागीय अधिकार्‍यांची बैठक घेऊन कृषी क्षेत्राचा आपण संपूर्ण आढावा घेतला आहे. डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व शेतकर्‍यांची माहिती मिळवून खर्‍या शेतकर्‍यांना ‘स्मार्ट कार्ड’ उपलब्ध करून दिले जाईल.

‘त्या’ वाहतूक निरीक्षकांची नियुक्ती प्रक्रिया संशयास्पद

Story Summary: 

भवितव्य धोक्यात

डिसेंबर २०१० मध्ये वाहतूक खात्याने वाहतूक निरीक्षकांची जी २९ पदे भरली होती ती भरताना भरती प्रक्रिया योग्य प्रकारे झाली नसल्याचे चौकशीत आढळून आले असल्याचे त्या प्रकरणी तपास करणार्‍या भ्रष्टाचार विरोधी विभागातील सूत्रांनी काल स्पष्ट केले.

या एकूण प्रक्रियेत पारदर्शकतेचा पूर्ण अभाव होता असे दिसून आलेले असून त्या संबंधीचा अहवाल लवकरच सरकारला सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी पुढे सांगितले. या अहवालानंतर पुढे काय करायचे याचा निर्णय सरकारलाच घ्यावा लागणार असला तरी ही एकूण प्रक्रियाच संशयास्पद अशी असल्याने वरील २९ आरटीओंचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे होते.

संकिताच्या कुटुंबियांना असोसिएशनची मदत

Story Summary: 

पोलीस तपासकामात अद्याप गती नाही

गोव्याची नामवंत सेपॅकटॅक्रो खेळाडू संकिता च्यारी हिच्या कुटुंबियांना गोवा सेपॅकटॅक्रो असोसिएशनतर्फे आज आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसेच कुंकळ्ळी येथील या असोसिएशनच्या कार्यक्रमात तिच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत कवळेकर यांनी ही माहिती दिली.

काही दिवसांपूर्वीच संकिता हिने देळे-काणकोण येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. आज संध्या. ५ वा. असोसिएशनच्या कार्यालयात तिच्या दुर्दैवी निधनानिमित्त शोकसभा घेण्यात येणार असल्याचे कवळेकर यांनी सांगितले. संकिताच्या पश्‍चात वृद्ध आई व भाऊ असा परिवार आहे.

पंतप्रधान मनमोहन दबावाखाली : रामदेव

काळ्या पैशावरील सरकारची श्वेतपत्रिका ही दिशाभूल करणारी असल्याचे सांगत योगगुरू बाबा रामदेव यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे दबावाखाली असून ते आपले हसणेही विसरून गेले आहेत, अशी टीका केली. तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्यासमवेत त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान हे व्यक्तिशः प्रामाणिक आहेत, परंतु त्यांना ‘‘राजकीय व संवैधानिक प्रामाणिकता’’ दाखवावी लागेल.

एलिना यांच्याकडे वन व पर्यावरण

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल मंत्री एलिना साल्ढाणा यांना खाते वाटप केले असून त्यांच्याकडे वन व पर्यावरण खात्यांची जबाबदारी सोपविली आहे.

डिचोली तालुक्यात आज मर्यादित पाणी पुरवठा

पडोसे जलप्रक्रिया प्रकल्पावर काल ११ रोजी वीज पुरवठा बंद राहिल्याने कच्चा पाण्याच्या उपशावर परिणाम झाला. त्यामुळे आज १२ रोजी संपूर्ण डिचोली तालुक्याला मर्यादित पाणी पुरवठा होणार आहे.

अल्पसंख्यांक आरक्षणविषयक निवाड्यास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

अल्पसंख्यकांना इतर मागासवर्गीय आरक्षणा अंतर्गत साडे - चार टक्के आरक्षण देण्याच्या सरकारच्या अधिसूचनेस फेटाळणार्‍या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या निवाड्यास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानेही काल सुनावणीदरम्यान नकार दिला. सरकार हा ‘गुंतागुंतीचा आणि संवेदनशील’ विषय गांभीर्याने हाताळत नसल्याची टिप्पणीही सर्वोच्च न्यायालयाने केली.

कायदा हातात घेणार्‍यांची गय नाही : मुख्यमंत्री

कायद्याच्या चौकटीत कुणीही काही केल्यास त्यास सरकारची हरकत नाही, परंतु कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल एका दैनिकातील वृत्ताचा उल्लेख करून स्पष्ट केले.

बंगळूरच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी बनवली

प्रतिलिटर २४० कि. मी. धावणारी कार

पेट्रोलच्या सतत वाढत्या दरामुळे त्रस्त झालेल्या भारतीयांसाठी एक खुषखबर आहे. बंगळूरच्या सर एम. विश्वेश्वरैय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या विद्यार्थ्यांच्या एका चमूने पेट्रोलचा कमीत कमी वापर करणारी कार तयार केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर बनवली गेलेली ही कार एक लीटर पेट्रोलवर तब्बल २४० कि. मी. धावेल असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. ‘टीम इन्फर्नो’ या नावाने संघटित झालेल्या या विद्यार्थ्यांनी ही कार बनवली आहे. येत्या चार ते सात जुलै दरम्यान क्वालालंपूर, मलेशिया येथे सेपांग इंटरनॅशनल सर्कीटमध्ये शेल इको मॅरेथॉन होणार आहे. त्यात हे विद्यार्थी आपल्या शोधाला जगासमोर प्रस्तुत करणार आहेत. आशिया खंडातील १५० अन्य पथकांतर्फेही अशाच प्रकारची सादरीकरणे या कार्यक्रमात होणार आहेत.

होस्नी मुबारक ‘कोमा’त

जन्मठेपेची सजा झालेले ईजिप्तचे माजी हुकूमशहा होस्नी मुबारक यांची प्रकृती कमालीची ढासळली असून ते ‘कोमा’त गेले आहेत.

रविवारी मुबारक यांच्या निधनाची अफवा पसरली होती, परंतु ते ‘कोमा’त गेले असल्याचे त्यांच्या डॉक्टरांनी जाहीर केले. तुरुंगाधिकार्‍यांनी मुबारक यांची पत्नी सुझान मुबारक व त्यांच्या दोन सुनांना कैरोच्या तोराह तुरुंगात जाऊन मुबारक यांची भेट घेण्याची परवानगी दिली.

मेस्ताच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत

शुक्रवारी पहाटे समुद्रामध्ये मच्छीमार ट्रॉलर बुडून मरण पावलेला सडा येथील पांडुरंग गोविंद मेस्ता यांच्या कुटुंबियांना नैसर्गिक आपत्ती विभाग दक्षिण गोवा विभागातर्फे दीड लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.

जेटी दर्जा वाढविण्याबाबत अहवाल लवकरच

मालिम, शापोरा, कुटबण व कुठ्ठाळी या चार मच्छीमारी जेटींचा दर्जा वाढवण्याचा तसेच विस्तार करण्याची जी योजना आहे त्याबाबत सल्लागार म्हणून काम पाहणारे वेस्ट बंगाल फिशरिज कॉर्पोरेशन लिमिटेड हे प. बंगाल सरकारचे महामंडळ पुढील महिन्यात आपला अहवाल मच्छीमारी खात्याला देणार असून त्यानंतर वरील जेटींचा दर्जा वाढवण्याचे काम सुरू होणार असल्याचे खात्याचे संचालक एन. व्ही. वेर्लेकर यांनी सांगितले.

फलोत्पादन महामंडळाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन

करंजाळे येथील कृषीभवन जवळ उभारण्यात आलेल्या फलोत्पादन महामंडळाच्या भवनचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते काल संध्याकाळी उद्घाटन करण्यात आले.

यावेळी महामंडळाचे अध्यक्ष किरण कांदोळकर, कृषी संचालक सतीश तेंडुलकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

‘किरात’चे श्रीधरजी : काही स्मृती...

- सुधीर सबनीस

‘किरात साप्ताहिक’! वृत्तपत्रांतील एक दीपस्तंभ. आमच्या तरूणपणी ‘किरात’चा दबदबा आणि जी प्रतिष्ठा होती, ती आजही टिकून आहे. ती जशाच्या तशी टिकवून ठेवण्याचे महत्त्वाचे काम करण्यात श्रीधर मराठेंचा मौलिक हिस्सा आहे. माझ्या सुदैवाने किरातकारांच्या तीन पिढ्या बघण्याचे, अनुभवण्याचे आणि त्याहीपेक्षा ‘वाचण्याचे’ सद्भाग्य मला मिळाले. माझे वडील जनार्दन विष्णू सबनीस म्हणजे जुन्या काळातले एक ख्यातकीर्त वकील. कायद्याचा ङ्गुकट आणि खात्रीशीर सल्ला मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सबनीस वकिलांचे घर, असा त्या काळात लौकिक होता. त्यामुळे श्रीधर मराठेंचे आजोबा म्हणजेच ‘किरात’चे संस्थापक अनंत केशव, त्यांचा वारसा चालवणारे श्रीधरचे वडील केशव अनंत उर्ङ्ग बाबा आणि बाबांचे, चिरंजीव व्हावेत अशी आम्हा सर्वांची इच्छा असलेले परंतु काळाने आमच्यातून हिरावून घेतलेले श्रीधर मराठे या तीन पिढ्यांचा आमच्या सबनीस घराण्याशी अत्यंत जवळचा संबंध.

महाराजा संकटात

एअर इंडियाच्या वैमानिकांचा संप चिघळत चालला आहे. गेल्या ७ मे पासून सुरू झालेला हा संप मिटण्याचे तर नाव घेत नाही, उलट एअर इंडिया व्यवस्थापन आता सर्व चारशे वैमानिकांना कायमचे घरी पाठवण्याच्या तयारीत आहे. कोणतेही क्षेत्र असो, व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातील तंटे लवकरात लवकर निकाली निघणे त्या आस्थापनाच्या हिताचे असते. त्यामुळे एअर इंडियामध्ये सध्या जे काही घडते आहे ते आधीच प्रचंड तोट्यात असलेल्या या कंपनीला कायमची मूठमाती देण्याकडेच चाललेली वाटचाल आहे असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. एअर इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे म्हणजेच सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांतून ती उभी राहिलेली आहे. या पैशाची अशी विल्हेवाट लावण्याचा अधिकार ना सरकारला आहे, ना वैमानिकांना. संपावरील वैमानिकांची मुजोरी एवढी की त्यांना न्यायालयांचीही फिकीर राहिलेली नाही. सरकारला कोंडीत पकडून नाकदुर्‍या ओढायला लावण्याची आजवरची परंपरा असल्याने यावेळीही सरकार गुडघे टेकील अशी या इंडियन पायलटस् गिल्डची अपेक्षा असावी, परंतु नागरी विमानवाहतूक मंत्री अजितसिंग यांच्या ठाम पाठिंब्यामुळे एअर इंडिया व्यवस्थापन मागे हटायला तयार नाही.

जुने गोवे अपघातात दोन युवक ठार

Story Summary: 

नुवे येथे झालेल्या अपघातातील स्कॉर्पियो जीप. (छाया : गणादीप शेल्डेकर)

रामनाथी येथे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन सुरू

Story Summary: 

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनास कालपासून रामनाथी येथे प्रारंभ झाला. या अधिवेशनासाठी २० राज्यांतून सुमारे १७४ धर्माचार्य, विचारवंत मंडळी उपस्थित असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

अधिवेशनाचा प्रारंभ उत्तर प्रदेशातील संत युश महाराज, हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे आणि आणि ऑस्ट्रेलिया येथील ‘स्पिरीच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे संत अतुल दिघे यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने झाला. हे अधिवेशन पाच दिवस चालणार आहे.

पुढील वर्षापासून महोत्सवातील चित्रपटांना पारितोषिके देणार

Story Summary: 

विष्णू वाघ यांची घोषणा; महोत्सवाची सांगता

पाचव्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची सांगता काल प्रतिभाशाली ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, हिंदी चित्रसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री झरीना वहाब, कथा, पटकथा, दिग्दर्शक, अभिनेता गिरीश कुलकर्णी, प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष, गोमंतकीय अभिनेता प्रसाद कामत, सांगता सोहळ्यावेळी प्रिमियर शो झालेल्या ‘धग’ चित्रपटातील कलाकार अभिनेता उपेंद्र लिमये, अभिनेत्री उषा जाधव, अभिनेता नागेश भोसले, बालकलाकार हंशराज जगताप, निर्माते विशाल गवारे, दिग्दर्शक शिवाजी पाटील, गीतकार शिव कदम, संगीतकार आदी रामचंद्र यांच्या उपस्थितीत झाली.

विष्णू वाघ यांनी याप्रसंगी या चित्रपट महोत्सवाला स्पर्धात्मक रूप यावे यासाठी पुढील वर्षापासून ईएसजीतर्फे पारितोषिके देण्यात येतील, अशी घोषणा केली.

कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात झालेल्या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून कला अकादमीचे अध्यक्ष तथा आमदार विष्णू सूर्या वाघ, विशेष अतिथी म्हणून गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ‘धग’चे निर्माते, दिग्दर्शक यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. विन्सन वर्ल्ड या आयोजन संस्थेचे संजय शेट्ये आणि श्रीपाद शेट्ये यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

जुने गोवे अपघातात दोन युवक ठार

Story Summary: 

रविवारी पहाटे जुने गोवे येथे झालेल्या अपघातात खोर्ली येथील सोहन गावकर (२३) व शैलेश पाठक (१८) ठार झाले. तर बाणस्तारी येथील निखील पेरणी जखमी झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरील तिघेहीजण जीए ०७ डी ४३९५ क्रमांकच्या मोटरसायकलवरून पणजीहून खोर्ली येथे येत होते. जुने गोवे येथील एटीएम केंद्राजवळ स्लिप होऊन त्यांना अपघात झाला.

टीव्हीवरील मालिकांत अर्थ उरला नाही : परांजपे

आताच्या मालिकांचा वास्तवाशी काही संबंधच उरलेला नाही. त्या मला बघवत नाहीत. बघताना कुठेतरी ऊद्वीग्नता येते इतक्या त्यात निरर्थक गोष्टी भरलेल्या असतात. तेव्हा मी त्यात आता बसणार नाही तो व्याप वेगळा झाला आहे त्यामुळे मला आता कोणी मानेवर सूरा ठेवून बजावले तरी मालिका करणार नाही, असे ख्यातनाम चित्रपट निर्मात्या सई परांजपे यांनी काल मराठी चित्रपट महोत्सवात बोलताना रोखठोकपणे सांगितले.

आधारभूत दर१ एप्रिलपासून लागू

सरकारने कृषी उत्पादन वाढविण्यावर यंदा लक्ष केंद्रित केले असून काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कृषी अधिकार्‍यांची बैठक घेऊन वेगवेगळ्या योजनांचा आढावा घेतला. उद्या ते शेतकर्‍यांना मदत करण्यासाठीच्या विविध नव्या योजना जाहीर करणार आहेत.

कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्षपदी चेतन आचार्य

कोंकणी भाषा मंडळाच्या अध्यक्षपदी चेतन आचार्य यांची निवड झाली. काल रविवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय झाला. उपाध्यक्षपदी उद्योजक सेराफीन कोत, सचिवपदी अन्वेषा सिंगबाळ, खजिनदारपदी चार्टर्ड अकाऊंटंट प्रदीप काकोडकार यांची नियुक्ती झाली.

नुवे येथे टँकर-जीप टकरीत ६ जखमी

नाफ्ताने भरलेला टँकर व स्कॉर्पियो जीप यांच्यात नुवे येथे झालेल्या टकरीत सहा जण जखमी झाले.

पैकी जीपचालक नितीन चव्हाण गंभीर असून त्यांना गोमेकॉ इस्पितळात दाखल केले आहे. तर अन्य जखमी संजय चव्हाण, अंकुश शिंदे, वामनचंद्रा बिबटे व वसंत शिंदे यांना हॉस्पिसियुत दाखल केले आहे.

दवर्ली पंचसदस्य, पतीस मारहाण

पंचायत निवडणुका गेल्या महिन्यात पार पडल्या तरी राजकीय गटांमधील वैमनस्य धुमसत असून काल दवर्ली पंचायतीच्या पंच लीला मंगलम, तिचे पती दीपक मंगलम व अक्षय आरोदे या तिघाना १५ ते २० लोकांच्या जमावाने रस्त्यात अडवून मारहाण केली. त्यात तिघे जखमी झाली.

‘एमआयसीआर’मुळेपतसंस्थांवर परिणाम

सरकारच्या प्रत्येक खात्याने एमआयसीआर कोड असलेल्या बँकांमध्येच संबंधित ग्राहकांच्या खात्यात थेट धनादेश जमा करण्याच्या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे धनादेश वितरित करण्याच्या वेळी होत असलेल्या भ्रष्टाचारावर पूर्णपणे नियंत्रण आल्याचे लेखा अधिकार्‍यांनी सांगितले.

धुळेर येथे अपघातात पाच जण जखमी

धुळेर-म्हापसा येथे काल रात्री १०.१५ वा. एका अज्ञात वाहनाने दोन दुचाकींना ठोकर दिल्याने पाच जण जखमी झाले असून पैकी दोघा गंभीर जखमींना बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात दाखल केले आहे. दरम्यान, ठोकर दिलेल्या वाहनचालकाने मात्र गाडीसह पळ काढला.

अल्पवयीन मोलकरणीस मारहाणप्रकरणी अटक

घरात मोलकरीण म्हणून १५ वर्षीय मुलीस ठेऊन तिला घरात डांबून मारहाण केल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी फातोर्डा येथील इझिता फर्नांडिस या घरमालकिणीस अटक केली. तिच्यावर गोवा बालहक्क कायद्याखाली गुन्हा नोंदविला आहे.

खासदार सचिनने बंगला नाकारला

नव्या मराठी - कोकणी शाळा उघडण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ

Story Summary: 

सरकारने २६ जूनपर्यंत अर्ज मागवले

मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने नुकत्याच घेतलेल्या देशी भाषांविषयीच्या निर्णयाची अंमलबजावणीही लगोलग सुरू झाली असून राज्यात मराठी - कोकणीच्या नव्या शाळा उघडण्याच्या प्रक्रियेला सरकारने गती दिली आहे. गोवा शालेय शिक्षण नियम, १९८६ खाली नोंदणीकृत संस्थांकडून नव्या मराठी वा कोकणी प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिक्षण खात्याच्या पर्वरी येथील कार्यालयात येत्या पंधरा दिवसांत म्हणजे २६ जूनपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

राज्यातील जवळजवळ आठशे सरकारी प्राथमिक शाळा असल्या तरी त्यापैकी पाचशेहून अधिक शाळांमध्ये पटसंख्या तीसहून कमी असल्याने त्या बंद पडण्याचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर नव्या खासगी प्राथमिक शाळा सुरू करण्यास उत्तेजन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. सरकारने अशा शाळांना भरघोस आर्थिक सहाय्य करण्याचाही निर्णय घेतलेला असून सध्याच्या इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित प्राथमिक शाळांनाही मराठी वा कोकणी माध्यमाकडे वळल्यास हे अनुदान मिळेल अशी घोषणाही मुख्यमंत्री श्री. पर्रीकर यांनी नुकतीच केली आहे.

खासदार म्हणून दिल्लीत मिळालेला बंगला सचिनने नाकारला

Story Summary: 

करदात्यांचा पैसा वाया न घालवण्याचा सल्ला

राज्यसभेची खासदारकी मिळालेला विश्वविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपल्याला राज्यसभेचा खासदार या नात्याने दिल्लीत मिळालेला सरकारी बंगला नाकारला आहे. आपण करदात्यांचा पैसा वाया घालवू इच्छित नाही असे कारणही त्याने दिले आहे. ५, तुघलक लेन येथे राहुल गांधी यांच्या बंगल्याशेजारचा बंगला सचिनला देण्यात आला होता.

‘‘मी दिल्लीत केवळ काही दिवस असणार आहे. त्यामुळे मला कोणत्याही सरकारी बंगल्यात राहण्याची काही आवश्यकता नाही. करदात्यांचा पैसा असा वाया घालवणे मला पटत नाही. तो बंगला माझ्याहून बंगल्याची अधिक गरज असलेल्या एखाद्याला दिला जावा’’ असे मत सचिनने यासंदर्भात वृत्तवाहिन्यांशी बोलताना व्यक्त केले.

गोवा मराठी चित्रपट महोत्सवास दुसर्‍या दिवशीही उदंड प्रतिसाद

Story Summary: 

पाचव्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशीही विविध चित्रपटांना रसिकांचा तुफानी प्रतिसाद लाभला. सचिन खेडेकर अभिनित व महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘काकस्पर्श’ चित्रपटासाठी तर प्रचंड गर्दी लोटल्याचे दिसून आले. असंख्य रसिकांची गर्दीमुळे निराशा झाली.

उद्घाटनाच्या दिवशी संध्याकाळी प्रदर्शित झालेल्या ‘अजिंठा’ या चित्रपटाचे पुनःप्रक्षेपण काल सकाळी ठेवण्यात आले होते. त्यालाही रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. विविध मराठी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटरसिक सकाळपासून ताटकळताना दिसत होते. गतवर्षी प्रचंड गर्दीमुळे मॅकेनिज पॅलेस येथील छोट्या चित्रपटगृहांमध्ये रसिकांची सोय करताना आयोजकांची तारांबळ उडाली होती.

नव्या जुवारी पुलासाठी ढवळीकर यांचे प्रयत्न

दक्षिण व उत्तर गोव्याचा महत्वाचा दुवा असलेल्या जुवारी पुलाचे बांधकाम राज्य सरकारतर्फे हाती घेण्यासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला देण्यास केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्रालयाने तत्वत: मान्यता दिल्याने दाखला मिळविण्यासाठी साबांखामंत्री सुदिन ढवळीकर यानी सध्या युध्द पातळीवर प्रयत्न चालविले आहेत.

खारदुंगला येथे अडकलेल्या ४०० प्रवाशांची मुक्तता

श्रीनगर - लेह राष्ट्रीय महामार्गावरील खारदुंगला पास येथे अडकून पडलेल्या सुमारे चारशे प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे दरडी कोसळल्याने जवळजवळ दहा कि. मी. चा रस्ता वाहतुकीस निकामी झाला आहे. खारदुंगला पास हा जगातील सर्वांत उंचीवरचा वाहने जाण्यायोग्य रस्ता आहे.

पेट्रोलचे दर आणखी उतरतील : मुखर्जी

कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घसरले असल्याने पेट्रोलचे दरही खाली येतील असे भाकीत केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी काल केले. देशातील सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी गेल्या २४ मे रोजी पेट्रोलच्या दरांत लिटरमागे सात रुपये ५४ पैशांनी वाढ केली होती. मात्र, नंतर विविध राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शवल्याने या दरात प्रति लिटर दोन रुपये दोन पैसे कपात करण्यात आली होती.

स्वतःच्या इच्छेने राष्ट्रपती होता येत नाही : प्रणव

कोणालाही वाटले म्हणून राष्ट्रपती होता येत नाही. त्यासाठी कॉंग्रेस पक्षाला विचार करावा लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केले. ‘‘तो निर्णय पक्ष घेत असतो. पक्षाचा उमेदवार पक्षाकडूनच ठरवला जात असतो. कोणाला स्वतःच्या इच्छेने राष्ट्रपती होता येत नाही’’ असे ते उद्गारले. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निश्‍चित करण्यासाठी कॉंग्रेसच्या कार्यकारिणीने पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना सर्वाधिकार दिलेले आहेत.

मारहाण प्रकरणी पाच जामीनमुक्त

खोल - काणकोण येथे क्रिकेट बॅट व विकेटने मारहाण केल्याचा आरोप असलेल्या पाच जणांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डेस्मंड डिकॉस्ता यांनी प्रत्येकी १० हजार रुपयांच्या हमीवर जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. वेर्णा येथील रुझारीयो डायस, चाल्स फर्नांडिस, ऑलव्हीन फर्नांडिस, पेटवील मेंडीस, फ्रांसीस फर्नांडिस यांना अटी पूर्ण केल्यानंतर जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.

कुंकळ्ळी येथे प्राणघातक हल्ला

पायराबांध - कुंकळ्ळी येथे शाब्दिक वादावरून झालेल्या भांडणात उग्र रुप धारण केले व पिटर पिंटो याने जुझे रॉड्रिग्स (४०) याच्यावर फावड्याने प्राणघातक हल्ला केला.

अण्णा हजारे व सहकार्‍यांना पंतप्रधान कार्यालयाचे कडक प्रत्युत्तर

अण्णा हजारे आणि सहकार्‍यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केलेल्या विविध आरोपांना पंतप्रधान कार्यालयाने कडक भाषेत प्रत्युत्तर लिहिले असून कोळसा वाटप घोटाळ्या संदर्भातील सर्व आरोप फेटाळले आहेत. कोळसा वाटपासंबंधीचा महालेखापालांचा अहवाल अद्याप संसदेत सादर झालेला नाही. तो संसदेत सादर होताच केंद्र सरकार त्यावर उत्तर देईल असे स्पष्टीकरणही पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने देण्यात आले आहे. कोळसा वाटपासंदर्भातील सर्व निर्णय विद्यमान कायदे कानूनांच्या खाली घेतले गेले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

मास्टर दत्ताराम जन्मशताब्दी वर्षास आज वळवईत प्रारंभ

नटसम्राट मास्टर दत्ताराम वळवईकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आज १० जूनपासून सुरू होत असून त्यानिमित्ताने वर्षभर विविध नाट्य विषयक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याचे गोवा कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू सुर्या वाघ यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

बेपत्ता खलाशाचा मृतदेह सापडला

शुक्रवारी पहाटे समुद्रामध्ये मच्छिमारीसाठी असताना ट्रॉलर बुडूक्याने बेपत्ता असलेल्या सडा येथील पांडुरंग मेस्ता याचा मृतदेह आज दुपारी तटरक्षक दलाच्या हॅलिकॉप्टरव्दारे शोधून मुरगांव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. पहाटे ६ वाजता खवळलेल्या समुद्री लाटांच्या तडाख्यात सापडल्याने श्री रामेश्‍वर प्रसाद नावाचा मच्छिमार ट्रॉलर समुद्रामध्ये बुडाला होता.

आंध्र न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध याचिका

केंद्रीय शिक्षण संस्थांमधील इतर मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणा अंतर्गत अल्पसंख्यकांना वेगळे साडे चार टक्के आरक्षण देण्यास विरोध दर्शवणार्‍या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात विशेष याचिका दाखल केली जाणार आहे. सदर निवाडा धार्मिक आधारावर दिला गेल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.

भ्रष्टाचाराविरोधात आता ‘आर या पार’ची लढाई

- कमलेश बांदेकर

स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या राष्ट्रव्यापी आंदोलनामध्ये देशाला खरेखुरे स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या लढ्याला दोन महान, निःस्वार्थी व त्यागी संन्यस्त वृत्तीची नेतृत्वे रामदेवबाबा व अण्णा हजारे यांच्या रूपाने लाभली आहेत. खरे तर ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक नेतृत्व इतर विषयांबरोबर काळे धन या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करत आहे, तर दुसरे नेतृत्व भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर कायद्यासाठी जनलोकपालाच्या मागणीसाठी उभे ठाकले आहे. आपण या दोन्ही आंदोलनांचा सविस्तर आढावा घेऊ व कोणत्या पार्श्‍वभूमीतून ही दोन्ही आंदोलने उभी राहिली याचाही विचार करू.

माध्यम धोरणाची कडक अंमलबजावणी व्हावी!

- रमेश सावईकर

अखेर पर्रीकर सरकारने प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमविषयीचे धोरण जाहीर करून निवडणुकीवेळी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली आहे. प्राथमिक शिक्षणाचे माध्यम मातृभाषाच असावे या जागतिक सिद्धांताचा समावेश माध्यमविषयक धोरणात करून सरकारने गोमंतकीय जनतेची मागणी पूर्ण केली आहे.

पर्रीकर सरकारने मराठी व कोकणी भाषा माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सरकारी अनुदानांत भलीमोठी वाढ करून प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. वास्तविक राजभाषा कायद्याच्या अंमलबजावणी अंतर्गत मराठी-कोकणी भाषांना प्रोत्साहन देऊन या भाषांच्या समृद्धीसाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक होते, पण दुर्दैवाने तसे घडले नाही. गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाल्याने विविध क्षेत्रांत नेत्रदीपक प्रगती साधण्यात सरकारला यश आले. पण प्रादेशिक भाषांचा विचार करता त्यांच्या संवर्धनासाठी, प्रगतीसाठी पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारने उल्लेख करण्यासारखे काही केलेच नाही.

स्वागत आणि विरोध

इंग्रजीकरण केल्या गेलेल्या शाळांचे अनुदान सुरू ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे देशी भाषाप्रेमींमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेवर स्वार होऊन विद्यमान सरकारला लक्ष्य करण्याचे काहींचे मनसुबे अखेर धुळीला मिळाले. भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या बैठकीत दुफळी माजेल या अपेक्षेत असलेल्यांना स्वतः मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीच त्या बैठकीस हजेरी लावून ‘मास्टर स्ट्रोक’ लगावला. गतवर्षी इंग्रजीकरण झालेल्या शाळांचे अनुदान सुरू ठेवण्याचा सरकारचा निर्णय गैर आहे यात शंकाच नाही. परंतु तो घेत असतानाच देशी भाषांच्या हितासाठी अत्यंत सुस्पष्ट आणि दूरगामी परिणाम घडवणारे निर्णयही नव्या सरकारने घेतलेले आहेत हे विसरून चालणार नाही. प्राप्त परिस्थितीत सरकारला तडजोड करावी लागली, त्यामागे अर्थातच राजकीय कारणे होती. काही मिळवण्यासाठी अखेर काही द्यावेही लागतेच. देशी भाषांसाठी एवढे काही देत असताना ‘फोर्स’ चा आवाज बंद पाडणेही आवश्यक होते, ते सरकारने थोडी तडजोड करून साधले.

पाऊस पहिला...

- सौ. पौर्णिमा केरकर

पाऊस पहिला जणू कान्हुला

बरसून गेला, तरसून गेला

पानावरती देठावरती

मयूर पिसारे, फुलती भिजती

आठवणींना उसवून गेला...

पहिल्या पावसाची संवेदना आताच काल-परवा सुरू झालेल्या पाऊससरी बरोबरीने मनभर सरसरून गेली आणि कवी प्रवीण दवणेंच्या कवितेतील शब्दांप्रमाणेच हा पहिला पाऊस आठवणींना उसवून गेला. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ ही उक्ती सर्वमान्य झालेली आहेच. तरीसुद्धा दरवर्षीचा पाऊस नव्याने सामोरा येतो. पाऊस पडल्यावर हवेतील सुखद गारवा दाहिदिशांत भरून राहिलेला दिसतो. भिजलेल्या सर्व दिशांतून, मातीच्या कणाकणातून, तृणपात्यावरील थेंबातून, कृमीकिटकांतून जग रुजून येते. येणार येणार म्हणून वाट पाहायला लावणारा तो शेवटी एकदाचा तृर्षार्तांना तृप्त करण्यासाठी येऊन धडकतो. रोमन् रोम पुलकित होऊन उठतात. भोवतालचे गर्द रान टवटवीत होऊन साद घालते. मनाची सारी मरगळ धुऊन जाते अन् उभे राहते ते सारा पाऊस आकंठ प्राशून घेण्यासाठी सडसडून जागे झालेले मन. या ताजेतवाने झालेल्या मनाला घेऊनच पहिला पाऊस घाटातच अनुभवायचा या विचाराने घाट रस्ता धरला. काळ्या राखाडी ढगांनी तर सारे आभाळ भरून आलेले. पाऊसच अंगावर घ्यायचा होता. त्यामुळे पावसापासूनच्या संरक्षणासाठीची कोणतीही वस्तू आमच्याबरोबरीने नव्हतीच. चोर्लाघाट ओलांडून सडा - कर्नाटक मार्गे आमच्या गाडीने वेग घेतला. दगडधोंड्याचा रस्ता त्यातच पावसाळी संध्याकाळ... दोन्ही बाजूला गडद हिरवे जंगल... पाऊस आता पडणारच! त्याच्याच स्वागतासाठी सावध झालेले. जंगल संपल्यानंतर मोठा पठार टणक कातळाचा. जिथे काहीच उगवणारे नसते तो म्हणजे सडा पण निसर्गाचा चमत्कारच. अशा या सुक्या निर्जीव सड्यावरही पहिला पाऊस झडून गेल्यावर हिरवे हिरवे तृणांकुर लवलवून बाहेर येतात आणि श्रावणसरींच्या आगमनापूर्वीच रंगबिरंगी रानफुलांनी उन्हाळ्यात निर्जीव, निस्तेज वाटणारा हा सडा लक्षलक्ष नक्षत्र फुलांनी डवरून उठतो. पाऊस अजून पडला नव्हता, पण पडणारच याची खात्री होती. या सुक्या सड्याचा सुखद गारवा अनुभवण्यासाठी पायातील वाहाणा काढून त्याला स्पर्श करण्याचा मोह आवरला नाही. एक क्षणभर तर त्या कातळाचा टणकपणा जाणवला नाही. मऊ लुसलुशीत वर येऊ पाहणार्‍या पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी आसुसलेल्या गवताचा स्पर्श सुखद वाटला.

बैल बाजार

- लाडोजी परब

कोकणातील शेतकर्‍याची सगळी आशा असते ती त्याच्या खिल्लारी जोडीवर अर्थात त्याच्या बैलांवर! बैल म्हणजे, कोकणातील शेतकर्‍यांचा जणू कणाच. त्यामुळे पावसाळ्याआधी बैलांची खरेदी-विक्री सुरूच असते. सिंधुदुर्गात विविध ठिकाणी आठवडी बाजाराप्रमाणे ‘बैल बाजार’ भरतात. विक्रीला आणलेले हजारो बैल एकाच ठिकाणी पाहावयास मिळतात. या बैल बाजारांच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने कष्टकर्‍यांचे दर्शन एकाच ठिकाणी घडते. शेतकर्‍यांचे आचारविचार या बैलबाजारातून अनुभवावयास मिळतात. या बाजारांचा थाट आणि डौल आगळा-वेगळाच असतो.

एलिना साल्ढाना यांना मंत्रिपदाची शपथ

Story Summary: 

एलिना साल्ढाना यांना मंत्रिपदाची शपथ देताना राज्यपाल भारत वांछू. सोबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर.

इंग्रजीकरण केलेल्या ‘त्या’ शाळांचे अनुदान बंद करा

Story Summary: 

भारतीय भाषा सुरक्षा मंचची मागणी

बैठकीस मुख्यमंत्री पर्रीकरांची उपस्थिती

पर्रीकर सरकारने घेतलेल्या माध्यमविषयक निर्णयाचे भारतीय भाषा सुरक्षा मंचने स्वागत केले आहे. मात्र माध्यम बदलून इंग्रजी केलेल्या डायोसेसन सोसायटीच्या १२६ शाळांचे अनुदान कायम चालू ठेवण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणीही मंचच्या काल झालेल्या बैठकीत करण्यात आली. माध्यमविषयक निर्णयावर विचारविनिमय करण्याकरिता घेतलेल्या कालच्या बैठकीस स्वत: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरही उपस्थित होते.

दरम्यान, सरकारने तयार केलेल्या माध्यमविषयक धोरणात प्राथमिक शिक्षणाचे माध्यम मातृभाषेतूनच असावे या जागतिक सिद्धांताचा समावेश प्रथमच माध्यविषयक धोरणात केल्याबद्दल मंचने समाधान व्यक्त केल्याचे मंचचे प्रवक्ते ऍड. उदय भेंब्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

एलिना साल्ढाना यांना मंत्रिपदाची शपथ

Story Summary: 

सोमवारी खात्यांची घोषणा

काल संध्याकाळी काबो राजभवनवर झालेल्या शानदार सोहळ्यात कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना यांना पर्रीकर मंत्रिमंडळातील बाराव्या मंत्री म्हणून राज्यपाल बी. व्ही. वांछू यांनी शपथ दिली.

दरम्यान, मंत्री साल्ढाना यांना सोमवारी खाती देणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. साल्ढाना यांना कोणते खाते हवे, तसेच याबाबतीत त्यांची आवड लक्षात घेतल्यानंतरच खाते दिले जाईल, असे ते म्हणाले. शपथविधी सोहळ्यास मंत्री व आमदार उपस्थित होते. कॉंग्रेसचा एकही आमदार दिसला नाही.

गोव्यातील सत्कार जीवनातील आनंददायी घटना : प्रभावळकर

Story Summary: 

मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

अतिशय अभिमान आणि आदर बाळगावा अशा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हातून सत्कार स्वीकारणे ही आनंदाची बाब आहे. कलेचे माहेरघर असलेल्या गोमंतभूमीतील हा सत्कार ही माझ्या जीवनातील आनंददायी घटना, आहे असे भावपूर्ण उद्गार सुप्रसिध्द अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी आज पाचव्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी कृतज्ञता पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना काढले.

प्रत्येक भूमिका मला काही तरी देऊन जाते. तसेच प्रत्येक पुरस्कारही मला वेगळे काही तशी देऊन जातो. गोव्याने दिलेला हा पुरस्कार मी विनम्रतेने स्वीकारतो असे सांगून गोवा आणि गोव्याच्या कोकणी भाषेवर आपले प्रेम आहे असे ते दिलखुलासपणे यावेळी म्हणाले.

दयानंद सुरक्षा योजनेच्या १४ बोगस लाभार्थींची चौकशी

सर्व रक्कम व्याजानिशी वसुल करणार

सरकारी सेवेत असतानाही समाजकल्याण खात्यातर्फे राबविण्यात येणार्‍या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेतलेल्या १४ लाभार्थींची चौकशी सुरू करण्याचा आदेश सरकारने दिला असून वरील लाभार्थींकडून ८ टक्के व्याजदराने सर्व रक्कम वसूल करून घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे या लाभार्थींची तारांबळ उडाली आहे.

माध्यम धोरणाचे ‘फोर्स’कडून स्वागत

गोवा सरकारने प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा जो निर्णय घेतला आहे त्याचे फोर्सने स्वागत केले आहे. सरकारने योग्य धोरणात्मक निर्णय घेऊन सर्व घटकांतील मुलांना शिक्षणाची संधी दिली असे फोर्सचे निमंत्रक प्रेमानंद नाईक यांनी म्हटले आहे. पालकानी संघटीत राहून न्याय मागण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

जर्मन बेकरी स्फोटातील आरोपी सिद्दिकी तुरुंगात मृतावस्थेत

इंडियन मुजाहिद्दीनचा कुख्यात दहशतवादी आणि बंगळूर तसेच पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट प्रकरणातील आरोपी कातील मोहंमद जाफर सिद्दिकी काल पुण्याच्या येरवडा कारागृहात गूढरीत्या मृतावस्थेत आढळला. अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या येरवडा कारागृहातील कोठडीत सिद्दिकी मृत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. पातळ दोराने त्याचा गळा आवळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तुरुंगातील दोन टोळ्यांतील संघर्षात सिद्दिकीचा बळी गेल्याचा प्रारंभिक कयास असला तरी बॉम्बस्फोट प्रकरणांतील तो प्रमुख दुवा असल्याने त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त होत आहे.

मच्छीमारी ट्रॉलर बुडून एक बेपत्ता

दोघांना वाचवले

येथील खारीवाडा समुद्र किनार्‍यावरून मच्छिमारीसाठी समुद्रामध्ये जात असताना खवळलेल्या लाटांच्या तडाख्यामध्ये सापडून मच्छिमारी ट्रॉलर समुद्रामध्ये बुडाल्याने पांडुरंग मेस्ता (४५) हा कामगार बेपत्ता आहे तर अन्य दोघांना वाचविण्यात यश आले आहे.

माहिती आयुक्तपदी पांडुरंग नाडकर्णी

राज्याचे नवे माहिती आयुक्त म्हणून गोवा शालांत आणि उच्च माध्यमिक मंडळाचे माजी अध्यक्ष पी. आर. नाकडर्णी यांची काल एकमताने निवड करण्यात आली. सोमवारी त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी होईल, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांना दिली.

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २२ जुलैपासून

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन दि. १२ जुलै ते ८ ऑगस्ट या काळात भरणार असून यावेळी शुक्रवार या खाजगी सदस्यांच्या कामकाजाच्या दिवशीही सरकारच्या मागण्यांवर चर्चा करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.

माजी लष्करप्रमुखांना कोर्टाचे समन्स

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) तेजिंदर सिंग यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्या प्रकरणी माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही. के. सिंग व चार अन्य वरिष्ठ लष्कर अधिकार्‍यांना दिल्लीच्या कोर्टाने समन्स पाठविले आहेत. अशाप्रकारे उच्चपदस्थ अधिकार्‍यांना समन्स पाठवून कोर्टात बोलावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

वाईन टुरिझमचे अद्भुत विश्व

- पद्माकर देशपांडे

मी प्रथमच सांगतो की, मी एक चांगला वाईनमेकर म्हणजे आसवे, अरिष्टे वगैरे औषधे बनवणारा कलाकार आहे. आसवे, अरिष्टे औषधोपचार म्हणून घेतली जातात आणि त्याचे कोणाला व्यसन लागणे शक्य नसते. एवढेच नव्हे तर कोरफडीच्या आसवासारखी काही आसवे अल्कोहोल आणि तंबाखू सुटण्याचे औषध आहे. या विषयाची माहिती नसल्यामुळे गैरसमज जरा जास्त आहेत आणि अल्कोहोलिक पेयांचा धंदा रोजचा अब्जावधी रुपयांचा असल्यामुळे अनेकांचे हितसंबंध यात गुंतलेले असतात. जाता जाता एवढेच सांगतो की, जेव्हा मी या विषयीचा लेख आयुर्वेदाच्या लोकप्रिय मासिकात लिहिला तेव्हा ‘आम्हाला हे पूर्वी कधी माहित नव्हते’ अशा प्रतिक्रिया अनेक नामवंत आयुर्वेदाचार्य आणि डॉक्टरांकडून ऐकायला मिळाल्या.

पारदर्शकतेची गरज

दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या बोगस लाभार्थींवर कारवाईचे आदेश देऊन सरकारने एक चांगले पाऊल उचलले आहे. अर्थात, या लाभार्थींना या योजनेखालील मदत मंंजूर कोणी आणि कशी केली याचे उत्तर देण्याची जबाबदारीही सरकारची आहे. सामाजिक कल्याण योजनांचा गैरफायदा उपटणारी बरीच मंडळी गोव्यात आहेत. सरकारच्या सर्वेक्षणात त्यातील काही नावे उघड झाली. गेल्या सरकारने जवळजवळ १८ हजार लाभार्थींची पेन्शन थांबवली होती. या योजनेचा बट्‌ट्याबोळ कसा झाला होता त्याची अनेक उदाहरणे तेव्हा समोर आली. काही लाभार्थींचे दोन अर्ज मंजूर झालेले आढळले, काही कला व संस्कृती खात्याचे मानधन मिळत असूनही दयानंद योजनेचा लाभ मिळवत असल्याचे दिसून आले, काही निवृत्त सरकारी पेन्शनरही या योजनेचा फायदा उपटत होते, काही पती - पत्नी अशी दोघेही योजनेचे लाभार्थी होते. ही अंदाधुंदी पुढे चालू राहिली तर या योजनेला काही अर्थच उरणार नाही. बोगस लाभार्थींपैकी काहींनी आपण उकळलेला आर्थिक लाभ परत करण्याची तयारी दर्शवली आहे, तर काही जण अजूनही बिनदिक्कत लाभ उकळत आहेत.

गोवा मराठी चित्रपट महोत्सव

गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची मेजवानी आजपासून

Story Summary: 

0 दिलीप प्रभावळकर यांचा आज सन्मान

0 तारे - तारकांची भरगच्च उपस्थिती

विशेष उपस्थिती :-

महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, नितीन देसाई, सोनाली कुलकर्णी, अफृता सुभाष, गिरीष कुलकर्णी, स्वाती मालपेकर, झरीन वहाब.

गेली काही वर्षे मराठी रसिक ज्या सोहळ्याची वाट पाहात असतात, तो पाचवा गोवा मराठी चित्रपट महोत्सव आज दि. ८ जूनपासून रविवार दि. १० जूनपर्यंत पणजीत साजरा होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज सायंकाळी ६ वाजता कला अकादमीच्या मा. दीनानाथ कलामंदिरात होणार असून ज्येष्ठ कवी व साहित्यिक ना. धों. महानोर यांच्या कथेवर आधारित बहुचर्चित ‘अजिंठा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने या महोत्सवाची सुरवात होईल. तीन दिवस चालणार्‍या या महोत्सवात ‘देऊळ’ ‘चिंटू’ आदी अनेक नव्या मराठी चित्रपटांबरोबरच आतापर्यंत कुठेच प्रदर्शित न झालेले ‘धग’ व ‘गाजराची पुंगी’ हे चित्रपटही रसिकांना पाहायला मिळणार आहेत.

‘अजिंठा’ या चित्रपटांसंबंधीत प्रदर्शनाचे कला अकादमीच्या प्रांगणात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून त्यानंतर नामवंत नाट्य व चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे या चित्रपट महोत्सवाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करतील.

‘कदंब’ने कर्ज थकवल्यानेच राज्यसहकारी बँकेसमोर पेचप्रसंग

Story Summary: 

अध्यक्ष रामचंद्र मुळे यांची माहिती

गोवा राज्य सहकारी बँक ही सहकार चळवळीची शिखर बँक. त्यामुळे आपण नेहमीच बँकेच्या हिताचा व सहकार चळवळीच्या भवितव्याचा विचार करतो. आपल्या बँकेने कदंब महामंडळाला २००३ साली दिलेल्या कर्जाची सरकार फेड करीत असेल तर आपण ताबडतोब अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे अध्यक्ष रामचंद्र मुळे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रकाश वेळीप यांच्या कारकीर्दीत बँकेने कदंबला ३० कोटी रुपये दिले होते. त्याची परतफेड न झाल्याने आता व्याजासह हे कर्ज ४६ कोटींवर पोचले आहे. सरकार त्यासाठी हमीदार आहे. कदंबला एवढी रक्कम देण्यास आपण व आपल्या काही सहकार्‍यांनी त्यावेळी विरोध केला होता असे ते म्हणाले. कदंबला दिलेल्या कर्जामुळेच बँकेचा एनपीए वाढला व नुकसान झाले, असे त्यांनी सांगितले.

‘त्या’ इंग्रजी शाळांना अनुदानाच्या निर्णयाचे कॉंग्रेसकडून स्वागत

Story Summary: 

इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान देण्याच्या कॉंग्रेस सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून त्याची अंमलबजावणी केल्याबद्दल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे प्रदेश कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष फ्रान्सिस सार्दिन यांनी काल अभिनंदन केले. त्यांच्या वरील निर्णयाचे सर्व कॉंग्रेसजन स्वागत करीत असल्याचे सार्दिन यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

१२६ शाळांचे अनुदान चालू ठेवण्याचा सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा असून उरलेल्या ५१ शाळांचेही यावर्षापासूनच इंग्रजीकरण करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

चिदंबरमविरुद्धची निवडणूक याचिका फेटाळण्यास नकार

Story Summary: 

मद्रास हायकोर्टाचा निर्णय; खटला चालणार

२००९ची लोकसभा निवडणूक गैरव्यवहार करून जिंकल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्याविरुद्ध प्रतिस्पर्धी उमेदवाराने दाखल केलेली निवडणूक याचिका फेटाळण्याची मागणी करणारी चिदंबरम यांची याचिका काल मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने काल फेटाळली. त्यामुळे आता चिदंबरम यांना खटल्यास सामोरे जावे लागणार आहे.

कोर्टाच्या निकालानंतर भाजप अध्यक्ष नितीन गडकरी तसेच तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली मात्र चिदंबरम यांनी ती फेटाळून लावली. कॉंग्रेस आणि केंद्र सरकारही चिदंबरम यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत.

एलिनाना आज मंत्रिपदी शपथ

आज संध्याकाळी ५ वाजता काबो राजभवनवर आयोजित शानदार सोहळ्यात राज्यपाल के. वांचू कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांना मंत्रिपदाची शपथ देतील.

प्रशासनात फेरबदल

सरकारने जारी केलेल्या एका आदेशाद्वारे पंचायत संचालक मिनीनो डिसोझा यांची बदली करून त्यांना अबकारी आयुक्त केले आहे तर सदरपदी असलेले जयदेव सारंगी (आयएएस) यांना तेथून मुक्त केले आहे.

भाषा सुरक्षा मंचची आज महत्त्वपूर्ण बैठक

शिक्षण माध्यम प्रश्‍नावर सरकारने तयार केलेल्या धोरणावर चर्चा करण्यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचने आज बैठक बोलावली असून या बैठकीनंतर मंच आपली भूमिका जाहीर करेल.

नियोजन मंडळाची पुनर्रचना

गोवा सरकारने एका आदेशान्वये राज्य नियोजन मंडळाच्या पुनर्रचनेची घोषणा केली आहे. नव्या रचनेनुसार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मंडळाचे अध्यक्ष असून दत्तप्रसाद खोलकर उपाध्यक्ष असतील. उपाध्यक्ष पदास कॅबिनेट दर्जा देण्यात आला आहे.

संकिताच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

सेपेकटॅकरो खेळाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू असलेल्या संकिता संतोष लोलयेकर हिच्या आत्महत्येमागील कारण गुलदस्त्यात असून काणकोणचे पोलीस निरीक्षक हरिश्‍चंद्र मडकईकर यांनी यासंबंधी सखोल तपास करण्याची सूचना उपनिरीक्षक चिमुलकर यांना केली आहे. ५ जून रोजी संकिताने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली होती.

सिरीयात सैनिकांकडून शंभर जणांचे शिरकाण

सत्ताविरोधकांचा दावा

सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्या सैनिकांनी शंभर लोकांची कत्तल केल्याचा दावा सत्ताविरोधी ’सीरिया नॅशनल कौन्सिल’ने केला आहे. या कत्तलीमध्ये महिला, मुले यांचा समावेश आहे. मध्य सीरियामधील एका खेड्यात ही घटना घडली असल्याचे नॅशनल कौन्सिलने सांगितले आहे. सीरियातील मानवी हक्कांसंबंधीच्या निरीक्षकांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे.

‘किरात’चे संपादक श्रीधर मराठे यांचे निधन

वेंगुर्ला येथे गेल्या ८० वर्षांपासून चालणार्‍या लोकप्रिय ‘किरात’ या साप्ताहिकाचे विद्यमान संपादक श्रीधर केशव मराठे (६०) यांचे काल सकाळी कुडाळ येथील इस्पितळात निधन झाले. काविळीच्या आजारामुळे गेला आठवडाभर त्यांच्यावर उपचार चालू होते.

पन्हाळगड : देखणे पर्यटन स्थळ

- सतीश गावकर, बोरी- गोवा

कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर समुद्र सपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर ५ मैल क्षेत्रफळात पन्हाळगड वसला आहे. महाभारत काळात पन्हाळ्यावर नागलोकांचे वास्तव्य होते. अधिश्रेष्ठ मुनी पराशर पन्हाळ्यावरील एका गुहेत वास्तव्य करून होते. ‘पन्नग’ म्हणजे नाग आणि ‘आलय’ म्हणजे घर. पन्हाळा म्हणजे नागलोकांचे घर! या गडाची बांधणी इ.स. १११२ साली शिलाहर राजा भोज याने केली होती. इ.स. १२२८ साली राजा सिंधन याने हा गड जिंकून घेतला. इ.स. १६५९ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला. १६६० मध्ये सिद्धी जोहराने गडाला वेढा घातला. या वेळी लढताना बाजी प्रभु देशपांडे आणि शिवा काशिद यांनी आत्मबलिदान दिले. इ.स. १६७३ साली शिवाजी महाराजांनी हा गड पुन्हा जिंकून घेतला. १७०५ मध्ये छत्रपती ताराराणी यांनी पन्हाळगड ही आपली राजधानी बनवली आणि कोल्हापूर संस्थानचा कारभार पुढे ७४ वर्षे तेथून चालवला. छत्रपती शिवाजी राजांनी या गडावर ८३९ दिवस वास्तव्य केल्याची नोंद ऐतिहासिक दप्तरात आहे. इ.स. १८२७ साली पन्हाळगड ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली आला.

धुगधुगी

गेले काही महिने गलितगात्र स्थितीत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पुन्हा धुगधुगी आणण्याचा निकराचा प्रयत्न पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी बुधवारच्या बैठकीत केला. अर्थव्यवस्थेला चालना मिळायची असेल तर त्यासाठी नव्या गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळाले पाहिजे आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करायचे असेल तर त्यासाठी साधनसुविधा विकसित झाल्या पाहिजेत. त्यामुळे साधनसुविधा उभारणीमध्ये ज्यांचे मोठे योगदान असते अशा पाच मंत्रालयांना दिशादिग्दर्शन करणारी एक बैठक पंतप्रधानांनी नुकतीच घेतली. ऊर्जा, रेल्वे, रस्ते व जहाजबांधणी, नागरी विमान वाहतूक आणि कोळसा मंत्रालय ही ती पाच महत्त्वपूर्ण खाती. या पाचही खात्यांमध्ये मिळून दोन लाख कोटी खर्चाचे विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प या बैठकीत पंतप्रधानांनी जाहीर केले आहेत. ऊर्जा क्षेत्रामध्ये आणखी अठरा हजार मेगावॅट क्षमतेची ऊर्जानिर्मिती करण्याचे लक्ष्य आखले गेले आहे. रेल्वे मंत्रालयाला मुंबईत बुलेट ट्रेनसाठी लागणार्‍या एलेव्हेटेड रेलमार्गासाठी २० हजार कोटी खर्च करण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे. तो मार्ग तयार होताच त्यावरून मुंबई - अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन धावेल. रस्ते व जहाजबांधणी मंत्रालयासाठीही भरघोस घोषणा आहेत.

मेजर अमित परबचा सत्कार करणार : पर्रीकर

Story Summary: 

मेजर अमित परब यांच्याशी चर्चा करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. सोबत माजी छात्रसैनिक संघटनेचे कार्यकारी सचिव प्रल्हाद मयेकर, संघटनेचे अध्यक्ष प्रदीप सावंत, उपाध्यक्ष जॉन आगीयार.

शैक्षणिक माध्यम धोरणास मंत्रिमंडळाची मान्यता

Story Summary: 

प्रत्येक घटकाचा विचार करणे आवश्यक : पर्रीकर

इंग्रजी शाळांचे माध्यम बदलल्यास अनुदान

काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्या शिक्षण माध्यम धोरणास मान्यता देण्यात आल्याचे सांगून या प्रश्‍नावर आपण कुणाचीही फसवणूक केलेली नाही. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे या मताशी आपण ठाम आहोत, परंतु राज्याचा प्रशासक या नात्याने प्रत्येक घटकाचा विचार केलाच पाहिजे. त्यामुळेच आपण डायोसेसन सोसायटीच्या १२६ इंग्रजी प्राथमिक शाळांचे अनुदान कायम ठेवल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय कॉंग्रेस सरकारने घेतला होता. या निर्णयास आव्हान देणारा अर्ज मागे घेण्यात आल्याने न्यायालयाला या प्रश्‍नावर आदेश देणे शक्य झाले नाही, असे पर्रीकर म्हणाले.

मोप विमानतळ लवकर होण्यासाठी केंद्र इच्छुक

Story Summary: 

देशात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देणार

मोप विमानतळाबरोबरच नवी मुंबई, कन्नूर येथील ग्रीनफिल्ड पद्धतीच्या विमानतळाच्या कामास गती देण्याची सूचना पंतप्रध मनमोहन सिंग यांनी केली. लखनऊ, वाराणसी, कोयंबतोर, त्रिची, गया येथे विमानतळांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी पावले उचलण्यास त्यांनी मंत्र्यांना सांगितले.

विमान वाहतूक, ऊर्जा, वाहतूक, जहाजोद्योग, कोळसा या खात्याच्या मंत्र्यांसोबत त्यांची काल बैठक झाली. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोंटेकसिंग अहुवालियाही यावेळी उपस्थित होते.

अतिरेक्याचा खात्मा करणार्‍या मेजर अमित परबचा सत्कार करणार

Story Summary: 

मुख्यमंत्री पर्रीकरांकडून कौतुक

राजपूत रेजिमेन्टमध्ये मेजरपदी असलेल्या व जम्मू आणि काश्मिरमधील कुपवाडा येथे घरात घुसलेल्या अतिरेक्याशी एकाकी झुंज देऊन त्याला कंठस्नान घालण्यात यशस्वी ठरलेल्या मेजर अमित परब याचा १९ डिसेंबर रोजी गोव्यात जाहीर सत्कार करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे.

पेडणे-वझरी येथील मूळ रहिवाशी असलेल्या अमित परब यांनी १४ ऑगस्ट २०१० रोजी एका अतिरेक्याला ठार करण्याचा प्रचंड धाडसाचे प्रदर्शन केले होते. त्यासाठी भारत सरकारने शौर्यासाठी देण्यात येणारे सेनापदक देऊनही त्यांचा गौरव केला होता. १५ ऑगस्ट २०११ रोजी त्याला सेनापदक देण्याची घोषणा करण्यात आली होती. नंतर १३ जानेवारी २०१२ रोजी त्याला ते विधिवत देण्यात आले होते.

पु. शि. नार्वेकर यांना कालिदास पुरस्कार

कोकण मराठी परिषदेचा ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा कार्यक्रम बुधवार दि. २० जून रोजी पणजी येथील गोवा राज्य वस्तू संग्रहालय सभागृहात सायं. ४ वा. होणार आहे. यावेळी संस्थेचा मानाचा ‘कालिदास पुरस्कार’ हा गोमंतकीय साहित्यिक, समीक्षक पु. शि. नार्वेकर यांना जाहीर झाला असून ऍड. रमाकांत खलप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

‘बफर झोन’ अहवालाची प्रतीक्षाच!

खाणी या वनक्षेत्रापासून किती दूर असाव्यात यासाठीचा बफर झोन ठरवण्यासाठी नेमलेल्या समितीने अद्याप आपला अहवाल सादर केलेला नसून ऑगस्ट महिन्याच्या आरंभी तो तयार होऊ शकणार असून तेव्हाच तो वन खात्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती खात्यातील सूत्रांनी दिली.

पेन्शन विधेयकात दुरुस्तीची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज होत असून यात पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट विधेयकात तीन प्रमुख दुरुस्ती प्रस्तावांस मान्यता दिली जाण्याची शक्यता आहे.

जन्मदाखला प्रकरणी जीसीएची समिती गठीत

गणेशराज नार्वेकर याच्या बनावट जन्मदाखला प्रकरणी तपासाकरिता गोवा क्रिकेट असोसिएशनने तिघांची एक समिती गठीत केल्याचे सचिव प्रसाद फातर्पेकर यांनी कळविले आहे. अकबर मुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचे मयुर सावकार व शिरीष नाईक हे सदस्य असतील.

संगीत नाटकांचा ठेवा जतन व्हावा

- नं. ध. बोरकर, गोवा वेल्हा

काही दिवसांपूर्वी पणजी येथील कला अकादमीच्या ब्लॅक बॉक्समध्ये संगीत ‘सौभद्र’ या नाटकावर एक कर्णमधुर, नयनरंजक असा शानदार कार्यक्रम सादर करण्यात आला. विशेष म्हणजे १३० वर्षांपूर्वी श्रेष्ठ नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेले संगीत ‘सौभद्र’ हे नाटक दैनिक नवप्रभाचे माजी संपादक सुरेश वाळवे यांनी संक्षिप्त करून ते पुनर्लिखित केलेले आहे. जुन्या पण उत्कृष्ट संगीत नाटकांचे पुनर्लेखन करून संगीत नाट्यकलेला चालना देण्याचा प्रयास केल्याबद्दल वाळवेसाहेब निश्‍चितच अभिनंदनास पात्र ठरलेले आहेत. त्यांनी मला फोनवरून कार्यक्रमाला मुद्दाम आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसे केले नसते तर मी एका शानदार कार्यक्रमाला मुकलो असतो.

उधळपट्टी

देशात संस्थानिक होते, तेव्हाच्या त्यांच्या ऐय्याशीच्या सुरस कहाण्या आजही अधुनमधून ऐकायला मिळतात. परंतु स्वतंत्र भारतामध्ये अर्धी अधिक जनता भुकेकंगाल असतानाही काही आधुनिक संस्थानिक ऐषाराम सोडायला काही तयार नाहीत. हे सांगण्याचे कारण म्हणजे माहिती अधिकारांखाली एका नागरिकाने मिळवलेली माहिती. नियोजन आयोगाने दिल्लीतील आपल्या ‘योजना भवन’ मधील कार्यालयातील दोन स्वच्छतागृहांवर तब्बल पस्तीस लाख रुपये खर्च केल्याची ही माहिती आहे. एखाद्या गुलहौशी गृहस्थाने आपल्या घरातील स्वच्छतागृहांमध्ये सोन्याचे नळ जरी बसवले तरी त्याला कोणी आक्षेप घेणार नाही, कारण शेवटी त्याने तो पैसा स्वतःच्या खिशातून खर्च केलेला असतो, परंतु नियोजन आयोगासारख्या सरकारी अधिकारिणीने आपल्या कार्यालयातील दोन छोट्याशा स्वच्छतागृहांवर पस्तीस लाख खर्च करणे हा अनाठायी खर्च आहे आणि तोही पंतप्रधानांनी काटकसरीचा संदेश देशाला दिलेला असताना. प्रश्न पस्तीस लाखांचा नाही. त्या अनाठायी खर्चामागील बेफिकीर वृत्तीचा आहे. याच नियोजन आयोगाने काही दिवसांपूर्वी देशात दारिद्य्ररेषा निश्‍चित करताना २८ रुपये दैनंदिन खर्च जगण्यासाठी पुरेसा आहे असा जावईशोध लावला होता.

इतिहासापासून बोध घ्यायचा असतो : पर्रीकर

Story Summary: 

पोर्तुगीजांनी रेईश-मागूश किल्ल्यात बंदी बनवून ठेवले असताना ज्या ठिकाणाहून धाडसी उडी टाकून पलायन केले ती जागा दाखवताना स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर सिनारी. (छाया : हेमंत परब)

मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल

Story Summary: 

गोव्याच्या वाटेवर

उन्हाळ्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देत मोसमी पावसाचे काल केरळमध्ये आगमन झाले. आता तो गोव्याच्या वाटेवर आहे. येत्या सात दिवसांत तो मुंबईपर्यंत जाऊन थडकेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

दरवर्षी ३१ मे किंवा १ जून रोजी मोसमी पाऊस केरळच्या किनारपट्टीवर येऊन पोहोचत असतो. यावेळी तो चार पाच दिवस उशिरा पोहोचला आहे. पावसाचा अंदाज चार पाच दिवस पुढे मागे होऊ शकतो, त्यामुळे सध्या तरी पावसाच्या भावी प्रवासाबाबत चिंता करण्याचे कारण नाही असे मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

इतिहासापासून बोध घ्यायचा असतो : पर्रीकर

Story Summary: 

रेईश मागूश किल्ल्याचे सौंदर्यीकरण

इतिहासापासून बोध घ्यायचा असतो, बरेच काही शिकायचे असते. आपली संस्कृती, आपला वारसा आपली भाषा, परंपरा याची इत्यंभूत माहिती इतिहासात डोकावून पाहिल्यास मिळू शकते, असे उद्गार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल वेरे येथील नूतनीकरण केलेल्या रेईश-मागूश या किल्ल्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना काढले.

हेलन हेम्लन ट्रस्टने गोवा सरकार बरोबर केलेल्या करारानुसार ४ कोटी रु. खर्चून या किल्ल्याचे नूतनीकरण केले आहे. गोव्यात येणार्‍या पर्यटकांवर फक्त समुद्र किनारे पाहून परत जाण्याची वेळ येऊ नये यासाठी अशी नवी पर्यटनस्थळे विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. रेईश-मागूश किल्ला हे एक उत्तम पर्यटन स्थळ बनवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असून त्यासाठी किल्ल्याजवळची कोमुनिदादीची जमीन ताब्यात घेणार असल्याचे ते म्हणाले. कला अकादमीजवळील जेटीकडून बोटीतून पर्यटकांना थेट या किल्ल्यात आणण्याची व्यवस्था करण्याचा सरकारचा विचार असल्याचे ते म्हणाले.

इंदिरा गांधींवर मोदी यांचे टीकास्त्र

Story Summary: 

माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी मतपेढीच्या राजकारणापोटी ईशान्येकडील राज्यांवर पाणी सोडायला तयार झाल्या होत्या, असा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल केला. मुंबईतील एका पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी हे विधान केले. श्रीमती गांधी यांच्या धर्मनिरपेक्षतेबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

‘‘इंदिरा गांधी यांनी मोठे पाप केले. त्यांनी तशी अनेक पापे केली, परंतु मी एकाचा उल्लेख करणार आहे’’ असे सांगून मोदी यांनी सांगितले की जेव्हा इंदिरा गांधींनी ईशान्येकडील राज्यांतून निवडणूक लढवताना कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात ‘आम्ही जिंकलो तर बायबलमध्ये सांगितलेले राज्य आणू’ असे जाहीर केले गेले होते. गांधी - नेहरू कुटुंबाने स्वतःच्या लाभासाठी इतिहासाचे विरुपीकरण केले व ईशान्येकडील राज्यांची उपेक्षा केली अशी टीकाही मोदी यांनी केली.

शुक्राच्या संक्रमणावस्थेचाआज दुर्मिळ योग

गोमंतकीयांना आज ६ रोजी एका अनोख्या खगोलीय घटनेचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. शुक्र ग्रहाच्या अनोख्या संक्रमणावस्थेचे दर्शन आज सकाळी ६ ते १० या वेळेत गोव्यात अनुभवता येणार आहे. जीवनातील दुर्मिळ अशी ही घटना मानली जाते. पृथ्वी व सूर्य यांच्या मधून होणारे शुक्राचे हे संक्रमण दुर्मिळ मानले जाते. यापुढील अशी घटना पुढील १०५ वर्षांनंतर होणार आहे.

भाषा सुरक्षा मंचची ८ रोजी बैठक

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी माध्यमप्रश्‍नी घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर भाषा सुरक्षा मंचने परवा दि. ८ जून रोजी एका बैठकीचे आयोजन केले असून तीत सरकारने माध्यमप्रश्‍नी घेतलेल्या निर्णयाबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे मंचच्या अध्यक्ष शशिकला काकोडकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

आदर्श घोटाळा प्रकरणी देशमुख व शिदेंचा तपास

करोडो रुपयांच्या आदर्श गृहबांधणी सोसायटी घोटाळाप्रकरणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखव सुशीलकुमार शिंदे यांच्यावरील आरोपांचा तपास चालू असल्याचे सीबीआयने काल मुंबई उच्च न्यायालयास सांगितले. याप्रकरणी १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करणार असल्याचेही सीबीआयने सांगितले.

वेगळ्या आयआयटी प्रवेश प्रक्रियेस राज्यांचा विरोध

आयआयटी, आयआयआयटी आणि एनआयटीसाठी समान प्रवेश परीक्षा असली तरी आयआयटीत प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रिया थोडीशी शिथील करून आयआयआयटी आणि एनआयटीपेक्षा वेगळे नियम बनविण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावास बहुतेक सर्व राज्यांनी विरोध दर्शविला.

डी. के. जोशी नवे नौदलप्रमुख

पाणबुड्यांच्या युद्धातीत तज्ज्ञ व्हाईस ऍडमिरल डी. के. जोशी हे नवे नौदल प्रमुख असतील. त्यांच्या नियुक्तीबाबत काल अधिकृतरित्या आदेश जारी करण्यात आला. ५८ वर्षीय जोशी हे सध्या नौदलाचे पश्‍चिम क्षेत्रीय ध्वजाधिकारी आहेत. सध्याचे ऍडमिरल निर्मल वर्मा ३१ ऑगस्ट रोजी निवृत्त होत असून त्यांच्या जागी जोशी पदभार स्वीकारतील.

योगगुरुंच्या आंदोलनाचे पवारांकडून स्वागत

रामदेव बाबांनी सुरु केलेल्या काळ्या धनाविरुद्धच्या मोहिमेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केले.

काल योगगुरुंनी पवारांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली. रामदेव बाबा सध्या सर्व पक्षप्रमुखांना भेटून काळ्या धनाविरुद्धच्या आंदोलनासाठी पाठिंबा मिळवित आहेत.

एलिना साल्ढाना यांचा शुक्रवारी शपथविधी

कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना यांचा मंत्रिपदी शपथविधी शुक्रवार दि. ८ रोजी संध्याकाळी ५ वाजता राजभवन येथे होणार आहे.

विदर्भात चार दिवसांत सहा शेतकर्‍यांची आत्महत्या

विदर्भातील शेतकर्‍याच्या आत्महत्या चालूच असून गेल्या चार दिवसात सहा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. विदर्भातील वर्धा, भंडारा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर या जिल्हातील हे शेतकरी आहेत.

भारत-जपान संयुक्त नाविक कवायती

भारत-जपान यांच्यात प्रथमच द्विपक्षीय नाविक कवायती ९ ते १० जून दरम्यान जपानमध्ये होणार आहेत. या कवायतींसाठी भारतीय नौदलाची चार जहाजे जपानला रवाना होणार आहेत. जपानच्या समुद्रावर या संयुक्त कवायती होणार आहेत.

गोवा प्लास्टिकमुक्त होईल तोच भाग्याचा दिवस

- दिलीप बोरकर

‘सुंदर गोवा, स्वच्छ गोवा’ ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून गोवा प्लास्टिकमुक्त करण्याचे स्वप्न हे प्रत्येक विचारी माणसाचे आहे. म्हणूनच रस्त्याच्या कडेला, वसाहतीच्या प्रत्येक नाक्यांवर प्लास्टीकच्या कचर्‍याचे ढिगारे पाहिले म्हणजे प्रत्येक सुजाण नागरिकांच्या कपाळावर आठ्या उभारून आलेल्या दिसतात. ज्यांचे मन संवेदनशील आहे आणि प्लास्टीकच्या या राक्षसाचे दुष्परिणाम ज्यांनी जाणलेले आहेत, ते प्लास्टिक कचरा करणार्‍यांच्या नावे आणि साचलेल्या ढिगार्‍यांच्या नावेही बोटे मोडत असतात. पण तो प्लास्टीकचा कचरा बंद करावा अथवा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मात्र क्वचितच कुणाला तरी वाटते.

बचावात्मक

कॉंग्रेस कार्यसमितीच्या नुकत्याच दिल्लीत झालेल्या बैठकीत गेल्या विधानसभा निवडणुकांतील पक्षाच्या अपयशासंबंधी आणि भावी निवडणुकांसाठीच्या रणनीतीसंबंधी चिंतन होईल आणि पक्षाची नवी दिशा आखणारे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा होती, परंतु पक्ष आणि सरकारवरील चौफेर टीकेला उत्तर देण्यातच या बैठकीतील सहा तास खर्ची पडले असे दिसते. या बैठकीत निमंत्रणे गेलेल्या ११५ नेत्यांपैकी ९८ जण उपस्थित होते, पण त्यापैकी केवळ ४२ जणांनी बैठकीत तोंड उघडले. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत त्यांना वस्तुस्थिती निदर्शक चार खडे बोल सुनावणारे या समितीमध्ये कोणी असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे या होयबांच्या गर्दीने केवळ माना डोलावल्या आणि वेळ मारून नेली हे तर स्पष्टच आहे. परंतु निदान अँटनी समितीच्या अहवालावर गंभीरपणे चिंतन व्हायला तरी हरकत नव्हती. तो अहवाल हा केवळ एक फार्स ठरला आहे. अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांच्या आरोपांपासून पक्षाचा बचाव करणे, सरकारवरील चौफेर टीकेला उत्तर देणे यालाच कार्यकारिणी बैठकीत प्राधान्य दिले गेले.

योगमार्ग- राजयोग (योगसाधना - १३१) (अस्तेय-१४)

- डॉ. सीताकांत घाणेकर

सृष्टिकर्त्याने सुंदर अशी सृष्टी सर्व प्राणिमात्रांसाठी तयार केली. मानव त्याची उत्कृष्ट कलाकृती आहे. ह्या मानवाला उत्कृष्ट बुद्धी दिली आहे. मानवाने ती बुद्धी सत्कारणी लावावी, सृष्टीचे संवर्धन करावे अशी त्याची अपेक्षा. शेवटी परमेश्‍वराने सृष्टीतील प्रत्येक घटक सर्वांच्याच उपयोगी पडावा म्हणूनच केला आहे. ह्या घटकांचा योग्य प्रमाणांत वापर करावा अशी इच्छा आहे. उगाचच स्वतःच्या मौजेसाठी ह्या घटकांचा दुरुपयोग करू नये. त्यांचा नाश करू नये.

साक्षी .. इन् नो मॅन्स लँड...

- प्रा. रमेश सप्रे

खरं तर, ‘साक्षी..इन् नो मॅन्स लँड’ म्हटल्यावर मीच्या साक्षीनं वादच घातला असता. ती तुटूनच पडली असती... ‘व्हाय इन् नो मॅन्स लँड? व्हाय नॉट इन् नो वुमन्स लँड? व्हाय नॉट इन् नो पर्सन्स लँड?’

पण आता साक्षी खरंच ‘ना घरकी, ना घाटकी’ अशा अवस्थेत आहे. घर तर सुटलंय अन् घाटानं जवळ केलेलं नाहीये. अन् कधी करील असं वाटतही नाहीये. असं झालंय तरी काय साक्षीला? ... काही विशेष नाही .. फक्त तिचा एस् एस् सीचा निकाल लागून ती आता अकरावीत पोचलीय.

उदासीनता

 - डॉ. शुभांगी सुनील नाईक (शब्दांकन-देवकी नाईक)

मानवाला आज अमाप सुखसोयी उपलब्ध आहेत. तरीसुद्धा आपल्याला नेहमी वाटत राहतं की, आपल्या काही इच्छा अपूर्ण आहेत. आपण मग ह्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यामागे लागतो. अनेकदा असफल ठरतो. अनेकदा आपल्या मनाला कसलं तरी दुःख, कसली तरी व्यथा सतत सलत राहते.

छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण आपलं सुखी जीवन निराशामय करून ठेवतो. आपली झोप उडते. मग आपल्याला काहीच बरं वाटत नाही. कुठंच लक्ष लागत नाही. एक प्रकारची उदासीनता आपल्या चेहर्‍यावर पसरते. लक्षात ठेवा ही उदासीनता एखाद्या व्यक्तीचं आयुष्य संपवू शकते. उदासीनता हा मानसिक विकार आहे.

शैक्षणिक माध्यमप्रश्‍नी सरकारचा सुवर्णमध्य

Story Summary: 

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. बाजूस कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू वाघ, साबांखा मंत्री सुदिन ढवळीकर, डॉ. विल्फ्रेड मिस्किता.

इंग्रजीकरण झालेल्या ‘त्या’ शाळांना अनुदान सुरूच

Story Summary: 

शैक्षणिक माध्यमप्रश्‍नी सरकारचा सुवर्णमध्य

0 प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्याच्या मातृभाषेतूनच

0 प्रादेशिक भाषांतील प्राथमिक शाळांनाच यापुढे अनुदान

0 नव्या मराठी - कोकणी शाळा सुरू करण्यास प्रोत्साहन

शैक्षणिक माध्यम प्रश्नी कोकणी आणि मराठी या प्रादेशिक भाषांतील प्राथमिक शाळांनाच अनुदान व प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने काल घेतला, परंतु त्याचबरोबर गेल्या वर्षी ज्या कोकणी माध्यमांच्या शाळांचे इंग्रजीकरण केले गेले, त्यांना शिक्षण खात्याने लागू केलेले अनुदान सुरूच ठेवण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल संध्याकाळी आपल्या सरकारच्या या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली.

गतवर्षी १० जूनपूर्वी ज्या शाळा कोकणी वा मराठी माध्यमाच्या होत्या व नंतर ज्यांनी माध्यम इंग्रजी केले, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिक्षण देण्यास सुरूवात केलेली आहे. त्यांना आता पुन्हा माध्यम बदलण्यास सांगितले गेले तर या शाळांतून शिकणार्‍या जवळजवळ पंचवीस हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येईल असा युक्तिवाद पर्रीकर यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन करताना केला. मात्र, आपले सरकार एकाही इंग्रजी शाळेला यापुढे अनुदान देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दहावीचा निकाल ७३.३८%

Story Summary: 

गोवा शालान्त मंडळाने गेल्या मार्च महिन्यात घेतलेल्या दहावी इयत्ता परीक्षेचा निकाल ७३.३८ टक्के एवढा लागला असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्ष फॅरेल फुर्तादो व सचिव भागीरथ शेट्ये यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल बराच कमी लागलेला आहे. गेल्या वर्षी ८६ टक्के एवढा निकाल लागला होता.

१४२०० विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. पैकी १०४२० उत्तीर्ण झालेले असून एकूण निकाल ७३.३८ टक्के एवढा लागला असल्याचे फुर्तादो यांनी सांगितले. ठराविक विषय घेऊन १४११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४२३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून ही टक्केवारी २९.३८ एवढी असल्याचे त्यांनी सांगितले.

तो ऍसिड हल्ला तिरस्कारापोटी

Story Summary: 

सुपारी घेतलेल्यांवर आरोप दाखल करणार

चिंचोणे (सासष्टी) येथील ब्रायन फर्नांडिस याच्यावर पणजीतील काकुलो मॉलजवळ जो ऍसिड हल्ला करण्यात आला होता त्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा तपास लागलेला असून हल्ल्यात जखमी झालेल्या ब्रायन फर्नांडिस याचा तो शेजारी असून त्याचे नाव जोझेफ उर्फ फुलांव फर्नांडिस (७०) असे असल्याचे काल पणजीचे उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश गावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ब्रायन फर्नांडिस याच्यावर हल्ल्याची जोजेफ याने सुपारी दिली होती असे सांगतानाच जोझेफ याचे ११ ऑगस्ट २०११ रोजीच म्हणजे ब्रायन फर्नांडिस याच्यावर हल्ला झाल्याच्या ५ दिवसांतच एका खासगी इस्पितळात मृत्यू झाल्याचे ते म्हणाले. सुपारी देऊन हल्ला घडवून आणल्यानंतर मानसिक तणाव होऊन त्याच धक्क्यात त्याचे निधन झाल्याचे गावकर यांनी सांगितले.

दुचाकीची धडक; पादचारी ठार

धर्मापूर येथे दुचाकीची धडक बसून मिलाग्रीस सांतान (६०) हा पादचारी ठार झाला. ही घटना काल रात्री ११.४५ वा. घडली. केएल-४-के-७४४९ या क्रमांकाच्या दुचाकीवरून ऍनीश थोमस हा निघाला होता तर मिलाग्रीस पायी जात होता.

७ स्वातंत्र्य सैनिकांचा क्रांतीदिनी गौरव

गोवा क्रांतीदिनी १८ जून रोजी येथील आझाद मैदानावरील शासकीय समारंभात सात स्वातंत्र्य सैनिकांना गौरविण्यात येणार आहे.

जागतिक पर्यावरणदिनानिमित्ताने...

- शंभू भाऊ बांदेकर

प्रत्येक वर्षाच्या २१ मार्चला जसा ‘जागतिक वन्य दिन’ साजरा केला जातो, तसाच प्रत्येक वर्षाच्या ५ जूनला ‘जागतिक पर्यावरणदिन’ साजरा करण्यात येतो. अरण्यदिन म्हणजेच वन्य दिन साजरा करण्यामागे जंगलांचा झपाट्याने होणारा र्‍हास थांबवणे व त्यासाठी जनजागृती करणे हा उद्देश असतो. तर ‘पर्यावरणदिन’ साजरा करण्यामागे पर्यावरणाचा समतोल राखणे किंवा पर्यावरणातील प्रदुषण थांबवणे हा हेतू असतो.

तडजोड

गेले तीन महिने जनतेला ज्याची प्रतीक्षा होती, तो शैक्षणिक माध्यम प्रश्‍नावरील निर्णय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल घेतला. राज्यात केवळ देशी भाषांतून प्राथमिक शिक्षणालाच प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण राहील आणि मुलांच्या मातृभाषांतून प्राथमिक शिक्षण देणार्‍या शाळांनाच अनुदान दिले जाईल असा हा निर्णय असला तरी गतवर्षी कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळात न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता रातोरात इंग्रजी माध्यम केलेल्या शाळांना शिक्षण खात्याने जे अनुदान दिले, ते मात्र सरकारने कायम ठेवले आहे. जवळजवळ २५ हजार विद्यार्थी त्या माध्यम बदललेल्या शाळांतून शिक्षण घेत आहेत, त्या विद्यार्थ्यांना फटका बसू नये यासाठीच ते अनुदान कायम ठेवले गेले आहे, अशी त्याची कारणमीमांसाही मुख्यमंत्र्यांनी काल दिली. म्हणजेच ‘सापही मरावा आणि लाठीही तुटू नये’ अशी राजकीय चतुराई या निर्णयात मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली दिसते. सरकारच्या या निर्णयानुसार, ज्या विनाअनुदानित शाळा कायदेशीर मार्गाने गेल्या, सरकारच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत राहिल्या, त्यांना अनुदान नाही आणि ज्या १०५ शाळांनी सरकारला खुंटीवर टांगत रातोरात माध्यम बदलले, त्यांना मात्र अनुदान असा हा अजब निर्णय आहे.

अण्णा-रामदेव यांच्या उपोषणास मतभेदाचे गालबोट

Story Summary: 

उपोषणाआधी अण्णा हजारे व बाबा रामदेव यांनी एकत्रितपणे राजघाटवर जाऊन गांधीजींच्या समाधीवर पुष्पचक्रे अर्पण केली.

अण्णा-रामदेव यांच्या उपोषणास मतभेदाचे गालबोट

Story Summary: 

योगगुरु रामदेव बाबा आणि अण्णा हजारे यांचे एका दिवसाचे उपोषण काल दिल्लीत जंतर मंतर येथे झाले. यावेळी टीम अण्णा सदस्य अरविंद केजरीवाल यांना आक्षेप घेत बाबा रामदेव यांनी टिप्पणी केल्यानंतर केजरीवाल तेथून उठून चालते झाले. नंतर मात्र त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण उपोषणस्थळावरून गेल्याचे ट्विटरवर सांगितले.

जंतर मंतर येथील असह्य उकाड्यातही काल अनेक कार्यकर्ते उपोषणास उपस्थित होते.

त्यांना संबोधित करताना बाबा रामदेव यांनी विदेशी बँकात साठवून ठेवलेला भारतातील काळा पैसा पुन्हा देशात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. यावेळी ते असेही म्हणाले की, पंतप्रधान मनमोहन सिंग वैयक्तिक प्रामाणिकपणाबद्दल ठामपणे बोलतात मात्र ते एक घटनात्मक संस्था असून त्यांच्याकडून प्रामाणिक कॅबिनेटची देश अपेक्षा करतो.

माध्यमप्रश्‍नी आज तोडगा

Story Summary: 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज सोमवारी आपण माध्यमप्रश्‍नी तोडगा काढणार असल्याचे जाहीर केल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते आज या अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या मुद्द्यावर नेमका कोणता तोडगा काढतात याकडे आज तमाम गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

पर्रीकर यांनी कोणत्याही परिस्थितीत इंग्रजी माध्यमातील शाळांना अनुदान देऊ नये अशी देशी भाषाप्रेमींची मागणी असून इंग्रजी धार्जिण्याकडून मात्र इंग्रजी शाळांना अनुदान देण्यासाठी वाढती मागणी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आज हा अत्यंत किचकट व तेवढाच वादग्रस्त ठरलेला मुद्दा ते कसा सोडवतात ते पाहण्यासाठी गोमंतकीय उत्सूक बनले आहेत.

पर्रीकरांची राजकीय संन्यासाची तयारी

Story Summary: 

गोव्याचे लाडके, अत्यंत हुशार व निष्कलंक असे नेते मनोहर पर्रीकर यांच्या करिष्म्यामुळे राज्यात भाजपला बहुमत मिळून त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्याने गोव्यातील जनता आनंद व्यक्त करू लागलेली असतानाच मनोहर पर्रीकर यांनी मात्र पाच वर्षांनंतर राजकीय संन्यास घेण्याची तयारी चालवली आहे.

खुद्द त्यांनीच शनिवारी तशी माहिती पत्रकारांना दिली. निमित्त होते पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी मेजवानीचे. राज्याला घटक राज्याचा दर्जा मिळून २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मनोहर पर्रीकर यांनी ही मेजवानी आयोजित केली होती.

दिवाळखोरीत नसल्याचे राज्य सहकारी बँकेचे स्पष्टीकरण

गोवा राज्य सहकारी बँकेचे दिवाळे निघण्याची वेळ आली असल्याचे वृत्त हे निराधार व गैरसमज पसरविणारे असल्याचा खुलासा काल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एन. एस. बोरकर यांनी केला.

नायजेरियात विमान कोसळून १५३ ठार

नायजेरियाची आर्थिक राजधानी लागोस येथे काल झालेल्या विमान दुर्घटनेत सर्व १५३ प्रवासी ठार झाल्याची भीती तेथील नागरी विमान वाहतूक अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. डाना एअरलायन्सचे हे विमान अबुजा ते लागोस अशा प्रवासावर होते. हे विमान लागोस शहरातील एका इमारतीवर कोसळल्याचे कळते.

सियाचीन : भारत-पाक बोलणी ११-१२ जूनला

जगातील सर्वांत उंच युद्धक्षेत्र म्हणून गणले जाणार्‍या सियाचीनमधून लष्कर मागे घेण्याची भारत व पाकिस्तानमधील संरक्षण सचिव स्तरावरील बोलणी ११ व १२ जून रोजी इस्लामाबाद येथे होणार आहेत.

रणवीर सेनेच्या बंदला हिंसक वळण

रणवीर सेनेचे प्रमुख ब्रह्मश्वर सिंग यांच्या हत्येनंतर सेनेने बिहारमध्ये पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. सेनेच्या समर्थकांनी वाहनांवर दगडफेकर करण्याचे, ठिकठिकाणी टायर जाळण्याचे, दगड टाकून रेलमार्ग अडवण्याचे प्रकार घडले. पटना - गया, जेहनादाबाद-अरवाल महामार्गही रोखून धरण्यात आले.

अमरनाथ यात्रेकरू स्थानबद्ध

काश्मीर खोर्‍यातील अमरनाथ यात्रेस नियोजित दिवसापूर्वी सुरुवात करण्यासाठी जमलेल्या शेकडो यात्रेकरूंना काल राज्य प्रशासनाने स्थानबद्ध केले.

पुरुषांसोबत नृत्य करणार्‍या महिलांना पाकिस्तानात मृत्यूदंड

पाकिस्तानच्या खैबर आदिवासी पट्‌ट्यात एका लग्नसमारंभात पुुरुषांसोबत गाणार्‍या व नृत्य करणार्‍या चार महिलांना तेथील स्थानिक मंडळ असलेल्या ‘जिरगा’ने मृत्यूदंड फर्मावल्याचे वृत्त पाकिस्तानातील एका दूरचित्रवाणीने प्रसारित केले असून वरिष्ठ अधिकार्‍यांनी मात्र तशी शक्यता फेटाळून लावली आहे.

पर्वरीत अपघातांची शक्यता

Story Summary: 

पर्वरीत भर रस्त्यात असे मोठमोठे ट्रक व ट्रॉली उभ्या करून ठेवल्या जात असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. (छाया : शेखर वायंगणकर)

पेट्रोल २ रुपयांनी स्वस्त

Story Summary: 

जनतेच्या रोषामुळे केंद्र सरकार झुकले

पेट्रोलच्या दरांत प्रचंड वाढ केल्याने देशभरात उसळलेल्या जनप्रक्षोभाची झळ गेल्या ३१ मे रोजी पुकारल्या गेलेल्या देशव्यापी बंदाच्या यशस्विततेतून लागल्याने केंद्र सरकारने काल पेट्रोलचे दर लिटरमागे दोन रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. ही दरकपात काल मध्यरात्रीपासून लागू झाली आहे.

सरकारच्या मालकीच्या तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरांत लिटरमागे कर वगळता १ रुपया ६८ पैसे कपात केली असून २० टक्के मूल्यवर्धित कर वजा करता दिल्लीत पेट्रोल लिटरमागे दोन रुपयांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोलच्या दरांत सरकारने नुकतीच लिटरमागे सात रुपये ५४ पैसे वाढ केली होती. त्यामुळे त्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर ७३ रुपये १८ पैसे झाला होता. तो आता कपातीनंतर ७१ रुपये १८ पैसे झाला आहे.

यंदा पाऊस उशिरा येणार

Story Summary: 

यंदा राज्यात पाऊस उशिरा सुरू होण्याची शक्यता असून मान्सून जूनच्या दुसर्‍या आठवड्यापूर्वी राज्यात येण्याची शक्यता कमीच असल्याचे येथील वेधशाळेचे प्रमुख के. व्ही. सिंग यांनी काल सांगितले.

मोसमी पाऊस २३ मे रोजीच अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहात सुरू झालेला असला तरी अजून तो केरळच्या दिशेने पुढे सरकला नसल्याचे ते म्हणाले. तो केरळमध्ये पोचण्यास आणखी किमान ३-४ दिवस लागण्याची शक्यता असून तसे झाल्यास गोव्यात मान्सून १० जून रोजीच पोचू शकेल असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, जर ते केरळहून अतिवेगाने गोव्याकडे सरकले तर त्याच्यापूर्वीही तो गोव्यात पोचू शकतो, असे सिंग यांनी स्पष्ट केले.

गोमंतकीय तरुणाईला आयआयटीसाठी प्रशिक्षण

Story Summary: 

धेंपो व विद्याविकासची हातमिळवणी

गोव्यातील गुणवान व हुशार विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आयआयटीसाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी धेंपो कला आणि विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय व मडगाव येथील विद्या विकास अकादमी उच्च माध्यमिक विद्यालय या गोव्यातील दोन आघाडीच्या उच्च माध्यमिक विद्यालयांनी एकत्र येऊन पेस एज्युकेशन, मुंबई या भारतातील आयआयटीसाठीचे प्रशिक्षण देणार्‍या आघाडीच्या शैक्षणिक संस्थेशी हातमिळवणी केली आहे.

दोन्ही उच्च माध्यमिक विद्यालयांतर्फे २०१२ या शैक्षणिक वर्षापासून आयआयटीसाठीचे हे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे धेंपो उद्योग समूहाचे चेअरमन श्रीनिवास धेंपो यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

पंतप्रधान ‘दूरनियंत्रित’ नेते : अण्णा

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे ‘रिमोट कंट्रोल्ड’ नेते आहेत, अशी घणाघाती टीका अण्णा हजारे यांनी काल केली. सन २००६ ते २००९ दरम्यान झालेल्या वादग्रस्त कोळसा साठे वाटपासंदर्भात चौकशीस पंतप्रधानांनी नकार दिल्याने अण्णांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. स्वतंत्र चौकशीचे आदेश पंतप्रधान का देत नाहीत असा सवाल अण्णा यांनी केला. ‘‘काही समस्या नसेल तर आपण तपासाला का घाबरत आहात? सीबीआयमार्फत ही चौकशी करणे पुरेसे ठरणार नाही. निवृत्त न्यायाधीशाने व इतरांनी या घोटाळ्याची चौकशी करायला हवी’’ असे अण्णा म्हणाले.

कोकणी व मराठीसाठी ‘गेट वेल सुन’ लढणार

कोकणी व मराठी भाषेविरुद्ध विद्यमान सरकारने कोणताही निर्णय घेतला तर त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा व आंदोलन करण्याचा इशारा ‘गेट वेल सुन’ या गटाने दिला आहे. माध्यम प्रश्न राज्यात ऐरणीवर असताना स्थापन झालेल्या ‘गेट वेल सुन दिगंबर’ या नावाने राज्यातील युवावर्गाने जो दबावगट निर्माण केला होता, तो आता यापुढे देशी भाषांच्या संवर्धनाबरोबरच राजभाषा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचे काम हाती घेणार आहे असे या गटाचे नेते राजदीप नाईक व युगांक नाईक यांनी काल सांगितले.

कळंगुट येथे एक ठार

कळंगुट येथे काल दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास एका ऍक्टीव्हा स्कूटर चालकाने समोरून येणार्‍या एका पर्यटक बसला धडक दिल्याने तो स्कूटर वरून बसच्या मागच्या चाकाखाली पडून ठार झाला.

अभियांत्रिकीच्या समान परीक्षेविरुद्ध सरकारला न्यायालयात खेचणार

आयआयटी आणि इतर केंद्रीय संस्थांमध्ये प्रवेशासाठी सन २०१३ पासून एकच समान प्रवेश परीक्षा घेण्याच्या सरकारच्या निर्णयास आयआयटी स्नातक संघटनेने विरोध दर्शवला असून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाविरुद्ध न्यायालयात धाव घेण्याचे ठरवले आहे. सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात त्यासंदर्भात याचिका दाखल होईल.

एलिना साल्ढाणा यांचे ८ रोजी शपथग्रहण

कुठ्ठाळी मतदारसंघातून बिनविरोध निवडल्या गेलेल्या भाजपच्या उमेदवार एलिना साल्ढाणा यांना येत्या ८ जून रोजी मंत्री म्हणून शपथ देण्यात येणार आहे. राजभवनवर संध्याकाळी ४ वाजता होणार्‍या एका सोहळ्यात एलिना साल्ढाणा यांना शपथ देण्यात येणार असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

भर पणजीत मंगळसूत्र हिसकावले

पणजी महापालिकेची एक सफाई कामगार संगीता बुदिहाल (सांतइनेज) हिच्या गळ्यातील मंगळसूत्र काल चोरट्यानी हिसकावून नेण्याची घटना कला अकादमीजवळ घडली.

डॉ. विल्फ्रेड मिस्किता अनिवासी भारतीय आयुक्तपदी?

अनिवासी भारतीय आयुक्तपद डॉ. विल्फे्रड मिस्किता यांना देण्यात येणार असल्याचे भाजपमधील सूत्रांनी काल सांगितले. दिगंबर कामत सरकार असताना एदुआर्द फालेरो हे अनिवासी भारतीय आयुक्त होते.

‘चौगुले’ उच्च माध्यमिकबाबत उपाययोजना तात्पुरती : सरदेसाई

चौगुले महाविद्यालय व्यवस्थापन व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची बैठक आके येथील भाई नायक यांच्या निवासस्थानी होऊन उच्च माध्यमिक विद्यालय चालू ठेवण्यास चौगुले व्यवस्थापन राजी झालेले असले तरी तो तात्पुरता उपाय असून मुख्यमंत्री पर्रीकर यांनी कायमचा तोडगा काढला असल्यास जाहीर करावा, असे आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अल्पोपाहार योजनेची कार्यवाही प्रभावी व्हावी!

- रमेश सावईकर

नवीन २०१२ - २०१३ या शालेय वर्षी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी अल्पोपाहार योजना गेल्या वर्षीप्रमाणेच कार्यान्वित करण्यात येणार आहे. या योजनेवर सुमारे १९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. गतसाली १ लाख ५० हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. केंद्र सरकारची ही योजना यशस्वीपणे राबविणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.

आर्थिक चिंता

यंदा पाऊस थोडा लांबणीवर पडणार असल्याचे दिसून आल्याने हवामानतज्ज्ञांमध्ये थोडी अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेली दोन वर्षे नेमाने येणार्‍या पावसाने यंदा विलंब लावला तर त्याचे सारे वेळापत्रकच विस्कटून जाईल आणि ज्या देशात साठ टक्के शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसलेले असतात, त्या भारतामध्ये असे पावसाचे वेळापत्रक विस्कटले तर त्याचा गंभीर परिणाम कृषी क्षेत्रावर होत असल्याने ही चिंता साहजिक आहे. गेली दोन वर्षे पाऊस वेळेवर आला, भरपूर झाला आणि त्यामुळे देशात अन्नधान्याचेही विक्रमी उत्पादन झाले. एकीकडे आर्थिक संकटांचे ढग देशावर दाटून आलेले असताना शेती क्षेत्रातील उत्साही वातावरणाने आपल्याला दिलासा दिला होता. यंदा पाऊस उशिरा येण्यापेक्षा ‘एल निनो’चा प्रभाव आपल्याकडच्या मोसमी पावसावर होण्याची धास्ती अधिक आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये कमालीची घसरण झाली आहे. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार त्यावर नियंत्रण ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची घसरण चालली आहे आणि सन २०११-१२ च्या अखेरच्या तिमाहीत राष्ट्रीय उत्पन्न विकास दर अवघ्या ५.३ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याचे दिसून आलेले आहे.

पुरातत्त्वशास्त्र एक परिचय

- वरद सुधीर सबनीस

‘संवर्धन’ या आस्थापनाद्वारे इतिहास, संस्कृती, पुरातत्त्व या विषयांवर संशोधन व ऐतिहासिक वारशाचे संवर्धन केले जाते. अभ्यासक्रमापलीकडे जाऊन या विषयांकडे ज्ञानपिपासू युवकांची पावले वळावीत व पुरातत्त्वशास्त्रासारखा संशोधनपर विषय पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या पलीकडे सामान्य लोकांपर्यंत पोचावा, यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कला आणि संस्कृती संचालनालय, गोवा सरकारच्या सहकार्याने ‘संस्कृती भवन’ पाटो- पणजी येथे दि. २५ ते २७ मे दरम्यान ही कार्यशाळा सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या वेळेत संपन्न झाली.

एज्यू नेक्स्ट : माहितीपूर्ण उपक्रम

- प्रा. रामदास केळकर

‘ऐकावे जनाचे करावे मनाचे|’ आपल्याला ज्यात आवड आहे, त्यातच करिअर करायला प्राधान्य द्यावे. पालकांनी याबाबत मार्गदर्शकाची भूमिका वठवावी. हे सर्व खडे बोल करिअर मेळाव्यात गोव्यातील विद्यार्थ्यांशी हितगूज साधताना आयआयटीयन मुख्यमंत्री पर्रीकरभाईंनी उपस्थितांना सुनावले. एस. एस. धेंपो वाणिज्य महाविद्यालय आणि नवहिंद टाइम्सतर्फे कला अकादमीत दोन दिवसीय ‘एज्यू नेक्स्ट’ अर्थात नव्या पिढीसाठी शिक्षण व व्यवसाय संधी यावर खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने तसेच विविध क्षेत्रांचा परिचय देणारे प्रदर्शन ही या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये असली तरी मुख्यमंत्री पर्रीकरांशी विद्यार्थ्यांचे हितगुज हे या उपक्रमातील खास वैशिष्ट्य ठरले.

चपयनृत्य

- लाडोजी परब

लोककला हा कोकणचा आत्मा आहे. लोककलेशिवाय कोकणची लोकसंस्कृती परिपूर्ण होत नाही. वेगवेगळ्या समाजाने लोकनृत्याचा हा वारसा जपला आहे. सिंधुदुर्गातील धनगर समाजही त्यापासून दूर नाही. ‘चपय नृत्य’ म्हणजे धनगर समाजाची एक ओळख आहे. बेभान होऊन केलेला नाच, उच्च स्वरातील देवाची आळवणी आणि मानवी थर रचून सादर केलेला कलाविष्कार हे सारं थक्क करणारं असतं. ढोल, घुमट, डफ, झांज, याती, सनई या पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर आणि पायामधील वाक्या घुंगरांच्या कान प्रसन्न करणार्‍या नादात धनगर बांधवांनी सादर केलेली एकापेक्षा एक सुरेख नृत्यं डोळ्यांचे पारणं फेडतात.

सुपरस्टार शाहरुख खान करणार धेंपो स्पोटर्‌‌स क्लबमध्ये गुंतवणूक

सुपरस्टार शाहरुख खान करणार धेंपो स्पोटर्‌‌स क्लबमध्ये गुंतवणूक

Story Summary: 

गोव्याशी आणि फुटबॉलशी जुळणार नाते

बॉलिवूडचा सुपरस्टार आणि नुकत्याच झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या कोलकता नाईट रायडर्स संघाचा एक मालक शाहरुख खान गोव्याच्या धेंेपो स्पोटर्‌‌स क्लब प्रा. लि. मध्ये आर्थिक गुंतवणूक करणार आहे. धेंपो उद्योग समूहाचे चेअरमन श्रीनिवास धेंपो यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. क्रीडा क्षेत्रावरील व फुटबॉलवरील प्रेमापोटीच शाहरुखने धेंपो स्पोटर्‌‌स क्लबमध्ये गुंतवणूक करण्यास रस घेतल्याचे श्री. धेंपो यांनी सांगितले.

शाहरुखचे क्रीडाप्रेम प्रसिद्ध असून आयपीएल स्पर्धेच्या संघाच्या मालकीमध्ये सहभाग घेऊन त्याने ते यापूर्वीच दाखवून दिले आहे. मात्र, आपला संघ विजेता झाल्याचे याचि देही याची डोळा पाहण्यास त्याला पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागली. ‘चक दे इंडिया’ या चित्रपटात शाहरुखने हॉकी प्रशिक्षकाचीही भूमिका बजावली होती. या सार्‍या पार्श्वभूमीवर त्याने फुटबॉलमध्ये रस घेणे अपेक्षितच होते, असे श्रीनिवास धेंपो यांनी सांगितले.

नर्सिंग महाविद्यालय स्थापण्याची घोषणा

Story Summary: 

दरवर्षी ५०० परिचारिकाची गरज असल्याचे सांगून त्यासाठी परिचारिकांसाठी नर्सिंग कॉलेज स्थापन करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.

गोव्यात स्वतंत्र्य वैद्यकीय मंडळ, डेन्टल मंडळ आहे तसेच नर्सिंग कॉऊंसिल तयार करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. यासंबंधीचा निर्णय येत्या विधानसभा अधिवेशनादरम्यान घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान नर्सिंग महाविद्यालयात ४ वर्षांचा अभ्यासक्रम असेल. त्यात पदवीधर पारिचारिका तयार होतील. गोवा सरकार व दोन खासगी नर्सिंग संस्थातून दरवर्षी ९० नर्सेस तयार होतात. ती संख्या फार कमी असल्याचे सरकारने हा विचार चालविल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर चौगुले उच्च माध्यमिकमध्ये प्रवेश सुरू

Story Summary: 

चौगुले महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने गेल्या एका वर्षापासून उच्च माध्यमिक विद्यालय बंद करण्याचा जो निर्णय घेतला होता तो काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व चौगुले महाविद्यालयाचे व्यवस्थापन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर व्यवस्थापनाने मागे घेतला व उच्च माध्यमिक सुरू करण्याचा निर्णय घेऊन आजपासून ऑन लाईन अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे जाहीर केले. या निर्णयाबद्दल माजी आमदार दामोदर नाईक यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी आमदार दामू नाईक, भाई उर्फ पांडुरंग नायक, चौगुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमाजी चौगुले, प्राचार्य डॉ. रमेश गावकर, प्रदीप महाले, भिकू पै आंगले व ऍड. माधव बांदोडकर यांची बैठक भाई नायक यांच्या निवासस्थानी झाली.

बाबा रामदेवना पाठिंब्यासाठी उद्या आझाद मैदानवर उपोषण

काळा पैसा व भ्रष्टाचार याच्या विरोधात रविवार दि. ३ जून रोजी स्वामी रामदेवबाबा हे दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषण व धरणे धरण्याचा कार्यक्रम करणार असल्याने त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी याच दिवशी भारत स्वाभिमान व युवा भारततर्फे सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या दरम्यान पणजीतील आझाद मैदानावर धरणे धरण्यात येणार असल्याचे काल भारत स्वाभिमान न्यासचे सहराज्य प्रभारी कमलेश बांदेकर व भारत स्वाभिमान न्यासचे राज्य तसेच केंद्रीय प्रभारी डॉ. सूरज काणेकर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले.

जन्म आणि मृत्यू दाखले आता तात्काळ

डिजिटलायझेशन करणार

सामान्य लोकांची होणारी अडचण लक्षात घेऊन जन्म आणि मृत्यूविषयक दाखले अर्ज केल्यानंतर त्याचदिवशी देण्याची सोय जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिकार्‍यांच्या कार्यालयात करण्यात आली असल्याचे काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य निबंधक, जन्म आणि मृत्यू आनंद शेरखाने यांनी सांगितले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात मुलांचा जन्म होत असून तेथे मरणार्‍यांची संख्याही मोठी असल्याने वरील दाखले मिळण्यासाठी लोकांची अडचण होऊ नये यासाठी अतिरिक्त तीन कर्मचार्‍यांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी पुढे बोलताना सांगितले.

अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी परेश प्रभू

राज्यातील पत्रकारांसाठीच्या राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी काल दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू यांची बिनविरोध निवड झाली. माहिती व प्रसिद्धी खात्याच्या कार्यालयात झालेल्या नव्या अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

चिखली येथे ट्रकखाली सापडून महिला ठार

चिखली-दाबोळी विमानतळ मार्गावरील जी. एस. एल. अधिकारी निवासी प्रवेशद्वारासमोर झालेल्या अपघातामध्ये ट्रकखाली सापडून वाडे येथील सौ. समिक्षा ब्रिजेश हळर्णकर ही महिला ठार झाली.

नोकर्‍यात सामावून घेण्यासाठी धरणे

नोकर्‍यात सामावून घेण्यास सरकारने नकार दिल्याच्या निषेधार्थ आरोग्य खात्यातील नोकर्‍यांसाठी प्रयत्न करणार्‍या सुमारे १०० विद्यार्थ्यांनी कालही मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर धरणे धरले.

साहित्य संमेलनासाठी ह. मो. मराठे रिंगणात

चिपळूण येथे होणार्‍या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मूळ गोमंतकीय असलेले ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार ह. मो. मराठे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.

गणेशपुरीतील संस्कारपीठ : श्री गणेश विद्यामंदिर

- उदय रवीन्द्र सामंत, तांबोसे - पेडणे

म्हापसा येथील गणेशपुरीत २००३ साली निवृत्त मुख्याध्यापिका सौ. अनुराधा कर्पे यांच्या घरात ‘गोवा विद्या प्रतिष्ठान’ या संस्थेने ‘विद्याभारती’ या अखिल भारतीय शैक्षणिक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली एक शिशुवाटिका सुरू केली. शिशुवाटिकेत दिल्या जाणार्‍या संस्कारक्षम तथा जीवनाभिमुख शिक्षणाने प्रभावित झालेल्या पालकांनी प्राथमिक शिक्षणाची सोय करा, असा आग्रह संस्थेकडे धरला आणि संस्थेने पालकांच्या आग्रहाला मान देऊन श्री. शशिकांत केरकर यांच्या घरात ‘श्रीगणेश विद्यामंदिर’ या नावाने प्राथमिक विभाग सुरू केला. पुढे शाळेविषयी पालकांच्या अपेक्षा वाढतच गेल्या. त्यामुळे माध्यमिक विभाग सुरू करावा असे संस्थेने ठरविले आणि ऍड. पांडुरंग बाणावलीकर यांच्या घरात २००९ मध्ये पाचवीचा वर्ग सुरू झाला. पुढे दरवर्षी साहजिकच सहावी व सातवी हे पुढील वर्ग सुरू झाले आणि आता येत्या शैक्षणिक वर्षापासून आठवीचा वर्ग सुरू होत आहे. सध्या या विद्यालयात माध्यमिक विभागात १५५, प्राथमिक विभागात ११४ आणि शिशुवाटिकेत ५२ विद्यार्थी मिळून एकूण ३२१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

भाजपाचे आत्मचिंतन

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये पक्षाध्यक्ष नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध जाहीर टीकाटिप्पणी केल्याचा विषय सध्या प्रसारमाध्यमांनी लावून धरलेला आहे. वास्तविक, अडवाणींच्या ब्लॉगमधील सोयिस्कर वाक्ये वेचून काढून त्यावरून हा वादंग माजवला गेला आहे आणि काही विशिष्ट हेतूने प्रेरित पत्रकार त्यामध्ये आघाडीवर आहेत हे वेगळे सांगायला नको. अडवाणींनी पक्षासाठी आत्मचिंतनाची गरज व्यक्त केली आहे हे खरे आहे. परंतु पक्षाने आत्मचिंतन करण्याची अडवाणींनी मांडलेली ही भूमिका काही एकाएकी मांडली गेलेली नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत आपण आत्मचिंतनाची ही गरज व्यक्त केलेली आहे असे अडवाणींनी त्या ब्लॉगमध्येच लिहिलेले आहे. म्हणजेच जाहीर टिप्पणी करण्याच्या आधी पक्षाच्या व्यासपीठावरून त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे. अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या मनात पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीविषयी थोडी अस्वस्थता निर्माण झाली तर त्यात वावगे म्हणता येणार नाही.