May 2012

राज्यात कडकडीत बंद

Story Summary: 

म्हापसा बाजारपेठेतील शुकशुकाट. (छाया : प्रणव)

राज्यात कडकडीत बंद

Story Summary: 

जनजीवन ठप्प

केंद्र सरकारकडून पुन्हा पुन्हा होत असलेल्या पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष व डाव्या पक्षांनी काल पुकारलेल्या ‘भारत बंद’ला गोव्यातही जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बहुतेक सर्व शहरांतील बाजारपेठा काल काही अपवाद वगळता पूर्णपणे बंद होत्या. खासगी वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. काही मोजक्या मार्गांवर कदंबच्या काही बसगाड्या धावल्या, परंतु प्रवाशांची नेहमीप्रमाणे वर्दळ नव्हती. सरकारी कार्यालये नाममात्र खुली होती, परंतु कर्मचार्‍यांच्या उपस्थितीवर मात्र मोठा परिणाम दिसून येत होता. रस्त्यांवर अडथळे उभे केलेले काही भाग वगळता अन्यत्र खासगी वाहतुकीवर मात्र बंदचा फारसा परिणाम दिसला नाही. परंतु बंदमुळे घरीच राहणे बहुतेकांनी पसंत केले. बंदमुळे पर्यटकांची मात्र मोठी गैरसोय झाली.

पणजीत शुकशुकाट

राजधानी पणजीत काल मासळी व भाजी मार्केटसह संपूर्ण बाजारपेठेत कडकडीत बंद पाळला गेला. पालिका मार्केटच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्यात आले होते. शहरातील पेट्रोल पंपही बंद ठेवण्यात आल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. पणजीसह तिसवाडी तालुक्यात बंदच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश गावकर यांनी सांगितले. पणजी - मडगाव मार्गावरील कदंब सेवा चालू राहावी यासाठी पोलिसांनी कदंब महामंडळाला आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरवल्याचे ते म्हणाले. कदंबची सेवा बंद पाडण्यासाठी सकाळी दहा - पंधरा जणांचा गट कदंब बसस्थानकावर आला होता. कदंबच्या नियंत्रण कक्षातील कर्मचार्‍यांना दमदाटी करून त्यांनी बस वाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तेथून परत पाठवल्याचे गावकर यांनी सांगितले.

झरेबांबरच्या पालयेकर कुटुंबावर नियतीचा घाला

Story Summary: 

भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील १० मृत्युमुखी

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीजवळील तवंदी घाटात काल झालेल्या भीषण दुर्घटनेत आंबेली - झरेबांबर येथील पालयेकर कुटुंबातील दहाजण काल मृत्युमुखी पडले. देवदर्शन आटोपून दोडामार्गकडे परतत असताना त्यांच्या टोयोटा फॉर्च्युनर व्हॅनचा पुढील टायर फुटल्याने रस्त्यावरील दुभाजक तोडून व्हॅन उलटल्याने ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये पाच मुलांचाही समावेश आहे. अपघातात केवळ एक महिला वाचली असून तिच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत.

आंबेली - झरेबांबर (दोडामार्ग) येथील प्रगतीशील शेतकरी व लाकडाचे व्यापारी प्रकाश पालयेकर हे आपली पत्नी, मुले व इतर कुटुंबियांसह पाच दिवसांपूर्वी नावेली - आमोणे येथील आपले मेहुणे श्यामसुंदर नाईक यांची जीए ०४ सी ६७७६ ही टोयोटा फॉर्च्युनर घेऊन हैदराबाद, शिर्डी व इतर ठिकाणी फिरून काल घरी परतणार होते.

मयेतील मंदिर व मठ फोडून लाखाचा ऐवज लंपास

Story Summary: 

सर्व पोलीस यंत्रणा डिचोली बंदमधील अडथळे दूर करण्यास गुंतलेली असल्याचा फायदा घेऊन काही अज्ञात चोरट्यांनी केळबाई देवस्थान व जवळच असलेल्या दोन मठातील दरवाजे फोडून ऐवज व रोख रक्कम मिळून सुमारे ८५ हजार रुपयांचे चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

डिचोलीचे पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर चोरीची घटना बुधवारी रात्रौ ७ ते पहाटे ५.३० या दरम्यान केळबाईवाईवाडा - मये येथील केळबाई देवस्थानात घडली. उपलब्ध माहितीनुसार पहाटे ५.३० वा. योगाभ्यास करण्यासाठी आलेल्या व्यक्तींना या घटनेची माहिती मिळाली. या प्रकरणाची माहिती शिवराम वझे यांनी पोलिसांना दिली.

५ पोलीस शिपाई निलंबित

ड्रग माफिया डूडू याच्या अंगावर अमली पदार्थ पेरून नंतर त्याला अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी अटक केल्याच्या आरोपाखाली परवा सीबीआयने अटक केलेल्या पाचही पोलीस शिपायांना काल सेवेतून निलंबित करण्यात आले.

‘त्या’ उमेदवारांचे आजपासून आल्तिनोवर पुन्हा धरणे

मागच्या सरकारने नियुक्ती पत्रे दिलेली असतानाही नवे सरकार कामावर घेत नसल्याच्या निषेधार्थ गेल्या बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी धरणे धरलेल्या उमेदवारांनी आज १ रोजी पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर धरणे धरण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळपासून हे उमेदवार धरणे धरणार असून उपोषणावर बसणार असल्याचे वृत्त आहे.

आज गोव्यासह भारत बंद

Story Summary: 

बंदच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत काल दाखल झालेले सुरक्षा रक्षक.

आज गोव्यासह भारत बंद

Story Summary: 

पेट्रोल दरवाढीच्या विरोधार्थ आज होऊ घातलेल्या देशव्यापी संपात गोवाही सहभागी होणार आहे. बंद गोव्यातही आयोजित करण्यात आलेला असून तो यशस्वी व्हावा यासाठी भाजप प्रयत्नरत असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले

बंद पाळण्यासाठी कुणावरही सक्ती करण्यात येणार नसून वाहतूक अडवली जाणार नसल्याचे भाजपने यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे.

दरम्यान, कदंबचे व्यवस्थापकीय संचालक वेरेनिसू फुर्तादो याना वाहतूक व्यवस्थेसंबंधी विचारले असता कदंबच्या बसेस चालू असतील अशी माहिती त्यानी दिली.

मतांसाठी युवकांना बोगस नियुक्तीपत्रे : पर्रीकर

Story Summary: 

भरती प्रक्रियेच्या चौकशीचे आदेश

दिगंबर कामत सरकारने निवडणूक आचारसंहितेचा भंग करून आरोग्य खात्यात जी नोकर भरती केली होती व ज्या उमेदवारांना नियुक्तीचे प्रस्ताव दिले होते त्या एकूण नोकर भरती प्रक्रियेची भ्रष्टाचारविरोधी विभागातर्फे चौकशी करण्याचे आदेश आपण दिले असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. युवकांनी कॉंग्रेस पक्षाला मते द्यावीत यासाठी त्याना बोगस नियुक्तीपत्रे देण्यात आल्याचेही यावेळी पर्रीकर यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळात जर कॉंग्रेसने कुणाला नियुक्तीपत्रे दिलेली असतील अथवा नोकरीचे आमिष देऊन फसवलेले असेल तर त्याना नोकरी देणे ही आपली जबाबदारी नाही. मात्र, २० डिसेंबरपूर्वी म्हणजेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ज्या उमेदवारांनी भरतीसाठीची सगळी प्रक्रिया पूर्ण केली होती व ज्यांच्याकडे ते सिद्ध करणारी आवश्यक ती सर्व कागदपत्रे आहेत अशा उमेदवारांना नोकर्‍यांत सामावून घेतले जाणार असून त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे ते म्हणाले.

‘विवेक’चे प्रबोधनकार्य कौतुकास्पद : आफळे

Story Summary: 

धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक विषय प्रबोधनाच्या रुपात मांडत असताना ‘विवेक’ विश्‍वासार्ह साहित्य, सज्जड पुरावा देत आला आहे. कीर्तनकार, प्रवचनकार आपल्या माध्यमातून ‘विवेक’च पोहचवत असतात. हिंदू धर्माची, संस्कृतीची दीव्य परंपरा आहे त्यावर जेथे जेथे आघात झाले त्याला परखडपणे उत्तर देण्यास ‘विवेक’ उभा राहिला आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी येथे केले. विवेक साप्ताहिकाच्या ‘गोवा व्हिजन २०२० विशेषांका’च्या प्रकाशन सोहळ्यात श्री. आफळे प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते.

गोवा विधानसभेचे सभापती राजेंद्र आर्लेकर याप्रसंगी अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, ‘विवेक’चे मुख्य संपादक दिलीप करंबेळकर, विवेक विशेषांकाचे अतिथी संपादक प्रा. भूषण भावे, संस्थेचे सदस्य सुभाष देसाई व नितीन फळदेसाई हे मान्यवर उपस्थित होते.

बेतोडा अपघातात दुचाकीचालक ठार

जमावाने ट्रक फोडला

काल सकाळी ८ च्या दरम्यान बेतोडा-फोंडा हमरस्त्यावर झालेल्या दोन वाहनांच्या भीषण अपघातात शैलेश काशिनाथ गावकर (२४) धाटवाडा-बेतोडा या युवकाचे जागच्या जागी दुर्दैवी मृत्यू झाला.

१ जूनपासून फ्रेंच चित्रपट महोत्सव

गोवा करमणूक सोसायटीने फ्रेंच दुतावासाच्या संयुक्त विद्यमाने १ ते ३ जून या दरम्यान मॅकेनिज पॅलेसमध्ये फ्रेंच चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले असून या महोत्सवात १ जून रोजी ‘चिकन विथ प्लम्स’, २ जून रोजी ‘बॅटर लाइफ’ व ‘डेिएकसी’ व ३ जून रोजी नो बडी एक्स बट यू’ व पॉलिन हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

अमली पदार्थ प्रकरणी ५ पोलिसांना अटक

ड्रग माफिया डूडू याच्या अंगावर अमली पदार्थ पेरून नंतर त्याला अमली पदार्थ जवळ बाळगल्या प्रकरणी अटक केल्याच्या आरोपाखाली काल सीबीआयने गोवा पोलीस दलातील ५ शिपायांना अटक केली.

आरोग्य खात्यात सत्तरीतील युवकांचीच भरती : वाघ

आरोग्य खात्यात नोकर भरती करताना दिगंबर कामत सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केलेला असून या खात्यात सत्तरी तालुक्यातील युवकांचीच खोगीर भरती करण्यात आल्याचे आढळून आले असल्याचे काल भाजपचे प्रवक्ते विष्णू सूर्या वाघ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

आंबेडकरांच्या व्यंगचित्राचा निरर्थक वाद

- रमेश भगवंत वेळुस्कर, पाळे - शिरदोन

भारतीय लोकसभेने १३ मे रोजी आपला साठावा वर्धापनदिन साजरा केला. लोकसभा हे भारताच्या सार्वभौमत्वाचे अधिष्ठान. तिथेच काही दिवसांमागे ज्यांच्या आधिपत्याखाली भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यंगचित्र (तसे पाहिल्यास या व्यंगचित्रात ज्या व्यक्तिमत्वांचा सहभाग आहे त्यात आंबेडकरांशिवाय पंडित नेहरू आणि जनता पण आहे. ) एन. सी. इ. आर. टी ने पाठयपुस्तकांत छापून त्यांचा अनादर केला अशी काही लोकप्रतिनिधींनी लोकसभेत आरडाओरड केली आणि याचा परिणाम म्हणून सहा वर्षांपासून भारताच्या लाखो शाळांनी करोडो विद्यार्थ्यांना शिक्षित करून गेलेले तसेच त्यांच्यातून लोकमन आणि लोकमत आकारास आणून दिलेले हे पाठयपुस्तक केंद्रीय मानव संसाधन मंत्री श्री कपिल सिब्बल एका दमात कायमचे बाद करून टाकले.

...तर ग्रामस्वराज्याची संकल्पना धोक्यात

- ऍड. शिवाजी य. देसाई, ब्रह्माकरमळी - सत्तरी

गोव्यातील पंचायत निवडणुका झाल्या आणि त्यानंतर मोठ्या चुरशीच्या वातावरणात सरपंच आणि उपसरपंच यांचीही निवडणूक पार पडली. सध्या अनेक पंचायतींचा कल सत्ताधारी पक्षाच्या बाजूने आहे. सरपंच आणि उपसरपंचपदांच्या निवडीत अनेक पंचायतींच्या पंचसदस्यांमध्ये ही पदे दीड - दोन वर्षांसाठी तर काही ठिकाणी अडीच वर्षे सत्ता उपभोगण्यासाठी अलिखित करार झाले आहेत. लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत धोकादायक आहे.

एकमुखी निषेध

पेट्रोल दरवाढीविरुद्ध राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि डाव्या पक्षांनी काल पुकारलेल्या देशव्यापी बंदला अपेक्षेनुसार बर्‍यापैकी प्रतिसाद मिळाला. पेट्रोलचे भाव देशात गगनाला भिडले आहेत. गोव्यामध्ये मूल्यवर्धित करात राज्य सरकारने कपात केलेली असल्याने आपल्याला थोडा दिलासा मिळालेला असला तरी काही राज्यांमध्ये ते प्रति लिटर पंच्याऐंशी रुपये पर्यंत गेलेले आहेत. स्वतःचे वाहन ही आजच्या काळातील अपरिहार्य अशी गोष्ट आहे. त्यामुळे पेट्रोलचे सतत वाढत चाललेले दर हा सामान्य जनतेला फार मोठा फटका असतो. त्यामागचे आंतरराष्ट्रीय दरांतील चढउतारांचे गणित अर्थमंत्र्यांनी कितीही समजावून दिले आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या चढत्या तोट्याविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा जरी प्रयत्न केला, तरी या सार्‍याची झळ या देशातील सर्वसामान्य जनतेनेच का सोसायची या आम आदमीच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मात्र कोणी तयार नाही. एकीकडे कोट्यवधी, अब्जावधींचे प्रचंड घोटाळे सर्रास सुरू आहेत आणि दुसरीकडे सर्वसामान्य जनतेच्या, मध्यमवर्गीयाच्या खिशातून कररूपाने आणि भाववाढीद्वारे पैसा ओरबाडला जातो आहे.

सद्गुरू

सद्गुरू वामनराव पै गेले. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ या संतवचनाचा प्रत्यय देत ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा साधा, सोपा गुरूमंत्र देऊन हजारोंच्या जीवनप्रवासाला अध्यात्माची योग्य दिशा देणारे वामनराव आधुनिक काळातील संतपुरूष होते. एखाद्या ज्ञानदीपासारखे ते सर्वसामान्यांच्या जीवनातील अंधार उजळत तेवत होते. प्रारब्धवाद आणि पलायनवादापेक्षा प्रयत्नवादाची कास धरा असा त्यांचा संदेश होता. मात्र केवळ कर्म करीत राहणे म्हणजे कर्मयोग नव्हे. तसे असते तर गाढव आणि बैल हे सर्वांत मोठे कर्मयोगी ठरले असते असे ते म्हणत. आपल्या नशिबाचे शिल्पकार आपणच असतो असे सांगत परमेश्वर हा कधी कृपा वा कोप करीत नसतो, तर स्वकर्मानुसारच आपल्याला बरेवाईट फळ मिळत असते असे सांगण्याचे धाडस त्यांनी दाखवले. जसे आपले मन, तसेच तन, जन आणि जीवन अशी शिकवण त्यांनी दिली. संतती, संपत्ती, संगती, आरोग्य आणि ईश्वर हे सुखी जीवनाचे पंचशील सांगितले.

योंगमार्ग - राजयोग (योगसाधना: १३०) (अस्तेय : १३)

- डॉ. सीताकांत घाणेकर

परमेश्‍वराने सुंदर सृष्टी निर्माण केली, त्यात इतर प्राणी, पशू-पक्ष्यांबरोबर मानवाचा देखील सहभाग केला. सर्वांनी चांगले जगावे, आनंदाने रहावे म्हणून वृक्ष-वल्ली, डोंगर-पर्वत, नाले-नद्या-समुद्र देखील तयार केले. पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून ढग निर्माण केले व पाऊस दिला. हे जास्त पाणी भूमीत साठवून ठेवले, सर्वांच्या अन्न पाण्याची व जीवनाची उत्कृष्ट अशी व्यवस्था सृष्टिकर्त्याने करून ठेवली.

गोल छिद्रं अन् चौकोनी खुंट्या..

- प्रा. रमेश सप्रे

मराठीत एक मजेदार म्हण आहे, ‘आग रामेश्‍वरी, बंब सोमेश्‍वरी.’

पूर्वीच्या एका विनोदी हिंदी चित्रपटात एक गाणं होतं, ‘जाते ये जापान, पहुँच गये चीन, समझ गये ना?’

इंग्रजीत एक सुंदर शब्दप्रयोग आहे, ‘स्क्वेअर् पेग्ज इन राउंड होल्स’(म्हणजे गोल छिद्रात चौकोनी खुंट्या)!’

या सार्‍याचा तसा आजच्या विषयाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आहे. एकूण अर्थ काय तर समस्या एका ठिकाणी, पण त्याचं उत्तर शोधायचं दुसर्‍या ठिकाणी. किंवा क्षमता (ऍबिलिटी) एका प्रकारची आणि संधी शोधायची दुसर्‍या प्रकारची. यामुळे होतं काय की आपण भलत्याच ठिकाणी पोचतो. नको ते करत राहतो. नको ते शिकत राहतो ...यातून निर्माण होतात ताण - निराशा अन् वैफल्य!

संबंधित पदांसाठी पुन्हा प्रक्रिया : मुख्यमंत्री

Story Summary: 

आल्तिनो येथे जमलेल्या उमेदवारांशी चर्चा करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. (छाया : नंदेश कांबळी)

भरती प्रक्रिया रोखल्याने फटका बसलेल्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

Story Summary: 

संबंधित पदांसाठी पुन्हा प्रक्रिया : मुख्यमंत्री

कॉंग्रेस सरकारने निवडणुकीच्या तोंडावर नोकर्‍यांसाठी निवड केलेल्या व नंतर आचारसंहिता लागू झाल्यामुळे नियुक्तीपत्रे मिळू न शकलेल्या सुमारे ३०० उमेदवारांनी काल आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी धाव घेऊन आपणाला नियुक्तीपत्रे देण्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी केली.

मात्र, भरतीसाठीची ही एकूण प्रक्रियाच योग्य प्रकारे झाली नसल्याने संपूर्ण प्रक्रियाच पुन्हा हाती घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या उमेदवारांनी आज ३० रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्नाटक पोलिसांच्या जीपमधून दारु व पेट्रोलची चोरटी वाहतूक

Story Summary: 

उपनिरीक्षक व जीपचालकास अटक

रामनगर पोलीस चौकीच्या जीपमधून अनधिकृतपणे पेट्रोल व दारुच्या बाटल्या घेऊन जाताना रामनगर पोलीस चौकीतील उपनिरीक्षक बाबू दुगाप्पा माधव (५९) व जीपचालक यल्लापा महादेव कारवाड (३७) यांना मोले अबकारी खात्याच्या अधिकार्‍यांनी काल सकाळी ९.३० वा. मोले चेकनाक्यावर मुद्देमालासह अटक केली. जीपही ताब्यात घेण्यात आली आहे.

रामनगर पोलीस चौकीची जीप गोव्याहून कर्नाटकच्यादिशेने जात होते. ती मोले चेकनाक्यावर पोचली असताना मोले अबकारी खात्याने जीपची झडती घेतली. त्यावेळी या जीपमध्ये पेट्रोलचे तीन भरलेले कॅन (सुमारे ७५ लिटर्स) त्याशिवाय २८ बाटल्या रॉयल स्टॅग व्हिस्की, १२ बाटल्या मेकडॉनल व्हिस्की, दोन बाटल्या रॉयल व्हिस्की, एक बाटली ओल्ड मॉन्क रम, एक बाटली हेवडर्‌‌स व्हिस्की, १२ बाटल्या बियरीच्या बाटल्या, पाच बाटल्या काजू फेणी एवढी दारू आढळली.

उद्याच्या ‘भारत बंद’मध्येगोवाही सहभागी : मिस्किता

Story Summary: 

केंद्रातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने पेट्रोलचे दर लिटर मागे ७.५० रु. नी वाढवल्याच्या निषेधार्थ भाजप नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने उद्या ३१ मे रोजी देशव्यापी बंदची जी हाक दिली आहे त्यात गोवाही सहभागी होणार असल्याचे भाजपचे प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या दरम्यान हा बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

सरकारने पेट्रोलच्या दरात केलेली वाढ ताबडतोब मागे घ्यावी या मागणीसाठी तसेच यूपीए सरकारने जी चुकीची आर्थिक धोरणे अवलंबिलेली आहेत, त्यावर आवाज उठवण्यासाठी तसेच महागाई नियंत्रणात आणून आम जनतेला दिलासा द्यावा अशी सूचना केंद्राला करण्यासाठी या देशव्यापी बंदचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉ. मिस्किता यांनी सांगितले.

आरोप सिद्ध केल्यास राजकारण सोडीन : पंतप्रधान

टीम अण्णाने केलेले भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करून दाखविल्यास सार्वजनिक जीवनातून सन्यास घेईन असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काल म्यानमारहून परततना विमानात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जीवनविद्या मिशनचे संस्थापक वामनराव पै यांचे निधन

जीवनविद्या मिशनचे संस्थापक सदगुरू वामनराव पै यांचे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास मुंबईत निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. आपल्या प्रवचनांनी त्यांनी अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणला होता.

माध्यमप्रश्‍न ३ जूनपर्यंत सोडवणार : पर्रीकर

युवा सृजन पुरस्कारांचे वितरण

बहुचर्चित व अत्यंत वादग्रस्त ठरलेला माध्यम प्रश्‍न आपण येत्या ३ जूनपर्यंत सोडवणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल कला अकादमीत युवा सृजन पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सांगितले.

जीसीएची २५ जुलैला निवडणूक

विनोद फडके यांची घोषणा

गोवा क्रिकेट असोसिएशनची निवडणूक होऊन आपल्या अध्यक्षतेखाली नवी समिती निवडल्याचा दयानंद नार्वेकर यांचा दावा फेटाळून लावताना विनोद ऊर्फ बाळू फडके यांनी काल जीसीए निवडणूक २५ जुलै रोजी होणार असल्याची घोेषणा केली.

दहावीचा निकाल ४ जून रोजी

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गेल्या मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल येत्या ४ जून रोजी सकाळी ११ वा. जाहीर करण्यात येणार आहे.

स्यू की यांना भारतभेटीचे निमंत्रण

म्यानमार भेटीस गेलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काल नोबेल पारितोषिक विजेत्या म्यानमारमध्ये लोकशाहीच्या पुरस्कर्त्या आणि सध्या तेथील विरोधी पक्ष नेत्या आंग सान स्यू की यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी स्यू की यांना यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावतीने भारतभेटीचे निमंत्रणही दिले.

परीवर्तनातून सुवर्णमयी गोवा साधणार : पर्रीकर

घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आजच्या रौप्यमहोत्सवी घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा देताना परिवर्तनातून सुवर्णमयी गोवा साधण्याचा संकल्प आपल्या संदेशात व्यक्त केला आहे.

बार्देश व डिचोलीत मर्यादित पाणीपुरवठा

घटक राज्य झाले, पण...

- दिलीप बोरकर

आज गोव्याचा घटक राज्य दिन. फक्त घटकराज्य दिनच नसून रजतमहोत्सवी वर्षाचाही दिवस. पण या दिनाची आठवण आणि महत्त्व आमच्यापैकी किती गोमंतकीयांना आहे? आज जर सार्वजनिक सुट्टी वगैरे असती तर, एकवेळ लोकांना घटकराज्य दिनाचे महत्त्व तरी कळले असते. पण घटकराज्याचा दर्जा मिळाल्याने आता गोव्याचे खोबरे होणार, आम्हा गोमंतकीयांना केंद्रशासीत प्रदेशच बरा होता. गोवा चालविण्यासाठी केंद्राकडून अनुदान तरी मिळत होते. असा विचार करणार्‍या परावलंबी, स्वाभिमानशून्य गोमंतकीयांकडून घटकराज्या बाबतीत विशेष अपेक्षा बाळगणेही निरर्थकच आहे. तरीसुध्दा गोव्याला घटकराज्याचा दर्जा मिळाल्याने गोमंतकीयांचा मानसन्मान वाढलेला आहे. आता आमच्या राज्यकर्त्यांनी घटकराज्याचे ‘घट्टाण राज्य’ करून टाकले त्याला कोण काय करणार?

परिवर्तन दिसावे

दीर्घकाळ विशिष्ट कोंडाळ्याच्या हाती सापडलेल्या अनेक ग्रामपंचायतींमध्ये यावेळी नव्या चेहर्‍यांचे अस्तित्व जाणवू लागले आहे. नुकत्याच झालेल्या सरपंच, उपसरपंचपदांच्या निवडणुकांत निवडून आलेले बहुतेक म्होरके आपल्या पक्षाचेच असल्याचा दावा भाजपा नेते करीत आहेत. खरे तर अशा दाव्यांना काही अर्थ नसतो. उगवत्या सूर्याला दंडवत घालणार्‍यांचीच चलती असलेल्या आजच्या काळात सत्ताधारी पक्षाच्या बाजूने राहण्यात शहाणपण आहे असे मानणारी यातील बहुतेक मंडळी आहेत. त्यामुळे पंचायतींमधील या यशाने भाजपाने हुरळून जाण्याचे काही कारण नाही. काही वर्षांपूर्वी भाजपा म्हटले की नाके मुरडणारी मंडळी आज स्वतःला पक्षाचे निष्ठावंत म्हणून मिरवताना सर्रास दिसतात. हा सारा सत्तेचा महिमा आहे. बहुतेक पंचायती आपल्या पक्षाच्या हाती आल्या म्हणजे परिवर्तन झाले असे म्हणणार्‍यांनी या पंचायतींमध्ये खर्‍या अर्थाने कामकाजात परिवर्तन दिसावे या दृष्टीने प्रयत्न केले तर ते अधिक उचित ठरेल. राज्यातील पंचायती या अविश्वास ठरावांचे पोरखेळ खेळण्याची ठिकाणे झालेली आहेत.

नवी समिती निवडल्याचा नार्वेकरांचा दावा

Story Summary: 

नार्वेकरांनी दावा केलेले त्यांच्या अध्यक्षतेखालील जीसीएचे नवे कार्यकारी मंडळ. (छाया : प्रणव फोटो)

११८६ पोलिसांची भरती करणार

Story Summary: 

राज्यात पोलिसांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे दिसून आल्याने ४५ पोलीस उपनिरीक्षकांसह ११८६ पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विविध सरकारी इस्पितळांत परिचारिकांची उणीव दिसून आल्याने प्राधान्यक्रमाने ३०० परिचारिकांची भरती करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

१४० पंचायतींवर भाजपचे सरपंच, उपसरपंच : पार्सेकर

Story Summary: 

राज्यभरातील १८५ पंचायतींपैकी १४० पंचायतींवर भाजप समर्थक सरपंच व उपसरपंचाची निवड झाली असल्याचे पंचायत मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या १६ मे रोजी झालेल्या पंचायत निवडणुकीतही लोकांनी भाजप समर्थक उमेदवारांची मोठ्या संख्येने पंच म्हणून निवड केली होती, असे सांगून त्यामुळे बहुतेक पंचायतींवर भाजप समर्थक सरपंच व उपसरपंचाची निवड होणार हे त्याचवेळीच निश्‍चित झाले होते, असे ते म्हणाले.

जीसीए निवडणुकीसंदर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Story Summary: 

जीसीएच्या निवडणुकीसंदर्भात सलग्न क्लबांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांनी फेटाळून लावली व जीसीएच्या व्यवस्थापकीय समितीची निवडणूक पुढे ढकललेली बरी असे म्हटले आहे.

गेल्या गुरुवार दि. २४ मे रोजी उभय पक्षाचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवाडा सोमवार दि. २८ मे पर्यंत राखून ठेवला होता. दरम्यान, जीसीएच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष ऍड. दिलीप दाभोळकर यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करीत नवीन व्यवस्थापकीय समिती बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. तसे प्रतिज्ञापत्र ऍड. दाभोळकर यांनी उत्तर गोवा जिल्हा न्यायालयात सादर केले.

आयआयटी, एनआयटीसाठी आता एकच प्रवेश परीक्षा

१२ वीच्या गुणांचाही विचार होणार

२०१३पासून केंद्राकडून अनुदानित सर्व तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमांसाठी एकच प्रवेश परीक्षा ठेवण्यात येणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने ठरविले आहे. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या आयआयटी आणि एनआयटी अभ्यासक्रमांचाही यात समावेश करण्यात येईल. याशिवाय प्रवेश देताना १२वीचे गुणही विचारात घेतले जाणार आहेत.

पाणी पुरवठ्याचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

जलवाहिनीत झालेला बिघाड व परिणामी पणजीसह आसपासच्या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पाण्याअभावी जनतेचे झालेले हाल या पार्श्‍वभूमीवर काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजी व आसपासच्या भागातील पाणी पुरवण्याची पाहणी केली. तसेच लोकांना व्यवस्थितपणे पाणी पुरवठा व्हावा यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकार्‍यांना दिले.

जगनमोहन रेड्डीना १४ दिवस न्यायालयीन कोठडी

बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी सीबीआयने परवा अटक केलेले वायएसआर कॉंग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांची काल सीबीआय कोर्टाने ११ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

भारताकडून म्यानमारला ५०० दशलक्ष डॉलर्सची पत हमी

म्यानमार भेटीवर गेलेल्या भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काल म्यानमारचे राष्ट्रपती थेन सेन यांच्याशी चर्चा केली. उभय राष्ट्रांत हवाई वाहतूक, सीमासहकार्य आदी विषयांवर अनेक करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या. यावेळी म्यानमारला ५०० दशलक्ष डॉलर्सची पत हमी देण्यासह भारताने मान्यता दर्शविली.

भारतीय गुन्हेगारांच्या हस्तांतरणावर पाकचा विचार

पाकिस्तानात असलेल्या भारतीय गुन्हेगारांच्या हस्तांतरणासाठी करार करण्याच्या भारत सरकारच्या मागणीवर विचार करणार असल्याचे पाकिस्तानने म्हटले असल्याचे गृह सचिव आर. के. सिंग यांनी सांगितले.

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ भाजयुमोची ‘सायकल रॅली’

केंद्रातील कॉंग्रेस नेतृत्वाखालील यूपीए सरकारने पेट्रोलचे दर ७.५ रु. नी वाढवल्याच्या निषेधार्थ काल भारतीय जनता युवा मोर्चाच्या सुमारे १०० कार्यकर्त्यांनी पणजी शहरातून सायकल रॅली काढून निषेध व्यक्त केला.

कॉंग्रेसचे, घालीन लोटांगण, वंदिन चरण...!

- रमेश सावईकर

विरोधी कॉंग्रेस पक्षाने राज्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षापुढे सपशेल नांगी टाकून विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने पक्ष किती डबघाईला आलेला आहे हे सिद्ध करून दाखवले आहे. राजकीय पराभवामागच्या सत्य परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर मिमांसा करून पक्ष पुनश्‍च कसा सशक्त, एकसंघ होईल यासाठी पावले उचलण्याऐवजी अंतर्गत हेवेदावे वाढविणे, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे आणि त्यामुळे उद्भवणार्‍या परिस्थितीचे खापर दुसर्‍यावर फोडणे हाच उद्योग करण्यात सध्या कॉंग्रेसची काही नेतेमंडळी व्यस्त झाल्याचे दिसत आहेत. अत्यंत लाजिरवाण्या राजकारणाचे हे चित्र आहे. ते निर्माण करण्यास जे जबाबदार आहेत, ठरतील, त्यांचे दिवस ‘भरत’ आले आहेत असेच म्हणावे लागेल. विरोधी कॉंग्रेसची राजनिती भरकटत चालली आहे. ना दिशा ना ध्येय! अशी दयनीय अवस्था कॉंग्रेस नेत्यांची झाली आहे. अगदी ताजे नि महत्त्वपूर्ण उदाहरण द्यायचे झाल्यास कुठ्ठाळी विधानसभा पोटनिवडणुकीचे देता येईल. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार श्रीमती एलिना साल्ढाणा तेथे बिनविरोध निवडून आल्या. कॉंग्रेसचे उमेदवार रेमंड डिसा आणि अपक्ष उमेदवार रमाकांत बोरकर यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी मागे घेऊन एलिना साल्ढाणा यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला. विरोधी पक्षाच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेऊन सत्ताधारी पक्षाची बिनविरोध निवड होण्यास हातभार लावण्याची कुठ्ठाळी पोटनिवडणूक ही बहुधा पहिलीच घटना असावी. श्री. रेमंड डिसा यांनी अर्ज मागे घेण्यासंदर्भात जी चर्चा झाली, त्यावरून तसे घडण्यास कोण कारणीभूत होते किंवा ठरले यापेक्षा एकूण परिस्थितीचा अंदाज घेता या घटनेशी सर्व संबंधित (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष) राजकीय मंडळींनी सारवासारव करण्याशिवाय दुसरे काहीच केलेले नाही.

रेड्डींचा डाव

जगन्मोहन रेड्डींमागे कॉंग्रेसने लावून दिलेेले सीबीआयचे शुक्लकाष्ट अखेर त्यांना गजांआड घेऊन गेले. जगन्मोहन आपले पिता वाय. एस. आर. रेड्डींप्रमाणे कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिले असते तर सीबीआयतर्फे बेहिशेबी संपत्तीचा हा असा तपास झाला असता का आणि त्यांची अटक ओढवली असती का हा प्रश्नच आहे. केवळ कॉंग्रेस पक्षनेतृत्वाला न जुमानता जगन्मोहन यांनी टाकलेली एकेक पावलेच त्यांच्यावरील या कारवाईस कारणीभूत आहेत. आज जगन्मोहन वायएसआर कॉंग्रेसचे नेतृत्व करीत आहेत. आंध्र प्रदेशमधील १८ मतदारसंघांतील पोटनिवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे जगन्मोहन यांचाच काटा काढला की वायएसआर समर्थकांना नेतृत्वहीन करून आपल्याला पुढे मुसंडी मारता येईल अशा भ्रमात कॉंग्रेस आहे. वायएसआर रेड्डी यांचे आंध्रमधील उत्तुंग नेतृत्व कॉंग्रेसनेच तर वाढू दिले. तेव्हा वायएसआर ही कॉंग्रेसची गरज होती. तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी हैदराबादच्या बाहेरच्या उजाड, खडकाळ पहाडावर सायबराबाद वसवले, परंतु त्या सायबराबादचे हैदराबादेच्या आम जनतेशी काही देणेघेणे नव्हते. वायएसआर रेड्डींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने आम आदमीचा धोशा लावून आंध्रमध्ये पाय रोवले.

नाईट रायडर्सचे स्वप्न साकार

Story Summary: 

आयपीएल विजेते ठरलेल्या कोलकोता नाईट रायडर्सचे खेळाडू जल्लोष करताना.

राज्यातील १८५ सरपंच, उपसरपंचांची आज निवड

Story Summary: 

राज्यातील १८५ पंचायतींवर आज सरपंच व उपसरपंच निवडले जाणार असल्याची माहिती पंचायत संचालक मिनिनो डिसोझा यांनी काल दिली.

निवड झालेल्या सर्व सरपंच व उपसरपंचांचा परवा बुधवार दि. ३० रोजी गटविकास अधिकार्‍यांच्या कार्यालयात शपथविधी होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

पंचायत निवडणुका राजकीय पक्षांच्या बॅनरखाली लढविण्यात येत नसल्या तरी प्रत्येक आमदाराने आपापल्या मर्जीतील उमेदवारांना पंच म्हणून निवडून आणले होते.

सर्वच शाळांना मिळणार ‘बालरथ’

Story Summary: 

उच्च माध्यमिक विद्यालयांनाही योजनेचा लाभ

राज्यातील सर्व अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांना यापुढे शिक्षण खात्यातर्फे बसेस पुरवण्यात येणार असून ज्याना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या विद्यालयांना शिक्षण खात्याकडे अर्ज करावा लागेल, असे शिक्षण खात्याचे उपसंचालक अनिल पवार यांनी काल सांगितले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अंदाजपत्रकात राज्यातील सर्व विद्यालयांना बसेस् पुरवण्याची घोषणा केली होती व त्या पार्श्‍वभूमीवरच शिक्षण खात्याने काल परिपत्रक काढल्याचे अनिल पवार यानी सांगितले. राज्यातील सर्व अनुदानित विद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालये तसेच विशेष मुलांसाठीची विद्यालये याना या बसेस् देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. किती विद्यालयांकडून अर्ज येतात त्यानुसार बसेस् मागवण्यात येणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले.

सीबीआयकडून तीन दिवस चौकशीनंतर बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी खा. जगनमोहन रेड्डी यांना अटक

Story Summary: 

संपूर्ण आंध्रात पोलिस सतर्क

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी तीन दिवस कसून चौकशी केल्यानंतर सीमीआयने काल वायएसआर कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना काल रात्री अटक केली. त्यांना अटक करण्यापूर्वी संपूर्ण आंध्र प्रदेशातील प्रमुख शहरांत आणि नगरांमध्ये सुरक्षा कडक करण्यात आली होती.

जगनमोहन हे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर चंद्रशेखर रेड्डी यांचे सुपूत्र आहेत. आज त्यांनी विशेष सीबीआय कोर्टात उपस्थित करण्यात येणार आहे.

त्यांच्या अटकेनंतर वायएसआर कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या आक्रमक प्रतिक्रियांची शक्यता असल्याने सुरक्षा रक्षकांनी काल काही प्रमुख शहरांत ध्वजसंचलन केले. शिवाय अनेक संवेदनशील भागांत सक्तीने दुकाने बंद करायला लावली. आंध्र प्रदेश परिवहन मंडळालाही बससेवा मर्यादित करण्यास सांगण्यात आले आहे.

मोदींवरील टीकेस भाजपचा आक्षेप

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नाझीकाळातील मंत्री जोसेफ गोबेल्स यांच्याशी केलेल्या तुलनेबद्दल भाजपने तीव्र आक्षेप घेत कॉंग्रेसला धारेवर धरले. कॉंग्रेसची ही तुलना मानहानीजनक आणि निषेधार्य असल्याचेही भाजपने म्हटले.

पंतप्रधान महत्वपूर्ण म्यानमार भेटीस रवाना

पंतप्रधान मनोमोहन सिंग काल म्यानमारच्या तीन दिवसीय भेटीवर रवाना झाले. तब्बल २५ वर्षांच्या कालखंडानंतर भारतीय पंतप्रधानांची ही म्यानमार भेट आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची लवकरच फेररचना

गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झालेला असला तरी त्या पराभवाने आम्ही खचून गेलेलो नसून लवकरच नव्याने पक्षाचे कार्य हाती घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुरेंद्र सिरसाट यांनी काल सांगितले.

केपे पोलीस करणार भाडेकरूंची तपासणी

परप्रांतियापासून होणारी गुन्हेगारी कृत्ये थांबवण्यासाठी केपेत प्रत्येक भाडेकरूची कडक तपासणी व नोंद ठेवली जाणार असून याकामी पोलिस अधिकारी, पालिका कर्मचारी, नगरसेवक अथवा पंच असे पथक पालिका व पंचायत क्षेत्रात काम करणार असून भाडेकरूची माहिती न पाठवणार्‍या घर मालकावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी महेश गांवकर यांनी केपे येथे बोलताना सांगितले.

मोबाईल चोरांची टोळी गजांआड

Story Summary: 

पोलिसांनी पकडलेले संशयित चोरटे. (छाया : गणादीप शेल्डेकर)

टीम अण्णाकडून पंतप्रधानांसह १५ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

Story Summary: 

टीम अण्णाकडून काल पंतप्रधान व अन्य १४ केंद्रीय मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले असून सरकारने मात्र हे आरोप साधी दखल घेण्यासारखेही नसल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत.

विशेष म्हणजे टीम अण्णाकडून पहिल्यांदाच पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आरोप झाले आहेत. १५ जणांची चौकशी न केल्यास बेमुदत उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.

कोळसा मंत्रालय पंतप्रधानांकडे होते त्या काळातील खात्याबाबत केलेल्या ‘कॅग’च्या टिप्पण्यांच्या आधारे हे आरोप करण्यात आल्याचे टीम अण्णाने म्हटले आहे. नोव्हेंबर २००६ ते मे २००९ या काळात कोळसा मंत्रालय मनमोहन सिंग यांच्याकडे होते. या काळात काही कोळसा खाणींचे परवाने बोली न लगावता थेट देण्यात आले त्यामुळे सरकारी तिजोरीला नुकसान सोसावे लागले व ‘निवडक’ कंपन्यांना भरमसाठ फायदा झाल्याचे म्हटले आहे.

मराठी चित्रपट महोत्सव ८ जूनपासून पणजीत

Story Summary: 

गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन येत्या ८ जून रोजी होणार असल्याची माहिती या महोत्सवाचे संयोजक ज्ञानेश मोघे यांनी काल दिली.

८ ते १० जून असे तीन दिवस चालणार्‍या या महोत्सवाचा शुभारंभ नितीन देसाई यांच्या बहुचर्चित ‘अजिंठा’ या चित्रपटाने होणार असल्याचे ते म्हणाले. शुक्रवारी संध्याकाळी ६ वा. कला अकादमीत ‘अजिंठा’ या चित्रपटातील कलाकारांच्या वेशभूषेच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर ६.३० वा. चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपस्थित असतील.

मोबाईल चोरांची टोळी गजांआड

Story Summary: 

मडगाव, वास्को व गोव्यातील विविध ठिकाणी लॅपटॉप व मोबाईल संचांची चोरी केल्याप्रकरणी कोलकाता येथील हसन उर्फ मुनीर मुझामक शेख (३०), उज्जत मुजामल शेख (३८) व अब्दुल फैयाज शेख (२५) या तिघा जणांच्या टोळीला मडगाव पोलिसांनी अटक करून दोन लॅपटॉप व ७ मोबाईल हस्तगत केले. किंमत १.५ लाख असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हसन व उज्जत या दोघांना काल पहाटे जुवारीनगर येथे छापा टाकून तर अब्दुल याला उसगाव येथे छापा टाकून पकडले. चार दिवसांमागे कोंब मडगाव येथील पृथ्वी एपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून चोरी करताना लोकांनी पकडलेल्या शेख मुस्ताकीन अंजूमल व नेवरीन हनीफ शेख या दोघांकडून सोन्याचे दागिने हस्तगत केले होते. त्याच टोळीतील काल पकडलेले तिघेजण आहेत व हे सर्व कोलकाता येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चेन्नई-कोलकाता झुंज रंगणार

सलग दोन वेळचा चेन्नई सुपर किंग्ज आणि प्रथमच अंतिम फेरी गाठलेला कोलकाता नाइटरायडर्स या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांत आज येथील चेपॉक स्टेडियमवर इंडियन प्रिमियर लीग अजिंक्यपदासाठी अंतिम मुकाबला होईल.

आजपासून सुरळीत पाणीपुरवठा

करमळी येथे फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यात आलेली असून आज रविवारपासून पणजी व आसपासच्या भागांना सुरळीतपणे पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा खात्यातील सूत्रांनी काल सांगितले.

पर्यटकांकडून कोकेन जप्त

पेडणे पोलिसांची कारवाई

हरमल व मोरजी किनारी दोघा विदेशी पर्यटकांकडून काल शनिवार दि. २६ रोजी ५५ हजार रु.ची कोकेन पेडणे पोलिसांनी जप्त केली.

पोलिसांवरील हल्लाप्रकरणी तिघांना शिताफीने अटक

उसप येथे काल पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी काल डिचोली पोलिसांनी धडक कारवाई करताना सायंकाळी पाचच्या दरम्यान पोलीस कुमक नेऊन तिघाजणांना शिताफीने अटक केली असून गावात सुमारे ५० पोलिसांचा फौजफाटा पोहचताच तेथे पळापळी सुरू आल्याची माहिती पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांनी दिला.

वारखंड येथे काजू बागायतीस आग; ५ लाखांचे नुकसान

तुळस्करवाडी-वारखंड-पेडणे येथील काजू बागायतीला आग लागून पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकर्‍यांनी दिली.

आगीच्या वणव्यात काजूच्या झाडाबरोबर फणस, जांभळ, सागवान आदि झाडेही जळून गेली. उपजिविकेचेच साधक नष्ट झाल्याने हे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पंतप्रधानांची राष्ट्रपतींशी भेट

राजकीय, आर्थिक विषयांवर चर्चा

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काल राष्ट्रपती प्रतिभासिंग पाटील यांची भेट घेऊन देशातील आर्थिक आणि राजकीय प्रश्‍नांबाबत चर्चा केली. सुमारे ४० मिनिटांची ही भेट होती.

‘गोव्यातून निर्यात वाढविण्यास वाव’

गोव्यातून होणारी निर्यात ही अत्यंत निराशाजनक असून एकूण राष्ट्रीय निर्यातीपैकी गोव्याची निर्यात ही फक्त ०.७ टक्के एवढी आहे. येणार्‍या काळात गोव्याला किमान २ टक्के एवढ्या निर्यातीचे उद्दिष्ट गाठायचे झाल्यास त्यासाठी गोवा सरकारला आपले निर्यात उत्तेजन धोरण आखावे लागेल, असे भारतीय निर्यात महासंघाचे अध्यक्ष रफिक अहमद यांनी काल कांसावली येथील पंचतारांकित हॉटेलात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले.

‘जळता गोमंतक’ पुन्हा रंगमंचावर

३१ रोजी कला अकादमीत प्रयोग

कै. सखाराम बापू बर्वे लिखित गोवा मुक्तिसंग्रामावर आधारीत ‘जळता गोमंतक’ या मराठी नाटकाचा गुरुवार दि. २४ रोजी कला अकादमीच्या खुल्या रंगमंचावर स्वातंत्र्यसैनिक नागेश करमलीच्या हस्ते सुमूहूर्त झाला. हे नाटक कला अकादमी आणि कला आणि संस्कृती संचालनालयाच्या सहयोगाने अकादमीच्या मा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात दि. ३१ मे रोजी संध्या. ७.३० वा. सादर होणार आहे.

मोती डोंगरावरील आणखी घरे पाडली

मोतीडोंगर म्हणजे बेकायदेशीर बांधकामे व गुन्हेगाराचा अड्डा म्हणून कुप्रसिद्ध आहे. बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली असून काल मोती डोंगरावरील कोमुनिदादीच्या जागेत बांधलेली ११ घरे पाडण्यात आली. गेल्या दोन दिवसांमागे दोन घरे मोडली होती. आजपर्यंत मोडलेल्या घरांची संख्या १३ झाली आहे.

डॉ. आंबेडकरांचे व्यंगचित्र आणि वस्तूस्थिती

- दत्ता भि. नाईक

एनसीईआरटीद्वारा निर्मित नववीच्या पुस्तकात परमपूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका गोगलगाईवर बसलेले असून त्यांच्यावर पंडित नेहरू चाबकाचे फटकारे मारीत आहेत असे दाखवणारे व्यंगचित्र घातलेले आहे. ही गोष्ट संतापजनक आहेच. याला जबाबदार असणार्‍या श्री. पळशीकर यांच्या कार्यालयावर हल्ला करणे योग्य नसले तरीही या देशातील लोकांच्या प.पू. आंबेडकर यांच्याप्रती असलेल्या भावनांचा पुस्तकाच्या निर्मात्यांनी विचार करणे आवश्यक होते. याशिवाय आपल्यामध्ये असा एक वर्ग आहे की, ज्यांचे प.पू. आंबेडकर हे एकमेव दैवत आहे. याचा पळशीकरांना कसा विसर पडला हाच मोठा प्रश्‍न आहे.

आयटीचा फुगा

फुगा कितीही मोठा असला तरी त्याच्याकडे लक्ष दिले नाही तर कालांतराने त्यातली हवा जातेच, तसेच सध्या भारतातील सॉफ्टवेअर उद्योगाचे झाले आहे. आयटीचा फुगा फुगवत नेऊन त्याच्या आधारे दिवास्वप्ने पाहणार्‍यांना आता प्रखर वास्तवाचे चटके बसू लागले आहेत. बीपीओ, कॉलसेंटरांना याची धग यापूर्वीच बसली होती. आता सॉफ्टवेअर निर्मिती उद्योगालाही जागतिक घडामोडींमुळे अनेक आव्हानांना सामोरे जाऊ लागते आहे. कामावरील निष्ठा, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि संस्कारशील व्यक्तिमत्त्व या त्रिगुणांच्या बळावर भारतीय तरुणांनी आयटी क्षेत्रामध्ये आजवर नवनव्या भरार्‍या घेतल्या. कोणी विदेशात स्थायिक झाले आणि तेथील व्यावसायिकांच्या स्वप्नपूर्तीसाठी झटू लागले, तर काहींनी देशातच राहून आयटी क्षेत्रामध्ये भक्कमपणे पाय रोवण्याचे धाडस केले. अनेक भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांनी म्हणता म्हणता आपला जम बसवला आणि विदेशी ग्राहकांना स्वस्त आणि मस्त तत्त्वावर आकृष्ट केले. गेली अनेक वर्षे हा संसार सुखाने चालत आला, परंतु आता त्यामध्ये नव्या अडचणी या कंपन्यांना भासू लागल्या आहेत आणि त्याला बदलती जागतिक परिस्थिती कारणीभूत आहे.

आयपीएलला फिक्सिंगचा डाग

- प्रशांत वेरेकर

एका षटकात सहा चौकार किंवा सहा षटकार असा धावांचा पाऊस किंवा हॅट्‌ट्रिकसह चार बळी, शेवटच्या चेंडूवर विजय, अफलातून झेल किंवा चित्त्याच्या चपळाईने क्षेत्ररक्षण, जोडीला मादक चिअर लिडर्सच्या दिलखेचक अदा यांमुळे इंडियन प्रिमियर लीग तथा आयपीएल म्हणजे मनोरंजनाची एक पर्वणीच जगभरातील क्रिकेटप्रेमींना ठरल्याचे सर्वसाधारण मत बनले आहे. याचवेळी अलीकडील काळात ज्या काही घडामोडी घडल्या आहेत, त्यामुळे आयपीएल नावाचे भारतीय क्रीडा ब्रँड क्रिकेट खेळाच्या विकासाच्या किंवा भवितव्याच्या दृष्टीने हितकारक की मारक ठरणार हा विषय वादविवादाचा मुद्दा ठरू शकतो.

तुंगभद्रेचा स्वप्नकिनारा...!

- समीर झांट्ये

कळावे की आपण कुठल्यातरी स्वप्नात जागे झालो आहोत, पावलांवर आपले नियंत्रण राहिलेले नाही, पावलांनी जेथे न्यावे तसे आपले चित्त वाहावत जावे, आपला प्रतिकार प्रतिसाद बनून स्वप्नांच्या अधीन व्हावा, दृष्टी जावी तेथे मन मोहवून टाकणारी गुंतागुंत अधिक गहन होत जावी....

हंपीतील अवशेषांच्या भूमीत जाऊन सभोववार नजर टाकावी तर अशी अनुभूती येते. हे अवशेष आहेत की, एखाद्या रचनेचा स्वप्नभंग.. मन गोंधळून जातं...

आमची वाटचाल... चिंतनाची गरज!

- अजित पैंगीणकर

गोवा मुक्त झाल्यानंतर मागच्या पन्नास वर्षांत गोव्याने विविध क्षेत्रात फार मोठी प्रगती केली. पर्यटन क्षेत्रात जागतिक नकाशावर गोवा नोंद झाला. वर्षाकाठी लाखो पर्यटक गोव्यात येतात, मुक्काम करतात. इथले नैसर्गिक लेणे लुटून नेतात. लाखो रुपयांचा महसूल त्यामुळे गोव्याच्या तिजोरीत जमा होतो. चांगल्या बरोबर वाईट गोष्टीदेखील या पन्नास वर्षात गोव्यात आल्या. पोर्तुगिजांच्या तावडीत असलेल्या गोव्याला मुक्त करण्यासाठी इथल्या माता - भगिनींनी सत्याग्रह केला, युवकांनी तुरुंगवास भोगला. संसाराची होळी केली. चांगल्या नोकर्‍यांवर लाथा मारून युवक सत्याग्रहात सामील झाले. भूमिगत झाले.

रत्नदुर्ग

- लाडोजी परब

रत्नागिरी म्हणजे कोकणामधील एक महत्त्वाचे शहर. या शहराची ओळख धार्मिक, सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वारसा असलेली आहे. या शहराजवळच असलेला रत्नदुर्ग हा किल्ला याची साक्षच आहे. या रत्नदुर्ग किल्ल्याला काहीजण भगवतीचा किल्ला असेही संबोधतात. रत्नागिरी शहराच्या पश्चिम अंगाला असलेल्या सागर किनार्‍यावर हा दुर्ग आहे. येथील विलोभनीय निसर्ग आणि मन मोहवून टाकणार्‍या सौंदर्याची भुरळ प्रत्येकाला पडतेच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक स्मृती जपल्या गेल्या आहेत.

जमावाचा पोलिसांवरही हल्ला

Story Summary: 

तोडफोडीत फुटलेली पोलिसांच्या जीपची काच. (छाया : विशांत वझे)

पेट्रोल दरवाढ मागे घेणे तूर्त अशक्य

Story Summary: 

सरकार म्हणते, पूर्ण अभ्यासांतीच निर्णय

तात्काळ दरवाढ मागे घेण्याची शक्यता सरकारने फेटाळली असून जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमती आणि रुपयाचे मूल्य याबाबत काही दिवस निरीक्षण केल्यानंतरच दरकपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे सरकारने म्हटले आहे.

तेल कंपन्यांनी परवा रु. ७.५४ प्रति लिटर पेट्रोलचे दर वाढविल्यानंतर देशात तीव्र विरोध प्रदर्शित होत आहे.

पेट्रोलियम मंत्री एस. जयपाल रेड्डी यांनी दरवाढीचे समर्थन करताना सांगितले की, तेल कंपन्यांनी सगळे पर्याय संपल्यानंतरच दरवाढीचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेससह सगळेच पक्ष जनमतवादी आहेत. मात्र केवळ लोकांच्या भावनांप्रमाणे देश चालवला जाऊ शकत नाही.

चोर समजून एकास मारहाण; जमावाचा पोलिसांवरही हल्ला

Story Summary: 

संशयित चोराला पकडण्यासाठी संघटित आलेल्या जमावाने भलत्याच इसमाला पकडून बेदम मारहाण केल्यानंतर पकडून ठेवलेले असताना त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करून त्याच्या अंगावर डोळ्यात चक्क मिरची पावडर मारून जीपची मोडतोड करून नुकसान करण्याची घटना गुरुवारी रात्री उसप लाटंबार्से गावात घडली आहे. याप्रकरणी मारहाण करण्यात आलेला इसम गंभीर जखमी असून त्याच्यावर इस्पितळात उपचार चालू आहेत.

या प्रकरणी डिचोली पोलिसांनी काही अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपास कार्य सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांनी दिली.

पणसुले येथे नव्या धरणासाठी चाचपणी

Story Summary: 

गोवा सरकारच्या जलसंसाधन खात्यामार्फत सध्या अस्तित्वात असलेल्या अंजुणे धरणाच्या जलाशयाच्या परिसरात दुसरे धरण पणसुले येथे बांधण्याच्या विचार असून त्यादृष्टीने प्राथमिक स्वरूपात कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.

आगामी काळात गोव्याला पिण्याच्या पाण्याचा व जलसिंचन सुविधांबाबतची वाढती मागणी लक्षात घेऊन जलसंसाधन खात्याला गोवा सरकारने सत्तरी येथील पणसुले येथे नवीन धरणाचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे.

भाजपच्या रॅलीत अडवाणी, सुषमा स्वराज अनुपस्थित

मतभेद नसल्याचा पक्षाचा निर्वाळा

काल मुंबईत झालेल्या भाजपच्या महत्त्वपूर्ण रॅलीत भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांची अनुपस्थिती लक्षणीय ठरली. मात्र त्यांना इतरत्र कार्यक्रम असल्याने त्यांचे रॅलीत उपस्थित न राहणे आधीच ठरले होते, असे पक्षातर्फे सांगण्यात आले. दोन्ही नेत्यांची अनुपस्थिती कुठल्याच मतभेदांमुळे नसल्याचेही पक्षाच्या प्रवक्त्यातर्फे सांगण्यात आले.

मडगाव पालिका अनधिकृत गाडे हटवणार

शहरातील गाडे व भाड्याने दिलेल्या फ्लॅट, दुकाने यांची पहाणी करून बेकायदेशीर गाडे शहरातून हटविण्याचा निर्णय मडगाव पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली.

‘उटा’ आंदोलनाची वर्षपूर्ती

पणजीतील सभेत मागण्यांचा पुनरुच्चार

२५ मे हा यापुढे दरवर्षी प्रेरणा दिन म्हणून ‘उटा’तर्फे पाळण्यात येणार असल्याचे उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी काल गेल्या वर्षी २५ मे रोजी उटातर्फे बाळ्ळी येथे झालेले आंदोलन व या दिवशी मंगेश गावकर व दिलीप वेळीप या आपल्या दोघा युवा कार्यकर्त्यांना प्राप्त झालेले हौतात्म्य यांच्या स्मरणात काल येथील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या स्मृति सभेत बोलताना सांगितले.

दहावीचा निकाल शुक्रवार किंवा शनिवारी

दहावी इयत्तेचा निकाल ३१ मे किंवा १ जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे गोवा शालान्त व उच्च माध्यमिक मंडळाच्या अध्यक्ष फॅरेल फुर्तादो यांनी काल सांगितले.

पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा इतिहास

- सुनील कुट्रे मळार- खोर्ली - तिसवाडी

विज्ञानाने नमूद केले आहे की, पृथ्वीवरील सजीवांच्या किमान ९९ टक्के जाती आजतागायतच्या करोडो वर्षांच्या इतिहासात नष्ट झाल्या आहेत. पृथ्वीवरील जीवनाची सुरूवात फार-फार प्राचिन काळी म्हणजे सुमारे ३०० कोटी वर्षांपूर्वी झाली. तेव्हा पासून ते आजतागायत सजीवांच्या असंख्य जाती जन्माला आल्या व नष्टही झाल्या. पृथ्वीवरील जीवन सर्वात प्रथम पाण्यात, महासागरात निर्माण झाले असे सांगण्यात येते. शार्कसारखे मासे फार प्राचिन आहेत.

पांढर्‍या केसांचा देश

भारत हा तरुणांचा देश आहे असा अभिमान आजवर आपण सदैव बाळगीत आलो. या देशाची सर्वाधिक लोकसंख्या तरुण आहे आणि ती चमत्कार घडवू शकते असा आशावादही आपल्या मनात त्यामुळे रुजला. याउलट जपानसारख्या देशाला वृद्धत्वाचा विळखा पडल्याने तो चिंतेचा विषय ठरलेला आहे. तेथे सर्वाधिक लोकसंख्या ज्येष्ठ नागरिकांची आहे. मात्र, आज आपल्या देशामध्येही ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण वाढत चालले आहे असे ताजी आकडेवारी सांगते. सरकारी आकडेवारीनुसार देशात सध्या १२ टक्के लोकसंख्या ६० वर्षे व त्यावरील लोकांची आहे. म्हणजे एकशे वीस कोटी देशाची लोकसंख्या आहे असे मानले तर ही संख्या होते १४ कोटी ४० लाख. खरी चिंतेची बाब ही आहे की सन २०२५ पर्यंत ज्येष्ठ नागरिकांचे हे प्रमाण पंचवीस कोटींवर पोहोचणार आहे. हे बदल केवळ आकडेवारीतले बदल नाहीत. त्याचे पडसाद निश्‍चितपणे आपल्या देशातील सामाजिक जीवनात उमटणार आहेत. एकीकडे वाढते जीवनमान आणि दुसरीकडे कुटुंबनियोजनाबाबतच्या जागृतीमुळे घटलेले जन्म प्रमाण यामुळे जसजशी वर्षे जातील तसतशी ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत जाणार आहे.

पेट्रोल दरवाढीचा निषेध

Story Summary: 

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ काल पेडणे येथे भाजपतर्फे निषेध सभा घेण्यात आली. तर पणजीत कम्युनिस्ट पार्टी आणि आयटकच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

पेट्रोल दरवाढीचा देशभरात निषेध

Story Summary: 

तेल कंपन्यांनी केलेल्या पेट्रोल दरवाढीच्या निर्णयाची तीव्र प्रतिक्रिया देशभरात उमटली. दरम्यान, तेलदरवाढीच्या तीव्र प्रतिक्रियेनंतर सरकार विचार करीत असलेली डिझेल, एलपीजी आणि केरोसीन दरवाढ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

मात्र तेलदरवाढीच्या निर्णयानंतर काल शेअर बाजारचा निर्देशांक १.८ टक्क्यांनी वधारला. रुपयाच्या किमतीतही थोडी सुधारणा दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपया ५६.४० वरून ५५.७६पर्यंत सावरला.

माजी मंत्री संजय बांदेकर यांचे निधन

Story Summary: 

गोव्याचे माजी मंत्री व काणकोणचे माजी आमदार संजय बांदेकर (५९) यांचे काल २४ रोजी दुपारी ३.१५ वाजता मडगाव येथे खाजगी रुग्णालयात निधन झाले.

अंत्यसंस्कार आज दि. २५ रोजी सकाळी अकरा वाजता आगोंद येथे होणार आहेत.

दि. ६ मे रोजी आपल्या निवासस्थानी कोसळल्यानंतर त्यांना प्रथम काणकोण व नंतर मडगांव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेंदूरक्तस्रावाच्या झटक्यानंतर गेले १८ दिवस त्यांच्यावर उपचार चालू होते.

नितीन गडकरी सलग दुसर्‍यांदा भाजप अध्यक्षपदी निश्‍चित

Story Summary: 

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना सलग दुसर्‍यांदा अध्यक्षपदाचा कार्यकाळ मिळण्याच्यादृष्टीने भाजपच्या घटने काल दुरुस्ती करण्यात आली.

गडकरींचा कार्यकाळ या डिसेंबरमध्ये संपत होता मात्र दुरुस्तीनंतर त्यांना दुसरा कार्यकाळ लाभणार असून तो डिसेंबर २०१५पर्यंत असेल. दुरुस्तीचा ठराव राजनाथ सिंग यांनी मांडला व व्यंकय्या नायडू यांनी त्यास अनुमोदन दिले.

जीसीए : निवाडा सोमवारपर्यंत राखला

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसंबंधी दक्षिण गोव्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी आज झाली व न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांनी निवाडा सोमवार दि. २८ मे पर्यंत राखून ठेवला आहे. आज दोन्ही पक्षानी आपली बाजू मांडली.

मावळींगे-काले अपघातात दुचाकीस्वार ठार

मावळींगे काले येथे रस्त्याच्या वळणावर मालवाहू ट्रक व दुचाकी स्वार दरम्यान दुचाकीस्वार अब्रो सिद्धी (कारवार) हा जागीच ठार झाला.

व्ही. एम. प्रभूदेसाई क्रीडा संचालकपदी

डॉ. सुझान डिसौझा संयुक्त क्रीडासचिव

अल्पकाळ सहाय्यक क्रीडासंचालक म्हणून काम केलेले सागचे माजी कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई यांची क्रीडा आणि युवा व्यवहार संचलनालयाच्या संचालकपदी बढती देण्यात आली आहे.

हत्ती आणि झाडे

आपल्या देशात भ्रष्टाचार हा कुठे कुठे असू शकतो याची अलीकडे कल्पनाही करवत नाही. पशुखाद्यापासून स्पेक्ट्रम वाटपापर्यंत कुठल्याही व्यवहारामध्ये लाचखोरी आणि दलालीची कीड अलीकडे दिसून येते. ताजी बातमी आहे ती मायावतींच्या हत्ती आणि झाडे घोटाळ्याची. या मायावतीबाईंची स्मारके उभारण्याची हौस जगजाहीर आहे. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत जागोजागी स्मारके उभारण्याचे पेव फुटले. आपल्या हयातीतच स्वतःचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात त्यांना शरमही वाटली नाही. आपल्या पक्षाचे चिन्ह असलेल्या हत्तीवर तर त्यांचे उदंड प्रेम. त्यामुळे प्रत्येक स्मारकावर असंख्य हत्ती उभारून त्यांनी आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जनतेच्या सतत डोळ्यांसमोर राहील याची तजवीज केलेली आहे. पण निवडणूक आयोगाने ऐन निवडणुकीच्या काळात हे पुतळे झाकण्याचे आदेश दिल्याने की काय, मतदारांनी या हत्तीला डोळ्यांआड केले आणि समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशमधील सत्तेचे सुकाणू दिले. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाल्याने अर्थातच मागील बसप सरकारच्या कार्यकाळातील कृष्णकृत्ये आता हळूहळू चव्हाट्यावर येऊ लागली आहेत.

विवाह समारंभांवर तथाकथित पुरोगाम्यांचे वृथा आक्षेप

- विजय प्रभू पार्सेकर देसाई, पेडणे.

उक्तीप्रमाणेच कृती करणारा एकमेव भारतीय होऊन गेला म्हणूनच लोकांनी ‘महात्मा’ ही पदवी त्यांना दिली. एरव्ही स्वतःला पुरोगामी समजणारे प्रत्यक्ष जीवनात प्रतिगामीच असतात. असे काही पुरोगामी अळंब्यांच्या छत्र्याप्रमाणे लग्नसराईत उगवतात. धर्म आणि परंपरेप्रमाणे लग्न समारंभ करणारे हिंदू त्यांच्या मते प्रतिगामी. इतर धर्मियांबद्धल ते ‘ब्र’ देखील काढत नाहीत. (संदर्भः २८/०४ ची ‘कुटुंब’ पुरवणी)

त्यांचा पहिला आक्षेप असतो तो, लग्नसमारंभ हा निव्वळ गडब़ड गोंधळ असल्याचा. हा ह्या लोकांचा तद्दन मूर्खपणा. एवढा मोठा समारंभ साजरा होत असताना जो उत्साह ओसंडून वाहत असतो, त्याला गडबड गोंधळ म्हणणार्‍याला ‘शहाणाच’ म्हणावा लागेल. त्यांचा दुसरा आक्षेप असतो तो हळद, पुण्याहवाचन वगैरे धर्मशास्त्राप्रमाणे करण्यात येणार्‍या विधींना. या तथाकथित पुरोगाम्यांनी स्वतःच्या लग्नात हे सर्व विधी यथासांग आणि पुराणोक्त केलेले असतात. तिसरा आक्षेप मंगलाक्षतांचा. या लोकांच्या मते या अक्षतांमुळे अन्न वाया जाते. लग्न होणे म्हणजेच डोक्यावर अक्षता पडणे असे पूर्वापार म्हणत आलेले आहेत. पूर्वीच्या काळात छापील निमंत्रण पत्रिका नव्हत्या. वधु-वरांचे आईवडिल चांदीच्या पेल्यात अक्षता घेऊन नातेवाईकांकडे वगैरे आमंत्रण द्यायला जात. कुटुंबप्रमुखाच्या हातावर अक्षता ठेऊन विवाहाचे निमंत्रण देण्यात येत असे. वधू/वर मातेची ओटी भरून नातेसंबंध किती जवळचे आहेत त्यावर अवलंबून आणि देणार्‍याच्या ऐपतीनुसार वधू/वर मातेला लग्न खर्चाला हातभार म्हणून पैसे दिले जात. वधू/वर माता ओटीत घातलेले थोडेसे तांदुळ आमंत्रितांच्या अक्षता म्हणून आपल्या बरोबर घेऊन जात. हेच तांदुळ नंतर घरच्या अक्षतापात्रात मिसळले जात. मुळातच वधू,वरांच्या डोक्यावर अक्षता टाकण्याची पद्धत देवादिकांवर केल्या जात असलेल्या पुष्पवृष्टीवरून मानवजातीने उचलली असावी. यात काहीही गैर नाही. ज्यांना गैर वाटते त्यांनी ह्या अक्षता एकत्रित करून घरी नेऊन शिजवून खाल्ल्यास वधू वर निश्‍चितच आक्षेप घेणार नाहीत.

कामत सरकार काळातील पदे रद्द

Story Summary: 

पत्रकार परिषदेत बोलताना मनोहर पर्रीकर.

पेट्रोल महागले

Story Summary: 

लिटरमागे रु. ७.५४ दरवाढ

पेट्रोल दरात काल तेल कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षांसमवेत सरकारमधील घटकपक्षांनीही विरोध दर्शविला आहे. गेल्या काही दिवसांपासूनच पेट्रोल दरवाढीचे संकेत मिळत होते. पेट्रोलच्या लिटरमागे सरासरी सुमारे रु. ७.५४ वाढ कंपन्यांकडून करण्यात आली आहे. ती स्थानिक कर किंवा व्हॅट वगळून असेल त्यामुळे दरवाढ प्रत्येक राज्यांत वेगवेगळी असेल.

काल मध्यरात्रीपासूनच वाढ लागू करण्यात आली आहे.

या दरवाढीनंतर दिल्लीत तेल रु. ७.५०ने वधारले आहे. मुंबईत रु. ७.९१, कोलकात्यात रु. ७.८५ व चेन्नईत रु. ७.९८ ने लिटरचे दर वाढले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींशी मेळ राहिला नसल्याने सोसावे लागणारे नुकसान हे प्रमुख कारण तेल कंपन्यांनी दरवाढीसाठी दिले आहे. त्याशिवाय रुपयाचे सातत्याने घसरत चाललेले मूल्य हे सुद्धा एक कारण असल्याचे कळते.

कामत सरकार काळातील एलडीसी, पेशंट अटेंडंट पदे रद्द

Story Summary: 

आचारसंहिता काळातील नियुक्ती पत्रेही रद्द

‘पेट्‌स’ वाल्यांना कायम करणार

निवडणूक आचारसंहितेचा भंग करून दिगंबर कामत सरकारने ज्या उमेदवारांना नियुक्तीची पत्रे दिली होती त्यांना नोकर्‍यात सामावून घेण्यात येणार नसून ती नियुक्तीपत्रे रद्द करण्यात येतील. मात्र, ज्यांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नियुक्तीची पत्रे मिळाली होती त्यांना नोकर्‍या मिळतील, असे काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यानी सांगितले.

दरम्यान, दिगंबर कामत सरकारने जी एल्‌डीसी व पेशंट अटेन्डंटची पदे तयार केली होती ती रद्द करण्यात येणार असून त्याजागी पेट्‌स (प्री एम्प्लोइमेंट ट्रेनिज) उमेदवारांना सामावून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना त्यांनी या उमेदवारांची भरती केली होती.

रस्त्यालगतची बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटणे अटळ

Story Summary: 

पर्रीकर : व्यापक धोरण बनविणार

रस्ते व महामार्गांच्या बाजूला बेकायदेशीररीत्या ज्या घुमट्या, खुरीस, मशिदी, गुरुव्दारा आदी धार्मिक स्थळे उभारण्यात आलेली आहेत ती पाडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असल्याने त्या संदर्भात एक व्यापक असे धोरण तयार करून ते जनतेपुढे ठेवण्यात येईल व त्याची अमलबजावणी करण्यापूर्वी जनतेची मते अजमावून घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

सदर धोरण मत आजमावणीसाठी राज्यातील मंदिरे, मशिदी व चर्चेसच्या व्यवस्थापनांकडेही पाठविण्यात येईल.

काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वरील निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेश दिलेला असल्याने रस्ते व महामार्गांच्या बाजूला असलेली धार्मिक स्थळे हलवावी लागणार असल्याचे सांगून या धर्मिक स्थळात अगदीच पुरातन अशी धार्मिक स्थळे असल्यास ती वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. अन्य महत्त्वाची अन्य ठिकाणी हलवण्यात येतील व बाकीची पाडण्यात येतील, असे पर्रीकर यांनी सांगितले, मात्र, त्यापुर्वी व्यापक असे धोरण तयार करून ते जनतेपुढे ठेवून त्यांची मते आजमावण्यात येतील.

जीसीए निवडणुकीबाबत आज सुनावणी

दि. २७ मे रोजीच्या जीसीएच्या नियोजित निवडणुकीबाबत आज मडगावच्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

दरम्यान, जीसीएच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष दिलीप दाभोलकर यांनी निवडणूक प्रक्रिया काल दि. २३ पर्यंत चालूच ठेवली होती. दि. २७च्या निवडणुकीस जीसीएच्या नूतन व्यवस्थापकीय समितीने लवाद वल्लभ साळकर यांच्यामार्फत आव्हान दिले आहे.

क्रिकेट घोटाळा : सरकारने पेंडसे अहवाल स्वीकारला

२००१ साली मडगांव येथे भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्याच्या वेळी गोवा क्रिकेट असोसिएशनने केलेल्या घोटाळा प्रकरणी न्यायमूर्ती एम्. एल्. पेंडसे आयोगाने दिलेला व कॉंग्रेस सरकारने फेटाळालेला अहवाल स्वीकारण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.

त्या बालिकेवर खूनाआधी बलात्कार

बिहारी तरुणास अटक

केपे येथून बेपत्ता झालेल्या चार वर्षीय बालिकेवर प्रथम बलात्कार करून नंतर गळा आवळून व तोंड दाबून खून करण्यात आल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. दरम्यान, या प्रकरणी केपे पोलिसांनी काल अटक केलेल्या दिपक गणेश राय (वय २१) बेगुळसराय, बिहार याने आपण बलात्कार करून खून केल्याची कबुली दिली आहे.

चोरांच्या शोधासाठी नादोड्यात युवकांचा पहारा

लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील नानोडा गावात गेल्या काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या व रात्रीच्या वेळी चोरीचे अनेक प्रकार घडल्यानंतर तसेच अजूनही काही ठिकाणी रात्रीची दारे ठोठावण्याचे प्रकार घडत असल्याने गावातील युवा शक्ती संघटित झाली असून त्यांनी गटागटाने रात्रभर गावाच्या परिसरात पहारा ठेवण्यास प्रारंभ केला आहे.

बढत्या व बदल्या

गोवा सरकारने एका आदेशाद्वारे प्रशासनातील १३ अधिकार्‍यांना बढत्या दिल्या असून १० जणांच्या बदल्या केल्या आहेत. बढती मिळालेले अधिकारी असे - माया पेडणेकर, भूषण सावईकर, शेखर शिरोडकर, वर्षा मांद्रेकर, अंजू केरकर, गौरीश कुट्टीकर, ब्रिजेश मणेरकर, सुषमा कामत, मारिया डिसोझा, संतोष कुंडईकर, अरविंद कुर्टीकर, टी. आय. मुरगावकर, सगुण वेळीप.

टेम्पोखाली चिरडून युवक ठार

काल सायंकाळी उशिरा उसगांव तिस्क परिसरात हमरस्त्यावर झालेल्या वाहनाच्या भिषण अपघातात संतोष च्यारी (२६) कुर्टी-फोंडा या युवकाला प्राण गमवावा लागला.

संशयित चोरट्यांना लोकांनी पकडले

त्या इमारतीत राहणार्‍या लिना हळदीपूरकर यानी इमारतीला लोकाना, बाहेरील लोकांना माहिती देताच, लोक धांवत घटना स्थळी पोहचले, दादू फ्रांसिस्क यानी त्याना पकडण्यासाठी धैर्य दाखविले. त्यानंतर पोलिस तेथे पोहचले. संभाजी जाधव यानेही आपल्या घरांत चोरी झाल्याची तक्रार नोंदविली आहे. पोलीस निरिक्षक सुदेश नाईक तपास करीत आहेत. कोंब मडगांव येथील पृथ्वी अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून चोरी करताना त्या इमारतीत राहणार्‍या लोकांनी दोघा संशयित चोरांना पकडून मडगांव पोलिसांच्या ताब्यात दिले.

रिक्षास टँकरची धडक; एक जखमी

तिस्क-फोंडा येथे मासे विक्री करून आपला चरितार्थ चालवणारा रोहिदास नाईक (३०) राहणार ढवळी-फोंडा यांच्या रिक्षाला ढवळी हम रस्त्यावर एक टँकरने जोरात धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला व रिक्षाचा चक्काचूर झाला. मडगावहून मासे घेऊन येताना सकाळी ८च्या दरम्यान हा अपघात झाला.

आयुष्य उत्साहाने आणि बिनधास्तपणे जगा

- कान्ता तारी, सडा-वास्को.

जगातील सर्व प्राणीमात्रांत माणूस हा एक असा प्राणी आहे, की जो चार अवस्थांमधून जात असतो. त्या चार अवस्था म्हणजेच बाल्यावस्था, तारूण्यावस्था, गृहस्थावस्था आणि वानप्रस्थावस्था. या सर्व अवस्थांमधून जाताना त्याला उत्तम आणि चांगली अवस्था प्राप्त व्हावी असे मनापासून वाटत असते. बालपण आणि तरूणपणात आई-वडील अथवा पालक त्याचं संगोपन करतात. गृहस्थावस्थेमध्ये हळू हळू तो आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहतो व आपल्या वैवाहिक जीवनातील कालक्रमणा करण्यात तत्पर होतो. याच अवस्थेमध्ये तो आपल्या भवितव्याची, आपल्यानंतर येणार्‍या पिढीची काळजी घेण्यासाठी अर्थार्जन करण्यासाठी धडपडत असतो. शेवटी वृद्धापकाळात त्याची अवस्था ‘ना घरका, ना घाटका’ अशी होऊन जाते. अशावेळी त्याची अर्धांगिनीही त्याच्यासारखीच वयोवृद्ध झालेली असते. तिलाही नवर्‍याप्रमाणे हरप्रकारच्या व्याधींनी ग्रासलेले असते. त्यामुळे तिची मानसिक स्थितीही नवर्‍याप्रमाणेच द्विधा झालेली असते.

इंटरनेटचा मुक्तिलढा

इंटरनेटचा आज जगभरामध्ये प्रचंड वेगाने विस्तार होत चालला आहे. या विस्ताराबरोबरच आणखी एक घडामोड घडते आहे ती म्हणजे इंटरनेटची मक्तेदारी काही ठराविक कंपन्यांच्याच हाती एकवटू लागली आहे. याहू, गुगल, फेसबुक, ट्वीटर, ऍमेझॉन, ऍपल अशा मोजक्याच कंपन्या आपला व्याप आणि विस्तार वाढवत चालल्या आहेत. म्हणजेच एकेकाळी इंटरनेट ज्यांच्यामुळे अस्तित्वात आले ते तंत्रज्ञ आणि विद्यापीठे यांचा सहभाग जाऊन आज काही मोजक्या कंपन्यांची - त्यातही सर्व अमेरिकन कंपन्यांची - मक्तेदारी इंटरनेटवर निर्माण झालेली आहे. इंटरनेट हा माहितीचा खुला स्त्रोत असे आपण म्हणतो, परंतु हा स्त्रोत आज खुला राहिलेला नाही. खुल्या इंटरनेटकडून आपण आता ऍप्स आधारित मोबाईल इंटरनेटकडे चाललेलो आहोत. ऍपलचे आयफोन, आयपॅड असू द्या किंवा अँड्रॉईड आधारित फोन आणि टॅब्लेट असूद्यात, इंटरनेटच्या सार्‍या सुविधा ‘ऍप्स’च्या माध्यमातून ग्राहकापर्यंत जाऊ लागल्या आहेत आणि चांगली उपयुक्त ऍप्स क्वचितच मोफत असतात. त्यासाठी अर्थातच पैसे मोजावे लागतात.

हंगामी शिक्षकांना मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

Story Summary: 

३०० हंगामी शिक्षकांचे पर्वरी येथील सचिवालयासमोर धरणे धरले. नंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांना आल्तिनो येथे बोलणी करण्यासाठी बोलाविले. गेल्या कित्येक महिन्यांपासून नोकरीत कायम करण्याची त्यांची मागणी आहे. (छाया : शेखर वायंगणकर)

बारावीचा निकाल ८३.३७%

Story Summary: 

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने गेल्या मार्च महिन्यात घेतलेल्या बारावी इयत्तेचा निकाल जाहीर करण्यात आलेला असून ८३.३७ टक्के एवढा निकाल लागला असल्याचे मंडळाच्या हंगामी अध्यक्ष फॅरेल फुर्तादो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. परीक्षेला एकूण १३७१० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ११४२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्याशिवाय मोजकेच विषय घेऊन ७६५ विद्यार्थीही परीक्षेला बसले होते. त्यापैकी २९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

कला शाखेचा निकाल ७५.१९ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ८२.५२ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल ८७.२३ टक्के तर व्यावसायिक शाखेचा निकाल ८८.४४ टक्के एवढा लागला आहे. कला शाखेतून २८२५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २१२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून ४७३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३९०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतून ३४२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २९८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर व्यावसायिक शाखेतून २७१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

केप्यात त्या बेपत्ता बालिकेचा खून

Story Summary: 

मृतदेह आढळला; एक संशयित ताब्यात

दोन दिवसांपूर्वी संशयास्पदरित्या बेपत्ता झालेल्या ४ वर्षीय बालिकेचा मृतदेह केपे येथील एका इमारतीच्या ट्यूबमध्ये कुजलेल्या स्थितीत कामगारांना आढळला. पोलीस तपासात तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून केपे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

केपे येथे नव्याने बांधण्यात येणार्‍या एका इमारतीमध्ये काम करणार्‍या कामगारांना कुजल्याची घाण आल्यावर त्यांनी शोधाशोध केली असता त्याना बालिकेचा मृतदेह आढळला. त्यांनी त्वरित आपल्या मालकाला कळवले व त्यांनी केपे पोलिसांना खबर दिल्यावर पोलीस तपासात तो मृतदेह दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या बालिकेचाच असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या अंगावर जखमा होत्या त्यामुळे तो खूनच असल्याचे पोलिसांचे मत आहे.

हंगामी शिक्षकांना मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

Story Summary: 

सरकारी प्राथमिक शाळांत इंग्रजी हा विषय शिकवण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आलेल्या राज्यातील सुमारे ३०० शिक्षकांनी काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन सेवेत कायम करण्याची त्यांच्याकडे मागणी केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी जून महिन्यात कायम तत्त्वावर जागे भरण्यात येणार असून जे उमेदवार पात्र आहेत त्यांना नोकर्‍या मिळतील, असे आश्‍वासन दिले. तद्पूर्वी या ३०० कंत्राटी शिक्षकांनी पर्वरी येथे सचिवालयासमोर आपणाला सेवेत कायम करण्यात यावे या मागणीसाठी धरणे धरले.

आंध्र प्रदेशात रेल्वेंच्या टकरीत २५ ठार

४३ जण जखमी

बेंगलोरकडे निघालेली हंपी एक्सप्रेसची उभ्या असलेल्या मालवाहू रेल्वेस धडक बसून झालेल्या अपघातात २५ जण ठार तर ४३ जण जखमी झाले. यांपैकी १६ जण होरपळून मृत्यूमुखी पडले. एक्सप्रेस रेल्वेच्या चालकाने पहाटेस सिग्नल तोडल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

स्वातंत्र्यवीर झिला सावंत राणे यांची स्मृतिशताब्दी साजरी करणार

श्री. दादा राणे यांच्या १८९५ सालच्या पोर्तुगीजांविरुद्ध केलेल्या उठावातील दक्षिण गोव्याचे प्रमुख स्वातंत्र्यवीर झिला सावंत राणे यांची यंदा स्मृतिशताब्दी. त्या निमित्त स्वातंत्र्यवीर झिला सावंत राणे मेमोरियल लायब्ररीतर्फे ०२ जून रोजी श्री मल्लिकार्जुन विद्यालयात संध्याकाळी ४.३० वाजता कार्यक्रम होणार आहे.

आज कॅबिनेट बैठक

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार असून तीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस राज्यात पंचायत निवडणुका व कुठ्ठाळी पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्याने सरकारला महत्त्वाचे निर्णय घेता आले नव्हते.

कळंगुट पंचायतीचा निकाल

कळंगुट पंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी काल पेडे-म्हापसा येथील संकुलनात झाली. या पंचायतीतल्या ११ प्रभागसाठी एकूण ७५ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यातील निवडून आलेले विजयी उमेदवार पुढील प्रमाणे - प्रभाग १ - थॉमस डिसोझा, प्रभाग २ - विनायक साळगावकर, प्रभाग ३ - गीता परब, प्रभाग ४ - आना मारिया डिसोझा, प्रभाग ५ - सावियो गोन्साविल्स, प्रभाग ६ - जोजफ सिक्वेरा, प्रभाग ७ - पास्कॉल फर्नांडिस, प्रभाग ८ - जयनाथ परुळेकर, प्रभाग ९ - रेश्मा कळंगुटकर, प्रभाग १० - एनी फर्नांडिस, प्रभाग ११ - फिलोमिनो फर्नांडिस.

मोतीडोंगरावरील बेकायदेशीर घरे पाडली

मडगाव पालिकेने मोती डोंगरावरील बेकायदेशीर घराचे बांधकाम पोलीस संरक्षणात मोडून टाकले. या बांधकामाबद्दल अनेक तक्रारी पालिका व उपजिल्हाधिकार्‍यांकडे पोहचल्या होत्या. काल सकाळी संयुक्त मामलेदार त्रिवेणी वेळीप, पालिका अभियंते व कामगाराना घेऊन तेथे गेले व सिमेंटाचे पक्के बांधकाम मोडून टाकले.

आर्थिक विकासाचे लक्ष्य : पंतप्रधान

यूपीए सरकारला तीन वर्षे पूर्ण

केंद्रातील यूपीए सरकारने आपली सत्तेतील तीन वर्षे (व एकूण आठ वर्षे) काल साजरी केली.

यावेळी पंतप्रधान मनमोह सिंग यांनी सांगितले की, देशाच्या आर्थिक विकासाचे लक्ष्य कायम राहणार असून भारत जगातील दुसरी वेगाने वाढणारी आर्थिक सत्ता आहे. आणखी खूप काही करायची गरज असून विकासात अस्थैर्य असल्याची कबुलीही त्यांनी दिली.

लपवाछपवी नको

आपल्या जैववैविध्यामुळे जगभरातील अभ्यासकांच्या कुतूहलाचा विषय असलेल्या पश्‍चिम घाटाच्या सद्यस्थितीबाबतचा माधवराव गाडगीळ समितीचा अहवाल दडपून टाकण्याचे केंद्र सरकारचे इरादे एव्हाना स्पष्ट झाले आहेत. स्वतः गाडगीळ यांनीच त्यासंदर्भात सरकारवर जाहीरपणे तोफ डागलेली आहे. पश्‍चिम घाटाचा सारा परिसर स्वतः पिंजून काढून अत्यंत तळमळीने त्या प्रदेशाच्या पर्यावरणाचा अभ्यास करून शास्त्रीय आधारावर आपण तयार केलेला अहवाल असा पायदळी तुडविला जात असल्याचे पाहून प्रा. गाडगीळ अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. केंद्रीय माहिती आयुक्तांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेण्याची सरकारची कृतीच हा अहवाल दडपण्याचे सरकारचे इरादे स्पष्ट करतात. मग एवढी वर्षे हा सारा खटाटोप केला त्याचे फलित काय? गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामीळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये पसरलेल्या पश्‍चिम घाटाच्या सह्याद्री व नीलगिरी पर्वतरांगांचा पर्यावरणीय अभ्यास करण्यासाठी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयानेच हा उच्चस्तरीय अभ्यास गट स्थापन केला होता. प्रा. माधव गाडगीळ यांच्या हाती त्याची धुरा सोपवली गेल्यानंतर त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक हा अभ्यास करून आपला अहवाल सादर केलेला आहे.

लोकायुक्ताच्या नेमणुकीला विघ्नं ती कसली?

- दिलीप बोरकर

‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नं’ म्हणतात, तशी गत सद्या गोव्यात लोकायुक्ताच्या नेमणुकीच्या बाबतीत होईल कि काय असे वाटायला लागले आहे. गोवा लोकायुक्त विधेयक २०११ सुरळीतपणे संमत होऊनसुद्धा आता लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांच्या नेमणुकीबद्धल जो वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तो पहाता हा वाद कृत्रिमपणे निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचे दिसून येते.

योगमार्ग-राजयोग (अस्तेय : १२)

- डॉ. सीताकांत घाणेकर

जग व्यवस्थित चालावे म्हणून मानवाने कायदे-कानून केले. सर्वांची अशी अपेक्षा असते की समाजातील प्रत्येक घटकाने त्यांचे काटेकोरपणे पालन करावे म्हणजे कुणालाही त्रास, दुःख होत नाही. हे कायदे तोडले जातात तेव्हा तो अपराध, गुन्हा ठरतो. असे विविध गुन्हे आहेत- काही लहान, काही मोठे. ह्या अपराधात एक सर्वमान्य गुन्हा म्हणजे चोरी. काही चोर्‍या जाणून-बुजून केल्या जातात. त्यात स्वार्थ असतो किंवा दुष्ट हेतू असतो. कुठल्याही हेतूने केलेली चोरी ही शेवटी चोरीच आहे. पण केव्हा केव्हा आपल्या हातून नकळत चोरी घडते त्यामुळे देखील पाप लागते त्याला देखील शिक्षा आहे. म्हणून चोरी न करणे-अस्तेय ह्या यमाबद्दल सुजाण व्यक्तींनी विचार करायला हवा. खरे म्हणजे आपल्या पूर्वजांनी अशा अनेक विषयांवर वेळोवेळी चिंतन करून विविध तर्‍हेने मार्गदर्शन केले आहे.

स्वागत तरुणोदयाचं...

- प्रा. रमेश सप्रे

गेल्यावेळी ‘अरुणोदयाच्या संधिप्रकाशात’ या समारोपात्मक लेखात आपण दृष्टिक्षेप टाकला होता. मुलांच्या कौटुंबिक व शैक्षणिक समस्यांवर आणि पालकांनी - शिक्षकांनी आपल्या दृष्टिकोनात व वागण्याच्या पद्धतीत (वर्तनशैलीत) कोणता बदल करावयाचा याबद्दल याची मुख्य सूत्रंही पाहिली होती.

आता लक्ष्य ठेवू या अरुणांच्या (अर्ली टीन एजेस) नव्हे तर तरुणांच्या (लेटर टीन एजेस) समस्या! हा वयोगट १७ ते १९ वर्षांचा. ढोबळ मानानं उच्च माध्यमिक स्तरावरचा. म्हणजे बाल्यावस्था मागे पडलीय..अरुणावस्था जागी झालीय. अशा मुलांच्या वयापेक्षा जरा वरचा वयोगट. यावेळी आपण आपलं चिंतन ‘विद्यार्थी केंद्री (चाइल्ड सेंटर्ड)’ न ठेवता ‘समस्या केंद्री (प्रॉब्लेम सेंटर्ड)’ ठेवणार आहोत. म्हणजे एका विशिष्ट मुलाच्या किंवा मुलीच्या जीवनाचा विचार न करता अनेक मुलांचा विचार एका विशिष्ट समस्येच्या संदर्भात करणार आहोत. यावेळी हे प्रास्ताविक सहचिंतन.

एलिना माथानी साल्ढाणा बिनविरोध

Story Summary: 

एलिना साल्ढाणा यांना निवड झाल्याचे पत्र देताना.

कॉंग्रेस व अपक्ष उमेदवाराची माघार; एलिना बिनविरोध

Story Summary: 

कुठ्ठाळी पोटनिवडणुकीचा नाट्यमय निकाल

कुठ्ठाळी मतदारसंघात येत्या ४ जून रोजी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीतून काल नाट्यमय घडामोडींत कॉंग्रेसचे उमेदवार रेमंड डिसा आणि अपक्ष उमेदवार रमाकांत बोरकर या दोघांनीही आकस्मिक माघार घेतल्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार व दिवंगत नेते माथानी साल्ढाणा यांच्या पत्नी एलिना यांची बिनविरोध निवड झाली आहे. अशा प्रकारे एखादा उमेदवार विधानसभेवर बिनविरोध निवडला जाण्याची ही गोव्यातील तिसरी घटना आहे. यापूर्वी लुईझिन फालेरो हे नावेली मतदारसंघातून, तर आलेक्स सिक्वेरा हे नुवे मतदारसंघातून बिनविरोध निवडले गेले होते.

एलिना यांच्या विरोधात कॉंग्रेसने रेमंड डिसा यांना उमेदवारी दिली होती, तर रमाकांत बोरकर यांनी आपण युगोेडेपाच्या वतीने उमेदवारी भरत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, नंतर युगोडेपाने बोरकर यांना ‘बी फॉर्म’न दिल्याने ते अपक्ष उमेदवार ठरले. त्यामुळे बोरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज काल मागे घेतला. दुसरीकडे कॉंग्रेसचे उमेदवार रेमंड डिसा यांनी कॉंग्रेस नेत्यांचा आपल्याला हवा तसा पाठिंबा मिळत नसल्याचे कारण देत रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

लोकायुक्त विधेयक अधिसूचित

Story Summary: 

अडीच महिन्यांत सुविधा पुरवणार

गोवा लोकायुक्त अधिसूचित झाल्याची माहिती काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

गेल्या ७ मे रोजी लोकायुक्त विधेयक मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पोचले. १२ मे रोजी राष्ट्रपतींनी त्यावर सही केली व गेल्या १८ रोजी ते अधिसूचित करण्यात आल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.

लोकपाल विधेयक राज्यसभेच्या समितीकडे

Story Summary: 

लोकसभेत संमत झालेले व राज्यसभेत गेल्या सत्रावेळी तांत्रिक कारणामुळे चर्चा पूर्ण होऊ न शकलेले बहुचर्चित लोकपाल व लोकायुक्त विधेयक काल पुन्हा राज्यसभेत आले असता सिलेक्ट समितीकडे पाठविण्यात आले. यामुळे गेल्या ४२ वर्षांपासून लांबत असलेली लोकपाल स्थापनेची प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.

गेल्या हिवाळी अधिवेशनावेळी चर्चा अपूर्ण राहिलेेले लोकपाल विधेयक काल कार्मिक खात्याचे राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी चर्चा व संमतीसाठी सभागृहात मांडल्यानंतर लगेच ते समितीकडे पाठविण्याचा ठराव मांडण्यात आला. विशेष म्हणजे हा ठराव समाजवादी पार्टीच्या नरेश अग्रवाल यांनी मांडला. त्याला भाजप तसेच डाव्या पक्षांनी व बहुजन समाज पार्टीने आक्षेप घेतला. असा ठराव हवा असल्यास केवळ संबंधित मंत्रीच मांडू शकतो असे सांगून सरकार पळवाट शोधण्यासाठी दुसर्‍या पक्षाचा आधार घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर नारायणसामी यांनी तसा ठराव मांडला व तो आवाजी मतदानाने संमत करण्यात आला.

कंत्राटदारांची ३०० कोटींची बिले प्रलंबित

दिगंबर कामत यांच्या सरकारच्या काळात काम केलेल्या कंत्राटदारांची बिले सदर सरकारने न फेडल्याने त्यांची सुमारे २०० ते ३०० कोटींची बिले पडून असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पिस्तुलप्रकरणी पकडलेल्या आरोपीकडून ४ किलो गांजा जप्त

देशी पिस्तूल, काडतुसे तस्करी प्रकरणी फोंडा पोलिसांनी परवा दि. १९ रोजी फर्मागुडी येथे अटक केलेल्या अखिलेश पारस गुप्ता (बिहार) याच्याकडून काल रोजी ४ किलो ९०८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे.

अटकेत असलेले आरोपी फक्त पिस्तुलांचीच तस्करी करत नव्हते तर गांजा सारख्या नशेलू पदार्थांची तस्करी देखील करत होते हे आता समोर आले आहे.

कळंगुटला ८१% मतदान

कळंगुट पंचायतीच्या काल झालेल्या निवडणुकीत ८१ टक्के मतदान झाले. मतदान शांततेत पार पडले. ११ प्रभागसाठी ७५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. आज मंगळवारी पेडे-म्हापसा येथील संकुलनात निकाल जाहीर केला जाईल.

आज बारावीचा निकाल

गेल्या मार्च महिन्यात झालेल्या बारावी इयत्तेचा निकाल आज मंगळवार दि. २२ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

३ ते २७ मार्च या दरम्यान विज्ञान, वाणिज्य, कला व व्यावसायिक अशा चार शाखांतील विद्यार्थी परीक्षेत बसले होते. १४५१६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

पुन्हा काटकसर

ग्रीसवरील आर्थिक संकटाची परिणती म्हणून जगापुढे पुन्हा उभ्या ठाकलेल्या आर्थिक पेचप्रसंगाचा तडाखा यावेळी भारतालाही जाणवू लागला आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी येणार्‍या काळात स्थिती अधिक बिकट होऊ नये यासाठी काटकसरीच्या उपाययोजनांची गरज नुकतीच व्यक्त केली होती. त्याला अनुसरून अर्थराज्यमंत्री नमोनारायण मीणा यांनी मंत्र्यांच्या, अधिकार्‍यांच्या विदेश दौर्‍यांना कात्री लावण्यापासून नव्या वाहन खरेदीस मनाई करण्यापर्यंत आणि पंचतारांकित हॉटेलांत मेजवान्या झोडण्यापासून नवीन पदांची निर्मिती करण्यास बंदी घालण्यापर्यंत अनेकविध निर्बंध नुकतेच जारी केले आहेत. अर्थात, काटकसरीच्या अशा घोषणा होण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. दोन वर्षांपूर्वी जागतिक बाजारपेठेत मंदी उद्भवली होती, तेव्हा स्वतः पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी काटकसरीचा संदेश देशाला दिला होता. तेव्हा नोकरशहा सोडाच, खुद्द मंत्रिगणांनीदेखील त्यांचे ते आवाहन पायदळी तुडवत चैन सुरूच ठेवली होती. तत्कालीन मंत्री शशी थरूर आणि एस. एम. कृष्णा पंचतारांकित हॉटेलांत मुक्काम ठोकून कसे राहिले होते त्याचा पर्दाफाश प्रसारमाध्यमांनी केला होता.

दुर्मिळतेच्या वाटेवरचे....!

- रामदास केळकर

बारदेश तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणावे असे गाव म्हणजे कोलवाळ! रेती व्यवसायामुळे आता ज्याच्या त्याच्या तोंडी असले तरी कधीतरी काळ्या खुब्यासाठीही ते प्रसिद्ध होते. बेली ब्रीजमुळे पेडण्याशी अधिक जवळीक या गावाने साधली तेव्हापासून एक एक गोष्टी नाहीशा होत गेल्या, म्हणण्यापेक्षा दुर्मिळ होत गेल्या असे म्हणाना! यादी करायला बसलो तेव्हा काही ठळक गोष्टी आढळत गेल्या. अर्थात् आधुनिकतेबरोबर नाविन्याचा शोध व जुन्याचा विसर होणे साहजिकच. त्यामुळेच त्याची हळहळ न करता, एक इतिहास याच नजरेने, तटस्थतेने या गोष्टीकडे बघणे जास्त महत्वाचे.

मुख्यमंत्री पर्रीकरांनी दिला तरुणाईला सल्ला

Story Summary: 

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पर्रीकर.

आवडीप्रमाणेच व्यवसाय क्षेत्र निवडा

Story Summary: 

मुख्यमंत्री पर्रीकरांनी दिला तरुणाईला सल्ला

बबन भगत यांजकडून

उच्च विद्याविभूषित व शिक्षणात रस घेणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल कला अकादमीत उच्च व व्यावसायिक शिक्षण घेऊ पाहणार्‍या राज्यातील सुमारे १०० विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणे आपल्या रोजच्या खुसखुशीत व किंचित विनोदी शैलीत संवाद साधला. निमित्त होते एस्. एस्. धेंपो वाणिज्य महाविद्यालयाने आयोजित केलेले ‘एड्यू नेक्स्ट’ हे शिक्षण व व्यवसायसंधी याबाबबत माहिती देणारे प्रदर्शन.

थेट विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांनी सुरू झालेला हा सुसंवाद मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची बुध्दी, विनोदबुध्दी व हजरजबाबीपणा यामुळे अपेक्षेपेक्षाही अधिक रंगला. यावेळी पर्रीकर यांनी आपले अंतरंग उघडून दाखवतानाच विद्यार्थ्यांच्या अंतरंगांतही शिरण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

कुडाळ येथे कर्नाटक एसटी बस फोडली

Story Summary: 

परवा निपाणी येथे महाराष्ट्राच्या एसटी बसवर झालेली दगडफेक व बस जाळण्याचा झालेला प्रयत्न यानंतर काल कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे कर्नाटकची बस फोडण्याचा प्रकार घडला.

काल पहाटे ६ वा. के. ए. २२ एफ १५७६ ही कुडाळ ते बेळगाव ही कर्नाटक परिवहन मंडळाची बस कुडाळ बसस्थानकावरून सुटल्यानंतर काही वेळाने सुमारे वीस जणांच्या जमावाने बस अडवली त्यानंतर चालक व वाहकांना ओडून बाहेर काढले आणि प्रवाशांना खाली उतरण्याची विनंती केली. यावेळी पाच सहा प्रवासी बसमध्ये होते.

उमेदवारी मागे घेण्याचा आज अंतिम दिवस

Story Summary: 

कुठ्ठाळी पोटनिवडणूक

कुठ्ठाळी मतदारसंघात येत्या ४ जून रोजी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवारी मागे घेण्याची आज अंतिम तारीख आहे.

भाजपतर्फे या मतदारसंघातून भाजपचे दिवंगत नेते माथानी साल्ढाणा यांच्या पत्नी एलिना साल्ढाणा, कॉंग्रेसतर्फे रेमंड डिसा, तर अपक्ष उमेदवार म्हणून रमाकांत बोरकर हे निवडणूक रिंगणात आहेत. बोरकर हे युगोडेपाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांना ‘ए’ फॉर्म न दिल्याने त्यांना निवडणूक अधिकार्‍याने युगोडेपाचे चिन्ह देण्यास नकार दिल्याने त्याना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे लागले.

दोघांचा बुडून मृत्यू

साळगावच्या युवकाचे तिळारीत बुडून निधन

सासोली हेदुस करमळकरवाडी येथील तिलारी नदीत रविवारी आंघोळ करण्यासाठी आलेल्या साळगाव - गोवा येथील दीपक श्यामसुंदर कोनाडकर या तरुणाचा बडून मृत्यू झाला. दीपकचा मृत्यू त्याच्या भावासमक्षच होण्याचा दुर्दैवी प्रकार घडला.

त्यांनी कुणाला विकली पिस्तुले?

तिघांना पाच दिवस रिमांड

बाहेरून पिस्तुले आणून गोव्यात ४० ते ४५ हजार रुपयांना विक्री होत असल्याचे उघडकीस आले असून परवा फोंड्यात पिस्तुले व जीवंत काडतुसांसह अटक ण्यात आलेल्या त्या दोघांनी गोव्यात त्यांनी कोणा कोणाला पिस्तुले विकलेली आहेत याचा तपास केला जात आहे.

खनिज वाहतुकीसंबंधी आज दक्षिण जिल्हाधिकार्‍यांची बैठक

कोडली दाभाळ येथील सेझा गोवा कंपनीकडून गेल्या दि. ४ जानेवारीपासून बंद ठेवलेली खनिज वाहतूक पूर्ववत चालू करण्यासाठी कंपनीने दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांजवळ संरक्षण देण्याची मागणी केल्याचे समजले.

आयपीएलविरुद्ध कीर्ती आझाद यांचे उपोषण

माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार कीर्ती आझाद यांनी आयपीएलमधील गैरकृत्यांच्याविरोधात कालपासून फिरोजशहा कोटला येथे उपोषण सुरू केले आहे. आयपीएलचे ज्या प्रकारे व्यवस्थापन केले जात आहे ते विवादास्पद असून स्पर्धेला वादग्रस्ततेचे ग्रहण लागल्याचा आरोपही आझाद व त्यांच्यासह उपोषणास बसलेल्यांनी केला आहे.

वैविध्यपूर्ण फुलपाखरांचा पश्‍चिम घाटात विहार

पश्‍चिम घाटात जैविक संपत्तीची श्रीमंती असून नाना प्रकारचे पक्षी, कृमी, कीटक यांचा वारसा लाभलेला आहे. हिवाळा आला की गोव्याच्या जंगलात फुल पाखरांच्या निरीक्षणाची अपूर्ण संधी असते.

‘रुपयाच्या दरात घसरण चिंतेची बाब’

रुपयाच्या दरात होत असलेली घसरण ही चिंतेची बाब असल्याचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी काल सांगितले. मात्र सरकार परिस्थिती सुधारण्याकरिता प्रयत्नरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेली रुपयाची घसरण यासंबंधी अर्थमंत्र्यांनी प्रथमच काल भाष्य केले.

एड्यू नेक्स्टचे उद्घाटन

Story Summary: 

एड्यू नेक्स्ट प्रदर्शनास मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी काल भेट दिली.

आजच्या विद्यार्थ्यांना उदंड शैक्षणिक सुसंधी : वाघ

Story Summary: 

नवहिंद टाइम्स व धेंपो महाविद्यालयाच्या एड्यू नेक्स्टचे उद्घाटन

जग आता झपाट्याने बदलू लागलेले असून चांगले शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना आता नव्या नव्या संधी उपलब्ध होऊ लागल्या असल्याचे आमदार व कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू सूर्या वाघ यांनी सांगितले.

एस. एस. धेंपो वाणिज्य महाविद्यालय आणि नवहिंद टाइम्सतर्फे नव्या पिढीसाठी शिक्षण व व्यवसाय संधी प्रदर्शित करणार्‍या ‘एड्यू नेक्स्ट’चे समई प्रज्वलनाने उद्घाटन केल्यानंतर बोलताना त्यानी वरील उद्गार काढले.

भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीस उपस्थित राहणार नाही : येडीयुरप्पा

Story Summary: 

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपली उपेक्षा होत असल्याची भावना बनलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे काल जाहीर केले. येत्या २४ मे पासून मुंबईत ही बैठक होणार आहे. आपल्याला पुन्हा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी बसवण्यात यावे अशी येडीयुरप्पांची मागणी आहे.

आपण भाजप सोडणार नाही वा कॉंग्रेससहित कोणत्याही नव्या राजकीय पक्षात प्रवेश करण्याचा आपला विचार नाही असेही येडीयुरप्पा यांनी सांगितले. ‘‘मी कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. ते खोटे आहे. कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही’’ असे येडीयुरप्पांनी सांगितले.

फोंड्यातील कंत्राटदाराची डिचोलीत आत्महत्या

Story Summary: 

मये येथील एका हॉटेलात वस्तीत आलेल्या सिल्वानगर फोंडा येथील ५७ वर्षीय इसमाने हॉटेलात काल रात्रौ गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती डिचोली पोलीस स्थानकातून देण्यात आली.

उपलब्ध माहितीनुसार मयत इसमाचे नाव विश्‍वास शांताराम हरमलकर असे असून तो कंत्राटदार होता व काल दुपारी १२ वा. त्याने मये येथील ‘मये लेक व्ह्यू हॉटेल’मध्ये खोली आरक्षित केली होती. त्यानंतर तो रूममध्ये गेला व नंतर बाहेरच आला नाही. रूममध्ये गेल्यानंतर त्याने दूरदर्शन संच चालू ठेवल्याने रात्रौपर्यंत कोणाला संशय आला नाही.

आचारसंहिता भंगाच्या आरोपातून मुक्त : ट्रोजन

विधानसभा निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग केल्याचा आपणावर निर्वाचन अधिकारी जयंत तारी व माध्यम समितीचे चेअरमन नारायण नावती यांनी जो आरोप ठेवला होता त्या आरोपातून आपली राज्यस्तरीय माध्यम समितीने निर्दोष सुटका केली असल्याचे ट्रोजन डिमेलो यांनी काल सांगितले.

मडगावातील हत्या प्रकरणी आरोपीस सक्तमजुरी

पांढरेवाडी-सांगली येथील भिवा शिंदे (३७) याच्या हत्याप्रकरणी दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजया पोळ यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) खाली दोषी ठरवून मिलाग्रीस आफोंसो याला ५ वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. शासनातर्फे सरकारी अभियोक्ता सुभाष देसाई यांनी बाजू मांडली. सदर घटना ११ मे २००९ रोजी पहाटे एक वाजता आके-मडगाव येथील कोकण रेल्वे उड्डाण पुलाजवळ घडली होती.

भडकलेल्या ममतांचा टीव्ही कार्यक्रमातून काढता पाय

थेट प्रक्षेपित होत असलेल्या एका टीव्ही कार्यक्रमात विचारल्या गेलेल्या एका प्रश्नावर चिडून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अर्ध्या कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

फॅशन डिझाईन संचालिकेविरुद्ध फसवणुकीची तक्रार

सांगोल्डा येथील निदा अली या विद्यार्थ्यानीने इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन, गोवा केंद्राच्या संचालिका अनुपमा काथियानी यांच्यावर फसवणुकीच्या आरोपाखाली काल पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली आहे.

काश्मीरमध्ये पोलीस ठाण्यावर बॉम्बहल्ला

जम्मू व काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर पोलीस स्थानकावर दहशतवाद्यांनी काल हातबॉम्ब फेकला. पोलीस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच हा बॉम्ब फुटला.

ज्येष्ठ समाजवादी नेते मोहाडीकर यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेते व साने गुरुजींचे शिष्य प्रकाश मोहाडीकर यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव दादर येथील सानेगुरुजी शाळेत ठेवण्यात येणार आहे.

जगन्मोहन रेड्डी यांच्या सीबीआय चौकशीस संमती

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचा पुत्र जगन्मोहन रेड्डी यांची सीबीआय चौकशी करण्यास आंध्र प्रदेश सरकारने अनुमती दिली आहे. बेहिशेबी संपत्ती प्रकरणी ही चौकशी केली जाणार आहे. रेड्डी यांच्या मालकीच्या जगती प्रकाशनसंस्थेच्या, इंदिरा टेलिव्हिजनच्या व जननी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या मालमत्तेवरही जप्ती आणण्यास सरकारने अनुमती दिली आहे.

शाहरुखनेच गैरवर्तन केल्याचा सुरक्षा रक्षकाचा दावा

बुधवारी रात्री शाहरुख खान आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांच्या बाचाबाचीवेळी मध्ये पडून वाद मिटवण्याचा प्रयत्न करणारे ५२ वर्षीय सुरक्षा रक्षक विकास बाळकृष्ण दळवी यांना सध्या टीव्ही वाहिन्यांनी भंडावून सोडले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्यांना या त्रासामुळे रजेवर पाठवले आहे.

शाहरुखचे वागणे अनुचित : ठाकरे

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचे वानखेडे स्टेडियममधील वागणे उचित नव्हते अशी टीका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या त्याच्यावर पाच वर्षे वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेशबंदी लागू करण्याच्या निर्णयाचे ठाकरे यांनी समर्थन केले.

कुठे गेली सहनशक्ती?

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान पारा चढला आणि प्रश्‍नकर्त्यांवर तुम्ही माओवादी आहात असा आरोप करीत त्या थेट प्रक्षेपित होत असलेल्या कार्यक्रमातून तडक बाहेरही पडल्या. अलीकडे टीव्हीवरील अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये पाहुण्याला राग येणे हे त्या कार्यक्रमाच्या यशस्विततेचे गमक मानले जाऊ लागले आहे आणि थेट, बोचर्‍या प्रश्‍नांनी आलेल्या पाहुण्याची भंबेरी कशी उडवायची त्याचे डावपेच अनेक यशस्वी अँकर आखत असतात. ममता दीदींच्या बाबतीत घडले ते मात्र वेगळे होते. येथे प्रश्न विचारणारे जाधवपूर विद्यापीठाचे विद्यार्थी होते. थेट आलेले बोचरे प्रश्‍न ममतांना एवढे झोंबले की त्या प्रश्‍नकर्त्या विद्यार्थ्यांनाच माओवादी ठरवून त्या मोकळ्या झाल्या. सार्वजनिक जीवनात वावरणार्‍या व्यक्तीने असे संवेदनशील होऊन चालेल का हा प्रश्न या सार्‍या वादात उपस्थित होतो आहे. आंबेडकरांच्या व्यंगचित्रांवरून माजलेला गदारोळ असो वा ममतांचे हे कार्यक्रमातून काढता पाय घेणे असो, आपली नेते मंडळी दिवसेंदिवस असंवेदनशील आणि असहिष्णू होत चालली आहेत की काय असा प्रश्न त्यामुळे जनतेला पडू लागलेला आहे.

पंचायतींचे अपेक्षित परिवर्तन सार्थकी लागो....!

- रमेश सावईकर

राज्यातील १८४ ग्रामपंचायतींच्या १४८२ प्रभागांसाठी दि. १६ मे रोजी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी ८२.१२ टक्के मतदान करून पंचायतींमध्ये लोकशाही राज्य सशक्त करण्याची आपली जबाबदारी हक्काने पार पाडली. एवढेच नव्हे तर मतदानाद्वारे जो कौल दिला, तो अर्थपूर्ण, लोकशाहीची ताकद काय असते याची पुरेपूर ग्वाही देणारा ठरला.

प्रत्येक पंचायतीमध्ये सरासरी ७० टक्क्यांपेक्षा जास्त चेहर्‍यांना मतदारांनी संधी दिली. आजी-माजी, विद्यमान सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य जे या निवडणूक रिंगणात ‘स्वकल्याण’ साधण्याच्या हेतूने उभे होते, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे महत्वपूर्ण काम मतदारांनी केले. ते केव्हढे सत्कार्य (?) होते याकडे आमचे लक्ष होते. आणि त्याचा जाब लोकशाही मार्गाने जनकौलाद्वारे मतदारांनी देऊन एक नवा ‘धडा’ जुन्या-नव्यांसाठी घालून दिला आहे. ‘पंचायती राज’ वरचा विश्‍वास ढळलेला नाही हे ग्रामीण भागातील सुज्ञ मतदारांनी दाखवून दिले आहे.

अपरिचित मारिओ

- रामनाथ न. पै रायकर

हजारो शब्द खर्च घालूनही जी गोष्ट एखादेवेळी व्यक्त करणे शक्य होत नाही, तीच गोष्ट ब्रशच्या काही फटकार्‍यांनी सहज सांगता येते अशा अर्थाची एक म्हण प्रचलित आहे. लेखणीच्या जोरापेक्षा कुंचल्याच्या रेषा सदैव अधिक परिणामकारक ठरत आलेल्या आहेत, हे एखाद्या डोळस माणसाला पटवून द्यायला वर उल्लेखीत म्हणीची तशी गरज पडत नाही. चित्र हे माध्यम आपल्यातील आशय एखाद्या अज्ञानी व्यक्तीपर्यंतदेखील सहजतेने पोचविते, जे लिखित मजकुराला शक्य नसते. थोर गोमंतकीय व्यंगचित्रकार मारिओ द मिरांदा यांची व्यंगचित्रे तर बघणार्‍यांपुढे अवघे विश्‍वच उभे करतात. किंबहुना मारिओची प्रत्येक कलाकृती म्हणजे एखाद्या कादंबरीचे प्रकरणच ठरावे. त्यांच्या व्यंगचित्रांमधील तपशील, बारीकसारीक गोष्टी, एखाद्या प्रचंड शिल्पावर डोळ्यात न मावणारे सूक्ष्म कोरीवकाम असावे त्याप्रमाणे छोट्या-छोट्या चित्रमय नोंदींची नक्षी उमटवीत जाते.

दहावीनंतर...महत्त्वाच्या प्रवासाचा आरंभ

- प्रा. रामदास केळकर

शैक्षणिक स्तरावर नवनवीन मोकळेपणा येत आहे. आठवीपर्यंत ना नापास धोरण, परीक्षा मोकळ्या वातावरणात व्हाव्यात यासाठी आग्रह होत आहे. अशा वातावरणातदेखील दहावीचे महत्त्व अजूनतरी वेगळे आहे. विद्यार्थी जीवनातील हा एक परीक्षापूर्व पहिला टप्पा. आणि येथूनच विद्यार्थ्यांच्या भावी करिअरचे मार्ग सुरू होतात. एका मार्गाने चालणारे हजारो विद्यार्थी आपापल्या कुवतीनुसार कला, विज्ञान, वाणिज्य, व्यावसायिक, आयटीआय आदी मार्गांचा स्वीकार करतात. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके पालक आपल्या मुलांच्या भावी वाटचालीची योजना पूर्वीच आखून ठेवतात. दहावीनंतर कुठले मार्ग इथल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत, याचा विचार या लेखात आपण करणार आहोत.

रडण्यास मनाई असलेलं गाव

- लाडोजी परब

निसर्गाचे वरदान आणि देवदेवतांचा वरदहस्त हे कोकणाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यामुळेच अनेक प्रथा या जनमानसातूनच येथे रुजल्या आहेत. कोकणातल्या प्रत्येक गावात ग्रामदेवतेचे एखादे मंदिर असतेच. या मंदिरांशी संबंधित प्रथा-परंपराही तेवढ्याच वैशिष्ट्यपूर्ण तथा अद्भुत म्हणाव्या अशाच असतात. पूर्ण गाव या प्रथा-परंपरांचे पालन करते. असेच एक गाव म्हणजे कणकवलीजवळ वसलेले निसर्गरम्य श्रावण. या गावातील तळेवाडीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे रडायला सक्त मनाई आहे. गावात कुणीच रडत नाही. कुणाला रडायचंच असेल तर त्याला वेशीबाहेर जावे लागते. काही अघटित घटना घडली तरी सारे विधी न रडता मूकपणे अश्रू न ढाळता पूर्ण केले जातात. हा इथला अलिखित असा परंपरागत नियमच आहे. गेली कित्येक वर्षे ही परंपरा येथे सुरू आहे. ग्रामस्थ ती परंपरागत पाळत आले आहेत.

मडगाव रेल्वे स्थानक परिसरात अतिक्रमणे हटविली

Story Summary: 

मडगाव रेल्वे स्थानक परिसरात अतिक्रमणे हटविताना पालिका कर्मचारी. (छाया : गणादीप शेल्डेकर)

आर्थिक पेचप्रसंगाशी मुकाबल्याकरिता केंद्रीय मंत्री, अधिकार्‍यांवर निर्बंध

Story Summary: 

प्रमुख उपाययोजना

विदेशवारीच्या खर्चास कात्री

नवीन वाहन खरेदीस मनाई

पंचतारांकित हॉटेलात बैठकांस बंदी

उभे ठाकलेल्या आर्थिक पेचप्रसंगांतून सहीसलामत सुटण्यासाठी केंद्र सरकारने काल काटकसरींचे उपाय म्हणून काही निर्बंध जारी केले आहेत. यानुसार मंत्र्यांच्या व वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांच्या विदेश वार्‍यांवरील खर्चास कात्री लागणार असून सरकारी खर्चात पंचतारांकित हॉटेलात बैठका घेणे तसेच नवीन गाड्यांची खरेदी करण्यावर बंदी लागू करण्यात येणार आहे.

वित्तीय तूटीचा सामना करण्यासाठी सरकारने कंबर कसली असून त्याचाच भाग म्हणून वरील उपाययोजना करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री नमो नरेन मीना यांनी काल केली. अर्थसंकल्पीय तूट भरून काढणे व खर्चाचे व्यवस्थापन याकरिता काटेकोरपणे वरील निर्देशांचे पालन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

युगोडेपाने उमेदवारी नाकारल्याने बोरकर अपक्ष म्हणूनच रिंगणात

Story Summary: 

कुठ्ठाळी पोटनिवडणूक

दि. ४ जून रोजी होणार्‍या कुठ्ठाळी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवार रमाकांत बोरकर यांना युगोडेपाने ‘ए फॉर्म’ न दिल्याने निवडणूक आयोगाने त्यांना ‘दोन पाने’ हे चिन्ह देण्यास नकार दिला. त्यामुळे बोरकर यांच्यावर वरील मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची पाळी आली आहे. बोरकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे.

बोरकर यांनी युगोडेपाचे उमेदवार म्हणून निवडणूक अधिकार्‍यांकडे अर्ज दाखल केला होता. बी फॉर्म त्यांच्याकडे होता. दहा सदस्यांनी त्यांच्या अर्जावर अनुमोदक म्हणून सह्या केल्या होत्या, परंतु छाननीच्यावेळी बोरकर यांच्याकडे ‘ए’ फॉर्म नसल्याचे आढळून आले. त्यामुळे निवडणूक अधिकार्‍यांनी त्यांना युगोडेपाचे चिन्ह देण्यास नकार दिला.

शाहरुखला वानखेडेवर बंदी

Story Summary: 

परवाच्या आयपीएल सामन्यावेळी सुरक्षा रक्षक व मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षा म्हणून शाहरुख खानवर वानखेडे प्रवेशास पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय काल मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतला.

दरम्यान, एखाद्या मोठ्या सेलेब्रिटीला अशाप्रकारे शिक्षा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सयुक्त मालक असलेल्या शाहरुखने संघाने सामना जिंकल्यानंतर धिंगाणा घातल्याचा आरोप होता. याप्रकरणी तक्रारही नोंदवण्यात आली होती.

मच्छीमारी बंदी ६० दिवस नको

४७ दिवसांचा प्रस्ताव

बहुसंख्य मच्छीमारांनी विरोध केल्याने मच्छीमारी बंदीचा काळ ६० दिवस करण्याचा सरकारचा प्रस्ताव बारगळून पूर्वीप्रमाणे १५ जून ते ३१ जुलैपर्यंत ४७ दिवस बंदीचा काळ उरण्याची शक्यता आहे.

वरील प्रकरणी आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा करून पुढील दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेणार असल्याचे खात्याचे मंत्री आवेर्तीन फुर्तादो यांनी सांगितले.

आरोग्य संचालकांची नेमणूक ज्येष्ठांना डावलून-आलेक्स रेजिनाल्ड

कॉंग्रेसपेक्षा भाजपा पक्ष वेगळा आहे, असे सांगणार्‍या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सात ज्येष्ठ अधिकार्‍यांना डावलून वादग्रस्त अधिकारी डॉ. संजीव दळवी यांची आरोग्य खात्याच्या संचालकपदी नेमणूक करून खरे रूप दाखविले आहे. तेही कॉंग्रेसच्याच वाटेने जात आहेत, असा आरोप आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केला.

जीसीएचे पुन्हा एकदा बक्षीस वितरण

गोवा क्रिकेट असोसिएशनने येत्या २२ मे रोजी दोन विजेत्या संघांना गौरवण्यासाठी तसेच बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला आहे.

जीसीएने यंदाच्या मोसमातील स्पर्धा सुरू असतानाच माजी अध्यक्ष दयानंद नार्वेकर यांनी घाईघाईतच दि. ५ मे रोजी बक्षीस वितरण सोहळा पार पाडला होता. यावेळी माजी कसोटीपटू बलविंदर सिंग उपस्थित होते.

एड्यू-नेक्स्टचे आज उद्घाटन

एस. एस. धेंपो वाणिज्य महाविद्यालय आणि ‘नवहिंद टाइम्स’तर्फे आयोजित ‘एड्यू-नेक्स्ट गोवा’ या कार्यक्रमाचे उद्घाटन आज १९ रोजी सकाळी १० वा. कला अकादमीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होईल.

बारावीचा निकाल २२ रोजी

गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार दि. २२ रोजी संध्या. ४ वा. जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, विविध तालुक्यांतील शाळांना दि. २३ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत पुढील व्यवस्थेनुसार गुणपत्रिका वितरित केल्या जातील.

फर्मागुढी अपघातात दुचाकी चालक ठार

फर्मागुडी येथे आतिश हॉटेलजवळ हमरस्त्यावर काल दुपारी ३ वाजता ट्रक व मोटरसायकल यांच्यात झालेल्या टकरीत मोटरसायकल चालक सदानंद गावडे (३०) मरण पावला. इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

रूमडामळ विठ्ठल मंदिरात चोरी

रूमडामळ-दवर्ली येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात घुसून फंडपेटी फोडून त्यातील रोख रक्कम व इतर सामान मिळून ४० हजारांची चोरी केली. चोरांनी दरवाजा तोडला व आत घुसले.

कळंगुट छाप्यात १७ जुगार्‍यांना अटक

राजीव गांधी आणि पंचायतीराज

- शंभू भाऊ बांदेकर

स्वातंत्र्यानंतर केलेल्या एका जाहीर भाषणात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी म्हणाले होते की, ‘वीस माणसे केंद्रात एकत्र बसून खर्‍या अर्थाने लोकशाही राज्य चालविता येणार नाही किंवा लोकशाहीची मुळे तळागाळात खोलवर रुजवता येणार नाहीत. त्यासाठी प्रत्येक गाव, खेडेगाव हा केंद्रबिंदू मानून त्यासाठी शिस्तबद्धपणे काम हाती घ्यावे लागेल.’

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर पं. नेहरू म्हणाले होते की, ‘फक्त लोकांसाठी काम करणे हे महत्त्वाचे नसून लोकांत राहून लोकांची कामे करणे आणि गावच्या, राज्याच्या, देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत सगळ्या लोकांना सामावून घेणे हे महत्त्वाचे आहे.’

डॉनगिरी

मुंबईतील आयपीएल क्रिकेट सामन्यानंतर अभिनेता शाहरुख खान आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यात झडलेली शाब्दिक चकमक आणि त्यानंतरच्या सर्वच घडामोडी अत्यंत दुर्दैवी आहेत. या वादाची परिणती म्हणून शाहरुखवर मुंबई क्रिकेट असोसिएशनने पाच वर्षे वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेशबंदी घातली आहे. त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रारही यापूर्वीच दाखल झालेली आहे. एका सर्वपरिचित सेलिब्रिटीसंदर्भातील हा वाद असल्याने सर्व प्रसारमाध्यमांचे लक्ष त्याकडे वेधले जाणे साहजिक आहे. मात्र, हा वाद एवढा चिघळणे योग्य नाही आणि गोष्टी एवढ्या चिघळण्याचा दोष दोन्ही बाजूंकडे जातो. शाहरुखचे आज जे खलनायकी चित्र निर्माण केले जाते आहे ते योग्य नाही. सभ्य, सुसंस्कृत आणि अत्यंत तरल विनोदबुद्धी असलेला हा अभिनेता आहे. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर प्रत्यक्षात वादाची ठिणगी उडली तेव्हाचे शाहरुखचे वर्तन अनाकलनीय आहे. त्याच्यावर आरोप होतो आहे त्याप्रमाणे तो खरोखरच मद्य प्राशन करून आला होता का आणि त्याच्या संतापाचा पारा एवढा वाढवण्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांची आणि जे तेथे तेव्हा उपस्थित होते त्या बघ्यांची भूमिका काय हे जोवर स्पष्ट होत नाही तोवर चूक कोणाची यासंदर्भात ठोस निर्णय घेता येत नाही.

मतमोजणी केंद्रावर निकालांची प्रतीक्षा

Story Summary: 

 दक्षिण गोव्यात मडगाव मतमोजणी केंद्रावर निकालांची प्रतीक्षा.(छाया : गणादीप शेल्डेकर)

नव्या चेहर्‍यांना कौल

Story Summary: 

सरपंच, उपसरपंच निवड पुढील आठवड्यात

राज्यातील १८४ पंचायतीतील १४८२ प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी काल रात्री उशिरापर्यंत चालू होती. बहुतेक पंचायतींवर २१ ते २५ वयोगटातील नवीन चेहरे निवडून आले आहेत. अनेक आजी माजी सरपंच, उपसरपंचांचा पराभव झाला. निवडून आलेल्यांमध्ये अनेक महिलांचा समावेश आहे. पुढील आठवड्यात नव्या सरपंचांची निवड केली जाईल.

सरपंच, उपसरपंचाचा निवडणुकीसाठी एक आठवडाभर देण्यात आल्याचे पंचायत संचालकांनी सांगितले. निवडून आलेल्या पंच सदस्यांनी काल विजयोत्सव साजरा केला. काल सकाळपासून विजयी उमेदवारांच्या मिरवणुका चालू होत्या.

८०% पंचायतींवर भाजपचा झेंडा : पर्रीकर

Story Summary: 

राज्यातील ८० टक्के पंचायतींवर भाजपचाच झेंडा फडकवल्याचे सांगून गेल्या दोन महिन्यांच्या काळात सरकारने केलेली कामे व वेगवेगळ्या जनहिताच्या निर्णयांचीच जनतेने पावती दिल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले.

पंचायत निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर काल दुपारपासून संध्याकाळी उशिरापर्यंत विजयी उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांची येथील भाजप कार्यालयासमोर प्रचंड गर्दी झाली होती.

जीसीएचा वाद संपेना

Story Summary: 

निवडणुकीच्या मुद्द्यावर पुन्हा पेच

गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) नवे अध्यक्ष म्हणून विनोद (बाळू) फडके यांनी १३ रोजी ताबा घेतला. परंतु माजी अध्यक्ष नार्वेकर आणि नूतन अध्यक्ष फडके यांमधील वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत.

सध्या निवडणूक प्रक्रियेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. व्यवस्थापकीय समितीचा निर्णय अव्हेरून निवडणूक प्रक्रिया चालू ठेवण्याचे काम निवडणूक समितीचे अध्यक्ष ऍड. दिलीप दाभोळकर आणि मॅक्स फुर्तादो यांनी काल दि. १६ पासून येथील क्षात्रतेज संस्थेच्या कार्यालयात चालू ठेवले असून निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. जीसीएचे सचिव प्रसाद फातर्पेकर यांच्याशी संपर्क साधला असता अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया अधिकृत नसल्याचे त्यांनी सांगितले.

गैरवर्तन केल्याप्रकरणी शाहरुखविरुद्ध गुन्हा

कोलकता नाईट रायडर्स या आयपीएल संघाची भागिदारी असलेला बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याने वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट सामन्यानंतर गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शाहरुखने यासंदर्भात माफी मागण्यास नकार दिला आहे. ‘‘मी प्यायलेलो नव्हतो. मी माझ्या मुलांना आणायला गेलो होतो. तेथील कर्मचारी अतिशय आक्रमक होते. मी संतापलो होतो, परंतु मी तेथून निघालो. रागाच्या भरात मी काही बोललो असेन, पण मी एकटा होतो आणि ते वीस - पंचवीस होते आणि ते अत्यंत उद्धटपणे बोलत होते’’ असे शाहरुखने या वादासंदर्भात पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी आपली माफी मागायला हवी असेही शाहरुख म्हणाला.

संगमा यांना राष्ट्रपतीपदासाठी नवीन व जयललितांचा पाठिंबा

राष्ट्रपतीपदासाठी पी. ए. संगमा यांच्या नावास पाठिंबा देण्याची तयारी ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दर्शवली आहे. बिजू जनता दल तसेच जयललिता यांचा अभाअद्रमुक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व लोकसभेचे माजी सभापती पी. ए. संगमा यांना पाठिंबा देण्यास तयार आहे असे त्यांनी सांगितले. पटनाईक यांनी नुकतीच जयललिता यांची चेन्नईत भेट घेतली होती. त्यात या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे ते म्हणाले. संगमा यांनी दोन दिवसांपूर्वीच जयललिता यांची भेट घेतली होती.

‘लोकपाल’ मंगळवारपर्यंत राज्यसभेत

- लोकायुक्तबाबत तरतूद गाळणार -

बहुचर्चित लोकपाल विधेयक सोमवार किंवा मंगळवारपर्यंत राज्यसभेत चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनावेळी लोकसभेत संमत झालेल्या या विधेयकावरील चर्चा राज्यसभेत तांत्रिक कारणांमुळे पूर्ण होऊ शकली नव्हती. हे विधेयक नव्याने राज्यसभेत चर्चेसाठी येणार असून त्यात दुरुस्त्या करण्यात आल्याचे कळते. दुरुस्त्यानुसार विधेयकातील लोकायुक्तबाबतची तरतूद गाळण्यात आली असून सीबीआय प्रमुखांच्या नियुक्तीबाबत अधिक पारदर्शकता आणल्याचे कळते.

बीएमडब्ल्यू चालकाच्याओळख परेडीस मनाई

गुडगाव येथे एका गोमंतकीय दांपत्याच्या इंडिगो कारला ठोकर देऊन सौ. क्षमा शेट्ये यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बीएमडब्ल्यू चालकाची ओळख परेड घेण्यास स्थानिक न्यायालयाने गुडगाव पोलिसांना काल परवानगी नाकारली.

मराठी भाषेच्या कुशीतच दोष आहे की काय!

- विजय बा. नाईक, सोनाळ- वाळपई,

बुधवार दि. ९/५ च्या दै. ‘नवप्रभा’तील वाचकीय सदरामध्ये ग. ना. कापडी यांनी ‘मराठीवर अन्याय होऊनही सर्व गप्प कसे?’ हे पत्र वाचनात आले. पणजी दूरदर्शनवर कोंकणीबरोबर मराठीतूनही बातमीपत्र सादर व्हावे अशी मागणी त्यांनी केली होती. त्याला अनुसरून सुरेश वाळवे यांनी त्यांना खासगीत पत्र पाठवून संध्याकाळी ७.०० ते ७.१५ या दरम्यान प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेत बातमीपत्रे सादर करण्यात येतात, त्यामुळे गोव्यातही कोंकणी बातमीपत्र सादर करण्यात येते. त्यामुळे मराठी बातमीपत्राचा आग्रह धरू नये, कोंकणी ‘खबरो’ वरच धन्यता मानावी असे सूचित केले आहे असा उल्लेख कापडी यांनी केला आहे.

सत्तातुराणां...

कर्नाटकमधील एक स्वच्छ छबीचे नेते म्हणून जनतेने ज्यांच्याकडे एकेकाळी आशेने पाहिले होते, त्या बी. एस. येडीयुराप्पा यांची प्रतिमा लोकायुक्तांचा अहवाल आणि त्यानंतरच्या घडामोडींनी जेवढी डागाळली नसेल, तेवढी त्यांच्या गेल्या काही महिन्यांतील सत्तापिपासूपणातून डागाळली गेली आहे. गेले जवळजवळ सहा महिने ते आपल्याला पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवा असा गळा काढून भाजपा नेतृत्वावर दबाव आणण्याचा हरघडी प्रयत्न करीत आले. लोकायुक्तांच्या अहवालात दोषी धरले गेल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडण्यास पक्षनेतृत्वाने फर्मावले तेव्हादेखील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी खुर्ची सोडलेली नव्हती. शेवटी निरुपाय झाला तेव्हा खुर्ची त्यागताना त्यांनी सदानंद गौडांनाच त्या पदावर बसवा असा आग्रह धरला. आता त्याच गौडांवर निष्क्रियतेचा आणि विश्वासघाताचा आरोप करून येडी मोकळे झाले आहेत. मुख्यमंत्रीपदावरून गौडा यांना उतरवा आणि स्वतःला त्या ठिकाणी बसवा असे सांगणार्‍या येडीयुराप्पांनी असा कोणता पराक्रम केला आहे म्हणून पक्षाने त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदावर बसवावे? त्यांच्याविरुद्धच्या सीबीआय चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने नुकताच हिरवा कंदील दर्शवलेला आहे. भूखंड घोटाळ्यात कारागृहाची हवा खाऊन आल्यानंतर खाण घोटाळ्यासंदर्भातील आरोपांना सध्या ते सामोरे जात आहेत.

पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान जास्त

Story Summary: 

उत्तर गोव्यातील एका मतदान केंद्रावर लागलेली मतदारांची रांग.

८०.१२% मतदान

Story Summary: 

आज १३ केंद्रांवर मतमोजणी

पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान जास्त

राज्यातील १८४ पंचायतींसाठी काल शांततापूर्ण निवडणूक झाली. १४८२ प्रभागांसाठी सुमारे ८०.१२ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली. गोव्यातील निवडणूक असलेल्या पंचायतींमधील एकूण ७ लाख १६ हजार ५८७ मतदारांपैकी ५ लाख ७६ हजार ५३२ मतदारांनी हक्क बजावला आज सकाळी ८ वाजल्यापासून राज्यातील १३ केंद्रांमध्ये मतमोजणी सुरू होणार असून आज संध्याकाळपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे.

गेल्या पंचायत निवडणुकीत ७२ टक्के मतदान झाले होते. यावेळी टक्केवारीत बरीच वाढ झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीतही विक्रमी मतदान झाले होते. या निवडणुकीलाही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे आयुक्तांनी सांगितले.

एलिनांच्या उमेदवारीसमिकींच्या गोविपचा पाठिंबा

Story Summary: 

गोवा विकास पार्टीने मगो-भाजप युती सरकारात सामील होण्याचा निर्णय घेतला असून त्याचा भाग म्हणून नुवेचे आमदार तथा गोविपचे सर्वेसर्वा मिकी पाशेको यांनी ४ जून रोजी होणार्‍या कुठ्ठाळी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार एलिना साल्ढाणा यांना पाठिंबा देण्याचे ठरविले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

पाशेको यांनी यापूर्वीच आपल्या सरकारला पाठिंबा दिला होता. त्यासाठी त्यांनी कोणतीही अट घातली नव्हती. दाबोळी विमानतळ, शिक्षण माध्यम प्रश्‍नावर आपण मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या भूमिकेमुळे आपले समाधान झाल्याने आपण युतीत सामील होण्याचे ठरविले आहे. पुढील पाच वर्षे पर्यंत आपल्या पक्षाचा पर्रीकर यांना पाठिंबा असेल, असे पाशेको यांनी सांगितले.

लोकायुक्त पदासाठी गोमंतकीय निवृत्त न्यायमूर्तींची शिफारस : पर्रीकर

Story Summary: 

लोकायुक्त पदासाठी आपण गोमंतकीय उमेदवारालाच प्राधान्य देणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले.

उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो, आर. एम. एस. खांडेपारकर व एन. बी. ब्रिटो यांच्या नावांची आपण उच्च न्यायालयाला शिफारस करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारने शिफारस केल्यानंतर न्यायालयाने मान्यता दिली पाहिजे, असे पर्रीकर म्हणाले.

राष्ट्रपतींची मान्यता मिळालेले लोकायुक्त विधेयक पुढील आठ दिवसांत गोव्यात पोहोचू शकेल. त्यानंतर लोकायुक्त स्थापन करण्याची प्रक्रिया आपण सुरू करणार असून त्यांचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास किमान सहा महिने लागतील, असे त्यांनी सांगितले. लोकायुक्तांसाठी कार्यालय, मनुष्यबळ व अन्य पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी काही दिवसांची गरज आहे, अशा गोष्टी एकाच रात्रीत पूर्ण करणे शक्य नसते, असे ते म्हणाले.

बलात्काराचा प्रयत्न झालेल्या दुकानाची जमावाकडून नासधूस

फातोर्डा : संशयिताचे पलायन

फातोर्डा येथील अय्यगार बेंगळूर बेकरीत आयस्क्रीम खाण्यासाठी गेलेल्या २० वर्षांच्या तरुणीवर दुकान मालकाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे वृत्त समजताच, जवळपासच्या शेकडो लोकांच्या संतापलेल्या जमावाने दुकानाजवळ जावून दुकानाची नासधूस केली व आतील दोन कामगारांना मारहाण केली. जमाव येत असल्याचे पाहून विजय अय्यर हा मालक पळून गेला. पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन लोकांची समजूत घातली.

गोव्याला विशेष दर्जा अव्यवहार्य; लोकसभेत माहिती

गोव्याने केलेली विशेष दर्जाची मागणी अव्यवहार्य व अशक्य असल्याचे काल लोकसभेत सांगण्यात आले.

गोव्यासह ओरिसा, राजस्थान, बिहार आणि झारखंड या राज्यांनीही विकासासाठी विशेष दर्जा देण्याची मागणी केंद्राकडे केली होती. मात्र गोव्याच्या मागणी व्यवहार्य नसल्याचे केंद्रीय नियोजन राज्य मंत्री अश्‍विनी कुमार यांनी लोकसभेत एक प्रश्‍नास उत्तर देताना सांगितले. उर्वरित राज्यांच्या प्रस्तावांवर नियोजन आयोग अभ्यास करीत असल्याचे ते म्हणाले.

जीसीएच्या कारभाराची समूळ चौकशी करा

- ऍड. अरुण तळावलीकर,

निमंत्रक, असोसिएशन ऑफ व्हेटरन क्रिकेटर्स ऑफ गोवा

गेला पंधरवडाभर मुद्रित आणि दूरचित्रवाणी माध्यमामध्ये गोवा क्रिकेट असोसिएशनच्या कारभाराबद्दल, आर्थिक गैरव्यवस्थापनाबाबत आणि माजी अध्यक्ष ऍड. दयानंद नार्वेकर यांच्याविषयी बरेच काही येत आहे.

तीन संघांनी दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे गोवा सरकारने सहकार निबंधकांमार्फत दोन सदस्यीय समिती नेमून ऍड. नार्वेकर यांनी केलेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करून पंधरा दिवसांत आपला अहवाल देण्यास त्या समितीला सांगितले आहे. या समितीच्या नेमणुकीबाबत प्रश्‍नचिन्ह आहे आणि त्यांच्यापाशी ही चौकशी करण्यासाठी आवश्यक ते अधिकार आणि अनुभव आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. उभय बाजूंचे दावे - प्रतिदावे आणि काही बलाढ्य व्यक्तींचा सहभाग पाहाता गोवा क्रिकेट असोसिएशनवर नियंत्रण ठेवण्याच्या या प्रयत्नांमागचे खरे कारण पैसा हेच आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून गेली अनेक वर्षे गोव्यात क्रिकेटला चालना देण्यासाठी बराच पैसा येत आहे.

नवा इतिहास घडावा

राज्यातील १८४ ग्रामपंचायतींच्या बहुचर्चित निवडणुका शेवटी एकदाच्या काल पार पडल्या. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या पंचायत निवडणुकीतील उमेदवारांचा आणि मतदारांचा उत्साह लक्षात राहण्यासारखा होता यात शंका नाही. उदंड उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केले गेले आणि मतदानही बर्‍यापैकी झाले. परंतु या सार्‍या घुसळणीची निष्पत्ती काय असेल हा खरा लाखमोलाचा प्रश्न असेल. गोवा मुक्त होऊन पन्नास वर्षे उलटून गेलेली असूनही आज गावागावांमध्ये मूलभूत समस्या ‘आ’ वासून उभ्या असलेल्या दिसतात. रस्त्यांपासून पथदीपांपर्यंत आणि गटारांपासून सांडपाणी निचर्‍यापर्यंत नानाविध समस्यांच्या गर्तेत गावांचा विकास खुंटला आहे. कचरा प्रश्न केवळ शहरांचाच प्रश्न उरलेला नाही, तर गावांमध्येही हळूहळू गंभीर रूप धारण करू लागला आहे. खरे तर गोव्यामध्ये गावांचे एवढे झपाट्याने शहरीकरण होत चालले आहे की गाव आणि शहर यांच्यातील सीमारेषाच पुसल्या जाऊ लागल्या आहेत. वाढत्या कॉंक्रिटीकरणामुळे शहर म्हणायचे आणि मूलभूत समस्या पाचवीलाच पुजलेल्या असल्यामुळे गाव म्हणायचे अशी ही दुविधा आहे.

दाबोळी विमानतळ विस्तार

Story Summary: 

दाबोळी विमानतळासाठी बांधण्यात येत असलेल्या नवीन टर्मिनलची पाहणी करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. सोबत आमदार मिलिंद नाईक व अधिकारी.

१८४ पंचायतींसाठी आज मतदान

Story Summary: 

राज्यातील १८४ ग्रामपंचायतींच्या १४८३ प्रभागांसाठी होणार्‍या आज दि. १६ रोजीच्या निवडणुकीत सुमारे ७ लाख मतदार ६४५१ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.

मतदानाची तयारी पूर्ण झाली असून काल संध्याकाळी राज्य निवडणूक आयोगाचे सर्व कर्मचारी मतदानाचे साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर पोचले, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली. राज्यातील एकूण ३७ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आल्याने या केंद्रावर पोलिसांची अधिक कुमक असेल. या निवडणुकीसाठी १५०० पोलीस तर ६००० कर्मचारी कामावर आहेत. सकाळी ७ वाजता मतदान सुरू होऊन संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालेल.

विमानतळ विस्तारासाठी नौदलाची जमीन देण्यास पंतप्रधान अनुकूल

Story Summary: 

मुख्यमंत्री पर्रीकर यांची माहिती

कल्पनाही करणे कुणाला शक्य नाही, अशा पद्धतीने दाबोळी विमानतळावर सर्व सुविधा उपलब्ध करणार असल्याचे सांगून सध्या नौदलाच्या ताब्यात असलेली २.५२ हेक्टर जमीन नौदलाने विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात द्यावी, असे प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे मत असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांना सांगितले.

पर्रीकर यांनी काल दुपारी पत्रकारांना घेऊन दाबोळी विमानतळावरील परिस्थितीची पहाणी केली. तेथील नव्या इमारत प्रकल्पाचे (टर्मिनलचे) काम पुढील वर्षी एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर प्रतीतासी दोन ते तीन हजार प्रवाशांना हाताळणे शक्य होईल.

कुठ्ठाळी पोटनिवडणूक २ ऐवजी ४ जूनला

Story Summary: 

कुठ्ठाळी पोटनिवडणूक २ ऐवजी ४ जूनला घेण्यात येणार असल्याचे गोव्याच्या मुख्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.

आज दि. १६ रोजी पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे सर्व निवडणूक कार्यक्रमात बदल झाला आहे.

बोरीमळ येथे अपघात; पत्नी ठार

पती, कन्या गंभीर जखमी

बोरीमळ-केपे येथे जीपने ठोकरल्यामुळे झालेल्या अपघातात स्कूटरवर बसलेली महिला आंजेलिका मिरांडा (वय ३०) ही ठार झाली. तिचा पती पायरी मिरांडा व कन्या प्रिज्मा मिरांडा (वय १३) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर हॉस्पिसिओ इस्पितळ मडगाव येथे उपचार सुरू आहेत. जीपचालक संगप्पा रामप्पा हुग्गर याला केपे पोलिसांनी अटक केली.

कुठ्ठाळीत कॉंग्रेसतर्फे रेमंड डिसा निश्‍चित

शनिवार दि. २ जून रोजी होणार्‍या कुठ्ठाळी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेस उमेदवार म्हणून रेमंड डिसा यांचे नाव निश्‍चित करण्यात आले आहे, अशी माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी दिली. आज सकाळी त्यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा केली जाईल. त्यानंतर ते उमेदवारी अर्ज सादर करतील.

कुंडई येथे भरदुपारी चार घरफोड्या

मानसवाडा-कुंडई येथे २० कलमी कार्यक्रमाखाली बांधलेल्या गरीबांच्या चार घरांत काल भर दुपारी चोरी झाली. यात दागदागिने, थोडीबहुत रोख रक्कम मिळून जवळ जवळ दोन लाखांवर ऐवज चोरट्यांनी पळवला.

‘अपना घर’ प्रकरण सीआयडीकडे

‘अपना घर’ मधील मुलांचा चोर्‍या करण्यास वापर होत असल्याचे प्रकरण महिला आणि बाल कल्याण खात्याने चौकशीसाठी गुन्हा अन्वेषण पोलिसांकडे सोपविले आहे, अशी माहिती खात्याचे संचालक संजीव गडकर यांनी काल दिली.

मये येथे बलात्कार प्रकरणी आरोपीस शिताफीने अटक

मये येथील एका हॉटेलात पश्‍चिम बंगालच्या युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी मूळ उत्तर प्रदेश येथील व सध्या गोव्यात राहणार्‍या शमशुद्दीन अहमद (३१) याला शिताफीने अटक केली.

बालिकेच्या लैगिक छळप्रकरणी ६५ वर्षीय शेजार्‍यास अटक

हळदोणा येथील एका ६५ वर्षीय इसमाने आपल्या शेजारी राहणार्‍या ९ वर्षीय बालिकेचा एप्रिल महिन्यापासून लैंगिक छळ चालविल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी त्याला काल अटक केली.

आजचे मतदान ‘रामराज्या’साठी असेल का?

- दिलीप बोरकर

गोव्यातील १८९ पैकी १८४ पंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. खरं म्हणजे त्या निवडणुका १८५ पंचायतींसाठी होणार होत्या. परंतु, कळंगुट पंचायतीची निवडणूक प्रभागांच्या गोंधळामुळे निवडणूक आयोगाला पुढे ढकलावी लागली. कळंगुटप्रमाणेच इतर काही पंचायतींच्या अनेक प्रभागामध्ये मतदार विभागणीच्या नावाने उडालेल्या सावळागोंधळाचे निमित्त करून चर्च सारख्या संस्थांनी आज होणारे मतदान पुढे ढकलण्याचे आवाहन निवडणूक आयोगाला केले होते. त्यांची मागणी फेटाळून लावली गेल्याने आजच्या होऊ घातलेल्या मतदानावर बहिष्कार टाकण्याची धमकीही देण्यात आली होती. सदर धमकीचा काय परिणाम झाला हे मतमोजणीनंतरच कळून येईल. तुर्तास ठरल्याप्रमाणे आज मतदानासाठी प्रारंभही झाला असेल.

लोकायुक्ताची चाहुल

केंद्र सरकारच्या लोकपाल विधेयकाचे घोडे संसदेत अडलेले असताना गोव्याच्या लोकायुक्त विधेयकाला राष्ट्रपतींनी हिरवा कंदील दर्शवला. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत दिलेले १०० दिवसांत लोकायुक्त स्थापन करण्याचे आश्वासन पाळण्याचा मार्ग मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना आता खुला झाला आहे. आपण युद्ध पातळीवर लोकायुक्त स्थापनेची प्रक्रिया सुरू करू, परंतु त्यात थोडा विलंब झाला तरी जास्तीत जास्त १२५ दिवसांत लोकायुक्ताची स्थापना राज्यात होईलच, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. २००३ सालापासून रखडलेले हे विधेयक कायद्यात रूपांतरित होणे आणि त्या अनुषंगाने लोकायुक्त यंत्रणा स्थापन होणे हे लोकशाहीच्या बळकटीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असेल. राजकीय भ्रष्टाचारावर अंकुश आणण्यात सक्षम लोकायुक्त महत्त्वाची भूमिका निश्‍चितपणे बजावू शकतो हे शेजारच्या कर्नाटकमधील उदाहरणाने सिद्ध केलेले आहे. त्यामुळे भ्रष्टासुरांची बेबंदशाही थोपवण्यासाठी लोकायुक्त जर ताठ कण्याने उभे राहिले तर भल्या भल्यांच्या पायांखालची वाळू सरकल्यावाचून राहणार नाही. अर्थात, लोकायुक्तपदी नेमली जाणारी व्यक्तीही तेवढ्याच तोलामोलाची आणि रामशास्त्री बाण्याची असणेही गरजेचे असेल.

योगमार्ग-राजयोग (अस्तेय : ११)

- डॉ. सीताकांत घाणेकर

जगात अनेक तर्‍हेच्या व्यक्ती असतात. सज्जन-दुर्जन, चांगल्या-वाईट... प्रत्येक जण आपले विचार, स्वभाव, गरज ह्याप्रमाणे कृती करतो. काही कृती चांगल्या तर काही वाईट. अशा ह्या वाईट कृतीत एक अत्यंत हीन कृती म्हणजे चोरी (स्तेय). चोरी करणे वाईट म्हणून संस्कार देताना सर्व लहान मुलांना सांगितले जाते की, चोरी करणे पाप आहे. त्यामुळे स्वतःचे तसेच समाजाचे, देशाचे नुकसान होते. चोरी करणार्‍याला चोरीप्रमाणे वेगवेगळ्या शिक्षा केल्या जातात. त्यामुळे बालमनावर लहानपणापासून चोरी न करण्याबाबत संस्कार होतात.

अरुणोदयाच्या संधिप्रकाशात...

- प्रा.. रमेश सप्रे

‘अरुणोदयाच्या संधिप्रकाशात’ हा शब्दप्रयोग कदाचित नवीन वाटेल. पण हे दोन्ही शब्द आपल्या परिचयाचे आहेत. पहाट व संध्याकाळ दोन्ही संधिकालच असतात. पहाटे रात्र संपून दिवसाला प्रारंभ होत असतो तर सायंकाळी दिवस संपून रात्रीच्या दिशेनं वाटचाल सुरू होते. संधि म्हणजे सांधा. दोन गोष्टींना जोडणारा. म्हणूनच या दोन्ही संधिकाली ‘संध्या’ करण्यासाठी आग्रह असतो. यात महत्त्व असतं संधिकालाला.. कधी अंधाराचं साम्राज्य संपून प्रकाशाचं राज्य सुरू होतं. विश्रामकाल संपून रामकाल (रामप्रहर) सुरू होतो. अभ्यास करायचा असतो यावेळी. मग तो रियाज असो किंवा तालीम असो; सराव (प्रॅक्टिस) असो किंवा साधना असो. हा संधिकाल खूप अनुकूल असतो.

मल्लखांब स्पर्धेतील एक कसरत

Story Summary: 

काणकोण येथे काल संपन्न झालेल्या पहिल्या मल्लखांब स्पर्धेतील एक कसरत. (छाया : अनुजित)

लोकायुक्त विधेयकास राष्ट्रपतींकडून मान्यता

Story Summary: 

बर्‍याच काळापासून समस्त गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिलेल्या गोवा लोकायुक्त विधेयकास काल राष्ट्रपतींकडून मान्यता बहाल करण्यात आली. मान्यताप्राप्त विधेयक उर्वरित सोपस्कार झाल्यानंतर येत्या आठ ते दहा दिवसांपर्यंत सरकारकडे पोचेल असे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी सांगितले.

५ ऑक्टोबर २०११ रोजी हे विधेयक गोवा विधानसभेत संमत झाले होते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या मान्यतेकरिता ते दिल्लीस पाठविण्यात आले होते. दिल्लीत विधी खाते व गृह खात्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर ते दहा दिवसांपूर्वी राष्ट्रपती भवनात मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते.

पंचायत निवडणुकीचा प्रचार थांबला; यंत्रणा सज्ज

Story Summary: 

उद्या बुधवार दि. १६ रोजी होणार्‍या पंचायत निवडणुकीचा जाहीर प्रचार काल संपला. त्यामुळे निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी मोबाईल वरून एसएमएस व अन्य मार्गातून प्रचार करण्याचे चालू ठेवले आहे.

आज संध्याकाळपर्यंत निवडणूक अधिकारी मतदानाचे साहित्य घेऊन मतदान केंद्रावर पोचतील. राज्यातील ३७ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

मुख्यमंत्र्यांची आज दाबोळी विमानतळास भेट

Story Summary: 

सुविधा वाढविण्यासाठी पाहणी

दाबोळी विमानतळावरील परिस्थितीची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपल्या अधिकार्‍यांसह आज दुपारी दाबोळी विमानतळाला भेट देणार असून विमानतळावरील सुविधा वाढविण्यासाठी त्यांनी जलदगतीने प्रयत्न करण्याचे ठरविले आहे.

या विमानतळावर प्रवाशांची व विमानांची गर्दी वाढली असून अनेकदा पर्यटकांना घेऊन येणारे विमान तेथे उतरविणे शक्य नसते. पार्किंग सुविधा नसल्याने दाबोळीला आलेले विमान मुंबईला न्यावे लागते.

एलिना यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कुठ्ठाळी पोटनिवडणूक

आपल्याला आधी आपल्या मतदारसंघातली कामे तसेच मतदारांची कामे पूर्ण करायची असून त्या कामाना आपण सुरुवातीपासूनच आरंभ केल्याचे श्रीमती एलिना साल्ढाना यांनी येथे सांगितले.

कुठ्ठाळीचे आमदार स्व. माथानी साल्ढाना यांच्या आकस्मिक निधनामुळे कुठ्ठाळीत परत एकदा पोट निवडणूक घेण्यात येणार असून सदर मतदारसंघात एलिना साल्ढाना यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काल सकाळी त्यांनी वास्कोतल्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीचा उमेदवारी अर्ज सादर केला.

जीसीएची निवडणूक पुढे ढकलली

प्रत्येक क्लबास एक लाख रु.

दयानंद नार्वेकर यांच्याकडून गोवा क्रिकेट असोसिएशनचा ताबा घेतलेल्या विनोद फडके यांच्या अध्यक्षतेखालील नवीन समितीची पहिली बैठक काल झाली. यात दि. २७ रोजी होऊ घातलेल्या असोसिएशनची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय प्रत्येक क्लबास एक लाख रु. जाहीर करण्यात आले.

नेपाळ विमान दुर्घटनेत १३ भारतीय ठार

पश्‍चिम नेपाळच्या एका टेकडीवर छोटे विमान आदळून झालेल्या अपघातात एकूण १५ ठार झाले. त्यांपैकी १३ भारतीय आहेत. वाचलेल्या सहा जणांपैकी तीन भारतीय आहेत. सात महिन्यांपूर्वीच नेपाळमधील एका विमान अपघातात दहा भारतीय पर्यटक ठार झाले होते.

वेळगे-पाळी येथे सर्पदंशामुळे मुलाचा मृत्यू

सर्पदशांमुळे फोंडामळ वेळगे पाळी येथील साजीद रुस्तम अन्सारी या सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती डिचोली पोलिसांनी दिली.

सर्पदंशानंतर साखळी येथील आरोग्य केंद्रात आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने त्याला बांबोळी येथे नेताना वाटेतच त्याचे निधन झाले.

सुसंपादित सं. सौभद्र : पडदा उघडण्यापूर्वी...

- ‘काव्यतीर्थ’ लक्ष्मण कृष्ण पित्रे

स. १८४३ साली विष्णूदास भावे यांनी ‘सीतास्वयंवर’ नाटक सादर करून महाराष्ट्रात मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली. समांतररीत्या गोमंतकात कृष्णभट्ट बांदकर (१८४४-१९०२) यांनी ‘शुकरंभासंवाद’ इत्यादी नाटके लिहून त्यांचे प्रयोगही घडविले. तेव्हापासून अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्यापर्यंत चाळीस वर्षांत वेगवेगळ्या स्वरुपाचे नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. (इ.स. १८६१ पासून महाराष्ट्रात लिखित नाट्यसंहिता निर्माण झाल्या.) नाट्यक्षेत्राशी या ना त्या स्वरुपात संबंध असलेल्या अण्णासाहेबांनी १८८० साली प्रथम संगीत ‘शाकुंतल’ सादर केले. त्याची वाहवा झाली. त्यानंतर त्यांनी संगीत ‘सौभद्र’ ची रचना केली. या नाटकामुळे त्यांनी मराठी नाट्यकलेचा एक नवा अध्यायच सुरू केला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

‘नोमोझो’चे स्वप्न

रविवारी पणजीच्या एरव्ही गजबजलेल्या रस्त्यावर ‘नोमोझो’ (‘नो मोटराईज्ड झोन’) ही अनोखी संकल्पना काही स्वयंसेवी संघटनांनी पणजी महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने प्रत्यक्षात आणली. तीन तास एकही वाहन या रस्त्यावरून फिरकले नाही. कार्यकर्त्यांनी रस्त्यावरून मस्त फेरफटका मारला, गप्पा मारल्या, कोणी सायकली चालवल्या, कोणी फुलांच्या रांगोळ्या घातल्या, कोणी स्केटिंग केले, कोणी खेळ खेळले... स्वप्नवत वाटावे असे वातावरण त्या दोन - तीन तासांत कांपालच्या त्या निसर्गरम्य परिसरात निर्माण झाले. एकेकाळी सुशेगाद शहर म्हणून ख्याती असलेले पणजी शहर आज प्रचंड गतीने धावताना दिसते. क्षणाक्षणाला धावणारी वाहने, रस्त्यांवर सतत दिसणारी कोंडी, वाजणारे कर्णकर्कश हॉर्न, पार्किंगची अत्यंत बिकट बनलेली समस्या यामुळे पणजीकरांना शहरात जीव नकोसा होऊन गेलेला दिसतो. या सार्‍या परिस्थितीतून काही तास का होईना, थोडा मोकळा श्वास घेण्याची संधी या जागृत पणजीकरांनी नागरिकांना मिळवून दिली हा कौतुकास्पद उपक्रम आहे. वाढती वाहने, बेशिस्त वाहतूक आणि तद्आनुषंगिक पार्किंगसारख्या समस्या या वाढत्या शहरांची डोकेदुखी होऊन बसलेल्या आहेत.

भारतीय चित्रपटांचा शतकमहोत्सव

- प्रा. मिलिंद म्हाडगुत

भारतीय चित्रपट यंदा शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. १९१३ साली निर्माण झालेल्या ‘राजा हरिश्‍चंद्र’पासून सुरुवात केलेला आपला भारतीय चित्रपट आता ‘रोबोट’, ‘रावण’सारख्या हॉलिवूडच्या चित्रपटांच्या तोंडात मारण्याएवढा प्रगत झालेल्या चित्रपटांपर्यंत पोचलेला आहे. आजचा आपला हिंदी चित्रपट केवळ आपल्या देशातच नव्हे तर परदेशांतसुद्धा लोकप्रिय व्हायला लागला आहे.

या शतकमहोत्सवी वर्षात अनेक चित्रपटांची, अनेक चित्रपटमहर्षींची आपल्याला याद यायला लागते. राजकपूर, व्ही. शांताराम व मेहबुब ही यातली तीन ठळक नावे. या तिघांनीही भारतीय चित्रपटांना एक नवे परिमाण दिले. राजकपूरचा ‘आवारा’ हा त्याकाळात केवळ भारतातच नव्हे तर रशियासारख्या परदेशातसुद्धा तुफान गाजला होता. या चित्रपटातले ‘घर आया परदेसी’ हे स्वप्नगीत आजसुद्धा एक माईलस्टोन दृश्य म्हणून वाखाणले जाते. ‘आवारा’बरोबर ‘श्री ४२०’, ‘संगम’, ‘बूट पॉलिश’, ‘जिस देश में गंगा बहती है’ या राजकपूरच्या चित्रपटांनी त्याकाळी लोकांना अक्षरशः वेड लावले होते.

संसदेची शान अबाधित राखू

Story Summary: 

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या लोकसभा व राज्यसभेच्या संयुक्त कार्यक्रमात पंतप्रधान मनमोहन सिंग, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, राष्ट्रपती प्रतिभा पाटील, लोकसभा सभापती मीरा कुमार.

नार्वेकरांनी अखेर जीसीएचा ताबा सोडला

Story Summary: 

कडेकोट पोलीस बंदोबस्तात विनोद फडकेंच्या नेतृत्वाखालील समितीने पदभार स्वीकारला

गेल्या अनेक दिवसांपासून चाललेल्या गोवा क्रिकेट असोसिएशनमधील नाट्यमय घडामोडींनंतर काल दयानंद नार्वेकर यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची असोसिएशनवरील हुकुमत संपुष्टात आली व त्यांना ताबा सोडणे भाग पडले. विनोद ऊर्फ बाळू फडके यांच्या अध्यक्षपदाखालील नव्या समितीने काल संध्याकाळी पोलीसांच्या कडेकोट बंदोबस्तात पदभार स्वीकारला.

जीसीएतील अंतर्गत वाद शिगेला पोचल्यानंतर गोवा क्रिकेट असोसिएशनच्या पंधरा सदस्यांपैकी अकरा सदस्यांनी दयानंद नार्वेकर यांना अध्यक्षपदावरून हटविण्याचा ठराव संमत केला होता. त्याचवेळी दुसरीकडे नार्वेकरांनी पत्रकार परिषद घेऊन सचिव प्रसाद फातर्पेकर व खजिनदार अमरेश नाईक यांची हकालपट्टी केल्याची घोषणा केली होती.

कुठ्ठाळीतून कॉंग्रेसतर्फेचर्चिलना उमेदवारीचा विचार

Story Summary: 

दि. २ जून रोजी होणार्‍या कुठ्ठाळी मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने माजी साबांखा मंत्री चर्चिल आलेमाव यांनाच उमेदवारी देण्याचा विचार चालविल्याचे खात्रीलायक वृत्त असून आज किंवा उद्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आलेमाव यांनी निवडणूक लढविण्याची तयारी करून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.

कॉंग्रेसने उमेदवारी दिल्यास निवडणुकीसाठी लागणारा खर्च करण्याची त्यांनी तयारी ठेवली आहे. त्यामुळेच कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते आलेमाव यांना उमेदवारी देण्यास तयार झाल्याचे कळते. गोव्याचे कॉंग्रेस प्रभारी जगमित सिंग ब्रार व सचिव सुधाकर रेड्डी यांनी चार दिवसांपूर्वी आलेमाव यांच्याबरोबर बैठक घेतली होती.

संसदेची शान अबाधित राखू

Story Summary: 

संसदेच्या विशेष सत्रात खासदारांचा निर्धार

भारतीय संसदेस ६० वर्षे पूर्ण

देशाच्या संसदेेचा मान, पावित्र्य आणि सर्वोच्चता अबाधित राखून सभागृहास राष्ट्रनिर्मिती आणि लोकशाहीच्या सशक्तीकरणाचे वाहन म्हणून उपयोगात आणण्याचा निर्धार काल लोकसभा व राज्य सभेच्या खासदारांनी केला. भारतीय संसदेचे पहिले सत्र १३ मे १९५२ रोजी झाले होते त्याला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त काल दोन्ही सभागृहांचे दिवसभराचे खास अधिवेशन बोलावण्यात आले होते.

दिवसभराच्या चर्चेनंतर शेवटी लोकसभेत सभापती मीरा कुमार आणि राज्य सभेत अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी ठराव मांडला जो सर्वानुमते आवाजी मतदानाने संमत करण्यात आला.

फोंड्याच्या महिलेचा उसगावात खून

तिस्क - उसगाव येथे रामनाथी फोंडा येथील महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. सदर महिलेचे नाव सुवर्णा सुर्यकांत गावडे (३५) असून ती बोकडबाग-रामनाथी फोंडा येथील आहे.

‘अपना घर’मधून बालिकेचे पलायन

चिंबल येथील अपना घरमधून एक अल्पवयीन बालिकेने पलायन केल्याने तेथील अधिकार्‍यांची तारांबळ उडाली आहे. काल संध्याकाळपर्यंत तिचा शोध लागला नव्हता.

येडीयूराप्पांकडून पक्षांतराचे संकेत?

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर कमालीची नाराज बनलेल्या बी एस येडीयूराप्पा यांनी कॉंग्रेस व सोनिया गांधी यांची काल तोंडभरून स्तुती केली त्यामुळे त्यांच्या पक्षांतराबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. कर्नाटकात नव्याने भाजपमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर दिल्लीस गेलेल्या मुख्यमंत्री सदानंद गौडा यांना येडीयुराप्पांनी ‘धोकेबाज’ असे संबोधले.

टीम अण्णामध्ये लष्करप्रमुख जाणार?

अण्णांकडून निमंत्रण

निवृत्तीनंतर लष्कर प्रमुख जन. व्ही. के. सिंग यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढाईत आपल्यासोबत सामील व्हावे असे निमंत्रण अण्णा हजारे यांनी दिले.

भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये भाग घेतलेल्या लष्कर प्रमुखांनी आता भ्रष्टाचारविरुद्ध लढाईल सामील व्हावे असे आवाहन करताना ही लढाईही तेवढीच महत्त्वाची असल्याचे अण्णा म्हणाले. या लढाईल समान ध्येय असलेल्या व्यक्तींच्या सहभागाची नितांत आवश्यकता असून जनरल सिंग यांचा होकार असेल तर त्यांचेही स्वागत आहे, असे हजारे यांनी चंद्रपूर येथे बोलताना सांगितले.

पंचायत निवडणूक प्रचार आज संपणार

परवा मतदान

बुधवार दि. १६ मे रोजी होणार्‍या पंचायत निवडणुकीचा जाहीर प्रचार आज संपत असून एकूण ५९३४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत.

निवडणुकीत ७ लाख २९ हजार ४७५ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. राज्यभरात २६ अतीसंवेदनशील तर १७ संवेदनशील केंद्रे जाहीर केलेली आहेत. निवडणुकीसाठी १५०० पोलीस व ६ हजार कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे.

पंचायत निवडणूक १६ रोजी असल्याने दि. १५ ते १८ मे असे चार दिवस दारूबंदी जाहीर केली आहे.

बालचित्रपट महोत्सवात कलिंगडे खाण्याची स्पर्धा

Story Summary: 

गोवा मनोरंजन संस्थेतर्फे आयोजित बालचित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने काल पणजीत कलिंगडे खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जवळजवळ ७५ मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. अनिकेत व सर्वदया यांनी या स्पर्धेत पारितोषिके पटकावली.

उमेदवारी दिली नाही तरी कॉंग्रेस सोडणार नाही

Story Summary: 

चर्चिल आलेमाव यांचे घुमजाव

कुठ्ठाळी मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने आपणाला उमेदवारी दिली नाही तरी पक्ष न सोडण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचे माजी मंत्री व कॉंग्रेस नेते चर्चिल आलेमाव यांनी काल सांगितले. आपण कॉंग्रेस पक्ष सोडू नये यासाठी केंद्रीय नेते, पक्षाचे गोवा प्रभारी जगमितसिंह ब्रार व सुधाकर रेड्डी आदींनी आपली मनधरणी केली असून त्यांना मान देऊन पक्ष त्याग न करण्याचा आपण निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

कुठ्ठाळीतून आपणाला कॉंग्रेसने उमेदवारी दिली तरच आपण या निवडणुकीत उतरणार असल्याचे ते म्हणाले. मोप विमानतळासंबंधीच्या आपल्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नसून मोपला आपला आजही तीव्र विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, मोप विरोधात आंदोलन करायचे की काय याबाबत आपण अजून निर्णय घेतला नसल्याचे ते म्हणाले. कुट्ठाळीतून कॉंग्रेसने आपणाला उमेदवारी दिल्यास जिंकून येण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाहनांना प्रवेश कर लावण्यासाठी कायदा करू

Story Summary: 

पर्रीकर यांचे प्रतिपादन

अन्य राज्यांतून गोव्यात येणार्‍या वाहनांवर तपासणी नाक्यावर व्यावसायिक कर लागू करण्याची कायद्यात तरतूद नसली तरी तो लागू करता यावा यासाठी खास कायदा तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल स्पष्ट केले.

अन्य राज्यातून रोज गोव्यात प्रवेश करणार्‍या शेकडो मालवाहू गाड्यांना प्रवेश कर लागू करता यावा यासाठी आवश्यक ते सोपस्कार पूर्ण केल्यानंतर सदर प्रवेशकर लागू करण्यात येणार असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

जीसीएतून नार्वेकरांची हकालपट्टी

Story Summary: 

सचिव व खजिनदारांनाच डच्चू दिल्याची नार्वेकरांची घोषणा

गोवा क्रिकेट असोसिएशनमधील अंतर्गत वाद काल शिगेला पोहोचला. समितीच्या पंधरा सदस्यांपैकी अकरा सदस्यांनी संघटनेचे अध्यक्ष दयानंद नार्वेकर यांना हटवण्यात यावे असा ठराव संमत केला. मात्र, दुसरीकडे श्री. नार्वेकर यांनीही पत्रकार परिषद बोलावून सचिव प्रसाद फातर्पेकर आणि खजिनदार अमरेश नाईक यांची हकालपट्टी केल्याची घोषणा केली.

सहकार निबंधक खात्यातील महानिरीक्षकांनी द्विसदस्यीय समितीची नियुक्त करून गोवा क्रिकेट अकादमी (जीसीए) च्या एकंदर व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे चौकशी समितीचे अधिकारी चेतन देसाई आणि अनिल लावणीस यांनी चौकशी चालू करून त्या आशयाची नोटीस जीसीए समितीला नुकतीच दिली होती. त्यानंतर जीसीएमध्ये नाट्यमयरीत्या हालचाली सुरू झाल्या.

गुडगावच्या ‘त्या’ अपघातावर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न

दिल्लीजवळील गुडगाव येथे भरधाव बीएमडब्ल्यू कारने दुसर्‍या कारला ठोकरल्याने गेल्या ५ मे रोजी झालेल्या भीषण अपघातात क्षमा शेट्ये या गरोदर गोमंतकीय महिलेचे दुर्दैवी निधन झाले होते. हा अपघात झाला तेव्हा आपण कार चालवत होतो असा दावा करून राजेश नामक एक व्यक्ती काल न्यायालयात शरण आली.

एलिना यांच्या नावावर भाजपचे शिक्कामोर्तब

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय समितीने कुठ्ठाळी पोटनिवडणुकीसाठीची आपली उमेदवार म्हणून एलिना माथानी साल्ढाणा यांच्या नावावर काल शिक्कामोर्तब केले.

गोवा विज्ञान केंद्रामध्ये कृत्रिम तारांगणाचे उद्घाटन

नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्सतर्फे जवळजवळ ऐंशी लाख रुपये खर्चून गोव्यातील मिरामार येथील विज्ञान केंद्रात उभारलेल्या कृत्रिम तारांगणाचे काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अशाच प्रकारची तारांगणे नागालँड, मणिपूर आणि आसाममधील जोरहाट येथे उभारण्यात येतील अशी घोषणा एनसीएसएमचे महासंचालक जी. एस. रौतेला यांनी केली. गेल्या तीन वर्षांत देशभरात सहा तारांगणे उभारण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. एक तारांगण उभारण्यासाठी सुमारे ऐंशी लाख खर्च येतो. वाढत्या बांधकाम खर्चामुळे हा खर्च एक कोटींवर जात असल्याचे ते म्हणाले.

कारच्या धडकेने पादचारी जखमी

काल दुपारी ११.४५च्या दरम्यान कुर्टी-फोंडा येथे एमएस-०३-एफ-२४७७ नंबरच्या कारने धडक दिली असता सोमलप्पा लामाणी (६५) हा पादचारी गंभीर जखमी झाला. इस्पितळात नेत असताना वाटेतच त्याचे निधन झाले. डॉक्टरानी त्याला मृत घोषीत केला.

अपघातग्रस्त ट्रकच्या चालकाचे निधन

धारबांदोडा-मोले हमरस्त्यावर काल रात्री १० च्या दरम्यान जीए-०५-टी-१७०२ नंबरचा टिप्पर ट्रकला झालेल्या अपघातात ट्रक चालक इंद्रकुमार जाधव (सध्या वास्तव्य पिळये) याचे काल गामेकॉत निधन झाले.

लग्नाचे आमीष दाखवून फसवणार्‍यास अटक

लग्नाचे आमीष दाखवून एका अल्पवयीन मुलीशी वर्षभर संबध ठेवून तिच्यावर मातृत्व लादल्यावर आता तिचा स्वीकार करायला नकार दिल्याने सीताराम लक्ष्मीकांत गावकर (२७) राहणार पंचवाडी याला काल फोंडा पोलिसांनी अटक केली.

येडीयुराप्पा समर्थक ७ मंत्र्यांचे राजीनामे

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी काल आपल्या समर्थकांची बैठक बोलावून पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या. येडीयुराप्पा यांचे कट्टर समर्थक असलेल्या सात मंत्र्यांनी शनिवारी मंत्रिपदाचे राजीनामे सादर करून मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंदगौडा यांच्यावर जोरदार दबाव आणला. आणखी दोन मंत्रीही आपले राजीनामे सादर करण्याची शक्यता आहे.

भिकू पै आंगले यांचा हृद्य सत्कार

ज्या समाजात शिक्षकाचा गौरव होतो, तो समाज निश्‍चितच सुसंस्कृत असतो. ज्ञान, वक्तृत्व गुणांची पारख करण्याची वृत्ती, संस्कार करण्याची जबाबदारी शिक्षकात असावी लागते. भिकू पै आंगले यांच्यात ती आहे. त्यांनी चार चार क्षेत्रांत जीव ओवाळून टाकून काम केले आहे, असे गौरवोद्गार प्रथितयश साहित्यिक प्रा. अनंत मनोहर यांनी येथे केले.

विजेचा धक्का लागून कामगार ठार

उत्तर प्रदेश येथील कुरंगा गावात राहणारा मूळ रहिवाशी ग्रीनपार्क-म्हापसा येथे तिळारी जलवाहिनीचे काम सुरू असताना पंकज (सुरज) चोरंजी कनौजीया या २३ वर्षीय कामगाराचा काल मध्यरात्री विजेचा धक्का लागून मृत झाला.

उमेदवारांचे नशीब! मतदारांची कसोटी

- रमेश सावईकर

-गोवा राज्यातील १८४ पंचायतींची निवडणूक १६ मे रोजी होणार आहे. १४७८ प्रभागांसाठी ५९३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. एकूण ७,२९,४३६ मतदार असून कार्यक्षम उमेदवार निवडून काढण्यासाठी त्यांची कसोटी लागणार आहे. ‘पंचायतराज’ आले तरी ते खर्‍या अर्थाने नव्हे याचा पुरेपूर अनुभव गेल्या पाच वर्षांत जनतेने घेतला आहे. काळ पुढे जात आहे, तसे सर्व क्षेत्रांतील वातावरण कमालीचे बदलते आहे. मग राजकारणाचे क्षेत्र तरी त्याला अपवाद कसे असेल?

भलते राजकारण

एनसीईआरटीच्या अकरावीच्या राजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील एका व्यंगचित्रावरून संसदेत हंगामा झाला आणि सरकारने त्याबाबत सपशेल शरणागतीही पत्करली. भारतीय संविधानाचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे हे व्यंगचित्र आहे असा पवित्रा मायावतींपासून रामविलास पास्वानांपर्यंत सर्व दलित नेत्यांनी घेतला आहे आणि मतांचे तुष्टीकरण हेच परमध्येय मानणार्‍या सरकारनेही त्या विषयावर संवादाला जागा न ठेवता शरणागती पत्करणेच श्रेयस्कर समजून एनसीईआरटीवर सारे खापर फोडले आहे. एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांबाबत अनेक तक्रारी आहेत आणि भारतीय राज्यघटना तयार होण्यास विलंब का लागला हा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारताना अशा प्रकारचे तत्कालीन व्यंगचित्र पाठ्यपुस्तकात छापणे आवश्यक होते का हा भाग वेगळा, परंतु ज्या प्रकारे या व्यंगचित्राचे राजकारण आता सुरू झाले आहे तो प्रकार अत्यंत उबगवाणा आणि निषेधार्ह आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते असे मानणे म्हणजे त्यांना कमीपणा आणणारे आहे. बाबासाहेब संपूर्ण देशाला वंदनीय आणि पूजनीय आहेत आणि असायलाच हवेत.

बारावीनंतरच्या करिअर वाटा

- प्रा. रामदास केळकर

‘नेमेचि येतो पावसाळा’ या धर्तीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या की पालक - विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते. पुढे काय करावे? कुठल्या मार्गाने जावे? असे यक्षप्रश्‍न उभे ठाकतात. मग घाई - गडबडीत निर्णय घेतला जातो; त्याची अखेर कुणाला तरी पश्‍चात्ताप होण्यात घडते. खरे तर दहावी - बारावीनंतर कुठला मार्ग आपल्या मुलाने चोखाळावा यात पालकांनी फक्त मार्गदर्शकाची भूमिका वठवावी. जे उपलब्ध आहे ते पाल्यांना सांगावे अन् निर्णय घेण्याचा मान मात्र मुलांवरच सोपवावा. दरवर्षी शेकडो विद्यार्थी बारावीची परीक्षा देतात. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी करिअर फीवरच्या लाटेत वाहिले जातात. दुर्दैवाने चुकीच्या मार्गाने गेलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी उपलब्ध नाही की तशी व्यवस्था उपलब्ध नसल्याने हे सर्व गुलदस्त्यात राहते. यंदा लवकरच बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत. त्या अनुषंगाने बारावी नंतरच्या पर्यायांचा विचार या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

‘गृह’ संस्कृती

- लाडोजी परब

कोकणची संस्कृती पाहण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधक दरवर्षी भेट देतात. अगदी कोल्हापूर मार्गावरून घाट उतरतानाच कोकणच्या निसर्गाचे विलोभनीय दर्शन होते. येथील प्रत्येक भागात शेजारच्या राज्यांतील भाषेची छाप जाणवते. दोडामार्ग, बांदा भागात गोव्याची छाप, फोंडा, गगनबावडा भागात कोल्हापुरी वळणाची भाषा, खारेपाटणमध्ये राजापूरमधील बोलीभाषा प्रकर्षाने जाणवते. सिंधुदुर्गात मालवणी भाषेची वळणे थोड्या अंतराने बदलतात.

बालचित्रपट महोत्सव

Story Summary: 

बालचित्रपट महोत्सवाचे उद्घाटन मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी मनोरंजन संस्थेचे मनोज श्रीवास्तव व मुलांच्या उपस्थितीत हवेत फुगे सोडून केले.

भाजप-कॉंग्रेस विरोधातील उमेदवारास युगोडेपाचा पाठिंबा

Story Summary: 

कुठ्ठाळी पोटनिवडणूक

कुठ्ठाळी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप व कॉंग्रेस उमेदवारांच्या विरोधात एक सर्वमान्य उमेदवाराला पाठिंबा देण्याचा विचार युगोडेपा करीत असल्याचे त्या पक्षाचे उपाध्यक्ष राधाराव ग्रासिएस यांनी म्हटले आहे. मोपा विमानतळाला विरोध असलेल्या सर्व लोकांनी एकत्र येऊन दोन्ही राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध काम करावे, असे ते म्हणाले.

कॉंग्रेस व भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गोव्यातील कॉंग्रेस सरकारने मोपासाठी जमीन संपादन केली व भाजपा तेथे विमानतळाचे बांधकाम करून दक्षिण गोवा नष्ट करू पाहात आहे, असेही राधाराव ग्रासियश यांनी म्हटले आहे.

बाल चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

Story Summary: 

उद्यापर्यंत चालणार

गोवा करमणूक सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय बाल चित्रपट महोत्सवाचे काल गोव्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

श्रीवास्तव यानी गोवा करमणूक सोसायटीच्या आवारात बालगोपाळांच्या उपस्थितीत हवेत फुगे सोडून महोत्सवाचा शुभारंभ केला. यावेळी गोवा करमणूक सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव हेही हजर होते.

जीसीए घोटाळाप्रकरणी खवटेंकडून कागदपत्रे सुपूर्द

Story Summary: 

सहकार निबंधक महानिरीक्षकांनी जीसीएतील कथित गैरभाराची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या द्विसदस्यीय समितीचे तपास अधिकारी चेतन देसाई यांच्याकडे या घोटाळ्यासंबंधीचे महत्त्वाचे दस्तावेज आमदार रोहन खंवटे यांनी काल सुपूर्द केले.

अकादमीच्या विस्तार संकुल बांधकामातील कथित घोटाळ्यासंबंधीची कागदपत्रेही त्यांनी देसाई यांच्याकडे सुपूर्द केली असून सखोल तपास करण्याची विनंती खंवटे यांनी केली आहे. माजी आमदार दयानंद नार्वेकर यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत खंवटे यांच्यावर टीका करताना सदर बांधकामास परवान्याची किंवा ना हरकत दाखल्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. जीसीएच्या मैदानाची जागा शिक्षण खात्याकडून इन्फोटेक कॉर्पोरेशन गोवा या संस्थेला दिली होती. त्यावेळी ना हरकत दाखला शिक्षण खात्याने दिला होता की नाही याची चौकशी होणे जरुरीचे आहे.

वेळ्ळी येथे महिलेचा खून

झायना वेळ्ळी येथे दिवसाढवळ्या लिंदा केझिटन आंद्राद (६७) या महिलेचा गळा दाबून खून करण्याची घटना घडली. कपाटातील लाखो रुपयांचे दागिनेही पळविल्याचे आढळून आले. या प्रकरणाचा खूनी रात्रौ उशिरापर्यंत सापडू शकला नव्हता.

मोबाईल चोर पोलिसांच्या कचाट्यात

शिकवणी घेण्यासाठी जाणार्‍या वा बाजारात गेलेल्या मुलींना गाठून तातडीने फोन करायचा असल्याची बतावणी करून मोबाईल फोन हिसकावून घेऊन फरारी होणार्‍या त्याशिवाय मडगाव शहरात कित्येक महाविद्यालयीन युवतींचे मोबाईल फोन हिसकावून फरारी होणार्‍या रुमडामळ-दवर्ली येथील दस्तगीर रझक शेख (२५) याला मडगाव पोलिसांनी अटक करून पाच मोबाईल संच व डिओ स्कूटर हस्तगत केली आहे.

डॉ. प्रकाश वझरीकर राजभाषा संचालक

कोकणी लेखक तथा खांडोळा सरकारी महाविद्यालयातील अद्यापक डॉ. प्रकाश वझरीकर यांनी काल राजभाषा संचालनालयाच्या संचालकपदाचा ताबा घेतला.

मेरशी येथे स्त्रीचा मृतदेह आढळला

मानशेर मेरशी येथे काल अज्ञात स्त्रीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. तिचे वय अंदाजे ३५ ते ४५ दरम्यान वर्तविण्यात आले आहे.

बेकायदेशीर खाण प्रकरणी येडीयुराप्पांची सीबीआय चौकशी

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांची बेकायदेशीर खनिज घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने काल दिले. काही खाण कंपन्यांवर मेहेरनजर करून त्या बदल्यात आपल्या नातेवाईकांतर्फे चालवल्या जाणार्‍या विश्वस्त संस्थेला त्यांच्याकडून देणग्या मिळवल्याचा येडीयुराप्पा यांच्यावर आरोप आहे. सरन्यायाधीश एस. एच. कापडिया यांच्या नेतृत्वाखालील खास खंडपीठाने येडीयुराप्पांवरील आरोपांबाबत चौकशी करून येत्या ३ ऑगस्टपूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश सीबीआयला दिले. न्या. आफ्ताब आलम व स्वतंत्र कुमार यांचाही या खंडपीठात समावेश होता.

वाहनांना प्रवेशकर कायद्यास अमान्य

सरकारसमोर पेच

व्यापारी वाहनांना गोव्यात प्रवेश करण्यासाठी चेक नाक्यांवर व्यापारी कर लागू करण्याची कायद्यात तरतूद नसल्याचे कायदा खात्याने सरकारला कळविले असून त्यामुळे वाहनांना व्यापारी कर लागू करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाची सध्यातरी अंमलबजावणी करणे अशक्य झाले आहे.

पाठ्यपुस्तकात आंबेडकरांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र

संसदेत खडाजंगी

कपिल सिब्बलनी मागितली माफी

दलितांचे कैवारी समजले जाणारे आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक आक्षेपार्ह व्यंगचित्र एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकात छापल्यावरून काल संसदेत हंगामा झाला. शेवटी मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी सरकारच्यावतीने माफी मागत लवकरच ते व्यंगचित्र पुस्तकातून काढले जाईल अशी ग्वाही दिली.

एअर इंडियाचा संप

Story Summary: 

एअर इंडियाचा सध्या संप चालू असल्याने मुंबईच्या छत्रपती शिवाजी तळावर उभे करून ठेवलेले विमान. संपकरी वैमानिकांना कामावर रुजू होण्याचे आदेश द्यावेत अशी याचिका काल एअर इंडियातर्फे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. काल संपाच्या तिसर्‍या दिवशी व्यवस्थापनाने आणखी नऊ वैमानिकांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला तसेच आठ आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमानसेवाही रद्द कराव्या लागल्या. याशिवाय काही प्रमुख मार्गावरील विमानसेवांचे आरक्षणही तूर्त बंद करण्यात आले आहे.

कॉंग्रेस उमेदवारीसाठी तीन नावांवर विचार

Story Summary: 

चर्चिल यांचा पक्षत्याग रोखण्याचे प्रयत्न

कुठ्ठाळीच्या पोटनिवडणुचा कॉंग्रेस उमेदवार निवडण्यासाठी काल पक्षाचे गोवा प्रभारी जगमितसिंह ब्रार व सचिव सुधाकर रेड्डी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सिंथिया डिसिल्वा, रेमंड डिसा आणि चर्चिल आलेमाव ही तीन नावे अंतिम विचारासाठी निवडण्यात आली असून पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम नावावर शिक्कामोर्तब होईल. कॉंग्रेस सोडून युगोडेपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या चर्चिल आलेमाव यांनी पक्षत्याग करू नये यासाठी त्यांचे मन वळवण्याचे शर्थीचे प्रयत्नही पक्षनेत्यांनी केले.

चर्चिल आलेमाव यांना उमेदवारी देण्याचा कोणताही विचार कॉंग्रेस पक्षाने केला नव्हता, मात्र युगोडेपाने चर्चिल यांना उमेदवारीसाठी गळ घालून राधाराव ग्रासियस आणि चर्चिल यांची संयुक्त पत्रकार परिषद झाल्यापासून कॉंग्रेस नेते सावध झाले असून चर्चिल यांनी युगोडेपातर्फे उमेदवारी दाखल केल्यास पक्षाला कुठ्ठाळीची पोटनिवडणूक बरीच जड जाईल याचा अंदाज आल्याने चर्चिल यांची मनधरणी करण्यासाठी कॉंग्रेस नेते पुढे सरसावले आहेत.

राज्यातील उपाहारगृहांमध्ये अस्वच्छता

Story Summary: 

८३ आस्थापनांस नोटीस; १० बंद ठेवण्याचा आदेश

पावसाळ्यात घेण्यात यावयाची काळजी म्हणून अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाने उत्तर गोवा व दक्षिण गोव्यातील तसेच सर्व किनारी भागांतील हॉटेलांची व उपाहारगृहांची तपासणी करण्याची मोहीम सुरू केली असून आतापर्यंत प्रशासनाने १३० उपाहारगृहांची तपासणी केली असता ८३ आस्थापनांना सुधारणा करण्याची नोटीस जारी करून ८ उपाहारगृहे व दोन बेकर्‍या मिळून १० आस्थापने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

म्हापसा, वास्को, फोंडा, मडगाव, कळंगुट व अन्य किनारी भागांतील उपाहारगृहांची तपासणी करण्यात आल्याचे संचालक वेलजी यांनी सांगितले. सदर मोहीम चालूच असून जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत सरकार कोणतीही तडजोड करण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले.

पणजी बाजारात कारमधील २ लाख रु. चोरले

Story Summary: 

भोजनासाठी जाण्यापूर्वी आपणाकडील रोख २ लाख रु. आपल्या कारमध्ये ठेवून जेवायला गेलेल्या खोर्ली येथील मार्क डिकुन्हा यांच्यावर आपले पैसे गमावून बसण्याची पाळी काल दुपारी आली. सदर घटना पणजी बाजारात घडली.

मार्क डिकुन्हा हे काल दुपारी जीए ० ए २४४६ या आपल्या मोटारगाडीने खरेदीसाठी पणजी शहरात आले होते. दुपारी १.३० च्या सुमारास ते नवतारा हॉटेलमध्ये भोजनासाठी गेले. गाडी त्यानी हॉटेलसमोरच पार्क केली होती. यावेळी त्यांनी आपणाकडील रोख २ लाख रु. गाडीत ठेवले. गाडी हॉटेलसमोरच ठेवलेली असल्याने जेवताना आपले लक्ष सारखे गाडीकडे होते. मात्र, जेवणानंतर आपण गाडीकडे आलो तेव्हा गाडीच्या खिडकीची काच फोडून आतील रोख रक्कम पळवण्यात आली होती, असे त्यांनी पणजी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

सोमवारपर्यंत कॉंग्रेस उमेदवार घोषित

कुठ्ठाळी मतदारसंघासाठीचा कॉंग्रेस उमेदवार दि. १४ पर्यंत निश्‍चित होईल, अशी माहिती कॉंग्रेस प्रभारी जगमितसिंग ब्रार यांनी दिली. चर्चिल आलेमाव कॉंग्रेसमध्येच राहणार असल्याचा दावाही त्यांनी केला. भाजप उमेदवाराविरुद्ध एकमेव उमेदवार उभा करण्यासाठी प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

‘व्हिजन डॉक्युमेंट’ जूनपर्यंत तयार

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत काल सकाळी सचिवालयात प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गोवा विकास मंडळाच्या बैठकीत पुढील २५ वर्षातील गोवा कसा असावा यासंबंधीचा संपूर्ण आराखडा ‘व्हिजन डॉक्युमेन्टस’ जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मळकर्णे अपघातात स्कूूटरचालक ठार

मेडका कार्यामळ, मळकर्णे येथे काल संध्याकाळी ट्रक व स्कूटर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात स्कूटरचालक विठ्ठल मुलो गावकर (४५) जागीच ठार झाले.

शहा आयोगाच्या अहवालावर ‘उटा’ असमाधानी

आंदोलनाची वर्षपूर्ती आझाद मैदानावर साजरी करणार

एक वर्षामागे बाळ्ळी येथे उटाच्या हिंसक आंदोलनाची चौकशी करून शहा आयोगाने जो अहवाल दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही असमाधानी आहोत. सी.बी.आय.च्या चौकशीच्या अहवालाची वाट पहात असल्याचे उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी सांगितले.

चार नव्या फेरीबोटी

नदी परिवहन खात्याच्या ताब्यात लवकरच ४ नव्या फेरीबोटी येणार असून उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आतापर्यंत ३१ फेरीबोटींची नोंदणी झाल्याची माहिती खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

ऊर्दू डी. एड. विद्यालय बंद न करण्याची ग्वाही

पर्वरी येथील ऊर्दू डीएड विद्यालय बंद न करण्याची मागणी करणारे निवेदन अखिल गोवा ऊर्दू शिक्षक संघटनेने काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिले असता पर्रीकर यांनी सदर विद्यालय बंद न करण्याचे आश्‍वासन दिले.

मातृत्वापेक्षा करिअर महत्त्वाचे

- भारतीय शहरांतील विवाहित महिलांचे मत -

भारतीय शहरांमधील विवाहित महिला करिअरला सर्वोच्च स्थान देत असून मुले जन्माला घालणे व वाढविणे त्यांच्यासाठी दुय्यम वा गौण बाब असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे.

असोसिएट चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजतर्फे करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात दिल्ली, मुंबई, बेंगलोर व इतर प्रमुख शहरांतील सुमारे १२०० महिलांची मते अजमावण्यात आली आहेत. या महिला २४ ते ३० वयोगटातील असून अजून माता बनलेल्या नाहीत.

‘बफर झोन’संबंधी अहवाल लांबणीवर

वन खात्यातर्फे तयार करण्यात येत असलेल्या खाणीसाठीच्या ‘बफर झोन’ संबंधीच्या अहवालाला आणखी १५ दिवस विलंब होऊ शकतो, अशी माहिती काल वन खात्यातील सूत्रांनी दिली.

दोन बातम्या आणि स्वैर मंथन

- डॉ. राजीव कामत, खोर्ली म्हापसा

या दिवसांत वाचलेल्या दोन बातम्यांमुळे मनात विचारांचे मोहोळ उठले. पहिली बातमी होती ती म्हणजे आमच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या संदर्भात व दुसरी बातमी होती ती रामदेवबाबा यांचे सांसदपटूंविषयीचे अनुद्गार. वरील दोन्ही बातम्यांचे अगदी तटस्थपण विश्‍लेषण करायचे म्हणून हा पत्रप्रपंच.

पहिल्या बातमीनुसार, आमच्या राष्ट्रपतीसाहेबांनी त्यांच्या परदेश प्रवासावर जवळजवळ २१० कोटी रुपये खर्च केले. हा खर्च त्यांच्या अजूनपर्यंतच्या कारकिर्दीवर केला गेला आहे. सध्याच्या माहिती हक्क कायद्यानुसार कुठलाही भारतीय नागरिक दहा रुपयाच्या अर्जाद्वारे कोणतीही माहिती मिळवू शकतो. त्यानुसार वरील आकडेवारी उपलब्ध झाली आहे. या खर्चाचे विश्‍लेषण करताना असे दिसून आले की, राष्ट्रपतींच्या दौर्‍यावर त्यांच्या पतीखेरीज (पतींची सोबत अपेक्षित आहे.) त्यांची मुले, सुना, जावई, नातवंडे व अन्य काही नातेवाईक यांचा पण सहभाग होता.

चिदंबरम घेर्‍यात

डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांची एक खासीयत आहे. ते एकदा पिच्छा पुरवू लागले की सोडत नाहीत. गोव्यात आयरिश जसे एखाद्याला नामोहरम करायचे ठरवले की त्याची सर्व बाजूंनी कोंडी करतात, तसेच स्वामी. गेले काही महिने स्वामी चिदंबरम यांच्या मागे लागले आहेत. अर्थात हे काही नुसते आरोप नाहीत, बरेच कागदोपत्री पुरावेही त्यांनी गोळा केलेले आहेत. पंतप्रधानांना त्यांनी चिदंबरम यांची टूजी स्पेक्ट्रम प्रकरणात चौकशी करा असे गेल्या वर्षी साकडे घातले होेते. पंतप्रधानांनी त्याकडे कानाडोळा केला म्हणून स्वामींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानेही प्रथमदर्शनी पुराव्यांना ग्राह्य मानून त्यांची याचिका दाखल करून घेतली आहे. आता यशवंत सिन्हा यांनी चिदंबरम यांच्यावर स्वामी यांनी केलेले गंभीर आरोप संसदेतही उपस्थित केल्याने दोन दिवस तेथील वातावरण प्रचंड तापलेले दिसते. कधी न संतापणारे प्रणव मुखर्जीही संतापाने थरथरत परवा ज्या प्रकारे लोकसभेत ओरडत होते, ते दृश्य पुरेसे बोलके होते. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या ऍडव्हान्टेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग या कंपनीला टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याची लाभार्थी असलेल्या मॅक्सीस या कंपनीने एअरसेल या दूरसंचार कंपनीत गुंतवणूक करताना पाच टक्के भागिदारी दिली असा स्वामी यांचा आरोप आहे.

सरकारी कार्यालय : एक अनुभव

- विजय प्रभू पार्सेकर देसाई, पेडणे

पेडणे सरकारी संकुलात प्रमाणित प्रत मिळविण्यासाठी सहनशक्तीपलीकडे दगदग आणि मनस्ताप सहन करावा लागतो.

जेव्हा उच्च न्यायालयासह कुठल्याही न्यायालयाच्या निकालाची किंवा इतर न्यायालयीन कागदपत्रांची प्रमाणित प्रत हवी असेल तर कोर्ट फी स्टँप लावून संबंधित कारकूनाकडे अर्ज द्यावा लागतो. सदर कारकून फाईल काढून अंदाजित रक्कम घेतो आणि पावती देतो. प्रत दहा दिवसांत देणे नियमानुसार (सर्टिफाईड कॉपीज रूल) बंधनकारक आहे. दिलेल्या दिवशी प्रत तयार नसल्यास प्रत का तयार नाही याचे कारण अर्जावर नमूद करून नवी तारीख दिली जाते. प्रमाणित प्रतीवर पहिल्यांदाच दिलेली तारीख आणि नव्याने दिलेली तारीख दोन्ही तारखांची नोंद करणे नियमानुसार आवश्यक आहे. जर तातडीने प्रत हवी असल्यास अर्जाला आणखी दोन रुपयांचा कोर्ट फी स्टँप लावावा लागतो आणि साधारण प्रतीची जी फी असते त्याच्या अर्धी जादा रक्कम द्यावी लागते.

दादापुता

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील अपयशापासून धडा घ्या आणि आपसातील लाथाळ्या थांबवा अशी हाक आपल्या कॉंग्रेसजनांना पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी एकीकडे दिलेली असताना दुसरीकडे युगोडेपाच्या वाटेवर असलेले गोव्यातील नाराज नेते चर्चिल आलेमाव यांनी पक्षत्याग करू नये यासाठी त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न कॉंग्रेसचे गोव्यात थडकलेले निरीक्षक करीत आहेत. चर्चिल यांना पक्षात फार महत्त्व आहे म्हणून त्यांची ही मनधरणी चालली आहे नव्हे, तर त्यांचे उपद्रवमूल्य पुरते ठाऊक असल्यामुळेच त्यांचा दादापुता या निरीक्षक मंडळींनी चालवलेला आहे. कुठ्ठाळी पोटनिवडणूक तोंडावर आलेली असताना आणि भाजपाच्या संभाव्य उमेदवार एलिना साल्ढाणा यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा करून इतरांचा पाठिंबा त्याला मिळवण्याच्या प्रयत्नात कॉंग्रेस असताना आलेमाव यांनी स्वतःच युगोडेपाची उमेदवारी पटकावून कॉंग्रेसला काटशह देण्याचा जोरदार प्रयत्न चालवल्यामुळे त्यांची पावले रोखण्याची ही धडपड आहे. याच चर्चिल यांच्या घराणेशाहीमुळे राज्यात कॉंग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले असे म्हणणार्‍या स्थानिक नेत्यांना चर्चिल यांच्या पक्षांतरामुळे पक्षाचे नुकसान नव्हे, तर फायदाच होईल असे वाटते, परंतु केवळ येणार्‍या कुठ्ठाळी पोटनिवडणुकीकडे पाहून त्यांचा पक्षत्याग रोखण्यासाठी या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Sagar kavach, the day-long security drill to test preparedness of security personnel, was conducted ,which as usual caused traffic jams

सागर सुरक्षा कवच .....

Story Summary: 

सुरक्षा कवायतींचा भाग असलेल्या ‘ऑपरेशन सागर सुरक्षा कवच’ ला कालपासून प्रारंभ झाला. ते एकूण तीन दिवसपर्यंत चालेल. दरम्यान, ‘सागर कवच’चा भाग म्हणून करण्यात येत असलेल्या वाहन तपासणीमुळे अनेक भागांत वाहतूक खोळंबली होती. (छाया : गणादीप शेल्डेकर)

चर्चिलचे मन वळवण्याचेब्रार व रेड्डी यांचे प्रयत्न

Story Summary: 

माजी साबांखा मंत्री चर्चिल आलेमाव यांनी कुठ्ठाळीतून युगोडेपाच्या तिकीटावर निवडणूक न लढवता कॉंग्रेस उमेदवारच या मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी सहकार्य करावे, यासाठी आलेमाव यांचे व कुठ्ठाळीतील कार्यकर्त्यांचे मन वळविण्यासाठी अखिल भारतीय कॉंग्रेस सरचिटणीस जगमितसिंग ब्रार व सचिव सुधाकर रेड्डी यांचे काल गोव्यात आगमन झाले.

काल संध्याकाळी रेड्डी यांनी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर, विरोधी नेते प्रतापसिंह राणे, कुठ्ठाळीचे गट अध्यक्ष व तेथील सरपंच, पंच सदस्य व अन्य नेत्यांची बैठक घेऊन चर्चा केली. सुरुवातीस सिंथिया डिसिल्वा यांनी कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली होती. परंतु चर्चिल आलेमाव यांनी कुठ्ठाळीतील गट अध्यक्ष व अन्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आपण युगोडेपावर निवडणूक लढवित असल्याचे सांगून त्यांचा पाठिंबा मिळविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे कॉंग्रेससमोर पेच प्रसंग निर्माण झाला आहे.

जीसीएच्या कारभाराची संपूर्ण चौकशी करा : खंवटे

Story Summary: 

गोवा क्रिकेट असोसिएशनमधील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या चौकशी पथकाने मैदानाची तसेच इमारतीच्या बेकायदेशीर बांधकामाची पूर्ण चौकशी करावी, अशी मागणी करून या प्रकरणी आवश्यक असलेले पुरावे सादर करण्यास आपण तयार असल्याचे पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

ऍड. दयानंद नार्वेकर यांनी जीसीएचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी केल्याचा आरोप खंवटे यांनी केला. जीसीएच्या प्रकल्पात तारांकीत हॉटेलप्रमाणे सुविधा असून त्याचा लाभ नार्वेकर व त्यांच्या कुटुंबियांना होत आहे. सर्वसामान्यांना तेथे प्रवेशही मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. तेथील इमारत बेकायदेशीर असून पंचायत किंवा अन्य संबंधित संस्थांकडून त्यांनी परवानेही घेतलेले नाहीत.

विधानसभा निवडणुकांतील पराभवापासून कॉंग्रेसजनांनी धडा घ्यावा : सोनिया

Story Summary: 

गोव्याचा निकाल अत्यंत निराशानजक

गेल्या निवडणुकीतील पराभवापासून पक्ष कार्यकर्त्यांनी धडा घ्यावा. नेत्यांनी आपसातील मतभेद दूर सारून पक्षासाठी शिस्तबद्धपणे काम करावे असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले आहे. सर्व प्रकारचे मतभेद दूर सारून सर्व पातळ्यांवर एक शिस्तबद्ध संघ म्हणून काम करा असे त्या म्हणाल्या. आम्ही जिंकू वा हरू ते ही एकच गोष्ट ठरवील असे त्या उद्गारल्या.

‘‘लोक आमच्याकडे अपेक्षेने बघत आहेत, पण या भावनांना निवडणुकीतील विजयश्रीत परिवर्तीत करायचे असेल तर त्यासाठी आम्ही बांधीलकी आणि एकजूट दाखवणे गरजेचे असेल’’ असेही सोनिया यांनी सांगितले. कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत त्या संबोधित करीत होत्या. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हेही या बैठकीस उपस्थित होते.

ट्रक-मोटरसायकल अपघातात युवक ठार

सुळकर्णे येथे ट्रक व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार दिलीप बाबू वरक (२२) हा देवरे येथील युवक ठार झाला.

तीन ठिकाणी तीन महिलांचे दागिने लुटले

काल एकाच दिवशी राजधानी पणजीसह मांद्रे व फोंड्यात घडलेल्या तीन घटनांमध्ये मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी प्रत्येक ठिकाणी एक या प्रमाणे तीन महिलांचे दागिने लुटण्याची घटना घडली.

पणसुले येथे वाघीण व बछड्याच्या पावलांचे ठसे

काही दिवसांपूर्वी म्हादई अभयारण्य क्षेत्रातील वझरा सखला येथे दोन पट्टेरी वाघांचे दर्शन झाल्याची घटना ताजी असतानाच काल पणसुले येथे म्हादई अभयारण्य क्षेत्रात वाघीण आणि बछड्याच्या पावलांचे ठसे आढळले असून पट्टेरी वाघांच्या उपस्थितीबाबत पुन्हा एकदा संकेत मिळाले आहेत.

झारखंडचे मुख्यमंत्री व पत्नीहेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावले

झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा, त्यांची पत्नी मीरा व अन्य सहकारी काल एका हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावले. रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर हे हेलिकॉप्टर उतरत असताना दुर्घटनाग्रस्त झाले. ऑगस्टा ए डब्ल्यू १०९ बनावटीचे दोन इंजिने असलेले हे हेलिकॉप्टर दुपारी साडे बाराच्या सुमारास आपत्कालीन स्थितीत उतरवण्याचा प्रयत्न करीत असता दुर्घटनाग्रस्त झाले. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते उतरवण्यात येत होते.

गुंडांच्या तडीपारीची मडगाव पोलिसांची मागणी

बशीर शेख याला अटक

मोती डोंगरवरील कुप्रसिद्ध गुन्हेगार बशीर शेख याला काल आठ महिन्यांपूर्वी मोतीडोंगरवरील प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणानंतर तो फरारी झाला होता.

कचरा विल्हेवाटीसाठी गोमेकॉला निर्देश

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने काल गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसराला भेट देऊन तेथील अधिकार्‍यांना महाविद्यालयातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्याच्या प्रकरणी योग्य तो आदेश दिला.

वैमानिकांचा संप बेकायदा न्यायालयाचा निवाडा

एअर इंडियाच्या वैमानिकांनी पुकारलेला आकस्मिक संप बेकायदेशीर असल्याचा निवाडा काल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. हा निवाडा येताच एअर इंडिया प्रशासनाने संपकरी वैमानिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली असून आणखी दहा वैमानिकांची हकालपट्टी काल करण्यात आली. या विषयावरील सुनावण्या पूर्ण होईस्तोवर वैमानिकांनी संप मागे घ्यावा व कोणीही वैमानिकाने आजारी असल्याचा बहाणा करू नये असे काल दिल्ली उच्च न्यायालयाने बजावले.

गोवा टू बेळगांव व्हाया ‘मार्ग’

- गुरूनाथ केळेकर

बेळगांवकरांनी बेळगावात गोवेकरांच्या संगतीने ‘बेळगाव मार्ग’ नावाची संस्था स्थापन केली आहे. या बेळगावकरात कन्नड, मराठी तसेच कोंकणी लोकही आहेत. गोव्यात ‘मार्ग’ संस्था जे कार्य करीत असते, तसेच शैक्षणिक कार्य बेळगांवकर, बेळगावमध्ये करू पाहत आहेत. असल्या विधायक कार्याचे स्वागत झाले पाहिजे.

बेळगाव आता पूर्वीचे राहिलेले नाही. एके काळी बेळगावला गरीबांचे माहेरघर म्हणायचे. आता ती गरीबी बेळगावात राहिलेली नाही. परंतु तेथील हवीहवीशी वाटणारी हवा आणि वेड लावणारा दूध, लोणी, भाज्या आणि फळे यांचा खजिना मात्र जशाचा तसा आढळतो. आधी बेळगावात सायकलीच सायकली दिसायच्या, आणि ते चालवणार्‍यांचे कसबही दिसायचे. आता हे शहर मोटरसायकलींचे झाले आहे. बेळगाव शहरात जास्त चारचाकी वाहने दिसत नाहीत. जे मोटारी घेऊन येतात ते त्या पार्किंगच्या जागेत ठेवतात आणि दोन तीन तास पायी फिरून आपली कामे करतात आणि त्यानंतर गाडी घेऊन निघून जातात. त्यात आपण गोवेकरही असतो. गोव्याच्या रस्त्यावर ‘दादागिरी’ करणारे आम्ही ‘भानगड नको’ म्हणून निमूटपणे सरळ पार्किंगच्या जागेत आपली गाडी पार्क करतो.

मॅथ्यूची व्यथा

संरक्षण दलांच्या अब्जावधी रुपयांच्या खरेदी व्यवहारात सर्रास चाललेल्या लाचखोरीचा पर्दाफाश सर्वप्रथम ‘तहलका’ पोर्टलच्या ‘ऑपरेशन वेस्टएंड’ या स्टींग ऑपरेशनने केला. तब्बल अकरा वर्षांनंतर अलीकडेच भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष बंगारू लक्ष्मण दोषी सिद्ध होऊन कारावासात गेले आणि इतर अकरा संबंधित प्रकरणांची सुनावणी अद्याप सुरू आहे. दोन लाख रूपयांची लाच स्वीकारताना पकडल्या गेलेल्या समता पक्षाच्या नेत्या व तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निकटवर्तीय जया जेटली यांच्यावरील खटल्याचाही त्यात समावेश आहे. आता लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी स्वतःलाच टेट्रा ट्रक व्यवहारात लाच देऊ केली होती असा गौप्यस्फोट करून संरक्षण दलांच्या खरेदी व्यवहारातील दलालांच्या सुळसुळाटास अधिकृत दुजोराच दिलेला आहे. काही वर्षांपूर्वी काही लाखांवर दिली जाणारी दलाली आज कोट्यवधींच्या घरात गेली आहे एवढाच काय तो फरक. हे सगळे येथे सांगण्याचे कारण वेगळे आहे. ज्या ‘ऑपरेशन वेस्टएंड’ या स्टींग ऑपरेशनने संरक्षण दलांविषयीच्या जनमानसातील उदात्त प्रतिमेला तडा देत तेथील उघडेनागडे वास्तव प्रथम समोर आणले, ती शोधपत्रकारिता राबवणार्‍या मॅथ्यू सॅम्युएल या पत्रकाराने आपल्याला त्या धडपडीचे कोणते परिणाम वैयक्तिक आयुष्यात भोगावे लागले, त्याची कहाणी ‘आऊटलूक’ नियतकालिकाच्या ताज्या अंकात मांडली आहे.

Bowing down to election commission caution, chief minister decides not to induct Alina Saldanha into his cabinet while the code of conduct is in force

रणरणत्या उन्हामुळे कुडतरी येथील तलावाशेजारील जमिनीला भेगा

Story Summary: 

राज्यात सध्या उन्हाळ्याने सगळे होरपळून निघत आहेत. रणरणत्या उन्हामुळे कुडतरी येथील तलावाशेजारील जमिनीला अशा भेगा पडल्या आहेत. (छाया : गणादीप शेल्डेकर)

निवडणूक आयोगाच्या सूचनेचा मान राखणार : पर्रीकर

Story Summary: 

कधीही कुणालाही मंत्री म्हणून शपथ देण्याचा अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्याला आहे. मात्र, सत्ताधारी भाजपतर्फे कुठ्ठाळी मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेल्या एलिना साल्ढाणा यांना राज्यात पोटनिवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झालेली असताना मंत्री म्हणून शपथ देऊ नये, असा सल्ला भारतीय निवडणूक आयोगाने गोवा सरकारला दिल्याने एलिना साल्ढाणा यांना कुठ्ठाळीतील पोटनिवडणुकीनंतरच मंत्रीपदी घेतले जाणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

मात्र, त्याचबरोबर मंत्री म्हणून कधी कुणाला शपथ द्यायची हा आपला अधिकार असून त्याबाबत कुणीही आपणाला कसलाही आदेश देऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री म्हणून कधी कुणाला शपथ द्यायची हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असून घटनेनेच मुख्यमंत्र्यांना तसे अधिकार दिले असल्याचे ते म्हणाले. घटनेच्या १६४ कलमानुसार विधानसभेवर निवडल्या न गेलेल्या व्यक्तीचीही मुख्यमंत्री मंत्रीपदी आणू शकतो, असे ते म्हणाले.

करमणे-दाभाळ अपघातात टीपर ट्रक चालक ठार

करमणे-दाभाळ येथे खनिज वाहतूक करणार्‍या ट्रिपर ट्रकच्या चालकाचाच बळी घेण्याची घटना आज सकाळी घडली.

बिंबल-शिगांव येथील खाणीवरून खनिज मालाने भरलेला ट्रक (जीए ०९ टी ५४६३) कुड्डेमाळ येथे येत होता. निरगिरी करमणे येथील पीटीआय प्लॉटजवळ सदर ट्रक रांगेत थांबला होता.

मराठी बातमीपत्र रद्द केल्याने शिवसेनेचा दूरदर्शनवर मोर्चा

Story Summary: 

शिवसेना गोवा राज्य प्रमुख रमेश बाबुराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काल सुमारे ४० शिवसैनिकांनी पणजी दूरदर्शनवर मोर्चा नेला व पणजी दूरदर्शन केंद्राने सह्याद्री वाहिनीवरून दाखवले जाणारे मराठी बातमीपत्र बंद करून स्वतःचे कोकणी बातमीपत्र सुरू केल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

शिवसेना मराठीवर झालेला हा अन्याय खपवून घेणार नसल्याचे शिवसेनेने पणजी दूरदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालकाना दिलेल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे.

पोंबुर्प्याला मंजूर झालेली स्मशानभूमी एकोशीत उभारण्याचा प्रयत्न

Story Summary: 

पोंबुर्पावासीयांचा आरोप; प्रशासनाकडे तक्रार

पालमार - पोंबुर्पा येथे स्मशानभूमीसाठी साडे सात लाख रुपये मंजूर झालेले असताना हा निधी एकोशी येथील आधीच अस्तित्त्वात असलेल्या स्मशानभूमीवर खर्च करण्याचा प्रयत्न स्थानिक पंचायतीकडून होत असल्याचा आरोप पालमार - पोंबुर्पा येथील ग्रामस्थांनी केला आहे.

एकोशी येथे आधीच स्मशानभूमी आहे व पालमार - पोंबुर्पा येथे सुसज्ज स्मशानभूमी नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. येथे स्मशानभूमी उभारली जावी अशी मागणी पालमार - पोंबुर्पा परिसरातील नागरिक सातत्याने करीत आले होते. अलीकडेच वृत्तपत्रांत पालमार - पोंबुर्पा येथे स्मशानभूमी उभारण्यासाठी वृत्तपत्रातून निविदा मागवण्यात आल्याचे कळल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच चौकशी केली असता ही स्मशानभूमी पालमार येथे उभारली जाणार नसून एकोशी येथे उभारली जाणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

पाकने काळजी घ्यावी : हिलरी

दहशतवाद्यांनी आपली भूमी दहशतवादी कृत्यांसाठी वापरू नये याची काळजी पाकिस्तानने घ्यावी असे मत अमेरिकेच्या भारतभेटीवरील विदेशमंत्री हिलरी क्लिंटन यांनी काल व्यक्त केले.

संजय बांदेकर यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा

माजी क्रीडामंत्री संजय बांदेकर यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी दिली आहे. ६ मे रोजी पहाटे त्यांच्या आगोंद येथील निवासस्थानी ते चक्कर येऊन खाली कोसळले. त्यावेळी ते घरा एकटेच होते. सकाळी ८च्या दरम्यान ज्या वेळी त्यांच्या घरी काम करणारा कामगार आला त्यावेळी त्याच्या निदर्शनास ही गोष्ट आल्यानंतर दार फोडून त्याने स्थानिक लोकांच्या सहकार्याने प्रथम काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर लगेच १०८ रुग्णवाहिकेने त्यांची रवानगी अपोलो व्हिक्टरमध्ये करण्यात आली.

वैमानिकांच्या आकस्मिक संपामुळे एअर इंडियाची सेवा कोलमडली

एअर इंडियाच्या संपकरी वैमानिकांना धडा शिकवण्यासाठी व्यवस्थापनाने काल इंडियन पायलटस् गिल्ड या वैमानिकांच्या संघटनेची मान्यता काढून घेतली व संपावरील दहा वैमानिकांना निलंबित केले. काल एअर इंडियाच्या जवळजवळ शंभर वैमानिकांनी ‘आजारी’ असल्याचा बहाणा करून रजा घेतल्याने विमानसेवेवर गंभीर परिणाम झाला होता. एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने वैमानिकांना कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते. संपकरी वैमानिकांनी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कामावर हजर व्हावे अन्यथा कारवाईस तयार राहावे असा इशारा व्यवस्थापनाने वैमानिकांना दिला आहे.

अपह्रत पोलीस अधिकार्‍याची ओरिसात नक्षल्यांकडून हत्या

नक्षलवाद्यांनी अपहरण केलेले पोलीस अधिकारी कृपाराम मांझी यांची हत्या करण्यात आल्याचे आढळून आले आहे. मांझी यांचा मृतदेह नुअपाडा - ओरिसा येथे आढळून आला. दहा माओवाद्यांच्या एका टोळीने सहायक उपनिरीक्षक असलेल्या मांझी यांचे व त्यांच्यासोबतच्या शिपायाचे अपहरण केले होते. शिपायाला नंतर सोडून देण्यात आले होते. धरमबांध पोलीस स्थानकाचे अधिकारी असलेल्या मांझी यांनी नुआपाडाच्या जंगलात नक्षलवाद्यांची शोधमोहीम राबवली होती.

म्हादई अभयारण्यातून वस्ती वगळण्याची मागणी

‘सत्तरी जागरूक युवा मंच’ या संघटनेने काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन प्रस्तावित म्हादई अभयारण्य क्षेत्रातून लोकवस्ती वगळण्यात यावी व त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी एका कृती दलाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली.

दहशतवाद्यांचे नवे हत्यार : अंडरवेअर बॉम्ब!

धातूशोधक यंत्रांनाही सुगावा नाही

आत्मघातकी हल्ले घडवून आणण्यासाठी अल कायदाने धातूशोधक यंत्रांनाही सुगावा न लागू शकणारे धातूविरहित असे ‘अंडरवेअर बॉम्ब’ विकसित केल्याचे अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना आढळून आले आहे. विमानतळावरील सुरक्षेचा भेद करीत अशा प्रकारचा बॉम्ब नेला जाऊ शकतो, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. अल कायदाच्या दहशतवाद्यांनी अशा प्रकारच्या अंडरवेअर बॉम्बद्वारे अमेरिकी विमानांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट आखला होता अशी माहिती त्यांना मिळाली आहे.

हाज यात्रेबाबत न्यायालयाचे निर्देश

दरवर्षी हाज यात्रेला जाणार्‍या यात्रेकरूंना सरकार देत असलेल्या अनुदानास सर्वोच्च न्यायालयाने काल जोरदार हरकत घेतली. हे अनुदान येत्या दहा वर्षांच्या काळात संपुष्टात आणावे असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्या. अलतसम कबीर व रंजना प्रकाश देसाई यांच्या खंडपीठाने हा निवाडा दिला. पंतप्रधानांच्या सदीच्छा शिष्टमंडळाची सदस्य संख्याही केवळ दोनवर आणावी असेही खंडपीठाने सरकारला फर्मावले आहे.

एलिनांच्या भावनांशी खेळ नको

- दिलीप बोरकर

कुठ्ठाळीचे आमदार आणि पर्यटनमंत्री माथानी साल्ढाणा यांच्या आकस्मिक निधनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे सध्या राजकीय भांडवल सुरू झाले आहे. माथानींच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या कुठ्ठाळी मतदारसंघातून त्यांच्या पत्नी एलिना साल्ढाणा यांना उमेदवारी देऊन निवडून आणावे आणि त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून घ्यावा असा निर्णय भाजपने घेतलेला असून त्यासाठी मंत्रिपद राखूनही ठेवलेले आहे. तरीसुद्धा त्यांना मंत्रिमंडळात समावेश करतेवेळी जो काही गोंधळ सध्या माजलेला आहे, त्यातून राजकारणाला वेगळाच रंग चढेल, मात्र त्यात एलिनांची फरपट होईल याकडे कोणाचेच लक्ष गेलेले दिसत नाही.

माघारच योग्य

दिवंगत पर्यटनमंत्री माथानी साल्ढाणा यांच्या पत्नी एलिना यांना मंत्रिपद देणारच हा आपला हट्टाग्रह सोडून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी निवडणूक आयोगापुढे मान तुकवून त्या घटनात्मक व्यवस्थेचा मान राखला हे उचित झाले. आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा वा आपल्याला हव्या त्या व्यक्तीला मंत्रिपदी आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार निर्विवाद असला तरी कुठ्ठाळी मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झालेली असताना आणि राज्यात आचारसंहिता लागू असताना त्याच पोटनिवडणुकीतील आपल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मंत्रिपद देणे हे घटनात्मकदृष्ट्या जरी नसले तरी नैतिकदृष्ट्या योग्य ठरले नसते. एलिना यांच्याबाबतीत मतदार काय तो कौल देतीलच, परंतु मंत्रिपदावर त्यांना आधीच आरूढ करून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला असा आक्षेप घेण्याची संधी आपल्या विरोधकांना देण्याचे मुख्यमंत्र्यांना काही कारण नाही. निवडणूक मुक्त वातावरणामध्ये घेणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे आणि सरकारवर आयोग आपले आदेश लागू शकत नसला तरी न्यायोचित गोष्टींबाबत सल्ला जरूर देऊ शकतो.

योगमार्ग-राजयोग (अस्तेय : १०)

- डॉ. सीताकांत घाणेकर

सर्व सृष्टी विविधतेने नटलेली आहे जसे - सुंदर-कुरूप, सत्य-असत्य, उजेड-अंधकार... तसेच जगात अनेक चांगल्या-वाईट गोष्टी व घटना आहेत. पण कुठली गोष्ट चांगली व कुठली वाईट ते ठरविण्यासाठी ती गोष्ट करणार्‍याचा हेतू बघावा लागतो, फक्त त्याचे सामाजिक स्थान नाही. शास्त्रकार सांगतात -

‘‘चांगल्या हेतूने केलेली वाईट दिसणारी गोष्टसुद्धा चांगलीच असते. तसेच वाईट हेतूने केलेली चांगली दिसणारी गोष्ट सुद्धा वाईटच आहे.’’

उदा. - आई आपल्या मुलाला मारते तसाच गुंडदेखील दुसर्‍याला मारतो. पण आईचा हेतू चांगला असतो. तिला वाटते - माझा मुलगा/मुलगी संस्कारक्षम व मोठा/मोठी व्हावेत.ह्याउलट गुंड स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना मारतो. सखोल विचार केल्यास अशी अनेक उदाहरणे आढळतील.

निशिगंधा : निशा ते उषा...

- प्रा. रमेश सप्रे

अरे, जरा सोडव रे हिच्या हाताची ही पकड!’ असं म्हणताना आश्‍चर्य वाटायचं.. एवढासा हा जीव, पण कुठून शक्ती येते एवढी? एक नवी आलेली पाचवीची छोटीशी मुलगी इतका घट्ट हात पकडायची की कधी कधी शिपायाची मदत घेऊन तिची पकड सोडवावी लागे. गंमत म्हणजे ही पोर रडायची.. पण केव्हा? शाळेत येताना नव्हे, तर शाळेतून जाताना!

निशिगंधा.. नावाप्रमाणेच गोरी, सडसडीत, सुंदर मुलगी. अतिशय कोवळा जीव. गोल चेहर्‍याची, बोलक्या डोळ्यांची...खरं तर तिचं सारं शरीरच बोलायचं. पण एकूण देहबोली (बॉडी लँग्वेज) मात्र सतत घाबरलेल्या सशासारखी. सारे तिला ‘भित्री भागूबाई’च म्हणायचे. मुलं चिडवायची. मग ही जास्त रडवेली व्हायची.

आय लीग विजेत्या धेंपो स्पोर्ट्‌स क्लबच्या खेळाडूंचा गौरव

Story Summary: 

पाचव्यांदा ‘आय लीग’ फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळविलेल्या धेंपो स्पोर्ट्‌स क्लबच्या खेळाडूंच्या काल ‘धेंपो हाऊस’ मध्ये आयोजित गौरव सोहळ्यात केक कापून विजयोत्सव साजरा करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. बाजूला क्रीडामंत्री रमेश तवडकर, धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, पणजीच्या महापौर सौ. वैदेही नाईक, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक एल्विस गोम्स, राज्य क्रीडा आयोगाचे अध्यक्ष डॉ. रुफीन मोंतेरो व संघातील खेळाडू. (छाया : नंदेश कांबळी)

निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर एलिनांना मंत्रिपद देऊ नये

Story Summary: 

निवडणूक आयोगाचा सरकारला सल्ला

निवडणूक आचारसंहिता लागू झालेली असताना कुठ्ठाळी मतदारसंघातील पोट निवडणुकीतील संभाव्य उमेदवार एलिना साल्ढाणा यांचा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मंत्रिमंडळात समावेश न करण्याचा सल्ला मुख्य निवडणूक आयोगाने काल सोमवारी गोवा सरकारला दिला.

ऍड. आयरिश रॉड्रिगीश यांनी वरील प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त, तसेच येथील निवडणूक अधिकार्‍यांना निवेदन सादर करून आचारसंहिता लागू झालेली असताना एलिना यांचा मंत्री म्हणून शपथविधी झाल्यास आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचा दावा केला होता. मुख्य निवडणूक आयोगाच्या काल दुपारी झालेल्या बैठकीत या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली गेली.

आय लीग विजेत्या धेंपो स्पोर्ट्‌स क्लबच्या खेळाडूंचा गौरव

Story Summary: 

धेंपो स्पोर्ट्‌स क्लबने आठ वर्षांत पाचव्यांदा आयलीग फुटबॉल जेतेपद मिळविल्याने आम्हाला गौरवान्वित वाटत आहे. हे यश म्हणजे गोव्यातील फुटबॉलप्रेमींसाठी एक प्रकारची आदरांजलीच आहे, असे भावपूर्ण उद्गार धेेंपो उद्योग समूह तथा धेंपो स्पोर्ट्‌स क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी काढले. धेंपो हाऊसमध्ये आयोजित काल एका शानदार सोहळ्यात विक्रमी पाचव्यांदा आयलीग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविलेल्या धेंपो स्पोर्ट्‌स क्लबच्या खेळांडूंचा गौरव सोहळ्यात उपस्थितांचे स्वागत करताना श्री. धेंपो बोलत होते. यावेळी त्यांनी विजेत्या संघासाठी २० लाखांचे बक्षीस घोषित केले.

धेंपो हाऊसमध्ये आयोजित या शानदार सोहळ्याला क्रीडामंत्री रमेश तवडकर, पणजीच्या महापौर सौ. वैदेही नाईक, धेंपो उद्योग समूहाचे चेअरमन श्रीनिवास धेंंपो, साळगावकर स्पोर्ट्‌स क्लबचे अध्यक्ष शिवानंद साळगावकर, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक एल्विन गोम्स, स्टेट स्पोर्ट्‌स कौंसिलचे अध्यक्ष डॉ. रुफीन मोंतेरो, धेंपो परिवार, प्रशंसक आदींची उपस्थिती होती.

हाफीज सईदला सजा देण्यास पाकला भाग पाडू : हिलरी

Story Summary: 

गुन्ह्याची सजा देण्यासाठी अमेरिका पाकिस्तानला भाग पाडील असा इशारा अमेरिकेच्या सध्या भारतभेटीवर आलेल्या विदेशमंत्री हिलरी क्लिंटन यांनी काल दिला. मात्र, अमेरिकेने त्यासाठी हाफीज सईदविरुद्ध सबळ पुरावे द्यावेत अशी मागणी पाकच्या वतीने करण्यात आली आहे.

दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानने आवश्यक ती पावले उचललेली नाहीत असे प्रतिपादन हिलरी यांनी केले. पाकिस्तानातील दहशतवादी गटांचा अमेरिका नायनाट करील अशी ग्वाही त्यानी दिली. ओसामा बिन लादेननंतर अल कायदाचे नेतृत्व करणारा अयमान अल जवाहिरी हा ईजिप्तचा मौलवी पाकिस्तानातच दडून बसला आहे असेही हिलरी म्हणाल्या.

हाफीज सईदला सजा देण्यास पाकला भाग पाडू : हिलरी

Story Summary: 

गुन्ह्याची सजा देण्यासाठी अमेरिका पाकिस्तानला भाग पाडील असा इशारा अमेरिकेच्या सध्या भारतभेटीवर आलेल्या विदेशमंत्री हिलरी क्लिंटन यांनी काल दिला. मात्र, अमेरिकेने त्यासाठी हाफीज सईदविरुद्ध सबळ पुरावे द्यावेत अशी मागणी पाकच्या वतीने करण्यात आली आहे.

दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानने आवश्यक ती पावले उचललेली नाहीत असे प्रतिपादन हिलरी यांनी केले. पाकिस्तानातील दहशतवादी गटांचा अमेरिका नायनाट करील अशी ग्वाही त्यानी दिली. ओसामा बिन लादेननंतर अल कायदाचे नेतृत्व करणारा अयमान अल जवाहिरी हा ईजिप्तचा मौलवी पाकिस्तानातच दडून बसला आहे असेही हिलरी म्हणाल्या.

सोन्याचे भाव उतरणार

सरकारने केलेली करवाढ मागे

गेल्या अर्थसंकल्पात सोन्याच्या दागदागिन्यांवर केलेली करवाढ अखेर केंद्र सरकारने काल मागे घेतली. सोन्यासह सर्व किंमती धातूंवर गेल्या अर्थसंकल्पात लागू करण्यात आलेला एक टक्का अबकारी कर मागे घेण्यात आला आहे. ब्रँडेड वा अनब्रँडेड दागदागिन्यांवर हा कर लागू करण्यात आला होता. त्याचप्रमाणे सोन्याच्या रोख पैशांतून होणार्‍या खरेदीवर स्त्रोताच्या ठिकाणी कर आकारण्यासाठी मूल्य मर्यादा सध्याच्या दोन लाख रूपयांवरून पाच लाख रूपयांपर्यंत वाढवण्यात येईल असेही मुखर्जी यांनी जाहीर केले. या निर्णयामुळे सोन्याचे कडाडलेले दर काही प्रमाणात तरी कमी होतील अशी अपेक्षा आहे.

बी. एड. प्रशिक्षित कंत्राटी शिक्षकांचे सरकारला साकडे

देशी भाषांतील सरकारी प्राथमिक शाळांत (मराठी, कोकणी, उर्दू, कन्नड, तामिळ आदी) इंग्रजी हा एक विषय शिकवण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर तत्कालीन कॉंग्रेस सरकारने नेमणूक केलेल्या २५० बीएड प्रशिक्षित शिक्षकांचा करार गेल्या एप्रिल महिन्यात संपल्याच्या पार्श्‍वभूमीवर या शिक्षकांनी काल येथील आंबेडकर उद्यानात आपली बैठक घेऊन चर्चा केली.

रामदेव समर्थकांकडून विद्यार्थ्यास मारहाण

योगगुरू बाबा रामदेव यांना नवी दिल्लीतील रामलीला मैदानावरील आंदोलनावेळी महिलांच्या वेशात पलायन का केले असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारल्याने रामदेव समर्थकांनी त्याला काल मारहाण केली. मध्य प्रदेशमधील भिंड येथे हा प्रकार घडला.

द्विसदस्यीय समिती सदस्यांची जीसीएला तपासाची नोटीस

सहकार निबंधक खात्यातील महानिरीक्षकांनी जीसीएतील कथित गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या द्विसदस्यीय समितीचे सदस्य चेतन देसाई आणि अनील लावणीस यांनी काल दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता जीसीए संकुलात येऊन तपासाची कायदेशीर नोटीस सचिव प्रसाद फातर्पेकर यांच्याकडे सुपूर्द केली. सचिव फातर्पेकर यांच्याशी संवाद साधला असता सदर नोटीशीला सायंकाळी ४ वा. उत्तर देण्यात येणार असून देसाई आणि लावणीस यांच्याशी बैठक आयोजित केल्याचे सांगितले.

जुवारी पुलाचे दिवस भरले

नव्या पुलाची जनतेला प्रतीक्षा

दक्षिण व उत्तर गोव्याला जोडणार्‍या महत्त्वाच्या अशा जुवारी पुलाची स्थिती दिवसेंदिवस कमकुवत बनत असून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते तो पूल आठ ते दहा वर्षेपर्यंत टिकून राहावा म्हणून प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी कॅन्टीलिव्हर पद्धतीच्या पुलांची शाश्‍वती नसल्याने कोणताही अधिकारी या पुलाच्या बाबतीत ठामपणे खात्री देऊ शकत नाही.

वसुंधराराजे यांना केंद्रीय नेत्यांनी चुचकारले

आगामी निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली

राजस्थानमधील आपल्या ज्येष्ठ नेत्या वसुंधराराजे यांची समजूत काढण्याचे जोरदार प्रयत्न काल भारतीय जनता पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी केले. पक्षाने दिल्लीला पाचारण केलेले असताना ते न जुमानता पक्षत्यागाचा इशारा देणार्‍या वसुंधराराजे यांना त्याच पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील असे नेत्यांकडून सांगण्यात आले. वसुंधराराजे यांच्या समर्थनार्थ पक्षाच्या साठ आमदारांनी आपले राजीनामे सादर केलेले आहेत.

तरुणीचा अश्‍लील एमएमएस बनवणारा पोलीस निलंबित

एका महिला पोलीस शिपायाचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून एका पोलीस अधीक्षकाला निलंबित केले जाण्याची घटना ताजी असतानाच काल एका एमएमएस प्रकरणी आयआरबीमधील एका पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले.

अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज

पोलीस खात्यातील महिला कॉन्स्टेबलमध्ये अश्‍लील चित्रिकरण करून ती प्रसारित केल्याची तक्रार नोंद होताच आयआरबीचा निलंबित शिपाई अब्दूल चांदसाब (२३) याने अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर आज व्हायची सुनावणी एक आठवड्याने पुढे ढकलली आहे.

विजयादुर्गेच्या प्रांगणात अतिरूद्र अनुष्ठान

- पं. दुर्गाराम बा. उपाध्ये

प्रणतांनाप्रसीद त्वं देविविश्वार्तिहारिणी|

त्रैलोक्यवासिनामीड्ये लोकांना वरदा भव॥

निसर्गसुंदर देवभूमी गोमंतकात अनेक प्राचीन व प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यापैकी फोंड्यापासून आठ किलोमीटरवर असणारे पावित्र्य व शांतता याद्वारे आपले वेगळेपण जपणारे असे श्री विजयदुर्गा मंदिर. गावात पोचत असताना आपल्याला धरतीमातेच्या सौंदर्याचा अनुभव येऊ लागतो. आजूबाजूला सुंदर वनराई, पुढे मागे डोंगर त्यामधून जाणारा नागमोडी वळणांचा चढउताराचा रस्ता हे सर्व पाहत असताना आपण केरी गावात कधी पोचतो हे कळतसुद्धा नाही. केरी गावात वेशीवर चौकीदार हनुमंताचे मंदिर आहे. तिथून उजवीकडे सावई-वेरेचा रस्ता सोडून डावीकडे वळलो की देवस्थानच्या प्रवेशद्वारातून आपण देवीच्या भव्य व दिव्य अशा प्राकारात प्रवेश करतो. आत पोचत असताना डावीकडे असणारा नूतननिर्मित कल्याणमंडप आपले लक्ष वेधून घेतो. तिथे ब्रह्मचार्याश्रमाच्या निमित्ताने देशाचे भाग्यविधाते असणारे निरागस बटू पाहिले की पावले तिथेच थांबतात. त्यांचे पाठांतर, खेळणे, बागडणे बघितले म्हणजे आपल्याला आपले बालपण आठवते. तिथून मंदिराची सुंदर शिखरे पाहत असताना आपण नकळतच मंदिरात येऊन पोहोचतो.

मरुभूमीतली धुसफूस

राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधराराजे शिंदे आणि प्रदेश अध्यक्ष गुलाबचंद कटारिया यांच्यातील शीतयुद्धाला अखेर तोंड फुटले. वसुंधराराजे यांना हळूहळू बाजूला काढून त्यांच्या ऐवजी कटारिया यांचे नेतृत्व पुढे आणण्याचा काही पडद्यामागील शक्तींचा डाव कणखर व्यक्तिमत्त्वाच्या वसुंधराराजेंनी त्यांच्यावरच उलटवल्याचे दिसते आहे. जवळजवळ साठ आमदारांनी एका दिवसात वसुंधरांच्या पायांशी आपले राजीनामे सादर करून पक्षाविरुद्ध बंडाचा बिगुल वाजवला. मुख्यमंत्रिपदावर नसतानाही वसुंधराराजे यांची आपल्या आमदारांवर किती हुकूमत आहे याचा हा दाखला पक्षनेतृत्वास राजस्थानातील वस्तुस्थितीचा अंदाज येण्यास पुरेसा ठरावा. वसुंधराराजे पक्षत्याग करण्याच्या पवित्र्यात आहेत याची चाहुल लागताच अगदी स्वतः लालकृष्ण अडवाणींपासून अरुण जेटलींपर्यंत सर्वांनी त्यांच्याशी तातडीने संपर्क साधला तो त्यामुळेच. वसुंधराराजे या राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या सुकन्या. राजघराण्याचा वारसा रक्तातच असल्याने राज्य कसे चालवावे त्याचे डावपेच त्यांना कोणी शिकवण्याची गरज नसावी. वसुंधराराजेंनी केवळ राजस्थानातच नव्हे, तर केंद्रीय पातळीवरही आपल्या नेतृत्वाची छाप आजवर उमटवलेली आहे.

गुटख्याची ९ हजार पाकिटे मोले तपासणी नाक्यावर जप्त

Story Summary: 

पोलीस निरिक्षक जिवबा दळवी व त्यांचे सहकारी जप्त केलेल्या गुटख्यासोबत.

एलिना प्रकरणी आज निवडणूक आयोगाचा निर्णय

Story Summary: 

आयोगाने सरकारला मनाई केल्याचा आयरिश यांचा दावा

निवडणूक आचारसंहिता लागू झालेली असताना कुठ्ठाळी मतदारसंघातील भाजपच्या संभाव्य उमेदवार एलिना साल्ढाणा यांना मंत्रिपदाची शपथ देणे कायदेशीर की बेकायदेशीर हे ठरविण्यासाठी आज सकाळी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार असून या बैठकीवरच पर्रीकर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे भवितव्य ठरेल.आज संध्याकाळपर्यंत दिल्लीहून यासंबंधीचा आदेश येण्याची शक्यता येथील निवडणूक अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

साल्ढाणा यांनी भाजपमध्ये कधी प्रवेश केला? तसेच भाजपने त्यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे की नाही, यासंबंधीची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने येथील निवडणूक अधिकार्‍यांकडून मिळविली आहे.

निवडणूक अधिकार्‍यांची नोटीस मिळताच उत्तर पाठवू : पर्रीकर

Story Summary: 

कुठ्ठाळी मतदारसंघाच्या पोट निवडणुकीतील संभाव्य उमेदवार एलिना साल्ढाणा यांची मंत्रिपदी नियुक्ती करण्याच्या प्रकरणी मुख्य निवडणूक अधिकारी कुमारस्वामी यांनी दिलेली नोटीस आपल्याला मिळाली नाही. ती मिळाल्यानंतर आपण त्यांना योग्य ते उत्तर पाठवू असे सांगून मंत्रिपदाचा विस्तार करणे हा आपला अधिकार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.

घटनेने दिलेल्या अधिकारानुसार निवडणूक आयोगाने कुठ्ठाळीतील पोट निवडणूक जाहीर केली आहे. मुख्यमंत्री म्हणून आपलेही अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही प्रश्‍नावर आपण चर्चा करण्यास तयार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.

लोकायुक्त विधेयकावर लवकरच राष्ट्रपतींची स्वाक्षरी : मुख्यमंत्री

Story Summary: 

लोकायुक्त विधेयक राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडे पोचले असून लवकरच त्यावर स्वाक्षरी होऊन आपल्याकडे येण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांना सांगितले.

वरील विधेयकास राष्ट्रपतींची मान्यता मिळताच गोव्यात लोकआयुक्तांची स्थापन केली जाईल. भ्रष्टाचारांच्या प्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून लोकायुक्त महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आपण या विधेयकासाठी केंद्रीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करीत आहोत, असे पर्रीकर यांनी यावेळी सांगितले.

गुटख्याची ९ हजार पाकिटे मोले तपासणी नाक्यावर जप्त

‘प्रेस’च्या गाडीतून होत होती वाहतूक

कुळे पोलिसांनी काल २.१५ वा. मोले आऊट पोस्ट जवळ कर्नाटकातून गोव्यामध्ये टॅ्रक्स जीपने आणण्यात येत असलेल्या गुटख्याची ९००० पाकिटेे जप्त केली. त्यांची किंमत २५ हजार रु. आहे.

आयरिश यांचे राज्यपालांना निवेदन

दिवंगत पर्यटनमंत्री माथानी साल्ढाणा यांची पत्नी एलिना यांना राज्यात आचारसंहिता लागू असताना मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाऊ नये, अशी मागणी ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी गोव्याचे नवे राज्यपाल भरतवीर वांछू यांच्याकडे केली आहे.

वसुंधराराजे यांचा पक्षत्यागाचा इशारा

राजस्थान भाजपमध्ये अंतर्गत कलह शिगेला

राजस्थान भाजपमधील अंतर्गत कलहाने उचल खाल्ली असून राज्याच्या माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेत्या वसुंधरा राजे यांनी पक्षत्याग करण्याचा इशारा दिल्याने त्यांच्या समर्थनार्थ अनेक आमदारांनी राजीनामे देण्याची तयारी दर्शवली आहे. प्रदेश भाजपा अध्यक्ष गुलाबचंद कटारिया यांच्या राजकीय मोहिमेवरून हा वाद विकोपाला गेला आहे. भाजपच्या ३० आमदारांनी व एका अपक्ष आमदाराने आपले राजीनामे वसुंधरा राजे यांना काल सुपूर्द केले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वसुंधरा राजे यांनाच निःसंदिग्धपणे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले जावे अशी मागणी या आमदारांनी केली आहे. आमदारांबरोबरच भारतीय जनता युवामोर्चाच्या अनेक पदाधिकार्‍यांनीही आपले राजीनामे दिले आहेत.

भारत भाग्यविधाता...

- रमेश भगवंत वेळुस्कर

‘‘जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता ’’ हे भारताचे राष्ट्रगीत लिहिणारे रवीन्द्रनाथ टागोर हे थोर कवी आपल्या पावन अशा वंग प्रांतातले आहेत. ते आपल्या कवितेने जगाला भूल घालणारे कवी आहेत. जगाला आपल्याकडे खेचून घेण्याची त्यांची शब्दकळा व भावकळा अप्रतिम आहे. या माणसाला जगातला सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाला आहे.’’ हे मी माझ्या पाळ्यातील शाळेत मास्तरांच्या तोंडून ऐकत होतो. ही गोष्ट असेल १९५६-५७ ची. मास्तरांचे नाव आठवत नाही. पण त्या काळी पोर्तुगीजशासीत गोव्यातल्या षाळेत ही गोष्ट सांगणे हा गुन्हा होता आणि ते ऐकणेही गुन्हाच होता. त्या काळी अशा गोष्टी ऐकताना सुद्धा अंगावर मूठभर मांस चढल्यासारखे वाटायचे. का कोण जाणे, टागोरांची ही कविता वाचावयास कुठे मिळेल असेही वाटले होते. या कवीविषयी खूप आपलेपणा वाटायचा. एकदा मास्तरांनी आपल्याजवळ असलेल्या हिंदी पुस्तकात असलेले हे टागोरांचे गीत दाखवले. ते गीत बघताच खूप आनंद झाला होता. ते गीत वाचतानाचा आनंद तर अवर्णनीयच होता. आपल्याला हिंदी न शिकताच वाचता येते हेही प्रथम तिथेच कळले. पण हा प्रभाव आपोआप दबला आणि मी टागोरांची कविता व भारताचे राष्ट्रगीत वाचायला मिळाल्याचा आनंद प्रसंग फार मोठा झाला. आज हे सारे आठवते कारण आज रवीन्द्रनाथ टागोरांची १५१ वी जयंती आज आपण साजरी करीत आहोत.

संजय बांदेकर अत्यवस्थ

माजी मंत्री संजय बांदेकर यांना प्रकृती अत्यवस्थ बनल्याने काल मडगाव येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एसएमएस व कॉलद्वारे जाहिरात करणार्‍यांना सरकारचा दणका

४५ हजार नोटिसा, २८ हजार फोन बंद

मोबाईल ग्राहकांना कॉल करून त्रास देणार्‍या अ-नोंदणीकृत टेलिमार्केटिंग कंपन्यांना सरकारने आतापावेतो जवळजवळ ४५ हजार नोटिसा पाठवल्या आहेत व २८ हजार दूरध्वनी काढून टाकले आहेत. दूरसंचारमंत्री कपील सिब्बल यांनीच ही माहिती दिली. ‘ट्राय’ ची मनाई असतानाही खासगी क्रमांकांवरून असे कॉल व एसएमएस केले जात असल्याचे सरकारला आढळून आले असून टेलिमार्केटिंग कंपन्यांना ४४,८१० नोटिसा पाठवल्या गेल्या आहेत व २४ एप्रिल पर्यंत २७,९८४ दूरध्वनी बंद पाडले गेले आहेत असे त्यांनी सांगितले.

आशियातील सर्वोत्तम दहा कंपन्यांमध्ये टाटा समूह

भारताचा टाटा उद्योगसमूह हा आशिया खंडातील प्रमुख दहा उत्कृष्ट कंपन्यांपैकी एक आहे असा निष्कर्ष व्यवस्थापन सल्लागार क्षेत्रातील एक अग्रणी कंपनी असलेल्या ‘हे ग्रुप’ च्या एका पाहणीअंती काढण्यात आला आहे. या क्रमवारीत सॅमसंग समूह सर्वांत वर असून त्या खालोखाल टोयोटा मोटर्स व युनिलिव्हर यांचा समावेश आहे.

उमेदवारीबाबत मीहीअंधारात : प्रणव

विद्यमान अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचे नाव राष्ट्रपतीपदाचे कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून चर्चेत असले तरी आपण त्याबाबत अंधारात आहोत असा दावा स्वतः मुखर्जी यांनी केला आहे. ‘‘तुम्ही जसे अंधारात आहात, तसाच मीही आहे’’ असे ते ढाका येथे उद्गारले.

एनसीटीसी ‘आयबी’च्या कक्षेबाहेर शक्य : चिदंबरम

केंद्र सरकारच्या प्रस्तावित राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राला विविध कॉंग्रेसेतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून कडाडून विरोध झाल्याने सरकारने आता ही यंत्रणा गुप्तचर विभागाच्या कार्यक्षेत्राबाहेर ठेवण्याबाबत विचार सुरू केला आहे.

वाहनांतील ऐवज पळवण्याचे प्रकार

किनारपट्टी भागात वाहनांतील मौल्यवान वस्तू पळविणे तसेच महिलांचे सोन्याचे दागिने हिसकावून घेण्याच्या प्रकारांत वाढ झाली. काल रात्री ९.३० वा. वार्का किनार्‍यावर व १०.३० वाजता बाणावली येथे सोनसाखळी हिसकावून घेण्याची घटना घडली. त्यांत दोघाना अटक केली आहे.

धेंपोचे अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब

Story Summary: 

‘चँपियन क्लब ऑफ इंडिया’ धेंपो स्पोर्टस क्लबचे खेळाडू चषक उंचावून आनंद प्रगटविताना. सोबत प्रमुख पाहुणे, प. बंगालचे क्रीडामंत्री श्री. मदन मित्रा, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सरचिटणीस श्री. कुशल दास आणि धेंपोचे प्रशिक्षक श्री. आर्मांद कुलासो.

धेंपोचे अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब

Story Summary: 

प्रयाग युनायटेडवरील एकतर्फी विजयासह आय् लीग मोसमाची दिमाखात सांगता

‘चँपियन क्लब ऑफ इंडिया’ धेंपो स्पोर्टस क्लबने आय् लीग मोसमाची दिमाखात सांगता करताना अखेरच्या लीग सामन्यात स्थानिक प्रयाग युनायटेडवर ३-० असा अजिंक्यपदास साजेसा विजय प्राप्त केला.

स्वगृहीच्या सामन्यात ईस्ट बंगाला अनिर्णित रोखून पाचव्यांदा प्रतिष्ठेचे राष्ट्रीय लीग अजिंक्यपद पटकावलेल्या धेंपो स्पोर्टस क्लबने या औपचारिकतेच्या सामन्यात बहारदार खेळीत दर्जास साजेसा विजय प्राप्त केला. धेंपोचे हे पाचवे आय लीग अजिंक्यपद होय. याआधी त्यानी २००४-०५, २००६-०७, २००७-०८ आणि २००९-१० साली राष्ट्रीय लीग विजेतेपद मिळविले होेते.पाच वेळा राष्ट्रीय लीग अजिंक्यपद पटकावणारा पहिला संघ बनण्याचा बहुमान प्राप्त केलेल्या धेंपोला झळाळत्या चषकासह रु. ७० लाखाचा पुरस्कारही मिळाला.

एलिना मंत्रिपद प्रकरणी सोमवारी निवाडा

Story Summary: 

कुठ्ठाळी पोटनिवडणुकीमुळे त्या पोटनिवडणुकीतील भाजपच्या संभाव्य उमेदवार व माजी पर्यटनमंत्री माथानी साल्ढाणा यांच्या पत्नी एलिना साल्ढाणा यांची मंत्रिपदी नेमणूक तूर्त न करण्याची निवडणूक अधिकार्‍यांनी केलेली सूचना धुडकावून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येत्या मंगळवारी आपला मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा घाट घातल्यासंदर्भात निवडणूक आयोग सोमवार दि. ७ मे रोजी आपला निवाडा देणार आहे.

ऍड. आयरिश रॉड्रिग्स यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीची पडताळणी भारतीय निवडणूक आयोगाकडून सुरू असून न्यायिक तसेच आचारसंहितेच्या दृष्टीने या तक्रारीचा विचार केला जात आहे. त्यासंदर्भात अंतिम निर्णय ७ मे रोजी दिला जाणार आहे.

मोपा व माध्यम प्रश्‍नावर कुठ्ठाळी पोटनिवडणूक लढवणार

Story Summary: 

चर्चिल-राधाराव यांची संयुक्त पत्रकार परिषद

दाबोळी विमानतळ हा गोव्याच्या मध्यभागी असून काणकोण ते पेडणेपर्यंतच्या लोकांना तो सोयीचा आहे, तर मोपा विमानतळामुळे दाबोळी विमानतळावरील नागरी विमाने बंद होऊन, मोपा विमानतळावरून उड्डाणे होतील. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गोव्याचे फार मोठे नुकसान होणार असल्याने, भाजपा सरकारने मोपा विमानतळासाठी जी प्रक्रिया सुरू केली आहे ती गोव्याच्या हिताची नाही. कुठ्ठाळीची पोटनिवडणुक मोपा व माध्यमप्रश्‍न अशा दोन प्रश्‍नांवर लढविणार असल्याचे माजी बांधकाममंत्री चर्चिल आलेमांव व युगोडेपाचे राधाराव ग्रासियस यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

पोर्तुगिजांपासून गोवा मुक्तीसाठी हा नागरी उड्डाण विमानतळ नौदलाच्या ताब्यात दिला गेला होता व त्यानंतर चीनने भारतावर आक्रमण केले होते. त्यासाठी संरक्षणासाठी त्याचा उपयोग करण्यासाठी त्यांच्याकडे तात्पुरता ताबा दिला होता. त्यानंतर नौदलाकडून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने तो ताब्यात घ्यायला हवा होता. यासाठी माजी मंत्री स्व. माथानी साल्ढाणा यांनी प्रयत्न केले होते.

चर्चिल युगोडेपाच्या वाटेवर

माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव कॉंग्रेसचा त्याग करून युगोडेपा पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काल युगोडेपाचे उपाध्यक्ष राधाराव ग्राशियस यांच्यासमवेत त्यांनी मोपा विमानतळाला विरोध करण्यासाठी आणि माध्यम प्रश्‍नावर सरकारच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी एक संयुक्त पत्रकार परिषदही घेतली.

फसवणुकीचे गुन्हे शोधण्यात अपयशी पोलिसांचे जनतेलाच साकडे

राज्यात पोलीस असल्याचे भासवून निष्पाप महिलांना लुबाडण्याचे आणि ईमेल, एसएमएसद्वारे फसवणूक करण्याचे प्रकार प्रचंड प्रमाणात वाढलेले असूनही त्यामागच्या टोळक्याला पकडण्यात आजवर अपयशी ठरलेल्या पोलीस यंत्रणेने अखेर काल जनतेलाच अशा गोष्टींपासून सावध राहण्याचे साकडे घातले.

लादेनचा मृतदेह शोधल्याचा अमेरिकी साहसवीराचा दावा

सूरतपासून ३०० कि. मी. वर अरबी समुद्रात लादेनचा मृतदेह

ओसामा बिन लादेनला अमेरिकी कमांडोंनी ठार मारल्यानंतर त्याचा मृतदेह ज्या ठिकाणी अरबी समुद्रात खोलवर गाडला गेला, ती जागा शोधून काढल्याचा दावा बिल वॉरेन या अमेरिकेतील प्रसिद्ध साहसवीराने केला आहे. खजिने शोधून काढण्याबद्दल वॉरेन यांची ख्याती आहे. गुजरातमधील सूरतपासून ३२० कि. मी. अंतरावर अरबी समुद्रात लादेनचा मृतदेह आढळून आला असल्याचा दावा वॉरेन यांनी केला आहे. येत्या एक जूनपासून त्यासंदर्भात मोहीम हाती घेतली जाईल असेही त्यांनी जाहीर केले.

उमेदवार निवडीसाठी ब्रार गोव्यात येणार

कुठ्ठाळी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेस उमेदवार निश्‍चित करण्यासाठी उद्या सोमवार दि. ७ रोजी किंवा मंगळवार दि. ८ रोजी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी जगमितसिंह ब्रार गोव्यात येणार आहेत, अशी माहिती पक्षसूत्रांनी दिली. कुठ्ठाळीसाठी पक्षाचा उमेदवार निवडण्यावर सध्या चर्चा सुरू असून ब्रार यांच्या गोव्यात आगमनानंतरच पुढील कृती योजना ठरेल अशी माहिती पक्षसूत्रांनी दिली.

गोवा बचाव अभियानचीनिवडणूक आयोगाकडे तक्रार

सन २०२१ चा प्रादेशिक आराखडा रद्द करण्याची व सन २००१ चा प्रादेशिक आराखडा तूर्त लागू करण्याची मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची घोषणा हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार गोवा बचाव अभियानतर्फे डॉ. सबिना मार्टीन्स यांनी निवडणूक अधिकार्‍यांकडे केली आहे.

पोलीस असल्याचे भासवून लुबाडणार्‍यांपासून सावध : यादव

पोलीस असल्याचे भासवून जनतेला लुबाडण्याच्या प्रकारांची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून सध्या गणवेषातील पोलिसांशी कोणीही संवाद साधू नये, असे आवाहन पोलीस महानिरीक्षक रविंद्र यादव यांनी काल पत्रकार परिषदेत केले.

माशेलमध्ये लवकरच नवे बसस्थानक

सुमारे १० कोटी रुपये खर्चून माशेल येथील नवे बसस्थानक बांधण्याचे काम लवकरच म्हणजे निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

कळंगुट पंचायत निवडणूक २१ रोजी

प्रभाग फेररचनेच्या प्रश्‍नावर पुढे ढकलण्यात आलेल्या व दि. २१ मे रोजी निश्‍चित केलेल्या कळंगुट पंचायतीच्या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या प्रभागांतून ९५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

साळगावात कोकेन जप्त

अमली पदार्थ विरोधी पोलिसांनी परवा रात्री साळगांव येथील स्मशानभूमीजवळ घाना देशातील एका नागरिकाला अटक करून त्याच्याकडील २१ लाख रुपये किंमतीचे २१० ग्रॅम किंमतीचे २१० ग्रॅम कोकेन जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हवामान बदलाचा उन्हाळी फळांवर परिणाम

- सतीश एस. पी. तेंडुलकर

(कृषी संचालक)

उन्हाळी पिकांमध्ये आंबा, काजू, फणस हे गोव्याचे वैशिष्ट्य. आंबा आणि काजू त्यांमध्ये विशेष. गोव्याच्या मानकुराद आंब्याला तर तोडच नाही. त्याचप्रमाणे गोव्याच्या काजू चवदार म्हणून जगभर ओळखल्या जातात. गोव्याच्या काजूला आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष दर असतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे, काजूपिकाची लागवड गोव्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने केली जाते. त्याचबरोबर काजू झाडावर पूर्ण पक्व झाल्यावरच गोळा केल्या जातात. या गुणामुळेच काजूकडे गोव्याच्या ग्रामीण भागामध्ये एक महत्त्वाचे रोख पीक म्हणून पाहिले जाते. या पिकावर गोव्याची ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे.

वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा...!

- रमेश सावईकर

राज्यातील वाढती वाहतूक सुरळीत होण्यासाठी नियोजनाचा अभाव असल्याने व्यवस्था अपुरी पडत आहे. वाढलेली लोकसंख्या, वाहनांची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या, अरूंद रस्ते, ग्रामीण भागात बस प्रवासाची असलेली अपुरी सोय, राज्यातील प्रमुख शहरी मार्गावर अपुरी बसेसची संख्या आदी कारणांमुळे गोव्यात वाहतूक व्यवस्थेचे ‘तीन तेरा वाजलेले’ आहेत. नियोजनाचा अभाव हे त्या मागचे प्रमुख कारण आहे.

त्याला कशाला उकरता?

ओसामा बिन लादेनचा समुद्राखालील मृतदेह शोधून काढल्याचा अमेरिकी साहसवीर वॉरेन यांचा दावा त्यांच्या आजवरच्या सागरी मोहिमांचा कळसाध्याय जरी असला तरी त्यातून काही समाजहित साधले जाणार नाही हेही तेवढेच खरे आहे. लादेनला अबोटाबादेत कमांडो कारवाईत ठार मारल्यानंतर, त्याचा मृतदेह कोणाच्याही हाती सापडू नये यासाठी तो समुद्राखाली गाडण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला. म्हणजे लादेन हा क्रूरकर्मा जरी असला आणि जगभरात हजारो मानवी बळी घेण्यास कारणीभूत जरी असला तरी इस्लामी परंपरेनुसार त्याला मूठमाती देण्याची अमेरिकेची कृती ही मानवी सभ्यतेला अनुसरूनच होती. फक्त त्याच्या समाधीचे कालांतराने इस्लामी जगताकडून उदात्तीकरण होऊ नये, मध्य पूर्वेतील राष्ट्रांकडून त्यासाठी दबाव येऊ नये यासाठीच आपल्या युद्धनौकेद्वारे लादेनचा मृतदेह खोल समुद्रात गाडण्यात आला. तो कोठे व कसा गाडला गेला हे जगासाठी आजवर एक गुपीत राहिले आहे. लादेनविरुद्धच्या कारवाईत सामील झालेल्या अगदी मोजक्या लोकांनाच ते स्थान कोठे आहे याची कल्पना आहे. ती जागा राष्ट्रीय गोपनीयतेचा विषय असल्याने येत्या काही वर्षांत तरी उघड केली जाण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे अमेरिकी इतिहासातील अनेक गूढांपैकी ते एक गूढ म्हणूनच सध्या तरी राहणार आहे.

गायनाचार्य

 - चंद्रकांत रामा गावस

 तत्कालीन सावंतवाडी संस्थानच्या आणि सद्याच्या दोडामार्ग तालुक्यातील वझरे या दुर्गम व गैरसोयीच्या आडगावी बाळकृष्ण वझे यांचा २० नोव्हेंबर १८८२ रोजी जन्म झाला. बालवयातच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यावेळी त्यांचे वय अवघे ६ वर्षांचे होते. पण त्यांच्या आईने धीर सोडला नाही. तिने ठरविले की, मुलाला उत्तम शिक्षण द्यावे. त्याला मोठा अधिकारी बनवावा. पण वझरे सारख्या भौतिक सुविधा नसलेल्या ग्रामीण गावात उच्च शिक्षण देणे शक्य नव्हते. म्हणून त्यांच्या आईने रामकृष्णांना घेऊन कागल गावी वास्तव्य केले. त्यांच्या आईने चरितार्थासाठी तेथील एका श्रीमंत गृहस्थाकडे स्वयंपाकीण म्हणून नोकरी पत्करली. पुढे काही दिवसांनी बाळकृष्णाला त्यांच्या आईने तेथील प्राथमिक शाळेत शिक्षणासाठी घातले. रामकृष्णाने कसेबसे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पण त्याचे लक्ष नेहमी गाण्यात असे. तो दुसर्‍या गायकाची गाणी अगदी सुरेल गळ्यात म्हणत असे. शाळेच्या गुरुजीने त्याच्या आईला सांगितले की, अभ्यासात त्याचे लक्ष नाही. नेहमी गाणी म्हणत असतो. त्याला संगीत शिकवा. त्याला त्याच्या आईने कागलच्या एका संगीत शिक्षकाकडे गाणे शिकण्यास ठेवले. दोन वर्षे रामकृष्णाने त्या संगीत शिक्षकाकडे प्रारंभीचे धडे घेतले. नंतर तो मालवणच्या विठोबाअण्णा हडप या ख्यालगायकाकडे वर्षभर गायन शिकला. पण बाळकृष्णाला उत्तम गायनसम्राट बनायचे होते. म्हणून तो केवळ संगीतविद्या प्राप्त करण्यासाठी कागलहून पुण्याकडे गेला. पुणे हे संगीत विद्येचे माहेरघर असल्यामुळे संगीतविद्या मिळविण्यासाठी तेथील नामवंत संगीत शिक्षकाकडे त्याने शिक्षण घेतले. पण तेथे रामकृष्णाचे समाधान झाले नाही. मग त्याने मुुंबई गाठली. तेथील माधवबागेत त्याला बंदेअलीखॉं यांची शागीर्द चुन्ना हिचे मधुर गाणे ऐकावयास मिळाले. बाळकृष्ण त्या गाण्याने प्रभावित बनला. नंतर रामकृष्ण इंदूरला गेला. तेथील नानासाहेब पानसे यांनी त्याला शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी ग्वाल्हेर संस्थानात जाण्याचा सल्ला दिला.

लाकडी खेळण्यांचे माहेरघर

- लाडोजी परब

वर्षांतून कधीही या, येथे प्रत्येक ठिकाणी आंबा, चिकू, पेरू, केळी, अननस... अशा सर्व प्रकारची फळे लगडलेली दिसतील. बघताक्षणी पाहणार्‍याच्या तोंडाला पाणीही सुटेल. पण जरा जपून, ती फळे लाकडी आहेत. कोणते बरे हे ठिकाण? बरोबर ओळखलात. अहो, हे आहे लाकडी खेळण्यांचे माहेरघर सावंतवाडी!

गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून भरतवीर वांछू यांना शपथ

Story Summary: 

गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून भरतवीर वांछू यांना अधिकारपदाची शपथ देताना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा.

आचारसंहिता काळात एलिना यांना मंत्रिपद देण्यास हरकत

Story Summary: 

मुख्यमंत्री विस्तारावर ठाम; निवडणूक आयोगाची विनंती धुडकावली

 पोटनिवडणुकीपूर्वी एलिना यांना मंत्रिपद देऊ नका : कुमारस्वामी

मंत्रिमंडळ विस्तार करणे हा माझा घटनात्मक अधिकार : पर्रीकर

आचारसंहिता काळात उमेदवारालाच मंत्रिपद देणे अयोग्य : आयरिश

 

दिवंगत पर्यटनमंत्री माथानी साल्ढाणा यांच्या पत्नी एलिना साल्ढाणा यांना राज्यात निवडणूक आचारसंहिता असताना व कुठ्ठाळी मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या त्या उमेदवार असताना मंत्रिपदी विराजमान करण्याच्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या ठाम भूमिकेमुळे राज्यात वादाला तोंड फुटले आहे.

सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी पर्रीकर यांनी एलिना यांना निवडणूक आचारसंहितेच्या काळात मंत्रिपदी नेमू नये यासाठी निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार नोंदवलेली आहे. तिची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकारी कुमारस्वामी यांनी सरकारने कुठ्ठाळीची पोटनिवडणूक होईपर्यंत एलिना यांचा समावेश मंत्रिमंडळात करू नये अशी सूचना सरकारला केली होती. मात्र, ती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी फेटाळून लावली आहे. कोणत्याही व्यक्तीची मंत्रिपदी नेमणूक करणे हा आपल्याला भारतीय घटनेने मुख्यमंत्री म्हणून दिलेला अधिकार असल्याने येत्या मंगळवारी दि. ८ रोजी एलिना यांचा मंत्रिपदी शपथविधी होणारच यावर पर्रीकर ठाम आहेत.

गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून भरतवीर वांछू यांना शपथ

Story Summary: 

काल दुपारी १२ वाजता दोनापावला येथील काबो राजभवनवर आयोजित शानदार सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूतीं मोहित शहा यांनी गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून भरतवीर वांछू यांना गुप्ततेची शपथ दिली.

यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, विरोधी नेते प्रतापसिंह राणे, माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत, माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर, धेंपो उद्योग समुहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, सौ. पल्लवी धेंपो,

बेकायदा खनिज उत्खनन झाल्यास कठोर कारवाई : पर्रीकर

Story Summary: 

लोकायुक्त फाईलचा सतत पाठपुरावा

सरकारी मालमत्ता लुटण्याचे प्रकार आपले सरकार सहन करणार नाही. क्रीडा नगरीत बेकायदेशीर खनिज काढण्याचा प्रकार घडल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल दिला.

बेकायदेशीर खनिज वाहतूक तसेच उत्खनन करणार्‍यांवर कारवाई करण्याचा आदेश खाण अधिकार्‍यांना यापूर्वीच दिला आहे. खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्याचा अधिकार आपल्याला नाही. पोर्तुगीजकालीन लीज बंद करणे शक्य नाही, परंतु नवीन लीज देण्याच्या बाबतीत सरकार गंभीर असेल. यासंबंधीचा संपूर्ण कारभार पारदर्शक असेल अशी ग्वाही पर्रीकर यांनी दिली. खाण धोरणही लवकरच तयार करण्यात येणार असून जूनपर्यंत ते तयार करणे शक्य असल्याचे ते म्हणाले. नवीन लीज मिळविण्यासाठी कोणीही अर्ज केला तरी संबंधितांची पार्श्‍वभूमी तपासून पाहिल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे ते म्हणाले.

पर्यावरणाचे जतन करूनच गोव्याचा विकास व्हावा

नूतन राज्यपाल वांछू यांचा संकल्प

गोव्यासारख्या सुंदर प्रदेशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आपल्याला आनंद होत असल्याचे स्पष्ट करून येथील पर्यावरणाचे जतन करूनच या राज्याचा विकास व्हावा, अशी आपली इच्छा असल्याचे राज्यपाल भरतवीर वांछू यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

पोटनिवडणूक लढवण्यास चर्चिल अनुत्सुक

कुठ्ठाळी मतदारसंघ पोटनिवडणुकीची उमेदवारी कॉंग्रेसच्या वतीने माजी साबांखामंत्री चर्चिल आलेमाव यांना देण्याचे घाटत असले, तरी स्वतः चर्चिल यांनी मात्र तेथून निवडणूक लढवण्यास नकार दर्शवला आहे. आपण कुठ्ठाळी येथून पोटनिवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे चर्चिल यांनी सांगितले. पंचायत निवडणुकीतही आपण सध्या लक्ष घातलेले नाही. पंचायतीत उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आणि निवडून आलेल्या पंचांनी नंतर कोलांट्या उड्या मारायच्या या प्रकाराचा आपल्याला उबग आला असल्याचे ते म्हणाले.

सिंघवी राज्यसभेत अनुपस्थित

एका सीडीमुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेले कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून प्रकृतीअस्वास्थ्याच्या कारणाखाली सुटी मागितली आहे.

प्रणव मुखर्जींकडून टिप्पणीस नकार

राष्ट्रपतीपदासाठी जी नावे चर्चेत आहेत, त्यापैकी प्रणव मुखर्जी यांच्या नावाला सध्या सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे. मात्र, स्वतः प्रणव मुखर्जी यांनी त्यावर भाष्य करण्यास काल नकार दर्शवला. ‘‘मी यावर टिप्पणी करू इच्छित नाही’’ असे ते म्हणाले. मुखर्जी सध्या मनिलामध्ये आहेत. आशियाई विकास बँकेच्या संचालक मंडळाच्या ४५ व्या वार्षिक बैठकीसाठी ते तेथे गेले आहेत.

‘अनुदानित संस्थांच्या कारभारात हस्तक्षेप नाही’

डायोसेसनसह राज्यातील सर्व अनुदान प्राप्त शिक्षण संस्थांना पात्र शिक्षकांची नियुक्ती करण्याचा अधिकार असून या प्रक्रियेत सरकार हस्तक्षेप करणार नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. तसा निर्णयही सरकारने घेतला आहे, असे ते म्हणाले. संगणक शिक्षकांचीही सेवेत भरती केली जाणार असून ज्या संगणक शिक्षकांना अनुदान प्राप्त शाळांमध्ये सामावून घेणे शक्य झालेले नाही त्यांची व्यवस्था सरकार करतील, याबाबतीत चिंता करण्याचे कारण नाही, असे पर्रीकर यांनी सांगितले.

गुजरात दंगल, ९ दोषी, ३२ निर्दोष

सन २००२ मध्ये गुजरातमधील ओडे गावी झालेल्या दंगल प्रकरणात सत्र न्यायालयाने नऊ जणांना दोषी धरले, तर ३२ जणांची निर्दोष मुक्तता केली. दोन महिलांसह तीन व्यक्ती या दंगलीत मारल्या गेल्या होत्या.

मा. मुख्यमंत्र्यांस अनावृत्त पत्र

(उत्तरार्ध)

- दासू शिरोडकर

४) रस्त्यांची डोकेदुखी - गोव्यात रस्ते ही जनतेची कायम डोकेदुखी होऊन राहिली आहे. हॉटमिक्स केलेले रस्ते एका पावसाळ्यात खळाळून जातात. हे का घडते? ठेकेदार संबंधित अधिकारी आणि मंत्री यांच्या मिलीभगतमुळेच असे प्रकार घडतात. कारवाई होऊन असे प्रकार बंद पडतील, तेव्हाच इथले रस्ते शाबूत राहतील. शिवाय कित्येक ठिकाणी रस्त्यांकडे सरकार लक्षच देत नाही. रस्त्यांची रुंदीकरण कामेही पडून आहेत. म्हणून बोरी फोंडासारख्या भागात वाहतुकीची सतत कोंडी होत असते. राज्यात आज कित्येक रस्ते सुधारण्याची आणि पुलांची आवश्यकता आहे. नवीन सरकारकडून तरी या बाबतीत जनतेला दिलासा मिळेल का?

प्लास्टिकमुक्त गोव्याचे स्वप्न

मनोहर पर्रीकर यांच्या सरकारने जे अनेक निर्णय गेल्या काही दिवसांत घेतले, त्यापैकी गोवा प्लास्टिकमुक्त करण्याचा त्यांचा संकल्प हा गोव्याच्या सौंदर्याला आजवर लागलेले गालबोट दूर करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल अशी अपेक्षा आहे. कचर्‍याचे आणि विशेषतः प्लास्टिक कचर्‍याचे ढिगारे गोव्याच्या बहुतेक रस्त्यांवर आज दिसतात. काही ठिकाणी तर अत्यंत विद्रुप स्वरूपात हा प्लास्टिक कचरा रस्त्याकडेला विखुरलेला दिसून येतो. या सगळ्या रस्त्याकडेच्या प्लास्टिक कचर्‍याला हटवण्याचे काम पर्रीकरांनी गोवा साधनसुविधा विकास महामंडळावर सोपवलेले आहे. प्लास्टिक कचर्‍याचा प्रश्न हा आज केवळ गोव्यापुढेच नव्हे, तर संपूर्ण जगापुढील एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. अमेरिकेचेच उदाहरण घेतले तर तेथे दर पाच सेकंदांना प्लास्टिकच्या ६० हजार पिशव्यांचा वापर होतो. म्हणजे वर्षाकाठी किमान १०० अब्ज प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात, त्या बनवण्यासाठी १२ दशलक्ष बॅरल तेल खर्ची पडलेले असते. आपल्या देशातही स्थिती काही वेगळी नाही. प्लास्टिक कचर्‍यावर नियंत्रण आणण्यासाठी आपल्याकडे कायदे आहेत, परंतु त्यांची अंमलबजावणी ज्या गांभीर्याने व्हायला हवी ती होताना मात्र दिसत नाही.

गोव्याचे नूतन राज्यपाल भरतवीर वांछू यांचे गोव्यात आगमन

Story Summary: 

आज शपथविधी होणारे गोव्याचे नूतन राज्यपाल भरतवीर वांछू यांचे काल सहकुटुंब गोव्यात आगमन झाले. त्याप्रसंगी त्यांचे दाबोळी विमानतळावर स्वागत करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. सोबत सभापती राजेंद्र आर्लेकर.

पंचायत निवडणुकीत ५९३४ उमेदवार रिंगणात

Story Summary: 

शेवटच्या दिवशी १५५७ अर्ज मागे; १४ बिनविरोध

येत्या १६ मे रोजी राज्यात होणार असलेल्या पंचायत निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी उत्तर गोव्यातून ९७७ व दक्षिण गोव्यातून ५८० मिळून १५५७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ५९३४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर पंचायत निवडणुकीच्या रिंगणात ७३०८ उमेदवार राहिले असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त एम. मुदस्सिर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र, दिवसभरात १५५७ अर्ज मागे घेण्यात आले. निवडणुकीसाठी १०,५१२ उमेदवारी अर्ज आले होते, मात्र काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर व अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर राज्यभरात १४ उमेदवार बिनविरोध पंच म्हणून निवडले गेले आहेत.

गोव्याचे नवे राज्यपाल वांछू यांचे आज शपथग्रहण

Story Summary: 

गोव्याचे राज्यपाल म्हणून आज शपथग्रहण करणार असलेले भरत वीर वांछू यांचे काल (३ मे) गोव्यात आगमन झाले. काल संध्याकाळी ४ वा. त्यांचे दाबोळी विमानतळावर आगमन झाले असता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, सभापती राजेंद्र आर्लेकर, विरोधी पक्ष नेते प्रतापसिंह राणे, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव व माहिती आणि प्रसारण सचिव टी. एम बालकृष्णन यानी त्यांचे स्वागत केले.

वांछू यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी नलिनी वांछू, पुत्र अंकित, कन्या आकृती कोहली, स्नुषा राखी व नात अमया आदी कुटुंबीयांचेही आगमन झाले आहे. राजभवनवरील सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आज वांछू यांना राज्यपालपदाची शपथ देणार आहेत. नंतर त्यांना पोलीस मानवंदना देतील.

मुलीला पाण्यात फेकून आत्महत्या करू पाहणारी महिला वाचली

Story Summary: 

२ वर्षांची मुलगी बुडून मृत्युमुखी; महिलेला अटक

पिळर्ण येथील मानशीच्या पाण्यात आपल्या दोन वर्षांच्या मुलीला फेकून देऊन स्वतःही पाण्यात उडी घेऊन आत्महत्या करू पाहणार्‍या एका महिलेचा जीव पाणी कमी असल्याने वाचला, मुलगी मात्र बुडून मृत्युमुखी पडली. सावित्री बसवराज कुंभार (२२) असे या विवाहित महिलेचे नाव आहे. पर्वरी पोलिसांनी तिला आत्महत्येचा प्रयत्न व मुलीच्या हत्येच्या आरोपावरून अटक केली आहे.

बसवराव व सावित्री कुंभार हे मूळ रायबाग येथील दांपत्य असून गेले सहा महिने ते कळंगूट येथे राहात होते. गेल्याच आठवड्यात ते रायबाग येथील गावी चार दिवस राहून परतले होते.

छत्तीसगढमधील अपह्रत जिल्हाधिकार्‍याची सुटका

छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्याचे अपह्रत जिल्हाधिकारी आलेक्स पॉल मेनन यांची माओवाद्यांनी काल सुटका केली. मेनन यांचा ताबा माओवाद्यांनी जी. हरगोपाल व बी. डी. शर्मा या मध्यस्थांकडे दिला. सरकारशी वाटाघाटी करण्यासाठी माओवाद्यांनीच या मध्यस्थांची निवड केली होती. रायपूरपासून सुमारे पाचशे कि. मी. अंतरावरील तारमेटला जंगलामधील एका अज्ञात स्थळी माओवाद्यांनी संध्याकाळी ३.४५ वाजता मेनन यांची सुटका केली. गेले बारा दिवस ते त्यांच्या ताब्यात होते.

दोन्ही अपक्ष आमदार भाजपसोबत : दामू

मजूरमंत्री आवेर्तिन फुर्तादो व बेंजामिन सिल्वा हे भाजपा सरकारांतील सदस्य असून, सरकारबरोबर खंबीरपणे आहेत असे माजी आमदार दामू नाईक यांनी सांगितले.

कुठ्ठाळीसाठी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा शोध सुरूच

कुठ्ठाळीतील पोट निवडणुकीसाठी कॉंग्रेसने उमेदवार म्हणून माजी साबांखामंत्री चर्चिल आलेमांव यांच्या नावांचा विचार चालविल्याचे कळते. उमेदवार ठरविण्यासाठी परवा पक्षाचा निरीक्षक गोव्यात येण्याची शक्यता आहे.

आचारसंहितेचा उद्घाटनांना फटका

वारंवार येणार्‍या निवडणूक आचारसंहितेचा सर्वाधिक फटका सत्तरी तालुक्यातील डोंगुर्ली - ठाणे पंचायतीला बसला असून या पंचायतक्षेत्रात उभारल्या गेलेल्या तीन मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन गेले आठ महिने खोळंबले आहे. ठाणे येथील कै. हि. बी. देसाई हायस्कूलच्या विस्तारीत इमारतीचे काम ९० लाख रुपये खर्चून करण्यात आले.

चारा घोटाळा : ६९ दोषी, १६ निर्दोष

बिहारमधील कुख्यात चारा घोटाळा प्रकरणी सीबीआय न्यायालयाने काल ६९ जणांना दोषी धरले, तर १६ जणांना निर्दोष मुक्त केले. २९ जणांना एक ते तीन वर्षांच्या कारावासाची सजा सुनावण्यात आली असून पंचवीस हजार रुपये ते दोन लाख रुपये पर्यंत दंड फर्मावण्यात आला आहे. दोषींना येत्या ७ मे रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

गोव्याच्या केरोसिन कोट्यात केंद्राकडून ७०% कपात

औद्योगिक कोट्यासाठी प्रयत्न

केरोसिन टंचाईमुळे होडी घेऊन मच्छीमारी करणार्‍यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांची गैरसोय दूर करण्याच्या हेतूने सरकारने औद्योगिक कोटा मिळविण्यासाठी भारतीय तेल महामंडळाशी संपर्क करून प्रस्ताव सादर केल्याची माहिती मच्छीमारी संचालक वेर्लेकर यांनी दिली.

मा. मुख्यमंत्र्यांस अनावृत्त पत्र

पूर्वार्ध

- दासू शिरोडकर

मा. मुख्यमंत्री श्री मनोहर पर्रीकर यांस,

विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला बहुमत मिळून सत्ता हस्तगत केल्याबद्दल आपणासमवेत निवडून आलेल्या आपल्या सार्‍या विधायकांचे (युतीचे धरून) हार्दिक अभिनंदन.

गोव्याच्या राजकीय पटावर भाऊसाहेब बांदोडकरांनंतर खर्‍या अर्थाने छाप पाडणारा राजकारणी म्हणून मी आपणाकडे पाहत आलो आहे. म्हणून मी आपला एक प्रशंसक आहे आणि म्हणून आपणाकडून केवळ माझ्याच नव्हे, तर या प्रदेशाचे हित चिंतिणार्‍या प्रत्येक गोमंतकीयाच्या बर्‍यात अपेक्षा आहेत.

एकजूट दाखवा

छत्तीसगढमधील सुकनाच्या जिल्हाधिकार्‍याचे अपहरणनाट्य संपुष्टात आले असले तरी माओवाद्यांचा प्रश्‍न काही सुटला आहे असे म्हणता येत नाही, उलट छत्तीसगढ सरकारशी त्यांच्या झालेल्या करारामुळे माओवाद्यांपाशी सरकारला नमवण्याचे एक प्रभावी हत्यारच गवसले आहे. या करारानुसार, सरकारला सध्या छत्तीसगढच्या विविध तुरुंगांत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या प्रकरणांचा फेरआढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी लागेल व त्या कैद्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा करावा लागेल. कैदी तर सुटतीलच, पण आपण सरकारला नमवले अशी शेखी मिरवत आदिवासी भागांवरील आपला प्रभाव वाढवण्यासाठीही ही खेळी नक्षलवाद्यांना उपयोगी ठरणार आहे. ओरिसा, छत्तीसगढसारख्या राज्यांमध्ये सध्या माओवाद्यांनी मांडलेल्या या उच्छादाच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी दिल्लीत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची प्रस्तावित राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राच्या विषयावर वादळी बैठक होणार आहे. दहशतवाद आणि नक्षलवादाच्या सामन्यासाठी केंद्र सरकार उभारू पाहात असलेल्या या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय यंत्रणेला सर्व बिगर कॉंग्रेसी मुख्यमंत्र्यांनी विरोध दर्शवलेला असल्याने त्यासंदर्भात केंद्र सरकारला त्या बैठकीत नरमाईचे धोरण स्वीकारावे लागेल असे दिसते आहे.

विर्डी धरण

Story Summary: 

विर्डी धरणाचे वेगाने सुरू असलेले काम. (छाया : विशांत वझे)

विर्डी धरणाची उंची १० मीटरने वाढवण्याचा प्रस्ताव

Story Summary: 

पाणीवाटपाचा करार न झाल्याने गोव्यावर संकट?

महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवरील विर्डी गावी महाराष्ट्र सरकारकडून बांधण्यात येत असलेल्या धरणाच्या कामाने पुन्हा वेग घेतला असून उसप पंचक्रोशीतील सहा गावांना धरणाचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विर्डी डोंगरात २ कि. मी. लांबीचा बोगदा खोदला जाणार आहे. त्यासाठी विर्डी धरणाची उंची आणखी दहा मीटरनी वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला असून त्यामुळे गोव्यावर त्याचे परिणाम होतील अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.

विर्डी धरणाचे पाणी उसप पंचक्रोशीतील सहा गावांना देण्यासाठी सुमारे साठ कोटी रुपये खर्च करून विर्डी डोंगरातून २ कि. मी. लांबीचा बोगदा खोदण्याचा निर्णय हे धरण बांधणार्‍या कोकण पाटबंधारे महामंडळाने व पाटबंधारे मंत्र्यांनी घेतला आहे. विर्डी धरणाचे काम जवळजवळ ७५ टक्के पूर्ण झालेले आहे, परंतु धरणाची उंची आणखी दहा मीटरने वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

२ सप्टेंबरपर्यंत गोवा प्लास्टिकमुक्त

Story Summary: 

मुख्यमंत्र्यांची घोषणा; मलेरिया कर्मचारी सेवेत कायम

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत येत्या २ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण गोवा प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. याशिवाय खनिज मालाची वाहतूक करणार्‍या बार्जेसवरील करात वाढ करण्याचा तसेच आरोग्य खात्यातील मलेरिया सेवकांना सेवेत कायम करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मलेरिया सेवकांना २ मेपासून सेवेत कायम करण्यात येणार असले तरी त्याची प्रत्यक्ष अमलंबजावणी मात्र निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच करण्यात येणार असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. मलेरिया सेवकांना सेवेत कायम करण्याचा निर्णय आपण गेल्या एप्रिल महिन्यातच घेतला होता असे त्यानी यावेळी सांगितले. आरोग्य खात्यात ६७ मलेरिया सेवक कंत्राटी पद्धतीवर काम करीत असून आता हे सर्वजण सेवेत कायम होणार आहेत.

दयानंद योजनेचे आणखी २५३९ अर्ज मंजूर

Story Summary: 

ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली आपणाला आर्थिक लाभ मिळावा यासाठी नव्याने अर्ज केलेल्यांपैकी २५३९ जणांचे अर्ज गेल्या महिन्यात मंजूर करण्यात आल्याची माहिती समाजकल्याण खात्याचे संचालक संजीव गडकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

वरील योजनेखाली आपणाला आर्थिक लाभ मिळावा यासाठी अर्ज केलेल्या आणखी ३ हजार जणांचे अर्ज पडून असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्वेसह आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर त्यांच्या अर्जांवर विचार होणार असल्याचे ते म्हणाले.

पंच, सरपंचांना मानधन वाढीची शिफारस

सरपंच, पंच तसेच जिल्हा पंचायत सदस्यांच्या मानधनात वाढ करावी असा प्रस्ताव पंचायत संचालनालयाने सरकारला पाठवला आहे.

खनिज मालाच्या वजनाने बार्ज अर्ध्यात तुटली

बार्ज मध्येच अर्धी मोडल्याने ती बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल सकाळी सदर बार्जमध्ये सुमारे ८०३ टन खनिज माल भरण्यात आला होता. भरण्याचे काम चालू असताना बार्जला मधोमध फूट पडून कलंडू लागली. कंपनीच्या अधिकार्‍यांनी लगेच सावधगिरी बाळगून आणखी खनिज माल भरण्याचे बंद केले.

नुपूर यांचा जामीन अर्ज आता सर्वोच्च न्यायालयाकडे

गाझीयाबादच्या सत्र न्यायालयाने आरुषी हत्याकांडातील आरोपी नुपूर तलवार यांना जामीन नामंजूर केल्याने त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. मात्र, त्यावर सुनावणी होऊन निवाडा होईपर्यंत नुपूर यांना दासना तुरुंगातच राहावे लागणार आहे.

लादेनच्या हत्येच्या वर्षपूर्ती दिवशीच काबुलमध्ये बॉम्बहल्ला

ओसामा बिन लादेनला ठार मारल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच तालिबानी आत्मघाती हल्लेखोरांनी काल काबुलमधील एका विश्रामधामावर बॉम्बहल्ला चढवला. बुरखा धारण केलेल्या या हल्लेखोरांनी एका कार बॉम्बचा स्फोट घडवून आणला व सुरक्षा रक्षकांवर गोळीबारही केला. ‘ग्रीन व्हिलेज’ नामक या विश्रामधामात युरोपीय महासंघ, संयुक्त राष्ट्रे, तसेच अनेक विदेशी संस्थांचे प्रतिनिधी वास्तव्यास होते. अत्यंत कडेकोट बंदोबस्तातील या विश्रामधामावर हल्ला चढवण्यात तालिबान्यांना यश आल्याने अफगाणिस्तानच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चुकांनी भरलेली पाठ्यपुस्तके यंदा नकोत

शिक्षा बचाव आंदोलनाचे सरकारला निवेदन

गोवा शिक्षा बचाव आंदोलन समितीतर्फे वल्लभ केळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल दि. २ रोजी गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ यांना एक निवेदन सादर केले. इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या इतिहास पुस्तकात अनेक अक्षम्य चुका झाल्या असून साल २००५ पासून त्या सुधाराव्यात म्हणून अनेक निवेदने देण्यात आली. शिक्षण मंडळावर मोर्चाही नेण्यात आला. परंतु गतसरकारने त्यावेळी योग्य पाऊले उचलली नाहीत किंवा सुधारणाही केल्या नाहीत. २००५ पासून दरवर्षी सर्वशिक्षा अभियानतर्फे सुधारित आवृत्त्या विद्यार्थ्यांना देण्यात येत नव्हत्या.

काणकोणात २५८ उमेदवारी अर्ज ग्राह्य

काणकोण तालुक्यातील ७ पंचायतीच्या ५७ जागांसाठी उमेदवारी अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर २५८ उमेदवारी अर्ज ग्राह्य मानण्यात आले आहेत.

बेकायदा खनिजनिर्यात रोखण्यासाठी हे करा

- डी. के. केंकरे निवृत्त आय. आर. एस. अधिकारी मिरामार.

वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी अलीकडेच एक विधान केले की लोहखनिज निर्यात मुक्तपणे करू दिली जात आहे आणि त्यावर बंदी घालण्याचा सरकारचा विचार नाही. सरकार ‘व्हॅल्यू ऍडिशन’ (मूल्यवर्धन) च्या बाजूने आहे.

आपल्या देशातून होणारी निर्यात ही संसदेने संमत केलेल्या निर्यात व्यापार नियंत्रण आदेशानुसार होत असते व त्यामुळे तिला सर्वोच्च न्यायालयातदेखील आव्हान देता येत नाही. याच्या आधारे डी. जी. एफ. टी. (डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड) हे निर्यात धोरण आखतात, जे साधारणतः पाच वर्षांसाठी असते.

मनमानीला लगाम

देशातील केबल चालकांच्या आजवरच्या मनमानीला वेसण घालून डिजिटलायझेशनद्वारे त्यात शिस्त आणण्याच्या दिशेने सरकारने जे प्रयत्न चालवलेले आहेत, त्याचाच एक भाग म्हणून ‘ट्राय’ ने नुकतेच काही निर्बंध केबलचालकांवर लागू केले आहेत. ग्राहकांना फक्त १०० रुपयांमध्ये किमान १०० फ्री टू एअर वाहिन्यांमधून निवड करण्याचा पर्याय केबलचालकांनी उपलब्ध करून दिलाच पाहिजे आणि आणखी १५० रुपयांमध्ये पाच प्रकारांत केलेल्या वर्गवारीनुसार वैविध्यपूर्ण वाहिन्यांमधून निवड करण्याचे स्वातंत्र्यही दिले पाहिजे या ‘ट्राय’च्या दोन प्रमुख अटी आहेत. त्याशिवाय एखादा ग्राहक एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असेल तर त्याचे सेट टॉप बॉक्स केबल ऑपरेटरने परत घेतले पाहिजे वगैरे दंडकही आखले गेले आहेत. या सार्‍या गोष्टी ग्राहकांच्या हिताच्या नक्कीच आहेत. केबल टीव्हीचे क्षेत्र आपल्या देशात झपाट्याने विस्तारते आहे. त्याचा सरासरी वार्षिक विकास दर ३५ टक्क्यांचा आहे. ९२ साली जेव्हा आपल्याकडे केबल टीव्ही युग अवतरले, तेव्हा साधारणतः चार लाखांच्या घरांमध्ये केबल टीव्ही पोहोचले होते. आज ही संख्या कोट्यवधींच्या घरांत गेलेली आहे.

आंतरराष्ट्रीय कामगार दिन

Story Summary: 

आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त पणजीत आझाद मैदानावर भरलेल्या मेळाव्यात बोलताना कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका.

आसाममध्ये बोट उलटून १०३ बुडाले; २०० बेपत्ता

Story Summary: 

पश्‍चिम आसामच्या धुबरी गावानजीक ब्रह्मपुत्रा नदीत एक बोट उलटून झालेल्या भीषण दुर्घटनेत किमान १०३ प्रवाशांना जलसमाधी मिळाली, तर अजून किमान दोनशे बेपत्ता आहेत. २५० प्रवासी क्षमतेच्या या बोटीत पाचशेच्या आसपास प्रवासी होते अशी भीती व्यक्त केली जात आहे. मृतदेहांचा शोध युद्धपातळीवर घेण्यात येत आहे.

‘‘या बोटीत पाचशे प्रवासी होते व आपण वरच्या डेकवर होतो. लोअर डेकवर असलेले प्रवासी दुर्घटना घडताच आतच अडकले व बुडाले’’ अशी माहिती जीव वाचवण्यात यशस्वी ठरलेल्या एका प्रवाशाने दिली. चक्रीवादळाने निर्माण केलेल्या भोवर्‍यात ही बोट अडकली व तिचे तीन तुकडे झाले असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. खराब हवामानामुळे मदतकार्यात बाधा पोहोचत आहे.

कामगारांचा पणजीत मोर्चा

Story Summary: 

‘आयटक’ व अन्य कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली काल कामगार दिनी पणजीत आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात हजारो कामगारांनी भाग घेऊन केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध केला. तसेच महागाई नियंत्रणात आणावी या मागणीसह ८ ठराव संमत केले.

अकुशल कामगारांना किमान १० हजार रु. वेतन द्यावे, कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी, समान कामासाठी समान वेतन देण्यात यावे, राज्यातील सर्व कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करावे, रात्रौ ९ ते सकाळी ६ या दरम्यान खनिज वाहतूक बंद ठेवावी, राज्यातील खाणी आठवड्यातील फक्त ५ दिवस चालू ठेवाव्यात.

माध्यम प्रश्‍नामुळे अस्वस्थ : पर्रीकर

Story Summary: 

माध्यम प्रश्‍नाने आपणाला अस्वस्थ बनवले असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने निवृत्त झालेल्या ३० शिक्षकांचा सत्कार करण्यासाठी येथील कला अकादमीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले.

पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षण हे फार महत्त्वाचे असून त्यामुळेच माध्यम प्रश्‍नावरून आपण अध्यक्ष बनल्याचे ते म्हणाले. रोजच्या प्रमाणेच हलके फुलके मिष्किल भाषण करताना त्यानी वरील कबुली दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की शिक्षण क्षेत्रातील गोंधळामुळे कित्येक पिढ्यांचे नुकसान झालेले आहे.

पंचायत निवडणूक अर्जांची छाननी

पंचायत निवडणुकांसाठीच्या अर्जांची छाननी करण्याचे काम काल पूर्ण झाले. गोवाभरातील छाननीत काल किती अर्ज बाद ठरले त्याचा अहवाल तयार करण्याचे काम काल राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उशिरापर्यंत चालू होते, असे कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

कुठ्ठाळीच्या उमेदवारीसाठी कॉंग्रेसची आज बैठक

कुठ्ठाळी मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील कॉंग्रेस उमेदवाराबाबत चाचपणी करण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांची आज अनौपचारिक बैठक होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

मच्छीमारी बंदी यंदा ६० दिवस

येत्या पावसाळ्यात १ जून ते ३१ जुलै दरम्यान मच्छीमारी बंदीच्या प्रस्तावास सरकारने मान्यता दिली आहे, परंतु मच्छीमारांनी सदर बंदीचा काळ आणखी पंधरा दिवस वाढविण्याची मागणी केल्याने त्यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच सरकारला सादर करणार असल्याचे खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

वारखंड येथील अपघातात १ जखमी

पोरस्कडे-वारखंड या राष्ट्रीय महामार्गावर मोटरसायकल व स्वीफ्ट कार यांच्यात अपघात होऊन सुभाष सावंत (वारखंड) जखमी झाले, त्यांना म्हापसा आझिलो इस्पितळात उपचारासाठी नेले, त्यांची प्रकृती सुधारत आहे, असे पेडणे पोलिसांनी सांगितले. सुभाष सावंत हे वारखंड येथून आपली मोटरसायकल जीए ०३ ए ०६२७ या वाहनाने पेडण्याच्या बाजूने येत होते.

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत रालोआमधील मतभेद उघड

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाले असून जेडी (यू) ने काल भाजपच्या भूमिकेशी फारकत घेतली. प्रणव मुखर्जी व हमीद अन्सारी या कॉंग्रेसने पुढे केलेल्या दोन्ही नावांना आमचा विरोध असेल असे भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांचे वक्तव्य वैयक्तिक असून त्याच्याशी आपला पक्ष सहमत नसल्याचे रालोआचे निमंत्रक व जेडी (यू) चे नेते शरद यादव यांनी सांगितले.

राजीव हत्या प्रकरणातील आरोपींची याचिका आता सर्वोच्च न्यायालयात

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची दयेची याचिका तामीळनाडूबाहेर सुनावणीस घेतली जावी या एका याचिकादाराच्या विनंतीनुसार सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. ही याचिका यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.

नुपूर तलवारच्या जामीन अर्जावर आज निकाल

आरुषी तलवार व हेमराज हत्या प्रकरणातील आरोपी नुपूर तलवार यांना कालची रात्रही तुरुंगात घालवावी लागली. त्यांच्या जामीन अर्जावरील निवाडा गाझीयाबाद न्यायालयाने बुधवारपर्यंत राखून ठेवला. विशेष सीबीआय न्यायालयाने काल नुपूर तलवार यांच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून घेतला. यावेळी नुपूर या न्यायालयात नव्हत्या. जामीनावर बाहेर असलेले नुपूर यांचे पती राजेश हेही न्यायालयात आले नव्हते. विशेष सीबीआय न्यायाधीश एस. लाल यांनी वकिलांचा युक्तिवाद ऐकला.

देशातील केबल चालकांसाठी ‘ट्राय’ची आचारसंहिता

देशातील केबल चालकांसाठी ‘ट्राय’ची आचारसंहिता

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने जारी केलेल्या नव्या केबल टीव्ही दरांनुसार आता ग्राहकांना किमान शंभर फ्री टू एअर मोफत दूरचित्रवाणी वाहिन्या कमाल १०० रुपये मासिक शुल्कात पाहायला मिळणार आहेत. काल हे नवे दर ट्रायने जाहीर केले. डिजिटलाईज्ड केबल टीव्हीसाठी एक आराखडा ‘ट्राय’ने तयार केला असून देशभरातील केबल ऑपरेटरांना आता आपल्या ग्राहकांना बेसिक सर्व्हीस टियर (बीएसटी) देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचा अर्थ या बेसिक सर्व्हीस टियरमध्ये किमान १०० फ्री टू एअर वाहिन्या आणि १८ दूरदर्शनच्या वाहिन्या व लोकसभा वाहिनी देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

केबलवर दाखवाव्या लागणार १०० रुपयांत १०० मोफत वाहिन्या

देशातील केबल चालकांसाठी ‘ट्राय’ची आचारसंहिता

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने जारी केलेल्या नव्या केबल टीव्ही दरांनुसार आता ग्राहकांना किमान शंभर फ्री टू एअर मोफत दूरचित्रवाणी वाहिन्या कमाल १०० रुपये मासिक शुल्कात पाहायला मिळणार आहेत. काल हे नवे दर ट्रायने जाहीर केले. डिजिटलाईज्ड केबल टीव्हीसाठी एक आराखडा ‘ट्राय’ने तयार केला असून देशभरातील केबल ऑपरेटरांना आता आपल्या ग्राहकांना बेसिक सर्व्हीस टियर (बीएसटी) देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचा अर्थ या बेसिक सर्व्हीस टियरमध्ये किमान १०० फ्री टू एअर वाहिन्या आणि १८ दूरदर्शनच्या वाहिन्या व लोकसभा वाहिनी देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

विदर्भात गेल्या ४८ तासांत ५ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशात गेल्या ४८ तासांत कर्जांत बुडालेल्या पाच शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचा दावा किशोर तिवारी या सामाजिक कार्यकर्त्याने काल मुंबईत केला. राज्यात गेल्या चार महिन्यांत ३३२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली असल्याचे त्यांनी सांगितले. तिवारी हे विदर्श जनआंदोलन समितीचे नेते आहेत.

गुलाम मानसिकता बदलण्यासाठी प्रशिक्षण हवे!

- दिलीप बोरकर

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मनोहर पर्रीकर यांनी ज्या काही अनेक घोषणा केल्या आहेत, त्यात गोव्यातील सरकारी सेवेत असलेल्या आयएएस अधिकार्‍यांना कोंकणी भाषेचे प्रशिक्षण देण्याच्या घोषणेचाही समावेश आहे. पर्रीकरांच्या या स्तुत्य घोषणेचे स्वागत व्हायला हवे. कारण, असल्या घोषणा गोव्यासारख्या राज्यात कधीच सत्यसृष्टीत उतरण्याची शक्यता नसली तरी आपल्या भाषेतूनच आपला राजकारभार चालायला हवा अशी स्वप्ने रंगवणार्‍या स्वाभिमानी गोमंतकीयांना वरकरणी का असेना समाधान वाटेल.

राष्ट्रपती कोण?

यंदा २४ जुलै रोजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल संपत असल्याने भावी राष्ट्रपती कोण ही चर्चा रंगात आलेली आहे. कॉंग्रेसच्या वतीने हमीद अन्सारी आणि प्रणव मुखर्जींचे नाव पुढे केले गेले, तर भाजपाने माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनाच दुसर्‍यांदा राष्ट्रपती करण्याच्या कल्पनेस पाठिंबा दर्शवून कॉंग्रेसच्या उमेदवारापुढे आव्हान उभे केले आहे. द्रमुक, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बसप, समाजवादी पक्ष, तृणमूल कॉंग्रेस यांनी अद्याप आपले पत्ते अद्याप पुरते खोललेले नाहीत. या सर्व घटक पक्षांचा पाठिंबा मिळवल्याविना कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही. कारण राष्ट्रपतीपदाची निवडणूक घ्यायची झाली तर जी एकूण १० लाख ९८ हजार ८८२ मते आहेत, त्यापैकी कॉंग्रेसपाशी केवळ ३१ टक्के मते आहेत. भाजपाची स्वतःची मते २१ टक्के आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडीचा म्हणून विचार केला तर त्यांची एकूण मतेही ४२ टक्के होतात. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची २८ टक्के मते आहेत. हे सारे गणित लक्षात घेतले तर एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे सहयोगी पक्षांच्या पाठिंब्याविना उमेेदवार राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर बसणे शक्य नाही.