February 2012
गोवा हा प्रगतिशील प्रदेश : पंतप्रधान
साखळी येथे कॉंग्रेसच्या प्रचारसभेत प्रतिपादन
गोवा भारतातील सर्वांग सुंदर प्रदेश आणि प्रगतिशील प्रदेश आहे. गोवा शांतीचा पुजारी असून सर्वधर्मसमभाव येथील जनतेत भिनलेला आहे, असे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी साखळी येथील कॉंग्रेसच्या प्रचार सभेत सांगितले.
कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील गोवा सरकारने विधायक बदलांची व विकासाची उंची गाठली आहे. राज्याच्या विकासाला दिशा देण्यासाठी आता पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
महिलेने मुलांसह नदीत उडी घेतल्याच्या वृत्ताने खळबळ
बोरी पुलावरून काल रात्री ८ च्या दरम्यान महिलेेने दोन मुलांसह जुवारी नदीत उडी घेतली असल्याची माहिती फोंडा पोलीस स्थानकाला दूरध्वनीवरून मिळाली. दरम्यान, हे वृत्त पसरून जवळपासच्या लोकांनी पुलावर गर्दी केली होती.
देशाचे भवितव्य भाजप ठरवेल : गडकरी
या देशाचे भविष्य जनतेच्या हातात तर देशाचे भवितव्य भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे. गोवेकरांचा स्वाभिमान टीकवायचा असेल तर भ्रष्ट कॉंग्रेसची राजवट संपुष्टात आणून भाजपा-मगो युतीचे सरकार राज्यात आणा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मांद्रे येथे भाजपाचे उमेदवार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेत काल केले.
मांद्रे हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित केलेल्या प्रचार सभेत उमेदवार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, मगोचे नेते श्रीधर मांजरेकर, राघोबा गावडे, जिल्हा पंचायत सदस्या श्रीमती मांजरेकर, मोरजीचे सरपंच रत्नाकर शेटगांवकर, नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू, युवा नेते सचिन परब, सोमनाथ पार्सेकर, कोरगाव जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर, श्रीपाद परब, आगरवाडा सरपंच एकता चोडणकर, पार्से सरपंच महेश कांबळी, अरुण बानकर, लुइस डिसोझा, सदानंद मेणकुरकर, रमेश शेटमांद्रेकर, विश्वनाथ शिरोडकर, संतोष शेटगावकर, पंच प्रभाकर नागवेकर, देवेंद्र प्रभुदेसाई, बाबली राऊत, प्राजक्ता कान्नाईक, मधुकर कानोळकर, प्रदीप नाईक, लक्ष्मण कुबल, सुजय गोकर्णकर, अभिमन्यू परब, निलेश आसोलकर, फ्रांसिस रॉड्रिग्स, आलेसिन फर्नांडिस, नामदेव टाककर, संदीप राणे, भिकाजी गोवेकर, कुस्तान डिसोझा, कालिदास सावंत, प्रविणा कानोळकर आदी हजर होते.
संसद, विधानसभांचे स्वरूप बदलावे लागेल : केजरीवाल
भ्रष्टाचारावर नियंत्रण आणायचे असेल तर संसद व विधानसभांचे स्वरूप बदलावे लागेल, असे ‘भ्रष्टाचारविरोधी भारत’चे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी काल पत्रकारांना बोलताना सांगितले.
जुने गोवेच्या मास्टर प्लॅनची मागणी
जागतिक वारसा स्थळ असलेल्या जुने गोवेसाठी लवकरात लवकर मास्टर प्लॅन तयार करण्यात यावा, अशी मागणी काल जुने गोवे वाचवा कृती समितीने पत्रकार परिषदेतून केली.
पेट्रोल स्वस्त करायला पैसे कुठून आणणार?
डॉ. विलींचा भाजपला सवाल
भाजपने आपल्या जाहीरनाम्यातून पेट्रोल ११ रु.नी कमी करण्याचे तर दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली लाभार्थींना २ हजार रु. देण्याचे तसेच ३ ते ४ हजार रु. बेरोजगार भत्ता देण्याचे जे जाहीर केले आहे त्यासाठी पक्ष पैसे कुठून आणणार असा सवाल तृणमूल कॉंग्रेसचे गोवा अध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसौझा यांनी काल पत्रकार परिषदेतून केला.
जनहो, भलत्या आमिषाला बळी पडू नका !
- विश्वास मधुकर पेडणेकर, पेडणे.
घराला महत्त्व घरातील सुखासमाधानाने, एकत्र नांदणार्या सदस्यांमुळेच येते. त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे वागणार्या लोकप्रतिनिधींमु़ळे चांगला पक्ष बनतो व तेव्हाच त्या पक्षाला महत्त्व प्राप्त होते. मग तो पक्ष कोणताही असो. पण आताच्या राजकारणात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच प्रामाणिक नेते मिळतील. असे असतानाही पक्षाचे नाव खराब होते, कारण इतर नेते बंडखोर किंवा अप्रामाणिक असतात. तरीही त्या प्रामाणिक नेत्यांचा विचार करता, त्यांना निवडून आणणे हे मतदाराचे काम आहे. त्यासाठी त्यांना पाठिंबा देणेही अत्यावश्यक आहे. अर्थात् ते कोणत्याही मोबदल्याविना हे लक्षात घेतले पाहिजे. कारण, काही लाचखाऊंनी पैशांच्या बळावर काही मतदारांना लाचार बनविले आहे. त्याचमुळे मते मिळविण्यासाठी महिला मतदारांना साड्यांचे वाटप, धान्यवाटप, देवस्थानांच्या वार्या, खेळाडूंना खेळांचे साहित्य वाटणे, सभेला उपस्थित राहण्यासाठी भत्ता देणे, तरूणांना चिकन-मटण, दारू देणे आदी गोष्टींचा पायंडाच काही राजकीय नेत्यांनी घातला आहे. याची झळ मात्र प्रामाणिक नेत्यांना बसते.
लोकां सांगे ब्रह्मज्ञान...
अण्णा हजारे यांनी चेतविलेली राष्ट्रचेतना विझवण्याचा वसाच त्यांच्या तथाकथित टीमने घेतला आहे की काय नकळे, परंतु त्या ‘टीम’मधील एकेकाचे वागणेबोलणे पाहिले, तर या आंदोलनाला मिळालेल्या उत्तुंग यशानंतर त्या शिखरावर टिकून राहणे शक्य न झाल्याने दिवसेंदिवस घसरणच चालली आहे असे दिसेल. या घसरणीचा नवा अध्याय परवा लिहिला अरविंद केजरीवालांनी. गोव्यात येऊन येथील जनतेला भ्रष्टाचार्यांविरुद्ध मतदान करण्याचे आवाहन करणार्या केजरीवालांना स्वतःच्या मतदानाचा मात्र सोयीस्कर विसर पडला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत स्वतःचे मत टाकायला तर ते विसरलेच, परंतु स्वतःचे नाव मतदारयादीत आहे की नाही हे पाहण्याची तसदीदेखील त्यांनी घेतली नाही. देशातील लोकशाही बुलंद करण्याची भाषा करणार्या केजरीवालांच्या उक्ती आणि कृतीमधील ही तफावत ‘टीम अण्णा’च्या नैतिक अधिष्ठानाचा पायाच कमकुवत करते. काही दिवसांपूर्वी किरण बेदी यांनी आपल्या प्रवासदौर्यांची बिले कशी फुगवली त्याचा तपशील उघडकीस आला होता.
कामगारांच्या संपास देशात संमिश्र प्रतिसाद
बँकिंग, वाहतूक क्षेत्रावर परिणाम
११ प्रमुख कामगार संघटनांनी दिलेल्या २४ तासांच्या देशव्यापी संपाला संमिश्र प्रतिसाद लाभला. सार्वजनिक क्षेत्रातील बँका तसेच वाहतूक क्षेत्रावर परिणाम दिसून आला. डाव्यांच्या कामगार संघटनांबरोबरच काही भाजपप्रणीत व कॉंग्रेसप्रणीत संघटनांनीही संपाला पाठिंबा दर्शविला होता. सरकारच्या नव - उदारमतवादी आर्थिक आणि कामगार धोरणांना ‘कामगार विरोधी’ सांगत निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला होता.
जनजीवनावर सामान्य होते, मात्र लोकांचे दैनंदिन व्यवहार मात्र विस्कळीत झाले.
काही ठिकाणी रेल्वेच्या वाहतुकीत अडथळा निर्माण करण्याचे प्रयत्न झाले.
दिल्ली, मुंबई, चेन्नई आदी प्रमुख शहरात स्थिती सामान्य होती. केरळ, उदिशा, त्रिपुरा या राज्यांमध्ये मात्र संपाचा प्रभाव दिसून आला. एकेकाळी डाव्यांचा गड मानला जाणार्या पश्चिम बंगालमध्ये बंदचा प्रभाव कमीत कमी व्हावा म्हणून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत: लक्ष ठेऊन होत्या. सरकारी कर्मचार्यांनी संपमध्ये भाग घेतल्यास खंडित सेवा असे मानण्यात येईल असा आदेश काढल्याने पश्चिम बंगालच्या सचिवालयात व इतर सरकारी कार्यालयांत जास्त जण गैरहजर नव्हते.
निवडणुकीसाठीची वाहने असल्याचे भासवून पैसे वाटप : पर्रीकर
निवडणुकीच्या कामासाठीची सरकारी वाहने असल्याचे भासवून विविध मतदारसंघात सदर वाहनांतून रोख रक्कम नेऊन मतदारांना पैसे वाटण्यात येत असल्याचा आरोप काल विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेतून केला. याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करण्यात आली असल्याचे त्यानी पत्रकारांना सांगितले.
निवडणुकीसाठी जुंपलेल्या सर्व वाहनांना पास वितरीत करण्यात यावेत, संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात यावी, एका मतदारसंघातून प्रचारासाठी दुसर्या मतदारसंघात जाणार्या व्यक्तींना संध्याकाळी ५ नंतर तेथून काढता पाय घेण्यासंबंधीचे आदेश जारी करण्यात यावेत, मत हे गुप्त असून मतदारांची छायाचित्रे घेण्यात आली तसेच बोटांचे ठसे घेण्यात आले तरी त्याने मत कुणाला दिले आहे हे गुप्तच राहणार असल्यासंबंधीची जागृती मतदारमध्ये करण्यात यावी, स्थानिक पोलीस तसेच मंत्री यांच्यात संगनमत झालेले असल्याने सांगें, वाळपई, पर्ये व कुंकळ्ळी या मतदारामध्ये भरारी पथके कार्यक्षमपणे काम करीत नसून तेथे सीआरपीएफ जवान तैनात करण्यात यावेत.
महिलांनाही उमेदवारी हवी : स्वराज
पक्षांनी पुढाकार घेण्याचे आवाहन
निवडणूक लढविण्यासाठी पात्र असलेल्या महिला गोव्यात आहेत. अशा महिलांना उमेदवारी देऊन पक्षाने त्यांना निवडून आणले पाहिजे, या मताशी आपण पूर्णपणे सहमत असल्याचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
महिलांना विधानसभेत उमेदवारी देण्यासाठी आरक्षण कायदा झाल्याशिवाय कोणतेही राजकीय पक्ष महिलांना उमेदवारी देण्याबाबत गंभीरपणे विचार करणार नाहीत, असे त्या पुढे म्हणाल्या.
पंतप्रधानांची आज साखळीत सभा
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या साखळी सरकारी महाविद्यालयाच्या मैदानावरील सभेस परवानगी मिळाली असून ही सभा आज संध्याकाळी ४.०० वा. होणार आहे.
‘आधार’ कार्डांचा असाही आधार!
ताळगांव मतदारसंघात काही राजकीय कार्यकर्ते आधार कार्डे वितरीत करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
समलिंगी संबंधांचे केंद्राकडून समर्थन
पुरुषांमधील समलिंगी संबंधांबाबत आपले मत बदलत केंद्राने काल गे-सेक्सला गुन्हा न मानण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयासमोर घेतली. यामुळे संताप व्यक्त करत कोर्टाने सरकारला धारेवर धरले व व्यवस्थेची थट्टा करीत असल्याची टीप्पणी केली.
विशेष दर्जा शक्य : शांताराम
केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी गोव्याला विशेष दर्जा देण्याच्या मागणीच्या बाबतीत घटनेतील ३७१ कलमाखालील तरतुदीचा उल्लेख केलेला नाही. गोव्याची ही मूळ मागणी असल्याचे राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक यांनी वरील प्रकरणी खुलासा करताना स्पष्ट केले.
लोकां सांगे ब्रह्मज्ञान... केजरीवाल यांच्या वागण्यामुळे प्रश्नचिन्ह
स्वतःच्या मतदानाचा पडला विसर; मतदारयादीत नावच नाही!
गोव्यात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी येणारे टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांना स्वतः करायच्या मतदानाची मात्र आठवण राहिली नाही. गोव्याला यायला निघालेल्या केजरीवाल यांना तुम्ही इतरांना मतदान करायला सांगता, पण उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये स्वतःचे मत देणार नाही का, असा सवाल करून पत्रकारांनी धारेवर धरताच ते आपली गोवा भेट रद्द करून गाझियाबादकडे निघाले. मात्र, मतदारयादीत त्यांचे नावच नसल्याचे तेथे स्पष्ट झाले. त्यामुळे केजरीवाल यांनी स्वतः मतदान केलेच नाही.
संसदेपेक्षा जनताच सर्वोच्च : केजरीवाल
संसदेपेक्षा भारतांतील जनता सर्वोच्च असल्याचे ‘इंडिया अगेन्स्ट करप्शनचे’ अरविंद केजरिवाल यांनी पाजीफोंड येथील नरसिंह दामोदर नायक सभागृहांत खचाखच भरलेल्या सभागृहांत सांगितले.
‘उडदामाजी काळे-गोरे’ निवडताना...
- दिलीप बोरकर
गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतदानास फक्त दोनच दिवसांचा अवधी राहिलेला आहे. निवडणुकीचा जाहीर प्रचार उद्या १ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता संपुष्टात येणार आहे. ३ मार्च रोजी मतदान होणार असून तत्पूर्वी ४८ तास अगोदर म्हणजे १ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांनाच जाहीर प्रचार बंद करावा लागणार आहे.
प्रणवदांची स्पष्टोक्ती
गोव्यासारख्या प्रगत राज्याला विशेष दर्जा देण्याची आवश्यकता नसल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केल्याने निवडणूक आली रे आली की ‘विशेष दर्जा’ चे गाजर दाखवण्याच्या नेत्यांच्या प्रयत्नांना चपराक बसली आहे. सोनिया गांधींनी काही वर्षांपूर्वी आपल्या प्रचारसभेत, गोव्याला विशेष दर्जा देण्याबाबत विचार करू अशी जाहीर ग्वाही दिली होती आणि तेव्हापासून ते गाजर सतत जनतेपुढे नाचविले जाते आहे. वास्तविक गोव्यासारखे प्रगत राज्य ‘विशेष दर्जा’ मिळवण्याच्या कोणत्याही निकषामध्ये कुठल्याही अंगाने बसत नाही, परंतु हे पक्के ठाऊक असतानाही केवळ राजकीय कारणांसाठी हे गाजर गोमंतकीय जनतेला दाखवले जात आले आहे. राष्ट्रीय विकास आयोगाद्वारे केवळ अकरा राज्यांना आजवर हा विशेष दर्जा दिला गेलेला आहे. ईशान्येतील सात राज्ये आणि सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू व काश्मीर यांना हा दर्जा आहे. झारखंडसारख्या मागास राज्यालादेखील अजून हा दर्जा मिळालेला नाही, मग तो गोव्याला मिळेल अशी अपेक्षा करणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक करून घेण्यासारखे आहे. जे निकष विकास आयोगाने पुढे ठेवले आहेत, त्यानुसार केवळ डोंगराळ, दुर्गम प्रदेश असलेल्या, सीमावर्ती, अपुर्या आर्थिक व सामाजिक साधनसुविधा असलेल्या, आदिवासींची मोठी लोकसंख्या असलेल्या, मागास राज्यालाच हा दर्जा देण्यात येतो.
योगमार्ग - राजयोग (सत्य - ४३)
- डॉ. सीताकांत घाणेकर
भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘तीन गोष्टी फार काळ लपून राहू शकत नाहीत - सूर्य, चंद्र व सत्य.’’
खरेच किती सत्य आहे बुद्धांचे हे मत. पण तरी देखील सामान्य माणूस स्वार्थ, प्रलोभन, भीती, अज्ञान... यामुळे सत्यापासून दूर राहतो. एवढेच नाही तर सज्ञान व्यक्ती ह्याबद्दल ज्ञान असूनसुद्धा असत्याच्या मार्गाने जातात. अनेक वेळा आपण असे का वागलो ह्याचे समर्थन करतात. बहुधा त्यांचा स्वतःचा स्वार्थच इथे जास्त डोकावतो.
कलेकलेनं विकसित झालेली कलावती...
- प्रा. रमेश सप्रे
‘गंमत म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जगातील एक श्रीमंत माणूस होता हेन्री फोर्ड. मोटारींचा त्याला सम्राट म्हणायचे. अजूनही त्याचं साम्राज्य आहेच.. तर एकदा त्याची स्वतःची गाडी बंद पडली. टॅक्सीनं जावं लागलं. उतरल्यावर मीटरप्रमाणे पैसे देऊन तो टॅक्सीवाल्याकडून परत मिळावयाच्या पैशांची वाट पाहत थांबला. यावर तो टॅक्सीवाला म्हणाला, ‘आपण श्री. हेन्री फोर्ड ना?’ यावर होकार मिळताच तो म्हणाला, ‘‘तुमचा मुलगा कधी टॅक्सीनं गेला तर असा थांबत नाही. ‘उरलेले पैसे तुम्हीच ठेवा(कीप द चेंज)’ असं म्हणून चालायला लागतो.’’ हेन्री फोर्ड लगेच म्हणाला, ‘बरोबर आहे कारण त्याचा बाप श्रीमंत आहे. माझा नाही.’ याचा अर्थ समजून सत्यवान मनापासून हसला. म्हणजे त्याला गोष्टीचं तात्पर्य कळलं होतं. शिकवण समजली होती. आता पुढचं सांगायला हरकत नव्हती.
धुळेर येथे पेट्रोल पंपला भीषण आग
१२ हजार लिटर पेट्रोल जळाले
२५ लाखांची हानी
धुळेर-म्हापसा येथील दत्तप्रसाद भांगलेे यांच्या हिंदुस्थान पेट्रोलियम पेट्रोल पंपला आग लागून २५ लाखांची हानी झाली.
पंपवरील टँकरला सर्वप्रथम आग लागली. यात सुमारे १२ हजार लीटर पेट्रोलसह टँकर पूर्णपणे जळून गेला. आगीत एक दुचाकी तसेच पेट्रोल पंपचा काही भागही जळाला. या इमारतीमधील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएम केंद्राची तसेच एका खासगी गाडीचीही हानी झाली. सुदैवाने या दुर्घटनेत प्राणहानी झाली नाही. पंपावरील एक पर्यवेक्षक किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आग इतरत्र पसरली असती तर दुर्घटने आणखी मोठी हानी होण्याची शक्यता होती.
पेट्रोल पंपवरील कर्मचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही दुर्घटना काल दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. जीए ०१ झेड २९९७ या टँकरमधून पेट्रोल पंपच्या टाक्यात पेट्रोल भरण्यात येत होते. यावेळी आवश्यक खबरदारी व्यवस्थापनाने घेतली होती. टँकरमधील पेट्रोल खाली करीत असताना टँकरचा चालक, वाहक तसेच पंपचे व्यवस्थापक टँकरजवळ होते.
गोव्याला विशेष दर्जाची शक्यता प्रणव मुखर्जींनी फेटाळली
गोव्याला विशेष राज्याचा दर्जा दिला जाण्याची शक्यता केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना फेटाळून लावली. गोवा हे एक श्रीमंत व विकासाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास घोडदौड केलेले राज्य असून अशा राज्यांना विशेष दर्जा मिळू शकत नसल्याचे मुखर्जी यांनी स्पष्ट केले.
गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे प्रचारासाठी आलेल्या प्रणव मुखर्जी यांनी काल एका पंचतारांकित हॉटेलात पत्रकार परिषद घेतली असता पत्रकारांनी त्याना विशेष दर्जाबाबत छेडले. त्यावर उत्तर देताना त्यांनी वरील स्पष्टीकरण केले.
राजकारणातील परिवारवाद लोकशाहीस घातक : गडकरी
राजकारणातील परिवारवाद हा लोकशाहीला असलेला फार मोठा धोका आहे. कॉंग्रेसने गोव्यात मोजक्या कुटुबांतील १२ सदस्यांना उमेदवारी देऊन गोव्यासमोर धोका निर्माण केला आहे, त्याचा गोमंतकीय जनतेने निषेध करावा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काल पत्रकार परिषदेत केले.
निवडणुकीत नातेवाईकांना उमेदवारी देऊ नये असे नाही. एखाद्या राजकारण्याचा मुलगा खरोखर समाजसेवा, कष्ट करून कर्तृत्व सिद्ध करून पुढे आल्यास त्याचा उमेदवारीसाठी विचार झालाच पाहिजे, परंतु कॉंग्रेसने ज्या राजकारण्यांच्या मुलामुलींना उमेदवारी दिली आहे, त्यांचे समाजातील योगदान काय आहे, हा प्रश्न आहे, असे गडकरी पुढे म्हणाले.
पंतप्रधानांच्या सभेच्या ठिकाणाबाबत पेच
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शैक्षणिक मालमत्तेत निवडणूक प्रचारसभा घेण्यास बंदी असल्याने साखळी येथील सरकारी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या प्रचारसभेस परवानगी मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे काल कॉंग्रेस पदाधिकार्यांची धावपळ सुरू होती.
अपक्ष उमेदवार गजांआड
साळगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार फ्रान्सिस्को झेवियर कुलासो यांना काल पर्वरी पोलिसांनी अटक केली.
एफ ऍण्ड सी कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक व बिल्डर यांना दिलेला धनादेश न वटल्याच्या गुन्ह्यावरून १३८ (एनआयए) कलमाखाली पर्वरी पोलिसांनी त्यांना अटक केली. कुलासो रेईस मागूस पंचायतीचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर धनादेश न वटण्याच्या प्रकरणात गुन्हे नोंद झाले असून त्याच एका प्रकरणात म्हापसा येथील न्याय दंडाधिकार्यांनी अटक करण्याचे आदेश दिले असता पर्वरी पोलिसांनी त्यांना निवासस्थानाहून अटक केली.
‘आर्टिस्ट’ने गाजवला ‘ऑस्कर’
यंदाच्या ८४व्या ऑस्कर पुरस्कार समारंभात फ्रेंच प्रेमकहाणीचे कथानक असलेल्या कृष्णधवल मूकपट ‘दि आर्टिस्ट’ने महत्त्वाचे बहुतेक पुरस्कार मिळविले. या चित्रपटास महत्त्वाच्या विभागांतील एकूण पाच पुरस्कार मिळाले.
मतदानापूर्वी ४८ तास राजकीय एसएमएसवर बंदी!
निवडणूक कायद्याचा भंग करणारे काही एसएमएस सध्या वितरित केले जात असल्याचे निवडणूक आयोगाला आढळून आल्यावर भ्रमणध्वनिवरून पाठविण्यात येणार्या एसएमएसवर निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे. दरम्यान, निवडणूक प्रचार थांबवण्यात आल्यानंतर मतदानाच्या ४८ तास अगोदर राजकीय स्वरूपाचे एसएमएस पाठविण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
आजच्या देशव्यापी संपात गोव्यातील कामगारही सहभागी
केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आज मंगळवार दि. २८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी संपात गोव्यातील कामगार वर्गही सहभागी होणार असल्याचे ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसचे येथील सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
सच्चा कॉंग्रेसमनची क्षमता प्रदेशाध्यक्षांना कवडीमोलाची
- एन्. शिवदास.
शुक्रवार दि. १० फेब्रुवारीच्या दै.‘नवप्रभा’च्या अंकात आमचे मित्र शंभू भाऊ बांदेकर यांचे ‘एका सच्चा कॉंग्रेसमनचे प्रदेशाध्यक्षांना अनावृत्त पत्र’ वाचनात आले. सदर पत्र वाचून माझे भाकीत खरे ठरले. मी कॉंग्रेस पक्षाचा माझा राजीनामा दिला, त्यालाही शंभूंनी व्यक्त केलेली काही कारणे आहेत. शंभू भाऊंनी जे मुद्दे मांडलेले आहेत, त्या मुद्द्यांना प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर कधी उत्तरे देण्याच्या फंदात पडणार नाहीत. कारण, तेवढी क्षमता आणि धमक त्यांच्यात नाही. शिवाय पत्रात व्यक्त केलेल्या विचारांची सभ्यतेने मनोमन कदर करण्याची वैचारिक कुवतही दिसत नाही.
अमानुष हल्ला
वेळ्ळी येथे शनिवारी पोलिसांवर अत्यंत अमानुष हल्ला झाला. तेथील धर्मगुरू फादर रोमानो यांच्याकडे माहिती मिळवण्यासाठी गेलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या तिघा पोलिसांना आत कोंडून, चर्चच्या घंटानादाद्वारे लोकांना गोळा करून अत्यंत अमानुषपणे मारहाण केली गेली आणि आता या घटनेचा निषेध करणे तर दूरच, उलट आपले कर्तव्य बजावण्यासाठी वेळ्ळीत गेलेल्या त्या पोलिसांनाच निलंबित करावे यासाठी स्थानिक आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्स वरिष्ठ पोलीस अधिकार्यांवर राजकीय दडपण आणीत आहेत. फिलीप नेरी यांची ही कृती येत्या तीन तारखेवर डोळा ठेवूनच आहे हे स्पष्ट आहे. या हल्ल्यानंतर फादर रोमानो यांच्यासह दीड हजार लोकांविरुद्ध गुन्हे जरी नोंदवले गेले असले, तरी या प्रकरणात घुसलेले राजकारण पाहाता पोलिसांनाच तंबी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. हे सारे प्रकरण म्हणजे भरारी पथकाने काही दिवसांपूर्वी फादर रोमानो यांच्यावर टाकलेल्या छाप्याचा दुसरा अध्याय आहे. त्या छाप्यानंतर वेळ्ळीतील साडेपाच हजार नागरिक तीन तारखेला मतदान करणार नाहीत अशी धमकी फादर रोमानो यांनी दिली होती. नागरिक खरोखरच मतदान करणार नाहीत का याची माहिती मिळवण्यासाठी सीआयडीचे तिघे पोलीस वेळ्ळीत शनिवारी गेले होते.
वेळ्ळीत पोलिसांवर हल्ला प्रकरणी ख्रिस्ती धर्मगुरुसह १५०० जणांवर गुन्हा नोंद
वेळ्ळी येथे सेंट फ्रांसिस्क झेवियर चर्च प्राकारांत सीआयडी पोलीस व कुंकळ्ळी पोलिस हे फादर रोमानो गोन्साल्वीस यांच्या निवासस्थानी गेले असता चर्चची घंटा वाजवल्याने हजारो लोकांच्या जमावाने तेथे धाव घेऊन पोलिसांना खोलीत डांबून प्राणघातक हल्ला करून बेदम मारहाणीत व दगडफेकीत ६ सीआरपी जवान जखमी केल्याप्रकरणाची नोंद घेत कुंकळ्ळी पोलिसांनी फा. रोमोनो गोन्साल्विस, पॅट्रीक डिसिल्वा (आंबेली), आग्नेलो फर्नांडिस, डेजमंड डिसिल्वा, आग्नेल डिसिल्वा, नेझल कायरो ऊर्फ भालू, बेवी कायरो, सावियो डिसिल्वा (वेळ्ळी) तसेच अन्य १५०० लोकांवर, बेकायदेशीर जमाव करणे, पोलिसांना कोंडून ठेवणे, मारहाण व खून करण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली १४३, १४४, १४७, १४८, १४९, १८६, ३०७, ३२३, ३२४, ३२६, ३३२, ३४२ व ३५३ कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. अशी माहिती उपअधीक्षक शांबा सावंत यांनी दिली.
या हल्ल्यात सीआयडी पोलिस उपनिरीक्षक कपील नायक, कुंकळ्ळी पोलिस उपनिरिक्षक संदीप केसरकर, हवालदार कृष्णानंद राणे व कुलदीप देसाई गंभीर जखमी झाले. पोलिस अधिकार्यांनी त्या संतप्त जमावातून रक्तबंबाळ अवस्थेत हॉस्पिटलांत हलविल्याने ते बचावले. त्यांच्यावर अपोलो व्हिक्टर हॉस्पिटलात उपचार चालू आहेत. जमावाने दगड व बाटल्या फेकल्याने सीआरएफचे दया शंकर सिंग, दीपककुमार सिंग, उपनिरीक्षक दिपक केसरकर, अरुण महाले जखमी झाले आहे.
सत्ताधार्यांनी गोव्याला लुटले : रामदेवबाबा
आझाद मैदानावर केला उपोषण सत्याग्रह
गोव्यात सत्तेवर असलेल्या सरकारने गोवा अक्षरश: लुटलेला असून त्यांना मतदार यावेळी खाली खेचल्याशिवाय राहणार नसल्याचे रामदेवबाबा यांनी काल येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
रामदेवबाबा यांनी आपल्या ‘भारत स्वाभिमान’च्या सदस्यांसह येथील आझाद मैदानावर काल दिवसभर उपोषण करून सत्याग्रह केला. तद्नंतर संध्याकाळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील सत्ताधार्यांविरुध्द अनेक आरोप केले. गोव्यातील राजकीय नेत्यांनी गोवा ओरबाडून खाल्ल्याचे ते म्हणाले.
भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये
८ वर्षांनंतर पात्र
येथील मे. ध्यानचंद स्टेडियमवरील ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल भारताने फ्रान्सचा ८-१ असा पराभव करीत लंडन ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळविला आहे.
आठ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे. भारताच्यावतीने सर्वाधिक ५ गोल संदीप सिंग याने लगावले.
अंतिम सामन्यात फ्रांसवर ८-१ असा विजय
पेनल्टी कॉर्नर तज्ज्ञ संदीप सिंगच्या ५ गोलांच्या जोरावर ऑलिंपिक पूर्व स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ङ्ग्रान्सचा ८-१ असा धुव्वा उडवित भारतीय हॉकी संघाने तब्बल आठ वर्षांनंतर ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळविला.
सफामशीदीच्या तळीत मृतदेह आढळला
येथील सफामशीदीच्या तळीत काल सकाळी अंदाजे ३५ वर्षे वयाच्या इसमाचा मृतदेह लोकांना आढळून आला. पंचायत सदस्य फारूक मुल्ला यांनी फोंडा पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी येऊन पाहणी केली असताना मृतदेह तरंगताना दिसला. अग्निशामक दलाला पाचारण करून तो पाण्याबाहेर काढण्यात आला.
नितीन गडकरी यांची आज मयेत जाहीर सभा
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची प्रचाराची जाहीर सभा सोमवार दि. २७ रोजी सायंकाळी ६ वा. केळबायवाडा मये येथे आयोजित करण्यात आली आहे.
पंतप्रधानांची बुधवारी साखळीत सभा
सभापती प्रतापसिंह राणे व उत्तर गोव्यातील अन्य कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे बुधवार दि. २९ रोजी गोव्यात आगमन होत असून त्या दिवशी दुपारी २ वाजता साखळी येथील सरकारी महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
...हिंमत असेल तर शाह आयोगाचा अहवाल जाहीर करा
गोपीनाथ मुंडे यांचे कॉंग्रेसला आव्हान
हिंमत असेल तर यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गोवा विधानसभा निवडणुकापुर्वी बेकायदेशीर खाणीवरील एम. बी. शाह यांचा अहवाल जाहीर करावा, असे आव्हान काल भाजपचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यंनी दिले.
राजकारण्यांच्या नवीन पिढीबाबत मतदारांत आकर्षण : सुशिलकुमार शिंदे
निवडणूक प्रचारासाठी बाहेरून येणार्या कॉंग्रेस नेत्यांना ‘फॅमिली राज’चे समर्थन करण्यावाचून अन्य कोणताही पर्याय राहिलेला नसून राजकारणात घराणेशाही हा विषय मला पटत नाही, नव्या मतदारांना राजकारण्यांच्या नव्या पिढीविषयी आकर्षण वाटत आहे. त्यामुळेच त्यांना उमेदवारी दिल्याचे केंद्रीय वीजमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
‘भ्रष्टाचारविरोधी भारत’तर्फे जागृती सभा
रामदेव बाबांपाठोपाठ ‘भ्रष्टाचारविरोधी भारत’नेही आपल्या प्रचाराचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
संघटनेच्या गोवा विभागाने जनजागृतीसाठी दि. २८, २९ फेब्रुवारी व दि. १ मार्च रोजी गोव्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले. आहे.
सरकार आल्यास जाहीरनामा पूर्णांशाने अंमलात आणू : सोनिया
केंद्र पाठपुरावा करून सर्वतोपरी सहाय्य देईल; फातोर्डा येथील जाहीर सभेत आश्वासन
कॉंग्रेस पक्षाने या निवडणुकीत आपल्यापुढे ठेवलेला जाहीरनामा सरकार आल्यास पूर्णपणे अंमलात आणील व दरवर्षी त्या कामांच्या प्रगतीचा अहवाल केंद्र सरकार त्यांच्याकडून मिळवून सर्वतोपरी सहाय्य देईल अशी ग्वाही कॉंग्रेस पक्षाध्यक्ष व संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख श्रीमती सोनिया गांधी यांनी काल गोव्यात फातोर्डा येथील जाहीर प्रचारसभेत दिली.
निसर्गसौंदर्याने नटलेल्या, थोर संस्कृतीची परंपरा असलेल्या व सदैव सर्वधर्मसमभाव राखणार्या गोव्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने स्थिर सरकार दिले व सर्व घटकांतील लोकांपर्यंत विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचविला. यूपीए सरकारच्या अनेक योजनांचा फायदा मिळवून या राज्याची प्रगती साधण्यासाठी कॉंग्रेसचेच स्थिर सरकार लोकांनी निवडून देण्याची गरज आहे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
विलींनी तृणमूल गोव्यात आणून निधर्मी मते विभागली : चर्चिल
गोव्याचे ज्येष्ठ नेते विल्फ्रेड डिसोझा यांनी तृणमूल कॉंग्रेस गोव्यात आणून सेक्युलर मतांची विभागणी करण्याचे जे कारस्थान रचलेले आहे त्याला गोव्यातील लोक थारा देणार नाहीत. त्यांची बुद्धी आता नाठी झालेली आहे व ते गोव्यातील लोकांमध्ये ते फूट घालण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका बांधकाम मंत्री चर्चील आलेमाव यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
बाणावली येथे चर्चिल यांची कन्या वालांका हिच्या विरोधात तृणमूल कॉंग्रेसचे जॉन फर्नांडिस हे उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी तृणमूल कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसौझा बाणावली येथे आले होते व त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाचा समाचार घेताना चर्चील आलेमाव म्हणाले, डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी जीवनभर गोव्याचा धर्मनिरपेक्षतावाद सांभाळण्यासाठी प्रयत्न केला व या वर्षी मात्र राज्यात धार्मिक फूट पाडून ते भाजपाला मदत करीत आहेत. त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवून नये असे चर्चिल म्हणाले. कारण तृणमूल कॉंग्रेसच्या नावाने जी मते पडतील ती कॉंग्रेसची मते असतील व त्याचा लाभ भाजपाला मिळेल, असेही ते म्हणाले.
गोव्यात येणार्या कारमध्ये मतदानयंत्राची प्रतिकृती
पेडणे पोलीस व निवडणूक भरारी पथकाने पत्रादेवी चेक पोस्ट नाक्यावर २३ रोजी सकाळी ११.३० वाजता एमएच १४९ सीएस ३९१४ या कारमधून बनावट मतदान यंत्रे (मशीन) राज्यात आणण्याच्या संशयावरून वाहन पकडले असता त्यात डमी. थर्माकॉलची प्रतिकृती मशीन सापडली.
उ. प्रदेशमधील औषध घोटाळ्यात २३ छापे
उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी काल २३ ठिकाणी पुन्हा छापे टाकण्यात आले. लखनौ, वाराणसी, गाझियाबाद, कानपूर, झांसी, मीरत येथे हे छापे टाकले गेले. प्रमुख वैद्यकीय अधिकारी व उपवैद्यकीय अधिकार्यांच्या घरांवर हे छापे टाकले गेले.
मुंडे यांची आज पैंगीणमध्ये सभा
भारतीय जनता पक्षातर्फे आज २६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वा. पैंगीण बाजारात जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा खासदार गोपीनाथ मुंडे यांचे प्रमुख भाषण होणार आहे.
महायुतीचा प्रस्ताव भाजपने नाकारला : रामदास आठवले
भाजप, मगो युतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व शिवसेना सहभागी होण्यास उत्सुक होते. आम्ही भाजपला तसा प्रस्तावही दिला होता. पण भाजपने प्रतिसाद दिला नसल्याचे रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले.
भरारी पथकाचे छापे
निवडणूक भरारी पथकाने पेडणे तालुक्यातील मांद्रे व पेडणे या दोन ठिकाणी तक्रारीनुसार छापे टाकून हाती शेवटी काहीच मिळाले नसल्याने अधिकार्यांना हात हलवत परत फिरावे लागले.
संवेदनशील मतदारसंघांत निमलष्करी दलाचे ध्वजसंचलन
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी उत्तरांचल, हरीद्वार व नाशिक येथून आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी वास्को तसेच दाबोळी मतदारसंघाच्या विविध भागांमध्ये संध्याकाळी ध्वजसंचलन केले.
घोडामैदान जवळ आहे, मतदारराजा जागा हो !
- रमेश सावईकर
गोवा राज्य विधानसभा निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. मतदारराजाला आपला मतदानाविषयीचा निर्णय पक्का करून दि. ३ मार्च रोजी आपले कर्तव्य जबाबदार नागरिक म्हणून पार पाडायचे आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुकीबाबत गेल्या दोन महिन्यांत ज्या घटना घडल्या, निवडणुकीच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात घडत आहेत, त्याबद्दल सद्सद्विवेकबुद्धीनुसार विचार करणे आवश्यक आहे.
नेमकी दिशा
दीर्घकालीक उद्योगांच्या उभारणीसाठी कोणकोणती पथ्ये उद्योजकांनी पाळणे आवश्यक आहे, त्यावर स्वानुभवाच्या आधारे मौलिक मार्गदर्शन करणारे किशोर चौकर यांचे स्व. नानी पालखीवाला स्मृती व्याख्यान नुकतेच पणजीत झाले. चौकर हे टाटा इंडस्ट्रीज या टाटा समूहाच्या मुख्य कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. तत्पूर्वी ते आयसीआयसीआयमध्ये वरिष्ठ पदावर होते. आपल्या या अनुभवाच्या शिदोरीवर त्यांनी व्यवस्थापनाच्या कुठल्याही पाठ्यपुस्तकात आढळणार नाहीत, अशा बाबी आपल्या व्याख्यानातून अधोरेखित केल्या, ज्या उद्योग - व्यवसायाच्या क्षेत्रात काही करून दाखवण्याची मनीषा बाळगणार्यांना निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठराव्यात. आजच्या बदलत्या काळात आपल्या उद्योगांचे अस्तित्व राखण्यासाठी दोन गोष्टींचे महत्त्व जाणण्याची सूचना त्यांनी केली आहे. एक म्हणजे पर्यावरण आणि दुसरी समाज. आज औद्योगिक क्षेत्रामध्ये जो असंतोष निर्माण होताना दिसतो त्यामागे मुख्यत्वे या दोन गोष्टींकडे झालेले उद्योजकांचे दुर्लक्षच कारणीभूत असते यात शंका नाही. गोव्यातील खाण व्यवसायाविरुद्ध आज जनमत निर्माण झाले आहे, त्यामागेही पर्यावरण आणि समाजहित या दोन गोष्टींचे भान ठेवण्याकडे या क्षेत्रात नव्याने घुसलेल्या मंडळींचे झालेले दुर्लक्षच कारणीभूत आहे.
प्रतिभाशाली कुसुमाग्रजांस....
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
आदरणीय कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ऊर्फ तात्यासाहेब शिरवाडकर,
सविनय नमस्कार.
तुम्हाला संवाद करायला आवडायचा म्हणून हे पत्र. तुमच्या जन्मशताब्दीची सांगता उद्या होत आहे. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकानंतर २७ फेब्रुवारी १९१२ मध्ये पुण्यनगरीत तुमचा जन्म. भारतीय कविकुलातील श्रेष्ठ कवी म्हणून तुमचा कीर्तिसुगंध दरवळत आहे. सर्जनशीलतेला सुजनत्वाचा स्पर्श झाला की ती द्विगुणित होते. तिला गोडवा प्राप्त होतो. हा आल्हाददायी प्रत्यय आम्हाला दीर्घकाळ घेता आला. कविता हा तुमचा मर्मबंध. कवितेशिवाय नाटक, कादंबरी, कथा, ललितनिबंध, आस्वादक समीक्षा आणि अनुवाद याही क्षेत्रांत तुम्ही अनिरुद्ध संचार केला. तिथेही ‘कुसुमाग्रजत्वा’ची मुद्रा उमटविली. या वाङ्मयनिर्मितीमागे तुमचे एकात्म मन आहे. एका संपन्न क्षितिजाचे हे प्रतिबिंबरूप आहे. तुमच्याइतकेच ते विलोभनीय आहे. परिणत प्रज्ञा, उन्मेषशालिनी प्रतिभा, प्रगाढ चिंतनशीलता, उत्तुंग कल्पनाशक्ती आणि समर्थ शब्दकळा यांच्या गुणसंगमातून अवतरलेले हे अक्षरशिल्प आहे.
तीर्थांचे महातीर्थ ‘काळेपाणी’
- य. रा. गाडगीळ
सुमारे एक वर्षापूर्वी अंदमानला जाण्याची सुसंधी मिळाली. आम्ही दोबोळी विमानतळ सोडून चेन्नई गाठले. माझा हा पहिलाच हवाई प्रवास असल्याने सर्व बारीकसारीक गोष्टी मी लहान मुलांच्या उत्कंठेने पाहत होतो. एकट्याने करण्याजोगा हा प्रवास मुळीच नव्हता. एक दिवस चैन्नईला उगाच विश्रांती घेतली व दुसरे दिवशी सकाळी पोर्टब्लेयरसाठी पुन: विमान गाठले.
श्रीदेव घोडेमुख अन् वेतोरेची श्रीसातेरी
- लाडोजी परब
सिंधुदुर्गातील संस्कृतीचा शोध घेताना येथील काही चमत्कारिक घटनांचे गूढ अचंबित करते. ग्रामीण भागातील देवालये, त्यांच्या प्रथा - परंपरा व चालीरीती खूप काही शिकवून जातात. वरवर पाहता ती अंधश्रद्धा भासते; पण खोलवर जाऊन विचार केल्यास ती डोळस श्रद्धा म्हटल्यावाचून पर्याय उरत नाही. असे अनेक दाखले मिळाल्याने ग्रामीण लोकांच्या जीवनात ही श्रद्धास्थाने अमूल्य ठेवा बनलेली आहेत. शरीराच्या कुठल्याही अवयवाचं दुखणं असेल तर तेथे फक्त नवस बोलला जातो. तो फेडताना त्याच अवयवाची मातीची प्रतिकृती देवाला अर्पण केली जाते. ते धार्मिक स्थळ म्हणजे श्रीदेव घोडेमुख! मातोंड (ता. वेंगुर्ला) येथील हे प्रसिद्ध देवस्थान. येथील ‘कोंबड्याची जत्रा’ तर सर्वपरिचित आहे. कुठल्याही तीर्थाने रोग्यावर इलाज होऊ शकतो ही गोष्ट निव्वळ भूलथाप वाटेल. पण वेतोरे (ता. वेंगुर्ला) येथील सातेरीच्या न्हावणाने अनेक त्वचारोग बरे झाल्याचे दाखले सापडतात. या अद्भुततेमुळेच कोकणातील देवस्थानांचे महत्त्व वर्षानुवर्षे अबाधित राहिले आहे.
मगोच्या जाहीरनाम्यात प्रादेशिक भाषांचा पुरस्कार
इंग्रजी शाळांचे अनुदान रद्द करण्याबाबत मौन
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने काल आपला २२ कलमी जाहीरनामा प्रकाशित केला. त्यात त्यांनी कोकणीबरोबरच मराठीला राज्यात मानाचे स्थान देण्यास कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकार पुरस्कृत प्राथमिक शिक्षणाचे माध्यम कोकणी मराठी व इतर प्रादेशिक भाषांत असेल, असे त्यांनी सांगितले. मात्र, इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय रद्द करण्याचे आश्वासन देण्याचे मगोने टाळले आहे.
या प्रश्नावर पत्रकारांनी त्यांना बरेच छेडले. त्यानंतर त्यांनी इंग्रजीला अनुदान देण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या जाहीरनाम्यात मगोने ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेसाठी आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन दिले आहे. लोकांच्या सहली आयोजित करण्याप्रकरणी राजकारण्यांवर टीका होत होती. मगोने त्याला कायदेशीर रूप देण्याचे ठरविले आहे.
भविष्यवेधी उद्योग उभारणीसाठी बदलत्या काळासोबत राहा
स्व. नानी पालखीवाला स्मृती व्याख्यानात किशोर चौकर यांचा गुरूमंत्र
आपल्या उद्योग - व्यवसायाकडे अल्प काळापुरते न पाहता प्रदीर्घ काळ तो टिकावा, भरभराटीला यावा असे वाटत असेल तर आपण कालसुसंगत राहणे आवश्यक असेल व त्यानुरूप आपल्या दृष्टिकोनातही बदल करावे लागतील. स्व. नानी पालखीवालांच्या जीवनकर्तृत्वाप्रमाणे ‘क्षमता’ (कॉंपिटन्स), ‘धाडस’ (करेज), ‘बांधिलकी’ (कमिटमेंट) आणि ‘चारित्र्य’ (कॅरेक्टर) या चतुःसूत्रीचा अवलंब जीवनामध्ये केला तरच ही उद्दिष्टे गाठणे शक्य होईल असे प्रतिपादन टाटा इंडस्ट्रीज लि. चे व्यवस्थापकीय संचालक श्री. किशोर चौकर यांनी स्व. नानी पालखीवाला स्मृती व्याख्यान देताना काल येथे केले. वसंतराव धेंपो एज्युकेशन अँड रीसर्च फाऊंडेशन व नानी पालखीवाला मेमोरियल ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन काल संध्याकाळी ‘धेंपो हाऊस’ मध्ये करण्यात आले होते. याप्रसंगी धेंपो उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो व पालखीवाला ट्रस्टचे श्री. दिवाकर व्यासपीठावर उपस्थित होते.
बदलत्या ग्राहकाचे भान ठेवा
पूर्वी ग्राहकापाशी विकल्प नसायचे, गुणवत्तेचा आग्रहही तो धरीत नसे, जे समोर येई ते निमूटपणे स्वीकारीत असे, परंतु आज तो काळ राहिलेला नाही. आज क्षणाक्षणाला तंत्रज्ञान बदलते. ग्राहक अधिक सजग झाला आहे, त्याच्यापुढे असंख्य पर्याय उभे राहिले आहेत, तो गुणवत्तेबाबत, किंमतींबाबत अधिक जागरूक झालेला आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक विचारसरणीच्या आधारे आपला उद्योग प्रदीर्घ काळ चालवणे अशक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वच्छ गोव्यासाठी भाजपकडे सत्ता द्या : हेमामालिनी
कॉंग्रेस सरकार गेल्या साठ वर्षांत जेवढा विकास करू शकले नाही तेवढा विकास पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने केला. केंद्र सरकारचे कित्येक मंत्री महाघोटाळे करून कोठडीत गेले आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेला व शांत असलेला गोवा या पाच वर्षांत बेकायदा खाणी, भ्रष्टाचार, अमली पदार्थांचा राजरोस व्यवसाय यामुळे बदनाम होत आहे. तो डाग पुसून स्वच्छ व विकसित गोवा बनविण्यासाठी भाजपचे सरकार सत्तेवर आणण्याची जबाबदारी गोमंतकीय जनतेची आहे. गोमंतकीयांनी त्यासाठी निश्चय करावा असे आवाहन भाजपच्या स्टार प्रचारक व राज्यसभा खासदार हेमामालिनी यांनी केले. आके मडगाव येथे भाजपच्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर भाई नायक, अनिल होबळे, डॉ. विल्फ्रेड मिस्किता, शमर्द पै रायतुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना हेमामालिनी म्हणाल्या की, भाजप हा सभ्य व संस्कृतीचे जतन करणारा पक्ष आहे. म्हणूनच आपण भाजपमध्ये प्रवेश केला. देशाचा विकास व परिवर्तन करण्याची धमक भाजपमध्ये आहे. गुजरात, बिहार, मध्यप्रदेश, उत्तराखंड या राज्यात नेत्रदीपक प्रगती साधलेली पहावयास मिळते. अनेक कारखाने या राज्यात सुरू झाले. रोजगारीचा प्रश्न सोडविला गेला. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी व बिहारातील नितीशकुमार सरकारने क्रांती केली. उलट कॉंग्रेस सरकारच्या राज्यांत भ्रष्टाचार बोकाळल्याची टीका त्यांनी केली. महागाईने आम आदमी त्रस्त झालेला आहे. तीच दुर्दैवी स्थिती गोव्याची झालेली आहे. देशीविदेशी पर्यटक, महिलांना गुन्हेगारीपासून संरक्षण मिळत नाही. खून, दरोडे, बलात्कारांची संख्या वाढत आहे. ही शरमेची बाब आहे असे त्यांनी सांगितले.
अर्जेंटिनात रेल्वे अपघात ४९ ठार, ६०० जखमी
ब्यूनेस आयर्स या अर्जेंटिनाच्या राजधानीत रेल्वेच्या झालेल्या दुर्घटनेत किमान ४९ प्रवासी ठार तर ६०० प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वे स्टेशनच्या संरक्षक कठड्यांवर आगगाडी आदळल्यामुळे हा अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितेल. प्रती तास २६ किमी वेगाने धावणारी ही रेल्वे आठ डब्यांची होती. सकाळी साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली.
जनतेला फसवणे हाच भाजपचा धर्म : शीला दीक्षित
गोव्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास पेट्रोल अकरा रुपयांना देण्याच्या त्यांच्या आश्वासनावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. प्रत्यक्षात ते शक्य होणारच नाही, असे सांगून आश्वासने देवून जनतेला फसवणे हा भाजपचा धर्म असल्याची टीका दिल्लीच्या मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांनी काल पत्रकार परिषदेत केली.
प्रतापसिंह राणेंची शेवटची निवडणूक?
यापुढे आपण विधानसभा निवडणूक लढविणार नसून ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे पर्ये मतदारसंघाचे उमेदवार तथा सभापती प्रतापसिंह राणे यांनी प्रुडंट मीडियाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले आहे.
वेश्या व्यवसायप्रकरणी आठ जणांना अटक
हणजूण मुड्डीवाडा चिकर येथील एका हॉटेलवर हणजूण पोलिसांनी छापा टाकत वेश्या व्यवसायात गुंतलेल्या आंध्रप्रदेश येथील पाच युवतींची सुटका केली तर हॉटेल मालक व व्यवस्थापकासहीत एकूण आठ जणांना अटक केली आहे.
आयकर मर्यादा तीन लाखांपर्यंत वाढणार
गुंतवणुकीवरील करसवलतही वाढवण्याचा प्रस्ताव
आयकर सवलत मर्यादा तीन लाखांपर्यंत वाढवण्याची व गुंतवणुकीवरील करसवलत अडीच लाखांपर्यंत वाढवण्याची शिफारस प्रत्यक्ष कर कायद्याविषयक संसदीय समितीने करायचे ठरवले आहे. या समितीच्या सर्व सदस्यांमध्ये त्याबाबत एकमत झाल्याचे अर्थविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी काल सांगितले. सध्या आयकर सवलत एक लाख ऐंशी हजार रुपये आहे. ती तीन लाखांपर्यंत वाढवण्याची शिफारस समितीने केलेली असल्याचे त्यांनी सांगितले. महागाईशी झगडणार्या जनतेसाठी तो दिलासा ठरेल असे ते म्हणाले.
भ्रष्टाचार नको असेल तर...
- कॅजिटन परेरा
येत्या ३ मार्च रोजी होणारी गोवा विधानसभेची निवडणूक ही लोकशाहीची एकप्रकारे विटंबनाच म्हणावी लागेल. मालदीव बेटावर असल्यासारखी परिस्थिती सर्वच मतदारसंघांत आहे. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ज्याचा तिकिटावर हक्क असावयास हवा, त्याला बकोटीला धरून दूर ङ्गेकण्यात आले आहे आणि कधीही पक्षामध्ये आले नव्हते त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपा आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांत हा सावळागोंधळ आहे. दोन्ही पक्ष उजवे-डावे म्हणण्याच्या योग्यतेचे नाहीत. त्याच मार्गाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षही चालला आहे. भरकटलेल्या या राजकीय अवस्थेचा ङ्गायदा घेऊन गोंयकारांनी कधीही न ऐकलेले काही राजकीय पक्षही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. हिंदू-ख्रिश्चन-मुस्लीम मतदारही मिळेल त्या पक्षामध्ये धावत आहेत. पळा.. पळा.. कोण पुढे पळे तो...! अशीच अवस्था आजच्या या निवडणुकीची आहे. जी पूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत कधीही नव्हती.
दडपशाहीला फटकार
योगगुरू बाबा रामदेव यांनी गतवर्षी जूनमध्ये वाढता भ्रष्टाचार व विदेशांत भारतीयांनी दडवलेला काळा पैसा याविरुद्ध जे आंदोलन दिल्लीत पुकारले ते चिरडून टाकण्यासाठी सरकारने मध्यरात्री केलेल्या पोलिसी कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने परवा जोरदार ताशेरे ओढले. ही जबरी कारवाई अनावश्यक तर होतीच, परंतु भारतीय लोकशाहीने दिलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मूलतत्त्वांवरील तो घालाच होता, अशी सुस्पष्ट व ऐतिहासिक टिप्पणी खंडपीठाने केलेली आहे. रामदेव यांच्यासमवेत हजारो सत्याग्रही दिल्लीच्या रामलीला मैदानावरील मंडपात अत्यंत शांततापूर्ण रीतीने सहभागी झालेले असताना अचानक मध्यरात्री पोलिसांनी लाठीमार, अश्रूधुराची नळकांडी फोडून जो हाहाःकार माजवला त्याचा निषेध तर न्यायालयाने केला आहेच, शिवाय जे पोलीस या कारवाईत सामील झाले होते व ज्यांनी बळाचा अतिरिक्त वापर केला त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत. बाबा रामदेव यांचे आंदोलन कोठेही हिंसक वळणावर पोहोचले नव्हते.
रामलीला मैदानावरील लाठीचार्जप्रकरणी - पोलीस व रामदेव बाबांवर सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
दोषी पोलिसांवर कारवाईचे आदेश
गेल्या जून महिन्यात मध्यरात्री अचानकपणे लाठीचार्ज करून बाबा रामदेव यांचे उपोषण उधळून लावल्याबद्दल सरकार आणि दिल्ली पोलिसांवर काल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत टीका केली. हा लोकशाहीच्या मुळावरच हल्ला होता, असे मतही कोटाने नोंदवले. पोलिसांनी झोपलेल्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. हा अधिकारांचा गैरवापर होता. दिल्ली पोलिसांनी असे करून नागरिकांच्या मूलभूत हक्कांचीही पायमल्ली केली आहे, असे मत कोर्टाने मांडले.
दरम्यान, कारवाई वेळी भ्रष्टाचाराविरोधात रामलीला मैदानावर समर्थकांसह उपोषणास बसलेल्या बाबा रामदेव यांच्यावरही हिंसा केल्याचा ठपका कोर्टाने ठेवला. अमानुषपणे कारवाई करणार्या दिल्ली पोलिसांवर तसेच कारवाईवेळी हिंसात्मक पद्धतीने वागलेल्या रामदेव यांच्या समर्थकांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करावी, असे निर्देशही कोर्टाने दिले.
धेंपोचा साळगावकरवर झुंजार विजय
पारंपरिक प्रतिस्पर्धी साळगावकर स्पोर्टस क्लबवर ३-२ असा झुंजार विजय मिळवित धेंपो स्पोर्टस क्लबने जीएफए आयोजित किंगफिशर सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील विजयाचे पूर्ण गुण प्राप्त केले. येथील नेहरू स्टेडियमवर विद्युतझोतात रंगलेल्या या अटीतटीच्या व उत्कंठावर्धक लढतीत विजेत्या धेंपोतर्फे कोको साकिबो (१४ आणि ४४वे मिनिट) आणि रँटी माटिंन्स यानी तर साळगावकरचे दोन्ही गोल रयुजी सुओकाने (३० आणि ८९वे मिनिट) नोंदले.
दहशतवादविरोधी केंद्र राज्यांच्या अधिकारांआड
राजनाथ सिंग यांचे प्रतिपादन
यूपीए सरकारच्या राष्ट्रीय आंतकवाद विरोधी केंद्राला सर्वत्र विरोध होऊ लागला असल्याचे सांगून ते भारतीय घटनेच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. या केंद्रामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत राज्यांना असलेल्या हक्कांवर गदा येण्याची भीती भाजपचे माजी केंद्रीय मंत्री, माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.
काल सिंग यांच्या मुरगाव व कुठ्ठाळी मतदारसंघात होऊ घातलेल्या जाहीरसभांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून पुढे बोलताना ते म्हणाले की, एक तृतीयांश मुख्यमंत्र्यांनी सदर केंद्राला विरोध दर्शविला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता तर कॉंग्रेस निवडणूक आयोगाचे अधिकारही कमी करू पाहत असून लोकशाहीसाठी तो एक फार मोठा धोका ठरू शकेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण हवे
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यात पुनरूच्चार
बेकायदेशीर खाणी, प्रादेशिक आराखडा २०२१, प्राथमिक शिक्षणाचे माध्यम व भ्रष्टाचार हे प्रमुख निवडणूक मुद्दे असून निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस बेकायदेशीर खाणी बंद करण्यासाठी सरकारवर दबाव आणील, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुरेंद्र सिरसाट यांनी काल पक्षाचा जाहिरनामा प्रकाशित केल्यानंतर बोलताना सांगितले.
प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले जावे अशी पक्षाची भूमिका असल्याचे सिरसाट यांनी यावेळी स्पष्ट केले. मातृभाषेतून शिक्षण दिल्यास मुले चांगल्या प्रकारे ते आत्मसात करू शकतात असे जगभरातील तज्ज्ञांचे म्हणणे असल्याचे ते म्हणाले.
‘गोव्याचा इतिहास’ वगळण्याचे निर्देश
अभाविपकडून निषेध
गोवा सरकारच्या शिक्षण खात्याने शाळांना पाठवलेल्या एका परिपत्रकाद्वारे आठव्या इयत्तेच्या पुस्तकातून ‘गोव्याचा इतिहास’ नावाचा पाठ वगळण्यास भाग पाडल्याचे निदर्शनास आले आहे. या पाठात परशुरामाचा असलेला उल्लेख काढून टाकण्यासाठीच हा निर्णय घेतलेला आहे हे लक्षात येते, असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पत्रकात म्हटले आहे.
जेनिफर मोन्सेर्रातविरुध्द एफआयआर नोंद
शिक्षणमंत्री बाबुश मोन्सेर्रात यांच्या पत्नी व ताळगांव मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार जेनिफर मोन्सेर्रात यांनी निवडणूक आयोगाची परवानगी न घेता दोन वाहनांना (जीए ०६ डी २२२८ व जीए ०९ ई ०३३३) प्रचार कार्यासाठी वापर केल्याबद्दल त्यांच्याविरुध्द पणजी पोलीस स्थानकात एफ्आयआर नोंदवण्यात आले आहे.
सडा येथे मारहाणप्रकरणी ५ आयआरबी जवानांना अटक
जेटी सडा येथे बुधवारी रात्री स्थानिक पुरुष व महिलांना मारहाण करून धुडगूस घातल्याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी इंडियन रिझर्व बटालियनच्या पाच जवानांना अटक केली आहे.
समलिंगी संबंधांना कोर्टात विरोध
गे-सेक्सला (पुरुषांमधील समलिंगी संबंध) मान्यतेबाबत सुप्रीम कोर्टात काल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दोनदा भिन्न मते मांडण्याचा प्रयत्न झाला.आधी नैतिक मूल्यांचा हवाला देत गृहमंत्रालयाने समलिंगी संबंधांना मान्यता दिली जाऊ नये असे सांगितले मात्र नंतर समलिंगी संबंधांबाबत सरकारने अजून कोणतीच भूमिका घेतली नसल्याचे सांगितले.
आचारसंहिता आणि लोकशाही
- शंभू भाऊ बांदेकर
गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात अर्थात महाराष्ट्र राज्याचा समावेश नाही, पण त्या राज्यातील दहा महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका याच महिन्यात होत्या, त्यामुळे सांगली येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवडणूक आयोगाने रोखले. मुख्य म्हणजे ज्या दहा महापालिकांची निवडणूक होणार होती, त्यात सांगलीचा समावेश नव्हता, तसेच नाट्य संमेलन हे बिगर राजकीय स्वरूपाचे असून तेथे मुख्यमंत्री कुठलीही घोषणा करणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाला कळविण्यात आले होते, तरीही चव्हाण यांना नाट्यसंमेलनास जाण्यापासून रोखण्याची घटना घडली.
पैशाचाच खेळ
राजकारण हा पैशाचा खेळ बनला आहे आणि त्यात सर्वसामान्य माणसाला आज स्थान राहिलेले नाही या जनतेच्या धारणेला पुष्टी देणारा तपशील नॅशनल इलेक्शन वॉचने जाहीर केला आहे. सध्या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांच्या अधिकृत प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करून त्यांनी मांडलेला तपशील हे खरे तर हिमनगाचे टोक आहे. या विश्लेषणाला उमेदवारांनी घोषित केलेल्या माहितीचा आधार आहे. अघोषित गोष्टींच्या मुळाशी जायचे ठरवले तर याहून अनेकपटींनी धक्के बसल्यावाचून राहणार नाहीत. काही ठळक बाबी या विश्लेषणातून अधोरेखित होतात. पहिली गोष्ट म्हणजे धनाढ्य उमेदवारांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ. गोव्याची पहिली निवडणूक आणि सध्याची निवडणूक यात किती जमीन अस्मानाचे अंतर पडलेले आहे. भाऊसाहेबांनी गोरगरिबांमधून उमेदवार घडवले, तर आज राजकीय पक्ष पैसा पाहून उमेदवारी देऊ लागले आहेत. प्रसंगी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्याला डावलून ज्याच्या पाशी वैध - अवैध मार्गांनी आलेला प्रचंड पैसा खुळखुळतो आहे, अशांनाच उमेदवारी देण्याचे धोरणच सर्व पक्षांनी अवलंबिले स्पष्ट दिसते आहे.
९२ उमेदवार करोडपती
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी उमेदवारी दिलेल्या १२९ उमेदवारांपैकी ९२ उमेदवार करोडपती असून हे प्रमाण ७१ टक्के आहे. सन २००७ च्या निवडणुकीत ४१ टक्के उमेदवार करोडपती होते, असा निष्कर्ष असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस् या स्वयंसेवी संस्थेने उमेदवारांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करून काढला आहे. सांताक्रुझमधून निवडणूक लढवणारे दिनार तारकर हे मगोचे उमेदवार सर्वाधिक श्रीमंत उमेदवार असून त्याची संपत्ती २११ कोटी ७६ लाख आहे, तर त्या खालोखाल कुंभारजुव्याच्या अपक्ष उमेदवार निर्मला सावंत यांची संपत्ती ३६ कोटी ३० लाख रू. आहे. ज्योकीम आलेमाव यांची संपत्ती त्या खालोखाल ३१ कोटी २६ लाख रूपये आहे. या निवडणुकीला उभ्या असलेल्या व संस्थेने विश्लेषण केलेल्या १२९ उमेदवारांपैकी केवळ तीन उमेदवारांची संपत्ती पाच लाखांहून कमी आहे. १२९ पैकी २९ उमेदवारांनी आपल्यावर एक कोटी वा अधिक कर्ज असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
गोवा विधानसभेची निवडणूक पुन्हा लढवणार्या काही विद्यमान सत्ताधारी आमदारांची सांपत्तिक स्थिती सन २००७ च्या तुलनेत यावेळी बर्यापैकी सुधारल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांवरून दिसून येत आहे. या पाहणीत पुन्हा निवडणुकीला उभ्या असलेल्या आमदारांच्या संपत्तीत सरासरी पाच कोटी ३९ लाखांची वाढ दिसून आली आहे, अशी माहिती काल यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ङ्गनॅशनल इलेक्शन वॉचफतर्फे देण्यात आली.
डिचोली व्यासाश्रम मठाला भीषण आग
रू. १५ लाखाहून अधिक हानी
५ खोल्या जळून खाक, छप्परही जळाले
व्यासाश्रम मठ साष्टीवाडा बोर्डे डिचोली येथील ‘मठाला’ काल सकाळी भीषण आग लागून व त्यानंतर सिलिंडरचा स्फोट होऊन सुमारे पाच खोल्या, त्यातील सामान जळल्याने सुमारे १५ ते १७ लाखांची हानी झाली. स्थानिक नागरिक व अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे चारतास आगीशी झुंज देत आग आटोक्यात आणली.
येथील व्यासाश्रम मठात राहणार्या रमेश प्रभुगावकर व श्वेता प्रभुगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार याठिकाणी असलेल्या न्हाणी घरातील चुलीत असलेल्या विस्तवाची ठिणगी उडाल्याने आग लागली त्यानंतर तिथे असलेला सिलिंडरचा भडका उडाल्याने आग छप्पराला लागली व सगळीकडे पसरल्याने हाहाकार उडाला. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान व स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले व त्यानी चार तासानंतर आग आटोक्यात आणली.
दुरुस्ती सुरू असताना जहाजातील कचर्यात स्फोट
४ कामगार आयसीयूत
मुरगाव बंदरातील हार्बर येथील, वेस्टर्न इंडिया शिपयार्ड लिमिटेडचा यार्डातील ड्राय डॉकवरील जहाज रुपातील ‘ड्रेजर’च्या तळभागामध्ये वेल्डिंग काम सुरू असलेल्या ठिकाणी तेथील कचर्यातील स्फोटक वस्तूचा स्फोट होऊन चार कामगार जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने चिखलीच्या एस. एम. आर. सी. इस्पितळातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. भारत सरकारच्या अंतर्गत समुद्रातील कचरा साफ करणारी डीसीआय-११ हा जहाज (ड्रेजर) गेल्या चार महिन्यांपासून दुरुस्तीसाठी हार्बर येथील वेस्टर्न इंडिया शिपयार्डातील ड्राय डॉकमध्ये चढविण्यात आले आहे. यावेळी कंत्राटी कामगार जहाजाच्या तळभागामध्ये वेल्डिंगचे काम करीत होते. जहाजाच्या ज्या भागातून कचरा खेचला जात होता. त्या भागामध्ये सुमारे एक फूट लांबीची स्फोटक वस्तू होती. वेल्डिंगच्या स्पर्शामुळे एकदम या वस्तूचा स्फोट होऊन काम करणारे चार कामगार जखमी झाले.
माध्यम प्रश्नावर प्रमुख विरोधी पक्षांची सहमती
देशी भाषांतूनच प्राथमिक शिक्षणाचे समर्थन
कॉंग्रेस वगळता राज्यातील जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे या मुद्यावर भर देऊन इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान देण्याच्या सरकारच्या निर्णयास काल विरोध दर्शविला.
सैफ अली खानला अटक
नंतर जामीनावर सुटका
अनिवासी भारतीय असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील एका उद्योगपतीस मुंबईत मारहाण केल्याप्रकरणी सिने अभिनेता सैफ अली खान याला काल त्याच्या वकीलाच्या चेंबरमध्ये कोलाबा येथे अटक करण्यात आली.
कारोणा बस दुर्घटनेची जिल्हाधिकार्यांमार्फत चौकशी
कारोणा येथे बस नदीत पडून झालेल्या अपघाताची चौकशी उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांमार्फत करण्यात येणार आहे. या अपघातात बस नदीत शिरल्याने चार विद्यार्थ्यांसह सहा जणांचा मृत्यू झाला होता.
नुवे येथे युवकाचा भोसकून खून
नुवे येथे पालवीर जार्दीनमध्ये कार्निवल नृत्याच्या वेळी वाद्यवृंदाचे प्रमुख मंजित फर्नांडिस (२०) असोळणा याची अज्ञात तरुणाने पोटात सुरा खुपसून निर्घृणपणे हत्या केली. ही घटना परवा रात्री १०.३० वाजता झाली.
नेत्रदानः खरोखर एक पुनर्जन्मच
- सौ. देवकी राजेश नाईक, घोगळ, मडगाव
‘‘सुंदर मी होणार! जुनी इंद्रिये जुना पिसारा, सर्व सर्व झडणार. नव्या शक्तीचे पंख मला फुटणार, सुंदर मी होणार! मृत्यू म्हणजे वसंत माझा, मजवरती फुलणार, सौंदर्याचा ब्रह्मा तो मज सौंदर्य घडणार, सुंदर मी होणार!’’
ह्या सुंदर ओळी आहेत स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद दरेकर यांच्या. बालपणापासून अपंगत्व आल्याने त्यांना शिक्षण घेता आले नाही, पण त्यांना कविता करण्याचा छंद लहानपणापासून होता. मृत्यूच्या थोडे दिवस आधी लिहिलेल्या या त्यांच्या सर्वोत्कृष्ट कवितेत मृत्यूचे स्वागत केले आहे. मृत्यूच्या पलीकडे जाऊनही एक सुंदर जग निर्माण करता येत ही कल्पनाच किती सुंदर आहे ना? मृत्यूचे स्वागत करून मृत्यूला कवेत घेणे क्वचितच लोकांना जमते. मृत्यूनंतर ज्यांचे अवशेष दानाच्या रूपाने जेव्हा मागे ठेवले जातात त्यांचे आयुष्य खरेच सत्कारणी लागलेले असते.
कोसळता डोलारा
काही महिन्यांपूर्वी देशातील दुसरी सर्वांत मोठी विमान वाहतूक कंपनी असलेल्या आणि आता पाचव्या स्थानी फेकल्या गेलेल्या ‘किंगफिशर एअरलाइन्स’ भोवतीचे दिवाळखोरीचे ढग अधिक गडद होत चालले आहेत. घर फिरले की घरचे वासेही फिरतात असे म्हणतात, त्याप्रमाणे ‘किंगफिशर’ पुढे अनेक समस्या एका मागून एक उभ्या राहू लागल्या आहेत. खेळत्या भांडवलाची चणचण तर आहेच, परंतु त्या मागोमाग प्राप्तीकर खात्याने त्यांची बँक खाती गोठविली, सेवा कर विभागाने कारवाई सुरू केली, स्टेट बँकेने आपण दिलेले कर्ज एनपीए गृहित धरले, विमान वाहतूक प्राधिकरणाने १७५ वाहतूक परवाने रद्द केले, कंपनीच्या ६४ विमानांच्या ताफ्यापैकी जेमतेम २८ चालू आहेत. भरीस भर म्हणून वैमानिकांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. एकंदरीत विजय मल्ल्या चहुबाजूंनी पुरते घेरले गेले आहेत. ‘किंगफिशर’ ची आजवरची सारी प्रतिष्ठा आणि पत धुळीला मिळवणार्या या घडामोडींनी त्यांच्या ग्राहकवर्गालाही मनस्ताप सोसावा लागतो आहे. अचानक रद्द होणारी उड्डाणे, वेळेतील बदल यामुळे धास्तावलेला कॉर्पोरेट ग्राहक तर अन्य विमानकंपन्यांकडे वळला आहे.
कारोणा बस दुर्घटनेची न्यायालयाकडून स्वेच्छा दखल
अहवाल देण्यास सरकारला फर्मावले
शनिवारी कारोणा-हळदोणे येथील कालवी नदीत बस पडून झालेल्या भीषण अपघाताची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गांभीर्याने स्वेच्छा दखल घेतली असून गोवा सरकारच्या वाहतूक व्यवस्थापनाविषयी प्रतिज्ञापत्राद्वारे संपूर्ण अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने सरकारला दिला आहे. त्यामुळे वाहतूक खात्याचीही झोप उडाली आहे. अहवाल सादर करण्यासाठी सरकारला चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी खंडपीठाने ऍमिकस क्युरि म्हणून ऍड. सतिश सोनक यांची नियुक्ती केली आहे.
या दुर्दैवी अपघातात सहाजणांचा बळी गेला होता. या प्रकरणी बस चालकालाही पोलिसांनी अटक करून पाच दिवसांच्या रिमांडवर कोठडीत पाठविले आहे. ब्रेक निकामी झाल्यानेच वरील अपघात घडल्याचा दावा चालक करीत आहे.
गोव्याचे वैभव कॉंग्रेसच टिकवेल : विलासराव
भारत हा तरुणांचा देश असून ६० टक्के तरुण कॉंग्रेसकडे नव्या आशेने पहात असून त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याचे सामर्थ्य या पक्षात आहे. गोव्यात कॉंग्रेसने तळागाळापर्यंत विकास साधलेला असून गोव्याचे वैभव टिकवण्यासाठी कॉंग्रेस हाच एकमेव पर्याय असल्याचे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी डिचोली येथील कॉंग्रेस उमेदवार राजेश पाटणेकर यांच्या प्रचार सभेत सांगितलेे. शिरोडकर सभागृहात आयोजित या सभेला प्रचंड प्रतिसाद लाभला.
देशभरात भाजपाने अनेक घोटाळे केले. सत्तेसाठी धर्माचा व जातीचा आधार घेऊन फूट पाडली व जनमानसात विद्वेश निर्माण केला. काही काळ त्यांना सत्ता मिळाली असली तरी अशी सत्ता टिकत नाही हे जनतेने दाखवून दिले. आज कॉंग्रेसने जगात भारताला मानाचे स्थान दिलेले असून गोव्यात कामतानी स्थिर सरकार देताना चौफेर विकास साधला. पुन्हा एकदा गोव्याला नवी दिशा नवी भरारी देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व डिचोलीतून राजेश पाटणेकर यांना बहुमतांनी विजयी करावे असे आवाहन केले.
निवडणूक आयोगाकडून २३ पासून‘मतदार स्लिप्सचे’ वितरण
ओळखपत्र म्हणूनही होईल वापर
गुरुवार दि. २३ पासून राज्यातील सर्व मतदारांना मतदार स्लिप्स वितरित करण्यास सुरुवात होणार असून दि. २९ पर्यंत सर्व मतदारांना त्या वितरित केल्या जातील. निवडणूक ओळखपत्र गहाळ झाल्यास मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार स्लिप्सचा वापर करण्याची तरतूद आहे त्यामुळे मतदारांची मतदानाच्या बाबतीत कोणतीही अडचण होणार नाही, असे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
गोव्यात शंभर टक्के फोटो ओळखपत्रे वितरित केल्याने अन्य कोणताही दाखला मतदानाच्यावेळी ग्राह्य न धरण्याचे निवडणूक आयुक्तांनी जाहीर केले आहे. त्यामुळेच मतदान स्लिप ओळखपत्र म्हणून वापरण्याची मुभा ठेवली आहे, असे नावती म्हणाले.
कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात जुन्या आश्वासनांचीच पुनरावृत्ती
श्रीपाद नाईक यांची टीका
कॉंग्रेस पक्षाने २००७ सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकांपुढे जो जाहीरना’ा ठेवला होता, तोच आता प्रसिद्ध केला असल्याची टीका उत्तर गोव्याचे खासदार व ज्येष्ठ भाजप नेते श्रीपाद नाईक यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
‘जगावेगळ्या’ पुलाची कहाणी
सांत आंद्रे मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजप उमेदवार विष्णू वाघ यांनी काल पत्रकारांना एका ‘जगावेगळ्या’ पुलाची कहाणी सांगितली. संपूर्ण जगात कुठे नसेल असा एक पूल सांत आंद्रे मतदारसंघातील डोंगरी या गावी असल्याचे ते म्हणाले.
निवडणूक आयोगाचे अधिकारहिरावून घेण्याचा सरकारचा प्रयत्न
भाजप नेते अरुण जेटली यांचा आरोप
कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्याकडून उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहितेसंदर्भातील निवडणूक आयोगाचे अधिकारच काढून घेण्याचे प्रयत्न केंद्र सरकारने चालवले असून मंत्रिगटाच्या आज होणार्या बैठकीत त्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करणार्या बातम्या काल पसरल्या.
५ लाख उत्पन्नापर्यंत विवरणपत्र नको
अर्थमंत्रालयाने काल जारी केलेल्या आदेशान्वये पगारी कर्मचार्याला त्याचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रु.पर्यंत असल्यास आयकर विवरणपत्र भरण्याची गरज नाही.
सोनियांची सभा २६ ऐवजी २५ रोजी
कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मडगाव येथील नियोजित जाहीरसभा दि. २६ ऐवजी शनिवार दि. २५ रोजी होणार आहे. काही कारणास्तव गांधी यांचा गोवा भेटीचा कार्यक्रम एक दिवस आधी निश्चित करण्यात आला आहे.
निवडणूक कायद्याचा भंग; ट्रोजन डिमेलो यांना अटक - नंतर जामिनावर सुटका
साळगाव मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले ट्रोजन डिमेलो यांना काल निवडणूक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी काल अटक केली. निर्वाचन अधिकारी जयंत तारी यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
नावेली येथे फ्लॅट फोडला
कोलमरड नावेली येथील आकाश अपार्टमेंटमधील दुसर्या मजल्यावरील साविया मिरांडा हिचा भर दिवसा फ्लॅट फोडून १.५० लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. साविया मिरांडा कामानिमित्त सकाळी १० वाजता बाजारात गेल्या होत्या व ११.४५ वाजता परतल्या तेव्हा खिडकी व दरवाजाचे गज तोडून चोरी केल्याचे दिसून आले.
पक्ष कुठले? ही तर पक्ष्यांची घरटीच...!
- दिलीप बोरकर
गोवा राज्यातील चाळीस विधानसभा मतदार संघांसाठीच्या निवडणुकांचे सर्व सोपस्कार पूर्ण झालेले आहेत. राष्ट्रीय आणि स्थानिक राजकीय पक्षांनी आपआपल्या कुवतीनुसार ‘जिंकणार्या’ उमेदवारांची निवड करून अथवा ‘सौदेबाजी’ करून संबंधित मतदारसंघात त्यांची पाठवणी केली आहे. आता पक्षांची लाज राखण्यासाठी म्हणा किंवा भविष्यातील ‘कमाई’कडे नजर लावून म्हणा, उमेदवार साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून आपल्या बाजूने मते खेचण्यासाठी धडपडणार आहेत. येनकेन प्रकारेण निवडून येणे हेच एकमेव ध्येय त्यांच्या दृष्टीपंथात असल्याने त्यांच्या ‘मर्कटलीलां’कडे लक्ष देण्यात अर्थ नाही. त्यांना उमेदवारी बहाल केलेल्या पक्षांकडे त्यासाठी वक्रदृष्टीने पाहण्याचेही कारण नाही, कारण हे पक्ष नव्हेत तर, राजकारणाचा धंदा करण्यासाठी एकत्र आलेल्यांच्या टोळ्या आहेत, असे या अगोदर याच सदरात म्हटलेले होते. आता तर या सर्वच्या सर्व पक्षांचा कारभार पाहता, हे पक्ष नसून ‘पक्ष्यांची घरटी’ आहेत असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
वचनाला जागणार ना?
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि कॉंग्रेसने आपापले जाहीरनामे घोषित केले आहेत. या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे जाहीरनामे हे सर्वसामान्य नागरिकांच्या मनाला साद घालणारे आणि गृहिणींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व समाजघटकांना काही ना काही देण्याची ग्वाही देणारे आहेत यात शंका नाही. अर्थात, कागदावरील आश्वासने प्रत्यक्षात उतरवण्याची धमक सगळ्यांत असतेच असे नाही हे मतदारांना अनुभवाने पुरते ठाऊक झालेले आहेच. सरकार कोणाचे येणार व त्यात पुन्हा केवळ द्विपक्षीय युतीचे सरकार येणार की त्रिशंकू स्थितीत अपक्ष व इतर पक्षांच्या सदस्यांचा टेकू घेऊन नवे सरकार बनणार हाही प्रश्नच आहे. त्यामुळे या पक्षांच्या जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीत ‘किमान समान कार्यक्रमा’चा अडसर तर येणार नाही ना ही शंकाही मतदारांच्या मनात आहेच. पुढे काय होईल ते होईल, परंतु दोही जाहीरनाम्यांतील आश्वासने कागदावर तरी आकर्षक नक्कीच आहेत.
योगमार्ग - राजयोग (सत्य - ४२)
- डॉ. सीताकांत घाणेकर
लहानणापासून संस्कार वर्गात शिकवले जाते- ‘सत्य बोला, खोटे बोलू नका’- कारण सत्य बोलणे हे पुण्यकर्म व खोटे बोलणे म्हणजे पापकर्म. त्याप्रमाणे अनेक सत्यवादी व्यक्ती वागतात देखील. पण जगात नजर फिरवली तर अनेक वेळा, अनेक व्यक्ती खोटे बोलताना दृष्टिक्षेपात येतात. ह्या घटना विविध क्षेत्रात घडतात. काही उदाहरणे म्हणजे- राजकारण, कोर्ट, आयकर भरणे वगैरे.
स्वप्नाळू , नव्हे, स्वप्नवेडा स्वप्निल
- प्रा. रमेश सप्रे
तसा तो आमच्या शाळेत उशीराच आला. म्हणजे नववीत. पण त्यापूर्वी त्याला घेऊन त्याचे आईवडील समुपदेशनासाठी आले होते. खोलीत प्रवेश करतानाच त्याची आई गरजली, ‘हा सारखी पुस्तकं वाचत असतो. याला जरा अभ्यास करायला सांगा.’ त्यावेळीच एकूण प्रकार लक्षात आला की समस्या तो विद्यार्थी नसून मातोश्री होत्या. कारण सोबत आलेले पिताश्री थंड, शांत, खोल, गंभीर - एखाद्या डोहासारखे. तोंडातून शब्द सोडाच पण त्यांच्या चेहर्याची रेषाही हल्ली नाही. कोणतीही प्रतिक्रिया नसणं हे खरंच खूप अवघड असतं. पण या महाशयांना ते छान जमलं होतं. आईची मात्र अखंड तक्रारीच्या सुरात बडबड. मुलगा काहीसा त्रासलेला, वैतागलेला. आई जरा शांत झाल्यावर म्हटलं, ‘तुम्ही दोघं जरा बाहेर थांबलात तर मला मुलाशी बोलता येईल.’ ते गेले बाहेर अन्...
कमकुवत घटकांस मोफत वीज व पाणी
कॉंग्रेसचा जाहीरनामा घोषित; देखरेख समिती स्थापणार
काल महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर कॉंग्रेसपक्षाने आपला निवडणूक जाहीरनामा घोषित केला असून आपले सरकार सत्तेवर आल्यास मागास जाती जमाती, इतर मागास वर्गीय, वार्षिक एक लाख रुपयेपर्यंत उत्पन्न असलेल्या कमकुवत घटकांना १५० युनिट पर्यंत मोफत पाणी व वीज पुरवठा करण्याची, त्याचबरोबर राज्यातील १ लाख १० हजार दयानंद निराधार योजनेखालील लाभार्थींना दरमहा २५०० रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे.
अखिल भारतीय कॉंग्रेस सरचिटणीस तथा निवडणूक छाननी समितीचे अध्यक्ष ऑस्कर फर्नांडिस यांच्या हस्ते या जाहिरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.
घराणेशाहीच्या मुद्द्याचा पक्षावर परिणाम नाही
ऑस्कर फर्नांडिस यांना विश्वास
‘फॅमिली राज’ या मुद्द्याचा कॉंग्रेसवर कोणताही परिणाम होणार नाही, लोकशाहीत कुणालाही निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. पक्षाने गुणवत्तेनुसारच उमेदवारी दिलेली आहे, असे सांगून निवडून आणणे किंवा आपल्याला नको त्या उमेदवाराचा पराभव करणे हे मतदारांच्या हातात असल्याचे अखिल भारतीय कॉंग्रेस सरचिटणीस तथा निवडणूक छाननी समितीचे अध्यक्ष ऑस्कर फर्नांडिस यांनी काल पत्रकारांना सांगितले.
विरोधकांनी कितीही आरोप केले तरी निवडणुकीत कॉंग्रेसच सत्तेवर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीत नव्या चेहर्यांना संधी देणे हे पक्षाचे कर्तव्य ठरते, असे ते म्हणाले.
कारोणा दुर्घटनेनंतर वाहतूक खात्याला जाग
प्रत्येक बसची तपासणी करणार
कालवी नदीत शनिवारी बस पडून भीषण अपघात झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कदंब व खासगी बसेस्सह एकूण एक बसेसची तपासणी करण्याचे काम वाहतूक खात्याने हाती घेतले असून आठवडाभरात ते पूर्ण होणार असल्याची माहिती वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
बसेस्चे ब्रेक व्यवस्थित लागतात की नाही, बसेस्च्या हेडलाईट्स, साईड लाईट्स सुस्थितीत आहेत की नाहीत, बसला हॅन्डब्रेक आहे की नाही, बसच्या टायर्सची स्थिती काय आहे, बसची आसने बसण्यायोग्य आहेत की नाहीत याची योग्य प्रकारे तपासणी केली जात असल्याचे ते म्हणाले. खासगी बसेस्बरोबरच कदंबच्या बसेस्चीही तपासणी केली जात असून कदंब हे सरकारी महामंडळ आहे म्हणून त्याला सूट देता येणार नसल्याचे अरूण देसाई यांनी स्पष्ट केले.
गॅस गळतीमुळे हरमलमध्ये आग
हरमल-खालचावाडा येथील अलिशा रेस्टॉरंटच्या मालकीच्या दोन झोपड्या सोमवार दि. २० रोजी सकाळी १०च्या दरम्यान गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून अंदाजे ७ लाख ५० हजारांचे नुकसान झाले. पेडणे अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी पोचल्याने मोठी दुर्घटना टळली.
विलासराव देशमुखांची आज डिचोलीत सभा
डिचोली मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार राजेश पाटणेकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांची आज मंगळवारी सायंकाळी ५.३० वा. येथील शिरोडकर सभागृहात जाहीर सभा होणार आहे.
गणवेषातील पोलिसांसोबत प्रचार केल्याची तक्रार
सभापती प्रतापसिंह राणे व शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेर्रात प्रचारासाठी खाकी गणवेषातील बंदुकधारी पोलिसांना सोबत घेऊन फिरत असल्याने मतदारांवर परिणाम होत असल्याची तक्रार प्रदेश भाजपने मुख्य निवडणूक अधिकार्यांकडे केली आहे.
आणखी ‘किंगफिशर’ उड्डाणे रद्द; सरकारचा मदतीस नकार
किंगफिशर एअरलाईन्सला काल सलग तिसर्या दिवशी आपली ३५ विमाने रद्द करणे भाग पडले. सरकारनेही कंपनीला आर्थिक मदतीची हमी देण्यास नकार दिला असून वरून विमाने रद्द का केली याचे स्पष्टीकरण देण्यास फर्मावले आहे.
निवडणूक सुरक्षेसाठी प्रथमच छात्रसैनिकही
होऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मतदानाच्या दिवशी अभूतपूर्व अशी सुरक्षा व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी दिली.
गोवेकर याचा विचार करणार आहेत का?
- डॉ. वासुदेव राजेंद्र देशप्रभू, पेडणे.
सध्या सार्वजनिक लेखा समितीच्या विरोधी पक्ष नेत्यांनी तयार केलेल्या अहवालाबद्दल, तसेच न्या. शहा आयोगाच्या अहवालाबद्दल अंदाज बांधले जात आहेत. आम आदमीने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेण्याची वेळ आली आहे हे निश्चित.
मातृभाषेची हाक
जगभरामध्ये आज जागतिक मातृभाषा दिन साजरा होत आहे. एकीकडे नवनव्या तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होऊन इंग्रजी भाषा जगातील सर्व भाषांवर कमी अधिक प्रमाणात हल्ला चढवीत सुसाट निघाली असताना आपापल्या मातृभाषांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संदेश देण्यासाठी हा दिवस युनेस्कोच्या प्रेरणेने गेले एक तप साजरा केला जातो आहे. मातृभाषांपुढील आव्हाने अनेकपदरी आहेत. अगदी शिक्षणापासून प्रशासनापर्यंत आणि न्यायपालिकेपासून नव्या तंत्रज्ञानांपर्यंत सर्वत्र देशी भाषांना जेवढे महत्त्व दिले गेले पाहिजे तेवढे दिले जात नाही आणि भारतासारख्या वसाहतवादी परंपरा अजूनही मिरवण्यात धन्यता मानणार्या देशामध्ये तर परिस्थिती अधिक वाईट आहे. स्वभाषाभिमानाच्या पोकळ गर्जना आणि भाषा संवर्धनाच्या पोकळ वल्गना करणे वेगळे आणि प्रत्यक्ष जीवनव्यवहारामध्ये या भाषांना सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष समरांगणावर लढणे वेगळे. दुर्दैवाने आपल्याकडील नेतेबाजीच्या परंपरेने यातील पहिल्या गोष्टीतच आपला वेळ खर्ची घातला आहे. देशी भाषांना जीवनव्यवहारामध्ये महत्त्वाचे स्थान देण्याची मोहीम ज्या नेटाने आणि ताकदीने उभारली गेली पाहिजे होती, ते कधी घडलेच नाही. हिंदी भाषा सप्ताह साजरे करण्यापुरते आपले राष्ट्रभाषाप्रेम सीमित असते आणि मातृभाषेचे म्हणाल तर त्यांच्याकडे लक्ष द्यायलाही कोणाला वेळ नाही.
शंभर दिवसांत लोकायुक्त
देशी भाषांतील शाळांनाच अनुदान
भाजपचा जाहीरनामा घोषित
जनसंपर्क यात्रेच्या माध्यमातून जनतेकडून आलेल्या सूचना विचारात घेऊन पक्षाने तयार केलेल्या जाहीरनाम्यातील सर्व योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करून ढासळलेले राज्याच्या प्रशासनाची पुनर्स्थापना करण्याची घोषणा भाजपचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते रवीशंकर प्रसाद व विरोधी नेते मनोहर पर्रीकर यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली. रवीशंकर प्रसाद यांच्या हस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.
आपले सरकार सत्तेवर आल्यास प्रादेशिक भाषांतील प्राथमिक शाळांनाच अनुदान दिले जाईल. त्याचबरोबर इंग्रजीतून शिकणार्या विद्यार्थ्यांचीही योग्य पध्दतीने सोय करून शिक्षण माध्यमाच्या प्रश्नावर निर्माण झालेल्या घोळावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन विरोधी नेत्यांनी दिले. मगो-भाजप युतीचा किमान समान कार्यक्रम तयार करण्याचे काम चालू असून तो लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. युतीचे सरकार सत्तेवर आल्यास तीन वर्षांच्या आत गोवा प्लास्टिक मुक्त करण्याची घोषणा त्यांनी केली.
मुळगाव येथे आगीत ३० दुचाकी, हजारभर टायर भस्मसात
मुळगाव येथे काल दुपारी एका सर्व्हिसग सेंटर तथा गॅरेजला भीषण आग लागून त्यातील सुमारे ३० दुचाकी वाहने सुमारे एक हजार टायर व स्पेअर पार्टस जळून बेचिराख झाल्याने व सुमारे १५ ते १६ लाखांची हानी झाली आहे.
मुळगांव हमरस्त्यालगत असलेल्या महेश ऑटो गॅरेजला ही भीषण आग दुपारी लागली. शॉर्ट सक्रीटमुळे आग लागल्याचे समजते. आग लागली त्यावेळी गॅरेजचा मालक महेश धामोणे हा दुचाकी दुरुस्त करत होता. आतल्या बाजुला सुमारे ३० दुचाकी ठेवण्यात आल्या होत्या. या आगीत या दुचाकीतील पेट्रोल टाक्यांचा स्फोट झाल्याने भडका उडाला व काही क्षणात पूर्ण गॅरेज जळून खाक झाली. त्यातील सर्व सामानही खाक झाले.
प्रियलवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
शनिवारी हळदोणा येथील कालवी नदीत बस पडून झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्या नास्नोळा-तळ्याजवळ राहणार्या प्रियल प्रकाश साळगावकर या १० वर्षीय हळदोणे येथील सेंट थॉमस शाळेत इयत्ता चौथीत शिकणार्या शाळकरी मुलीच्या मृतदेहावर नास्नोळा स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले.
अपघातात मरण पावलेल्या कालवी येथील तीन मुली व जोसेफीन डायस (५८) व दयानंद होबळे (५५) यांचे मृतदेह शवचिकित्सेनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. कालवी येथील चार मृतांवर आज सोमवार दि. २० रोजी संध्याकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रियल प्रकाश साळगांवकर या मुलीचा मृतदेह आज दुपारी ११.४५व्या दरम्यान घरी आणल्यावर मृतदेह पाहून तिच्या आईने व आजीने आक्रोश केला.
सोनियांची २६ रोजी मडगावात सभा
सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन कॉंग्रेसने सासष्टीवरच अधिक भर देण्याचे ठरविले असून कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची रविवार दि. २६ रोजी मडगांव येथे जाहीर सभा आयोजित केली आहे.
इटलीच्या नौदल रक्षकांवर खुनाचा गुन्हा
केरळच्या मच्छीमारांवर गोळीबार प्रकरण
केरळ येथील समुद्रात भारतीय मच्छीमारांवर गोळीबार करून दोघांना ठार केल्याप्रकरणी इटलीच्या जहाजावरील त्या देशाच्या दोन नौदल रक्षकांना किनार्यावर आणून अटक करण्यात आली. नंतर त्यांना सीआयएसएफच्या गेस्ट हाऊसवर जबानीसाठी नेण्यात आले. जहाजाच्या सुरक्षेची जबाबदारी असणार्या सहा जणांच्या पथकापैकी हे दोघे आहेत. या दोघांना काल सकाळी ८ वा.पर्यंत शरण येण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी टाळाटाळ केल्यानंतर त्यांना भारतीय अधिकार्यांकडून ताब्यात घेण्यात आले व नंतर केरळ पोलिसांनी त्यांना अटक केली.
कारोणा येथे शाळकरी मुलांसह बस बुडाली
६ मृतदेह सापडले
शोधकार्य सुरूच
परिसरावर शोककळा
राज्यात एकीकडे कार्निव्हलचे उत्साही वातावरण असतानाच काल दुपारी कारोणा - हळदोणे येथे शाळकरी मुलांना घेऊन आलेली एक बस फेरीबोट धक्क्यावरून थेट नदीत कोसळून चार विद्यार्थिनींसह सहाजणांचा बळी गेला. बसचालक व वाहकाने मात्र उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. या दुर्घटनेने संपूर्ण गोव्यात शोककळा पसरली असून कार्निव्हलची पणजीतील मिरवणूकही रद्द करण्यात आली.
हळदोण्याच्या सेंट थॉमस गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी या बसमध्ये होत्या. प्रियल प्रकाश साळगावकर (१०, तळ्याकडे-नास्नोडा), डायना क्रिस डायस (८, कालवी), ऍलिना डायस (१३, कालवी) व नायजेल ग्रासियस (१०) या विद्यार्थिनींचे मृतदेह नंतर आढळून आले. जोसेफिना साल्वादोर डायस (५८, कालवी), दयानंद जनार्दन होबळे (५५, मये) यांचे मृतदेहही पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत. अंधार पडेपर्यंत पाण्यात शोधमोहीम सुरू होती. आज रविवारी पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात येणार आहे. एक बालिका व एक महिला अद्याप पाण्याखाली असल्याचा संशय व्यक्त केला जात असून शोधमोहीम सुरू ठेवली गेली आहे. बस चालक राजेश चंद्रकांत नाईक (खोर्जुवे) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पूल असता तर दुर्घटना घडली नसती
स्थानिक नागरिकांत उपेक्षेबाबत संताप
कारोणा येथे काल झालेल्या बस अपघाताबाबत स्थानिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारच्या निष्काळजीपणामुळेच तसेच या नदीवरील पुलाबाबत जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामुळेच हा प्रसंग ओढवल्याचे सांगितले. कालवी-कारोणा पूल झाला असता ही दुर्घटना घडलीच नसती, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
घटनास्थळी मदतकार्याकरिता योग्य ती यंत्रणा वेळेत न पोहोचल्याने तसेच संबंधित खात्यात एकवाक्यता नसल्याने मदतकार्याअभावी चिमुकल्यांचा व इतरांचा नाहक बळी गेला. योग्य प्रशिक्षणाअभावी घेतलेल्या जवानांकडून पाण्यात उतरण्याकरिता संकोच तसेच त्यांच्यात भीती दिसत होती अशी प्रतिक्रिया कालवी येथील रीना मास्कारेन्हस यांनी व्यक्त केली. सदर अपघात चालकाच्या चुकीमुळे घडला तसेच एकतर बस जुनी असावी किंवा चालक नवीन असावा असे सांगून जर बस जुनी असेल तर ती मार्गावर परवाना देणारे वाहतूक खाते दोषी आहे असे हळदोण्याचे ग्रेगरी डिसोझा यांनी सांगितले.
गोवा ‘फॅमिली राज’ चा उंबरठा ओलांडणार की...?
- रमेश सावईकर
गोवा राज्य विधानसभेची निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. ४० मतदारसंघातून २१५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले असून आपले राजकीय नशिब ते अजमावित आहेत. ३ मार्च रोजी होणारी ही निवडणूक लोकशाहीचा विचार करता, ऐतिहासिक ठरायला हवी. तथापि, ती तशी ठरेल असे कोणी छातीठोकपणे सांगू शकणार नाही. गोव्यात ‘राजकीय परिवर्तन’ झाल्याशिवाय लोकशाही राज्य खर्या अर्थाने येण्याची शक्यता नाही. हे परिवर्तन कोण घडवणार? मतदारराजा की त्याच्या सहाय्याला आणखी कोण आहे? असा यक्षप्रश्न उभा राहतो.
गरज विश्वासाची
दहशतवादाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्र स्थापन करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तीव्र विरोध दर्शवून खीळ घातली आहे. केंद्र सरकारने या यंत्रणेची उभारणी करण्याचा घाट घालताना राज्य सरकारांना विश्वासात घेतलेले नाही आणि या प्रस्तावित केंद्राला दिलेले दिलेले थेट छापा टाकण्यापासून अटक करण्यापर्यंतचे अधिकार हा राज्यांच्या अधिकारांवरील घाला आहे असे दोन प्रमुख आक्षेप या मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत. विरोध करणारे मुख्यमंत्री केवळ विरोधी पक्षांचेच नाहीत, तर संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटक पक्ष असलेल्या तृणमूल कॉंग्रेसनेही विरोधकांच्या सुरांत सूर मिळवलेला आहे, किंबहुना विरोध करण्यात ममता बॅनर्जीच सर्वांत आघाडीवर आहेत. पश्चिम बंगालमधील केंद्राच्या उद्घाटनालाही त्या काल अनुपस्थित राहिल्या. या सार्या विवादाचे मूळ केंद्र सरकार दाखवीत असलेल्या हुकूमशाही वृत्तीत आहे.
मतदारांच्या मानसिकतेत घराणेशाहीचे मूळ!
- प्रमोद आचार्य
काही दिवसांपूर्वी एका वरिष्ठ कॉंग्रेस पुढार्याला भेटलो. कॉंग्रेसने तिकिटे जाहीर केल्यावर सगळीकडे घराणेशाहीच्या नावाने आरडाओरड चालू होती. पक्ष प्रत्येक दबावाला आणि प्रत्येक घराण्यापुढे वाकला अशी कडवी टीका होत होती. अशावेळी कॉंग्रेसचे हे केंद्रीय नेते मला भेटले.
विशेष संपादकीय - पुन्हा वैरीण झाली नदी ...
कालवी - हळदोणे येथे काल घडलेली बस दुर्घटना ही निव्वळ दुर्घटना नाही, तर ती मानवी निष्काळजीपणाची, बेफिकिरीची आणि गोव्यातील अत्यंत भ्रष्ट वाहतूक व्यवस्थेची परिणती आहे. प्रवाशांनी भरलेली एखादी बस सरळ फेरीधक्क्यावरून नदीत जाऊन कोसळते यामध्ये जशी चालकाची हलगर्जी दिसते, तसेच बसच्या सुस्थितीबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहते. बसचे ब्रेक लागले नाहीत हे कारण पुढे करून या दुर्घटनेवर आता पडदा टाकण्याचा प्रयत्न होईल. दुर्घटनेस जबाबदार असलेला चालक न्यायालयात पुराव्यांअभावी सुटेल, मालक भरपाईपासूनही स्वतःची सुटका करून घेईल, पण बळी गेलेली कोवळी मुले काही परत येणार नाहीत. कित्येक कुटुंबांचा आशेचा दिवा कायमचा विझून गेला आहे. त्या मुलांचे पालक या जिवघेण्या दुःखातून कधीही सावरणे शक्य नाही. बुडालेल्या मुलांची शोधाशोध करताना सापडलेल्या त्यांच्या भिजल्या वह्या पाहून अवघ्या गोव्याचे डोळे काल पाणावले असतील. कोणताही दोष नसताना निष्पाप कोवळ्या शाळकरी मुलांना जिवंत जलसमाधी मिळाली, पुरेशा साधनसामुग्रीविना कोणीही त्यांना वाचवू शकले नाही, हे वास्तव ह्रदय पिळवटून टाकणारे आहे. भ्रष्ट वाहतूक अधिकार्यांच्या कृपेने मोडकळीस आलेल्या बसगाड्या राजरोस रस्त्यावर चालविल्या जातात, खुलेआम लाच घेऊन चालक - वाहकांना रान मोकळे सोडले जाते, त्याचीच अशा प्रकारच्या दुर्घटना ही परिणती असते.
गिरवा शिवरायांचा आदर्श
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
राजा असूनही लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाही पद्धतीने निवडून येऊन राजासारखे वागणारे आजचे राजकारणी यांच्यामधील तुलना करणे हा फार मोठा चिंतनाचा अन् चिंतेचा विषय आहे. शुद्ध, पवित्र हेतूने प्रेरित होऊन केलेले, ईश्वरी अधिष्ठान असलेले, धर्माचे अधिष्ठान असलेले कोणतेही कार्य हे चिरंजीवी स्वरूपाचे असते, आणि अशी कार्ये करणारेही चिरंजीवी ठरतात. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती महाराज होय! अलेक्झांडर, सीझर, नेपोलियन असे अनेक पराक्रमी, शूरवीर जगात होऊन गेले. परंतु, पवित्र तथा शुद्ध हेतूने कार्य करणारा राजा म्हणून संपूर्ण जगाला परिचित आहेत ते फक्त एकटे शिवाजी महाराजच! अलेक्झांडरने आपल्या सोबत्यांना मारले. सीझरने आपल्या बायकोला सोडले, तर नेपोलियनने डफ डांगियांचा वध केल्याचे इतिहास सांगतो. परंतु आप्तेष्टांचा घात शिवाजी महाराजांनी कधीच केला नाही. राज्याची शिस्त म्हणून काही कठोर निर्णय शिवाजी महाराजांनी अवश्य घेतले, परंतु आपल्या स्वार्थासाठी त्यांनी राजेपदाचा उपयोग केल्याचे उदाहरण इतिहासात सापडत नाही. आजच्या राजकारणात सगळं स्वार्थासाठी चालू असल्याचे आपणास ठायी ठायी दृष्टीस पडते.
कुणकेश्वराचा महाशिवरात्रौत्सव
- लाडोजी परब
कणकेश्वर म्हणजे प्रती काशिच! शिवाचे जागृत स्थान असलेल्या कुणकेश्वराच्या पायावर अरबी समुद्रही नतमस्तक झाला आहे. महाशिवरात्रीचा येथील उत्सव म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा! प्रत्येक दिवशी ११० हून अधिक असलेल्या शिवलिंगावर अभिषेक सुरू असतो. भाविकांचा अपार उत्साह आणि श्रद्धेचा हा दिव्य उत्सव कोकणची एक वेगळी ओळख सांगून जातो. कुणकेश्वराचे मंदिर हे भव्यता, शिल्पकला यांचा अनोखा संगम आहे. आपल्या देशात शिल्पकला, स्थापत्यशास्त्र व विज्ञान कसे बहराला आले त्याचे साक्ष देणारे हे मंदिर!
मुंबई महापालिका पुन्हा शिवसेना-भाजपकडे
देशाची आर्थिक राजधानी मानली जाणार्या सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजप-रिपब्लिकन पार्टीच्या महायुतीने झेंडा फडकवला.
गेल्या १७ वर्षांपासून मुंबई महापालिका शिवसेना-भाजपकडे आहे. शेजारील प्रतिष्ठेच्या ठाणे महापालिकेवरील सत्ताही शिवसेना-भाजपने राखण्यात यश मिळविले आहे. काल राज्यातील १० महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले.
मुंबईत महायुतीपैकी शिवसेनेला ७६. भाजपला ३२, रिपाईला १ जागा मिळाली होती. कॉंग्रेसला ५०तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला १४ जागा व इतरांना २७ जागा प्राप्त झाल्या आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे प्राबल्य २००७च्या तुलनेत चौपट वाढले असून त्यांना २८ जागा मिळाल्या आहेत.
‘सत्तेसाठी कॉंग्रेसला मगोची गरज नसेल’
यावेळी कॉंग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी मगो आमदारांची गरज भासणार नाही. परंतु त्यांनी स्वतःहून पाठिंबा दिल्यास तो नाकारणार नाही. कारण गेली पांच वर्षे मगो कॉंग्रेसबरोबर सरकारात होते, असे प्रदेश कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष फ्रान्सिस सार्दिन यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या आपण संपर्कात असून प्रत्येक जण विजय मिळविण्यासाठी घोडदौड करीत आहे. किमान २२ ते २३ उमेदवार कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीला मिळेल, असा विश्वास सार्दिन यांनी व्यक्त केला. काही अपक्षांना मागे काढण्यास पक्ष यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीस अटक
खोडगीणी बाराजण सुर्ल येथील किशोर माईणकर आमोणकर (३६) या इसमाने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, पत्नीने मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याची पत्नी कल्पना माईणकर हिला भा.दं.स. ३०६ कलमाखाली अटक केली आहे. याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता असून हा घातपाताचा संशय असल्याची तक्रार विजय माईणकर यांनी पोलिसांत नोंदविली आहे.
डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी किशोर व त्याची पत्नी कल्पना यांच्यात वादावादी झाली होती. त्यानंतर कल्पना दागिने घेऊन ती शिरगावला आपल्या माहेरी आली.
दहशतवादविरोधी केंद्रास सात मुख्यमंत्र्यांकडून विरोध
नॅशनल काऊंटर टेररिझम सेंटर (एनसीटीसी) स्थापन करण्यासाठी हे दहशतवादविरोधी केंद्र राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणारे असल्याचे सांगत सात मुख्यमंत्र्यांनी विरोध दर्शविला आहे. यामुळे यूपीए आघाडीसमोर नवीन पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
‘युनायटेड पोर्वोरकर’चा भाजपला पाठिंबा
पर्वरीच्या विकासासाठी विविध राजकीय पक्ष, संघटना व पंच सदस्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘युनायटेड पोर्वोरकार’ या संघटनेने दि. ३ मार्च रोजी होणार्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार गोविंद पर्वतकर यांना पाठिंबा व्यक्त केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रसाद फातर्पेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
५ लाख रु.पर्यंत आयकर माफ करण्याची मागणी
डायरेक्ट टॅक्स कोड (डीटीसी) संबंधी संसदीय समितीतील काही सदस्यांनी आयकर सुट मर्यादा ५ लाख रु.पर्यंत वाढविण्याची काल मागणी केली.
खेमलो सावंत यांचा साखळीत भाजपला पाठिंबा
साखळी मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज भरून डॉ. प्रमोद सावंत आणि आमदार प्रताप गावस यांच्यासमोर आव्हान उभे केलेले आमोणे येथील उद्योजक तथा कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व क्रियाशील कार्यकर्ते खेमलो सावंत यांनी उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणी मागे घेऊन आपला पूर्ण पाठिंबा भाजपचे उमेदवार डॉ. प्रमोद सावंत यांना जाहीर केला आहे.
अ. भा. कोकणी परिषदेस मुंबईत प्रारंभ
शणै गोंयबाबनगर, मुंबई (अजित पैंगीणकर)
आमी गोंयकार मुंबई आणि अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या २८ व्या अधिवेशनाला शानदार सुरुवात झाली. शिवाजी पार्क येथील वीर स्वातंत्र्यवीर सभागृहात भरविण्यात आलेल्या या तीन दिवसांच्या कोकणी साहित्य परिषदेचे उद्घाटन आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचे प्रकाशक आणि अध्यक्ष रामदास भटकळ यांनी केले. निवृत्त आयएएस अधिकारी अरविंद भाटीकर परिषदेचे अध्यक्ष आहेत.
राजकारण्यांचा निगरगट्टपणा चिंताजनक : दिलीप प्रभावळकर
(विशांत वझे)
देशपातळीवर राजकीय व सामाजिक परिस्थिती अतिशय निराशजनक असून एकूणच राजकीय नेत्यांना कोणत्याही प्रकारची संवेदना नाही. संवेदना नसलेले राजकारणी व त्यांच्यात जो एक प्रकारचा निगरगट्टपणा आहे तो खूपच त्रासदायक असून एकूणच संवेदना या राजकीय व्यवस्थेत हरवलेली आहे त्यांचे दुःख होत असल्याची प्रतिक्रिया ख्यातनाम अभिनेते व राष्ट्रीय पातळीवरील सारस्वत बँकेचे ब्रॅन्ड ऍम्बॅसेडर दिलीप प्रभावळकर यांनी डिचोली येथे व्यक्त केली.
शिवबा ते लोकराजा : एका महापुरुषाचा महाप्रवास
- शंभू भाऊ बांदेकर
कृष्णाजी अनंत सभासद यांनी तीनशे वर्षांपूर्वी ‘श्री शिवछत्रपतींचे चरित्र’ हे शिवाजी महाराजांवर लिहिलेले पहिले चरित्रात्मक पुस्तक होय. या पुस्तकातील परिशिष्ट -२ मध्ये म्हटले आहे की, परवापरवापर्यंत ६ एप्रिल १६२७ हीच शिवाजी महाराजांची जन्मतारीख प्रमाण मानली जात होती. पण सर्व नव्या पुराव्यांच्या आधारे आता शिवाजी महाराजांची जन्मतिथी फाल्गून वद्य ३ शके १५५१ हीच निश्चित करण्यात आली असून दिनांकाप्रमाणे ही १९ फेब्रुवारी १६३० ही ठरते. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना अजूनही तारखेबाबत घोळ निर्माण केला जातो, म्हणून हा खुलासा. ज्या महाराष्ट्र राज्यात शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्या महाराष्ट्रानेही १९ फेब्रुवारी हीच जन्मतारीख पूर्ण अभ्यासाअंती निश्चित केल्यामुळे निदान यापुढे तरी हा घोळ होऊ नये हीच अपेक्षा.
जनतेचा कौल
महाराष्ट्रातील महापालिका निवडणूक निकालांमध्ये काल शिवसेना - भाजप - रिपाई महायुतीने मुंबई, ठाणे, नागपूरसारख्या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आपली ताकद अधोरेखित केली. मुंबईमध्ये काय होणार, राज ठाकरे यांच्या मनसेचा वारू महायुतीमध्ये किती खिंडार पाडणार आणि त्याच्या आधारे कॉंग्रेस - राष्ट्रवादी युती सत्तेचा गड सर करणार का, असा जो प्रश्न विचारला जात होता, त्याचे उत्तर नकारार्थी देत शिवसेनेने आपल्या मुंबईवर पुन्हा भगवा फडकवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. ‘अँटी इन्कम्बन्सी’ ची लाट येईल आणि त्यात शिवसेना वाहून जाईल अशी स्वप्ने पाहणार्यांची निवडणूक निकालाने बोलती बंद केली आहे. ठाण्यात खासदार आनंद परांजपे यांची निवडणुकीच्या तोंडावरची बंडखोरी सोसूनही शिवसेनेने तेथील महापलिका काबीज केली. बाळासाहेबांच्या ठाणेकरांप्रतीच्या विश्वासाला मतदारांनी सार्थ ठरवले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची लाज नागपूरने राखली आहे. पुण्यात परिस्थिती वेगळी असली तरी इतरत्र मिळालेले यश सेना - भाजप - रिपाई महायुतीचा आत्मविश्वास वाढवणारे ठरेल यात शंका नाही.
विधानसभेच्या ४० जागांसाठी २१५ उमेदवार रिंगणात
साखळी, पर्ये, मडकई व कुडचड्यात सरळ लढत
सर्वाधिक ११ उमेदवार वास्को मतदारसंघात
शेवटच्या दिवशी ४० अर्ज मागे; ७४ अपक्ष रिंगणात
गोवा विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी ४० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ४० जागांसाठी २१५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. विशेष म्हणजे अपक्षांनी उमेदवारी मागे घेतल्याने साखळी आणि कुडचडे मतदारसंघातही पर्ये व मडकईप्रमाणेच सरळ लढत होणार आहे. सर्वाधिक म्हणजे ११ उमेदवार वास्को मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत, तर त्या पाठोपाठ साळगावमध्ये १०, पेडण्यात ९, फातोर्डा, कुंकळ्ळी व सांताक्रुझमध्ये प्रत्येकी ८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. २१५ उमेदवारांपैकी ७४ उमेदवार अपक्ष असून त्यात ७२ पुरुष उमेदवार, तर केवळ दोन महिला उमेदवारांचा समावेश आहे. एकूण २१५ उमेदवारांमध्ये केवळ ९ महिला आहेत. उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाल्याने आजपासून प्रचाराला रंग भरणार आहे.
मडकईमध्ये मगोचे नेते व माजी वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांना गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांचे आव्हान असून पर्येमध्ये सभापती प्रतापसिंह राणे यांच्या विरोधात विश्वजित कृष्णराव राणे उभे आहेत.
आपल्याविरोधात कॉंग्रेस नेत्यांचा वावर : चर्चिल
नावेली मतदारसंघातून आपल्या व बाणावली मतदारसंघात आपली कन्या वालंका आलेमांव हिच्याविरुद्ध कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते वावरत असल्याचा आरोप कॉंग्रेस उमेदवार चर्चिल आलेमांव यांनी केला.
माजी मंत्री लुइझिन फालेरो लोकांना बोलावून बैठका घेत आहेत मात्र दोन्ही जिल्हा पंचायत सदस्य व चारही सरपंच आपल्याबरोबर असताना आपला कोणीच पाडाव करू शकणार नाही, असा विश्वासही आलेमाव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
घर फोडायला आलेली टोळी पोलिसांच्या कचाट्यात
पर्वरी परिसरातील एका बंगल्यात चोरी करण्याच्या इराद्याने आलेल्या एका टोळीला ताब्यात घेण्यास पर्वरी पोलिसांना यश आले आहे. दि. १५ रोजी पर्वरीतील ग्रीन व्हॅली परिसरातील बंगल्यात हे चोरटे आले होते मात्र शेजार्याने दाखविलेल्या धाडसामुळे त्यांचा इरादा उघड झाला व ते सापडले.
बंगल्यातील रहिवासी हरविन फुर्तादो दांपत्य सकाळीच निघून गेले होते. दोघेही महाविद्यालयात व्याख्याते असल्याने त्यांना घरी यायला उशीर होतो. दरम्यान, दुपारी २ वा. सुमारास संशयित आरोपी सोनी सिंग (हरयाणा), नूर महमद अब्दुल हमीद (दिल्ली), नौशाद ताहीर छत्री (उत्तर प्रदेश) फुर्तादो यांच्या बंगल्याच्या कुंपणात चोरीच्या उद्देशाने घुसले. आपल्याकडील पोलादी हत्याराने त्यांनी बंगल्याचे मुख्य प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी फुर्तादो यांचे शेजारी एल्वीस कुतिन्हो यांना चाहूल लागताच ते धाडसाने पुढे सरसावले व सोनी सिंग यास घट्ट पकडून ठेवले. इतरजण मात्र पळून गेले.
मायनॉरिटी फ्रंटची मिकीशी युती
मिकी पाशेको यांच्या गोवा विकास पार्टीबरोबर आपण निवडणूकपूर्व युती केली असल्याची माहिती काल ऑल इंडिया मायनॉरिटी फ्रंटचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एम. असिफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कै. काकासाहेब गाडगीळ : उक्ती आणि कृतीतले अद्वैत
- दीपक विष्णू फडके, आंबेगाळ, पाळी
स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर भारताच्या जडणघडणीत अगणित संख्येने महाराष्ट्रातील नेत्यांचे योगदान राहिले आहे. टिळक, गोखले, फडके, सावरकर यांच्या युगाने भारतात स्वातंत्र्याची ज्योत पेटविली. त्या युगाचे साक्षीदार व त्यानंतरच्या स्वातंत्र्य भारताच्या मंत्रिमंडळातील हर टप्प्यावरील सहकारी म्हणजे देशाचे पहिले वीजमंत्री काकासाहेब गाडगीळ, पहिले सभापती कै. गणेश वासुदेव तथा दादासाहेब मावळंगकर, देशाच्या नियोजन आयोगाचे मार्गदर्शक डॉ. धनंजयराव गाडगीळ, राजकीय निपुण स. का. पाटील...! अशा या अस्सल मराठी फौजेत कै. नरहर विष्णु गाडगीळ ऊर्फ काकासाहेब गाडगीळ यांचे स्थान काही वेगळेच होते.
आता भिस्त मतदारावर
गोवा विधानसभेच्या चाळीस जागांवर नजर ठेवून रणमैदानात उतरलेल्यांपैकी कितीजण प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात राहिले आहेत हे काल स्पष्ट झाले. जर - तर ची भाषा संपून आता प्रत्यक्ष कोण कोणाचा सामना करणार आहे ते सुस्पष्ट झाले आहे. त्यामुळे मतदारांना आपापल्या मतदारसंघातील उमेदवारांच्या भल्या - बुर्या बाजू चाचपण्यासाठी पुरेसा अवधी मिळायला हरकत नसावी. गोव्याचे राजकारण नैतिकता आणि प्रामाणिकपणा या बाबतीत किती ढासळत चालले आहे हे प्रत्येक मतदाराला पुरते ठाऊक आहे आणि तरीही दरवेळी निवडणूक आली की जाती-पातीच्या निकषांवर, आमिषा - प्रलोभनांना भुलून मतदार मतदान करीत असतात आणि मग मात्र अमूक भ्रष्टाचारी आहे, तमूक अकार्यक्षम आहे म्हणून खडे फोडत बसण्यावाचून त्यांच्या हाती काही राहात नाही. गोव्याची गेल्या काही वर्षांमध्ये कशी दुर्गती चालली आहे याचे प्रत्यक्ष साक्षीदार असूनही मतदार आपला मताधिकार बजावताना प्रत्यक्ष मतदानावेळी सारे काही विसरून क्षुल्लक वैयक्तिक लाभापोटी मतदान करू लागले तर ज्यांची पात्रता नाही अशी माणसे सत्तेच्या शिड्या चढत जाणारच. कोणी आपल्याला वापरून घेते आहे का, आपल्याला प्रलोभने दाखवीत स्वतःचा स्वार्थ साधते आहे का, याचा थोडा अंतर्मुख होऊन विचार मतदार करू लागला, तरच नंतर जो काही तमाशा घडतो तो टळू शकेल.
उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
पर्ये व मडकईत सरळ लढत होणार; इतरत्र नजरा अपक्षांकडे
गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून त्यानंतरच एकंदर चित्र स्पष्ट होणार आहे.
कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीपैकी कॉंग्रेसने ३३ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत, तर सात जागा राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी सोडल्या आहेत. भाजपा - मगो युतीपैकी भाजपाने २८ जागांवर स्वतःचे उमेदवार उभे केले आहेत, तर सहा जागांवर मगोने आपले उमेदवार उभे केले आहेत. उर्वरित मतदारसंघांमध्ये अपक्षांना पाठिंबा देण्याचे धोरण भाजपा - मगो युतीने स्वीकारले आहे.
बंडखोरांची माघार पक्षाला यश देईल
सार्दिन यांना विश्वास
कॉंग्रेस विरोधात विविध मतदारसंघांतून बंडखोरी करण्यास पुढे सरसावलेले बंडखोर एक-एक करून आता माघार घेऊ लागले असल्याचे कॉंग्रेसचे हंगामी प्रदेश अध्यक्ष फ्रान्सिस सार्दिन यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले.
माघार घेण्यात तयार नसलेल्यांचीही मनधरणी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पक्षातील ज्येष्ठ नेते अशा बंडोबांची लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
किर्लपाल येथे पूल कोसळून ५ खनिजवाहू ट्रक पाण्यात
तिघे चालक जखमी
किर्लपाल दाभाळ येथील नदीवर बांधलेल्या लोखंडी पुलाजवळ (बेलीब्रीज) पाच खनिजवाहू ट्रक जात असताना पूल कोसळून ट्रक नदीत वीस मीटर खोल पडले. यात तीन ट्रकचालक जखमी झाले. हे ट्रक सेझाच्या तेथील खाणीवरील मालाची वाहतूक उत्तर गोव्यात करीत होते. ही घटना काल दुपारी ३.३०च्या दरम्यान घडली. पुल लोखंडी असल्याने मंदगतीने कोसळला त्यामुळे मोठी हानी टळली.
हा पूल २००९ बांधला होता. तो सुमारे ५० मीटर लांबीचा असून नदीपासून पुलाची उंची २० मीटर आहे. जखमी झालेल्या चालकांची नावे क्लेतो तावारीस, नागेश नाईक व चंद्रकांत अशी आहेत. त्यांना प्राथमिक उपचारांसाठी कुडचडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.
दिल्ली स्फोटासंदर्भातदुचाकी ताब्यात
दिल्लीत इस्रायली दूतावासाच्या वाहनात घडवून आणल्या गेलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी दिल्लीतील लाडोसराय भागातून एक लाल रंगाची दुचाकी जप्त करण्यात आली. ही दुचाकी तेथे टाकून दिलेल्या स्थितीत आढळून आली. याच दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी दूतावासाच्या वाहनावर लोहचुंबकयुक्त बॉम्ब लावला असा कयास आहे. या मोटारसायकलच्या मालकाचा शोध घेण्यात येत आहे.
डाव्या आघाडीचा जाहीरनामा चार ठिकाणी रिंगणात
पणजी, साळगांव, सांताक्रुझ व सावर्डे चार मतदारसंघातून निवडणूक लढवणार्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या आघाडीने काल आपला जाहीरनामा जाहीर करतानाच प्रियोळ मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गोविंद गावडे यांना आपला पाठिंबा व्यक्त केला.
सशर्त कार्निव्हलला परवानगी
राज्यातील महत्त्वाच्या कार्निव्हल उत्सवास निवडणूक आयोगाने अखेर परवानगी दिली. मात्र केवळ शासकीय पातळीवरील कार्निव्हलला परवानगी देण्यात आली असून खासगी कार्निव्हलचे आयोजन होऊ नये तसेच एखाद्या उमेदवाराने कार्निव्हल आयोजित केल्यास त्याचा उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समावेश केला जाईल असे स्पष्ट केले आहे.
ज्यो बॉयनेही घेतली पत्रकार परिषद
सांताक्रुझमधून अपक्ष उमेदवारी
कित्येक गुन्हेगारी प्रकरणांत अटक करण्यात आलेला व गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक व रितेश नाईक यांची हत्या करण्यासाठी सुपारी घेतल्याचा आरोप असलेला जुझे लोपीस उर्फ ‘ज्यो बॉय’ हा सांताक्रुझ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असून या पार्श्वभूमीवर काल पत्रकारांशी बोलताना आपण आतापर्यंत कोणतेही गुन्हेगारी कृत्य केलेले नसून केवळ प्रसार माध्यमांनी आपणाला बदनाम केल्याचा आरोप त्याने केला.
इराणकडून युरोपीय राष्ट्रांना तेल निर्यात बंद
सहा युरोपीय राष्ट्रांना तेल निर्यात बंद करण्याचा निर्णय काल इराणने जाहीर केला. युरोपीयन युनियनच्या इराणवरील निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
चलन फुगवट्याच्या दराने गेल्या दोन वर्षातला निचांक गाठला
चलनफुगवट्याने दर गेल्या दोन वर्षांतला निचांक गाठत ६.५५ टक्क्यांवर पोहचला आहे. घाऊक किंमत निर्देशांकावरून मोजला जाणारा चलनफुगवट्याचा दर डिसेंबर २०११मध्ये ७.४७ टक्के इतका होता तर जानेवारी २०११मध्ये हा दर ९.४७ टक्के इतका होता.
मालदीवमधील उठावात बुद्धमूर्तींची तोडफोड
मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नाशीद यांच्या राजीनाम्याची मागणी करत गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान, मालदीवच्या राष्ट्रीय संग्रहालयात प्रवेश करुन अनेक हिंदू आणि बौध्द मूर्ती फोडल्यात आल्याचे कळते. यातील अनेक मूर्ती हिंदू देवी-देवता आणि गौतम बुद्ध यांच्या होत्या.
नानी पालखीवाला स्मृती व्याख्यान
नानी पालखीवाला मेमोरियल ट्रस्ट, मुंबई व वसंतराव धेंपो एड्यूकेशन अँड रिसर्च फाऊंडेशन, पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. नानी पालखीवाला स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात टाटा उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक किशोर चौकर हे ‘टिकावू उद्योगांची उभारणी’ या विषयावर बोलतील.
छाननीअंती ११९ अर्ज फेटाळले
३१७ उमेदवार तूर्त रिंगणात; गुरुवारी चित्र स्पष्ट होणार
वेगवेगळ्या मतदारसंघातील मिळून ११९ अर्ज फेटाळले गेल्याने ३१७ उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात असून त्यात ४५ महिलांचा समावेश आहे. अपक्षांची संख्या १०६ म्हणजे विक्रमी असल्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहतील हे दि. १६ नंतरच स्पष्ट होऊ शकेल, या निवडणुकीसाठी उमेदवारांची संख्या विक्रमी असल्याचेही ते म्हणाले. त्यात अखिल भारतीय अल्पसंख्यांक मंचचे ३, तृणमूल कॉंग्रेस २१, भाजप ५४, भाकप ५, माकप १, गोवा सुराज पार्टी २, गोवा विकास पार्टी ११, अपक्ष १०६, कॉंग्रेस ६२, जयमहाभारत पक्ष ३, जनता दल युनायटेड ६, मगो ८, राष्ट्रवादी १०, राष्ट्रीय क्रांतिकारी समाजवादी पक्ष १, आरपी आय ३, समाजवादी जनता पार्टी ५, समाजावदी ५, शिवसेना ३, सोशलिस्ट डेमोक्रेटिक पार्टी १.
कौटुंबिक उमेदवार्यांचा पक्षावर परिणाम होणे अशक्य : राणे
कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिल्याने त्याचा कॉंग्रेसवर काहीही परिणाम होणार नसून निवडणूक जिंकण्याची क्षमता हा महत्त्वाचा विषय आहे. अशा उमेदवारांना मत देणे किंवा न देणे हे मतदारांवर अवलंबून असते असे कॉंग्रेसचे प्रचार प्रमुख प्रतापसिंह राणे यांनी काल सांगितले.
मंत्र्यांना पैसे देऊन नोकर्या घेतल्या या विजय सरदेसाई यांनी केलेल्या आरोपाकडे त्यांचे लक्ष वेधले असता असे वरवरचे आरोप न करता कुणाला पैसे दिले त्यांची नावे त्यांनी जाहीर करावी, असे ते म्हणाले. निवडणुकीत कॉंग्रेसलाच बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बेकायदा खाणींचा विषय गोव्यापुरता मर्यादित नसून तो अन्य भागांतही आहे, असे ते म्हणाले.
बँकॉकमध्ये तीन स्फोट
थायलंडची राजधानी बँकॉक काली तीन स्फोटांनी हादरली. एक बॉम्ब घेऊन जाताना वाटेत फुटल्याने इराणी नागरिकाचा एक पाय उडाला. त्याआधी तो माणूस राहत होता त्या इमरतीत व त्यानजीकच्या रस्त्यावरही झाला.
या स्फोटात एकूण चौघे जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ही व्यक्ती दहशतवादी संघटनेशी वगैरे संबंधित होती का याचा अद्याप उलगडा झालेला नाही. सध्या तेथील स्थिती नियंत्रणाखाली असल्याचे सुरक्षा सूत्रांनी सांगितले.
अपघातात दुचाकीस्वार ठार
चिखली उतरणीवर काल दुपारी बोलेरो जीपच्याखाली आल्याने दुचाकी स्वार अजय चनमल (३३, रा. पणजी) हा जागीच ठार झाला. वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केरी सत्तरी येथील विनोद माजिक हा जीए ०४ टी ३२९० क्रमांकाच्या बोलेरो जीपमधून भाडे घेऊन वास्कोहून पणजीच्या दिशेने निघाला होता. तर मूळ सोलापूर येथील मयत अजय चनमल हा बजाज डिस्कव्हर क्र. जीए ०६ एच ८७४८ ने वास्कोच्या दिशेने येत होता.
नादोडा मंदिरातून लाखाचा ऐवज लंपास
नानोडा येथील सातेरी पुरमार देवस्थानचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यानी तीन मुखवटे, प्रभावळ व रोख दहा हजार मिळून सुमारे लाखभर रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती डिचोली पोलीसांनी दिली.
‘नवी दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला’
इस्त्रायली दूताच्या कारमध्ये झालेला स्फोट हा सुनियोजित दहशतवादी हल्ला होता, असे केंद्रीय गृहमंंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले. परवा दुपारी झालेल्या या हल्ल्यात दूताच्या पत्नी व ड्रायव्हर गंभीर जखमी झाले होते.
सार्दिनवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्याची मागणी
गोव्यातील पोर्तुगीज राजवटीचे समर्थन करणारे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवावा व पुढील सहा वर्षे त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घालावी अशी मागणी दत्ता नाईक यानी संसद सदस्यांना पाठवलेल्या एका निवेदनातून केली आहे.
जीवदान द्या : कसाबची याचना
२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जीवंत आरोपी अजमल अमीर कसाब याने काल सुप्रीम कोर्टाकडे वकीलामार्फत प्राणांची याचना करीत फाशीची शिक्षा जन्मठेपेवर आणण्याची मागणी केली.
बंडखोरांच्या मनधरणीसाठी ऑस्कर फर्नांडिस गोव्यात
विविध मतदारसंघांत कॉंग्रेस उमेदवारांविरुद्ध उभे ठाकलेल्या कॉंग्रेस बंडखोरांचे मन वळविण्यासाठी अ.भा. कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा छाननी समितीचे अध्यक्ष ऑस्कर फर्नांडिस यांचे काल गोव्यात आगमन झाले. दि. १६पर्यंत त्यांचे गोव्यात वास्तव्य असेल.
कॉंग्रेसच्या ‘घराणेशाही’चेशांताराम नाईकांकडून समर्थन
उमेदवारी देण्यासाठी निवडून येण्याची क्षमता हा महत्त्वाचा निकष आहे. त्यामुळेच कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे भवितव्य मतदारच ठरवतील असे सांगून राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक यांनी कुटुंबातील सदस्यांवर उमेदवारी देण्याच्या पक्षाच्या निर्णयाचे समर्थन केले.
उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकी
केपे मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले फिलीओ पेरैरा यांनी फोनवरून अज्ञात इसमानी शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदविली आहे.
दारू जप्त
अबकारी खात्याने सोमवार दि. १३ रोजी छापे मारून डिचोली येथे ११२० रु., बार्देशमध्ये मारलेल्या छाप्यात ११५९०० रु. तर काणकोण येथे मारलेल्या छाप्यात २५०० रु. एवढ्या किमतीची दारू जप्त केली.
कर्नाटकात भाजप आमदारांना नैतिकता व शिस्तीचे धडे
कर्नाटक विधानसभेत तीन भाजप मंत्री मोबाईलवर ब्लू फिल्म पाहताना आढळल्याच्या प्रकरणानंतर भाजपने आपल्या आमदारांसाठी नैतिकता व शिस्त शिकविण्यासाठी प्रशिक्षण सत्र घेण्याचे ठरविले आहे.
कॉंग्रेसविरुध्द प्रचार करणार शेख इफ्तिकार यांचा इशारा
गोवा मुस्लीम फोरम
कॉंग्रेस पक्षाने मुसलमान बांधवांचा विश्वासघात केलेला असून त्याचा बदला म्हणून होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील दीड लाख मुसलमान बांधव कॉंग्रेसच्या विरोधात मतदान करणार असल्याचे गोवा मुस्लिम फोरमचे मुख्य समन्वयक शेख इफ्तिकार यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
निरीक्षक आजपासून गार्हाणी ऐकणार
थिवी, म्हापसा व शिवोली या मतदारसंघांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक वंदना केणी या १५ फेब्रुवारीपासून दुपारी ३ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लोकांची गार्हाणी ऐकून घेण्यासाठी निरीक्षक चेंबर, पहिला मजला, सरकारी कार्यालय संकुल मरड म्हापसा येथे उपलब्ध असतील.
लोकशाहीचे अध:पतन रोखण्यासाठी निवडणूक सुधारणा आवश्यक
- प्रा. विनय ल. बापट, ताळगाव.
सध्या गोव्यासह उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे, तर मणिपूर, उत्तराखंड, पंजाबमधील निवडणूक धुरळा अजूनही खाली बसलेला नाही. या राजकीय धामधुमीत राजकारणाची हिडीस, ओंगळवाणी, किळस आणणारी अशी अनेक रूपे आपल्यासमोर येत आहेत. कालपर्यंत एका पक्षात असलेला आज दुसर्या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित होत आहे. धनशक्ती आणि गुंडशक्ती असणे ही उमेदवारी मिळविण्याची आज प्राथमिक पात्रता असल्याचे दिसत आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती ही आजच्या राजकारणात भूषणावह गोष्ट ठरत आहे. सर्वच राजकीय पक्ष धनदांडगे, बाहुबली, गुन्हेगार अशा लोकांनाच आपले उमेदवार म्हणून जनतेसमोर आणत आहेत. असे करण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे, सर्वच राजकीय पक्ष ‘निवडून येणे’ हा उमेदवारी देण्याचा एकमेव निकष वापरीत आहेत. अशा लोकांची संख्याही प्रत्येक पक्षात वाढत असल्यामुळे व सर्वांनाच ‘निवडून येण्याची खात्री’ वाटत असल्यामुळे एकाला तिकीट दिल्यास बाकीचे बंडखोरी करताना दिसतात, किंवा उपर्यांना तिकिटे मिळत असल्यामुळे त्या - त्या मतदारसंघातील काही निष्ठावान कार्यकर्तेही बंड करताना दिसतात. पण या सर्व किळसवाण्या प्रकारांमुळे आपल्या लोकशाहीचे मात्र दुर्दैवाने चांगलेच ‘वस्त्रहरण’ होत आहे.
चढाओढ आणि चुरस
महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिकेसह १० महापालिकांची निवडणूक आज होत आहे. गेले काही महिने पंचायत समित्या व नगर परिषदा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे जी रणधुमाळी उसळली आहे ती पाहाता या निवडणुकीसाठीही विलक्षण रस्सीखेच चालली आहे हे स्पष्टपणे दिसून येते. राजकीय पक्षांमध्ये तर राज्यातील विविध महापालिका आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी चढाओढ आहेच, परंतु काही नेत्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसलाही या निवडणुका करणार असल्यामुळे विलक्षण चुरशीने आणि चढाओढीने जो तो रिंगणात उतरलेला आहे. सर्वांची नजर अर्थातच आहे ती मुंबईवर. शिवसेनेने आपला हा गड १९९४ सालापासून आजवर अभेद्य ठेवला असला तरी यावेळी त्या पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यात यावेळी उद्धव यांनी १३५ पैकी ९६ नव्या चेहर्यांना या निवडणुकीत उतरवलेले आहे. ‘अँटी इन्कम्बन्सी’ घटकाचा फटका बसू नये यासाठी ही खेळी असली तरीही त्याचा विपरीत परिणामही होऊ शकतो. ही निवडणूक सेेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या राजकीय नेतृत्वाची कसोटी ठरणार आहे.
परिषदेचे आमंत्रणपत्र कोंकणी-मराठीतून का नाही?
- दिलीप बोरकर
अखिल भारतीय कोंकणी परिषदेचे २८ वे अधिवेशन याच महिन्याच्या १७ तारखेला म्हणजे परवापासून मुंबईत भरत आहे. देशभर विखुरलेल्या कोंकणी भाषकांची ही परिषद असून त्या निमित्ताने गोवा, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र राज्यातील कोंकणी लोक एकत्र येणार आहेत. १७ ते १९ फेब्रुवारीपर्यंत निरनिराळ्या विषयांवर चर्चा करणार आहेत. त्या चर्चेची कल्पना आमंत्रण पत्रिकेवरील वेगवेगळ्या विषयांवरून येते. परिसंवादातील या विषयांकडे पाहता, मागच्या परिषदेप्रमाणेच चर्वण होऊन तीन दिवसांच्या या वार्षिक सोपस्काराचे सूप वाजेल यात शंका नाही. १९४२ साली याच मुंबईत परिषदेचे तिसरे अधिवेशन झाले होते. त्या परिषदेचे स्वागताध्यक्ष होते, वामन रघुनाथ वर्दे वालावलीकर म्हणजेच शणैं गोंयबाब! शणैं गोंयबाबनी कोंकणी माणसाला स्वाभिमान शिकवला. कोंकणी माणूस म्हणजे ‘बाबत कुळं’ नव्हेत असे सांगून शणैं गोंयबाबनी कोंकणी माणसाचा आत्मा जागवला आणि त्याचीच परिणती म्हणून आज गोव्याला कोंकणी राज्याचा दर्जा मिळाला, हे सत्य कोणी नाकारू शकणार नाही. तरीसुद्धा आज त्याच गोव्यात कोंकणी भाषेची जी काय अवस्था झालेली आहे, ती पाहिल्यास २०१२ मधील २८ वी परिषद आणि १९४२ साली झालेली ३ री परिषद यात कुठल्याच प्रकारचा फरक असेल असे वाटत नाही. फरक असलाच तर, ७० वर्षांअगोदरच्या परिषदेच्या स्वागताध्यक्षांच्या दृष्टीसमोर एक निश्चित ध्येय होते, मात्र आज आयोजकच गोंधळलेल्या अवस्थेत चाचपडत आहेत.
दहशतवादाच्या सावळ्या
दहशतवादाच्या काळ्या सावळ्या पुन्हा एकवार जगावर घोटाळू लागल्या आहेत. दिल्लीमध्ये परवा इस्रायलच्या दूतावासाच्या वाहनामध्ये घडवला गेलेला स्फोट, जॉर्जियामध्ये आढळून आलेली स्फोटके आणि काल बँकॉकमध्ये झालेली स्फोटमालिका या सार्या घटना पाहिल्या, तर हिज्बुल्लासारखी दहशतवादी संघटना पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसते. दहशतवादाविरुद्ध ठामपणे पाय रोवून असलेल्या इस्रायलला यावेळी लक्ष्य केले गेले आहे आणि त्याकामी हिज्बुल्लाला इस्रायलचा हाडवैरी असलेल्या इराणची फूस आहे असा तर्क व्यक्त होतो आहे. खुद्द इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिल्लीतील हल्ल्यानंतर त्वरित इराणकडे बोटे दाखवली. आजवर जगाला भेडसावणार्या दहशतवादी कारवायांचे केंद्र म्हणून पाकिस्तानकडे आणि अफगाणिस्तानचा उल्लेख केला जायचा, परंतु अमेरिकेने त्या दोन्ही देशांमध्ये आपला वावर वाढवल्याने आता इराणमध्ये इस्लामी दहशतवादी शक्ती एकवटू लागलेल्या दिसतात. आधीच आपल्या अण्वस्त्रसज्जतेच्या प्रयत्नांमुळे वादाच्या भोवर्यात अडकलेल्या इराणकडून हिज्बुल्लाची पाठराखण चालते हे उघड गुपीत आहे.
योगमार्ग - राजयोग (सत्य- ४१)
- डॉ. सीताकांत घाणेकर
जगात अनेक संस्कृती होऊन गेल्या. त्यातच आपली भारतीय संस्कृती, विविध संस्कृतींमध्ये एक उत्कृष्ट अशी संस्कृती. आपल्या संस्कृतीत महान तत्त्वज्ञान आहे. जे पुष्कळ ग्रंथांमध्ये सामावलेले आहे. वेद, उपनिषदे, मनुस्मृती, योगशास्त्रात... एवढेच नव्हे तर पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या मुखारविंदातून अर्जुनाला मार्गदर्शक असे कुरुक्षेत्रावर सांगितलेलं तत्त्वज्ञान म्हणजेच श्रीमद्भगवद्गीता देखील आहे.
सोनेरी अश्विन
- प्रा. रमेश सप्रे
‘ऋतुचक्र’ नावाचं दुर्गा भागवतांचं एक अप्रतिम पुस्तक आहे. वर्षाच्या बाराही महिन्यातील निसर्गाचं पैलूदार वर्णन करताना त्यांनी प्रत्येक महिन्याच्या प्रकरणाला सुंदर समर्पक नाव दिलंय. त्यातलंच एक ‘सोनेरी अश्विन’. कल्पना फारच सुरेख आहे. आषाढात पाऊस सुरू झाला की पेरणी होत शेताशेतातून. पिकं वाढू लागतात. गणपतीच्या माटोळीला शेतात उभ्या असलेल्या भाताची कणसं बांधली जातात. नंतर पाऊस ओसरून उन्हं तापायला लागतात. ‘देवाजीने करुणा केली| शेते पिकुनी पिवळी झाली॥ असं म्हणणारे बाकीबाब (कविवर्य बा.भ.बोरकर)एक प्रकारे शेतात उभ्या असलेल्या पिकलेल्या भातांचं म्हणजेच पिवळ्या सोन्याचं श्रीसूक्तच म्हणत असतात. तर आश्विन सुरू झाला की दिवसा कापायला आलेली शेतातली लक्ष्मी, रात्री कोजागरीच्या पूर्ण चंद्राच्या दिशेनं सुरू असलेली प्रकाशाची वाटचाल...सारं कसं सोनेरी दिसतं! केवळ रंगरूपानं नाही तर प्रत्यक्ष वैभवसमृद्धीच्या दृष्टीनं सुद्धा.
पर्वरीत कारमधून ४ लाख रोख जप्त
भरारी पथकाकडून दोन कार्स ताब्यात
७ लाखांचे धनादेश, दारुही हस्तगत
भरारी पथकाने काल पर्वरी येथे दोन कार्सची झडती घेतली असता पैकी एक कारमधून ४ लाख ३७ हजार रु. रोकड व ७ लाख २३ हजार ५०० रु.चे धनादेश जप्त केले. धनादेश व रोकड मिळून एकूण रक्कम ११ लाख ६० हजार ५०० होते. येथील कवळेकर सुपर मार्केटसमोर संध्याकाळी ६ वा. ही कारवाई करण्यात आली.
या दोन वाहनांत पैसे असल्याची माहिती कोणीतरी भरारी पथकाला दिली होती. त्यानुसार दोन्ही वाहनांची झडती घेण्यात आली. पैकी कार क्र. जीए-०३ - एच -१९६० मध्ये एकूण ११ लाख ६० हजार ५०० रुपये रोख आणि धनादेशाच्या स्वरूपात सापडले. दुसर्या वाहन क्र. जीए-०७, सी- ४७५५ मध्ये तीन बॉक्समध्ये भरलेल्या दारूच्या बाटल्या मिळाल्या.
शेवटच्या दिवशी २२० जणांचे अर्ज
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी २२० उमेदवारांनी ३०४ अर्ज सादर केले.
काल दाखल झालेले मतदारसंघवार प्रमुख उमेदवारी अर्ज खालीलप्रमाणे -
मांद्रे - दयानंद सोपटे (कॉंग्रेस), लक्ष्मीकांत पार्सेकर (भाजप), गोविंद पार्सेकर (भाजप), पेडणे - संतोष मांद्रेकर (युनायटेड गोवन्स डेमोक्रेटिक पार्टी), कांता जाधव (तृणमूल कॉंग्रेस), डिचोली - पांडुरंग राऊत (तृणमूल कॉंग्रेस), राजेश पाटणेकर (कॉंग्रेस), बाबासाहेब राणे (कॉंग्रेस), नरेश सावळ (अपक्ष), मनोहर शिरोडकर (भाजप), थिवी - माधवी नीळकंठ हळर्णकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस), किरण कांदोळकर (भाजप), म्हापसा - फ्रान्सिस डिसोझा (भाजप), आशिष शिरोडकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस), शिवोली - दयानंद मांद्रेकर (भाजप), विनोद पालयेकर (कॉंग्रेस), साळगाव - दिलीप परुळेकर (भाजप), ट्रॉजन डिमेलो (अपक्ष), तुलियो डिसोझा (अपक्ष).
‘राष्ट्रवादी’च्या उमेदवार्या पैसे घेऊन : प्रभू मोनी
‘राष्ट्रवादी’ सोडण्याचा निर्णय
गोव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आपण इमाने इतबारे सेवा केली, परंतु गोव्याच्या प्रभारी म्हणून आलेल्या भारती चव्हाण यांनी पैसे घेऊनच तिकीट विकल्याचा सनसनाटी आरोप व्यंकटेश प्रभू मोनी यांनी काल केला.
मोनी व प्रकाश फडते यांनी वरील कारण पुढे करूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा त्याग केला. आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे मोनी यांनी सांगितले. चव्हाण यांनी आपल्याकडे ५० लाख रोख व ५० लाखांचा बंगला मागितला होता, असा आरोप त्यांनी केला.
बंडखोरांचे मन वळवण्याचे प्रयत्न करू
प्रदेश कॉंग्रेस कार्यकारी अध्यक्ष सार्दिन यांचे सूतोवाच
कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन काहींनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न पक्षातर्फे केले जातील असे संकेत प्रदेश कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष फ्रान्सिस सार्दिन यांनी काल पत्रकार परिषदेत दिले.
राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांचे अर्ज
रुद्रेश चोडणकर व आशिष शिरोडकर यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात रितसर प्रवेश केला व त्यानंतर शिरोडकर यांना म्हापसा मतदारसंघातून तर चोडणकर यांनी मये मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून अर्ज सादर केले. पर्वरीतून फेर्मिना खंवटे यांनी उमेदवारी दाखल केली.
संजय बांदेकर भाजपमध्ये
माजी मंत्री संजय बांदेकर यांनी १३ रोजी आपल्या कार्यकर्त्यांसहित रितसररित्या भाजपात प्रवेश केला. यावेळी खासदार श्रीपाद नाईक, माजी मंत्री विनय तेंडुलकर, आमदार रमेश तवडकर उपस्थित होते.
विश्वजितना धमकी प्रकरणी पाच जणांना अटक
निवडणूक प्रचारासाठी उसगाव घुडेमळ येथे आलेले असताना वाळपई मतदारसंघाचे कॉंग्रेस उमेदवार तथा आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायाधीशांनी त्यांची जामिनावर सुटका केली.
ताळगावच्या अपक्षाचा भाजपला पाठिंबा
‘जागृत गोंयकारांचो एकवट’चे ताळगावमधील उमेदवार झेव्हियर आल्मेदा यांनी आपण उमेदवारी अर्ज मागे घेऊन भाजपला आपला पाठिंबा व्यक्त करणार असल्याचे काल सांगितले.
नोकरी देण्यासाठी मंत्र्यांनी लाच घेतल्याच्या आरोपाची चौकशी करा
आयरिश यांचे निवडणूक आयोगास साकडे
फातोर्डा येथील जनतेला नोकरी मिळवून देण्यासाठी मंत्र्यांना आपण लाच दिली असल्याचा कॉंग्रेसचे माची सरचिटणीस तथा फातोर्ड्याचे अपक्ष उमेदवार विजय सरदेसाई यांनी केलेल्या आरोपाची सखोल चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
ब्रिटनला भारताकडून अपेक्षा
ब्रिटनचे खा. किथ वाझ यांचे प्रतिपादन
ब्रिटनच्या भारताकडून फार अपेक्षा असून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांनी हातमिळवणी करण्याची गरज असल्याचे गोमंतकीय वंशाचे ब्रिटनमधील संसद सदस्य क्रिथ वाझ यांनी काल ‘भारत-ब्रिटन उद्योग संधी’ या विषयावर बोलताना सांगितले.
पालिका कर्मचार्यांकडून प्रचार; निवडणूक अधिकार्यांसमोर पेच
‘कार्निव्हल’वर नजर
निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार सरकारी कर्मचारी प्रचारकार्यात भाग घेऊ शकत नाहीत. परंतु पालिका मंडळातील कर्मचारी औद्योगिक आस्थापन कायद्याखाली येत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याच्या बाबतीत निवडणूक अधिकार्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.
म्हापशातील आगीत दोन लाखांची हानी
म्हापशातील पेद्रु विन्सन वाझ ना’क दारू गोदा’ व कार्यालयाला काल (सो’वारी) पहाटे लागलेल्या आगीत सु’ारे दोन लाख रु.चे नुकसान झाले. आगीत आतील फर्निचर व इतर वस्तू जळून खाक झाल्या.
विकास नको, पण तुम्ही जा...
- कॅजिटन परेरा
‘विधानसभेमध्ये मी निवडून आलो नाही तर समस्त गोवेकरांचे भले कसे होणार?’ हा प्रश्न निवडणुकीला उभे राहाणार्या हर एक उमेदवाराच्या मनात असतो. पूर्वीही होता व आता तर तो अधिक जोरकस आहे. दुसर्याबद्दल म्हणाल तर उमेदवारांच्या मनातील खळबळ अशी...‘तो काय करणार विधानसभेत जाऊन? असल्याने गेल्या दहा वर्षांमध्ये तरी काय दिवे लावलेत? तो लोकांचा नव्हे तर स्वतःचा विकास करणार ना?’ १९६३ नंतर दर पाच वर्षांनी निदान ९ ते १० निवडणुका आल्या अन् गेल्या. पूर्वीच्या विजयी आमदारापेक्षा आपण आपला मतदारसंघाचा कसा चौफेर विकास यावेळी करू ह्याच्या गमजा नवीन उमेदवार मारणार. अशा तर्हेच्या वागण्यामुळे विकास म्हणजे नक्की काय हवे आहे सामान्यजनांना? गेल्या पन्नास वर्षांचा साक्षीदार म्हणून सांगतो....रस्ते आले, वीज गावागावात पोहोचली, नळ घरोघरी जोडले गेले, शाळा बांधण्यात आल्या, पाच गावांमध्ये कोठेतरी सरकारी इस्पितळे आली, पोस्ट ऑफिसे, बँका गावागावात पोहोचल्या. रेल्वे आणि मोठमोठे महामार्ग गोव्यातून धावू लागले. यावर सुद्धा विकास झाला नाही असे कसे म्हणता येईल? गोव्यातील टोकावरच्या आजूबाजूला असलेल्या गावातून सकाळी सात वाजता बसेस धावू लागतात आणि रात्री सात ते आठ वाजेपर्यंत माघारी येतात. विकासासाठी आता उरले आहे तरी काय? मासेवाले, भाजीवाले, फेरीवाले आणि हमालसुद्धा खिशामध्ये मोबाईल फोन ठेवून फिरतात. यापेक्षा आणखी विकास तो कोणता? यासाठी विकासाच्या दिशा आता बदलल्या आहेत आणि त्या नवीन उमेदवारांना निश्चितपणे माहीत असावयास हव्यात.
तिकीटवाटपाचे गूढ
पक्षाच्या उमेदवारीसाठी आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भल्या भल्यांचा पत्ता कॉंग्रेसने अंतिम क्षणी काटला. फातोर्डा आणि काणकोणच्या उमेदवारीकडे डोळा लावून बसलेल्या दोघा ‘विजयां’चे जवळजवळ निश्चित मानले जाणारे तिकीट ऐनवेळी काढून घेण्यात आले. विजय सरदेसाई यांनी तर आपल्या प्रचाराला सुरूवात केली होती. प्रचाराची गाणीही तयार केली होती. प्रचार कार्यालयाचे उद्घाटन त्यांनी खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना बोलावून केले होते, त्यामुळे त्यांचे तिकीट निश्चित आहे असेच मानले जात होते, परंतु कॉंग्रेस संस्कृतीमध्ये कोण कोणाचा कधी कसा गळा कापेल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे सरदेसाई यांना शेवटच्या क्षणी डावलले गेले आणि पक्षाचे निष्ठावंत एम. के. शेख यांना उमेदवारीची लॉटरी फुटली. शेख यांची पक्षनिष्ठा वादातीत आहे, परंतु या निष्ठेपेक्षा त्यांच्या अल्पसंख्यक असण्याचा त्यांना ही उमेदवारी मिळण्यात अधिक वाटा आहे असे दिसते. काही मतदारसंघांतून तरी कॉंग्रेस उमेदवारी मुस्लीम उमेदवारालाच मिळायला हवी असा आग्रह त्यांच्या विविध संघटनांनी गेला बराच काळ धरला होता आणि त्यामुळे काही मतदारसंघांमध्ये अशी उमेदवारी देण्यासाठी कॉंग्रेसवर यावेळी मोठा दबाव होता.
दोन ‘विजयां’ना डावलून कॉंग्रेसचे चार उमेदवार घोषित
विजय सरदेसाई व विजय पै खोत यांना तिकीटे नाहीत
ज्या चार मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्याच्या प्रश्नावर कॉंग्रेस पक्षासमोर आव्हान उभे ठाकले होते त्या मतदारसंघातील उमेदवार काल पक्षाने जाहीर केल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक असलेल्या दोन ‘विजयां’चा अपेक्षाभंग झाला. यामुळे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या समोर पेच निर्माण झाला आहे.
पक्षाने काल मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्यासाठी विजय सरदेसाई यांचा पत्ता कापून फातोर्डा मतदारसंघाची उमेदवारी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एम. के. शेख यांना दिली. मुरगांव मतदारसंघाची उमेदवारी युवा नेते संकल्प आमोणकर, काणकोणची उमेदवारी इजिदोर फर्नांडिस व सावर्डे मतदारसंघाची उमेदवारी गोविंद सावंत यांना दिली आहे.
परिवर्तनासाठी भाजप-मगो युतीला निवडा
फोंडा येथे युतीच्या पहिल्या सभेत आवाहन
सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येऊन ३ मार्च रोजी भाजप-मगो युतीला मतदान करून गोव्यात परिवर्तन घडवून आणावे असे आवाहन विविध वक्त्यांनी काल सायंकाळी आगियार मैदानावर भाजप-मगोच्या पहिल्या जाहीरसभेत केले.
सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. सभेला भाजपचे प्रचार प्रमुख उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, नेते मनोहर पर्रीकर, सुदीन ढवळीकर, म. गो.प.चे अध्यक्ष दीपक ढवळीकर, माजी मंत्री जोईर्लंद सौझ आगियार, आखीन सुवारीश, शिरोड्याचे महादेव नाईक, ऍङ बाबुसो गावकर, राजेश वेरेकर, नगरसेवक तथा स्वतंत्र उमेदवार व्यंकटेश नाईक, ऍड. मनोहर आडपईकर, संदीप खांडेपारकर, विष्णु वाघ, फोंडा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार लवू मामलेदार, एन. शिवदास उपस्थित होते.
निवडणूक लढवण्याचा विचार नाही : मामी
ताळगांव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे काल सांताक्रुझच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
सांताक्रुझ मतदारसंघातून आपण व आपली सून मारिया फर्नांडिस डमी उमेदवार म्हणून अर्ज भरणार असून निवडणूक मात्र आपला पुत्र रूदाल्फ फर्नांडिस हाच लढवणार असल्याचे त्या म्हणाल्या.
पणजी शिमगोत्सव समितीचे श्रीनिवास धेंपो अध्यक्ष
पणजी शिमगोत्सव समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्रीनिवास धेंपो यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे - मंगलदास नाईक - कार्याध्यक्ष, पणजीचे महापौर - पदसिद्ध अध्यक्ष, शांताराम नायक (चिटणीस), शशिकांत सरदेसाई (खजिनदार), सुधीर आगशीकर (संयुक्त खजिनदार), दीपक आमोणकर (संयुक्त सरचिटणीस), मनोहर पर्रीकर - पणजीचे आमदार.
अपक्ष लढणार : विजय सरदेसाई
तिकीटास विरोधामागे घराणेशाहीचे पुरस्कर्ते : आरोप
घराणेशाही आणू पाहणार्या लोकांनीच केंद्रीय वरिष्ठ नेत्यांना अमिष दाखवून, आपण घोटाळ्यांचा विरोध केल्याने आपला फातोर्डा येथील कॉंग्रेसची उमेदवारीपासून बळी दिला. यापुढेही आपला लढा चालूच राहणार असून माझे हायकमांड फातोर्डेची जनता असून, त्यांच्याच मागणीनुसार आज सोमवारी १० वाजता ‘अपक्ष’ म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे असे हजारो कार्यकर्त्यांसमोर बोलताना विजय सरदेसाई यांनी सांगितले.
राष्ट्रवादी मये सोडण्याच्या तयारीत
मयें मतदारसंघात राष्ट्रवादीला जिंकून येणे शक्य नसल्याचे दिसून आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काल झालेल्या बैठकीत मयें मतदारसंघ कॉंग्रेसलाच सोडण्यावर विचार झाल्याचे समजते. असे झाल्यास राष्ट्रवादीला आता फक्त सहा मतदारसंघावरच समाधान मानावे लागणार आहे. दरम्यान, म्हापसा व पर्वरी या मतदारसंघांसाठीचे उमेदवार काल रात्री उशीरापर्यंत राष्ट्रवादीकडून जाहीर झाले नव्हते.
राज्यपालांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
गोवा राजभवन हे ‘जनतेची अधिकारिणी’ असून ते माहिती हक्क कायद्याच्या अखत्यारित येत असल्याच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निवाड्याविरोधात गोव्याच्या राज्यपालांच्यावतीने त्यांचे विशेष सचिव डॉ. एन. राधाकृष्णन यांनी ‘स्पेशल लिव्ह पिटिशन’व्दारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दलवीर भंडारी व न्यायमूर्ती दीपक मिश्रा या न्यायपीठासमोर १३ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
भारतीय विद्यार्थ्यास भोसकण्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
प्रवीण रेड्डी या एमबीएचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याला भोसकून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लंडन पोलिसांनी तिघांवर गुन्हे नोंद केले आहेत. त्यांची नावे अमरेश्वर अरावा (२५), साई किशोर बालगुडी (२५), निशांत पुट्टपका (२३) अशी आहेत. शुक्रवारी रात्री या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्याला मानेत, पोटात असे अनेक ठिकाणी भोसकण्यात आले.
सैफुल्ला यांना उमेदवारी नसल्याने नाराजी
सैफुल्ला खान यांना मुरगांव मतदारसंघाची उमेदवारी न दिल्याने अखिल गोवा मुस्लिम फोरमचे मुख्य समन्वयक शेख इप्तिकार यांनी नाराजी व्यक्त करून या निवडणुकीत कॉंग्रेसच्या विरोधात काम करणार असल्याचे सांगितले.
हणजुणे येथे ५ लाखांचे चरस जप्त
अमली पदार्थ विरोधी पोलिसांनी परवा शनिवार दि. ११ रोजी उशिरा रात्री (१०.३० ते ११च्या दरम्यान) हणजुण येथे पेट्रोल पंपजवळ जुड पावलो विलीयम्स (२९) या किंगडम ऑफ लेसोयो या देशाच्या नागरिकांकडून ५ किलो चरस हस्तगत केले. या चरसची किंमत पाच लाख रु. एवढी आहे.
इतरांच्या जीवनात आनंद पेरणारी संस्कृती घडवूया
डी. डी. कोसंबी वैचारिक महोत्सवात प्रा. महंमद युनूस यांची हाक
आपण आज पैशाभोवती केंद्रित झालेल्या व्यवस्था घडवीत आहोत. अधिकाधिक पैसा कमावणे हेच लोकांचे उद्दिष्ट बनले आहे. आपण केवळ पैशामागे धावणारे यंत्रमानव बनतो आहोत. जो तो स्वतःसाठी धावतो आहे. ही व्यवस्था आपण का बदलू नये? आपल्या जीवनाचे उद्दिष्ट काय याचा प्रत्येकाने विचार करावा. जीवन हे पैसा कमावण्यासाठी नसावे. दुर्दैवाने जगभरातील अर्थतज्ज्ञांना वाटते की पैसा म्हणजेच जीवनातला आनंद. इतरांच्या जीवनात आनंद पेरणे यातच खरा आनंद आहे असे मानणारी नवी संस्कृती आपण घडवूया, अशी हाक जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ व बांगलादेशच्या बहुचर्चित ‘ग्रामीण बँके’चे जनक, ‘नोबेल शांती पुरस्काराचे मानकरी प्रा. महंमद युनूस यांनी काल डी. डी. कोसंबी विचार महोत्सवाचे अंतिम पुष्प गुंफताना दिली.
आपल्या ‘ग्रामीण बँके’ची व तत्संबंधित उद्योगांची कहाणी साध्या - सरळ शैलीतून मांडताना त्यांनी या उपक्रमांनी बांगलादेशमध्ये गोरगरिबांच्या आयुष्यात घडवलेल्या ऐतिहासिक परिवर्तनाची यशोगाथा श्रोत्यांपुढे ठेवली.
व्हिक्टोरिया फर्नांडिस यांचा राजीनामा
कॉंग्रेसच्या एक ज्येष्ठ नेत्या व सांताक्रुझ मतदारसंघाच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी काल आपल्या आमदारकीचा राजीनामा सभापती प्रतापसिंह राणे यांना टपालाने पाठवला.
यासंबंधी माहिती देताना फर्नांडिस म्हणाल्या की, काल शनिवारी आपण आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी पर्वरी येते सभापतींच्या चेंबरमध्ये गेले होते, पण तेथे त्यांचे कार्यालय बंद असल्याचे आढळून आले. नंतर आपण राजीनाम्याचे पत्र टपालाद्वारे सभापतींना पाठवले. सोमवारी आपण जाऊन त्यासंबंधी प्रतापसिंह राणे यांची भेट घेणार असल्याचे त्या म्हणाल्या. आमदारकीबरोबरच सर्व विधानसभा समित्यांचाही आपण राजीनामा दिलेला असून सोमवारी पीडीए अध्यक्षपदाचा राजीनामाही देणार असल्याचे मामींनी स्पष्ट केले.
४ उमेदवारांबाबत तिढा कायम
उमेदवारासाठीचा तिढा सुटू न शकलेल्या काणकोण, फातोर्डे, मुरगांव सावर्डे या चार मतदारसंघांसाठीचे उमेदवार ठरवण्यासाठी काल संपूर्ण संध्याकाळपर्यंत कॉंग्रेस हाऊसमध्ये खलबते चालू होती.
कॉंग्रेसचे गोवा प्रभारी जगमितसिंग ब्रार, सुधाकर रेड्डी यांच्याबरोबरच हरिप्रसाद, प्रतापसिंग राणे, सुभाष शिरोडकर दिगंबर कामत आदींनी चर्चा केली. फातोर्डा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांपैकी उरफान मुल्ला, एम. के. शेख (मुस्लीम उमेदवार), फातोर्ड्याचे माजी आमदार मामा कार्दोज व त्यांचे पुत्र टिटो कार्दोज, मोनिका डायस आदींना बोलावून घेऊन वरील नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. तर प्रतिमा कुतिन्हो यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. फातोर्डा मतदारसंघासाठी विजय सरदेसाई व उरफान मुल्ला यापैकी कुणाला उमेदवारी द्यावी याबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
आणखी ४० उमेदवारी अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीसाठी काल ४० उमेदवारांनी अर्ज केले. त्यात समीर साळगावकर - (मांद्रे) तृणमूल कॉंग्रेस, विठू मोरजकर - (पेडणे) भाजप, पांडुरंग राऊत - (डिचोली) तृणमूल कॉंग्रेस, नीळकंठ हळर्णकर (थिवी) राष्ट्रवादी कॉंग्रेस, फ्रान्सिस डिसोझा (म्हापसा) भाजप, उदय पालयेकर (शिवोली) कॉंग्रेस, दिलीप परुळेकर (साळगाव) भाजप, मायकल लोबो (कळंगुट) भाजप, गोविंद पर्वतकर (पर्वरी) भाजप, ग्लेन तिकलो (हळदोणे) भाजप, मनोहर पर्रीकर (पणजी) भाजप,
आल्तिनो गोम्स प्रचार समन्वयक
ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व गोवा प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस आल्तिनो गोम्स यांची होऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार समितीचे समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे.
विठू मोरजकर यांचाही भाजपतर्फे पेडण्यातून अर्ज
पेडणे मतदारसंघातून भाजपातर्फे विठू मोरजकर यांनी ११ रोजी उमेदवारी अर्ज सादर करून चर्चेला उधाण आणले आहे.
पेडणे मतदारसंघातून भाजपातर्फे ९ रोजी राजेंद्र आर्लेकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला होता व ११ रोजी विठू मोरजकर यांनी त्याच पक्षाच्या उमेदवारीवर अर्ज भरल्याने विठू मोरजकर यांचा अर्ज आता पक्षाच्या ‘बी’ फॉर्मवर अवलंबून आहे. अन्यथा तो अर्ज त्याच दिवशी बाहेर पडू शकतो.
भारतीय विद्यार्थ्यास लंडनमध्ये भोसकले
ब्रिटनमधील लंडन बिझनेस स्कूलचा एमबीएचा विद्यार्थी असलेल्या प्रवीण रेड्डी नामक भारतीय तरुणास काल लंडनमध्ये भोसकण्यात आले. यासंदर्भात अकराजणांना अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशात दुसर्या टप्प्यात ५९ टक्के मतदान
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या काल झालेल्या दुसर्या टप्प्यात ५९ टक्के मतदान झाले. नऊ जिल्ह्यांतील ५९ जागांसाठी काल मतदान झाले. दोन राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांसह एकूण १०९८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य काल मतदानयंत्रांमध्ये बंद झाले आहे. ३१ आमदार व २४ माजी मंत्र्यांचाही यात समावेश आहे.
अखंड समर्पित वृत्तीने काम करता आले पाहिजे
प्रा. रत्नाकर लेले सत्कार सोहळ्यात डॉ. अशोकराव कुकडे यांचे उद्गार
व्यक्तीपेक्षा सामाजिक संबंध महत्त्वाचे. सामाजिक संबंधांपेक्षा राष्ट्रीय संबंध महत्त्वाचे ही मानसिकता तयार होणे गरजेचे आहे. त्यातूनच जीवननिष्ठेने काम करणारी आदर्श माणसे तयार होतात. रत्नाकर लेले यांच्यासारखे अखंड समर्पित वृत्तीने काम करता आले पाहिजे, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. अशोकराव कुकडे यांनी काल येथे केले.
लढाईपूर्वीची धुमश्चक्रीही झाली अवघी चुरशीची!
- रमेश सावईकर
येत्या ३ मार्च २०१२ रोजी होणारी गोवा राज्य विधानसभा निवडणूक राजकीय पक्षांची कसोटी ठरविणारी असेल, अशी स्पष्ट चिन्हे आता दिसू लागली आहेत. सत्ताधारी कॉंग्रेस पक्षात धुमसत असलेल्या अंतर्गत धुसफुशीला तोंड फुटले आहे. सत्तेसाठी हेवेदावे, दावेगिरी, राजकीय कार्यकर्त्यांकडून दबावतंत्राचा वापर, उमेदवारी-तिकीटासाठी कार्यकर्ते-समर्थक यांचे शक्तीप्रदर्शन, एकमेकांची उणी-दुणी वेशीवर टांगण्यासाठी लागलेली अहमहमिका.... सारे सारे काही मतदारांना उघड्या डोळ्यांनी पहात राहण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही.
माफी का मागावी?
वेळ्ळीच्या धर्मगुरूंवरील छाप्याप्रकरणी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्यांनी व निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी माफी मागावी असा हट्टाग्रह काही राजकारण्यांनी आणि धर्मगुरूंनी धरला आहे. माफी मागली जाणार नसेल तर वेळ्ळीतील साडेपाच हजार नागरिक मतदान करणार नाहीत अशी धमकीही यासंदर्भात दिली गेली. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन राजकारणीही तापल्या तव्यावर पोळी भाजून घेण्यासाठी त्यात उतरले आणि शांताराम नाईकांपासून सुभाष शिरोडकरांपर्यंत सर्वांनी तत्परतेने हे छापे कसे गैर होते हे सांगण्यात आपली शक्ती खर्ची घातली. निवडणूक काळात एखाद्या उमेदवाराच्या वतीने मतदारांना पैसे वाटले जात असतील तर छापा टाकून अशी रक्कम तात्काळ जप्त करावी असे निवडणूक आचारसंहिता सांगते. वेळ्ळीचे धर्मगुरू अशा प्रकारे मतदारांना पैसे वाटत असल्याची एक निनावी तक्रार निवडणूक आयोगाकडे आली आणि त्यांच्या भरारी पथकाने आयकर अधिकार्यांसह तेथे छापा मारला. प्रत्यक्षात तेथे पैसेवाटप चालल्याचे त्यांना काही आढळून आले नाही.
पूर्वेची पश्चिमेला ओळख
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
भारतीय प्रबोधनकालाचे एक शिल्पकार म्हणून स्वामी विवेकानंदांचे नाव अभिमानाने घेतले जाते. त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्त्व देशबांधवांना निरंतर स्फूर्ती देणारे आहे. सार्या जगाला मानवतेचा दिव्य संदेश देणारे आहे. खडतर कालखंडात त्यांनी विवेकनिष्ठेच्या बळावर भारतीय अस्मितेला आकार दिला. राष्ट्रतेजाचा स्फुल्लिंग जागविला. त्यांच्या अमोघ वाणीत मनुष्यमात्राला भावमंत्रित करण्याची शक्ती होती. तिच्यातील विजिगीषू जीवनप्रणाली किंकर्तव्यमूढ देशबांधवांना दीपस्तंभाप्रमाणे अभ्युदयाची दिशा दाखविणारी होती.
रंगलेला ‘सादीर नाट्यमहोत्सव’
- अजय बुवा
गोव्यात नाट्यचळवळ म्हणावी तशी अजूनही सशक्त झालेली नाही. हौशी रंगभूमी हळूहळू लोप पावत चालली आहे. कला अकादमीच्या नाट्य स्पर्धांना फक्त चार-चार नाटके सादर होताहेत. उत्सवी रंगभूमीवर तीच नाटके व तोच पचकट विनोद चालू आहे. वार्षिक परंपरा म्हणून देवळासमोर नाटक व्हायला हवे, या भावनेने निव्वळ ‘भागवून नेणे’ हा प्रकार चालू आहे. कोकणी अकादमी व सम्राट क्लबचा मास्टर दत्ताराम नाट्य महोत्सव वगळता नाट्यक्षेत्रात गोव्यात तशी उदासीनताच आढळून येत आहे. आणि अशा या वातावरणात ‘सादीर थिएटर फेस्टीवल’ सारखं नाव गोव्यात आढळतं हे नाट्यचळवळीला पोषक आहे. पृथ्वी थिएटर फेस्टीवल, भारत रंग महोत्सव - दिल्ली सारखे महोत्सव आम्हांला ऐकून माहीत होते. परंतु त्याच तोला-मोलाचे एक नाट्यमहोत्सव गोव्यात यशस्वी होऊ शकतो हे या फेस्टीवलने दाखवून दिले आहे.
बोलक्या मूर्ती...!
- लाडोजी परब
कोकणचे निसर्गसौंदर्य जसे विलोभनीय तसेच तेथील लाल मातीतून घडणारे कलाकार म्हणजे कलेची खाणच! कोकणची कला आणि संस्कृती या कलाकारांनी स्वत:च्या कुंचल्यातून जिवंत ठेवली आहे. सावंतवाडी तालुक्यातील निरवडे (कोनापाल) गावातील एक तरुण कलाकार दिलीप राणे. या कलावंताच्या हातातून तयार होणारी प्रत्येक मूर्ती बोलू लागते. कोकणच्या संस्कृतीचे दर्शन घडविते. सावंतवाडी (माजगाव) येथील आणखी एक कलाकार विलास मांजरेकर यांच्या कलाकृतीही सर्वदूर पोहोचल्या आहेत. कोकणातील ही रत्ने आपल्या कलेद्वारे कोकणची संस्कृती जतन करताहेत.
विजय पै खोत यांचा आमदारकीचा राजीनामा
भाजपने विश्वासात न घेतल्याचा आरोप
काणकोणचे भाजप आमदार विजय पै खोत यांनी काल आपल्या आमदारकीचा राजीनामा सभापती प्रतापसिंह राणे यांना सादर केला. त्यामुळे त्यांचा कॉंग्रेस प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. आज ते आपल्या कार्यकर्त्यांसह कॉंग्रेस प्रवेश करण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खोत यांना कॉंग्रेसने काणकोण मतदारसंघाची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळेच ते बर्याच काळापासून कॉंग्रेस प्रवेशाच्या प्रतीक्षेत होते.
मालपे येथे ट्रकवाहू रेल्वेस आग : एक ठार
मालवाहू ट्रक घेऊन जात असलेल्या रेल्वेस मालपे - पेडणे जंक्शनवर अचानक लागलेल्या आगीत एक ट्रक जळून खाक झाला. या ट्रकचा चालकही भाजल्याने मरण पावला.
काल रात्री ८.३० रोजी मालपे पेडणे रेल्वे स्थानकाच्या जंक्शनवर बेंगलोरहून मुंबईला जाणारी ट्रकवाहू रेल्वे पोचली असता त्यातील एका ट्रकास अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर रेल्वे लाल बावटा दाखवून थांबवण्यात आली. दरम्यान, आग लागलेल्या ट्रकातील चालक भाजला गेला. रेल्वेची थांबण्यापूर्वीच त्याने ट्रकातून उडी मारली व तेथेच मरण पावला.
दाबोळीत मगोने उमेदवार बदलला
नाराज म्हार्दोळकरांचा राजीनामा
येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये अचानकपणे झालेल्या घडामोडीत म.गो. पक्षाच्या केंद्रीय समितीने पूर्व घोषित उमेदवार प्रताप म्हार्दोळकर यांचा दाबोळी मतदारसंघातून डावलून नगरसेवक प्रेमानंद उर्फ बाबू नानोस्कर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर म्हार्दोळकर यांनी मगोचा राजीनामा दिला आहे.
पक्षाच्या नेत्यांनी यापूर्वी दाबोळी मतदारसंघातून चिखली पंचायतीचे विद्यमान पंच प्रताप म्हार्दोळकर यांचे नाव जाहीर केल्यानंतर म्हार्दोळकर यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली होती. मात्र बुधवारी झालेल्या राजकीय घडामोडीमध्ये म्हार्दोळकर यांचे नाव बदलून माजी नगराध्यक्ष क्रितेश गावकर यांचे नाव पुढे आले होते. मात्र गुरुवारी शेवटी प्रेमानंद नानोस्कर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. नानोस्कर यांना पक्षाने ‘बी’ अर्ज दिल्याने नानोस्कर हेच उमेदवार असल्याचे सिद्ध झाले आहे.
लष्कर प्रमुखांची माघार
जन्मवर्ष वादप्रकरणी न्यायालय सरकारच्या बाजूने
लष्कर प्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सरकारची बाजू घेत जनरल सिंग यांना याचिका मागे घेण्याची सूचना केली. सरकारने नोंद केेलेली जन्मतारीखच ग्राह्य धरली जाईल असेही कोर्टाने स्पष्ट केले. याचिका मागे घेतली नाही तर स्वत:हून ती फेटाळू असा इशाराही कोर्टाने दिला.
आणखी २६ अर्ज
काल वेगवेगळ्या मतदारसंघातून २६ जणांनी निवडणूक उमेदवारी अर्ज सादर केले असून त्यामुळे एकूण उमेदवारांची संख्या ७७ झाली आहे. काल अर्ज भरलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये आग्नेल फर्नांडिस (कॉंग्रेस- कळंगुट), पांडुरंग मडकईकर (कॉं- कुंभारजुवे), सुभाष शिरोडकर (कॉं. शिरोडा), वालंका आलेमाव (कॉं. बाणावली), चर्चिल आलेमाव (कॉं. नावेली),
युगोडेपाचे तीन उमेदवार जाहीर
युगोडेपा पक्षाने आज आपले तीन उमेदवार जाहीर केले. वास्को- आदम जुम्मा, फोंडा- गितेश गोकुळदास नाईक व साळगाव येथे फ्रांसिस्क कुलास यांना उमेदवारी दिली आहे.
व्हिक्टोरिया अपक्ष लढणार
कॉंग्रेस पक्षाने उमेदवार्या विकल्याचा आरोप करून आपल्यावर झालेल्या अन्यायामुळे आज किंवा उद्या आमदारकीचा राजीनामा देऊन आपण अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याचे सांताक्रुझच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केले. शिक्षणमंत्री बाबुश मोन्सेर्रात सत्तेचा गैरवापर करीत असून आपल्या कार्यकर्त्यांना तो धमक्या देत असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.
ब्रिटीश खासदार किथ वाझ गोव्यात
मूळ गोमंतकीय असलेले ब्रिटीश संसदेचे सदस्य किथ वाझ हे सोमवार दि. १३ फेब्रुवारीला गोमंतकीय उद्योजकांना संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रम संध्या. ५.३० वा. गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सुरेंद्रबाबू तिंबलो सभागृहात होईल. भारत-ब्रिटन दरम्यान, उद्योगसंधींबाबत ते माहिती देतील. किथ वाझ हे १९८७ सालापासून सहा वेळा हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून गेले आहेत. टोनी ब्लेअर यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही होते.
इम्रान खानच्या रॅलीवर ग्रेनेड हल्ला, गोळीबार
पाकिस्तानातील राजकीय नेता असलेला भूतपूर्व क्रिकेटर इम्रान खान याच्या रॅलीवर काल झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात व गोळीबारात दहा जण ठार झाले. यात चार पोलीसांचा समावेश आहे. हा हल्ला खैबर पक्तूनक्वा प्रातांत झाला.
मुंबईतील दुहेरी स्फोटप्रकरणी तिघांची फाशी कायम
मुंबईतील झवेरी बाजार आणि गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटातील तिघाही आरोपींचा मृत्यूदंड मुंबई उच्च न्यायालयाने काल कायम ठेवला. सन २००३ मध्ये हे स्फोट झाले होते व त्यात ५७ जण ठार झाले होते. आरोपींनी दाखल केलेल्या सर्व याचिका उच्च न्यायालयाने निकालात काढल्या. या निवाड्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे आरोपींच्या वकिलांनी सांगितल्याने त्यांना आठ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
दाबोळीत तीन वाहनांच्या अपघातात एक ठार
दाबोळी येथे फ्लॉपी बार जवळील वळणावर शुक्रवारी पहाटे तीन वाहनांच्या विचित्र अपघातामध्ये बसची धडक बसल्याने इनोव्हा कार चालक किशन बोरकर (२१, रा. डोंगरी) हा जागीच ठार झाला तर तिघेजण जखमी झाले. वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर अपघात शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. सिता टुर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सची मिनी बस, वॅगनआर आणि इनोव्हा यांच्यामध्ये हा अपघात घडला. तिनही वाहने यावेळी वेर्णाहून दाबोळी विमानतळाकडे येत होती. जीए-०१-टी-७१६६ क्रमांकाची इनोव्हा कारने चालक किशन बोरकर हा दाबोळीच्या दिशेने येत असताना उजव्या बाजूकडील मागील टायर पंक्चर झाल्याने गाडीतून बाहेर येऊन तिथेच टायर बदलत होता.
पोलिसांच्या बदल्यांविरोधात निवडणूक अधिकार्यांकडे तक्रार
राज्यातील पोलिस अधिकारी तथा इतर पदावरील पोलिसांच्या बदल्यामध्ये झालेला विरोधाभास स्पष्टपणे दिसत असल्याची तक्रार ऍड्. आयरिश रॉड्रिग्ज यांनी काल मुख्य निवडणूक अधिकार्यांकडे केली आहे.
आखाती राष्ट्रांबाबत भारताचे निश्चित धोरण हवे : नक्वी
भारताच्या विदेश धोरणात अरब राष्ट्रांबाबत कोणत्याही प्रकारची नीती अथवा धोरण नसते. सौदी अरेबिया, कुवेत, इस्राईल, तुर्की, सिरिया या अरब राष्ट्रांमध्ये संघर्ष असतात. राजकीय घटनाही वेगाने घडत असतात. तरीही या देशात भारताचा राजदूत नाही किंवा त्यासंदर्भात खास धोरणही नाही. अरब राष्ट्रात १९७३ पासून संघर्षास प्रारंभ झाला. १९९० मध्ये रशियाचे विघटन झाले व परिस्थिती बदलली.
पेडण्यातील लोकांना अपशब्द : चौकशी पूर्ण
पेडण्याचे उपजिल्हाधिकारी अजित पंचवाडकर यांनी पेडण्यातील लोकांना अपशब्द वापरल्याप्रकरणी निवडणूक अधिकार्यांनी स्थापन केलेल्या समितीने चौकशी पूर्ण केली असून अहवाल सादर केला आहे.
सातत्य नि चिकाटी म्हणजेच रत्नाकर लेले
- दत्ता भि. नाईक.
डिसेंबर १९७० मध्ये सावंतवाडी येथील नरेंद्र डोंगरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत शिबिर भरले होते. तेथे रत्नाकर एका गणाचा शिक्षक होता. माझा समवयस्क, नुकतेच मिसरूड फुटलेला, पण तरीही तो गणशिक्षक झालेला. स्पष्ट आवाजात आज्ञा देत होता. त्याची नजर सर्वत्र भिरभिरत होती. गणातील सर्वजणांवर त्याचे असलेले नियंत्रण पाहून एखादा सेनाधिकारीही ओशाळला असता. तेव्हापासून आमची गट्टी जमली ती आजतागायत घट्टच आहे.
मालदीवचे बंड
जगभरातील सधन पर्यटकांचे प्रिय स्थळ असलेल्या मालदीवमधील विद्यमान राजकीय घडामोडी भारतासाठीही चिंतेचा विषय आहे. हिंदी महासागरातील या द्वीपसमूहावरील लोकशाही राजवट उलथवून तेथील सत्ता विरोधी पक्षांनी काबीज केली आहे. निवडणुकीद्वारे निवडले गेलेले राष्ट्राध्यक्ष महंमद नाशीद यांना सत्तेवरून पायउतार तर केले गेलेच, शिवाय त्यांना जबर मारहाणही झाली. अर्थात, परिस्थिती एवढी चिघळण्यास ते स्वतःच कारणीभूत ठरले हेही तेवढेच खरे आहे. गेले काही महिने मालदीवमध्ये असंतोषाचे वारे वाहात होते. वाढती महागाई, सरकारची इस्लामविरोधी धोरणे अशी अनेक कारणे पुढे करून विरोधकांनी राष्ट्राध्यक्षांविरुद्ध आघाडी उघडली होती. त्यातच देशाचे सरन्यायाधीश अब्दुल्ला महंमद हे आधीच्या राजवटीतील भ्रष्टाचाराची प्रकरणे नीट हाताळत नाहीत असा आरोप करून सरकारने त्यांना तुरुंगात डांबले, तेव्हा विरोधकांनी ती संधी साधून लोकांना रस्त्यावर उतरवून सत्ता हस्तगत केली आहे. न्या. अब्दुल्ला यांना अटकेत टाकण्याची सरकारची कृती राष्ट्राध्यक्षांचे आसन डळमळवण्यास कारणीभूत ठरली असली, तरी या प्रकरणाला गेल्या अनेक महिन्यांतील घडामोडींची पार्श्वभूमीही आहे. मालदीव हा द्वीपसमूह मुख्यत्वे तेथील पर्यटनासाठी जगविख्यात आहे.
४४ अर्ज दाखल
गोवा विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या कालच्या चौथ्या दिवशी एकूण ४४ अर्ज सादर करण्यात आले. त्यात भाजपचे १६, कॉंग्रेसचे ६, यूजीडीपीचा १, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे २, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा १, मगो ४, तृणमूल कॉंग्रेस ४, समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय) २ व ८ अपक्ष यांचा समावेश आहे.
काल अर्ज भरलेल्या भाजप उमेदवारांमध्ये लक्ष्मीकांत पार्सेकर - मांद्रे, राजेंद्र आर्लेकर - पेडणे, दयानंद मांद्रेकर - शिवोली, तिकलो ग्लॅन सोझा - हळदोणे, मनोहर पर्रीकर - पणजी, अनंत शेट - मये, प्रमोद पांडुरंग सावंत - साखळी, सत्यविजय नाईक - वाळपई, महादेव नाईक - शिरोडा, मिलिंद नाईक - मुरगाव, कार्लुस आल्मेदा - वास्को, दामोदर नाईक - फातोर्डे, सुभाष नाईक - कुंकळ्ळी, गणेश गावकर - सावर्डे यांचा समावेश आहे.
भाजपच्या प्रचाराची धुरा श्रीपाद नाईक यांच्याकडे
फोंड्यात युतीची पहिली जाहीर सभा
युतीचा जाहीरनामा लवकरच; पक्षाचा १९ रोजी
प्रचारासाठी हेमामालिनी, स्मृती इराणी, मुंडे, जेटली
भाजप-मगो आघाडीच्या प्रचाराची धुरा उत्तर गोव्याचे खासदार व ज्येष्ठ भाजप नेते श्रीपाद नाईक यांच्याकडे सोपवण्यात आलेली असून येत्या १२ रोजीपासून पक्षाचा प्रचार सुरू होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल येथे पत्रकार परिषदेत सांगितले. १२ रोजी फोंडा येथे भाजप-मगोची संयुक्त सभा होणार असल्याची माहितीही यावेळी पार्सेकर यांनी दिली.
भाजप-मगो आघाडीचा समान जाहीरनामा ३-४ दिवसांत येणार असून भाजपचा स्वतःचा एक वेगळा जाहीरनामाही असेल व त्याचे १९ रोजी पक्षाचे केंद्रीय नेते रवीशंकर प्रसाद यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात येईल, अशी माहिती पार्सेकर यांनी दिली.
कॉंग्रेसच्या घराणेशाहीला जनतेने झुगारावे : पर्रीकर
गोवा मुक्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पाच कुटुंबातील ११ जणांना उमेदवारी देऊन कॉंग्रेस पक्ष गोमंतकातील जनतेच्या मानेवर गुलामगिरीचे जू ठेवू पाहत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला. तसेच या सरंजमशाहीला मतदारांनी कडाडून विरोध करावा, असे आवाहन केले.
घराणेशाही या एका मुद्द्यावरच कॉंग्रेस पक्षाचा पराभव करण्याची गरज असल्याचे पर्रीकर पुढे म्हणाले. अशा प्रकारे पाच कुटुंबांतील लोकांना उमेदवारी देणे व तेही जिंकू शकण्याची शक्यता असलेल्या मतदारसंघांत हे भयानक असून हे लोक निवडले गेल्यास या पाच कुटुंबियांच्या हातात विधानसभा जाण्याची भीती पर्रीकर यांनी व्यक्त केली. अशा प्रकारे अवघ्याच लोकांच्या हातात विधानसभा गेल्यास गोव्याचे भवितव्य अंधारमय ठरण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
बंडखोरांना ‘तृणमूल’चा आसरा
समीर साळगावकर, बंडू देसाई, पांडुरंग राऊत यांना उमेदवारी
भाजप-कॉंग्रेस या मोठ्या पक्षांनी उमेदवारी नाकारल्याने वेगवेगळ्या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी आता तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली असून काल पक्षाचे राष्ट्रीय सचिव तथा केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री मुकूल रॉय यांनी चार उमेदवारांची नावे जाहीर केली.
इंदिरानगरला राजकीय समर्थकांत मारामारी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांताक्रुझ मतदारसंघातील वातावरण संवेदनशील बनत असून काल व्हिक्टोरिया फर्नांडिस व बाबूश मोन्सेर्रात यांच्या समर्थकांत झालेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
घराणेशाहीवर सार्दिनचे मौन
प्रदेश कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष फ्रान्सिस सार्दिन यांनी कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिल्यासंबंधीच्या प्रश्नावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तिकीट देण्याचे काम आपले नव्हे, असेही ते म्हणाले. वेळी येथील चर्चच्या कार्यालयावर आयकर खात्याने मारलेल्या छाप्याचा त्यांनी निषेध केला. चर्चचे कार्य बिशपनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच होत असते, असे सार्दिन यांनी सांगितले.
दूरवर बदली झालेल्या पोलिसांची मानवी हक्क आयोगाकडे धाव
सूडबुद्धीने अन्यायकारक बदल्या झाल्याची तक्रार
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील पोलिसांच्या बदल्या करताना उत्तर गोव्यातील कर्मचार्यांना दक्षिण गोव्यात व दक्षिणेतील कर्मचार्यांना उत्तर गोव्यात पाठविण्यात आल्याने त्यांच्यासमोर गंभीर समस्या निर्माण झाली असून मुलांच्या परीक्षा तोंडावर असताना अचानक करण्यात आलेल्या या बदल्यांना सामोरे कसे जावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. पोलिसांच्या वतीने यासंदर्भात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
लोकशाही संस्थांना पर्याय शोधण्यापेक्षा त्या बळकट करूया
डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात शेखर सिंग यांचे प्रतिपादन
भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एखादी सक्षम यंत्रणा निर्माण केली म्हणजे देशातील भ्रष्टाचार मिटेल ही देशातील मध्यमवर्गाची ‘फँटसी’ असून सध्याच्या अकार्यक्षम संस्थांना पर्याय म्हणून नव्या संस्था उभारण्यापेक्षा सध्याच्या लोकशाही संस्थाच अधिक बळकट कशा करता येतील याचा विचार व्हावा असे मत शेखर सिंग यांनी काल डी. डी. कोसंबी वैचारिक महोत्सवाचे तिसरे पुष्प ‘प्रशासन व नैतिकता’ या विषयावर गुंफताना व्यक्त केले.
देशभरातील आंदोलनांना ‘लोकसंसद’ खाली आणणार
मेधा पाटकर यांचा इशारा
देशभरातील आंदोलने व आंदोलक यांना ‘लोक संसद’ नावाने सुरू केलेल्या आपल्या बिगर सरकारी संघटनेखाली आणून देशपातळीवर एकत्रित लढा देण्याचा निर्धार काल मेधा पाटकर यांनी पणजीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
एका सच्च्या कॉंग्रेसमनचे प्रदेशाध्यक्षांस अनावृत्त पत्र
कॉंग्रेस पक्षामध्ये हयात घालवलेले माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर यांनी प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांना विद्यमान राजकीय घडामोडींसंदर्भात जाहीर पत्र लिहिले आहे. त्याचा गोषवारा -
श्री. सुभाष शिरोडकर,
मा. अध्यक्ष,
गोवा प्रदेश कॉंग्रेस समिती,
कॉंग्रेस भवन, पणजी गोवा
सविनय सप्रेम नमस्कार,
महाशय,
३ मार्च रोजी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचे तिकीट वाटप करून आपण पक्षात असलेल्या अगोदरच्या गोंधळाच्या वातावरणात अधिक गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला आहे, हे नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे पत्र आपणास लिहीत आहे. खालील दहा मुद्दे पक्षाच्या हिताच्या आड येऊ शकतात.
पाहुणे उमेदवार
उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होऊन गेली तरी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांची उमेदवारी यादी तयार न होणे ही बाब यावेळी तिकीटवाटप किती गुंतागुंतीचे आणि कटकटीचे झाले आहे त्याचीच निदर्शक आहे. या निवडणुकीत एक गोष्ट मुख्यत्वे घडली आहे ती म्हणजे कॉंग्रेस आणि भाजपा या दोन्ही प्रमुख पक्षांत निवडणुकीच्या तोंडावर काही ‘पाहुणे’ उमेदवार आले आहेत आणि पक्ष कार्यकर्त्यांनी मुकाटपणे त्यांच्यासाठी काम करावे अशी पक्षनेत्यांची अपेक्षा आहे. ज्यांना तिकीट नाकारले गेले, ते पक्षाचे तिकिटेच्छुक बंड करून पक्षाबाहेर पडले आणि स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागले आहेत. ही झाली उघड बंडखोरी आणि या उमेदवारांचे असे जे काही कमी - अधिक वैयक्तिक मतदार आहेत, ते त्याच्या बाजूने राहणारच, परंतु त्याखेरीज पक्षाचा जो पारंपरिक मतदार आहे, त्याला या नवीन ‘पाहुण्या’ उमेदवाराबद्दल कितपत विश्वास आहे, त्याला त्याच्याविषयी आत्मीयता वाटते का, केवळ पक्षाकडे पाहून तो मतदार आपल्याला नको असलेल्या उमेदवाराच्या पारड्यात आपले मत टाकणार का, या गोष्टीकडे मात्र पक्षनेत्यांचे दुर्लक्ष झालेले दिसते. त्यांना त्याला महत्त्व देण्याची गरज वाटत नसावी, कारण पक्षांची भिस्त यावेळी आपल्या पारंपरिक मतदारांपेक्षा आलेल्या नव्या उमेदवारांच्या मतदारसंघातील वैयक्तिक बळावर अधिक दिसून येते.
तिकिटेच्छुकांच्या असंतोषाचे तीव्र पडसाद
प्रवीण झांट्ये, दिनार तारकर यांचा कॉंग्रेसला रामराम
डॉ. आमोणकरही भाजपा सोडण्याच्या तयारीत
तिकीटवाटपावरून प्रमुख राजकीय पक्षांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाचे पडसाद कालही प्रकर्षाने उमटले. कॉंग्रेसचे मयेचे इच्छुक उमेदवार प्रवीण झांट्ये यांना उमेदवारी नाकारली गेल्याने व तो मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिला गेल्याने त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला, तर मगोतर्फे सांताक्रुझमधून निवडणूक लढवण्यासाठी दिनार तारकर यांनीही काल कॉंग्रेसला रामराम ठोकला. भाजपाची साखळीची उमेदवारी न मिळाल्याने नाराज बनलेल्या डॉ. सुरेश आमोणकर यांनीही पक्षत्यागाचा विचार चालवला आहे. मात्र, आपण अद्याप राजीनामा दिलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
काणकोणची उमेदवारी आपल्यालाच मिळावी या मागणीसाठी इजिदोर फर्नांडिस यांनी काल दुपारपासून आपल्या शेकडो समर्थकांसह कॉंग्रेस भवनसमोर ठिय्या मांडला. काल गोव्यात दाखल झालेले अ. भा. कॉंग्रेस सरचिटणीस ऑस्कर फर्नांडिस यांना इजिदोर समर्थकांनी कॉंग्रेस भवनाच्या प्रवेशद्वारावर अडवून इजिदोर यांनाच काणकोणची उमेदवारी देण्याची मागणी केली. त्यामुळे काणकोणमध्ये भाजपातून दाखल झालेल्या विजय पै खोत यांना उमेदवारी द्यावी की इजिदोर यांनाच फेर उमेदवारी द्यावी असा पेच कॉंग्रेस पक्षापुढे निर्माण झाला आहे.
विकासाच्या नावाखाली देशाची लूट : पाटकर
राजकीय नेते व उद्योगपतींनी विकासाच्या नावाखाली देशाची लूट चालवली असून हा भ्रष्टाचार नाहीसा करण्यासाठी जनलोकपालाबरोबरच जनांदोलनांचीही गरज असल्याचे मत थोर समाजसेविका व नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी काल डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात ‘विकास योजनांचा फेरआढावा ः लोक चळवळीचे योगदान’ या विषयावर बोलताना मांडले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, नुसता बदल म्हणजे विकास नव्हे. तर हवा असलेला बदल म्हणजेच विकास होय. शिवाय झालेल्या विकासाचा फेरआढावाही घेणे महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. लोकांचा विकास व मानवी हक्क हाच विकासाचा निकष असल्याचे पाटकर यांनी पुढे स्पष्ट केले. देशातील नैसर्गिक संसाधनाचा वापर हा सर्वांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी व्हायला हवा होता पण तसे झाले नसल्याची खंतही पाटकर यांनी यावेळी व्यक्त केली. ही नैसर्गिक साधने ही सगळ्यांसाठी रोजीरोटीची साधने व्हायला हवी होती. मात्र, ती बनू शकली नाहीत हे कटू सत्य असल्याचे पाटकर यांनी खेदपूर्वक सांगितले.
देशभरातील करोडो लोक हे आजही झोपडपट्ट्यांत राहत असून आजही लाखो मुले कुपोषणाला बळी पडत असल्याचे त्या म्हणाल्या. दिवसभर राब राब राबणारे बांधकाम कामगार, शेत मजूर यांना कोणतेच पेन्शन मिळत नसून त्यांचे जीवन हे अत्यंत असुरक्षित असल्याचे त्या म्हणाल्या. मोठमोठे नोकरशहा हे हजारो-लाखो कमवतात. निवृत्त होतात तेव्हा त्यांच्या बँक खात्यात लाखो रु. असतात. या लोकांना मात्र लठ्ठ असे पेन्शन मिळत असते असे सांगून या अन्यायाविरुद्ध कोण आवाज उठवणार असा प्रश्न त्यांनी व्यक्त केला. या आशा परिस्थितीतूनच देशभरात अडीच लाख शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे सांगून त्या खरे म्हणजे आत्महत्या नसून हत्याच असल्याचे मत पाटकर यांनी व्यक्त केले. कृषी क्षेत्राचा विकास झाला. नवी संकरित व जास्त पीक देणारी बियाणी आली, खते आली, किटक नाशके आली. मात्र हे सगळे येऊनही शेतकर्यांच्या जीवनात समृद्धी आली नाही. भ्रष्टाचारामुळे ती येऊ शकली नाही. परिणामी शेतकर्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबिल्याचे त्या म्हणाल्या. आदिवासींना त्यांचे वनहक्क देण्यासाठी कायदा संमत होऊन चार वर्षे झाली. मात्र, त्याची अमलबजावणी अजून केली जात नसल्याचे पाटकर म्हणाल्या. दलितांनाही त्यांच्या सामूहिक मालमत्तेचे अधिकार देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. देशातील बहुसंख्य लोकांना अजून विकासाची फळे चाखता येत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
भूगर्भातील पाण्याचीही विक्री
आता तर भूगर्भातील पाण्याचीही कोकाकोला, पेप्सीसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना ५५ पैसे प्रती लिटर एवढ्या अत्यल्प दरात विक्री केली जाते. तेच लोक मग जनतेला १५ रु.त पेप्सी विकत असतात, असे त्या म्हणाल्या. स्वातंत्र्यापूर्वी इस्ट इंडिया कंपनीने भारताची लूट केली होती. आताही देशातील काही मोठ्या उद्योगपतींनी व काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी देशाची लूट चालवली असल्याचे त्यांनी सांगितले. लवासा नावाचे जे शहर उभे केले जात आहे त्यात २५ हजार कोटी रु. चा घोटाळा झाला असल्याचे त्या म्हणाल्या.
श्रीमंत रेषाही हवी
दारिद्य्र रेषेप्रमाणेच देशात श्रीमंत रेषाही हवी असे सांगून जे गर्भश्रीमंत लोक आहेत त्यांच्या मालमत्तेवर व्याजाच्या दरात कर बसवायला हवा. तसे केल्यास आज जनतेकडून कर घेण्याची गरजच भासणार नसल्याचे त्या म्हणाल्या. देशात सध्या ‘एक बादशहा और सौ फकीर’ अशी स्थिती झालेली असून ते चित्र त्याद्वारे बदलू शकेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेसने पक्षपात केल्याने अपक्ष म्हणून रिंगणात : शॅलोम
गोव्यातील कॉंग्रेस पक्ष म्हणजे कुटुंबराज बनले आहे. पाच कुटुंबातील १२ सदस्यांपेक्षा अधिकांना उमेदवारी देऊन कॉंग्रेसजनांची बदनामी केली आहे. पांच कुटुंबांतील माणसांना उमेदवारी मिळते व आपणास नाकारून पक्षपात केल्याचे खासदार फ्रांसिस्क सार्दिन याचे पुत्र शॅलोम सार्दिन यांनी सांगितले.
प्रामाणिक, शिक्षितांना, गोव्याच्या हितासाठी वावरणार्याना पक्षांत स्थान काही. आपण आता आपल्या समर्थकांना विश्वासात घेऊन निर्णय घेईन व दि. १३ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी भरण्यास मुदत असल्याने आपण कुडतरी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल करीन, असेही शॅलोम यांनी जाहीर केले.
राज्यातील बार बंद ठेवण्याचा इशारा
खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोव्यात आलेल्या निरीक्षकांनी पोलिसांच्या मदतीने बार व रेस्टॉरंटवाल्यांना सतावण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ दि. १७ पासून बार व रेस्टॉरंट बंद ठेवण्याची तयारी केली आहे, तसा इशारा त्यांनी अबकारी खात्याला दिला आहे. त्यामुळे अबकारी खात्यासमोर पेच निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री कामत आज उमेदवारी भरणार
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षातर्फे मुख्यमंत्री दिगंबर कामत मडगाव मतदार संघातून आज गुरुवार दि. ९ रोजी सकाळी ११ वा. निर्वाचन अधिकार्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
फ्रान्सिस सार्दिन कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर हे विधानसभा निवडणूक लढवत असल्याने प्रदेश समितीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांची नेमणूक करण्यात आली आहे. सोनिया गांधी यांनी त्यांच्या नेमणुकीस मान्यता दिल्याचे कॉंग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरपोलिसांच्या बदल्या
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून पोलीस खात्याने १९२ पोलीस अधिकारी व ४९८ हवालदारांच्या बदल्यांचा आदेश काल काढला. या सर्व पोलिसांना तात्काळ नव्या पोलीस स्थानकांवर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
खनिज निर्यात बंदीसंदर्भातअंतिम निर्णय लवकरच
केंद्रीय खाण सचिवांचे प्रतिपादन
गोव्यातून होणार्या लोहखनिज निर्यातीवर बंदीसंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालय लवकरच अंतिम निर्णय घेईल, असे प्रतिपादन केंद्रीय अतिरिक्त खाण सचिव एस. के. श्रीवास्तव यांनी काल बंगलोरमध्ये केले. लोहखनिज व मँगनिजच्या बेकायदेशीर खाणींसंदर्भात चौकशी करणार्या न्या. एम. बी. शाह समितीने खनिज निर्यातीवर बंदीची शिफारस केलेली आहे. त्यासंदर्भात त्यांनी हे विधान केले.
अश्लील चित्रफीत पाहणार्या मंत्र्यांचे कर्नाटकात राजीनामे
कर्नाटक विधानसभेचे कामकाज सुरू असताना अश्लील चित्रफीत पाहताना आढळलेल्या भाजपा सरकारमधील तिघाही मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदांचे राजीनामे काल सादर केले. हे राजीनामे राज्यपाल भारद्वाज यांनी स्वीकारले आहेत. मात्र, त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याने समाधानी नसलेल्या विरोधी पक्षाने काल या विषयावरून जोरदार निदर्शने केली. या तिघाहीजणांना कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात ६२ % मतदान
उत्तर प्रदेशात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. ४०३ पैकी ५५ मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानात ६२ % मतदारांनी आपला हक्क बजावल्याचे निवडणूक अधिकार्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या निमित्ताने
- सुभाष साजू हळर्णकर, अध्यक्ष, सहकार भारती, गोवा प्रदेश.
संयुक्त राष्ट्रसंघाने २०१२ हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार जगातील सर्वच देशांमध्ये चालू वर्ष सहकार चळवळीला वाहिलेले आहे. त्या निमित्ताने जगभरात सहकार चळवळीचे विविधांगी कार्यक्रमही आयोजिण्यात येत आहेत. या वर्षाचे औचित्य साधून सहकार भारतीनेसुद्धा संयुक्त राष्ट्रसंघाच्या संमतीने आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन केले आहे. संपूर्ण जगभरातून अत्यंत उत्साहात या परिषदेला प्रतिसाद मिळत आहे. मध्य प्रदेश सरकार, सहकार भारती आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद ९ आणि १० फेब्रुवारी असे दोन दिवस भोपाळ येथे संपन्न होत आहे. सहकार चळवळ ही अत्यंत परिणामकारक आणि यशस्वीपणे राबवत असल्याचे अनेक देशांमधल्या सहकारी संस्थांच्या यशस्वी कार्यपद्धतीवरून दिसते.
मंत्र्यांची ‘करमणूक’
राजकारण्यांच्या रंगेलपणाच्या कहाण्या आजवर अनेक नाटका - चित्रपटांच्या कथानकाचा विषय बनल्या. आपल्या निळूभाऊंनी तर अशा अनेक खलनायकी भूमिका अजरामर केल्या. पण प्रत्यक्ष राजकारणात त्या खलनायकांनाही लाजवील अशा अशा रंगेलपणाचे घृणास्पद दर्शन काही नेतेमंडळींनी वेळोवेळी जनतेला घडवले. काहींची राजकीय कारकीर्द त्यामुळे संपुष्टात आली, तर अनेकजण आजही उजळ माथ्याने राजकारणात वावरत आहेत. देशाच्या जवळजवळ प्रत्येक राज्यामध्ये राजकीय नेत्यांची प्रकरणे कधी ना कधी उजेडात आलेली आहेत आणि गोवाही त्याला अपवाद नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये उत्तर प्रदेशच्या किमान दहा राजकारण्यांना अशा प्रकरणांत राजीनामे द्यावे लागले आहेत, ज्यामध्ये सहाजण मंत्री होते. राजस्थानचे मंत्री महिपाल मदेर्ना यांचे ‘भंवरी देवी’ प्रकरण तर ताजेच आहे. ८६ वर्षांचे नारायणदत्त तिवारीदेखील जेव्हा आपल्या राज्यपालपदाला काळीमा फासत तीन महिलांसमवेत आंध्र प्रदेशच्या राजभवनात चाळा करताना पकडले जातात, तेव्हा अनैतिकतेची ती परिसीमा ठरते. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे कर्नाटक विधानसभेत कामकाज सुरू असताना चोरून आपल्या मोबाईलवर अश्लील चित्रफीत पाहणार्या भाजपाच्या मंत्र्यांना काल राजीनामे द्यावे लागले.
चर्चिलची कन्या, रवींचा पुत्र, बाबूशची पत्नी आणि मडकईकरांच्या बंधूसही कॉंग्रेस उमेदवारी
एका कुटुंबातील एकालाच उमेदवारी या तत्त्वाशी फारकत घेत कॉंग्रेसने काल आपली दुसरी यादी जाहीर करताना साबांखामंत्री व नावेलीचे उमेदवार चर्चिल आलेमाव यांची कन्या वालंका आलेमाव हिला बाणावलीतून, कुंभारजुवेचे उमेदवार व विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांचे बंधू धाकू मडकईकर यांना प्रियोळ मतदारसंघातून, फोंड्याचे उमेदवार व गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांना मडकईतून आणि सांताक्रुझचे उमेदवार व शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेर्रात यांची पत्नी जेनिफर हिला ताळगावातून उमेदवारी घोषित केली.
कॉंग्रेसने आपली २२ उमेदवारांची पहिली यादी गेल्या शनिवारी जाहीर केली होती. त्यानंतर काल सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यात शिवोली मतदारसंघात उदय पालयेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर कुडतरीतून आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना उमेदवारी जाहीर झाली.
पर्वतकरांनी उमेदवारी नाकारावी
भाजप कार्यकर्त्यांचा दबाव
श्रीपाद नाईक यांच्या उमेदवारीवरून प्रदेश भाजपात उठलेले वादळ अद्याप शमलेले नाही असे दिसत आहे. परवा काही भाजप कार्यकर्त्यांनी पर्वरीतील भाजप उमेदवार गोविंद पर्वतकर यांच्या घरी जाऊन त्यांना उमेदवारी मागे घेण्यास बजावले. श्रीपाद नाईक यांना उमेदवारी नाकारलेली असताना त्यांनी ती घेऊ नये अशी त्यांची भूमिका होती. भाजपच्या प्रचार कार्यात भाग घेणार नसल्याची तंबीही त्यांनी यावेळी दिली असल्याचे कळते.
काल या सर्व कार्यकर्त्यांना भाजप कार्यालयात पाचारण करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी पर्वतकरांनी उमेदवारी मागे घ्यावी अशी भावना व्यक्त केल्याचे कळते. प्रदेश भाजप व श्रीपाद नाईक यांच्यातील दरी रुंदावण्यास विरोधी पक्षनेते व भाजप प्रदेशाध्यक्ष जबाबदार असल्याचा आरोपही या कार्यकर्त्यांकडून झाल्याचे समजते. पर्वतकरांच्या प्रचारावर बहिष्कार टाकण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे. यामुळे हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीला ‘मये’ चालेल मात्र एका अटीवर...
मये मतदारसंघात रॉय नाईक अपक्ष किंवा अन्य कोणत्याही पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविणार नसल्याची गृहमंत्री रवी नाईक यांनी हमी दिल्यास मये मतदारसंघ आपल्या पक्षासाठी ठेवण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे.
सध्या कॉंग्रेसने मये मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याचे ठरवून रुद्रेश चोडणकर यांना उमेदवारी देण्याची विनंती केली आहे. रॉय यांनी अपक्ष निवडणूक लढविल्यास राष्ट्रवादीला त्याचा फायदा होणार नाही.
दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांची निवडणूक आयोगाकडून बदली
मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध असण्यावरून निवडणूक आयोगाने काल दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी संदीप ज्यॅकीस यांच्या बदलीचे आदेश दिले. त्यांच्या जागी डी. ए. हवालदार, आयएएस हे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
लाच प्रकरणी सहायक अभियंत्यास अटक
एका कंत्राटदाराकडून रु. ५० हजार लाच घेताना काल सीबीआयने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहायक अभियंते आर. पी. कीणी यास अटक केली.
‘रवींद्रनाथांनी पूर्व व पश्चिमेतील विद्वानांना एकत्र आणले’
कोसंबी वैचारिक महोत्सवाचे उद्घाटन
पूर्व व पश्चिमेतील विद्वानांना एकत्र आणण्याचे कार्य गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या हयातीत केल्याचे उमा दासगुप्ता यांनी काल कला अकादमीत डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात ‘मिटिंग ऑफ इस्ट ऍण्ड वेस्ट - रवींद्रनाथ टागोर्स चॅलेंजिग आयडियास फॉर वर्ल्ड चेंज’ या विषयावर व्याख्यान देताना सांगितले.
मिनीबसखाली चिरडून दुचाकीस्वार ठार
मुळगाव-नानोडा रस्त्यावर काल दुपारी एका मिनीबसची दुचाकीला धडक बसून दुचाकीस्वार नारायण चंद्रकांत केरकर (२६) हा वडावल येथील युवक जागीच ठार झाला.
केंद्रीय अर्थसंकल्प १६ मार्च रोजी
१२ मार्चपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
केंद्रीय अर्थसंकल्प यंदा १६ मार्च रोजी मांडला जाणार असून रेल्वे अर्थसंकल्प त्याच्या दोन दिवस आधी म्हणजे १४ मार्च रोजी मांडला जाईल. सन २०१२ - १३ चे सर्वेक्षण १५ मार्च रोजी मांडले जाणार आहे.
व्हिक्टोरिया समर्थकांचेआज सामूहिक राजीनामे
कॉंग्रेस हाऊसवर मोर्चा काढणार
सांताक्रुझच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांना कॉंग्रेसने उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ सांताक्रुझच्या गट कॉंग्रेससह मतदारसंघातील सुमारे २५०० कार्यकर्ते आज (८ रोजी) कॉंग्रेस सदस्यत्वाचे सामूहिक राजीनामे देणार असल्याचे सांताक्रुझ गट कॉंग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश नाईक यांनी सांगितले. वरील २५०० कार्यकर्ते आज कॉंग्रेस हाऊसवर मोर्चा आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांना वरील कार्यकर्ते आपली राजीनामापत्रे सादर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप मंत्री ‘ब्लू फिल्म’ पाहताना आढळले
कर्नाटक विधानसभेत प्रकार
कर्नाटक विधानसभेत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा सुरू असतानाच भाजपचे दोन मंत्री मोबाईलवर ‘ब्लू फिल्म’ पाहताना आढळून आल्याने खळबळ माजली.
तिघा दुचाकी चोरांना अटक
फोंडा शहरात पार्क करून ठेवलेल्या दुचाकी वाहनाना बनावट चावी वापरून दुचाकी चोरणार्या तीन युवकांना फोंडा पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. पैकी दोन अल्पवयीन आहेत.
महाराष्ट्रात ६५ टक्के मतदान
२७ जिल्हा परिषद आणि ३०५ पंचायत समित्यांसाठी मंगळवारी सरासरी ६५ टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी मुंबईत दिली.
राजभाषा अंमलबजावणीची ऐशीतैशी..!
- दिलीप बोरकर
याच महिन्याच्या ४ तारखेला राजभाषा दिनाचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम गोवा कोंकणी अकादेमीने मडगावच्या रवींद्र भवनमध्ये साजरा केला. राजभाषा कायदा संमत करून यंदाच्या वर्षी २५ वर्षाचा काळ उलटला तरी हा कायदा गोव्यात अस्तित्त्वात आहे, याची सुतराम कल्पना गोव्यातील जनतेला आहे असे वाटले नाही, कारण एक कोंकणी अकादेमी वगळता या दिनाची आठवण सरकार आणि आम जनतेला सोडा, देशी भाषा संवर्धनासाठी झटणार्या एकाही संस्थेला झाली नाही, यावरून गोमंतकीयांना सदर दिनाचे महत्त्व किती आहे, याची कल्पना येते.
बंडोबाच बंडोबा
यंदाच्या गोवा विधानसभा निवडणुकीत बंडखोरी अटळ असेल असे सूतोवाच बर्याच दिवसांपूर्वी केले होेते, ज्याचे दृश्य पडसाद आता ठळकपणे दिसू लागले आहेत. कॉंग्रेस असो किंवा भाजपा असो, जवळपास प्रत्येक मतदारसंघात बंडोबा तयार झाले आहेत आणि कमी - अधिक प्रमाणात पक्षाच्या अधिकृत उमेदवारास दणका देण्यास सज्ज झाले आहेत. सर्वांत लक्षवेधी बंड ठरले ते श्रीपाद नाईक यांचे. त्यांच्या उमेदवारीसंदर्भात जो काही खेळ मांडला गेला, त्याच्या निषेधार्थ त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ती नाकारून शहाला काटशह दिला. अद्याप त्यांनी पक्षाच्या विरोधात कोणतीही टिप्पणी केलेली नसली तरी त्यांच्या विषयावरून पक्ष दुभंगलेला आहे हे कोणालाही कळून चुकते. जे श्रीपाद यांच्या बाबतीत घडले आहे, तेच भाजपाचेच ज्येष्ठ नेते प्रकाश वेळीप यांच्या बाबतीतही घडणार आहे.
योगमार्ग - राजयोग (सत्य - ४०)
- डॉ. सीताकांत घाणेकर
जगातील प्रत्येक माणसाला आपल्या कर्माप्रमाणे फळ मिळते. सत्कर्माचे फळ चांगले व दुष्कर्माचे फळ वाईट हा निसर्गाचा सिद्धांत आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने दक्षतेने कर्म करायला हवे व आपले चारित्र्य घडवायला हवे. ह्या जन्मातील आपले प्रारब्ध चांगले आहे. ह्याचे कारण म्हणजे अनेक जन्माचे संचित कर्म. हे सत्य सुज्ञ मानवाने कधीही विसरता कामा नये. पण दुर्भाग्याने अनेक व्यक्तींच्या बाबतीत अनेक वेळी असे घडत नाही. उलट पूर्वसुकृतामुळे जी विद्या, संपत्ती किंवा सत्ता त्यांना मिळते त्यामुळे ते स्वार्थी व उन्मत्त बनतात. ते अधर्माने वागतात. इतरांवर अत्याचार करतात. कारण कर्मसिद्धांताची त्यांना विस्मृती होते. अशा घटना विश्वात आजच नाही तर इतिहासात देखील प्रत्येक युगात अनेक वेळा दिसतात.
नवी दिशा .. नवी दृष्टी देणारी - नूपुर...!
- प्रा. रमेश सप्रे
‘‘माझ्या नावाचं स्पेलिंग ‘एन् ओ ओ पी यू आर्’ असं करा हं .. अन् हिंदीत लिहिताना ‘नू’ दुसरा व ‘पु’ पहिला बरं ...’’ आईवडलांच्यामध्ये बसलेल्या एका चिमुकल्या चानीनं (खारोटीनं) उठून सांगितलं. मी प्रवेश यादीत तिचं नाव लिहित होतो. तिचे बाबा प्रवेशअर्ज भरत होते.. आई अकारण अस्वस्थ नि ही निर्धास्त..बिंधास!
कॉंग्रेसचे उर्वरित उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता
अकरा मतदारसंघातील उमेदवारी निश्चित करण्यासाठी काल सकाळपासून दिल्लीत बैठका सुरू असून आज काही मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.
कुडतरी मतदारसंघाची उमेदवारी शालम सार्दिन यांना मिळवून देण्यासाठी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांना दिल्लीत बोलावून घेतले आहे तर मुरगाव मतदारसंघाचाही उमेदवार निवडण्याच्या प्रश्नावर मतभेद निर्माण झाले आहेत.
मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्यासाठी संकल्प आमोणकर यांचा पत्ता कापण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने त्यांचे मन वळविण्यासाठी आमोणकर यांनाही काल दुपारी दिल्लीत बोलावून घेतले आहे.
गोव्याच्या राजकारणाची सूत्रे मोजकी कुटुंबेच हलवणार?
राजकारणातील घराणेशाहीविरुद्ध जनतेमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना प्रत्यक्षात राजकीय पक्ष मात्र घराणेशाहीलाच उत्तेजन देणारी पावले टाकत असल्याचे दिसत आहे. येत्या ३ मार्च रोजी गोव्यात होणार्या निवडणुकीत पाच कुटुंबांतील दहा जण उमेदवार म्हणून उतरणार असल्याचे संकेत मिळत असून ते निवडून आले तर आगामी विधानसभेत काही घराण्यांचाच कारभार चालेल अशी भीती जनतेला वाटू लागली आहे.
प्रतापसिंह राणे व विश्वजित हे राणे पिता - पुत्र, चर्चिल व ज्योकीम हे आलेमाव बंधू कॉंग्रेस पक्षाच्या सत्तेत गेल्यावेळी सहभागी झाले होते. आता नव्याने उमेदवारी देताना एकाच कुटुंबातील एकाहून अधिक सदस्यांना उमेदवारी न देण्याचे गेल्या निवडणुकीत पाळलेले तत्त्व बासनात गुंडाळल्याचे दिसून येत आहे.
कुठ्ठाळी मतदारसंघासाठी जुझे फिलीप दिल्लीला
आगामी विधानसभा निवडणुकीत कुठ्ठाळी मतदारसंघाची उमेदवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मिळावी यासाठी उच्च पातळीवरून प्रयत्न करण्यासाठी महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा संध्याकाळी उशिरा दिल्लीला रवाना झाले.
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष यांच्यामध्ये यापूर्वीच शिक्कामोर्तब झालेले असून राष्ट्रवादी पक्षाला सात जागा देण्याबाबत निर्णय झालेला आहे. यातील सहा जागा निश्चित झालेल्या असून सातवा मतदारसंघ कुठ्ठाळी की मये याबद्दलचा निर्णय सध्या वरिष्ठ नेत्यांकडे सोपविण्यात आलेला आहे. पक्षाचे नेते यापैकी कुठ्ठाळी मतदार संघाकडे जास्त लक्ष केंद्रित करीत आहेत.
थिवीतून लढण्यास मगोकडे उमेदवार नाही
चार उमेदवार जाहीर
थिवी मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी मगोकडे उमेदवार नसल्याने मगो नेत्यांनी आपल्या पक्षाच्या तिकीटावर माजी आमदार सदानंद शेट तानावडे यांनी निवडणूक लढवावी म्हणून त्यांना साकडे घातले आहेत. त्यामुळे मगो व भाजपसमोर या मतदारसंघाच्या बाबतीत समस्या निर्माण झाली आहे.
पहिल्या दिवशी दोन उमेदवारांचे अर्ज
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या काल पहिल्या दिवशी केवळ दोघा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरून निर्वाचन अधिकार्यांकडे सादर केले.
समीर साळगावकर मांद्य्रात अपक्ष म्हणून लढणार
मांद्रे मतदारसंघाची उमेदवारी नाकारल्याच्या कारणावरून कॉंग्रेसच्या आर्थिक विभागाचे प्रमुख समीर साळगावकर यांनी काल आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा सादर करून या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली.
अग्निशामक दलात भरतीची चौकशी
विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर अग्निशामक दलात ११ पदे भरण्यात आल्याचा संशय व्यक्त करून आयरिश रॉड्रिग्ज यांनी त्या बाबतीत जी तक्रार आयोगाकडे केलेली आहे त्याबाबत चौकशी चालू असल्याचे गुरुदास नावती यांनी काल सांगितले.
१५ दिवसांत आक्षेपार्ह मजकूर हटवा
कोर्टाचा संकेतस्थळांना निर्वाणीचा इशारा
१५ दिवसांत आक्षेपार्ह मजकूर हटवावा असा निर्वाणीचा इशारा दिल्लीच्या कोर्टाने याहू, गुगल, फेसबूकसह २२ संकेतस्थळांना दिला असून संबंधित मजकूर काढून टाकल्याचे प्रतिज्ञापत्र १ मार्चपर्यंत सादर करावे, असे सांगितले आहे.
‘आणखी वेळास तुम्ही पात्र नाही’ असे या संकेतस्थळांना कोर्टाने खडसावले. धर्मद्वेषी, समाजविघातक मजकूर प्रसारित केल्याचा ठपका या संकेतस्थळांवर ठेवला आहे. याप्रकरणी काल सुनावणी झाली.
संयुक्त जनतादल १५ जागा लढवणार
जनता दल (संयुक्त) गोवा विधानसभा निवडणुकीत १५ जागा लढवणार असल्याचे पक्षाचे गोव्यातील उपाध्यक्ष डॉ’निक सावियो फर्नांडिस यांनी सांगितले.
डी. डी. कोसंबी वैचारिक महोत्सव आजपासून
बुद्धीला वैचारिक खाद्य देणारा गोवा राज्य कला आणि संस्कृती संचालनालयाचा पाचवा डी. डी. कोसंबी वैचारिक महोत्सव आज पासून सुरू होत आहे. ७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान कांपाल पणजी येते कला अकादमीच्या मा. दिनानाथ मंगेशकर सभागृहात जागतिक कीर्तीच्या विचारवंताना ऐकण्याची नामी संधी गोमंतकीयांना मिळणार आहे.
प्राप्तीकर सूट दोन लाखांवर जाण्याची शक्यता
प्राप्तीकरातून वगळण्याची मर्यादा सध्याच्या एक लाख ऐंशी हजारांवरून दोन लाखांवर नेण्याचा निर्णय सरकार घेण्याची शक्यता असून आगामी अर्थसंकल्पात तशी घोषणा संभवते. सरकारच्या विचाराधीन असलेल्या डायरेक्ट टॅक्स कोडमध्ये तशा प्रकारची शिफारस करण्यात आली आहे. सरकारने त्याची अंमलबजावणी जरी लांबणीवर टाकलेली असली, तरी त्यातील काही शिफारशी या वर्षीच्या अर्थसंकल्पात लागू केल्या जाऊ शकतात.
राजकारणात उतरण्यास हरकत नसेल : रॉबर्ट
सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका राजकारणात सक्रिय होण्याची चर्चा असतानाच प्रियंकाचे पती रॉबर्ट वध्रा यांनी काल आपली सक्रिय राजकारणात उतरण्याची इच्छा असल्याचे जाहीर केले. ‘‘मी येथे माझ्या मेहुण्यासाठी आलो आहे. जनतेसाठी मी काही बदल घडवू शकत असेन तर त्यासाठी राजकारणात उतरण्यास माझी हरकत नसेल’’ असे वधरा यांनी उत्तर प्रदेशमध्ये प्रचारात सहभागी झाले असता सांगितले. ‘‘मी ज्या कुटुंबातील मुलीशी विवाहबद्ध झालो आहे, ते कुटुंब राजकारणात आहे. त्यामुळे मी राजकारणापासून दूर राहू शकत नाही. योग्य वेळ असेल तेव्हा योग्य तो निर्णय घेईन’’ असे ते म्हणाले. मात्र, आपले लक्ष्य सध्या कामावर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आश्वासनांच्या पूर्ततेसाठी पर्रीकरच हवेत
- एन. शिवदास
जनसंपर्क यात्रेत व अन्य सार्वजनिक सभांतून बोलताना विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर नेहमी आपला पक्ष सत्तेवर आल्यास अमूक अमूक योजना अंमलात आणणार अशा आशयाची आश्वासने देत आहेत. पेट्रोलचे भाव कमी करणे, निराधार महिलांची पेन्शन रक्कम वाढवून देणे, कचर्याची समस्या सोडवणार या व अशा प्रकारची अनेक आश्वासने ते सभांमधून देत आहेत. हल्लीच दै. ‘नवप्रभा’तून एका स्तंभलेखकाने मनोहर पर्रीकरांच्या या आश्वासनाची खिल्ली उडवून त्या आश्वासनांना ‘हवेतील आश्वासने’ असे म्हटले आहे. या लेखकाने आपली निष्ठा व प्रतिष्ठा गहाण टाकून मुख्यमंत्र्यांकडे लाळघोटेपणा करून एका सरकारी संस्थेचे अध्यक्षपद पटकावले आहे. आपली कोणी दखल घेत नाही असा टाहो फोडत शेवटी त्यांंनी, त्यांच्या काही ‘बारमेट’ मित्रांकरवी स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. मात्र विरोधी पक्षाचे पुढारी मनोहर पर्रीकर आपल्या पक्षाच्या प्रचारयात्रेत लोकांना जी आश्वासने आणि कार्यक्रम सादर करीत आहेत, त्याच्याशी वास्तविक या स्तंभलेखकाचे काहीही देणे-घेणे नाही. तरीही ‘नवप्रभा’चा हा स्तंभलेखक भारतीय जनता पक्षाला हिणवून कदाचित मुख्यमंत्र्यांनी त्याच्यासाठी जे काय केले, त्याचे सार्थक झाले असे भासविण्याचा तो प्रयत्न असावा. परंतु, भाजपाच्या जनसंपर्क यात्रेत लोकांना जी आश्वासने दिलेली आहेत, ती आश्वासने वरवरची नसून ती अभ्यासाअंती आणि सध्याची राजकीय व सामाजिक परिस्थितीचा विचार करूनच दिलेली आहेत. विद्यमान सरकारने गोव्याला काय दिले? तर सर्वांनी भयमुक्त लुटावे, मी माझ्या जागी, तुम्ही तुमच्या जागी, हवे ते करा हे आपल्या सहकार्यांना सांगितले. सरकारी नोकरांनाही, त्यांना हवा तसा ढिला राजकारभार करा, शासक म्हणून मी कुठलीही कारवाई करणार नाही, असा संदेश दिला गेला.
भिडू रिंगणात
कॉंग्रेस - राष्ट्रवादी आणि भाजपा - मगो युतीचे घोडे अखेर गंगेत न्हाल्याने राजकीय रणधुमाळीस आता तोंड फुटणार आहे. कॉंग्रेसने आपली २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि लागोपाठ भाजपानेही आपले २२ उमेदवार जाहीर केले. त्यामुळे काही मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. मांद्रे मतदारसंघात दयानंद सोपटे आणि डिचोलीत राजेश पाटणेकर निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसवासी झाले, तरी त्यांना तिकीट दिले जाणार की नाही या शंकेला पूर्णविराम देत दोघांनाही उमेदवारी देत कॉंग्रेसने पक्षनिष्ठेपेक्षा जिंकून येण्याच्या क्षमतेलाच पक्षाचे प्राधान्य असेल याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पक्षाच्या निष्ठावंतांमधील अस्वस्थतेचा त्यामुळे या निवडणुकीत स्फोट होणे अटळ आहे. डिचोली गट कॉंग्रेस समितीने राजीनामे सादर करून बंडाचा बिगुल वाजवला आहेच. अनेक मतदारसंघांमध्ये विविध राजकीय पक्षांपुढे यावेळी अशा बंडाळीचे आव्हान उभे असणार आहे. भाजपाने निवडणूक जवळ येताच पक्षाचे एकेकाळचे ज्येष्ठ नेते डॉ. सुरेश आमोणकर यांना पक्षात स्वगृही परत आणले, परंतु साखळीतून उमेदवारी मात्र प्रमोद सावंत यांना बहाल केली आहे.
लोकशाहीचे भवितव्य
- डॉ. प्रमोद पाठक
या वर्षी भारताच्या प्रजासत्ताकाला ६२ वर्षे पूर्ण झाली. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यावेळच्या घटना समितीने निवडणूक प्रक्रिया, मंत्रिमंडळ, राज्यकारभार इ. विषयांवर निरनिराळी मतमतांतरे लक्षात घेऊन आणि राज्यकारभार सुनियंत्रित, स्वच्छ आणि कार्यक्षमतेने चालावा यासाठी मोठ्या प्रमाणावर चर्चा घडवून आणली आणि १९५० मध्ये घटनासमितीने ती मंजूर करून भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले.
भाजपचे २२ उमेदवार घोषित
युतीवर शिक्कामोर्तब
भाजप ३१ जागांवर लढणार
मगोला ८ जागा
पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत गोवा विधानसभा निवडणुकीसाठी २२ उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. या बैठकीला लालकृष्ण अडवाणी, लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेचे विरोधी नेते अरूण जेटली उपस्थित होते. उमेदवारांची यादी पक्षाचे सरचिटणीस अनंत कुमार यांनी रात्री उशीरा जाहीर केली.
शनिवारी उशिरा रात्री झालेल्या बैठकीत भाजप व मगोच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे व दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व युती करून संयुक्तपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
प्रचारास पुरेसा वेळ नसल्याने श्रीपादनी उमेदवारी नाकारली
विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारीचा हट्ट धरून बदलेले उत्तर गोव्याचे भाजप खासदार श्रीपाद नाईक यांना भाजपने काल उमेदवारी दिली खरी. मात्र, आता प्रचार करण्यासाठी केवळ २८ दिवसच बाकी असल्याचे कारण पुढे करून निवडणूक न लढवण्याचा निर्णय काल त्यानी घेतल्याने त्यांच्या समर्थकांच्या आनंदावर विरजण पडले.
दरम्यान, श्रीपादना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचे काल पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी सांगितले होते. त्यांना मिळणार असलेल्या मतदारसंघाबाबत दिल्लीत निर्णय होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. मात्र त्यानंतर श्रीपाद यांंनी स्वत: उमेदवारी न स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला.
उमेदवारी भरण्यास आजपासून प्रारंभ
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सोमवार दि. ६ फेब्रुवारीपासून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज दि. १३ फेब्रुवारीपर्यंत स्वीकारले जातील. दि. १४ रोजी छाननी होईल. संबंधित मतदारसघांचे निर्वाचन अधिकारी अर्ज स्वीकारतील.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी इमारतींतील सर्व निर्वाचन अधिकार्यांची कार्यालये सज्ज झाली आहेत. उमेदवारी अर्ज इंग्रजी, मराठी, कोंकणी व हिंदीमधून तयार करण्यात आले आहेत.
‘मगोने सरकारचा पाठिंबा काढला’
मगो पक्षाने दिगंबर कामत सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे काल मगोचे अध्यक्ष व आमदार दीपक ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
मगोने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे गोव्याचे राज्यपाल शंकरनारायण, सभापती प्रतापसिंह राणे व मुख्यमंत्री दिंगबर कामत यांना कळवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
भाषा सुरक्षा मंच युतीचा प्रचार करणार
भाषा सुरक्षा मंचाच्या काल येथे झालेल्या पालक महासंघ मेळाव्यात होऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस विरोधी प्रचार करण्याचा व भाजप-मगो युतीच्या समर्थनार्थ जाहीरपणे प्रचार करण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.
डिचोली गट कॉँग्रेसचा राजीनामा
कॉंग्रेस पक्षाचा निष्ठावंत सेवक म्हणून गेली काही वर्षे प्रामाणिक कार्य करूनही ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी आमच्या असंख्य कार्यकर्त्यांचा विश्वासघात केल्याने डिचोली गट कॉंग्रेस समितीच्या सर्व पदाधिकार्यांनी राजीनामा दिल्याची घोषणा नरेश सावळ, गटाध्यक्ष विघ्नेश गांवकर, महिला अध्यक्ष विद्या परब, कुंदन फोगेरी, अवदूत परब यांनी पत्रकार परिषदेत केली.
मये भूविमोचन समितीच्या उमेदवाराची घोषणा
मये भूविमोचन समितीतर्फे मयेचा प्रश्न सोडवण्यासाठी समितीने ऍड्. चंद्रशेखर नाईक यांना उमेदवारी जाहीर केला असून त्यांना विजयी करण्यासाठी सर्व घटनांतील मये वासियांनी खंबीरपणे सहकार्य करावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष, काशिनाथ मयेकर, सखाराम पेडणेकर, हरी नाईक, बाळकृष्ण प्रभू, हरिश्चंद्र च्यारी यांनी दिली.
कॉंग्रेसचे २२ उमेदवार घोषित
व्हिक्टोरियांना वगळले
बाबूश मोन्सेर्रात सांताक्रूझमधून
राष्ट्रवादीस ७ जागा
आज - उद्या, आज - उद्या करीत काल शेवटी कॉंग्रेसने २२ मतदारसंघांतील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. सांताक्रुझ मतदारसंघातील आमदार व गोवा विधानसभेतील एकमेव महिला प्रतिनिधी व्हिक्टोरिया फर्नांडिस यांना उमेदवारी नाकारण्यात आली असून त्यांच्या जागी विद्यमान शिक्षणमंत्री आतानासिओ ऊर्फ बाबूश मोन्सेर्रात यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत २२ उमेदवारांची ही यादी जाहीर केली. कुंभारजुव्याचे विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांची उमेदवारीही घोषित झालेली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती झाली असून सात जागा राष्ट्रवादीसाठी सोडल्या जातील असेही यावेळी सांगण्यात आले.
चिदंबरम यांना तात्पुरता दिलासा
टूजी घोटाळ्यात सहआरोपी करण्यास न्यायालयाचा नकार
टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात माजी अर्थमंत्री व विद्यमान गृहमंत्री पी. चिदंबरम यांना सहआरोपी करावे ही जनता पक्षाचे अध्यक्ष डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांची याचिका काल दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळून लावली. या निवाड्यामुळे चिदंबरम यांना पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी आपल्या अवघ्या दोन ओळींच्या निवाड्यात सदर याचिका फेटाळून लावली.
न्यायालयाचा निवाडा येताच याचिकादार जनता पक्षाचे अध्यक्ष डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी या निवाड्याविरुद्ध आपण वरच्या न्यायालयात दाद मागू अशी प्रतिक्रिया दिली. ‘‘या निवाड्याने मी आश्चर्यचकीत झालो, परंतु निराश झालेलो नाही. हे असे घडत असते’’ असे डॉ. स्वामी म्हणाले. ‘‘मी उच्च न्यायालयात दाद मागेन आणि गरज भासल्यास सर्वोच्च न्यायालयातही जाईन’’ असे त्यांनी पुढे सांगितले.
बिल्डर लॉबीनेच तिकीट कापले : मामी
रुडॉल्फ अपक्ष म्हणून रिंगणात
नवी दिल्लीच्या काही बड्या बांधकाम व्यावसायिकांच्या दबावामुळेच आपल्याला कॉंग्रेस पक्षाने सांताक्रुझची उमेदवारी दिली नाही, असा आरोप सांताक्रुझच्या विद्यमान कॉंग्रेस आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी काल पत्रकार परिषदेत केला. ताळगावपाठोपाठ आता सांताक्रुझही बाबूश मोन्सेर्रात यांना परराज्यातील बिल्डर लॉबीच्या व भूमाफियांच्या घशात घालायचे आहे, मात्र त्यांना त्यात यश येणार नाही, असे व्हिक्टोरिया यांनी सांगितले.
दिगंबर कामत सरकारने तयार केलेला प्रादेशिक आराखडा हा गोव्याचा विनाश करणारा होता व त्याचसाठी आपण त्या आराखड्याला विरोध केला होता, असे सांगून त्याचसाठी आपल्याला उमेदवारी नाकारण्यात आल्याचा आरोप व्हिक्टोरिया यांनी केला. उमेदवारी नाकारली गेली असल्याने आपली पुढील कृती काय असेल या पत्रकारांच्या प्रश्नावर आपल्या मतदारसंघातील जनताच काय ते ठरवील, असे त्या उद्गारल्या.
भाजपचे उमेदवार आज ठरणार?
कॉंग्रेसने काल आपल्या २२ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी आज जाहीर करणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे काल उशिरा रात्रौ गोव्यात आगमन झाले. ते येथील स्थानिक नेत्यांशी सल्लामसलत करून महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचे सूत्रानी स्पष्ट केले.
६ जागांबाबत निर्णय : पटेल
गोवा विधानसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सहा मतदारसंघ निश्चित झाल्याचे सांगून सातवा मतदारसंघ कुठ्ठाळी की मये याबाबत निर्णय आज पर्यंत होणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी संध्याकाळी पत्रकारांजवळ बोलताना सांगितले.
आरुषी प्रकरणी पुढील सुनावणी २९ रोजी
आरुषी तलवार हत्या प्रकरणी गाझियाबाद न्यायालयाने आपली सुनावणी काल २९ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली. आपला खटला गाझियाबाद न्यायालयाकडून सर्वोच्च न्यायालयात हलवावा असा अर्ज डॉ. राजेश व नुपूर तलवार यांच्या वतीने सादर करण्यात आला असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.
अमेरिकी विद्यापीठांत वर्णभेद होत असल्याची तक्रार
अमेरिकेतील हॉर्वर्ड आणि प्रिन्सटन या दोन प्रतिष्ठित व जगविख्यात विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न करीत असताना आपल्याला वर्णभेदास सामोरे जावे लागल्याची तक्रार भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांनी केली असल्याने अमेरिकी प्रशासनाने त्यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे.
मायनॉरिटी फ्रंट सर्व जागा लढविणार
‘ऑल इंडिया मायनॉरिटी फ्रंट’ हा पक्ष होऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत सर्व ४० ही जागा लढवणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष एस. एम. असिफ यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
अडकलेल्या रशियन पर्यटकांची कॅपेर ट्रॅव्हल्सद्वारे व्यवस्था
गेल्या आठ दिवसांमागे मॉस्को येथील लांता टूरतर्फे चार्टर विमानातून ५०० पेक्षा अधिक पर्यटक गोवा दर्शनासाठी आलेले होते. मात्र लांता टूर आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्याने सदर पर्यटक गोव्यात अडकवून पडले. रशियाच्या मुंबई येथील दूतावासाने याबाबत मध्यस्थी करून त्यांना सुखरूप मायदेशी जाण्यासाठी प्रयत्न केले व भारतातील कॅपेर ट्रॅव्हल्सने हॉटेलातील सर्व बिलाची रक्कम देऊन त्यांना चार्टर विमानातून पाठविण्यात येत आहे असे रशियातील मुंबई येथील राजदूत निवासातील वकील आलेक्सी नोव्हीको यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
चर्चिलविरोधात सीबीआयकडे तक्रार : कवठणकर
सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत आपण आता केंद्रीय थेट कर मंडळाचे अध्यक्ष, सीबीआयचे विशेष संचालक, केंद्रीय दक्षता आयोग, अमलबजावणी संचालक आदींकडे तक्रार केली असल्याचे एनएसयूआयचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
आयपीएल लिलावात रवींद्र जडेजासाठी लागली चुरस
इंडियन प्रिमियर लीगसाठी काल झालेल्या लिलावात गतवर्षीप्रमाणेच यंदाही विलक्षण चुरस दिसून आली. क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याला प्रचंड मागणी असल्याचे दिसून आले. त्याच्यावर चेन्नई सुपर किंग्ज आणि डेक्कन चार्जर्स या दोन्ही संघांनी वीस लाख डॉलरची बोली लावली. मात्र समान बोली लावली गेल्याने नंतर ‘टायब्रेकर’ बोलीद्वारे चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली. सकाळी झालेल्या लिलावात ज्यांच्यावर बोली लावली गेली त्या सतरा खेळाडूंपैकी सहाजण भारतीय खेळाडू होते. गेल्या वर्षी गौतम गंभीरवर कोलकता नाईट रायडर्सने २४ दशलक्ष डॉलरची बोली लावली होती.
बदलते निकष लोकशाहीला मारक
- रमेश सावईकर
मुक्तीनंतर गोवा प्रदेश सर्वच क्षेत्रांत बदलत गेला आहे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात होणार्या स्थित्यंतरांमुळे गोमंतकीय जनतेचे जीवन झपाट्याने बदलले. या बदलत्या जीवनमानाचे काही फायदे जरूर आहेत, पण त्याचे वाढत जाणारे तोटे गोमंतकीयांना निश्चितच विचार करायला लावणारे आहेत. राजकीय क्षेत्राचा विचार करता, गोव्याची राजकीय परिस्थिती अपेक्षेपेक्षा बदलत जाऊन एका वेगळ्याच टप्प्यावर येऊन ठेपली आहे. राज्यात होणार्या विधानसभा किंवा पंचायत निवडणुका लढणे आणि जिंकणे ही सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने अशक्यप्राय बाब बनली आहे. निवडणुकांबाबत पक्ष, व्यक्ती, जातीयवाद आदी बाबी प्रमुख घटक ठरतात. त्याचबरोबर सत्ता आणि पैसा यांचा खेळही महत्त्वाचा असतो, नव्हे आहेच! केव्हढीही बंधने येवोत, निर्बंध जारी होवोत, निवडणुकांना लागलेले हे ‘सत्ता-पैसा’च्या वर्चस्वाचे ग्रहण सुटणे कठीण आहे. १९६३ साली गोवा, दमण व दीव संघप्रदेशासाठी पहिली विधानसभा निवडणूक झाली. गोवा मुक्तीनंतर या प्रदेशातल्या पीडित, गरीब व कष्टकरी बहुजन समाजाला कै. भाऊसाहेब बांदोडकर यांचे कर्तबगार नेतृत्व लाभले. त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने १९६३ सालची निवडणूक जिंकली नि कै. भाऊसाहेब बांदोडकर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री बनले.
विनाशाकडे?
राज्यातील बांधकाम व्यावसायिकांवर पडलेले आयकर विभागाचे छापे, या व्यावसायिकांकडून एका राजकारण्याने कोट्यवधींची लाच स्वीकारल्याचा आरोप आणि त्यानंतर प्रादेशिक आराखड्याचे हत्यार वापरून झालेल्या जमीन रूपांतरणाची प्रकरणे गोव्यात सध्या काय चालले आहे ते सांगण्यास पुरेसे आहे. व्यावसायिकांना व्यवसाय करायचा असेल तर स्थानिक राजकारण्यांकडून हिरवा कंदील मिळवल्याखेरीज तरणोपाय राहात नाही, कारण अन्यथा त्यांची पावलोपावली अडवणूक आणि छळणूक होते. त्यामुळे विनासायास सर्व कामे व्यवस्थित मार्गी लागावीत म्हणून राजकारण्यांना खुश करून टक्केवारीचे गणित सोडवणे त्यांना अधिक सोयीस्कर वाटू लागले आहे. गोव्यात सदनिका प्रचंड महागल्या आहेत, त्यामागे जमिनीचे वाढलेले दर हे कारण तर आहेच, परंतु राजकारण्यांना चारावा लागणारा मलिदा हेदेखील एक प्रमुख कारण आहे. गृहप्रकल्पांना वीज - पाण्याची जोडणी जरी हवी असेल तरी राजकारण्यांना, नोकरशहांना टक्केवारीचे गणित सोडवून दाखवल्याखेरीज कोणी एक पाऊल पुढे टाकू शकत नाही अशी परिस्थिती आहे. वर्षानुवर्षे हे चालत आले आहे आणि आता तर गळ्याशी येऊन ठेपले आहे.
डी. डी. कोसंबी वैचारिक महोत्सव
- प्रदीप आनंद नाईक
आपल्या जीवनाच्या वाटचालीत आपल्याला अनेक माणसे भेटतात, पण त्यातील अवघीच कायम स्मरणात राहतात. जीवनातील बर्यावाईट प्रसंगांपैकी थोडेच प्रसंग आपल्या मनात कायमचे घर करून राहतात. तद्वत अनेक कार्यक्रम वा उत्सवांतील अगदी मोजकेच कार्यक्रम आपल्या स्मृतीपटलावर कायमचे कोरले जातात, हेदेखील तितकेच खरे! असाच समस्त गोमंतकियांना भावलेला, आपल्या बुद्धीला चालनाच नव्हे तर वैचारिक खाद्य पुरविणारा गोवा राज्य कला आणि संस्कृती संचालनालय आयोजित दामोदर धर्मानंद कोसंबी वैचारिक महोत्सव. हा महोत्सव समस्त गोमंतकीयांत आता ‘डी. डी. कोसंबी वैचारिक महोत्सव’ वा ‘फेस्टीव्हल ऑफ आयडीयाज’ म्हणून रूढ झाला आहे.
पिंगुळीची ‘चित्रकथी’
- लाडोजी परब
ठाकर आदिवासी जमातीच्या विविध लोककला ऐतिहासिक आणि कोकणच्या संस्कृतीचे दर्शन घडवितात. पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील ठाकर आदिवासी जमातीच्या विविध लोककलांतील ‘चित्रकथी’ ही परंपरेनुसार पिढ्यान्पिढ्या चालत आलेली लोककला! रामायण, महाभारतातील पौराणिक कथांवर आधारलेली चित्रे जेव्हा दिव्यासमोर येतात, तेव्हा ती चक्क बोलू लागतात. चित्रकथीतील चित्रे रंगपटावर नाचू लागतात. सुमारे ३०० वर्षांपूर्वीच्या चित्रांच्या काही पोथ्या ठाकर आदिवासी समाजाने आजही जतन करून ठेवल्या आहेत. या लोककलेने कोकणच्या लोकसंस्कृतीत भर घातली आहे. सोमेश्वराच्या ‘मानसोल्लासा’मध्ये उल्लेख असलेली ‘चित्रकथी’ म्हणजे चित्रांद्वारेच कथन केली जाणारी कथा होय. हे एक कुतूहल, आकर्षण आदिवासी जमातीने जतन केले आहे.
चर्चिल व रेजिनाल्डविरुद्धच्या अपात्रता याचिका निकालात
२००९ साली पक्षांतरबंदी कायद्याखाली ‘सेव्ह गोवा’तून कॉंग्रेसवासी झालेले साबांखामंत्री चर्चिले आलेमाव व कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांना अपात्र ठरविण्याची मागणी करणारा बाणावलीचे माजी आमदार मिकी पाशेको यांनी केलेला अर्ज सभापती प्रतापसिंह राणे यांनी काल निकालात काढून पाशेको यांच्या अर्जात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. आलेमाव व लॉरेन्स यांचा कॉंग्रेस प्रवेशाचा निर्णय ग्राह्य धरला, असे असले तरी संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी निवडणूक आयोगाच्या दस्तऐवजानुसार ‘सेव्ह गोवा’ हा पक्ष अस्तित्वात असल्याचे सांगितले.
सभापती प्रतापसिंह राणे यांना वरील आदेश देण्याचा घटनात्मक अधिकार आहे, परंतु आयोगाच्या मतानुसार सेव्ह गोवा कोणत्याही पक्षात विलीन झालेला नाही, असे नावती यांनी सांगितले. त्यामुळे पाशेको या विषयावर कोणती भूमिका घेतील हे लवकरच स्पष्ट होऊ शकेल.
टू जी स्पेक्ट्रमची नव्याने लिलाव प्रक्रिया
टू जी स्पेक्ट्रमचे १२२ परवाने रद्द करत लिलाव पद्धतीनेच वाटप करण्याचा आदेश सुप्रीम कोटाने दिल्यानंतर दुसर्याच दिवशी, काल, दूरसंचार नियामक आयोगाने (ट्राय)ने स्पेक्ट्रम वाटपाची लिलाव प्रक्रिया सुरू केली. ‘ट्राय’ नव्या शिफारशी करणार असून त्यासंदर्भात आयोगाने १५ फेब्रुवारीपर्यंत सूचना मागवल्या आहेत.
‘थ्री-जी’ स्पेक्ट्रमच्या वाटपात ‘ट्राय’ने लिलाव पद्धतीच वापरली होती. आता रद्द झालेल्या परवान्यामुळे ५३६ मेगाहट्स स्पेक्ट्रम उपलब्ध होणार असून त्यांचे वाटपही लिलावानेच केले जाईल, असे ’ट्राय’चे प्रमुख सल्लागार सुधीर गुप्ता यांनी स्पष्ट केले.
पोलीस व प्रशासकीय अधिकार्यांच्या बदल्या
निवडणूक आयोगाच्या मान्यतेने सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार ९ पोलीस उपअधीक्षक तर १८ पोलीस निरीक्षकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत.
पोलीस उपअधीक्षक निळू राऊत देसाई (उपविभागीय पो. अधिकारी मडगाव), बोदीएट एड. डिसिल्वा (उपविभागीय पो. अधिकारी म्हापसा), दिनराज गोवेकर (उपविभागीय पो. फोंडा), लॉरेन्स डिसोझा (उपविभागीय पो. वास्को), उमेश गावकर (पोलीस मुख्यालय पणजी), जी. व्ही. पी. म्हापणे (उपविभागीय पोलीस अधिकारी केपे), देवू बाणावलीकर (कोकण रेल्वे), पी. आय. मापारी (दक्षिण गोवा पोलीस नियंत्रण कक्ष), नरेश म्हामल (एसओ डीजीपी).
डोक्यावरून ट्रकाचे चाक गेल्याने ठार
येथील कदंबा बस स्थानकासमोरच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर १० चाकी ट्रकाचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने मूळ मालार दिवार येथील अनिल सावळ (५४) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
दोन दलालांना अटक; रशियन महिलेची सुटका
हुमटावाडो - कळंगुट येथे एका गेस्ट हाऊसवर छापा टाकून कळंगुट पोलिसांनी दोघा दलालांना अटक केली. एकजण फरारी आहे. अटक केलेल्यांची नावे प्रमोद गुर्जन (३४), रा. मध्य प्रदेश व किरण राज (२५), रा. केरळ अशी आहेत. पोलिसांनी एका रशियन महिलेची सुटका करून तिला रायबंदर येथे रिमांड रुममध्ये पाठविले.
बिबटा जेरबंद
तामणे-पैंगीण येथील अनिल माधव टेंगसे यांच्या घरालगत एका बिबट्याला जेरबंद करण्यात काणकोणच्या अभयारण्य विभागाला यश आले. जेरबंद करण्यात आलेला बिबटा नर जातीचा असून साधारण पाच वर्षे वयाचा आहे. त्याची रवानगी बोंडला अभयारण्यात करण्यात आली असल्याची माहिती अभयारण्य विभागाचे प्रमुख विलास गावस यांनी दिली.
चित्रपट दिग्दर्शक राज कंवर यांचे निधन
प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक राज कंवर यांचे काल निधन झाले. ‘दीवाना’ (१९९२) या चित्रपटापासून आपली चित्रपट कारकीर्द सुरू केलेल्या कंवर यांनी ‘लाडला’, ‘जीत’, ‘जुदाई’, ‘दाग’, ‘बादल’, ‘हर दिल जो प्यार करेगा’ व ‘अंदाज’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.
कवठणकर यांना एनएसयूआयतून काढण्याच्या हालचाली
एनएसयूआयचे उपाध्यक्ष सुनिल कवठणकर यांनी संघटनेच्या आचारसंहितेचे उल्लंघन करून कॉंग्रेस पक्षाविरोधी कारवाया सुरू केल्याने त्यांची संघटनेतून हकालपट्टी करण्याची शिफारस आपण संघटनेच्या राष्ट्रीय नेत्यांना केली आहे. यासंबंधी लवकरच आदेश जारी होईल, असे एनएसयूआयच्या हसिबा अमिन यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
मिरवणुकीने येऊन अर्ज भरण्यास मनाई
दि. ३ मार्च रोजी होणार्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासंबंधीची अधिसूचना दि. ६ रोजी जारी करण्यात येणार असून अर्ज भरण्यासाठी येणार्या उमेदवाराला फक्त तीन वाहने घेऊन येण्याची मान्यता असेल, तर मिरवणूक आणल्यास ती निर्वाचन अधिकार्यांच्या कार्यालयापासून शंभर मीटर अंतरावर थांबवावी लागेल. या खर्चाचा उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समावेश केला जाईल, असे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
लाख रुपयांचे पाईप जळाले
आके येथील कॉश्ता फॅक्टरी लगत भूयारी मलनिःस्सारसाठी जीईसी पाईप साठवून ठेवले त्याला काल दुपारी अचानक आग लागून, एक लाख रुपयांची हानी झाली. या आगीत १० पाईप जळाले तर अग्नीशामक दलाने धाव घेऊन ती विझविल्याने २ लाख रुपयांच्या वाहिन्या वाचविल्या. या वाहिन्याच्या ठेकेदाराचे नाव मिळू शकले नाही.
सरदेसाई यांच्या ई-मेलमधील माहितीची चोरी : तक्रार
गोवा प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस विजय सरदेसाई यांची ई- मेल उघडून माहिती चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून तशी तक्रार विजय सरदेसाई यांनी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांचा राजीनामा
वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे सादर केला. त्यामुळे मगो-भाजप युतीचा किंवा स्वबळावर निवडणूक लढविण्याचा मगोचा मार्ग मोकळा झाला आहे.
जोपर्यंत ढवळीकर कॉंग्रेसची कास सोडत नाहीत, तोपर्यंत युतीचा निर्णय होऊच शकत नाही, असे प्रदेश भाजप प्रवक्ते विष्णू सुर्या वाघ यांनी काल दुपारी पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर स्पष्ट केले होते.
ढवळीकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने भाजप व मगो समर्थकांचे पुढील घडामोंडीवर लक्ष लागले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मगोच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत ढवळीकर यांना सरकारातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला होता.
१२२ स्पेक्ट्रम वाटप रद्दबातल
चिदंबरम यांच्या सीबीआयकरवी चौकशीस नकार
टूजी घोटाळा
टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील वादग्रस्त १२२ स्पेक्ट्रमचे वाटप काल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी मनमानीपणे व घटनाबाह्य रीतीने हे स्पेक्ट्रम वाटप केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला. तत्कालीन अर्थमंत्री व विद्यमान गृहमंत्री पी. चिदंबरम यांनाही या खटल्यात सहआरोपी करण्याचे आदेश सीबीआयला द्यावेत या डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या मागणीवर दोन आठवड्यांत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य खालच्या न्यायालयास दिले गेले आहे. सीबीआयला अशा प्रकारे निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
न्या. जी. एस. सिंघवी व ए. के. गांगुली यांच्या खंडपीठाने टूजी घोटाळ्यातील विविध कंपन्यांना जबर दंड ठोठावला आहे. टूजी स्पेक्ट्रमचा परवाना मिळताच विदेशी कंपन्यांना आपले समभाग विकणार्या तीन कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकी पाच कोटी रुपये दंड ठोठावला, तर इतर कंपन्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये दंड ठोठावला गेला आहे. भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरणास (ट्राय) टूजी स्पेक्ट्रमवाटपाबाबत नव्याने शिफारशी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या शिफारशींवर सरकारने एका महिन्याच्या आत निर्णय घ्यावा असा आदेशही न्यायालयाने दिला. हे स्पेक्ट्रम वाटप लिलाव पद्धतीने चार महिन्यांत केले जावे अशी सूचनाही न्या. गांगुली यांनी केली.
प्रदेश भाजपच्या बैठकीत उमेदवारीबाबत चर्चा
प्रदेश भाजपच्या निवडणूक समितीची रात्री उशिरापर्यंत बैठक चालू होती. विधानसभा निवडणुकीसाठी बहुतेक मतदारसंघातील उमेदवारी निश्चित करण्यावर चर्चा झाली असून मगो पक्षाला ६ जागा सोडण्याचा तर कुंभारजुवे मतदारसंघात अपक्ष उमेदवार निर्मला सावंत यांना पाठिंबा देण्याचे ठरविल्याचे कळते.
मिळालेल्या माहितीनुसार मांद्रे ः लक्ष्मीकांत पार्सेकर, डिचोली ः सतीश गावकर किंवा शिल्पा नाईक, थिवी ः किरण कांदोळकर, म्हापसा ः ऍड. फ्रान्सिस डिसोझा, शिवोली ः दयानंद मांद्रेकर, कळंगुट ः मायकल लोबो, साळगाव ः दिलीप परुळेकर, हळदोणे ः क्लेवन डिखलो, पणजी ः मनोहर पर्रीकर, ताळगाव ः दत्तप्रसाद नाईक, सांत आंंद्रे ः विष्णू सुर्या वाघ, मये ः अनंत शेट, साखळी ः डॉ. सुरेश आमोणकर, पर्ये ः विश्वजित कृष्णराव राणे, मुरगाव ः मिलिंद नाईक, वास्को ः कार्लोस आल्मेदा, कुठ्ठाळी ः माथानी साल्ढाणा, फातोर्डा ः दामोदर नाईक, कुडचडे ः नीलेश काब्राल, सावर्डे ः गणेश गावकर, सांगे ः सुभाष फळदेसाई, काणकोण ः रमेश तवडकर, शिरोडा ः महादेव नाईक या नावांवर चर्चा करण्यात आल्याचे कळते.
श्रीपाद यांना उमेदवारी देण्याबाबत विचार
उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांना राज्याच्या राजकारणात प्रवेश करण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नांमुळे भाजपमधील गोंधळ वाढत गेल्याने पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या पर्वरी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या प्रस्तावावर गंभीरपणे फेरविचार सुरू केल्याचे कळते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी दि. ४ रोजी रात्री किंवा दि. ५ रोजी गोव्यात येणार असून त्यावेळीच या संबंधीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
बाळ्ळी येथे आठ जणांना अटक
व्हेरोडा बाळ्ळी येथील साम देवारूप समितीचे अध्यक्ष कमलाकांत बाबुसो गावकर यांनी गावचा विरोध असतानाही आमदार ज्योकीम आलेमाव यांना कोपरा बैठक घेण्यास मदत केल्याने तेथील युवकांनी त्यांना जाब विचारत मारहाण केली, अशी तक्रार कुंकळ्ळी पोलिस स्थानकात करण्यात आली. यावेळी पोलिसांनी अशोक फडते, सुरेश गावकर, संतोष गावकर, सूर्या मुळेकर, दीपेश तवडकर, रोहिसा गावकर, शशी गावकर व श्याम गावकर या आठ जणांना पोलिसांनी अटक केली.
भाषा सुरक्षा मंच पुन्हा सक्रिय
भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे रविवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वा. गोमंतक मराठा समाज सभागृह पणजीत गोव्यातील सर्व तालुक्यातील पालक महासंघ प्रतिनिधींचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास सुमारे ५०० पालक संघाचे प्रतिनिधी उपस्थित राहतील असा विश्वास मंचाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मंचाच्या राज्य निमंत्रक शशिकला काकोडकर असतील. मंचाच्या काल गुरुवारी पणजीतील सिद्धार्थ बांदोडकर भवनामध्ये आयोजित केलेल्या बैठकीत मंचातर्फे पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचे विविध टप्पे ठरवण्यात आले.
चर्चिल आलेमाव विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार
सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी आपल्या खात्यात ३०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार एनएसयूआयचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी पणजी पोलिसात तसेच गुन्हा अन्वेषण विभागात नोंदवली आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते पी. टी. पारकर व गोव्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्याविरुद्धही तक्रार करण्यात आलेली आहे.
तृणमूल कॉँग्रेसची पहिली यादी जाहीर
अखिल भारतीय तृणमूल कॉग्रेसने गोव्यात ३ मार्च २०१२ होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत १० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
तामीळनाडूत विरोधी नेते १० दिवस निलंबित
तामीळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजयकांत यांना विधानसभेत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्याशी शाब्दीक चकमक उडाल्यानंतर दहा दिवसांसाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले. सभापती डी. जयकुमार यांनी ही कारवाई केली. विजयकांत व त्यांच्या डीएमडीके या पक्षाच्या आमदारांनी जयललिता यांच्याविरुद्ध आघाडी उघडली होती. काल सभागृहाचे कामकाज सुरू होताच जयकुमार यांनी विजयकांत यांना हक्कभंग समितीच्या शिफारशीनुसार निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर डीएमडीके सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली व सभात्याग केला.
पर्रा येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून खंडणीची मागणी
वेर्ला पर्रा येथे राहणार्या व मूळ पश्चिम बंगालमधील एका कंत्राटदाराच्या १५ वर्षीय मुलीस पळवून नेऊन सदर कंत्राटदाराकडे चार लाख रुपयांच्या खंडणीची मागणी अपहरणकर्त्याने केली आहे. सदर खंडणी न दिल्यास मुलीला ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मुलीच्या आईने म्हापसा पोलिसांत दाखल केली असून तिने सुजय मंडळ या कामगदाराविषयी संशय व्यक्त केला आहे.
ईजिप्तमध्ये फुटबॉलप्रेमींत दंगल उसळल्याने ७४ ठार
ईजिप्तमधील पोर्ट सैद या शहरात फुटबॉल सामन्यावेळी उसळलेल्या दंगलीत ७४ जण मारले गेले. तर एक हजारजण जखमी झाले आहेत. ‘फिफा’ने हा फुटबॉलच्या इतिहासातील काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यजमान संघ अल मस्रीने कैरोच्या अल अहली या संघावर ३ - १ ने विजय मिळवताच रेफ्रीने सामना संपल्याची शिट्टी वाजवताच दंगल उसळली.
प्रसारमाध्यमांना लक्ष्य करण्याचा इरादा नाही : त्रिपाठी
माध्यमांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवून सत्य मांडावे
पेड न्यूजचा मुद्दा उपस्थित करून प्रसारमाध्यमांना लक्ष्य करण्याचा आमचा कोणताही इरादा नाही असे स्पष्ट करतानाच प्रसारमाध्यमांनी आपली जबाबदारी ओळखून मतदारांना योग्य व सत्य ती माहिती आपल्या वृत्तांतून द्यावी, असे आवाहन भारतीय निवडणूक उपायुक्त सुधीर त्रिपाठी यांनी काल प्रसारमाध्यमांशी ‘पेड न्यूज’ या विषयावर वार्तालाप करताना केले.
गझल संमेलन : थोडे कडू, थोडे गोड
- डॉ. राजीव कामत, खोर्ली, म्हापसा
दि. १४ व १५ जानेवारी या दिवशी पणजी येथे कला अकादमीच्या सभागृहात ‘गझल सागर प्रतिष्ठान’ या संस्थेतर्फे सहावे अ. भा. मराठी गझल संमेलन पार पडले. देेशाच्या विविध भागांतल्या प्रतिनिधींनी आपली हजेरी लावून हे संमेलन यशस्वी करण्यास हातभार लावला. काही कारणास्तव मी पहिल्या दिवशी या संमेलनाला हजर राहू शकलो नाही, पण दुसर्या दिवशी संबंध दिवस उपस्थित राहून मी या संमेलनाचा आस्वाद घेतला.
कोकणचे भांडण
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणावर आपली मजबूत पकड ठेवणार्या नारायण राणे यांच्या त्या बालेकिल्ल्यात जागोजागी सुरूंग लावून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आव्हान उभे केले आहे. त्यानंतर ज्या तर्हेने उभय नेत्यांमध्ये जाहीर आव्हाने - प्रतिआव्हाने झडली, ते पाहाता महाराष्ट्राच्या राजकारणात याचे दूरगामी पडसाद यापुढील काळात उमटल्यावाचून राहणार नाहीत. अजित पवार यांनी स्वतःला संपूर्ण महाराष्ट्राचा नेता म्हणून पुढे आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आपल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये इतर पक्षांचे नेते आणण्याची मोठी मोहीम राबवून आणि छोटे - मोठे मासे गळाला लावून त्यांनी कॉंग्रेसचे सत्तासोबती असूनही त्यांना वरचढ ठरण्याची जय्यत तयारी केलेली दिसते. सध्या महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणुकांचे दिवस आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही जी जमवाजमव अजित पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने चालवली आहे, त्यामुळे उभय पक्षांमध्ये तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, कॉंग्रेस नेतृत्वाने यासंदर्भात संयमी भूमिका स्वीकारून राष्ट्रवादीच्या घोडदौडीचे मूक साक्षीदार बनणेच पसंत केलेले असताना राणे यांचाच पापड का मोडावा याचे उत्तरही स्पष्ट आहे.
सरकार तोंडघशी
ए. राजा यांनी मनमानीपणाने स्वस्तात वाटलेले १२२ टूजी स्पेक्ट्रम रद्दबातल ठरवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा कालचा निवाडा विद्यमान केंद्र सरकारच्या तोंडावरची जोराची थप्पड आहे. ‘‘हे वादग्रस्त स्पेक्ट्रम वाटप राजा यांनी केले,’’ ‘‘त्यांनी त्या आधीच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या धोरणाचीच अंमलबजावणी केली,’’ ‘‘पंतप्रधानांनी वेळोवेळी दिलेले सल्ले राजा यांनी निर्णय घेताना धुडकावले,’’ वगैरे कितीही युक्तिवाद करून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याची धडपड आता कपिल सिब्बल प्रभृतींनी चालवली असली तरी ‘बूँदसे गयी वो हौदसे नही आती’ हे त्यांना कळायला हवे. राजा आज तुरुंगात आहेत म्हणून या घोटाळ्याची सर्व जबाबदारी त्यांच्यावर ढकलून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग तसेच माजी अर्थमंत्री व विद्यमान गृहमंत्री पी. चिदंबरम यांना नामानिराळे होता येणार नाही. चिदंबरम यांचीही या खटल्यात सहआरोपी म्हणून सीबीआयमार्फत चौकशी व्हावी ही डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांची मागणी न्यायालयाने सत्र न्यायालयापुढे निर्णयार्थ पाठवलेली असली, तरी त्याचा अर्थ ती मागणी धुडकावली गेली आहे असा होत नाही. खालच्या न्यायालयाला त्यावर दोन आठवड्यांत निर्णय घ्यायचा आहे.
आमचे आबा गेले...!
- प्रकाश शांबा पर्येकर, धावे - तार, वाळपई.
गोपिनाथ गांवस यांचा फोन आला. म्हणाले ‘आबा गेले....’ काल संध्याकाळी मृत्यूशी झुंज देताना त्यांना मी जवळून पाहिलं होतं. वाळपई येथे आमशेकर हॉस्पिटलात प्राथमिक उपचार सुरू होते. तद्नंतर गोमेकॉत पुढील उपचारासाठी त्यांना आणण्यात आले होते. सकाळी त्यांचे पुत्र रणजित राणे यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. संध्याकाळी त्यांना पाहण्यासाठी गोमेकॉत जाणार होतो, त्याच्या अगोदरच ते गेले...
प्रशासनावर निवडणूक आयोगाची करडी नजर
मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी यांचा इशारा
गोव्यातील विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी प्रशासनातील वर पासून खालपर्यंतचे सर्व अधिकारी निवडणूक आयोगाच्या नजरेखाली असून निवडणूक आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी आयोगाचा आदेश धुडकावून लावण्याची कुणालाही हिंमत नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी काल पणजीत पत्रकार परिषदेत सांगितले.
इच्छुक उमेदवार अनेक असतात, परंतु कोणत्याही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच निवडणूक आयोगाचा कायदा लागू होतो. असे असतानाही हळदोण्याचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांनी क्रिकेट क्लबना वितरित केलेल्या साहित्याची चौकशी चालू आहे, असे कुरेशी म्हणाले.
भाजपचे उमेदवारउद्या निश्चित होणार
कुंभारजुव्यात निर्मलास पाठिंबा
श्रीपाद नाईक यांच्या मुलाला उमेदवारी नाही
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या ३ रोजी नवी दिल्लीत बैठक होत असून त्यात उमेदवार निश्चित करण्यात येणार आहेत. त्याच दिवशी उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केली.
भाजप किती जागा लढवणार असे विचारले असता मगोला किती जागा द्याव्या लागतील त्यावर ते ठरणार असल्याचे ते म्हणाले.
निर्मला सावंत यांना कुंभारजुवे मतदारसंघात पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे काय, असे विचारले असता ‘होय’ असे उत्तर त्यांनी दिले.
दलाली प्रकरणाच्या समूळ चौकशीची भाजपची मागणी
प्रादेशिक आराखडा तयार करताना झालेल्या भ्रष्टाचाराचे सांगाडे आता बाहेर येऊ लागलेले असून जमिनींचे रूपांतर करण्यासाठी बाबुश मोन्सेर्रात यांनी २६ कोटी रु.ची दलाली घेतल्याचे आयकर खात्याच्या छाप्यात उघड झालेले आहे, असे सांगून या प्रकरणाची आता इत्यंभूत चौकशी व्हायला हवी, अशी मागणी काल भाजप प्रवक्ते विष्णू सूर्या वाघ यांनी पत्रकार परिषदेतून केली.
त्याचबरोबर अशा कलंकित व्यक्तीला कॉंग्रेस येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देणार की काय हेही जनतेला सांगावे, अशी मागणी वाघ यांनी केली.
श्रीपाद नाईक दत्तदर्शनास!
भाजपचे ज्येष्ठ नेते व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक हे कुरवपूरला (आंध्रप्रदेश) गेले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल दिली. कुरवपूर हे प्रसिद्ध दत्तक्षेत्र आहे. तीन दिवसांनंतरच ते गोव्यात परतणार असल्याचे ते म्हणाले.
संगीतकार अनिल मोहिले यांचे निधन
ज्येष्ठ संगीतकार आणि संगीतसंयोजक अनिल मोहिले यांचे काल बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. कयामत से कयामत तक, लेकीन, शराबी, डॉन, थोडीसी बेवफाई, अभिमान या सारख्या सुपरहिट चित्रपटातील संगीत संयोजन त्यांनी केले.
मगोच्या उद्याच्या बैठकीत काय ठरणार?
विधानसभा निवडणुकीतील मगो-भाजप युती संबंधीचा निर्णय उद्या मगो पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतरच होणार असे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले.
ठिकठिकाणी मद्य जप्ती
अबकारी पथकाकडून बेकायदेशीर मद्याविरोधातील मोहीम चालूच असून केपे, फोंडा व साखळी परिसरात ठिकठिकाणी मद्य जप्त करण्यात आले.
फोंडा येथे आज दुपारी २ ते ५.३० च्या दरम्यान अबकारी खात्याच्या भरारी पथकाने तीन ठिकाणी छापे टाकून जवळ जवळ ९० हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.
लॉरीखाली सापडून दुचाकीस्वार ठार
आमोणा येथील पुलावर एका लॉरीखाली सापडून जुवाव लोबो फर्नांडिस (३५) हा केळशी कुठ्ठाळी येथील इसम मागच्या टायरखाली सापडल्याने फरफटत जाऊन जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी २.३० च्या सुमारास घडली.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला प्राधान्य द्या : रेमो
गेली अनेक वर्षे भाषा, जात, धर्म हे विषय निवडणुकीच्यावेळी पुढे आणले जातात. त्यामुळे आपल्यासमोर असलेला भ्रष्टाचार हा सर्वांत मोठा विषय बाजूला ठेवला जातो. या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे, असे प्रख्यात पॉप गायक तथा निवडणूक आयकॉन रेमो फर्नांडिस यांनी काल सांगितले.
नारायण राणेंचे संतुलन बिघडले : अजितदादा
पुण्यात येऊन ‘वस्त्रहरण’ करू असे परवा नारायण राणे यांनी कुडाळच्या सभेत सांगितल्यावर त्याला राष्ट्रवादीच्या गोटातून चोख प्रत्यूत्तर देण्यात आले.
तस्लिमाचे वादग्रस्त आत्मचरित्र प्रकाशित
वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांचे आत्मचरित्र ’निर्वासन’चा सातवा भाग अखेर पेचप्रसंगातच प्रकाशित झाला. कोलकाता पुस्तक मेळ्यामध्ये होणारे हे प्रकाशन आयत्या वेळी रद्द झाले, पण तरीही मेळ्याबाहेर त्याचे प्रकाशन करण्यात आले.
चारित्र्यवान उमेदवारालाच मत देऊया
- भास्कर वासुदेव जोशी, कारापूर-तिस्क, साखळी
आपल्या गोव्यात निवडणूक जाहीर झाली आणि अचारसंहिताही लागू झाली आहे. त्यामुळे बर्याच मंत्र्यांची कोंडी झाली. नोकरभरती, अनेक विकासकामांची पायाभरणी तशीच राहून गेली. अशावेळी मला अलिबाबा आणि चाळीस चोर या गोष्टीची आठवण होते. आपले मतदारसंघ चाळीस. चाळीस मतदारसंघांचे चाळीस लोकप्रतिनिधी. अलिबाबाची एक गुहा असते आणि त्याचे चाळीस साथीदार चोरी, दरोडा घालून आणलेले धन त्या गुहेत ठेवत. नंतर अलिबाबा एक वाक्य म्हणून त्या गुहेचे दार लावून घेत असे. ते उघडण्यासाठी दुसरे वाक्य म्हणायचे. हेतू हा की ते धन कोणी पळवून नेऊ नये.
कालमर्यादेची गरज
भ्रष्टाचारासारखा गंभीर गुन्हा करूनही राजकारण्यांवर आणि प्रशासनातील बड्या बड्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात जी सर्रास चालढकल चालते, तिच्यावर आसूड ओढणारी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या याचिकेच्या अनुषंगाने केली आहे. माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा यांना अटक होऊन सोळा महिने लोटले तरी त्यांच्याविरुद्ध खटला का चालवला जात नाही, असा सवाल डॉ. स्वामी यांनी केला होता, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे हे ऐतिहासिक भाष्य आहे. लोकप्रतिनिधी अथवा सरकारी सेवकांविरुद्ध खटला चालवण्यासंदर्भातील परवानगी तीन महिन्यांच्या आत दिली गेली पाहिजे. त्यात फार तर एका महिन्याची मुदतवाढ मिळवता येईल, परंतु जर चार महिने उलटूनही अशा परवानगीसंदर्भात काय तो निर्णय घेतला जाणार नसेल, तर मात्र खटला चालवण्यास सरकारची परवानगी आहे असेच गृहित धरावे आणि संबंधित यंत्रणांनी पंधरा दिवसांच्या आत पुढील कार्यवाही सुरू करावी असे न्या. ए. के. गांगुली म्हणाले. केवळ ही टिप्पणी करूनच ते थांबलेले नाहीत, तर सरकारने या मार्गदर्शक तत्त्वांस अनुसरून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या कलम १९ मध्ये घटनात्मक दुरुस्ती करावी अशी सूचनाही त्यांनी सरकारला केलेली आहे.


















































