November 2011

योगमार्ग - राजयोग (सत्य - २९)

डॉ. सीताकांत घाणेकर

आजच्या मानवाने प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. खरे म्हणजे ह्या युगातील प्रत्येक जण फार आनंदात असायला हवा. विज्ञानाने तर भौतिक सुखसोयी जगाच्या कानाकोपर्‍यात सहज पोचवण्याची उत्कृष्ट व्यवस्था केली आहे. पण असे असून देखील मानव प्रत्येक क्षेत्रात अधोगतीकडे वाटचाल करताना दिसतो. ह्याची कारणे अनेक आहेत; पण मुख्य कारण म्हणजे सत्याकडे दुर्लक्ष करणे, सत्य जाणण्याचा प्रयत्न न करणे, हे होय.

देवदूत टेडी...

प्रा. रमेश सप्रे

तसं त्याचं नाव एडवर्ड. सगळे त्याला म्हणायचे टेड. मला आठवतो तो दिवस...तो क्षण जेव्हा मी त्याला ‘टेडी’ म्हटलं. माझ्याजवळ येऊन तो म्हणाला, ‘सर, मला पुन्हा तशीच हाक मारा ना.’ मीही एकदम म्हणून गेलो ‘टेडी!’ त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. माझी हाक जणू त्याच्या आतल्या अवकाशात पुन्हा पुन्हा प्रतिध्वनीत होत राहिली. पाचवीतलं पोर. तसं चौथी पास झालेलंच. शाळेचा नव्या वर्षाचा पहिलाच आठवडा. त्याला जवळ घेऊन थोपटत विचारलं, ‘काय झालं रे टेडी?’ ‘आईची आठवण आली. या जगात फक्त तीच मला टेडी म्हणते.’

रेती उपसून त्याखाली गाडले गेलेले मृतदेह

Story Summary: 

रेती उपसून त्याखाली गाडले गेलेले मृतदेह शोधताना स्थानिक नागरिक व अग्निशामक दलाचे जवान.

केप्यात रेतीवाहू ट्रक उलटून दोन ठार, चौघे जखमी

Story Summary: 

आमोणे - केपे येथे रेतीवाहू ट्रक कलंडल्याने रेतीखाली गाडले गेल्याने यल्लम्मा निमनोव्वा मुरलेर (३५), निर्मलनगर, शेल्डे व लिंगराज लोकप्पा लोकीभाय (१९), निर्मलनगर, शेल्डे या कामगारांचा काल दुर्दैवी मृत्यू झाला, तर चालकासह अन्य चौघेजण जखमी झाले. त्यापैकी एकाची स्थिती चिंताजनक आहे.

शेल्डे येथे बांधकामासाठी रेती घेऊन जीडीझेड ६५९१ क्रमांकाचा सदर ट्रक चालला होता. समोरून येणार्‍या वाहनाला बाजू देण्यासाठी ट्रक बाजूला घेतला असता तो बाजूला कलंडला व वर बसलेले पाच कामगार रेतीखाली गाडले गेले. त्यापैकी तिघांना स्थानिक नागरिकांनी व केपे पोलिसांनी बाहेर काढले, तर दोघे रेतीमध्ये खोलवर रुतल्याने त्यांचा तेथेच गुदमरून मृत्यू झाला.

दिल्ली व पुण्यातील बॉम्बस्फोट प्रकरण

Story Summary: 

सहा दहशतवाद्यांस शस्त्रास्त्रांसह अटक

दिल्लीतील जामा मशीद, पुण्यातील जर्मन बेकरी आणि चिन्नास्वामी स्टेडियमवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या सहा संशयितांना अटक केली आहे. जामा मशीद स्फोटाच्या व जर्मन बेकरी स्फोटाच्या कटाचे धागेदोरे उकलल्याचा दावाही दिल्ली पोलिसांनी केला आहे.

अटक झालेल्या सहाजणांपैकी एक पाकिस्तानी असून या दहशतवाद्यांकडून दोन एके ४७ रायफली, पन्नास काट्रिजीस, एक पिस्तूल व चौदा गोळ्या, पाच किलो स्फोटके, पाच डिटोनेटर तसेच दोन लाख रुपयांचे बनावट चलनही जप्त करण्यात आले आहे. इंडियन मुजाहिद्दीनच्या दोघा दहशतवाद्यांना चेन्नईतून पकडण्यात आले व दिल्लीत चौकशीसाठी आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी दिलेल्या कबुलीवरून इतर साथीदारांना अटक करण्यात आली.

किरकोळ विक्री क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीस अनुमती घातक

Story Summary: 

विरोधी पक्षनेते पर्रीकर यांचे प्रतिपादन

किरकोळ विक्री क्षेत्रात ५१ टक्के थेट परकीय गुंतवणुकीस परवानगी देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत घातक असून या निर्णयामुळे देशभरातील दुकानदार व शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती काल विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली. वरील प्रश्‍नावरून आज व्यापार्‍यांनी जी देशव्यापी बंदची हाक दिलेली आहे त्याला भाजपचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.

या निर्णयामुळे देशभरात १० लाख नोकर्‍या निर्माण होणार असल्याचा दावा सरकारने केलेला असला तरी ३० लाख लोकांवर वरील निर्णयामुळे परिणाम होणार आहे त्याचे काय, असा सवालही पर्रीकर यांनी यावेळी केला. थेट विदेशी गुंतवणुकीनंतर खरेदीदार हा एकच असणार असल्याने कृषी व्यवसायावर त्याचा गंभीर परिणाम होणार असल्याचे ते म्हणाले.

पेट्रोल दरात ७८ पैशांनी कपात

कुठे आहे राज्य सरकारचे भूसंपादन धोरण? : पर्रीकर

डिसेंबर महिन्यात आपले सरकार भू संपादन धोरण तयार करून त्याची अमलबजावणी करेल, असे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात सरकारने काहीही केले नसल्याचा आरोप काल विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेतून केला.

विदेशी गुंतवणूक निर्णयाचे संसदेत पुन्हा पडसाद

किरकोळ विक्री क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीसंदर्भात विरोधकांनी गदारोळ माजवल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांतील कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये मंत्रिमंडळाच्या निर्णयावरून मतभेद निर्माण झाल्याने त्याचे तीव्र पडसाद संसदेत उमटत आहेत. लोकसभेत सभापती मीराकुमार यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच सदस्यांनी सरकारने हा वादग्रस्त निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करीत सभापतींपुढील मोकळ्या जागेत धाव घेतली. कॉंग्रेसचे काही सदस्य तसेच तेलगू देसमचे सदस्यही यावेळी स्वतंत्र तेलंगणाची मागणी करीत असल्याचे दिसून आले. गोंधळ वाढल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांतील कामकाज तहकूब करावे लागले.

गोव्याच्या राज्यपालांविरोधात अवमान याचिका सादर

उच्च न्यायालयाने निवाडा दिल्यानंतरही माहिती हक्क कायद्याखाली माहिती देण्यास नकार देणार्‍या गोव्याच्या राज्यपालांचे विशेष सचिव डॉ. एन. राधाकृष्णन यांच्या विरोधात ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अवमान याचिका आज सादर केली आहे. सदर याचिका न्यायमूर्ती एफ. एम. रीस यांच्यासमोर गुरुवार दि. १ रोजी सुनावणीस येणार आहे.

मयेच्या प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी सरकार वचनबद्ध : मुख्यमंत्री

मये स्थलांतरित मालमत्तेचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार वचनबद्ध असून कायदेशीर बाब असल्याने याबाबतचा सखोल अभ्यास करूनच हा प्रश्न यापुढे सोडवायचा असल्याने त्याला थोडा वेळ लागेल, परंतु हा प्रश्‍न नक्कीच सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी काल मये भूविमोचन समितीच्या शिष्टमंडळाला दिले.

सर्व जागा लढवण्याचीही राष्ट्रवादीची तयारी : जुझे

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस युती केंद्रीय पातळीवर झालेली असून गोव्यातही ती होणार आहे. स्थानिक नेत्यांना त्यासंबंधी बोलण्याचा कोणताच अधिकार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत जागांवरून स्थानिक पातळीवर बोलणी करणे शक्य आहे. गोव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षही मजबूत असून तोही सर्व जागा लढवू शकतो असे महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.

फिल्म डिव्हिजनच्या ८ हजार माहितीपटांचे डिजिटायझेशन

‘वेबकास्ट’ द्वारे सर्वांना लाभ मिळणार

(करण समर्थ यांजकडून)

दूरदर्शनच्या माध्यमातून लवकरच देशातील पहिली माहितीपट वाहिनीसुरू होईल व त्यापूर्वी फिल्म डिव्हिजनने आजवर बनवलेले सर्व म्हणजे आठ हजार माहितीपट डिजिटाइज करून ‘वेबकास्ट’ द्वारे सर्वांना उपलब्ध करून दिले जातील अशी माहिती फिल्म डिव्हिजनचे महासंचालक ‘बंकीम’ यांनी काल दिली.

युथ अगेन्स्ट करप्शनचे पणजीत धरणे

फोफावलेल्या भ्रष्टाचारापासून भारताला मुक्त करणे हीच देशभक्ती आहे त्यासाठी युवकांनी सक्रिय झाले पाहिजे, असे आवाहन युथ अगेंस्ट करप्शनचे गोवा राज्य संयोजक ऍड. प्रवीण फळदेसाई यांनी केले. काल दिवसभर पणजीतील आझाद मैदानावर भ्रष्टाचार विरोधी झालेल्या ‘महाधरण्यात’ ते बोलत होते. या ‘महाधरण्यात’ गोव्यातील विविध महाविद्यालये, उच्च माध्यविद्यालयातील विद्यार्थी व देशप्रेमी युवक, नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले.

‘अर्पण’ व्याख्यानमालेचे कौतुकास्पद आयोजन

- सुरेंद्र शेट्ये, म्हापसा

‘अर्पण’ व्याख्यानमालेचे पुष्प पहिले. स्वच्छ, कार्यक्षम प्रशासन, खच्चून भरलेले सभागृह. दाटीवाटीने बसलेले दर्जेदार श्रोते, माजी सनदी अधिकारी, समाजसेवेचा दांडगा अनुभव असलेले. समर्पित व्याख्यात्यांना पाचारण करून ‘अर्पण’ हे नाव सार्थ करणारी रोटरी क्लब ऑफ म्हापसाने पणजीत आयोजित केलेली सदर व्याख्यानमाला व तीही मराठीतून हे सगळेच सुखावणारे. अगदी निमंत्रण पत्रिकेपासून सगळाच शाही थाट व वैचारिक प्रबोधन पुण्या - मुंबईला धोबीपछाड देणारे. श्री. गुरुप्रसाद पावसकरांसारख्या नव्या पिढीकडून व तेही रोटरी क्लबसारख्या संस्थेकडून व्हावे, हे सगळेच विस्मयचकीत करणारे. ऍड. मनोहर उसगावकरांचे मराठीतील भाषण, ‘फोमेन्तो’ सारखे प्रायोजक व ‘मांडवी’ सारखे हॉटेल, हे सगळेच देवदुर्लभ. जागतिक भाषेत निमंत्रणे व ती सुद्धा अशी काही झकास म्हणून सांगू! त्यामुळेच तर सगळा एलाईट वर्ग उपस्थित राहिला, हे काय कमी झाले? योजकस्तत्र दुर्लभः म्हणतात, परंतु शारदा व्याख्यानमाला आयोजित करणारे गुरुप्रसाद पावसकर अध्यक्ष म्हटल्यावर त्यांनी घडवून आणलेल्या आणखी एका ज्ञानयज्ञाचे तोंड भरून कौतुक करावेसे वाटले म्हणून हा पत्रप्रपंच. मूर्ती छोटी, पण उच्च अभिरूची व कामाचा उरक म्हणा, झपाटा म्हणा, उत्साह आणि जोम वाखाणण्यासारखा. कुठे आनंद निकेतनसारखी संस्था उभी करा, तर त्यांच्यासाठी पैसे उभे करण्यासाठी ‘ट्रेड फेअर’चे आयोजन करीत असतानाच या व्याख्यानमालेचे आयोजन करून त्यांनी आपल्यातील धडाडीचे दर्शन घडवले खरे.

अण्णांची अजब भूमिका

अण्णा हजारे यांनी जनलोकपालच्या विषयावरून पुन्हा एकवार दंड थोपटले आहेत. मात्र, गेल्यावेळचे वातावरण आणि आजची परिस्थिती यामध्ये बरेच पाणी वाहून गेले आहे, याची कल्पना अण्णांनाही असेल अशी आशा आहे. त्यांची तथाकथित ‘टीम अण्णा’ केव्हाच दुफळीग्रस्त झाली आहे. अण्णांच्या निकटच्या सहकार्‍यांच्या दुटप्पी वागण्याचा फुगा जाहीरपणे फुटला आणि केजरीवाल किंवा किरण बेदींनी कितीही सारवासारव केली, तरी त्यांचे स्वतःचे वर्तन संशयाच्या घेर्‍यात अडकले आहे. खुद्द अण्णांच्या गांधीवादावर शिंतोडे उडवणारे काही प्रसंग घडून गेले. शरद पवारांच्या श्रीमुखात भडकवली गेल्यानंतर ‘फक्त एक थप्पड?’ अशी भाषा अण्णांनी करणे किंवा राळेगणसिद्धीत आत्मक्लेष आंदोलन करण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना अण्णा समर्थकांनी मारहाण करणे, त्यांच्या गाड्या फोडणे हे सारे अण्णा हजारे या नावाभोवती जे वलय आहे, त्याला काळीमा फासणारे होते.

‘थ्री इडियटस्’ फेम अभिनेता ओमी वैद्य.

Story Summary: 

‘इफ्फी’त संवाद साधताना ‘थ्री इडियटस्’ फेम अभिनेता ओमी वैद्य.

त्या १४० शाळांची मान्यता रद्द करा

Story Summary: 

भाषा सुरक्षा मंचाची मागणी

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्थगिती दिलेली असतानाही न्यायालयाचा अवमान करून राज्यातील १४० इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान वितरित केल्याने कामत सरकार ताबडतोब बरखास्त करण्याची मागणी भारतीय भाषा सुरक्षा मंचाने केली आहे. त्याचप्रमाणे नियमांचे उल्लंघन करून माध्यम बदलणार्‍या व बेकायदेशीरपणे सरकारी अनुदान घेतलेल्या १४० इंग्रजी शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी ‘मंच’चे नेते ऍड. उदय भेंब्रे यांनी काल पत्रकार परिषदेत केली.

‘फोर्स’ या संघटनेने यापूर्वीच वर्तमानपत्रातून माध्यमात बदल केल्याची माहिती जाहीर केली आहे. न्यायालयानेही वरील प्रकरणी गोवा सरकार, शिक्षण खाते व अन्य संबंधितांवर नोटिसा बजावल्याने अनुदान दिल्याचे सिद्ध झाले आहे.

साळेरी-खोला परिसरातील मच्छीमारांचेही वादळात नुकसान

Story Summary: 

काणकोण तालुक्यात रविवारी मध्यरात्री आलेल्या वादळी वार्‍यामुळे अनेक मच्छीमार बांधवांचे सागरी संसार उद्ध्वस्त झाले असून खोला-साळेरी येथील अनेक मच्छीमार बंधूंनाही त्याचा तडाखा बसला आहे. खोला व आगोंद परिसरातील सुमारे ४० मच्छीमार बांधवांच्या होड्या, मोटर, तसेच मच्छीमारी जाळी वाहून गेल्याचे मच्छीमार खात्याच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

साळेरी आगोंद तसेच काब-द-राम किनारी भागातील काही मच्छीमार होड्या व जास्त प्रमाणात मच्छीमार जाळी वाहून गेल्याच्या तक्रारी मच्छीमार खाते व पंचायत तलाठी यांच्याकडून नोंद करून घेण्यात आल्या आहेत. वादळी वार्‍यामुळे समुद्राचे पाणी अचानक वाढल्याने साळेरी खोला येथील मच्छीमार बांधवांनी आपल्या मच्छीमारी नौका धक्यावर बांधून ठेवण्यात यश मिळविले तरी मच्छीमारी जाळी वाचवण्यात अपयशी ठरल्याचे समाजकार्यकर्ते व मच्छीमार आनंदू पागी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

भूमिकेच्या चाकोरीत अडकायचे नाही : सचिन खेडेकर

Story Summary: 

एखाद्या भूमिकेच्या प्रतिमेत अडकून पडून त्याच त्याच प्रकारच्या भूमिका आपल्याला करायच्या नाहीत, असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी अभिनेते सचिन खेडेकर यांनी काल ‘इफ्फी’त केले. चांगला दर्जेदार चित्रपट बनवलात तर प्रेक्षकही निश्‍चितच तो बघायला येतील असे ते पुढे म्हणाले.

केवळ पालकच मुलांवर नव्हेत तर मुलेही पालकांवर संस्कार करू शकतात हे ‘तार्‍यांचे बेट’ या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे या चित्रपटात नायकाची भूमिका केलेले श्री. खेडेकर यांनी पुढे सांगितले. दहा आठवडे हा चित्रपट चालल्याचे सचिन खेडेकर व दिग्दर्शक किरण यज्ञोपावित यांनी यावेळी सांगितले.

पुन्हा आंदोलन उभारण्याचा अण्णा हजारेंचा इशारा

संसदीय समितीने तयार केलेल्या लोकपाल समिती मसुद्यातून कनिष्ठ नोकरशाही व न्यायपालिकेस वगळण्यात आल्याच्या वृत्तावर अण्णा हजारे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

खाण परिपत्रकाच्या अंमलबजावणीबाबत दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र द्या

उच्च न्यायालयाचा सरकारला आदेश

गेल्या दि. ४ ऑक्टोबर रोजी खाण खात्याने जारी केलेल्या परिपत्रकाचे खाण कंपन्यांनी पालन केले की नाही, तसेच पालन केलेले नसल्यास सरकारने संबंधितांवर कोणती कारवाई केली, या संबंधीचे प्रतिज्ञापत्र दोन आठवड्यांच्या आत सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल सरकारला दिला.

डॉक्टरांच्या जामीन अर्जावर ५ रोजी सुनावणी

राज्यात १ लाख ३५ हजार जणांना ‘आधार’ वितरित

आतापर्यंत गोव्यात १ लाख ३५ हजार नागरिकांना ‘आधार’कार्डे वितरित केली असून भविष्यकाळात प्रत्येक नागरिकाची संपूर्ण माहिती ‘आधार’ कार्डातच उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्यामुळे भविष्यकाळात अन्य कार्डांची गरजच भासणार नाही, असे नियोजन आणि सांख्यिकी खात्याचे संचालक आनंद शेरखाने यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

तरंगत्या चित्रपटगृहाचे शेखर कपूर यांच्या हस्ते उद्घाटन

‘शायना फ्लॉटोप्लॅक्स’ नावाचे पहिले तरंगते सिनेमाघराचे इफ्फी २०११ च्या निमित्ताने प्रसिद्ध हॉलीवूड व बॉलीवूड दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या हस्ते पणजी येथे उद्घाटन झाले. माननीय मुख्यमंत्री दिगंबर कामत व मनोरंजन सोसायटीचे सीईओ मनोज श्रीवास्तव याप्रसंगी उपस्थित होते. ‘धी सायलंट नॅशनल अँथम’ व ‘सही धंदे गलत बंदे’ या इंडियन पॅनोरामामधील चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले.

पुरस्कारांच्या बोथट शस्त्राची ऐशीतैशी

- दिलीप बोरकर

एखादी राज्यव्यापी चळवळ, जी विशेष जोर धरू शकली नाही, ती पुढे रेटण्यासाठी पुरस्कार हे शस्त्र होऊ शकते का? आंदोलनाचा विझत चाललेला वणवा पुरस्कार परत करण्याच्या नाटकी केरोसीनने भडकून उठू शकतो का? की पुरस्कार परत करण्याच्या धोरणाचे बोथट शस्त्र एक थट्टेचा विषय बनून एकंदर आंदोलनच पोरखेळ बनून जाते, यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. आज इंग्रजी माध्यम अनुदानविरोधी आंदोलनातील काही नेते आपल्या कपाटातील पुरस्कार बाहेर काढून, त्यावरील धूळ साफ करून सरकारला परत करायला लागलेले आहेत आणि ते घेताना जेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रसिद्धी पदरी पाडून मोकळे होतात. ह्या प्रसिद्धीचा, ह्या पुरस्कार परत करण्याच्या नाटकाचा एकंदर चळवळीला काही फायदा होतो का? एखाद्याने पुरस्कार परत केल्याबरोबर राज्यातील सर्वच्या सर्व पुरस्कार विजेते आपापले पुरस्कार परत करण्यासाठी रांगा लावतात का? ह्या धोरणाने आंदोलनाने उधाण येते का? चळवळ, आंदोलनाचा मार्ग चोखळणार्‍या प्रत्येकाने यावर विचार करण्याची आज गरज आहे.

हडेलहप्पी

किरकोळ विक्री क्षेत्रात ५१ टक्के थेट विदेशी गुंतवणुकीस अनुमती देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद कालही संसदेत उमटले व कामकाज तहकूब करावे लागले. सरकारने मध्यस्थी करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकही घेतली. परंतु त्यातूनही या निर्णयास होणारा विरोध मावळू शकलेला नाही. या देशातील लक्षावधी किराणा दुकानदारांशी, पर्यायाने छोट्या उत्पादकांशी, शेतकर्‍यांशी संबंधित असा हा संवेदनशील विषय असल्याने ज्या घिसाडघाईने आणि राजकीय पक्षांना विचारात न घेता मंत्रिमंडळाने यासंदर्भातील निर्णय घेतला, त्यातून आजची परिस्थिती ओढवणार याचे संकेत मिळत होतेच. तरीही सरकारने स्वतःहून आजच्या राजकीय अस्थिरतेस आमंत्रण दिले आहे असेच म्हणावे लागेल. भाजपा आणि डावे पक्षच या निर्णयाच्या विरोधात आहेत असे नव्हे, तर खुद्द संयुक्त पुरोगामी आघाडीतील घटक पक्ष असलेला द्रमुक आणि तृणमूल कॉंग्रेसने या निर्णयास कडाडून विरोध केलेला आहे. दुसरीकडे विरोधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष असलेल्या अकाली दलासारख्या पक्षाने मात्र आघाडीशी विसंगत भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे हा विषय अधिक ताणला गेला, तर त्यातून सध्याची राजकीय समीकरणे उलटीपालटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वादळी वार्‍याने मच्छीमारी होड्यांची नासधूस झाली

Story Summary: 

१) समुद्राला आलेल्या उधाणामुळे व वादळी वार्‍याने मच्छीमारी होड्यांची नासधूस झाली. २) किनार्‍यावर वादळाने केलेली पडझड ३) वाहून जाणारी मच्छीमारी जाळी आणि होड्या वाचवण्याच्या प्रयत्नात स्थानिक. (छाया : गणादीप शेल्डेकर)

पाळोळे व कोळंब किनार्‍यास वादळाचा तडाखा

Story Summary: 

मच्छीमारी बोटी व जाळ्यांचे लाखोंचे नुकसान

काणकोण तालुक्यातील किनारपट्टीवर २७ रोजी मध्यरात्री अचानक आलेल्या वादळामुळे पाण्याची पातळी वाढल्याने पाळोळे व कोळंब किनार्‍यांवरील चाळीसहून अधिक मच्छिमारी बोटी व जाळ्यांची नासधूस होऊन कोट्यवधींची हानी झाली आहे. या आकस्मिक प्रकारामुळे त्सुनामीच्या आठवणी ताज्या झाल्याने या परिसरात घबराट पसरली.

रविवारी मध्यरात्री अचानक वादळी वारे वाहू लागले व समुद्राच्या पाण्याला भरती आली. त्यामुळे समुद्राला उधाण आले व पाणी भरती रेषा पार करून किनार्‍यावर दूरपर्यंत थडकले. तेथे भरती रेषेलगत उभ्या केलेल्या मच्छिमारी होड्यांना लाटांचे तडाखे बसले व आत पाणी शिरले. अनेक होड्या यावेळी पाण्याच्या जोरामुळे वाळूत अडकल्या, तर काही होड्यांमधील मच्छिमारी जाळी पाण्याबरोबर वाहून गेली.

माध्यम प्रश्‍नी सरकारविरुद्ध अवमान याचिका

Story Summary: 

निर्णयास स्थगिती असताना अनुदान वितरणास हरकत

इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान देण्याच्या सरकारच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिलेली असतानाही माध्यम बदललेल्या १४० शाळांना सरकारने अनुदान दिल्याने न्यायालयाचा अवमान झाल्याचा दावा करून अर्जदार सई डिचोलकर व अन्य तिघांनी वरील न्यायालयात काल अवमान याचिका सादर केली आहे.

सरकार या प्रकरणी आज न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार असून उद्या दि. ३० रोजी या अर्जावर सुनावणी होणार आहे. सरकारच्या वरील निर्णयास आव्हान देणारा आणखी एक अर्ज शिक्षणतज्ज्ञ पांडुरंग नाडकर्णी यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून न्यायालयाने वरील प्रकरणी स्वेच्छा दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विधिमंडळ निवडणुकांची घोषणा लवकरच : खुर्शिद

राज्यपालांची स्थगिती याचिका न्यायालयाने फेटाळली

Story Summary: 

गोवा राजभवन हे ‘जनतेची अधिकारिणी’ असून ते माहिती हक्क कायद्याच्या अखत्यारित येत असल्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निवाड्याला स्थगिती देण्याची मागणी करणारी गोव्याच्या राज्यपालांची याचिका सुनावणीस घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल नकार दर्शविला. न्यायमूर्ती यू. व्ही. बाक्रे यांच्यासमवेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे प्रमुखपद सांभाळणार्‍या न्यायमूर्ती ए. पी. लवंदे यांनी ‘नॉट बिफोर मी’ असे म्हणत सदर याचिका सुनावणीस घेण्यास नकार दिला.

१४ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याला राज्यपाल सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याने सदर निवाड्याला स्थगिती देण्याची विनंती गोवा राज्यपालांचे विशेष सचिव डॉ. एन. राधाकृष्णन यांनी याचिकेद्वारे केली आहे.

कोलवा येथील २१ हॉटेलांवर कारवाई

मंगळसूत्र हिसकावून म्हापशात पोबारा

काल सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास राधिका राजन कासकर (४२), चिखली-कोलवाळ या महिलेच्या गळ्यातील सुमारे ३० हजार रुपये किंमतीचे गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमाने दत्तवाडी-म्हापसा येथे हिसकावून पळ काढला.

सराईत दुचाकी चोरांची टोळी केपे पोलिसांनी पकडली

चोरलेल्या सात दुचाक्या हस्तगत

केपे पोलिसांनी मोटारसायकल व स्कूटर चोरणार्‍या चौघांच्या टोळक्याला पकडण्यात यश मिळवले असून सर्व चोरटे अल्पवयीन आहेत. चोरट्यांकडून पोलिसांनी सात दुचाक्या जप्त केल्या आहेत. कट्टा - आमोणे येथे दोन मुले संशयास्पदरीत्या डिओ स्कूटरवरून जात असताना तेथून जाणार्‍या पोलिसांनी सतर्कतेने या स्कूटरचा पाठलाग केला असता दोन्ही मुले स्कूटर तेथेच टाकून पळाली. या गडबडीत एका चोरट्याचा मोबाईल फोन खाली पडला. केपे पोलिसांनी तो फोन ताब्यात घेन एका चोरट्याचा माग काढला.

ऑस्कर फर्नांडिसना जुवारी पुलाबाबत भेटल्याचा माविन यांचा दावा

जुवारी पूल कमकुवत बनला असून कोणत्याहीक्षणी तो कोसळू शकेल. त्यामुळे १७ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम कधीही होऊ द्या, परंतु जुवारी पुलाचे काम प्राधान्याने हाती घ्यावे, अशी मागणी आपण कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश निवडणूक छाननी समितीचे अध्यक्ष ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे केली आहे. त्यांनी या प्रस्तावाचा युद्धपातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिल्याचे उपसभापती तथा प्रवक्ते माविन गुदिन्हो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

टूजी घोटाळ्यात कनिमोझीसह चार आरोपींस जामीन

एकाचा जामीन अर्ज फेटाळला

टूजी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी द्रमुक नेत्या कनिमोझी व इतर चार आरोपींना काल दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहुरा यांच्या जामीन अर्जास सीबीआयने विरोध केल्याने त्यांना जामीन मिळू शकला नाही. इतरांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे पाच हमीदार सादर करण्यास सांगण्यात आले असून देशाबाहेर जाण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.

मलेरिया कर्मचार्‍यांची पुन्हा बोळवण?

- ज. अ. रेडकर, सांताक्रुझ - पणजी

मलेरिया निर्मूलन कंत्राटी कर्मचार्‍यांचे पंधरा दिवसांचे उपोषण अखेर मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवून मागे घेण्यात आले. यापूर्वीही अशी आश्वासने दिली गेली आणि ती पाळली नाहीत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे हे आश्वासन म्हणजे पूर्वीच्याच आश्वासनाची पुनरावृत्ती नसेल कशावरून असा प्रश्न कुणालाही मनात येईल. लेखी आश्वासन देताना प्रक्रिया पूर्तीसाठी साठ दिवसांची मुदत अपेक्षित आहे. आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा हा प्रकार आहे. पंधरा दिवसांच्या उपवासाने क्षीण व अस्थिपंजर झालेल्या कर्मचार्‍यांची स्थिती पाहावत नव्हती. कोणत्याही क्षणी मृत्यू त्यांच्यावर झडप घालील असे वाटत होते. तसे घडते तर सारा गोमंतक पेटून उठला असता यात शंका नाही. इफ्फीसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांनीदेखील या उपोषणकर्त्यांची भेट घेतली, आपली सहानुभूती दर्शविली आणि सरकारच्या या असंवेदनशीलतेचा निषेध केला. म्हणजे एक प्रकारे कंत्राटी कामगारांचा प्रश्न इफ्फीमुळे प्रसार माध्यमांद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला म्हणायचा. यंदाच्या इफ्फीची ही फलश्रुती म्हणायला हरकत नसावी. सरकार बदनाम झाले. महनीय पाहुण्यांच्या समोर आणखी शोभा नको म्हणून कदाचित सरकारने आश्वासनांचे गाजर दाखविले असण्याची ज्यास्त शक्यता वाटते. मृत्यू समोर दिसत असताना आश्वासन मिळाले म्हणजे बुडत्याला काडीचा आधार असेही उपोषणकर्त्यांना वाटणे शक्य आहे. कारण फुकाफुकी मरण कुणालाच नको असते. किंबहुना प्रत्येक सजीव सर्वांत जास्त मरणालाच घाबरतो. मरण अटळ आहे हे माहीत असून देखील.

छोट्या निर्मात्यांची व्यथा

राष्ट्रीय पुरस्कारासह तब्बल २१ पुरस्कार पटकावलेल्या आपल्या ‘बाबू बँडबाजा’ या चित्रपटास वितरक मिळत नसल्याची जी व्यथा दिग्दर्शक राजेश पिंजनानी यांनी परवा ‘इफ्फी’त मांडली, ती चंदेरी दुनियेतील आजच्या भीषण वास्तवाची धग जाणवून देणारी आहे. असे अनेक चित्रपट महोत्सवांमधून चित्रपट समीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरतात, परंतु आम प्रेक्षकांपर्यंत कधी पोहोचूच शकत नाहीत अशा प्रकारचे कमालीचे व्यावसायिक वातावरण आज चित्रपट उद्योगामध्ये निर्माण झालेले आहे. वीज महामंडळातील भ्रष्टाचारावरील ‘एक कप चहा’ या चित्रपटानेही अशीच ‘इफ्फी’त हजेरी लावली होती, परंतु वितरकांकडून नकारघंटा मिळाल्याने हैराण झालेल्या निर्मात्यांनी शेवटी एलसीडी प्रोजेक्टरद्वारे त्या चित्रपटाचे प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक चांगले, दर्जेदार चित्रपट महोत्सवांमधून दिसतात, परंतु चित्रपटगृहांमध्ये मात्र कधीच लागत नाहीत हे का घडते याचा शोध घ्यायला गेले तर चित्रपट वितरणाच्या व्यवसायातील गटबाजी आणि हितसंबंध यावर झगझगीत प्रकाश पडतो. देशातील तेरा हजार चित्रपटगृहांमधून कोणते चित्रपट प्रदर्शित करायचे हे शे - दीडशे वितरक ठरवीत असतात.आज हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुतेक बड्या कंपन्यांनी स्वतःचे स्वतंत्र वितरण विभाग उभे करून या क्षेत्रात स्वतःची मक्तेदारी निर्माण केलेली आहे. त्यामुळे छोट्या छोट्या निर्मात्यांपुढे अर्थातच पेचप्रसंग उभा ठाकतो आहे.

A large section of catholic community demands to advance concluding ceremony of iffi to 2nd December

BJP demands that the regional plan 2021 be kept in abeyance till the land acquisition policy is implemented

Real estate lobby is suspected to be behind the opposition to the regional plan 2021 to get a higher floor to area ratio

22 Colva establishments have been ordered to suspend their operations for violating pollution control board directives on sewage discharge

ब्राझीलचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ऑस्कर मारन फिल्हो यांचे निधन

Story Summary: 

ब्राझीलचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ऑस्कर मारन फिल्हो यांना काल ‘इफ्फी’तील ‘ओपन फोरम’ कार्यक्रमावेळी हृदयविकाराचा झटका आला. तत्पूर्वी घेतलेल्या या छायाचित्रात डावीकडून चौथे श्री. फिल्हो. नंतर गोमेकॉमध्ये त्यांचे निधन झाले.

राज्यपालांच्या स्थगिती याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी

Story Summary: 

गोवा राजभवन हे ‘जनतेची अधिकारिणी’ असून ते माहिती हक्क कायद्याच्या अखत्यारित येत असल्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निवाड्याला स्थगिती देण्याची मागणी करणार्‍या गोव्याच्या राज्यपालांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आज २८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

न्यायमूर्ती ए. पी. लवंदे व न्यायमूर्ती यू. व्ही. बाक्रे यांच्यासमोर सदर याचिकेवर सुनावणी होणार आहे. राज्य मुख्य माहिती आयुक्त मोतीलाल केणी हे आपले नातेवाईक असल्याने माहिती आयोगाने दिलेल्या निवाड्यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी घेण्यास यापूर्वी न्यायमूर्ती लवंदे यांनी नकार दर्शविला होता. राज्यपालांच्या या याचिकेला ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांच्या आक्षेपाचीही अपेक्षा आहे.

ब्राझीलच्या चित्रपट दिग्दर्शकाचे ‘इफ्फी’त हृदयविकाराने निधन

Story Summary: 

इफ्फीसाठी गोव्यात आलेले ब्राझिलियन चित्रपट दिग्दर्शक ऑस्कर मॅरोन फिल्हो (५४) यांचे काल हृदयविकाराने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात निधन झाले. काल इफ्फीस्थळी आयनॉक्स प्रांगणात ओपन फोरममध्ये भाग घेतला असता हृदय विकाराचा झटका आल्याने ते तेथेच कोसळले. नंतर त्यांना तात्काळ गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. पण तेथे उपचार चालू असतानाच त्यांचे निधन झाले.

दरम्यान, इफ्फीचे संचालक शंकर मोहन यानी ऑस्कर मॅरोन फिल्हो यांच्या निधनाबद्दल काल पत्रकार परिषद घेऊन दुःख व्यक्त केले. दुखवटा म्हणून इफ्फी स्थळी संगीत वाजवायचे नाही असा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले. आज होऊ घातलेला रेड कार्पेट सोहळाही रद्द करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

जीवनाच्या प्रत्येक क्षणावर प्रेम करा

Story Summary: 

कवळे येथील कार्यक्रमात कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे उद्गार

(अजय बुवा यांजकडून)

जीवनाचा आनंद मोकळेपणाने घ्यावा. एकमेकांना दाद देऊन घ्यावा. हाच मंत्र माणसांना मृत्यूवर मात करायला शिकवील, म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षणावर प्रेम करा. कवितेच्या शब्दांत सांगायचे तर ‘मरण येणार म्हणून कोणी जगायचं सोडतं का? जीव जडून प्रेम कोणी करायचं सोडतं का?’ असे सुंदर आशावादी विचार ज्येष्ठ मराठी कवी व गीतकार मंगेश पाडगावकर यांनी काल कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्ष व गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने श्री शांतादुर्गा शिक्षण समिती, कवळे यांनी आयोजित केलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केले. डॉ. अजय वैद्य यांनी ही प्रकट मुलाखत घेतली.

‘‘आमच्याकडे बा. भ. बोरकर वारंवार यायचे. आपल्या कवितेचे वाचन ते करायचे. त्यांच्या कवितांनी मी भारावून गेलो होतो. त्यांचीच एक कविता वाचून ‘तुज पाहिले, तुज वाहिले, नवपुष्प हे पहिलेच ते’ ही माझी पहिलीवहिली कविता मी लिहिली व त्यांना वाचून दाखवली. त्यांच्या शाबासकीने माझ्यातील कवी फुलत गेला’’ असे श्री. पाडगावकर यांनी विनम्रपणे सांगितले.

अडवई-सत्तरी येथील अपघातात युवकाचा मृत्यू

शनिवारी रात्री ७ च्या दरम्यान अडवई-सत्तरी येथे झालेल्या मोटारसायकल व अज्ञात वाहनाच्या अपघातात सावर्शे-सत्तरी येथील विशांत रामनाथ गावकर वय २५ वर्षे याचा जागीच मृत्यू झाला. तर विष्णू रामनाथ साखळकर वय १८ व जनी रामनाथ साखळकर वय ४५ वर्षे (दोघेही साखळी हरवळे येथील) गंभीररित्या जखमी झाले. त्यांना गोमेकॉ बांबोळी येथे उपचारासाठी नेण्यात आले. सविस्तर माहितीनुसार विशांत हा जीए ०४ ए ४१४४ या क्रमाकांची मोटारसायकल घेऊन होंडा येथे जात होता.

पक्षनिष्ठांवर अन्याय होत असल्याची तक्रार

सावर्डे येथे रेल्वेच्या धडकेने एक ठार

तिन्ही डॉक्टरांचे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

पोनभाट वेर्णा येथील रवीना रॉड्रिगीस हिच्या मृत्यूप्रकरणी वास्को पोलिसांना हवे असलेले डॉ. शांताराम सुर्मे, डॉ. श्रीधर पै व डॉ. दिलीप आमोणकर यांनी येथील प्रथम श्रेणी न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

तोतया पोलिसांचा महिलेला गंडा

पोलीस असल्याचे सांगून व चोरीची भीती दाखवून महिलांच्या अंगावरील दागिने नेणारी टोळी पुन्हा मडगावात गंडा घालू लागली आहे. आज सकाळी एसपीडीए बाजाराजवळ आपण सी.आय.डी. पोलीस असल्याचे सांगून काणकोण येथील विजया व्यंकटेश शेणवी बेलयो यांच्या अंगावरील १.६५ लाख रुपयांचे दागिने लुटले.

संकटे आली नसती तर मोठी झाले नसते : सिंधुताई सपकाळ

‘अर्पण’ व्याख्यानमालेत अनुभवकथनाने रसिक हेलावले

‘‘वयाच्या नवव्या वर्षी लग्न झाले. पती पस्तीस वर्षांचे होते. मी वीस वर्षांची असताना पतीने मला सोडले, तेव्हा मी बाळंतीण होते. त्यावेळी गोठ्यात गाईने मानवता शिकवली. तिला वचन दिलं की मी ‘माय’ होईन आणि आज १०४२ निराधारांची ‘माय’ बनले. दुसर्‍यांचे अश्रू कळणे, दुबळ्यांना आधार देणे हे खरे शिक्षण. मला आयुष्याने हे शिकवले. खाच - खळगे, काटे - कुटे, धोक्याची वळणे ‘आई’ होण्यासाठी पार करावी लागतात. वेदना पदरात घेते ती आई म्हणून मी आज ‘माई’ झाले. माझ्यावर संकटं आली नसती तर मी मोठी झाले नसते.’’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी या शब्दांत ‘अर्पण’ व्याख्यानमालेचे ‘आई’ हे तिसरे व अंतिम पुष्प गुंफताना आपली जीवनकथा मांडली.

अशोक वृक्ष पडून दुचाकीस्वार जखमी

येथील स्वातंत्र्यपथ मार्गावरील एच. क्यू. हॉटेल समोर असलेला जुना अशोक वृक्ष कोसळून सदर मार्गाने आपल्या दुचाकीवरून जाणारा वीज खात्याचा कर्मचारी जखमी झाला.

रविवारी दुपारी १२.४५ वाजता हा प्रकार घडला. वीज कर्मचारी सत्यप्पा हा आपल्या एम-८० वरून (जीए ०२ एल ३२६३) वास्कोच्या दिशेने येत होता. यावेळी मार्गाच्या विरुध्द बाजूने एच. क्यू. हॉटेलच्या समोर असलेला वृक्ष मुळापासून उन्मळून रस्त्यावर पडला.

पर्यटन व्यवसायाकडे ‘डोळस’पणे बघा

- रमेश सावईकर

पर्यटन व्यवसाय हा राज्याचे उत्पन्न वाढविणारा असल्याने त्याची वृद्धी व्हावी म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील आहे. एखाद्या व्यवसायाकडे केवळ उत्पन्नाचे साधन म्हणून न पाहाता त्याचे फायदे व तोटे या दोन्हींचा सर्वंकष विचार व्हायला हवा.

खाण व्यवसायानंतर आर्थिक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणजे पर्यटन असे मानून गोव्यात येणार्‍या देशी - विदेशी पर्यटकांच्या संख्येत कशी वाढ होईल यादृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. खाण व्यवसायाची वृद्धी साधताना उत्पन्न मिळाले, पण त्यामुळे गोमंतकीय जनतेचे किती नुकसान झाले आणि भविष्यात किती होऊ घातले आहे त्याचे चित्र आज स्पष्ट झाले आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा र्‍हास होऊन पर्यावरण संतुलन बिघडल्याने त्याचे दुष्परिणाम आज जनतेच्या जीवनमानावर झाले आहेत. आता कुठे केंद्र सरकारने जाग आणल्याने राज्य सरकारला त्याची नोंद घेणे भाग पडले आहे. तरीसुद्धा बड्यांचे संबंध त्यात गुंतल्याने कृतीपेक्षा फार्स जास्त अशी थोडीशी परिस्थिती दिसत आहे. सरकारला त्याचे काही परिणाम भोगावे लागणार नसले तरी जनतेला ‘राम’ आठवावा लागेल हे नक्की!

रवीनाचा बळी

रवीना मृत्यूप्रकरणात तीन प्रथितयश डॉक्टरांविरुद्ध गुन्हा नोंदवला जाण्याची घटना ही गोव्याच्या वैद्यकीय इतिहासातील एक अभूतपूर्व घटना आहे. दुर्दैवी रवीनाचे वडील मायकेल यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांविरुद्ध ज्या निश्‍चयाने मोहीम राबवली त्यामुळेच ही कारवाई होऊ शकली, अन्यथा अशी हलगर्जीची किती तरी प्रकरणे हरघडी दाबली, दडपली जात असतात. ज्या डॉक्टरांविरुद्ध गुन्हे नोंदवले गेले आहेत, त्यापैकी एकाने केलेल्या चुकीच्या निदानावर विसंबून इतरांनी पुढील उपचार केल्याने रवीनाचा दुर्दैवी मृत्यू ओढवला असे दिसते. ही मंडळी आपल्या पेशाला जागली असती, तर आधी झालेले निदान चुकीचे आहे हे पुढील टप्प्यात तरी नजरेस आले असते व वेळीच चूक दुरुस्त करता आली असती, परंतु ते घडू शकले नाही आणि निष्पाप रवीनाला जीव गमवावा लागला. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट असल्याने संबंधितांवर यथोचित कारवाई होईल व रवीनाच्या पित्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. वैद्यकीय पेशाला काळीमा फासणारी गैरकृत्ये बर्‍याचदा होत असतात आणि ‘डॉक्टर’ या संस्थेप्रती असलेला आदरभाव आणि श्रद्धा यामुळे ती दुर्लक्षिली जातात. परंतु खरोखरच वैद्यकीय व्यवसायात आज रुग्णाचे हित परमोच्च मानले जाते का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

आराखड्याचा आखाडा अन् गोंयकारांचे ‘न्हयकारपण’

- सुरेश वाळवे

कोणी सर्वेक्षण केलेच तर असा निष्कर्ष निघेल की, ७० टक्के गोमंतकीयांना ‘प्रादेशिक आराखडा’ हे काय प्रकरण ते माहीतही असणार नाही. पण काय नवल बघा. आज प्रत्येकजण त्यावर बरेवाईट भाष्य करू लागला आहे! पंधरावीस वर्षांपूर्वी भूतखांब, केरी, फोंडा येथे होऊ घातलेल्या नायलॉन ६,६विरोधी आंदोलनाच्या वेळी अशाच प्रकारे सोम्यागोम्यादेखील ‘पॉलिमर सायन्टिस्ट’ बनला होता. पाचसहा वर्षांपूर्वी प्रादेशिक आराखडा-११ खूप गाजला होता. त्याला कारणही होते. गोव्यातील सगळे डोंगर आणि शेतेभाटे लालेलाल रंगविण्यात आली होती. हा रंगबदल म्हणजे तेथे निवासी वसाहती उभारण्याचा परवाना ठरला असता. एक तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. ऑस्कर रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली ‘गोवा बचाव अभियान’ स्थापन होऊन त्याने त्या सदोष आराखड्याविरोधात रान उठवले. ते इतके परिणामकारक ठरले की, तत्कालीन राणे सरकारला आराखडा मोडीत काढावा लागला. त्या आराखड्याचे दोन खलनायक आजही सत्तेत आहेत. परंतु दिगंबर कामत सरकारने उभयतांना नव्या आराखड्याच्या आखणीत चार ‘हात’ दूर ठेवले. एवढेच नव्हे तर मागचा अनुभव लक्षात घेऊन प्रादेशिक आराखडा- २१च्या आखणीसाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तुविशारद तथा गोव्याचे सुपुत्र एड्‌गर रिबैरो यांच्या नेतृत्वाखाली कार्य दल नेमले. त्यात राहुल देशपांडे वगैरेंसारख्या वास्तुतज्ज्ञांचा भरणा केला. तुम्ही काम करा; राजकीय हस्तक्षेप होणार नाही, अशी हमी दिली. तरीदेखील कुठे तरी माशी शिंकली अन् नाराज रिबैरो यांनी राजीनामा दिला. मात्र अन्य सदस्यांनी काम नेटाने पुढे नेऊन बाराही तालुक्यांचा आराखडा पूर्ण केला.

गोवा विरुद्ध झांबिया फुटबॉल सामन्यातील एक लक्षवेधी क्षण.

Story Summary: 

फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर काल रंगलेल्या गोवा विरुद्ध झांबिया फुटबॉल सामन्यातील एक लक्षवेधी क्षण.

तिन्ही डॉक्टर गायब

Story Summary: 

कारवाई करण्याची पोलिसांची ग्वाही

रवीना मृत्यूप्रकरण

पोनभाट - वेर्णा येथील रवीना रॉड्रिगिस हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले संशयित चिकीत्सक डॉ. शांताराम सुर्मे, डॉ. श्रीधर पै तसेच डॉ. दिलीप आमोणकर यांच्याविरुद्ध सहा सदस्यांनी सादर केलेला अहवाल मनुष्यवधाचा आरोप सिद्ध करण्यास पुरेसा आहे, असा दावा वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक राहुल परब यांनी काल केला.

तिघाही डॉक्टरांविरुद्ध वास्को पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा नोंद करून त्यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी, तसेच इतरत्र छापे टाकले, परंतु यापैकी कोणीच सापडू शकले नाही. यासंदर्भात बोलताना पोलीस निरीक्षक परबयांनी सांगितले की तिघाही डॉक्टरांना लवकरच ताब्यात घेतले जाईल.

चित्रपटगृहांतून लघुपट न दाखवणार्‍यांविरुद्ध न्यायालयात धाव घेणार : माईक पांडे

Story Summary: 

एक जानेवारीपासून दूरदर्शनवर लघुपटांसाठी रोज अर्धा तास

चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी वीस मिनिटे लघुपट दाखवणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाने तसा आदेश दिलेला आहे, मात्र या आदेशाची चित्रपटगृह मालक अंमलबजावणी करीत नाहीत असे आढळून आले असून भारतीय लघुपट निर्माता त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागतील असा इशारा भारतीय लघुपट निर्माता संघटनेचे सरचिटणीस संस्कार देसाई व अध्यक्ष माईक पांडे यांनी काल पत्रकार परिषदेत दिला.

बर्‍याच वर्षांपूर्वी देशातील चित्रपटगृहांतून फिल्मस् डिव्हिजनचे लघुपट दाखवले जात असत. मात्र, आता लघुपट दाखवले जात नाहीत असे सांगून ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले असतानाही त्यांची अंमलबजावणी होत नाही. उपग्रह वाहिन्यांनीही सामाजिक बांधिलकी म्हणून माहितीपट दाखवायला हवेत, परंतु एक - दोन वाहिन्या सोडल्यास कोणीही ते दाखवीत नाहीत, अशी तक्रारही पांडे यांनी केली.

‘तृष्णा’तील भूमिकेमुळे भावनिक समाधान : फ्रीडा

Story Summary: 

‘तृष्णा’ या चित्रपटातील भूमिका करताना आपल्याला भावनिक समाधान मिळाले, असे उद्गार त्यात प्रमुख भूमिका करणारी आंतरराष्ट्रीय प्रख्यात अभिनेत्री फ्रीडा पिंटो हिने काल ‘इफ्फी’ मध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक मिशेल विंटरबॉटम यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

चित्रपटाच्या कथावस्तूने, अभिनय कौशल्य आणि मर्यादा शोधण्याची संधी मिळाल्याचेही तिने नमूद केले. यावेळी चित्रपट निर्मितीची प्रक्रिया व संकल्पना याविषयी फ्रिडा पिंटो व मिशेल विंटरबॉटम यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मयेवासियांचे १ डिसेंबरपासून पणजीत उपोषण

मये गावच्या मुक्तीसाठी सरकारतर्फे चालढकल केली जात असल्याने आता मयेवासियांनी १ ते १८ डिसेंबरपर्यंत पणजीत दीर्घ उपोषण करण्याचा निश्‍चय केला आहे. या दिवसात रोज सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पणजी येथील कस्टम कार्यालयासमोर उपोषणास मयेवासिय बसणार आहेत, अशी माहिती मये भूविमोचन नागरिक कृती समितीचे अध्यक्ष काशिनाथ मयेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. सुरेश आमोणकर यांचा आज भाजपामध्ये फेरप्रवेश

पाळी मतदारसंघाचे माजी आमदार व माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश आमोणकर हे आज रविवार दि. २७ रोजी भारतीय जनता पक्षामध्ये फेरप्रवेश करणार आहेत. पणजीत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आज संध्याकाळी चार वाजता काही कार्यकर्त्यांसह त्यांना स्वगृही प्रवेश दिला जाणार आहे.

गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवानिमित्त भारत सरकारचे विशेष टपाल तिकीट

गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने येत्या १९ डिसेंबर रोजी टपाल खाते गोव्यावरील एक विशेष टपाल तिकीट प्रसिद्ध करणार असून सदर कार्यक्रमाला केंद्रीय दळणवळण मंत्री सचिन पायलट उपस्थित राहणार आहेत. खासदार शांताराम नाईक यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.

किरण बेदींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा आदेश

विदेशी कंपन्या व काही संस्थांशी संगनमत करून निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा आदेश काल दिल्लीतील न्यायालयाने दिला. दिल्लीतील वकील देवेंद्रसिंग चौहान यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रथमवर्ग दंडाधिकारी अमित बन्सल यांनी हे आदेश दिले.

इच्छाशक्तीच्या जोरावर अडचणींवर मात

आदिवासी वस्तीतील दोन पायांच्या प्राण्यांचे जीवन चार पायांच्या प्राण्यांपेक्षा भयंकर आहे, याचे दर्शन आम्हाला झाले आणि आम्ही आमचे खासगीपण बाजूला ठेवून आमच्या गरजा कमी करून बांधिलकीला महत्त्व दिले. इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अडचणींवर मात करून हेमलकसात आदिवासींसाठी काम केले, म्हणूनच अशक्य ते शक्य झाले असे डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी काल ‘अर्पण’ व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना सांगितले.

काणकोण येथे आत्महत्या

भिकरवाडा-काणकोण येथील शिवानंद खुशाली देसाई (३९) या अविवाहिताने घरा लगतच्या विहिरीत आत्महत्या करण्याची घटना २६ रोजी घडली. मयत २५ पासून बेपत्ता होता. शिवानंद हा चार रस्ता येथे मोटारसायकल पायलट म्हणून काम करीत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्याच्यावर २७ रोजी संध्याकाळी ४ वा. अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्याच्या पश्‍चात्य आई व भावंडे असा परिवार आहे.

जंगल संवर्धनासाठी सायकल यात्रा

- भक्ती मसे गवस

पर्यावरण म्हणजे काय? हा प्रश्‍न आपल्याला कधी पडलाय का? मुळीच पडला नसेल. कारण सर्वांनाच माहिती आहे, पर्यावरण म्हणजे काय ते. आजूबाजूने नटलेला सुंदर असा हिरवागार निसर्ग, झाडं, फुलं, पक्षी, झरे, नदी, शीतल वारा - पाऊस हा सगळाच पर्यावरणाचाच तर भाग आहे. पण आज हे सर्व कुठंतरी हरवल्यागत वाटतंय. हे असं का घडतंय आणि कोण घडवतोय याचा कधी विचार केलात का?

नौकाविहारात विलसे परब्रह्म

- सौ. पौर्णिमा केरकर

नौका म्हणजे नाव. आज वाहतूक आणि दळणवळणाची साधने विकसीत झालेली असल्याने जलमार्गाचा प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत नाही. एका प्रदेशातून दुसर्‍या प्रदेशात किंवा एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी पूर्वी नौकेचा वापर केला जायचा. भारताच्या इतिहासात पूर्वी नौकानयनाला महत्त्वाचे स्थान होते. प्राचीन काळापासून नौकानयनाच्या विद्येत भारतीय लोकांनी विशेष कौशल्य प्राप्त केले होते. पूर्वी बराचसा व्यापार समुद्रमार्गाने होत असल्याने नौकानयन महत्त्वाचे ठरले होते. अजंठा येथील भित्तिचित्रामध्ये नौकानयनाचे चित्र आहे. देशभरातील मंदिर शिल्पांमध्ये नौकानयनाची चित्रे आहेत. सत्तरीतील भिरोंडा, भुईपाल, धामशे, गुळेली, सावर्डे आदी गावांत नौकेत आसनस्थ झालेल्या आणि उभ्या स्थितीत असलेल्या दुर्गेच्या मूर्ती आढळलेल्या आहेत. वाळपईजवळ असलेल्या नागव्याच्या देवराईत नौकेत उभी असलेली लोकदेवता आहे. फोंडा तालुक्यातील पूर्वाश्रमीच्या ‘गांजे’ बंदरात नौकांची ये-जा व्हायची. म्हादई काठी वसलेले हे बंदर बरेच गजबजलेले होते. आज हे बंदर विस्मृतीत गेलेले आहे. इथल्या गांजेश्‍वरीच्या मंदिरात नौकेत आसनस्थ झालेली देवी आहे. गोवा आणि नौकानयन यांचे पूर्वापार संबंध आहे. देशविदेशांतून पूर्वीच्या काळी नौकेद्वारे व्यापारी, यात्रेकरू यांची ये-जा व्हायची. विरगळावरही नौकानयनाचा इतिहास पाहायला मिळतो. सासष्टीतील न्हावेली आणि डिचोलीतील न्हावेली या गावांचा संबंध ‘नौका’, ‘नाव’ याच्याशी असला पाहिजे. एखाद्या जिल्ह्यापेक्षा भौगोलिक आकाराने लहान असलेला गोवा नदी, ओहोळ यांच्या जाळ्यांनी अक्षरश: विणलेला आहे. पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नौकेशिवाय जाणे हे गोव्यात बरेच कठीण होते.

अभिनेत्री फ्र्रिडा पिंटो रेड कार्पेटवर

Story Summary: 

अभिनेत्री फ्र्रिडा पिंटो रेड कार्पेटवर

रवीना मृत्यूप्रकरणी तीन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

Story Summary: 

संपूर्ण गोव्यात गाजलेल्या पोनभाट - वेर्णा येथील रवीना रॉड्रिगिस (१६) हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून वास्को पोलिसांनी येथील चिकीत्सक डॉ. शांताराम सुर्मे, डॉ. श्रीधर पै व डॉ. दिलीप आमोणकर व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेर्णा येथील रवीना रॉड्रिगिस ही जून २०१० मध्ये डॉ. सुर्मे यांच्याकडे उपचार घेत होती. २ जून रोजी डॉ. सुर्मे यांनी तिला कावीळ झाल्याचे अनुमान काढून तिला वाडे येथील खासगी इस्पितळात दाखल केले. ३ जून रोजी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेथून तिला घरी पाठवले गेल्यानंतर पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने ५ जुलै रोजी तिला पुन्हा त्याच इस्पितळात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिची तपासणी करून तातडीने तिला कोणत्याही प्रकारची वाहन व्यवस्थाही न करता बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यास सांगितले.

सरकार अँथनी गोन्साल्विस यांची ‘पद्म’ पुरस्कारासाठी शिफारस करणार

Story Summary: 

मुख्यमंत्र्यांची स्पष्ट ग्वाही

हिंदी चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे आघाडीचे ‘म्युझिक अरेंजर’ अँथनी गोन्साल्विस यांना केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा पद्म किताब मिळावा यासाठी गोवा सरकारतर्फे शिफारस करण्यात येईल, असे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

काल इफ्फीत अँथनी गोन्साल्विस यांच्यावरील लघुपट दाखवण्यात आला असता या लघुपटाचे निर्माते श्रीकांत जोशी यांनी अँथनी गोन्साल्विस यांच्या नावाची गोवा सरकारने पद्म किताबासाठी केंद्राकडे शिफारस करावी तसेच गोवा विद्यापीठातर्फे त्यांना संगीतातील डॉक्टरेट प्रदान करावी अशी मागणी केली होती. त्या संदर्भात लघुपटानंतर मुख्यमंत्र्यांना विचारले असता अँथनी गोन्साल्विस यांना पद्म किताब देण्यात यावा यासाठी गोवा सरकार केंद्राकडे शिफारस करेल, असे त्याबाबत विचारले असता ते म्हणाले.

पुंडलिक नाईक यांना साहित्य प्रतिभा पुरस्कार

Story Summary: 

कोकणी अकादमीचे पुरस्कार जाहीर

गोवा कोकणी अकादमीचे साहित्य व सेवा पुरस्कार जाहीर झाले असून प्रसिध्द कोकणी लेखक पुंडलिक नाईक यांना साहित्य प्रतिभा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पंचवीस हजार रु. रोख, प्रमाणपत्र शाल आणि मानचिन्ह या स्वरूपाचा हा पुरस्कार असल्याचे अध्यक्ष एन. शिवदास यांनी काल पुरस्कारांची घोषणा करताना सांगितले.

याच स्वरूपाचा साहित्यप्रज्ञा जीवनगौरव पुरस्कार रॉकी मिरांडा यांना प्राप्त झाला आहे. गौरीश वेर्णेकर व अनंत अग्नी यांना प्रत्येकी पंधरा हजार रु. रोख, प्रमाणपत्र व मानचिन्ह पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कथा विभागासाठी असलेला दहा हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व मानचिन्ह स्वरूपाचा नयना आडारकर यांच्या ‘स्पंदन’ या कथासंग्रहासाठी, नाट्य लेखन विभागात उल्हास नाईक यांच्या ‘गे आये’ तर निबंधासाठी असलेला नमन धावस्कर यांच्या ‘मुक्तमन’ या निबंध संग्रहास संशोधन, विभागात ‘वखदी वनस्पती’ या डॉ. अर्चना गावकर यांच्या पुस्तकास प्राप्त झाला आहे. तर बालसाहित्यासाठी असलेला पांच हजार रु. रोख, प्रमाणपत्र व मानचिन्ह या स्वरूपाचा पुरस्कार सुधा खरंगटे यांच्या ‘काणी एका खुन्याची’ या पुस्तकास मिळाला आहे.

टी. बी. कुन्हा यांचे संसदेत तैलचित्र

गोव्यातील राष्ट्रवादी चळवळीचे जनक डॉ. टी. बी. कुन्हा यांचे लोकसभेत व राज्यसभेत तैलचित्र लावण्याचे केंद्र सरकारने मान्य केले असून येत्या १९ डिसेंबर रोजी ते लावण्यात येणार असल्याचे अनिवासी भारतीय आयुक्त एदुआर्द फालेरो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न कराल तर चित्रपटगृहांत घुसू

विष्णू वाघ यांचा सरकारला इशारा

इंग्रजी ’ाध्य’ातील प्राथि’क शाळांना अनुदान देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी इफ्फीच्या स्थळी ब्लॅक कार्पेट आंदोलन करणार्‍यांविरुद्ध पोलीस दडपशाही करीत आहेत. यापुढे दडपशाही चालू ठेवल्यास चित्रपटगृहात घुसून आंदोलन करू असा इशारा लेखक व भारतीय भाषा सुरक्षा मंचचे नेते विष्णू वाघ यांनी काल दिला.

आज राजकीय व्यवस्था बांडगूळ बनली आहे : धर्माधिकारी

आपली राजकीय व्यवस्था ही आपल्या सामाजिक व आर्थिक व्यवस्थेचे शोषण करून घेणारी बांडगुळे बनली आहेत. भ्रष्टाचारमुक्त कार्यक्षम प्रशासन हवे असेल तर लोकशाहीच्या मूलभूत सुधारणेचा विचार करायला हवा. सरकारी यंत्रणेने सामान्य जनतेशी सन्मानाने वागले पाहिजे, हा आपला मूलभूत हक्क आहे. लोकपाल विधेयक संमत होणे आवश्यक आहे, मात्र जादूची कांडी फिरवल्यासारखा, कायदा करून भ्रष्टाचार संपुष्टात येणार नाही, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी व सामाजिक चळवळीतील सुपरिचित व्यक्तिमत्त्व अविनाश धर्माधिकारी यांनी येथे केले.

मुरगाव खरोखरच सुंदर झाले आहे का?

- सौ. उल्का उ. गांवस, हेडलँड-सडा, मुरगांव.

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट! आटपाट देश होता. तिथे एक प्रधानमंत्री राज्य करायचा. त्याने जनतेकरीता खूप योजना राबविल्या होत्या. आणि त्या योग्य प्रकारे राबविल्या जातात की नाही हे पाहण्यासाठी समित्याही त्याने नियुक्त केल्या होत्या. त्याच देशातील एक गाव, तिथे एक शेतकरी आपल्या शेतात राबराबराबायचा. खूप काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. एके दिवशी योजनेवर देखरेख ठेवणारी माणसे अचानक दारात हजर झाली. सरकारने योजनेंतर्गत बांधलेली तुमच्या शेतातील विहीर दाखवा असे त्यांनी फर्मान सोडले. शेतकरी बिचारा घाबरला. किंचित त्याला आश्‍चर्यही वाटलं. कारण, सरकारच्या कुठल्याही योजनेंतर्गत त्याच्या शेतात त्याने विहीर बांधलेली नव्हती. मग तो समितीला विहीर कुठली दाखवणार? सरकारी पैशांचा अपहार केला म्हणून समितीची माणसे त्या गरीब बिचार्‍या शेतकर्‍याला धमकावू लागली. शेतकर्‍याने खूप गहन विचार केला, आणि तो तडक पोलीस ठाण्यात गेला. त्याने ठाण्यात जाऊन आपली सरकारी योजनेंतर्गत आपल्या शेतात नवीन बांधलेली विहीर चोरीस गेल्याची तक्रार दिली. पोलीस हतबल. कारण अशी कुठलीही विहीर शेतकर्‍याच्या शेतात बांधलीच गेली नव्हती. आता बोला!

सवंग हल्ला

शरद पवार यांच्यासारख्या ७१ वर्षांच्या सुसंस्कृत व शालीन नेत्यावर थप्पड लगावणार्‍या माथेफिरूला या देशाच्या संत्रस्त जनतेचा प्रतिनिधी संबोधून त्या घटनेचे उदात्तीकरण करणे हे प्रत्यक्ष हल्ल्याइतकेच निंद्य व निषेधार्ह कृत्य आहे. देशात महागाईचा आगडोंब उसळलेला आहे आणि त्याची झळ दिवसामासी सर्वसामान्य जनतेला सोसावी लागते आहे हे खरे आहे आणि महागाईसारख्या शासकीय गैरव्यवस्थापनातून उद्भवणार्‍या समस्यांना संबंधित राजकारणी आणि त्यांची पुचाट धोरणे कारणीभूत ठरत असतात यातही बरेच तथ्य आहे, तरीदेखील कोण्या माथेफिरूने कायदा हातात घेऊन एखाद्या केंद्रीय मंत्र्याला थप्पड लगावणे हे कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही. नेत्यांना किंवा प्रसिद्ध व्यक्तींना लक्ष्य करून फुकटची देशव्यापी प्रसिद्धी मिळवण्याचे फॅडच अलीकडच्या काळात निर्माण झालेले आहे आणि प्रसारमाध्यमांची अशा गोष्टींचे चर्वण करण्यात आनंद मानण्याची वृत्ती व अशा घटना शोधण्याची बुबुक्षित नजरच त्याला खतपाणी घालत असते. कॅमेरे आपल्यावर असतील याची पूर्ण खात्री करून घेऊन एखाद्या बेसावध व्यक्तीवर हल्ला चढवणार्‍या या तथाकथित ‘आम आदमी’च्या प्रतिनिधींना ‘माथेफिरू’ याखेरीज दुसरा समर्पक शब्दच लागू होत नाही.

भारतीय पॅनोरमा विभागाच्या उद्घाटनप्रसंगी अभिनेत्री माधुरी दीक्षित

Story Summary: 

४२व्या ‘इफ्फी’मध्ये भारतीय पॅनोरमा विभागाच्या उद्घाटनप्रसंगी अभिनेत्री माधुरी दीक्षित व मुख्यमंत्री दिगंबर कामत

चित्रपटांमुळे विचारांची कक्षा वाढते : माधुरी

Story Summary: 

चित्रपटांमुळे आपली संस्कृती, आपले लोकजीवन व आपले विचार यांचे आदानप्रदान होण्यास मदत होते. आपल्याला बरेच काही शिकता येते व आपल्या विचारांची कक्षा वाढते, असे उद्गार ख्यातनाम बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने काल पणजीत ‘इफ्फी’त काढले.

आयनॉक्समध्ये ‘इफ्फी’तील ‘इंडियन पॅनोरामा’ या भारतीय चित्रपट विभागाचे उद्घाटन केल्यानंतर माधुरीने उपस्थितांशी संवाद साधला. गेल्या आठ वर्षांपासून ‘इफ्फी’ गोव्यात होतो आहे ही चांगली गोष्ट आहे. गोवा हे एक अत्यंत सुंदर असे स्थळ असून इफ्फीसाठी ते योग्यच असल्याचे तिने यावेळी सांगितले.

तरुणाने दिली पवारांच्या श्रीमुखात

Story Summary: 

महाराष्ट्रात घटनेचे तीव्र पडसाद

एका जाहीर कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असलेले केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या श्रीमुखात लगावण्याचा प्रकार एका तरुणाने केल्याने काल खळबळ माजली. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या विविध भागांत उमटले व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्ते रोखून निषेध व्यक्त केला. महागाई व भाववाढीच्या निषेधार्थ आपण पवार यांच्या थोबाडीत लगावल्याचे या तरुणाने नंतर पत्रकारांना सांगितले.

हरविंदर सिंग असे या हल्लेखोराचे नाव असून तो दिल्लीच्या रोहिणी भागातील रहिवासी आहे. दिल्लीच्या संसद मार्गावरील एका सभागृहातील कार्यक्रम आटोपून पवार बाहेर पडत असताना काही पत्रकारांनी किरकोळ विक्री क्षेत्रातील गुंतवणुकीसंदर्भात सरकारची भूमिका त्यांना विचारली असता, आपल्याला माहीत नसल्याचे उत्तर पवारांनी दिले. त्यावर ‘यांना सगळे माहीत आहे’ असे ओरडत अचानक या तरुणाने पवार यांच्या डाव्या बाजूने श्रीमुखात लगावली. ७१ वर्षीय पवार या आकस्मिक हल्ल्याने बाजूला फेकले गेले. पवारांसोबत असलेल्या सहाय्यकांनी या तरुणाला पकडून पोलिसांच्या हवाली केले. विशेष म्हणजे याच तरुणाने शनिवारी दूरसंचार मंत्री सुखराम यांना भ्रष्टाचार प्रकरणात सजा झाल्यानंतर दिल्लीतील न्यायालयाबाहेर गाठून मारहाण केली होती.

ब्रिटनमधून फरार वकिलाचे गोव्यात दुसर्‍या नावाने वास्तव्य

ब्रिटनमध्ये आपल्या एका अशिलाला गंडा घालून पसार झालेला आणि तब्बल २४ वर्षे फरार असलेला अँड्य्रू पॅटरसन हा ठकसेन मार्क पॅटरसन हे खोटे नाव धारण करून गोव्यात वास्तव्यास होता असे उघड झाल्याने खळबळ माजली आहे. गोव्यामध्ये एक यशस्वी व्यावसायिक म्हणून त्याने आपली स्वतःची नवी ओळख निर्माण केली होती, परंतु नुकताच त्याचा गेल्या महिन्यात गोव्यात आकस्मिक मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह जेव्हा ब्रिटनमधील पेंब्रोकशायर या गावी नेण्यात आला, तेव्हा पॅटरसन व ऍटवूड ही एकच व्यक्ती असल्याचे उघडकीस आले. ब्रिटनच्या ‘वेल्सऑनलाइन’या वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त काल प्रसिद्ध केले.

आराखडा रद्द न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

येत्या दि. ५ डिसेंबरपर्यंत अधिसूचित केलेला प्रादेशिक आराखडा २०२१ रद्द न केल्यास गोवाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पिळर्ण नागरिक मंचचे अध्यक्ष प्रकाश बांदोडकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिला.

निवडणूक अधिकारी कोयू यांची रवानगी

राज्य माहिती आयोग निर्नायकी स्थितीत

एकही सदस्य नसताना राज्य ’ाहिती आयोग चालू शकत नाही, असा निवाडा ’ुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे. या आयोगाचे सदस्य आफोन्सो आरावजो निवृत्त झाल्याने गेले वर्षभर सरकारने आयोगावर कुणाचीही नियुक्ती केलेली नाही. एम. एस. केणी सध्या मुख्य आयुक्तपदी आहेत. परंतु दुसरा सदस्य नसताना आयोगाचे काम चालू ठेवणे शक्य नाही. वरील कारणामुळे जनतेला माहिती हक्क कायद्याखाली माहिती मिळविणे कठीण झाले आहे.

हिज नेम इज अँथनी गोन्साल्विश

- सुरेश वाळवे

४२ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पणजीत सुरू झाला असून आज दुपारी २ वाजता मॅकेनिज पॅलेस चित्रपटगृहात श्रीकांत - मृणालिनी जोशी निर्मित आणि अशोक राणे दिग्दर्शित ‘ऍँथनी गोन्साल्विश - द म्युझिक लिजंड’ हा तासाभराचा लघुपट प्रदर्शित होणार आहे. त्याचा लघुपटाचा नायक अँथनी गोन्साल्विश हा गोव्याचा सुपुत्र. येत्या प्रजासत्ताकदिनी त्याला पद्म किताबाने गौरवावे, ही तमाम गोमंतकीयांची सद्भावना आणि राज्य सरकारला विनंती.

गेली चाळीसेक वर्षे गोव्यात असलेले आणि गोंयकारांपेक्षाही गोंयकार बनलेले श्रीकांत जोशी आपल्याला माहीत आहेत ते सर्वमित्र म्हणून. सिनेमा आणि संगीत हाच त्यांचा श्वास अन् ध्यास. रसिकोत्तम आणि दिलदार गृहस्थ. संगीतकार दत्ताराम (‘आँसू भरीं है जीवन की राहें’) वाडकर यांच्यावर श्रीकांत आणि मृणालिनी जोशी यांनी ‘मस्ती भरा है समां’ हा केवळ लघुपटच काढला असे नव्हे, तर दत्तारामसाहेबांची (सगळ्यांनाच ‘साहेब’ पुकारणे हे श्रीकांतजींचे वैशिष्ट्य) तनमनधने सेवाही केली. दत्ताराम मूळ मावळिंगे - डिचोलीचे. जोशींचे फार्मही तेथेच. त्यामुळे उभयतांची गाठभेट झाली अन् जिवाभावाचे नाते जडले.

भाववाढीच्या मुद्द्यावर संसदेचे कामकाज तहकुब

विरोधी पक्षांनी भाववाढीच्या मुद्द्यावरून काल संसदेचे कामकाज दिवसभरासाठी बंद पाडले. सलग तिसर्‍या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत प्रश्नोत्तरांचा तास होऊ शकला नाही. लोकसभेत कामकाज सुरू होताच समाजवादी पक्ष व राजद सदस्यांनी भाववाढीच्या विषयावर घोषणाबाजी सुरू केली व काहींनी सभागृहात धाव घेतली.

वेळापत्रक आणि वेळेचे भान

- डॉ. राजीव कामत, खोर्ली-म्हापसा

आजच्या संगणक युगात वेळेचे महत्त्व वादातीत आहे. प्रत्येक गोष्टीचे एक वेळापत्रक ठरलेले असते व त्यानुसार त्या त्या गोष्टी काटेकोरपणे केल्या जातात. संपूर्ण जगात लोकांना वेळेचे महत्त्व पटलेले असून त्या वेळेनुसार गोष्टी घडवण्याचा त्यांचा कल असतो. विशेषतः पाश्चिमात्य व युरोपीय देशांत, दिलेली वेळ अचूक पाळली जाते. असे म्हटले जाते की, या देशात जर तुम्हाला भेटायची एक वेळ देऊन तुम्ही ती पाळली नाही, तर उशिरा आल्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला भेटण्याची शाश्वती नसते.

व्यापार्‍यांचे संरक्षण

मल्टी ब्रँड किरकोळ विक्री क्षेत्रामध्ये थेट विदेशी गुंतवणुकीस अनुमती देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांविरुद्ध डावे आणि उजवे तर एकत्र आलेच आहेत, परंतु खुद्द सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या तृणमूल, द्रमुकसारख्या घटक पक्षांमधूनही विरोध होऊ लागला आहे. इतकेच कशाला खुद्द कॉंग्रेसमधील वीराप्पा मोईली, मुकुल वासनिक प्रभृतींनी आपल्या चिंता व्यक्त केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार वॉलमार्टसारख्या बलाढ्य जागतिक विक्री साखळ्यांना भारतीय किरकोळ विक्री बाजारपेठेत चंचुप्रवेश करू देणार का, हा आज लाखमोलाचा सवाल आहे. आपण जागतिकीकरणच्या युगात आहोत आणि जागतिक व्यापार संघटनेशी करारबद्ध असल्याने किरकोळ व घाऊक विक्रीसेवांच्या क्षेत्रामध्येदेखील हा करार आपल्यावर बंधनकारक आहे हे खरे असले, तरी सरकारच्या या पुढच्या पावलाचे काय दूरगामी परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर होतील हे तपासणेही तितकेच महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. देशातील एकूण किरकोळ विक्रीपैकी ९८ टक्के विक्री ही असंघटित किराणा दुकानदारांच्या माध्यमातून होत असते आणि शेतीनंतर रोजगार पुरवणारे ते दुसरे मोठे साधन आहे हे लक्षात घेतले, तर सरकारच्या प्रस्तावित निर्णयाचे किती दूरगामी परिणाम होऊ शकतील हे लक्षात येते.

४२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करताना अभिनेता शाहरूख खान.

Story Summary: 

४२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करताना अभिनेता शाहरूख खान. सोबत मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, मडगावच्या नगराध्यक्ष सुशीला नायक, मुख्यमंत्री दिगंबर कामत, केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री अंबिका सोनी, इफ्फीचे संचालक शंकर मोहन.

कलेची हत्या करू पाहणार्‍यांची गय नको : शाहरूख खान

Story Summary: 

४२व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे मडगावात शानदार उद्घाटन

कलेची हत्या करू पाहणार्‍यांची गय करून नये, सत्यासाठी लढायला घाबरू नये असे प्रसिद्ध अभिनेते शाहरूख खान यांनी काल सांगितले. मडगाव येथील रवींद्र भवनात आयोजित केलेल्या शानदार सोहळ्यात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अंबिका सोनी व शाहरूख खान यांच्या हस्ते ४२व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वाचे उद्घाटन झाले.

चित्रपट कथेचे आधुनिक माध्यम

किंग खान म्हणाले की, चित्रपट हे कथा सांगण्यासाठीचे आधुनिक माध्यम आहे. पुरातन काळी लोक तोंडाने एकमेकांना कथा सांगायचे. नंतर पुस्तकांचा शोध लागला आणि पुस्तकातून कथा सांगितल्या गेल्या आता कथा सांगण्यासाठीचे चित्रपट हे प्रभावी माध्यम बनले आहे.

सायरस मिस्त्री टाटांचे वारसदार

Story Summary: 

जगातील एक श्रीमंत व आघाडीचा उद्योग समूह मानल्या जाणार्‍या टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांच्या निवृत्तीनंतर त्यांची जागा सायरस मिस्त्री (४३) घेणार असल्याचे काल कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले. श्री. सायरस हे सध्या शापूरजी पालोनजी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहे.

दाबोळी येथील आगीत ६ लाखांचे नुकसान

Story Summary: 

आल्त दाबोळी येथे काल दुपारी डोंगरावरील सुक्या गवताला लागलेल्या आगीत तिथे उभा करून ठेवलेला टँकर सापडल्याने सुमारे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले. टँकर रिकामा होता त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत सुकलेले असून अधूनमधून गवताला आग लागण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून आढळून आले आहेत. या भागामध्ये मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर खाली टँकर्स व ट्रक पार्क करून ठेवले जातात.

गोव्यात ‘बफर झोन’ अस्तित्त्वातच नाही

राज्यसभेत माहिती

गोव्यातील वन्य प्राणी अथवा पर्यावरणाचा सांभाळ करण्याकरिता कोणताच बफर झोन स्थापन केलेला नाही व तसा प्रस्तावही गोवा सरकारकडून मंत्रालयाला आलेला नाही, असे केंद्रीय पर्यावरण वन राज्यमंत्री (स्वतंत्र ताबा) जयंती नटराजन यांनी काल राज्यसभेत खासदार शांताराम नाईक यांना दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.

सरकारच्या लेखी आश्‍वासनानंतर मलेरिया कर्मचार्‍यांचे आंदोलन स्थगित

आरोग्य खात्याचे संयुक्त सचिव दत्ताराम सरदेसाई यांनी सर्व मलेरिया कर्मचार्‍यांना आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करून ६० दिवसांच्या आत सेवेत कायम करण्याचे लेखी पत्र दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून उपोषण मागे घेण्याचा निर्णय उपोषणकर्त्या मलेरिया कर्मचार्‍यांनी काल घेतला.

आशा पारेख आता काणकोणवासी

सुप्रसिद्ध हिंदी सिनेतारका आशा पारेख यांचा सध्या काणकोण तालुक्यात मुक्काम आहे. त्यांनी येथील रुबी रेसिडन्सीमध्ये सदनिका घेतली आहे. काणकोणचे सौदर्य, शांतता आणि सुरक्षितता यासाठी आपण ही जागा निवडल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्प संचालक विश्‍वास देसाई यांनी ही भेट घडवून आणली.

जॅकी श्रॉफही घेणार घर

मुलांना गोवा फार आवडत असून आपण लवकरच गोव्यात एक घर खरेदी करणार असल्याचे अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी काल एका प्रश्‍नाचे उत्तर देताना सांगितले. काल इफ्फी स्थळी त्यांनी ऍक्टर्स लॉंजचे उद्घाटन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

इंग्रजी माध्यमास अनुदानाचा निर्णय दबावाखाली

हायकोर्टात युक्तीवाद

प्राथमिक शिक्षणाचे माध्यम ठरविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घ्यायचा नसून तो शिक्षण तज्ज्ञांनी घ्यायचा असतो. देशाच्या कोणत्याही भागात मंत्रिमंडळाने अशा प्रकारचा निर्णय घेतलेला नाही, असा दावा करून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अन्य काही मंत्र्यांच्या व डायोसिजन सोसायटीच्या दबावाला बळी पडून इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला, असे सांगून ऍड. आत्माराम नाडकर्णी यांनी काल उच्च न्यायालयात युक्तीवाद केला.

राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान व्हावा!

- ज.अ.रेडकर, सांताक्रुझ - पणजी

कोणत्याही देशाची प्रामुख्याने तीन मानचिन्हे असतात. एक म्हणजे राष्ट्रध्वज, दुसरे राष्ट्रगीत आणि तिसरे राष्ट्रप्रमुख ! पहिल्या दोन चिन्हांचे प्रतिबिंब त्या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयात सन्मानाने प्रतिबिंबित होणे वादातीत असायला हवे. तिसर्‍या चिन्हाबद्दल मतभिन्नता असू शकेल, कारण ते चिन्ह व्यक्तिगत असते. राजेशाही राजवटीत राजा जुलमी निघाला तर त्याच्याविषयी प्रजेला आस्था उरत नाही, पण रयतेची काळजी वाहणारा आणि त्यांचे योग्य प्रकारे पालन करणारा, त्यांच्या सुख-दुःखाशी समरस होणारा असला तर अशा राजावर प्रजा जीव ओवाळून टाकते. हुकुमशाहीत हुकुमशाहाचा अतिरेक होतो तेव्हा काय होते हे आपण नजीकच्या काळात पाहिले आहे. त्यासाठी इतिहासाच्या फार खोलात जाण्याची आवश्यकता नाही. लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेला राष्ट्रप्रमुख, लोकांचा विश्वास असेपर्यंतच सत्तेवर राहू शकतो. राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत मात्र दीर्घकाळ टिकणारे असते. म्हणूनच या चिन्हांचा आदर प्रत्येकाने करणे आवश्यक ठरते.

आता तरी शब्द पाळा

मलेरिया कर्मचार्‍यांनी आपले पंधरा दिवसांचे उपोषण सरकारच्या लेखी आश्वासनानंतर अखेर काल मागे घेतले. अर्थात, सरकार सरतेशेवटी झुकले त्यामागे या उपोषणकर्त्या कर्मचार्‍यांविषयीचे प्रेम किती आणि ऐन ‘इफ्फी’च्या काळात बाहेरगावच्या प्रतिनिधींना बेमुदत उपोषणाचे ओंगळवाणे दृश्य कांपालच्या झगमगाटात पाहायला मिळू नये हा व्यावहारिक विचार किती, याचा अर्थ ज्याने त्याने हवा तसा काढावा. काही असो, दारातले उपोषणार्थी हटल्याने आरोग्य संचालक आता सुखाने आईस्क्रीम खाऊ शकतील! उपोषणकर्त्यांची दिवसेंदिवस खालावत चाललेली प्रकृती पाहाता, काहीही करून ते संपुष्टात येणे गरजेचे होते. त्या दृष्टीने सरकारने उशिरा का होईना, हालचाल केली हे योग्य झाले. मात्र, यावेळी मलेरिया कर्मचार्‍यांना दिलेल्या आश्वासनामध्येही दोन महिन्यांची मुदत मागितली गेली आहे, त्यामुळे साहजिकच पुन्हा एकवा शंकेची पाल चुकचुकते आहे. वारंवार आश्वासने देऊन ती न पाळणार्‍यांकडून यावेळी त्याचीच पुनरावृत्ती होणार नाही अशी आशा करूया. मलेरिया कर्मचार्‍यांच्या या प्रदीर्घ आंदोलनातील घटनाक्रम पाहिला तर राज्यकर्त्यांची आम आदमीप्रती असलेली असंवेदनशीलताच त्यातून प्रकटताना दिसून आली.

The Badshah of bollywood opens the 42nd International Film Festival of India at Margao

Malaria eradication workers suspend their hunger strike till the government keeps its promise of absorbing them in service

खाण समर्थकांचा मोर्चा

Story Summary: 

प्रचंड पोलिस बंदोबस्तात निघालेला खाण समर्थकांचा मोर्चा (छाया : नंदेश कांबळी)

मलेरिया सेवकांच्या प्रश्‍नावर तोडगा दृष्टिपथात

Story Summary: 

६० दिवसांत सामावून घेणार : आरोग्यमंत्री

सेवेत कायम करू : मुख्यमंत्री

मलेरिया सेवकांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी काल पिळर्ण सिटीझन फोरमच्या नेतृत्वाखालील मलेरिया सेवकांच्या शिष्टमंडळाला दिले. मात्र मलेरिया सेवकांनी आपले बेमुदत उपोषण चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला असून लेखी आश्‍वासन हाती पडल्यानंतरच त्याचा अभ्यास करून उपोषण मागे घ्यायचे की नाही त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे मलेरिया सेवकांचे नेते प्रेमदास गावकर यांनी सांगितले. त्यामुळे मागण्या अधिकृतरित्या मान्य झाल्यास आज उपोषण मागे घेतले जाण्याची शक्यता आहे.

काल बोलणी करायला गेलेल्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सर्व ६७ मलेयिा सेवकांना सेवेत कायम करण्यात येईल. ज्यांचे वय झाले आहे त्यांना वयोमर्यादेत शिथीलता दिली जाईल. वृत्तपत्रातून जाहिरात देऊन पदे भरली जातील. मात्र सेवेत कायम कधी केले जाईल ते सांगण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिल्याचे, गावकर म्हणाले.

खाण समर्थकांचे पणजीत शक्तिप्रदर्शन

Story Summary: 

पणजी - मिरामार रस्ता रोखल्याने पोलिसांचा लाठीमार, १० जखमी

राज्यातील खाणी बंद पडतील या भीतीमुळे बिथरलेल्या खाण समर्थकांनी काल पणजीत शहरात आणलेला मोर्चा हिंसक बनल्याने पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात काही मोर्चेकरी जखमी झाले. यावेळी आंदोलकांनी काही वाहनांची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला व पोलिसांवरही दगडफेक केली.

खाण व्यवसायावर गंडांतर येण्याच्या भीतीने उत्तर व दक्षिण गोव्यातील खनिजवाहू ट्रकमालक व खाणींशी संबंधित इतर व्यावसायिकांनी काल पणजीत विराट मोर्चा आणून शक्तिप्रदर्शन केले. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जवळजवळ तीन हजार खाण समर्थक पणजीत थडकले. सकाळी अकरा वाजेपर्यंत त्यांनी पणजी - मिरामार दरम्यानचा दयानंद बांदोडकर मार्ग मिलिटरी हाऊसपाशी ठाण मांडून अडवून धरला.

इफ्फीचे आज मडगावात उद्घाटन

Story Summary: 

शाहरुखची उपस्थिती

४२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज संध्याकाळी ५ वा. बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचे चित्रपट महोत्सवाचे संचालक शंकर मोहन यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यंदा प्रथमच उद्घाटन सोहळा पणजी शहराबाहेर होत असून तो मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये संपन्न होणार आहे.

महोत्सवासाठी रवींद्र भवनचे नूतनीकरण करण्यात आलेले असून भवनला नवा साज चढवण्यात आलेला आहे. यापूर्वी दरवर्षी उद्घाटन सोहळा पणजीतील कला अकादमीमध्ये होत असे. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘कोन्सुल ऑफ बोर्डो’ हा पोर्तुगाली चित्रपट दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाने चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. तर ‘धी लेडी’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

कॉंग्रेस यात्रेच्या समारोपास मंत्री-आमदार गैरहजर

स्पष्टीकरण मागणार : सुधाकर रेड्डी

प्रदेश कॉंग्रेस समितीने आयोजित केलेल्या लोकसमृद्धी यात्रेच्या समारोप सोहळ्यास अल्प प्रतिसाद मिळाला. या समारोप सोहळ्यास उपस्थित न राहिलेल्या आमदार मंत्र्यांकडून कॉंग्रेस पक्ष स्पष्टीकरण मागणार असल्याचे राष्ट्रीय सचिव सुधाकर रेड्डी यांनी काल समारोप सोहळ्यात बोलताना सांगितले.

सॉलिसिटर जनरल बाजू मांडणार

इंग्रजी अनुदान देण्याच्या सरकारच्या निर्णयास आव्हान देणार्‍या अर्जावर आजपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर अंतिम सुनावणी सुरू होणार असल्याने सरकारची बाजू मांडण्यासाठी भारताचे सॉलिसिटर जनरल रोहिंगरू नरिमन येणार आहेत.

इफ्फीचा उद्घाटन सोहळा असाही असावा !

- दिलीप बोरकर

यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज संध्याकाळी मडगावच्या रवींद्र भवनमध्ये होत आहे. मडगाव हे गोव्याचे सांस्कृतिक शहर! या शहराला गोव्याची सांस्कृतिक राजधानीही म्हटले जाते. कारण मठग्रामला प्रदीर्घ संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. त्यातच मडगाव हा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा मतदारसंघही आहे.

अस्तित्वाचा प्रश्न

बेकायदेशीर खनिज व्यवसायापासून सुरू झालेले घटनाचक्र शेवटी कायदेशीर खाण व्यवसायाच्या मुळावर येऊन थडकण्याची चिन्हे दिसू लागल्याने गेले काही दिवस खाण समर्थकांना पुढे करून जी वातावरणनिर्मिती केली जाते आहे, तिचेच एक रूप कालच्या शक्तिप्रदर्शनात दिसले. हे शक्तिप्रदर्शन हा सरकारवर व त्याहूनही अधिक शाह आयोगावर दबाव टाकण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे हे जाणण्याइतकी जनता सुज्ञ आहे. गेले काही दिवस वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होणार्‍या जाहिरातींमधून कोणकोणत्या पंचायती आणि सरपंच खाण व्यावसायिकांच्या बाजूने उभे राहिले आहेत, त्याची जंत्री जनतेला वाचायला मिळाली. या जाहिराती कोणी दिल्या ते गुलदस्त्यात राहिले तरी त्यांचा मथितार्थ स्पष्ट होता. या दबावतंत्राचीच पुढची पायरी म्हणून खाणींवर ज्यांचे पोट चालते अशा विविध व्यवसायांतील तरुणांना रस्त्यावर उतरवून काल सरकारवरील दबाव आणखी वाढवला गेला. या छोट्याशा निसर्गसुंदर राज्यातील अमर्याद खनिज व्यवसायाने नैतिकतेच्या सीमामर्यादा केव्हाच उल्लंघल्या आणि बेकायदा खनिज व्यवसाय फोफावत गेला. त्याने येथील शेता-भाटांची वासलात लावली असली, पर्यावरणाचे तीन तेरा वाजवले असले, तरी आज असंख्य छोटे - मोठे व्यवसाय खाण व्यवसायावर अवलंबून आहेत आणि येथील तरुणांच्या स्वयंरोजगाराचे ते क्षेत्र एक मोठे साधन बनलेले आहे हीदेखील या नाण्याची दुसरी बाजू आहे हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही.

मलेरिया सेवकांचा प्रश्‍न

Story Summary: 

पोलीस संरक्षणात आरोग्य संचालक डॉ. राजनंदा देसाई यांना बाहेर नेताना. (छाया : नंदेश कांबळी)

योगमार्ग - राजयोग (सत्य - २८)

- डॉ. सीताकांत घाणेकर

विश्‍वात अनेक वेगवेगळे विषय आहेत. प्रत्येक विषयाची तत्त्वे भिन्न आहेत. पण एक मूलभूत तत्त्व सर्वांचा पाया आहे - ते म्हणजे सत्य. म्हणून प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ त्या सत्याकडे जाण्याचा अथक प्रयत्न करतात, मग तो विषय कुठलाही असो- कला, शास्त्र, विज्ञान, इतिहास, आरोग्य, निसर्ग, राजकारण...

सत्यशोधन करण्यामागे विचारवंतांचा शुद्ध हेतू हाच असतो की त्या विषयामागील सत्य शोधले म्हणजे मग त्याचा शास्त्रशुद्ध वापर करता येतो. तसेच मानव विकासासाठी त्याचा उपयोग होतो. मानव सुखी व समृद्ध होतो. आपल्या महान ऋषींनी तर हाच मार्ग अनुसरला होता.

कथा समिधा-अक्षताची...

- प्रा. रमेश सप्रे

त्या दोघी कायम एकत्र असायच्या. गमतीनं सारेजण त्यांना ‘इटर्नल अनसेपरेबल्स(चिरंतन जोडी)’ असं म्हणत. दोघी होत्याही गुणी. इतरांसाठी सहज कोणत्याही गोष्टीचा त्याग करणार्‍या. मग ती बसमधली खिडकीकडची जागा असू दे की नवी घेतलेली पेन्सिल असू दे. त्यांची नावंही तशीच होती समिधा, यज्ञात अर्पण करण्यासाठी असलेली नि अक्षता, पूजेत कशासाठीही अर्पण केली जाणारी!

आरोग्य संचालकांनी थप्पड मारल्यावरून वातावरण तंग

Story Summary: 

४७ भाजप कार्यकर्त्यांना अटक; मलेरिया सेवकांचा प्रश्‍न

गेले तेरा दिवस उपोषणास बसलेल्या मलेरिया कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याची मागणी सरकारने पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ आरोग्य संचालक डॉ. राजनंदा देसाई यांना घेराव घालण्यासाठी गेलेल्या महिला कार्यकर्त्यांवर संचालकांनी थप्पड मारल्यानंतर पोलीस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या ढकलाढकलीमध्ये भावेश जांबावलीकर हा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. त्यामुळे तेथील वातावरण तंग बनले. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

संतप्त बनलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी संचालकांना कार्यालयापासून बाहेर येण्यापासून रोखले. संध्याकाळी चार वाजता सुरू झालेले नाट्य संध्याकाळी उशिरापर्यंत चालूच होते. जखमी भावेश याला कांपाल क्लिनिकमध्ये दाखल केल्याची माहिती मिळताच कार्यकर्ते अधिक भडकले.

‘इफ्फी’च्या उद्घाटनाची तयारी पूर्ण

Story Summary: 

उद्या होणार असलेल्या ‘इफ्फी’ उद्घाटन सोहळ्यासाठी मडगावचे रवींद्र भवन सज्ज झाले आहे. काल गोवा पोलीस खात्याने त्या दिवसाच्या सुरक्षेची तालीम घेतली. उद्घाटन सोहळ्याचे आकर्षण ठरलेल्या रेड कार्पेट विभागाची सजावट पूर्ण झाली आहे.

रवींद्र भवनाची सुधारणा, आकर्षक रंगरंगोटी करून स्वच्छ धुवून घेण्याचे काम दिवसभर चालू होते. रोषणाईचे काम युद्ध पातळीवर दोन दिवसांपासून सुरू झाले आहे. कोलवा वाहतूक बेट ते रवींद्र भव विद्युत दीपमालाची रोषणाई तर पथदीप घालण्याचे काम जोरात चालू आहे. रेड कार्पेटच्या जागेत पारंपरिक दरवाजे, खिडक्या बसविण्याचे, आकर्षक चित्रे, स्तंभ तयार केलेले आहेत.

खनिज वाहतूकदारांचे आज शक्तीप्रदर्शन

Story Summary: 

खाण व्यवसायावर निर्बंध घालण्यात आल्याने व भविष्यकाळात बेकायदेशीर खाणी पूर्णपणे बंद होण्याची शक्यता असल्याने संतप्त बनलेल्या खनिज वाहतूक करणार्‍या ट्रक मालकांनी व बार्जवाल्यांनी आज राजधानीत शक्तीप्रदर्शन करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आज राजधानीत वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.

माध्यमप्रश्‍नी अंतिम सुनावणी आजपासून

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांचे गोव्यातून वाढते स्थलांतर

राज्यात संधी उपलब्ध करण्यासाठी गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे प्रयत्न

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगातील संधी गोव्यात उपलब्ध नसल्याने येथील शिक्षित युवकांना पुणे, बंगलूर, हैद्राबाद किंवा विदेशात जाऊन स्थायिक व्हावे लागत आहे. त्यामुळे येथील घरात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची स्थिती बिकट होते. या सामाजिक समस्येचा विचार करूनही माहिती आणि तंत्रज्ञान तसेच अन्य क्षेत्रातील मनुष्यबळाचा गोव्यातच उपयोग होऊन त्यांना चांगल्या रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी गोवा चेंबरने आता त्या दृष्टिकोनातून काम सुरू केल्याची माहिती अध्यक्ष मांगिरीश पै रायकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

चकमक नव्हे, इशरतचा गुजरात पोलिसांकडून खून

हायकोर्टाच्या चौकशी पथकाचा निष्कर्ष

कॉलेज युवती इशरत जहान आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांचा चकमकीत मृत्यू झाला नसून गुजरात पोलिसांनी त्यांचा खून करून नंतर त्यांना दहशतवादी घोषित केले असा निष्कर्ष गुजरात हायकोर्टाने नेमलेल्या विशेष चौकशी पथकाने काढला. हा गुजरातच्या नरेंद्र मोदी सरकारला हादरा असल्याचे सांगण्यात येत आहे.

उ. प्र. विभाजनाचा प्रस्ताव मंजूर

उत्तर प्रदेशचे लहान लहान राज्यांत विभाजन करण्याचा ठराव राज्य विधानसभेत गदारोळात आवाजी मतदानाने संमत करून घेण्यात आला. राज्याच्या विकासासाठी विभाजनाचा प्रस्ताव विधासभेत पूर्ण बहुमत असणार्‍या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा व उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी पुढे केला होता. महत्त्वाचे म्हणजे, हा ठराव पारीत झाल्यानंतर लगेच सभापती सुखदेव राजभीर यांनी कालपासूनच सुरू झालेले विधानसभेचे हिवाळी अधिवेशन अनिश्‍चित काळासाठी तहकूब केले. ठराव पारीत झाल्यानंतर घाईघाईने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री मायावती म्हणाल्या, माझे काम मी केले आहे.

विभक्त कुटुंब पद्धतीने काय साधले?

- रूद्राजी जगन्नाथ शेणवी केंकरे,

प्रगतीनगर ए/१-१३/१४, म. गांधी रोड,

गोरेगांव (प) मुंबई ४००१०९

‘नवप्रभा’ च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट २०१० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला विशेषांक वाचत होतो. तो वाचता वाचता रा. गजानन नाईक भाटकर यांचा ‘विभक्त कुटुंब पद्धतीने काय साधले?’ हा लेख नजरेस पडला. त्यांनी तो बराच अभ्यास करून लिहिला असावा याची जाणीव झाली. बर्‍याच पिढीजात गोमंतकीय कुटुंबाची जुनी, पण नजरेत भरणारी घरे ओसाड पडल्याचे पाहून सुधारणेच्या नावाने समाजात घडून येणारी स्थित्यंतरे पाहून मनात खिन्नता पसरते. हे काय चालले आहे याचा अंदाज घेण्यासाठी मन भटकू लागते. आणि बेसुमार वाढणारी लोकसंख्या हेच प्रमुख कारण असल्याची हळुहळू जाणीव होते. काही अन्य कारणेही आहेत. उच्च शिक्षण प्राप्त करण्याची विविध क्षेत्रांत उपलब्ध असलेली संधी आणि त्यामुळे उच्च पगाराच्या नोकर्‍या मिळवण्याची शक्यता या प्रकारच्या कारणांमुळे श्री. भाटकर यांनी सविस्तर मांडलेली परिस्थिती उद्भवलेली आहे. परंतु ही आपत्ती केवळ गोव्यापुरती मर्यादित नाही. पुर्‍या भारतात जवळजवळ हीच परिस्थिती आहे.

सार्वत्रिक विरोध

राज्याच्या प्रादेशिक आराखड्याची निर्मिती जनतेला विश्वासात घेऊन पारदर्शकरीत्या केलेली आहे, या सरकारच्या दाव्याला तडा देत ठिकठिकाणच्या ग्रामसभांमधून आराखड्यास परवा जोरदार विरोध दर्शवण्यात आला. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आराखड्याचा मसुदा ठेवून त्यावर चर्चा घडवून आणून नंतरच त्याला अंतिम रूप देण्याचा प्रयत्न सरकारने जरी केला, तरी पंचायतींनी ग्रामपातळीवर जनतेला खरोखरच विश्वासात घेतले गेले होते का असा प्रश्न पडावा इतपत मूलभूत विषयांवरच ग्रामसभांमधून हा विरोध झाला आहे. आराखड्यातील गंभीर गफलती, पंचायत मंडळांवरील अविश्‍वास, हितसंबंधियांनी आराखडा आपल्याला हवा तसा करून घेतल्याचा संशय, अशा अनेक कारणांमुळे ग्रामपातळीवर या आराखड्यासंदर्भात पुन्हा एकदा अविश्वासाचे वातावरण निर्माण झालेले आहे हे उघड आहे. वरपर्यंत पोहोच असलेले बांधकाम व्यावसायिक, विकासक, परप्रांतीय गुंतवणूकदार, हॉटेल व्यावसायिक आदींची टोळधाड गोव्यावर सध्या आलेली असल्याने आपल्या गावातील जमिनी लाटून आपल्याला देशोधडीला लावण्यासाठी आराखड्याचा वापर केला जाईल अशा शंकेने गोमंतकीयांना आज घेरलेले आहे.

Health Director Rajananda Desai loses cool, slaps an elderly BJP worker who was part of a delegation that went to meet her even as the fasting malaria workers see no light at the end of the tunnel

If BJP comes to power, recent government recruitments will be reviewed, lok ayukta will be appointed within 90 days, says Parrikar

ग्रामसभा

Story Summary: 

आराखड्याची माहिती करून घेताना नार्वे येथील ग्रामस्थ (छाया : विशांत वझे)

ठिकठिकाणी ग्रामसभांत आराखड्यास विरोध

Story Summary: 

रस्त्यांच्या प्रस्तावित रुंदीबाबत विशेष नाराजी

काल झालेल्या वेगवेगळ्या पंचायतींच्या ग्रामसभांमध्ये प्रादेशिक आराखडा २०२१ला विरोध झाला असून त्यामुळे या प्रश्‍नावर पुन्हा गोव्यात आंदोलन पेटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या रुंदीकरणास सर्वच भागात विरोध झाला आहे.

चिंबल येथे झालेल्या ग्रामसभेत अनेक नागरिकांनी प्रादेशिक आराखडा म्हणजे काय, असा प्रश्‍न केला. त्यामुळे जनतेला या आराखड्याच्या बाबतीत काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. या सभेस सांताक्रूझच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांचे पुत्र रूडोल्फ उपस्थित होते. त्यांनी वरील आराखड्यामुळे चिंबल पंचायत क्षेत्रात ४५० निवासी गाळे येणार असून त्यात बिगर गोमंतकीयच वास्तव्य करतील असे सांगितले. तसे झाल्यास चिंबलवासियांच्या अस्तित्वालाच धोका पोचेल, असे सांगून आराखड्यास त्यांनी विरोध केला.

खाण व्यवसायाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ४०० बार्जेस दिवसभरासाठी बंद

Story Summary: 

गोव्यातील व्यवसायाकडे गोवा सरकारने गंभीरतेने लक्ष केंद्रित करून खनिज व्यवसाय सुरळीत करण्यासाठी गोवा सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी गोवा बार्ज मालक संघटनेने सर्व ४०० बार्जीस सोमवारी मध्यरात्रीपासून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

संघटनेचे अध्यक्ष अतुल जाधव, सचिव विलीयम डिकॉस्ता व खजिनदार चंद्रकांत गावस यांनी आपल्यासहीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे, की न्या. शहा आयोगाच्या अहवालानुसार गोव्यातील खनिज निर्यातीवर पूर्णपणे बंदी येण्याची शक्यता बळावलेली आहे.

ट्रक मालकांचा उद्या मुख्यमंत्री निवासावर मोर्चा

Story Summary: 

उत्तर गोवातील काल होंडा-सत्तरी येथे सुमारे पाचशें ट्रक मालकांच्या बैठकीत मंगळवार दि. २२ रोजी पणजीत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर अखिल गोवा ट्रक मालकांचा मोर्चा नेण्याचा निर्णय झाला. त्यांना ट्रक मालक संघटना मागण्याचे निवेदन सादर करणार आहे.

सकाळी ९.३० वाजता कदंबा बसस्थानकाकडून सुरू होऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरून आझाद मैदानावर मोर्चा संपून त्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.

दिल्लीत आगीत भाजून १४ ठार

‘लोकप्रतिनिधींना माघारी बोलावणे व्यवहार्य नाही’

भारतासारख्या मोठ्या देशात लोकप्रतिनिधींना माघारी बोलावणे, उमेदवार नाकारणे यासारख्या निवडणूक सुधारणा भारतासारख्या मोठ्या देशात व्यवहार्य नसल्याचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सांगितले. या सुधारणा लागू केल्यास देशात राजकीय अस्थीरता माजण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

रालोआ खासदारांकडे काळे धन नाही; लवकरच संसदेला जाहीरनामा : अडवाणी

जनचेतना यात्रेचा समारोप

भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची ३८ दिवसांची ‘जनचेतना यात्रा’ काल संपली. यावेळी बोलताना अडवाणी म्हणाले, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटकपक्षांचे सर्व २१५ खासदार येत्या दहा दिवसांत आपल्याकडे बेकायदेशीर मालमत्ता तसेच विदेशात बँक खाती नसल्याचा जाहीरनामा संसदेला सादर करणार आहेत.

लोकसमृध्दी यात्रेचा उद्या समारोप

गोवा मुक्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून प्रदेश कॉंग्रेसने काढलेल्या लोक समृद्धी यात्रेचा समारोप मंगळवार दि. २३ रोजी येथील आझाद मैदानावर होणार आहे. समारोप सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी गोव्याचे कॉंग्रेस प्रभारी जगमित सिंग ब्रार व सचिव सुधाकर रेड्डी गोव्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेस सूत्रांनी दिली.

‘यूपीए’ला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची रणनीती

उद्यापासून अधिवेशन

उद्यापासून सुरू होणार असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी यूपीए आघाडीच्या सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक पूर्ण तयारी करीत आहेत. या अधिवेशनात दरवाढीच्या विषयावर स्थगन प्रस्ताव आणण्याचे डाव्या आघाडीने ठरवले असून भाजप-प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आपले डावपेच ठरविण्यासाठी आज बैठक घेत आहे.

सरकारी कर्मचारी अन्य कामांत व्यस्त झाल्याने कामकाज ठप्प

प्रादेशिक आराखड्यामागचे ‘कल्याण’

- रमेश सावईकर

गोव्यात सध्या ‘प्रादेशिक आराखडा २०२१’ हा ज्वलंत प्रश्न बनून राहिला आहे. आपल्या मायबाप सरकारने प्रादेशिक आराखड्याचे नियोजन करताना जो प्रचंड घोळ निर्माण केला आहे, तो निस्तरणे आता कठीण होऊन बसले आहे.

पूर्वीचा प्रादेशिक आराखडा रद्द करून नव्याने जो आराखडा तयार करण्यात आला आहे तो म्हणजे नाममात्र बदलाचा नमुना म्हणावा लागेल. ‘नव्या बाटलीत जुनी दारू’ तशातलाच हा प्रकार आहे. किंबहुना वाटल्यास ‘असावा’ असे म्हणा. त्यावेळी आराखड्यास झालेला विरोध मर्यादित होता, त्यामुळे सरकारने घोडे पुढे दामटले. पण आता होणारा विरोध पाहता ‘प्रादेशिक आराखडा २०२१’ बदलावाच लागणार आहे.

वेगळी दिशा

टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करणार्‍या सीबीआयने अखेर आपला मोर्चा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कार्यकाळातील घडामोडींकडे वळवला. अरुण शौरी यांच्या चौकशीत आजवर काही आढळून न आल्याने आलेली अस्वस्थता दूर करण्यासाठी प्रमोद महाजन यांच्या कार्यकाळातील फायली उकरून काढून सीबीआयने शनिवारी दोन मोबाईल कंपन्यांच्या कार्यालयांवर छापेही टाकले. महाजन यांच्या काही निर्णयांमुळे सरकारला ५६५ कोटींवर कसे पाणी सोडावे लागले, यावर सीबीआय सर्वोच्च न्यायालयात भर देईल असे दिसते. टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यावरून उठलेले वादळ द्रमुकपासून सुरू झाले आणि व्हाया कॉंग्रेस आता भाजपाच्या दिवंगत मंत्र्यांपर्यंत येऊन पोहोचले आहे. मात्र, सीबीआयच्या एकंदर तपासाची दिशा पाहिली, तर द्रमुकच्या ए. राजा, दयानिधी मारन, कनिमोझी या नेत्यांभोवती पाश आवळणारी सीबीआय, अरुण शौरी, महाजन यांच्या कारभाराची कसून चौकशी करणारी सीबीआय कॉंग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याभोवती संशयाचे गडद वलय असूनही त्यांच्या चौकशीचे नाव घेत नाही. ज्यांचा दुर्दैवी मृत्यू होऊन कैक वर्षे लोटली त्या महाजन यांच्या निर्णयांच्या जुन्या फायली उचकटून काढण्यात इमानेइतबारे ही तपास संस्था गुंतली आहे. जो न्याय द्रमुकला लावला जातो, जो न्याय महाजन यांना लावला जातो, तोच न्याय चिदंबरम यांच्यासारख्या विद्यमान कॉंग्रेस नेत्यांस का लावला जात नाही? या देशातील तपास यंत्रणा सत्तेवरील मंडळींकडून कशा हव्या तशा वाकवल्या जातात त्याची साक्ष देणारा हा घटनाक्रम आहे.

इफ्फी गोव्यात स्थिरावतोय...

- प्रा. मिलिंद म्हाडगुत

गोव्यातील इफ्फीचे हे आठवे वर्ष. या वर्षापासून इफ्फी काही प्रमाणात पणजीहून मडगावला स्थलांतरित होत आहे. काही प्रमाणात अशाकरिता की यंदा प्रथमच इफ्फीचा उद्घाटन सोहळा मडगावला संपन्न होणार आहे. त्याकरिता मडगावच्या रवींद्र भवनाचा कायापालट केला गेला आहे.

तसे पाहायला गेल्यास गेली दोन वर्षे इफ्फीचे काही चित्रपट मडगावलाही दाखविले जायचे. पण त्याचा विशेष गाजावाजा नसल्यामुळे कोणाला त्याचा पत्ताच लागत नसे. त्यामुळे या चित्रपटांना रसिकांकडून थंडा प्रतिसाद मिळाला होता. पण यंदा मुख्यमंत्र्यांनी स्वतः कंबर कसल्यामुळे प्रथमच मडगावला इफ्फीचे ग्लॅमर प्राप्त झाले आहे, आणि ही खरी तर स्वागतार्ह बाब आहे. गोवा हा छोटा प्रदेश असल्यामुळे इफ्फी केवळ पणजीपुरताच मर्यादित राहता कामा नये. यंदा इफ्फीने मडगावात प्रवेश केला आहे; पुढील वर्षी गोव्याची सांस्कृतिक राजधानी फोंडा येथेही इफ्फीचे चित्रपट दाखवायला हवेत. फोंड्याच्या राजीव गांधी कलामंदिरावरही नवा साज चढत आहे. त्यात इफ्फीत दाखविल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांकरिता लागणार्‍या खास प्रोजेक्शनचीही सोय आहे. त्यामुळे पुढील वर्षी इफ्फीच्या कार्यक्रम पत्रिकेवर फोंड्याचे नाव चमकल्यास आश्‍चर्य वाटायला नको.

फक्त तू जागी हो या ठार झोपेतून!

श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्था व कला, संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने फोंडा येथे नववे गोमंतक महिला साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. संमेलनाध्यक्षा नीरजा यांचे अध्यक्षीय भाषण-

नमस्कार,

रदा ग्रंथप्रसारक संस्थेने आयोजित केलेल्या ९व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला दिल्याबद्दल मी प्रथम या संमेलनाच्या आयोजकांचे तसेच संगीता अभ्यंकर यांचे आभार मानते आणि आपण दिलेले हे अध्यक्षपद नम्रपणे स्वीकारते.

फोंड्यातील महिलांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या या संस्थेने महिला व मुलांसाठी जे काम केलं आहे त्याचा वृत्तांत मी वाचला आणि त्यातलं एक वाक्य मला विशेष भावलं. मुलांना वाचायची गोडी लागण्यासाठी आईनंही वाचलं पाहिजे या भावनेतून त्यांनी हे वाचनालय सुरू केलं असं म्हटलं आहे. माझ्या दृष्टीने हा विचारच खूप महत्त्वाचा आहे. घरातला एक पुरुष शिकला तर तो एकटाच शिक्षित होतो. पण जर बाई शिकली तर सारं घरच शिक्षित होतं असं म्हणतात. आपल्याकडं तशी अनेक उदाहरणं आहेत की आईचं वाचनाचं वेड मुलांना वाचनाकडं घेऊन जातं. अनेक लेखक-कवींनी सांगितलेल्या गोष्टींतून हे उलगडलं गेलं आहे. मंगेश पाडगावकरांसारखे कवी तर आपल्या आईचं हे ऋण नेहमीच मानतात. त्यामुळे महिलांनी वाचनाकडे वळावं यासाठी उभ्या केलेल्या या वाचनालयाचा हा वृक्ष असाच बहरत राहो अशा मी आपणा सर्वांना शुभेच्छा देते.

प्रमोद महाजन यांच्या कार्यकाळातील स्पेक्ट्रम वाटपासंदर्भात सीबीआयचे छापे

Story Summary: 

लक्ष अन्यत्र वळवण्याची चाल : भाजपा

टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिवंगत केंद्रीय दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन यांच्या काळातील कंत्राटांची चौकशी सुरू केली असून दोन बड्या मोबाईल कंपन्यांच्या कार्यालयांवर त्यासंदर्भात काल छापे टाकण्यात आले. दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातील कारभाराची चौकशी करून सरकार दिशाभूल करीत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने शनिवारी प्रमोद महाजन यांच्या कार्यकाळातील प्रकरणांचा शोध घेण्यासाठी व्होडाफोन व एअरटेल या बड्या कंपन्यांच्या मुंबई व गुरगावमधील कार्यालयांवर छापे टाकले. माजी दूरसंचार सचिव श्यामलाल घोष व भारत संचार निगम लि. चे माजी संचालक जे. आर. गुप्ता यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला.

जुने गोवे येथे भीषण अपघातात

Story Summary: 

२ विद्यार्थी ठार, एक गंभीर जखमी

परवा रात्रौ जुने गोवे येथे झालेल्या एका भीषण बस व स्कूटर अपघातात गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन विद्यार्थी ठार झाले, तर तिसरा गंभीररित्या जखमी झाला.

मृतांची नावे जोसेफ मोसांग (२३), आंध्रप्रदेश व प्रंकित हरन (२२), मालभाट - मडगाव अशी आहेत, तर जखमीचे नाव इनातियो सू (२२), नागालॅण्ड असे आहे.

म्हापसा येथे दुकान फोडून चार लाखांचे मोबाईल चोरीस

Story Summary: 
  • तळीवाडा-म्हापसा येथील सेंट जेरॉम इमारतीच्या तळमजल्यावर असलेले विला नोवा लोबो यांचे आर्टे दोवरो डिजीटल वर्ल्ड हे दुकान काल रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ४ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

याबाबत वृत्त असे आज सकाळी ६.३० च्या सुमारास दुकानासमोर उभी केलेली आपली मोटारसायकल नेण्यासाठी आलेला मोबाईल दुकानातील कामगार आर्य दिव यास दुकानाचे शटर अर्ध्या स्थितीत असल्याचे नजरेस पडले. त्याने समोर जाऊन पाहिले असता शटरच्या डाव्या बाजूचे कुलूप व कुलूप लावण्यासाठी असलेल्या हूक एक्स ब्लेडच्या सहाय्याने कापल्याचे नजरेस पडले. आर्यन याने दुकान मालक विला नोवा लोबो यांना घटनेची माहिती दिली व म्हापसा पोलिसांना पाचारण करण्यात आले.

म्हापसा येथे दुकान फोडून चार लाखांचे मोबाईल चोरीस

तळीवाडा-म्हापसा येथील सेंट जेरॉम इमारतीच्या तळमजल्यावर असलेले विला नोवा लोबो यांचे आर्टे दोवरो डिजीटल वर्ल्ड हे दुकान काल रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ४ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

३ लाखांच्या लाच प्रकरणी ८६ वर्षीय सुखराम यांना पाच वर्षांचा कारावास

न्यायालयाबाहेर युवकानेही बदडले

एका खासगी कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी १९९६ साली तीन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोषी धरण्यात आलेले माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांना दिल्ली न्यायालयाने काल पाच वर्षांच्या कारावासाची सजा फर्मावली. सध्या सुखराम ८६ वर्षांचे असून आपल्या वयामुळे आपल्याला शिक्षा करू नये अशी विनंती त्यांच्या वतीने न्यायालयास करण्यात आली होती, परंतु सीबीआयने सुखराम यांनी वारंवार तशा प्रकारचा गुन्हा केलेला असून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी असा युक्तिवाद केला.

राज्य सहकारी बँकेच्या कर्मचार्‍यांची निदर्शने

आपल्या पगावाढीच्या मागणीकडे व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ काल गोवा राज्य सहकारी बँकेच्या साठ कर्मचार्‍यांनी येथील कदंब बस स्थानकाजवळील क्रांती सर्कलवर धरणे धरले. संध्याकाळी ४ ते ५.३० या दरम्यान हे धरणे धरण्यात आले.

सेवा करातून २२ सेवा वगळणार

सेवाकरांच्या जाळ्यातून काही सेवा वगळण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार असून आरोग्य सुविधा, सार्वजनिक परिवहन सेवा, मीटरयुक्त टॅक्सी, तिचाकी, मेट्रो, मोनोरेल आदींना सेवा करातून वगळण्याचा सरकारचा विचार आहे. १५ डिसेंबरपर्यंत त्यासंदर्भात विचारविनिमय होणार आहे. गेल्या ३१ ऑगस्टला अर्थ मंत्रालयाने २७ सेवा सेवाकरांच्या जाळ्यातून वगळल्या होत्या. नव्या यादीत आणखी २२ सेवांना करातून सूट देण्याचा विचार आहे.

दिगंबर कामत यांच्या विरोधात मडगावातून रमाकांत आंगले?

(बबन भगत याजकडून)

इंग्रजी माध्यमातील शाळांना अनुदान देण्याच्या प्रश्‍नावरून वादग्रस्त ठरलेले मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याविरोधात मडगावमधून दक्षिण गोव्याचे माजी आमदार रमाकांत आंगले यांना उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.

माडेल-थिवी येथे अपघातात १ ठार

माडेल थिवी येथे काल रात्री ११.३० वा. एका दुचाकी वाहनाने विजेच्या खांबावर धडक दिल्याने दुचाकीस्वार शेख शब्बीर शदाब (२४), नागझर-डिचोली हा युवक जागीच ठार झाला तर मौसीन शेख (२१), डिचोली-बंदेवाडा हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार चालू आहेत.

सख्ख्या भावाची हत्या करणार्‍या दोघांना अटक

वरचाबाजार फोंडा येथे मित्रानेच मित्राच्या डोक्यावर दगड घालून खून केल्याची घटना ताजी असतानाच काल दि. १८ रोजी रात्री -बेतोडा येथे स्वतःच्याच सख्ख्या भावावर सुर्‍याचा वार करत खून केल्याच्या आरोपावरून दोन भावांना अटक करण्यात आली आहे.

तालक यांचे चित्रपट स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीवर

राष्ट्रीय पुरस्कार विजेते कोकणी चित्रपट दिग्दर्शक राजेंद्र तालक यांच्या चार चित्रपटांचा महोत्सव करण्याचा निर्णय प्रुडंट मिडियाने घेतला असून ११ डिसेंबर ते १ एप्रिल या दरम्यान दर रविवारी चित्रपटाचे दोन खेळ प्रुडंटवरून दाखवण्यात येणार असल्याचे काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रुडंट मिडियाच्या सरव्यवस्थापक सोनिया कुंकळ्येकर यांनी सांगितले. यासंबंधी राजेंद्र तालक यांच्याबरोबर समझोता करार करण्यात आला असल्याचे त्या म्हणाल्या.

इफ्फी प्रतिनिधींच्या दिमतीस कदंबच्या नव्या मिनीबसेस

तिथे फुले विशेष बालसृष्टी!

- चंद्रकांत रामा गावस

डिचोली - वाळपई मुख्य रस्त्यावर केशव सेवा साधना, गोवा संचालित डिचोली तालुक्यात वाठादेव - डिचोलीच्या निसर्गसंपन्न माळरानावर झांट्ये कॉलेजच्या जवळ मतिमंद मुलांसाठी शिक्षण देणारी ‘नारायण झांट्ये विशेष मुलांची शाळा’ कार्यरत आहे. सर्व्हेक्षणानंतर डिचोली - सत्तरी परिसरात ३०० मतिमंद मुले असल्याची नोंद मिळाली. केशव सेवा साधना - गोवा या संस्थेचे अनुभवी व ज्येष्ठ कार्यकर्ते नाना बेहरे यांच्या मार्गदर्शनाखाली मे २००४ मध्ये डिचोलीत बैठक घेऊन डिचोली - सत्तरी येथील मतिमंद मुलांसाठी शाळा उघडण्याचा संकल्प केला. यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते एकत्र झाले. त्यानंतर डॉ. गुरुप्रसाद कापडी यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यकारी समिती नियुक्त झाली. या समितीत डॉ. गुरुप्रसाद कापडी, मकरंद कामत, आनंद जोशी, विद्या केळकर, सुनील वेंगुर्लेकर, श्याम पै, अरुण नाईक, गजानन कर्पे, प्रकाश राजाध्यक्ष, दीपा जांभळे, पांडुरंग शेट्ये, सदाशिव सामंत, हरी धुमे, दिलीप देसाई, आदित्य सातोस्कर, आत्माराम गावकर, नाना बेहेरे, ऍड. स्वाती केरकर अशा अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

दिवाडी-चोडण जोडणार

Story Summary: 

दिवाडी-चोडण जोडणार : दिवाडी ते चोडण व दीवाडी ते रायबंदर अशा दोन पुलांच्या कामाचा शुभारंभ काल मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते झाला. यावेळी साबांखा मंत्री चर्चिल आलेमांव, आमदार पांडुरंग मडकईकर आदी उपस्थित होते.

सहकार क्षेत्रातील संस्थांत महिलांना ३३% आरक्षण

Story Summary: 

सहकारमंत्री रवी नाईक यांची घोषणा

७,८०० स्त्रियांची लागणार वर्णी

सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांत महिलांना ३३% आरक्षण देण्याची तरतूद करण्यासाठी सरकार नवा कायदा करणार असल्याचे सहकारमंत्री रवी नाईक यांनी काल फोंडा येथे सांगितले. असे केल्याने राज्यातील विविध संस्थांत सुमारे ७ हजार ८०० महिलांना हक्काने संचालक होता येईल असे ते म्हणाले.

५८व्या राष्ट्रीय सहकारी सप्ताहानिमित्त गोवा राज्य सहकारी संघ व गोवा मार्केटिंग फेडरेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

माध्यमप्रश्‍नी इफ्फीस्थळी शांततापूर्ण आंदोलन

Story Summary: 

युवकांच्या मेळाव्यात निर्णय

इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान देण्याच्या सरकारच्या निर्णयास विरोध करणार्‍या राज्यातील युवकांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवस्थळी शांततापूर्ण आंदोलन करण्याचा निर्णय काल येथील टी. बी. कुन्हा सभागृहात झालेल्या बैठकीत घेतला.

साहित्यिक आणि भारतीय भाषा सुरक्षा मंचचे नेते विष्णू सूर्या वाघ यांनी युवकांना मार्गदर्शन केले. प्रत्येक रेडकार्पेट स्थळी जाऊन निषेध करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या आंदोलनासाठी जनजागृती करण्याचेही ठरविण्यात आले.

‘भारत-चीनमधील खनिज व्यवहार वसाहतवादी पद्धतीने’

Story Summary: 

भारताकडून मोठ्या प्रमाणावर कुठल्याच नियोजनाशिवाय चीनला लोहखनिज पाठविण्यात येते, हा व्यवहार वसाहतवादी पद्धतीचा असल्याचे केंद्रीय पोलाद मंत्रालयाच्या मुख्य उप-अर्थतज्ज्ञ सुस्मिता दासगुप्ता यांनी मिरामार येथे आयोजित केलेल्या खाणव्यवहारसंबंधीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दुसर्‍या दिवशी बोलताना सांगितले. भारताकडे आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या नियोजनासंबंधी काहीच दीर्घकालीन धोरण नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

त्या म्हणाल्या, लोह व कोळसा येत्या काळात देशाचे राजकारण ठरवणार आहे. दुसर्‍या देशांना संपन्न करण्यासाठी आपल्या देशातील नैसर्गिक साठ्यांची लूट करणे कितपत योग्य आहे, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

बागा येथे पर्यटक अभियंत्याचा बुडून मृत्यू

बागा येथील समुद्रामध्ये आंघोळीसाठी गेलेले झारखंड व बिहार येथील सहा जण बुडत असताना पाच जणांना जीवरक्षकांनी वाचवले मात्र एकजण दीपक प्रकाश राय (२३), सिंगम-झारखंड या सॉफ्टवेअर अभियंत्याचा बुडून मृत्यू झाला.

लोकायुक्त विधेयकावर कायदा आयोगाची कार्यवाही

फ्लॅट फोडताना अट्टल चोरटा जेरबंद

मडगाव - नावेली रेल्वे उड्डाण पुलाजवळील शिरवडे येथील एका इमारतीत फ्लॅट फोडून चोरी करताना रविकुमार सत्यनारायण प्रसाद शहा (३१) या बिहार येथील चोराला लोकांनी पोलिसांच्या मदतीने पकडून दिले. ही घटना काल (शुक्रवारी) पहाटे ३ वा. घडली. दरम्यान, मुंबईत घरफोड्यांशी त्याचा संबंध असल्याचे अधीक्षक अरविंद गावस यांनी सांगितले.

महापालिकेच्या कचर्‍यात पुन्हा राष्ट्रध्वज सापडला

पणजी महापालिकेच्या कचर्‍यात काल सकाळी आणखी एक राष्ट्रध्वज सापडला असून या प्रकरणामुळे खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणी महापालिकेचे आयुक्त आग्नेल फर्नांडिस यांनी पणजी पोलीस स्थानकावर राष्ट्रध्वज अवमान प्रतिबंधात्मक कायद्याखाली तक्रार नोंदविली असून पोलीस चौकशी करीत आहेत.

यंदाचा इफ्फी १० कोटी रुपयांचा

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव स्वयंपूर्ण होणे एवढ्यात शक्य नसल्याचे सांगून यंदाच्या महोत्सवाच्या खर्चाचा अंदाज सुमारे १० कोटी रुपये असल्याचे गोवा करमणूक सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनी काल पत्रकार परिषदेत एका प्रश्‍नावर सांगितले.

मडकईच्या श्री नवदुर्गेचा प्रसिद्ध जत्रोत्सव

- राजेश वि. कामत, भाटले - पणजी

श्री नवदुर्गा संस्थानतर्फे हिंदू पंचागाप्रमाणे देवीचे उत्सव साजरे करण्यात येतात. सुरवात होते चैत्र महिन्यातल्या संवत्सर प्रतिपदा पूजा, रामजन्म हनुमान जयंती, वसंत पूजा, वैशाख महिन्यात अक्षय तृतिया, महादेव पार्वती पूजा, पंचमी पूजा, नवमी पौर्णिमा पूजा, ज्येष्ठ महिन्यातला नवमी पालखी उत्सव, आषाढ महिन्यातली एकादशी, विठोबा अलंकार पूजा, कर्क सक्रांती. श्रावण महिन्यात सोमवार पूजा, श्रावणी, गोकुळाष्टमी, एकादशी विठोबा अलंकार पूजा, लघुविष्णू अनुष्ठान नवरात्रोत्सव, महानवमी, विजयादशमी, दसरा सीमोल्लंघन (पालखी), कोजागरी पौर्णिमा, गुरुद्वादशी पूजा, धनत्रयोदशी पूजा, नरकचतुर्दशी- दीपावली, कार्तिक महिन्यात एकादशी विठोबा अलंकार पूजा, तुलसी विवाह, नारायणदेव काला, आवळी भोजन पालखी व लालखी उत्सव व गंधपूजा, जत्रोत्सव, महापर्वणी नवमी व रथोत्सव, एकादशी विठोबा अलंकार पूजा, खोळेवरील पूजा, कुंकपुरूष जत्रा, मार्गशीर्ष महिन्यात गणपती काला, संप्रोषण नवमी, पौष महिन्यात मकर संक्रांती व नवमी पालखी, माघ महिन्यात गणेश जयंती, अनुष्ठान, मयूर वाहन उत्सव, महाशिवरात्री, फाल्गुन महिन्यात शिमगो, होळी. सर्व उत्सव हिंदू पंचांगाप्रमाणे साजरे केले जातात. कार्तिक महिन्यातला जत्रोत्सव हा संस्थानचा मुख्य उत्सव व त्या खालोखाल आश्विन महिन्यातला नवरात्रोत्सव व फाल्गुनमध्ये होणारा शिमगोत्सव.

ब्रँड बिहार

देशातील सर्वांत मागास राज्य म्हणून आजवर हिणवले जाणारे बिहार बदलू लागल्याचे संकेत मिळत आहेत. एका सर्वेक्षणात नुकतेच असे दिसून आले की, बिहारी मजुरांच्या स्थलांतराच्या प्रमाणात एक तृतीयांश घट झाली आहे. याचाच सरळ अर्थ बिहारी मजुरांना आता राज्याबाहेर जाण्याची गरज भासेनाशी झाली आहे. देशभरातील कष्टाच्या कामांमध्ये आजवर बिहारी मजुरांचा वाटा मोठा असे, कारण त्यांना स्वतःच्या राज्यात उत्कर्षाच्या संधीच नव्हत्या. प्रशासनाचा बट्‌ट्याबोळ, भ्रष्टाचार, प्रचंड गुन्हेगारी, त्यामुळे गुंतवणूक नाही आणि गुंतवणूक नाही म्हणून नोकरी - व्यवसायाच्या संधी नाहीत अशा दुष्टचक्रात सापडलेली बिहारी माणसे रोजीरोटीसाठी देशाच्या काना-कोपर्‍यांत धाव घेत आणि कष्ट उपसत. बिहार मात्र मागासच राहिला होता. पण आता हळूहळू हे चित्र बदलू लागले आहे असे दिसते. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काही मूलभूत गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिले, त्याचाच परिणाम म्हणून राज्यात नवी गुंतवणूक होऊ लागली आहे. रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. बिहार हे खरे तर देशातील लोकसंख्येच्या मानाने देशातील तिसरे राज्य.

Proposal of a new bridge on Zuari still on the cards, repair the existing bridge urgently, writes PWD to the government

Busy wooing voters ahead of elections, politicians turn a blind eye towards malaria workers fasting for 10 days

राष्ट्रध्वज

Story Summary: 

कचर्‍यात पडलेला राष्ट्रध्वज. (छाया : नंदेश कांबळी)

लोहखनिज निर्यातीवर बंदीचे धोरण केंद्राकडे नाही

Story Summary: 

लोहखनिज निर्यातीवर बंदी घालण्याबाबतचे धोरण सध्या तरी केंद्र सरकारकडे नाही असे केन्द्रीय पोलाद मंत्रालयाच्या वित्त संशोधन केंद्राचे अर्थतज्ज्ञ डॉ. ए. एस. फिरोझ यांनी सांगितले.

ते म्हणाले, लोहखनिज निर्यातीवर बंदीचा केंद्र सरकारचा इरादा नाही. या क्षेत्रातील जागतिक स्पर्धा आणि बाजारपेठेतील परिस्थितीमुळे खनिज उद्योगावर येत्या चार ते पाच वर्षात अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणार्‍या खनिज निर्यातीला आपोआप लगाम बसण्याची शक्यता आहे.

पणजी महापालिकेचा ध्वज कचर्‍यात सापडला

Story Summary: 

महापौरांनी मागितली माफी

पणजी महापालिकेने कचर्‍यात टाकून दिलेला राष्ट्रीय ध्वज काल पत्रकारांना सापडला आणि एकच खळबळ उडाली. पणजी महापालिका मंडळाच्या काल असलेल्या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले बातमीदार व छायापत्रकार यांना काल महापालिका इमारतीच्या मागे कचर्‍यात टाकून देण्यात आलेल्या अवस्थेत राष्ट्रीय तिरंगा सापडला.

बैठकीसाठी गेलेल्या काही छाया पत्रकारांनी दुसर्‍या मजल्यावरील खिडकीतून सहज खाली पाहिले असता तेथे कचर्‍यात तिरंगा टाकून देण्यात आला असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तात्काळ तेथे जाऊन तो तिरंगा काढला. पालिकेच्या एका कामगाराला ते कळताच त्याने पत्रकारांशी हुज्जत घालत तुम्हीच इकडे आणून टाकला आहे, असा त्यांच्यावर आरोप केला.

विशेष सीबीआय कोर्ट स्थापण्याचे गोव्याला आदेश

Story Summary: 

८ आठवड्यांची सुप्रीम कोर्टाची मुदत

२००९ साली पंतप्रधानांनी विशेष सीबीआय कोर्ट स्थापण्यासाठी राज्यांना सूचना केली होती. मात्र ती पाळली नसल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने काल राज्यांना फटकारले. गोव्यासह आठ राज्यांना येत्या आठ आठवड्यांत सीबीआय कोर्ट स्थापन करण्याचे आदेशही खंडपीठाने जारी केले.

न्या. जी. एस. सिंघवी आणि एस. डी. मुखोपाध्याय यांच्या पीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी टिप्पणी केली की, केवळ कोर्टाकडून निर्देश आल्यानंतरच अवमान होऊ नये म्हणून निर्णय घेण्याची देशातील परिस्थिती खेदजनक आहे.

इफ्फीमधील चित्रपटांत धुम्रपानास कात्री

आयनॉक्स, रवींद्र भवन परिसरातही प्रतिबंध

काल सचिवालयात झालेल्या राज्य तंबाखू निर्मूलन समितीच्या बैठकीत आरोग्य सचिव विजयन यांनी येत्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयनॉक्स परिसरात तसेच मडगाव येथील रवींद्र भवन परिसरात कोणत्याही परिस्थितीत धुम्रपान होणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला संबंधितांना दिला.

उपोषणकर्ता मलेरिया सेवक इस्पितळात

६७ जणांचे उपोषण चालूच

सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी येथील आरोग्य खात्यासमोर उपोषणास बसलेल्या एका कर्मचार्‍याची प्रकृती बिघडल्याने त्याला काल बांबोळी इस्पितळात दाखल करण्यात आले तर ६७ जणांचे आमरण उपोषण चालू आहे.

डॉ. सुरेश आमोणकर भाजपाच्या वाटेवर

विधानसभा निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना राजकीय समीकरणांना गती प्राप्त होऊ लागलेली असून भारतीय जनता पक्षाने माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री व पाळीचे माजी आमदार डॉ. सुरेश आमोणकर पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत असून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना पक्षात येण्यासाठी गळ घातली असल्याचे वृत्त आहे.

किरकोळ विक्री क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीस सरकारची अनुमती?

पुढील आठवड्यात निर्णय अपेक्षित

किरकोळ विक्री क्षेत्रात ५१ टक्के थेट विदेशी गुंतवणुकीस परवानगी देण्यास केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केंद्रीय मंत्रिमंडळास आपली संमती दिली आहे. अर्थ मंत्रालयाकडून तसा प्रस्ताव मंत्रिमंडळास देण्यात आला आहे. मल्टीब्रँड रिटेल व्यवसायक्षेत्रात अशा प्रकारे विदेशी गुंतवणूक करू देण्यास डाव्या पक्षांसह विविध राजकीय पक्षांचा व संघटनांचा कडवा विरोध आहे. त्यामुळे किराणा दुकानदार उद्ध्वस्त होतील अशी भीती व्यक्त होत आहे.

अंतर्गत कलहांनी कॉंग्रेस पोखरली?

- चरणजित सप्रे, फोंडा.

गोव्यात कॉंग्रेस पक्ष भरकटत चालला आहे. पक्षाचे नेतृत्व नेमके कुणाकडे आहे, हेच कळायला मार्ग नाही असा सूर व्यक्त होत आहे, कारण, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, निवडणूक प्रचारप्रमुख, मंत्री, आमदार हे ज्या पद्धतीने पक्षाचा कारभार चालवतात व वादग्रस्त विधाने करतात ते पाहता, प्रदेश कॉंग्रेसला एका चांगल्या मार्गदर्शकाची खरोखरच आवश्यकता आहे. राज्यात पक्षाची सूत्रे योग्य व्यक्तीकडे नसल्याकारणाने कॉंग्रेसमध्ये बजबजपुरी माजली आहे. पक्षातील योग्य, निष्ठावंत आणि अनुभवी नेत्यांना बाजूला सारून पक्ष भलत्याच लोकांच्या हातात गेल्यासारखा वाटतो. प्रदेश कॉंग्रेसच्या भवितव्याची चिंता पक्षातील काही मोजक्याच निष्ठावंतांना लागून राहिली आहे.

आराखड्याचे राजकारण

प्रादेशिक आराखड्याचा विषय पुन्हा एकवार तापत चालला आहे. भविष्यवेधी दृष्टिकोन ठेवून बनवलेल्या या आराखड्यामध्ये अद्यापही अनेक त्रुटी राहून गेल्या आहेत आणि त्यातून पुन्हा एकदा त्यासंदर्भात अविश्वासाचे व साशंकतेचे वातावरण निर्माण झालेले दिसते. गोवा बचाव आंदोलनाच्या ऐतिहासिक चळवळीनंतर सरकारने प्रादेशिक आराखड्यासंदर्भात स्वागतार्ह पारदर्शक भूमिका घेत गाव पातळीवर तो जनतेच्या अभ्यासासाठी उपलब्ध करून दिला होता, ग्रामसभांमधून त्यावर चर्चाही झाली, परंतु त्यानंतर केल्या गेलेल्या सूचना आराखड्यात समाविष्ट करून घेतानाही त्रुटी राहून गेल्या आहेत. काही चुका झाल्या आहेत, तर काही मुद्दामहून केल्या गेल्याचा संशय आहे. शेवटी हा ज्याच्या त्याच्या जमिनीशी संबंधित विषय असल्याने आणि या आराखड्यास अनुरूप असेच नियोजन पुढील काळात केले जाणार असल्याने त्यातील बर्‍यावाईट गोष्टींचे फार दूरगामी परिणाम होणार आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीस उशीर लागला तरी हरकत नाही, परंतु जो आराखडा अंतिम स्वरूपात येईल, तो बिनचूक असावा आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे गोव्याचे हित विचारात घेऊन केलेला असावा अशीच जनतेची अपेक्षा आहे.

पत्रकारिता दिन

Story Summary: 

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री दिगंबर कामत. सोबत माहिती संचालक मिनीन पिरिस, गुजचे कार्यकारी अध्यक्ष सोयरू कोमरपंत, दै. नवप्रभाचे संपादक परेश प्रभू, गुजचे सरचिटणीस विठ्ठलदास हेगडे व प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार.

आराखडा रद्द करू नका, वादग्रस्त विषय रोखून कार्यवाही करा

Story Summary: 

पर्रीकर : ग्रामीण रस्त्यांची रुंदी इतकी कशाला

प्रादेशिक आराखडा २०२१ च्या बाबतीत ग्रामीण भागातील काही नागरिकांनी काही विषयांना हरकत घेतली आहे. आराखड्यातील त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने संबंधित विषय सहा महिनेपर्यंत निलंबित करून आराखड्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी विरोधी नेते मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत केली. कुणीही कितीही विरोध केला तरी सरकारने प्रादेशिक आराखडा रद्द करू नये, असेही ते म्हणाले.

कोणत्याही परिस्थितीत जमीन रुपांतरच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयावर सरकारने माघार घेऊ नये, तसे झाल्यास विपरित परिणाम होईल, असा इशारा पर्रीकर यांनी दिला.

सामाजिक झुंडशाहीविरुद्ध लिहिणे आज अवघड

Story Summary: 

ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांची खंत

(बबन भगत)

आजच्या काळात सरकारविरुद्ध टीका करणे सोपे आहे कारण त्यांचे हात कायद्याने बांधलेले आहेत, परंतु इतरांच्या विरोधात लिहिणेच फार अवघड आहे, कारण ते अंगावर येत असतात. जी झुंडशाही समाजामध्ये आहे, त्याविरुद्ध लिहिणेच आज अवघड आहे. आज तुम्हाला गांधींची चिकित्सा करता येते, परंतु आंबेडकरांची चिकित्सा करता येत नाही, शिवाजी महाराजांची चिकित्सा करता येत नाही, याचे कारण त्यांच्यामागे जातींचे संघटित समूह उभे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक श्री. सुरेश द्वादशीवार यांनी काल पणजीत आयोजित व्याख्यानात केले. राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या निमित्ताने गोवा सरकारचे माहिती व प्रसिद्धी खाते, संपादक परिषद आणि गोवा श्रमिक पत्रकार संघटना यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आजची पत्रकारिता ही व्रतस्थ पत्रकारिता नसून व्यावसायिक पत्रकारिता आहे. आजचे वर्तमानपत्र हे एक उत्पादन बनले असून ते सजवून धजवून वाचकांच्या हाती द्यावे लागते. परिणामी वर्तमानपत्राचे निर्मितीमूल्यही प्रचंड वाढले आहे. १८ रुपये उत्पादन मूल्य असणारा अंक वाचकांना अवघ्या दोन - तीन रुपयांत दिला जातो. त्यामुळेच वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातींचे महत्त्व वाढले असल्याचे श्री. द्वादशीवार पुढे म्हणाले.

च्यारी व कोमरपंत समाजाचा केंद्रीय ओबीसी यादीत समावेश

Story Summary: 

देशातील ५० नव्या जातींच्या समावेशास मान्यता

इतर मागासवर्गीय समाज (ओबीसी) यादीत सुधार करण्यासंबंधीच्या ‘नॅशनल पॅनल’च्या शिफारसींना काल केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. गोव्यातील च्यारी व कोमरपंत समाजांचा केंद्राच्या ओबीसी यादीत समावेश करण्यात येणार आहे.

देशातील २० राज्ये व संघ प्रदेशांमधील ५०हून जास्त जातींना सुधारित यादीत समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना शिक्षण व नोकर्‍यांत आरक्षणाचे लाभ मिळू शकतील. दरम्यान, च्यारी व कोमरपंत समाजांना गोवा सरकारने राज्याच्या ओबीसी यादीत आधीच दाखल करून घेतले आहे.

सिप्रियान मृत्यू प्रकरण सीबीआयकडे

सिप्रियान फर्नांडिस याच्या कारागृहातील कथित मृत्यूचे गाजलेले प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय अखेर काल राज्य सरकारने घेतला.

मालेगाव स्फोट : आरोपींना पाच वर्षांनंतर जामीन

२००६ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी नऊपैकी सात आरोपींना काल आर्थर रोड कारागृहातून सोडण्यात आले. कोर्टाने त्यांना पाच वर्षांनंतर जामीन मंजूर केला आहे.

लोकायुक्त विधेयकातील त्रुटी दूर करणार

लोकायुक्त विधेयकाच्या बाबतीत राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी दाखविलेल्या त्रुटीवर सरकार अभ्यास करून सदर विधेयक पुन्हा राज्यपालांकडे पाठविणार असल्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले.

कदंबला आग; प्रवासी सुखरूप

वास्कोहून पणजीला निघालेल्या कदंब बसच्या इंजीनमध्ये बिघाड झाल्याने बसच्या इंजीनला चिखली येथे आग लागली मात्र ताबडतोब धावपळ झाल्याने बसमधील सर्व प्रवासी बालबाल बचावले.

अभिषेक-ऐश्वर्याला कन्यारत्न

बच्चन कुटुंब तथा तमाम चाहत्यांच्या उत्कंठेला पूर्णविराम देत ऐश्वर्या राय - बच्चन हिने काल सकाळी येथील खासगी इस्पितळात मुलीला जन्म दिला. ऐश्वर्या (३८) व अभिषेक (३५) यांचे पहिले अपत्य असलेल्या या मुलीचा जन्म सेव्हन हिल्स या खासगी इस्पितळात झाला. आई व मुलगी दोन्ही सुखरूप असल्याचे इस्पितळातील सूत्रांनी सांगितले.

फेसबुक’वर अश्‍लील साहित्याचा हल्ला

युवकांच्या संवादाचे आणि संपर्काचे जगातील एक प्रसिद्ध माध्यम बनलेल्या ‘फेसबूक’ या सोशल नेटवर्किंग साईटवर हॅकर्सनी आपली वकृदृष्टी केल्याने हे संकेतस्थळावरील अकाउंटधारक संकटाच्या गर्तेत सापडले आहेत.

गोमंतकीयांना आज लाभणार गडकिल्ल्यांच्या अभ्यासाची सुवर्णसंधी

‘संवर्धन’ तर्फे दुर्गाभ्यासाबाबत विशेष कार्यशाळा

पुरातत्त्व विषयावर सर्वसाधारणपणे दिसून येणार्‍या अनास्थेच्या पार्श्वभूमीवर गड किल्ल्यांवर व ऐतिहासिक वारशावर प्रेम करणार्‍या काही तरुणांनी आज व उद्या पणजीत ‘दुर्गाभ्यास’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. ‘दुर्ग प्रकार आणि व्याख्या’, ‘सह्याद्री आणि दुर्ग’, ‘कथा दुर्गांच्या’, ‘दुर्ग कसे पाहावेत’, ‘शिवकालीन दुर्ग व्यवस्थापन’, ‘किल्यांवरील उत्खनने आणि पुरातत्त्वीय अवशेष’, ‘गोव्यातील किल्ले’, तसेच ‘जीपीएस, उपग्रह प्रतिमा आणि किल्ले’ अशा वेगळ्या विषयांवरील तज्ज्ञांची व्याख्याने हे या दोन दिवशीय कार्यशाळेचे ठळक वैशिष्ट्य आहे.

जीपमधून रोकड लंपास

गोव्यातील वाढते रस्ते अपघात : गंभीर समस्या

- विजय प्रभू पार्सेकर-देसाई, पेडणे.

सकाळी-सकाळी ‘नवप्रभा’ उघडताक्षणी त्यात रस्ता अपघाताच्या कमीत कमी दोन तरी बातम्या हमखास आढळतात. बहुतेक अपघात हे दुचाकीचे असतात. भटकी गुरें आणि कुत्री पण अपघात घडवून आणतात. अपघाताच्या वृत्तांतात पोलीस तपास चालू असल्याचा उल्लेख असतोच असतो. मात्र अपघात होऊ नये किंवा त्यांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून सरकारने एखाद्या रस्त्याबाबत ठोस उपाययोजना केल्याचे काही वाचनात येत नाही.

विवेकबुद्धीचा कस

आजच्या पत्रकारितेच्या स्वरूपाबाबत समाजामध्ये सातत्याने ओरड ऐकू येत असते आणि ‘पेड न्यूज’ सारख्या विषयांनी तर पत्रकारितेची उरलीसुरली प्रतिष्ठाही धुळीला मिळण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये हयात घालवलेले मान्यवर आपले या व्यवसायाविषयीचे चिंतन जेव्हा समाजापुढे ठेवतात, तेव्हा पत्रकारांना आजच्या पत्रकारितेच्या मर्यादा आणि तिच्यापुढील आव्हाने समजून घेण्याच्या दृष्टीने आणि समाजाला त्यांचा त्या क्षेत्राकडे बघण्याचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन तपासून घेण्याच्या दृष्टीने एक दिशा मिळत असते. कुमार केतकर, अरुण टिकेकर, सुरेश द्वादशीवार आदी मराठीतील मान्यवर व आदरणीय संपादकांची व्याख्याने अलीकडच्या काळात गोव्यात झाली व त्यातून उद्बोधक विचारमंथनही झाले. द्वादशीवार यांचे प्रसारमाध्यमांच्या सामाजिक बांधिलकीविषयीचे जे व्याख्यान राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या निमित्ताने काल पणजीत आयोजित केले गेले होते, त्यामधून त्यांनी आजच्या पत्रकारितेचे अभिनिवेशरहित, अत्यंत वास्तववादी चित्र तर उपस्थितांपुढे ठेवलेच, परंतु त्याचबरोबर या आव्हानात्मक कालखंडामध्ये स्वत्व कसे जपावे यासंबंधीचे मौलिक मार्गदर्शनही केले.

Increasing questions raised on the quality of media on National press day celebrations in Panaji, Chief minister assures Protection Law for Journalists in Goa soon

India against corruption activists, demand clarification from the chief minister over return of lokayukta bill 2011, by the Governor

आता असरदार फवारा मारा!

- दिलीप बोरकर

मलेरियाचा प्रसार होऊ नये आणि मलेरियाच्या डासांपासून होणारी लागण आटोक्यात राहावी म्हणून गोव्याचे आरोग्य खाते अधूनमधून औषधमिश्रित धुराचे फवारे नगरपालिका क्षेत्रात सोडत असते. डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी जनतेने काय काय उपाययोजना करावी आणि कुठली सावधगिरी बाळगावी याचीही मुक्ताफळे आरोग्य खात्याकडून अधूनमधून फवारली जातात. पण या फवार्‍यांचा उपयोग कितपत होत असतो आणि मलेरियाचे निर्मूलन करण्यात सदर खात्याला कितपत यश आलेले आहे, याचा दाखला मात्र आरोग्य खात्याकडे नाही. जनतेच्या डोळ्यांसमोर दिसतो तो मात्र फवार्‍याच्या नावाने उठलेला धुरळा.

शॅक जळून खाक

Story Summary: 

जळून खाक झालेला शॅक व आतील जळालेले सामान. (छाया : लक्ष्मण ओटवणेकर)

पेट्रोल दरात कपात

Story Summary: 

रु.१.८५ प्रति/लि. स्वस्त

राज्यांनी ‘व्हॅट’ कमी केल्यास दर आणखी उतरतील

काल मध्यरात्रीपासून पेट्रोल प्रति लिटरमागे रु. १.८५ स्वस्त करण्याचा निर्णय तेलकंपन्यांनी घेतला. २००९पासून प्रथमच पेट्रोल दरांत कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेल दर किंचित कमी झाले असून त्यामुळे देशांतील दरांत कपात करणे शक्य झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, राज्यांनी आपल्या अखत्यारितील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी केल्यास संबंधित राज्यांत तेल आणखी स्वस्त होऊ शकते.

तेल दरवाढीवरून देशात तीव्र विरोध प्रदर्शित झाला होता. यूपीएच्या घटक पक्षांनी जाहीररित्या किमती वाढविल्यावरून नाराजी व्यक्त केली होती. यूपीएचा दुसरा सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेऊन यापुढे दरवाढ झाल्यास सरकारमधून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट केले होते.

आणखी ‘टोल’वा टोलवी नको : चर्चिल

Story Summary: 

महामार्गासाठी सहकार्य करण्याचे विरोधकांना आवाहन

राष्ट्रीय महामार्ग एनएच १७ चा तयार केलेला आराखडा ‘टोला’वरून विरोध झाल्याने त्यातही विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी ठाम विरोध केल्याने तो रद्द झाला व गोव्याचे नुकसान झाले. आता तो पुन्हा चालीला लावण्यासाठी आपण प्रयत्न करीत असून, लोकांनी भावी काळातील गरज ओळखून पाठिंबा द्यावा, अशी मागणी बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी केली.

प्रसारमाध्यमांनी अशा प्रकल्पाला विरोध न करता जनतेमध्ये जागृती करावी. तेच उत्कृष्ट कामगिरी बजावू शकतात. केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने मार्गाच्या दिशेमुळे ४ हजार पेक्षा जास्ती घरे मोडणार होती पण लोकांच्या भावना समजून घेवून गोव्याच्या बांधकाम खात्याने ज्या महामार्गाची आखणी केली त्यात ६०० पेक्षा कमी घरी मोडली जाणार आहेत.

विश्‍वास नसेल तर विश्‍वजित यांना मंत्रिमंडळातून काढा

Story Summary: 

भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मलेरिया विभागातील कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्री दिगंबर कामत व आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे एकमेकांवर खापर फोडत आहेत. मुख्यमंत्र्यांचा आरोग्य मंत्र्यांवर विश्‍वास नसेल तर त्यांनी त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी काल पत्रकार परिषदेत केली.

सरकारने मलेरिया कामगारांच्या प्रश्‍नावर पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारच्या आश्‍वासनावर विश्‍वास न ठेवता त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. आज सात दिवस उलटूनही सरकारला जाग येत नसल्याचा आरोप आर्लेकर यांनी केला. सरकार उपोषणास बसलेले कामगार दगावण्याची वाट पहात असल्याची टीका आर्लेकर यांनी केली.

मुख्यमंत्री म्हणतात, आपण पदे तयार केली होती. परंतु आरोग्यमंत्र्यांनी मलेरिया कर्मचार्‍यांना घेतले नाही, असे असेल तर सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांना जाब विचारायला हवा होता, असे ते म्हणाले. मलेरिया विभागातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी गरज पडल्यास आंदोलन करण्याचा इशारा आर्लेकर यांनी दिला आहे.

ट्रकांच्या चोर्‍यांमागील मुख्य सूत्रधारास अटक

कुडचडे सावर्डे परिसरातील मोठ्या प्रमाणात होणार्‍या ट्रक चोरीच्या प्रकरणातील टोळीच्या मुख्य संशयिताला पकडण्यास कुडचडे पोलिसांना यश आले असून सदर संशयिताच्या अटकेमुळे कुडचडे भागातील असंख्य चोरीची प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हरमल येथे शॅकला आग लागून ७ लाखांची हानी

हरमल-खालचावाडा समुद्रकिनार्‍यावरील पर्यटन खात्याकडून लॉटरीद्वारे मिळालेल्या सुरेश बर्डे यांच्या ‘मॉर्निंग स्टार’ शॅकला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागून अंदाजे ७ लाख ५० हजारांचे नुकसान झाले.

कॉंग्रेसच्या यात्रेवर काणकोण कार्यकर्त्यांचा बहिष्कार

कॉंग्रेसने आयोजित केलेल्या लोकसमृद्धी यात्रेवर काणकोणचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते बहिष्कार घालणार आहेत. १७ रोजी ही लोकचेतना यात्रा काणकोण तालुक्यात पोचणार असून या यात्रेत सहभागी व्हायचे नाही असा निर्णय १५ रोजी काणकोण नगरपालिका सभागृहात घेतलेल्या बैठकीत घेऊन कॉंग्रेसला घरचा अहेर दिला आहे.

म्हापशात दोन महिलांची मंगळसूत्रे चोरली

म्हापसा पोलिस स्थानकाच्या हद्दीत येणार्‍या डांगी कॉलनी म्हापसा येथील आज भर दुपारी अज्ञात चोरट्याने रस्त्यावरून चालत जाणार्‍या रेषा मांद्रेकर हिच्या गळ्यातील ४० हजार रुपयांचे तर घरात काढून ठेवलेले लता कांबळे या महिलेचे २० हजार रुपयांचे मंगळसूत्र व मोबाईल घेऊन पळ काढण्याच्या घटना घडली.

योगगुरू रामदेव बाबा डिसेंबरमध्ये गोव्यात

भ्रष्टाचाराविरोधात जनजागरण अभियाना अंतर्गत ‘गोवा बचाव’चा संदेश घेऊन योग योगगुरू स्वामी रामदेव बाबा दि. १० व ११ डिसेंबर रोजी गोव्यात येत आहेत. गोव्यात होणार्‍या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यातील जनतेला जगावण्याकरिता स्वामी रामदेव बाबा गोव्यातील जनतेला मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पतंजली योग समितीचे केंद्रीय प्रभारी राकेश कुमारजी यांनी म्हापसा येथे दिली.

सरकारकडे आर्थिक मदतीची याचना केली नव्हती : मल्ल्या

आपण आपल्या ‘किंगफिशर एअरलाइन्स’ साठी सरकारकडे आर्थिक मदतीची याचना केली नव्हती, परंतु विद्यमान आर्थिक पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी ७०० ते ८०० कोटीचे भांडवल कर्जरूपाने व सवलतीच्या दरात मिळावे एवढीच अपेक्षा व्यक्त केली होती, असे विजय मल्ल्या यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. ‘‘आम्ही करदात्यांच्या खिशात हात घालण्यास सरकारला कधीच सांगितलेले नाही आणि आम्ही ते कधी करणारही नाही’’ असे मल्ल्या यांनी स्पष्ट केले.

राय-शिरोडा व सापेंद्र-दिवाडी जलमार्गावर प्रत्येकी दोन फेरीबोटी

नदी परिवहन खात्याला चालू महिन्याच्या अखेरपर्यंत चार नव्या फेरीबोटी मिळणार असून त्यापैकी दोन फेरीबोट राय ते शिरोडा या मार्गावर तर उर्वरित दोन बोटी सांपेद्र ते दिवाडी बेट या मार्गावर घालण्यात येणार असल्याचे नदी परिवहन खात्यातील सूत्रांनी सांगितले.

आता असरदार फवारा मारा!

- दिलीप बोरकर

मलेरियाचा प्रसार होऊ नये आणि मलेरियाच्या डासांपासून होणारी लागण आटोक्यात राहावी म्हणून गोव्याचे आरोग्य खाते अधूनमधून औषधमिश्रित धुराचे फवारे नगरपालिका क्षेत्रात सोडत असते. डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी जनतेने काय काय उपाययोजना करावी आणि कुठली सावधगिरी बाळगावी याचीही मुक्ताफळे आरोग्य खात्याकडून अधूनमधून फवारली जातात. पण या फवार्‍यांचा उपयोग कितपत होत असतो आणि मलेरियाचे निर्मूलन करण्यात सदर खात्याला कितपत यश आलेले आहे, याचा दाखला मात्र आरोग्य खात्याकडे नाही. जनतेच्या डोळ्यांसमोर दिसतो तो मात्र फवार्‍याच्या नावाने उठलेला धुरळा.

घोर अन्याय

आरोग्य खात्याच्या कंत्राटी मलेरिया कर्मचार्‍यांची परवड काही अजून थांबलेली नाही. गेल्या ९ तारखेपासून ते बेमुदत उपोषणाला बसले आहेत. सोमवारी ते मुख्यमंत्र्यांनाही भेटले, परंतु आजवर आश्वासनांखेरीज त्यांच्या हाती काहीही पडलेले नाही. एकीकडे ‘इफ्फी’वर लाखोंची उधळपट्टी करण्याची जय्यत तयारी चाललेली असताना दुसरीकडे गोवा मनोरंजन संस्थेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरील आरोग्य खात्याच्या मुख्यालयासमोर या दुर्दैवी कर्मचार्‍यांना आपल्या मुलाबाळांसह उपोषणास बसावे लागणे हे वास्तव सरकारच्या प्राधान्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करते. १९९६ साली या कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती झाली होती. म्हणजे यंदा त्यांच्या नेमणुकीला सोळा वर्षे उलटत आली. गेली सोळा वर्षे जी अक्षम्य थट्टा सरकारने या कर्मचार्‍यांच्या बाबतीत चालवलेली आहे, तिला काही अंत आहे की नाही? किती वेळा सरकारच्या वतीने त्यांना नोकरीत कायम करण्याची आश्वासने दिली गेली आणि कितीवेळा शब्द फिरवला गेला याचा लेखाजोखा घेतला तर या कर्मचार्‍यांच्या हिताआड कोण येते आहे आणि का येते आहे, त्यावर स्पष्ट प्रकाश पडतो.

योगमार्ग - राजयोग (सत्य २७)

- डॉ. सीताकांत घाणेकर

संपूर्ण विश्‍वातील मानवाच्या इतिहासाचा सूक्ष्म अभ्यास केला तर सहज लक्षात येईल की अनादी काळापासून अनेक द्वंद्वे चालू आहेत. त्यांत प्रमुख म्हणजे सत्य-असत्य, धर्म-अधर्म, सज्जन-दुर्जन ह्यामधील द्वंद्वे. पण अनेक वेळा मानवता सज्जन मानते ते सत्य विसरून अधर्माच्या मार्गाने जातात किंवा काही महापुरुष धुरीण मानले गेलेले सज्जन सत्य समोर दिसत असून त्याकडे आडनजर करतात आणि मग त्या कुळाला राज्याला मानवतेला भयानक परिस्थितीला तोंड द्यावे लागते. शेवटी नियती आपला प्रताप सर्व समर्थ-असमर्थांना दाखवतेच. सत्याचाच विजय होतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

...योजकस्तत्र दुर्लभः

- प्रा. रमेश सप्रे

रमणलाल या भारदस्त नावाच्या विद्यार्थ्याचा परिचय करून घ्यावा या हेतूनं त्याला बोलावलं. तो मोर उभा ठाकल्यावर एका रशियन कवितेचं शीर्षक आठवलं. ‘क्लाउड इन पँट्‌स(पँटीतला ढग)’. होताच तो तसा प्रचंड. मनात विचार आला आमच्या बर्‍याच शिक्षकांपेक्षाही मोठ्या अशा या विद्यार्थ्याला हाताळायचा कसा आणि तोही किमान सहा वर्षं? पण त्याची खाली झुकलेली नजर अन् एकूणच शांत, गरीब देहबोली पाहून थोडा धीर आला. विचारलेल्या एकाही प्रश्‍नाचं उत्तर पूर्ण वाक्यात दिलं नाही त्यानं. फक्त ‘हो, नाही’ करत राहिला. तेही मानेनं. आत्ता ताणून धरण्यात अर्थ नाही. नंतर पाहू, असा विचार करून त्याला जायला सांगितलं.

लोक समृद्धी यात्रेचा शुभारंभ

Story Summary: 

१) पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाजवळ कॉंग्रेसच्या लोक समृद्धी यात्रेचा शुभारंभ करताना गोवा कॉंग्रेस प्रभारी जगमितसिंग ब्रार, मुख्यमंत्री दिगंबर कामत, सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमांव, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभष शिरोडकर व इतर. (छाया : निवृत्ती शिरोडकर), २) पैरा येथे कॉंग्रेसच्या यात्रेला काळे बावटे दाखविताना मये भूविमोचन समितीचे कार्यकर्ते. (छाया ः विशांत वझे)

प्रादेशिक आराखड्यासंदर्भातील विरोध ग्रामसभांमधून प्रकट करा : गुदिन्हो

Story Summary: 

ग्रामसभेतील ठरावांच्या आधारेच निर्णय

प्रादेशिक आराखडा २०२१ नुसार ग्रामीण भागातील रस्त्यांच्या रुंदीच्या बाबतीत अनेक तक्रारी आल्याने दि. ५ डिसेंबर पर्यंत खास ग्रामसभा बोलावण्यासाठी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पंचायत संचालकांना सर्व पंचायतींना परिपत्रक पाठविण्यास सांगितले आहे. त्यामुळे जनतेने याबाबतीत योग्य तो विचार करूनच ग्रामसभेत ठराव मंजूर करून ते सरकारला पाठवावेत, असे आवाहन कॉंग्रेस प्रवक्ते माविन गुदिन्हो यांनी काल पत्रकार परिषदेत केले.

रस्त्यांची रुंदी कमी करण्याच्या बाबतीत सरकार ग्रामसभेतील ठरावांच्या आधारेच निर्णय घेतील, असे गुदिन्हो यांनी सांगितले.

लोकसमृद्धी यात्रेचा शुभारंभ

Story Summary: 

कॉंग्रेसच्या लोकसमृद्धी यात्रेचा शुभारंभ काल पत्रादेवी येथे हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून झाला. नंतर ही यात्रा तोरसे, न्हंयबाग, पेडणे, पार्से मार्गे शिवोलीला रवाना झाली.

यात्रेच्या शुभारंभप्रसंगी आयोजित केलेल्या सभेस मुख्यमंत्री दिगंबर कामत, सार्वजनिक बांधकामंत्री चर्चिल आलेमांव, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, उपसभापती माविन गुदिन्हो, पाळीचे आमदार प्रताप गावस, डिचोलीचे माजी आमदार राजेश पाटणेकर, नरेश सावळ, पेडण्याचे माजी आमदार दयानंद सोपटे, सांताक्रुझच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस, माजी कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप, युवा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, तसेच पेडण्याच्या स्थानिक नेत्यांची, पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

यात्रेला मयेवासियांकडून काळे बावटे

Story Summary: 

कॉंग्रेसची लोकसमृद्धी यात्रा काल मये मतदारसंघात दाखल झाली तेव्हा पैरा येथील पुलाजवळ मये भूविमोचन समितीच्या कार्यकर्त्यांनी यात्रेला काळे बावटे दाखवून मये मुक्तीविषयी निर्णय घेण्यात चालढकल चालविल्याबद्दल निषेध केला.

यात्रा रोखण्याचा इशारा आधी दिल्याने आधीपासूनच याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे यात्रा दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी कडे करून रोखून धरले.

उत्तर प्रदेश माफियांच्या हातात : राहुल गांधी

उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पक्षाचे सरकार भ्रष्ट असून गरिबांप्रति असंवेदनशील असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. मायावती यांनी राज्यात ‘माफिया राज’ सुरू केल्याचेही ते म्हणाले.

सत्र न्यायालयात आग

पणजी जिल्हा व सत्र न्यायालयात काल लागलेल्या आगीत खुर्च्या, टेबल व रद्दी जळून खाक झाली. मात्र, वेळीच आग विझवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

८० हजारांची बेकायदा दारू म्हापशात जप्त

कदंब बसस्थानकाजवळ असलेल्या इमारतीत शुभम वाईन स्टोअर्स येथे अबकारी खात्याच्या अधिकार्‍यांनी काल छापा टाकून सुमारे ८० हजार रुपयांची बेकायदा दारू जप्त केली.

सर्व शिक्षा अभियानाच्या नव्या उपक्रमांची आखणी

२७ कोटी रु. निधी उपलब्ध

शाळांच्या विकासासाठी सर्व शिक्षा अभियान योजनेखाली २७ कोटी रु. एवढा निधी उपलब्ध झालेला असून या पैशातून सरकारी शाळांत वीज दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची सोय, संडास, अपंग व मुलींसाठी वेगळे संडास, अपंगांसाठी रॅम्पस् आदी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे सर्व शिक्षा अभियानच्या सूत्रांनी सांगितले.

शेतकर्‍यांना भरपाईसाठी कायदा आयोगाचे प्रयत्न

मोप विमानतळाचे भूसंपादन

शाह आयोगाचा अहवाल केवळ शिफारसवजा

बेकायदेशीर खनिज प्रकरणी चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या एम. बी. शाह आयोगाचा अहवाल शिफारसवजा असेल, परंतु केंद्र सरकार त्यावर अभ्यास करूनच योग्य तो निर्णय घेऊन कारवाई करील, असे कॉंग्रेस प्रवक्ते माविन गुदिन्हो यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.

राज्यपाल ‘जनतेची अधिकारिणी’ असल्याचा उच्च न्यायालयाचा निवाडा

गोवा राजभवन हे ‘जनतेची अधिकारिणी’ असून ते माहिती हक्क कायद्याच्या अखत्यारित येत असल्याचा महत्त्वपूर्ण निवाडा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल दिला.

मलेरियासेवकांना अन्य पदांवर सामावून घेण्याचे आश्‍वासन

उपोषण चालूच ठेवणार

आमरण उपोषणाला बसलेल्या मलेरिया सेवकांना काल मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मलेरिया सेवकांसाठीची रिक्त पदे नसल्याचे सांगतानाच आरोग्य खात्यात त्यांना अन्य पदे देऊन सामावून घेण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, त्याने समाधान न झाल्याने या मलेरिया सेवकांनी आमरण उपोषण चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

आय. ए. एस. अधिकारी खातेप्रमुख ?

- ज. अ. रेडकर

शिक्षण खात्याला गेल्या दीड दशकांत अनुभवसंपन्न, ठाम निर्णयक्षमता असलेला संचालक मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे. गोवा राज्य मंत्रिमंडळाने ऑगस्टच्या बैठकीत शिक्षण, अबकारी, पर्यटन, विक्रीकर, नगरविकास या खात्यांचे प्रमुख आणि जिल्हाधिकारी ही पदे आय. ए. एस. अधिकार्‍यांच्या केडरमधून नेमण्याचा निर्णय घेतला आहे. परंपरेनुसार जिल्हाधिकारी हा आय. ए. एस. केडरचाच असतो, त्यात काहीही वेगळेपण नाही. परंतु अन्य खात्यांना आय. ए. एस. अधिकारी आणि तोही काही ठराविक खात्यांनाच का, असा प्रश्न पडतो. कृषी, आरोग्य, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, लेखा, उद्योग या अन्य महत्त्वाच्या खात्यांना का नको ? हा पंक्तिप्रपंच कशासाठी ? यात काही काळेबेरे नाही ना, असा संशय येतो.

पुन्हा अपमान

राष्ट्रीय सुरक्षा हा प्रत्येक देशाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषय असतो आणि तसा तो असायलाच हवा. परंतु सुरक्षेचा बाऊ करून जेव्हा अतिरेक केला जातो, तेव्हा तो चीड आणणारा प्रकार असतो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना सुरक्षेच्या नावाखाली अमेरिकेने दुसर्‍यांदा जी अपमानास्पद वागणूक दिली, ती निषेधार्ह आहे. हा प्रकार पुन्हा पुन्हा का घडतो या प्रश्नाचे उत्तर अमेरिकनांच्या ‘आम्ही जगात सर्वश्रेष्ठ’ या चढेल आणि मस्तवाल मनोवृत्तीमध्येच दडलेले आहे. डॉ. कलाम यांनी स्वतःच्या या अपमानाकडे यावेळीही दुर्लक्षच केले, तो त्यांच्या मनाच्या मोठेपणाचा भाग आहे, परंतु हा केवळ डॉ. कलाम यांचा अपमान नाही. हा देशाचा अपमान आहे. डॉ. कलाम यांच्या बाबतीत जो काही प्रकार न्यूयॉर्कच्या केनेडी विमानतळावर घडला, तो अनवधानाने झालेला आहे असे दिसत नाही. एकदा विमानतळावर तपासणी झाल्यानंतर डॉ. कलाम विमानात बसले असताना अमेरिकी सुरक्षा अधिकार्‍यांनी एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांना विमानाचे दार उघडायला लावले. डॉ. कलाम यांना बूट आणि जॅकेट उतरवण्यास सांगण्यात आले आणि ते तपासणीसाठी नेण्यात आले. विमानातील भारतीय कर्मचार्‍यांनी डॉ. कलाम कोण आहेत याची कल्पना दिलेली असतानाही त्यांना न जुमानता हा प्रकार केला गेला, याचाच अर्थ हे सारे सुरक्षेच्या नावाखाली मुद्दामहून केले गेले.

मये मुक्ती प्रश्न : आणखी अंत पाहू नका!

- रमेश सावईकर

पन्नास वर्षांपूर्वी मुक्त झालेल्या गोवा प्रदेशात एखादा गाव अजून अमुक्त राहावा व त्या गावच्या लोकांना मुक्तीसाठी लढा देणे भाग पडावे ही तमाम गोमंतकीयांसाठी शरमेची बाब आहे. डिचोली तालुक्यातील मये गावची जनता आजही ‘मुक्ती’साठी लढा देत आहे. ज्या मयेवासीयांनी गोवा मुक्तीसाठी, पोर्तुगीज सत्तेविरुद्ध चाललेल्या ‘चले जाव’ चळवळीत सक्रिय सहभाग घेतला, कित्येकजणांनी जिवाची कुर्बानी केली, काहीजण हुतात्मे झाले, त्या मयेवासीयांच्या युवा पिढीवर ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावच्या मुक्तीसाठी लढा द्यावा लागत आहे, ह्याला म्हणावे तरी काय?

मदतीचा हात हवा

देशातील सर्वोत्तम एअरलाइन्स म्हणून अल्पावधीत लौकीक प्राप्त करणार्‍या ‘किंगङ्गिशर’ पुढील विद्यमान आर्थिक संकट हे सरकारच्या नागरी विमान वाहतुकीप्रतीच्या नकारात्मक दृष्टिकोनाची परिणती आहे. सरकारकडून होणार्‍या प्रचंड कर आकारणीमुळे बहुतेक खासगी विमान कंपन्या आज जेरीस आल्या आहेत. या वर्षीची आकडेवारी पाहिली, तर ‘इंडिगो’ वगळता अन्य सर्व विमान कंपन्या तोट्यात आहेत. गेल्या सहामाहीत या विमान कंपन्यांना साडे तीन हजार कोटींचा तोटा झालेला आहे. ‘जेट एअरवेज’ ला गेल्या तिमाहीत ७१४ कोटींचा तोटा झालेला आहे. ‘किंगफिशर’ पुढील संकटांची चाहूलही दोन वर्षांपूर्वीच लागली होती. खरे तर सन २००५ मध्ये ए ३२० बनावटीच्या अवघ्या चार विमानांनिशी ‘किंगफिशर’ अवतरली तेव्हा नागरी विमान वाहतूक क्षेत्रात नवी चेतना निर्माण झाली होती. मध्यमवर्गाच्या आवाक्यात विमानप्रवास आल्याने नवी ग्राहकपेठ खुली झाली होती. तिचा लाभ घेत कंपनीने आपला विस्तार केला. २००८ साली बेंगलुरू - लंडन विमानसेवा सुरू करून त्यांनी आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीत पदार्पण केले.

जननायक अण्णा हजारे

- ज. अ. रेडकर

युद्धसैनिक ते जननायक असा जीवनप्रवास करणारे श्री. किसन बाबुराव ऊर्फ अण्णा हजारे हे एकमेवाद्वितीय उदाहरण असावे. युद्धकाळात जवळच्या सहकार्‍यांचा डोळ्यांदेखत मृत्यू झाला हे त्यांच्या मनाला खूप लागले व त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला. विमनस्क अवस्थेत रेल्वे फलाटावर येरझारा घालत असताना तिथल्या बुकस्टॉलवर विवेकानंदांचे ‘राजयोग’ हे पुस्तक दिसले. ते पुस्तक वाचतानाच त्यांच्या मनातील आत्महत्येचे दुष्ट विचार पुसले गेले आणि त्याऐवजी आपले जीवन देशहितासाठी खर्च झाले पाहिजे असे नवीन विचार त्यांच्या मनात घोळू लागले.

वेरे येथे आग

Story Summary: 

आगीमुळे झालेली हानी. (छाया : शेखर वायंगणकर)

स्कूटर वीजखांबास आपटून पिता - पुत्र ठार

Story Summary: 

स्कूटरचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात

मार्ना उतरणीवर ब्रेक निकामी झाल्यानंतर स्कूटरची धडक वीजखांबाला बसून शिवदास खांडेपारकर (३७) व साईश खांडेपारकर (१३) या पिता - पुत्राचे जागीच निधन झाले तर मागे बसलेली शिवदास यांची मेहुणी मीशा रेडकर ही गंभीर जखमी झाली असून तिला गोमेकॉत दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

फर्नांडिसवाडा शिवोली येथील रहिवासी शिवदास काल आपल्या व्हेसपा स्कूटरवरून म्हापसा गेणशपुरीमार्गे शिवोलीला जात होते. त्यावेळी मार्ना येथील उतरणीवर त्याच्या स्कूटरचे ब्रेक निकामी झाले व वीज खांबाला धडक बसली.

वेरे येथे आगीत ५० लाखांचे नुकसान

Story Summary: 

वेरे येथील देसाई सॉ मिलला काल पहाटे आग लागून अंदाजे ५० लाखाचे नुकसान झाल्याचे कळते. सविस्तर वृत्त असे की वेरे येथील अरविंद देसाई यांच्या मालकीच्या देसाई सॉ मिलला काल (रविवारी) पहाटे २.३० वा. शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. वेरे-कळंगुट मार्गावर धावणार्‍या पर्यटक टॅक्सी चालकाने त्वरित म्हापसा येथील अग्नीशमन दलाला दूरध्वनी करून सांगितले.

वरिष्ठ अग्नीशमन अधिकारी दत्ताराम रेडकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी रवाना झाले. तोपर्यंत आगीने रौद्रस्वरूप धारण केले होते. आग विझविण्यासाठी घटनास्थळी दहा बंब दाखल झाले. अग्नीशमन दलाने आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. जवळ-जवळ त्यांनी २०-२५ खेपा पाण्यासाठी मारल्या. परंतु आगीने भीषण स्वरूप घेतल्याने दुपारी १२ वा.पर्यंत प्रयत्नांची शिकस्त करण्यात आली व शेवटी आग आटोक्यात आणण्यात आली.

कॉंग्रेसच्या यात्रेचा आज शुभारंभ

Story Summary: 

गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर प्रदेश कॉंग्रेसने आयोजित केलेल्या गोवा लोक समृध्दी यात्रेचा आज सकाळी १० वाजता पत्रादेवी येथे आयोजित कार्यक्रमात गोव्याचे कॉंग्रेस प्रभारी जगमित सिंग ब्रार बावटा दाखून शुभारंभ करतील, अशी माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी काल दिली.

पत्रादेवी ते पोळे दरम्यान काढण्यात येणार्‍या या यात्रेचा दि. २२ रोजी पणजी येथील आझाद मैदानवर समारोप होईल. या यात्रेस उपस्थित राहण्यासाठी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव सुधाकर रेड्डी यांचे काल संध्याकाळी आगमन झाले तर ब्रार आज सकाळी दाखल होतील. दि. १४ ते २२ नोव्हेंबर या काळात वेगवेगळ्या मतदारसंघात पक्षाच्या सभा आयोजित केल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.

इफ्फीच्या समारोप तारखेत बदल अशक्य

ख्रिस्ती बांधवांचा विरोध

इफ्फीच्या समारोप सोहळ्याच्या तारखेत यंदा बदल होणे शक्य नाही. मात्र, पुढील वर्षी तारीख बदलण्यात येणार असल्याचे उपसभापती माविन गुदिन्हो यानी काल सांगितले.

इफ्फीचा समारोप यावर्षी ३ डिसेंबर रोजी होत असून त्याच दिवशी जुने गोवे येथील फेस्त असल्याने समारोप सोहळा ३ डिसेंबरऐवजी २ डिसेंबर रोजी करण्यात यावा, अशी मागणी राज्यातील ख्रिस्ती बांधवांकडून होऊ लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर माविन गुदिन्हो यांचे मत विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

अमेरिकेने अब्दुल कलाम यांची माफी मागितली

विमानतळावरील अपमानास्पद तपासणी

भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची अमेरिकेतील विमानतळावर अपमानजनक पद्धतीने तपासणी केल्याबद्दल भारताने कडक भूमिका घेतल्यानंतर अमेरिकेने अब्दुल कलाम यांची माफी मागितली. माफीची पत्रे अमेरिकेच्या वरिष्ठ प्रशासकीय विमागातून भारत सरकार व श्री. कलाम यांना अधिकार्‍यामार्फत वैयक्तिकरित्या सुपूर्द करण्यात आली आहेत.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीत जागावाटपाचा तिढा कायम

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठका सुरू झाल्या असल्या तरी बैठकांतून जागावाटपासंबंधी अद्याप काहीही निष्पन्न झालेले नसून यासंबंधीचा निर्णय दिल्लीतच होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

१२ जागा दिल्या तरच राष्ट्रवादीची कॉंग्रेसशी युती : चव्हाण

गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला ६ जागा दिल्या होत्या. पक्षाचे कार्य आता वाढत गेल्याचे विचारात घेऊन यंदा १२ जागांची मागणी केली आहे. ही मागणी कायम राहणार असून यामध्ये कोणताही बदल होणार नाही असे पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस तसेच गोव्याच्या प्रभारी भारती चव्हाण यांनी केले.

तेलासाठी अनुदान दिल्यास महागाई वाढेल : पंतप्रधान

तेलाच्या किमतीत घट करण्यासाठी तेल कंपन्यांना अनुदान दिले तर त्याचा ताण देशाच्या आर्थिक नियोजनावर पडेल व परिणामत: महागाई आणखी वाढेल अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली. महागाई वाढण्यामागे तेलाच्या किमतीतील वाढ हे एक प्रमुख कारण असल्याचेही ते म्हणाले. देशाच्या एकूण गरजेच्या ७५ टक्के तेल पुरवठा हा देशाबाहेरून होतो व आंतरराष्ट्रीय बाजारातील तेल दरांवर अंकुश ठेवणे भारताला केवळ अशक्य आहे.

ऐतिहासिक वास्तू असलेला निमुजगा

Story Summary: 

लामगावचा हा तलाव व ऐतिहासिक वास्तू असलेला निमुजगा डिचोलीच्या आराखड्यातून गायब आहेत. (छाया : विशांत वझे)

इफ्फीचे उद्घाटन मडगावी, समारोप कला अकादमीत

Story Summary: 

पोर्तुगीज चित्रपटाने शुभारंभ

लोकांसाठी कांपाल मैदानावर चित्रपट

इफ्फीचा उद्घाटन सोहळा यंदा मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये होणार असला तरी समारोप सोहळा मात्र पूर्वीप्रमाणेच कला अकादमीत होणार असल्याची माहिती इफ्फीचे संचालक शंकरमोहन यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.

चित्रपट महोत्सव संचालनालयाकडे इफ्फीसाठी वेळ नसल्याने संचालनालयाने इफ्फीची जबाबदारी आता इफ्फी सचिवालयाकडे सोपवली असल्याचे ते म्हणाले. यापुढे इफ्फीसाठीचे कोणतेही प्रशासकीय काम चित्रपट महोत्सव संचालनालय पाहणार नसून ती जबाबदारी इफ्फी सचिवालयाची असेल व गोवा करमणूक सोसायटी त्यासाठी इफ्फी सचिवालयाला आवश्यक ती मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निमुजगा, तळी, मंदिरे, झरी, जंगल... डिचोलीच्या आराखड्यातून बरेच काही गायब

Story Summary: 

भरवस्तीत रुंद रस्ते दाखवल्याने लोक भयभीत

डिचोलीचा नियोजन आराखडा अनेक चुकांनी भरलेला असून तो त्वरित रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या आराखड्यातून १६८७ सालची ऐतिहासिक वास्तू असलेला निमुजगा तसेच अनेक नैसर्गिक तळी, झरी गायब झाल्या आहेत तसेच ‘बफर झोन’ही दाखविण्यात आलेला नाही.

डिचोलीच्या पेठांतील रस्तेही २५ मीटर दाखविले आहेत त्यामुळे घरांना धोका निर्माण होण्याची भीती लोकांना सतावत आहे.

दहशतवादाशी संबंधित खटल्यात ताबडतोब न्याय हवा : राज्यपाल

Story Summary: 

मुंबई हायकोर्टाचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव

दहशतवादाशी संबंधित खटल्यांत तातडीने निकाल यायला हवेत. अशा प्रकरणांत न्याय व्हायला उशीर लागता कामा नये. सध्या प्रसार माध्यमे अशा प्रकरणांवर मोठ्या प्रमाणात भाष्य करताना दिसून येतात. त्यामुळे दहशतवादाच्या खटल्यात उशीर झाल्यास लोकांच्या न्यायपालिकेविषयीच्या भावना बिघडू शकतात अशी भीती गोव्याचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी व्यक्त केली.

मुंबई हायकोर्टाला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या सभागृहात करण्यात आले.

नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार यांचे निधन

प्रसिद्ध नर्तक आणि मराठी चित्रपटसृष्टीतले नावाजलेले नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार यांचे काल दादर येथील निवासस्थानी प्रदीर्घ आजारानंतर वयाच्या ७६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे.

खनिजवाहू ट्रकांसाठी २५ कोटी रु. कर्ज

बसचे सुटे भाग चोरणारी टोळी फोंड्यात गजांआड

बसचे सुटे भाग व बॅटरी चोरून पळून जात असलेल्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी परवा रात्री २.३० वा. कुर्टी-फोंडा येथे मुद्देमालासह अटक केली.

केसरबाई संगीत महोत्सवाचे उद्घाटन

कला अकादमीच्या ३१व्या सूरश्री केसरबाई केरकर संगीत महोत्सवास कालपासून प्रारंभ झाला.

कला अकादमीचे अध्यक्ष तथा सभापती प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून व केसरबाईंच्या अर्धपुतळ्यास पुष्पांजली वाहून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अकादमीचे उपाध्यक्ष परेश जोशी, सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई, सूंद्रीवादक भिकाण्णा जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.

सहकार पुरस्कार जाहीर

गुरुदास सावळ, प्रतिमा धोंड आदींची निवड

गोवा राज्य सहकारी संघाने सहकार सप्ताहानिमित्त सहकार पुरस्कारांची काल घोषणा केली. काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गोवा राज्य सहकारी बँकेचे चेअरमन रामचंद्र मुळ्ये म्हणाले की, उत्कृष्ट सहकारी कार्यकर्ता म्हणून गुरुदास सावळ यांची निवड झाली आहे, तर उत्कृष्ट चेअरमन म्हणून श्रीमती प्रतिमा धोंड यांची निवड झाली आहे. उत्कृष्ट सचिव म्हणून इस्ट केपे कंझ्युमर्स को ऑपरेटिव्ह सोसायटीची निवड झाली आहे, तर मासोर्डे दूध उत्पादक सहकारी संस्था, मर्यादितला प्रशस्ती प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

जीवन सार्थकी लावण्यासाठी समाजसेवेचा वसा घ्या

डॉ. अभय बंग यांचे फोंडा येथील व्याख्यानात आवाहन

जगण्यातला उद्देश शोधण्याची गरज आहे. एकदा ‘का जगावे’ हे कळले की ‘कसे जगावे’ हेही समजेल. जीवन सार्थकी लावायचे असेल तर समाजसेवेचा वसा घ्या, असे आवाहन नामांकित सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी काल फोंडा येथे केले. गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

वेस्टर्न इंडिया कंपनीतील वाद संपुष्टात

मुरगाव बंदरातील वेस्टर्न इंडिया कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगारांविरुद्ध निलंबन आणि कारणा दाखवा नोटीस जारी केल्याने निर्माण झालेला वाद काल दुपारी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यातील झालेल्या यशस्वी चर्चेनंतर संपुष्टात आला.

सेंट्रल लायब्ररी’चा कायापालट

- समीर झांट्ये

पणजीतले आझाद मैदानानजीकचे मध्यवर्ती वाचनालय म्हणजेच ‘सेंट्रल लायब्ररी’ गोमंतकियांना खास करून ग्रंथप्रेमींना माहीत नाही असे होणे अशक्यच! सुमारे १२५ वर्षांची परंपरा लाभलेले हे वाचनालय गोवा मुक्तीपासून राज्याच्या मध्यवर्ती वाचनालयाची भूमिका बजावत आहे. हेच वाचनालय आता पाटो येथील गोवा वस्तूसंग्रहालयानजीक भव्य इमारतीत नव्या दिमाखात अवतरीत होत आहे. त्याचे नामकरण आता कृष्णदास शामा मध्यवर्ती वाचनालय करण्यात आले आहे. वाचनसंस्कृतीच्या कक्षा विस्तारताना केवळ मुद्रित साधनांपुरते स्वत:ला मर्यादित न ठेवता दृकश्राव्य तसेच अन्यमाध्यमातूनही ज्ञानाची कवाडे वाचनालय येत्या काळात खुली करणार आहे.

महिलांसाठी साहित्याची महापर्वणी

- सौ. लक्ष्मी जोग

दिवाळीची सुट्टी लागली की नंतर लगेच येणार्‍या पहिल्या रविवारी समस्त गोमंतकीय साहित्यप्रेमी भगिनींची पावले भल्या सकाळी फोंड्याच्या दिशेने चालू लागतात, त्याला आठ वर्षे झाली. मुलांच्या परीक्षा झाल्या की त्यांच्या माताही सुटकेचा नि:श्‍वास टाकतात व त्या रविवारी महिला साहित्य संमेलनाला जायचे निश्‍चित करतात. तो दिवस आपल्या आवडत्या विषयासाठी राखून ठेवतात. गोमंतकीय महिलांचा महापर्वणीचा दिवस. साहित्य मेजवानीचा दिवस! खरे आहे ना भगिनींनो? यंदा मात्र काही कारणाने म्हणा किंवा अडचणीमुळे म्हणा त्या दिवसात बदल घडतो आहे. ही मेजवानी थोडी उशिरा म्हणजे रविवार दि. १३ रोजी या दिवशी होणार आहे.

रवींद्र भवन सजले

Story Summary: 

रवींद्र भवन सजले : मडगाव येथील रवींद्र भवनाच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले असून नवी झळाळी प्राप्त झाली आहे. याच ठिकाणी यंदा इफ्फीचे उद्घाटन होत आहे. (छाया : गणादीप शेल्डेकर)

किंगफिशर एअरलाईन्सची सरकारकडे मदतयाचना

Story Summary: 

भारताची दुसरी मोठी खासगी विमान कंपनी असलेली किंगफिशर एअरलाईन्स आर्थिक पेचप्रसंगात सापडली असून त्यामुळे गेल्या काही दिवसांत त्यांना अनेक विमाने रद्द करावी लागली. प्रसंग अधिकच कठीण होत जात असल्याने विमान कंपनीने आता सरकारकडे मदतयाचना केली आहे. आपल्या कर्जांसाठी मदत करावी यासाठी कंपनीने थेट अर्थखात्याकडे संपर्क साधल्याचे कळते.

विमान उड्डाण मंत्री वायलर रवी यांनी सांगितले की, संकटात सापडलेल्या किंगफिशर विमान कंपनीसाठी सरकार बँकांकडे बोलणी करू शकते. मात्र दिवाळखोरीत गेलेल्या एअर इंडियासारखी किंगफिशर कंपनीला सूट देणे अशक्य आहे. किंगफिशरचे विजय मल्ल्या यांनी संपर्क साधल्याचेही मंत्री वायलय रवी म्हणाले. आपण याविषयावर अर्थमंत्री प्रणव मुखर्जी व तेल मंत्री जयपाल रेड्डी यांच्याशी बोलणी करणार असल्याचे ते म्हणाले.

निवडणूक आचारसंहिता काळात ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम बँकातून काढणार्‍यांवर नजर

Story Summary: 

आगामी विधानसभा निवडणुकीत पैशांच्या गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने, बँका, आयकर खाते, अबकारी खाते व पोलीस यांच्याशी ‘टायअप’ केला असून आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही व्यक्तीने बँकातून पन्नास हजार रुपये व त्याहून अधिक रक्कम काढल्यास त्यावर नजर ठेवली जाईल.

कोणत्याही ग्राहकाने बँकातून वरील रक्कम काढल्यास बँकेला त्याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागेल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या गोवा कार्यालयातील अधिकार्‍यांनी सांगितले.

टपाल खात्याच्या बचत योजनांच्या व्याजदरांत वाढ

Story Summary: 

किसान विकास पत्र बंद

देशातील अल्पबचतधारकांना दिलासा देत सरकारने काल पोस्टाच्या विविध बचत योजनांच्या व्याजदरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला. पोस्टातील बचत खाते, मासिक मिळकत योजना आणि भविष्य निर्वाह निधी योजनेच्या व्याजात ही वाढ करण्यात आली आहे. नव्या व्याजदरांची अधिसूचना लवकरच जाहीर होणार असून त्यानंतर नवे व्याजदर लागू होतील.

पोस्टाच्या बचत खात्यातील रकमेवर आधीच्या ३.५ टक्क्यांवरून ४ टक्के व्याज करण्यात आले आहे. मासिक मिळकत योजना (एमआयएस)वर आता ८.२ टक्के तर भविष्य निर्वाह निधी योजनेवर ८.६ टक्के व्याज मिळेल. सगळ्यात जास्त वाढ एक वर्ष मुदतीच्या कामम ठेवींसाठी केली आहे. या ठेवींवरील व्याज ६.२५ टक्क्यांवरून ७.७ टक्के करण्यात आले आहे.

तत्काल तिकीट आता केवळ २४ तास अगोदर

रेल्वे तिकीटवाढीचेही संकेत

‘तत्काल’ तिकीट मिळविण्याचा कालावधी दोन दिवसांवरून एक दिवस करण्यात आला आहे. काही तिकीट एजंट दोन दिवस आधी ‘तत्काल’खाली मिळणार्‍या तिकीटाचा गैरवापर करीत असल्याचे दिसून आल्याने हा बदल केल्याचे रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी म्हटले आहे. या बदलामुळे आता रेल्वे सुटायच्या नियोजित वेळेच्या आदल्या दिवशी सकाळी ८ वा. तत्काल कोटाखालील तिकीटे देणे सुरू केले जाईल. आणखी एक विशेष म्हणजे पहिले दोन तास म्हणजे ८ ते १० या वेळेत एजंट तिकीट खरेदी करू शकणार नाहीत. याशिवाय तत्काल तिकीटासाठी साक्षांकित केलेला फोटो व पात्र ओळखपत्र सादर करावे लागणार आहे.

टूजी : पहिलाच साक्षिदार पलटला

खटला सुरू

देशातील सर्वात मोठा घोटाळा समजला जात असलेल्या टूजी वितरण घोटाळ्याचा खटला कालपासून सुरु झाला. यात माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्यासह अन्य १३ मोठ मोठ्या असामींचा समावेश आहे.

दरम्यान, खटला सुरू झाला तेव्हाच ए. राजा यांच्या वकीलांनी सीबीआयच्या साक्षीदारांची उलट तपासणी घेणार नाही कारण सीबीआयने तपास अजून पूर्ण केलेला नाही असे सांगितले मात्र कोर्टाने त्यांचे हे मत फेटाळून लावले.

आता गावोगावी भरणार लोक अदालत

कायदा जागृतीसाठी मोबाईल व्हॅन

जनतेमध्ये कायदेविषयक जागृती करण्यासाठीच्या मोबाईल कोर्ट व्हॅनचे काल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहीत शहा यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

राज्याच्या वेगवेगळ्या भागांत जाऊन लोक अदालत आयोजित करणे, कायदा विषय शिबिरे घेणे यासाठी या व्हॅनचा वापर केला जाईल.

उस शेतकर्‍यांचे आंदोलन यशस्वी

महाराष्ट्र सरकारकडून मागण्या मान्य

ऊसाला रास्त भाव मिळावा यासाठी पश्चिम महाराष्ट्रातल्या हजारो शेतकर्‍यांनी गेले पाच दिवस आंदोलन पुकारले होते. शेवटी काल शुक्रवारी या आंदोलनासमोर महाराष्ट्र सरकारने झुकते घेत दरवाढीबाबत शेतकर्‍यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या.

जागतिक तापमानवाढीवर हरित तंत्रज्ञानाचा उपाय

जागतिक तापमानामुळे २१०० मध्ये पृथ्वीतलावरील तापमान २.६ डिग्री सेल्सीएस इतके वाढू शकेल व ते टाळण्याचा प्रयत्न झाल्यास त्यावर सुमारे १५ ड्रिलियन डॉलर इतका म्हणजे जगाच्या जीडीपीतील ०.५ टक्के इतका खर्च येणार असल्याचे जागतिक पर्यावरण तज्ज्ञ बजोर्न लेेंबोर्ग यांनी सांगितले.

बलात्कारी व खूनी भिकार्‍याला फाशी

२३ वर्षीय युवतीवर बलात्कार करून तिचा खून करणार्‍या भटक्या भिकार्‍याला येथील जलदगती न्यायालयाने फाशीची सजा सुनावली. गेल्या फ्रेब्रुवारीतील ही घटना केरळ राज्यात बरीच गाजली होती. काल कोर्टाने सजा सुनावताना सांगितले की, गुन्हा इतका ‘राक्षसी’ स्वरूपाचा आहे की दोषी दया दाखविण्याचा जरासुद्धा लायकीचा नाही. गोविंद छमया (३०) या मूळ तामीळनाडूतील भिकार्‍याने सौम्या (२३) नामक युवतीला रेल्वेच्या टब्यातून बाहेर ढकलून नंतर तिच्यावर बलात्कार केला व तिला मारून पसार झाला होता.

राज्यांची समस्या - जिल्ह्यांना स्वावलंबन

- प्रकाश आचरेकर, मुंडवेल - वास्को

भारतीय स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशाने काबीज केलेली राज्ये त्या राज्यांच्या हवाली करून ते भारत सोडून इंग्लंडला गेले. मग भारतीयानी सर्व राज्यांना एकत्र आणून भारताचे गणराज्य स्थापन करण्यात आले. मग प्रादेशिक भाषा व तिकडील संस्कृतीचा सर्वांगीण विकास व्हावा ह्यासाठी भाषेच्या धर्तीवर राज्यांची रचना करण्यात आली व त्या त्या प्रादेशिक भाषेला राज्यभाषेचा दर्जा देण्यात आला. ह्यासाठी त्या भागातील सर्व मांडलिक राजे एकत्र येऊन एक संस्कृती, एक भाषा ह्या धर्तीवर राज्यांची स्थापना करण्यात आली. हे करण्यापूर्वी काही राज्ये अफाट होती. उदाहरणार्थ भाषिक तुकडा गुजरातमध्ये, मधला मराठी भाषिक तुकडा महाराष्ट्रामध्ये व दक्षिणेचा कन्नड भाषिक तुकडा कर्नाटकला देण्यात आला.

दणका

गोपनीय अहवाल आधीच चव्हाट्यावर आणून ढोल पिटण्याची चटक अलीकडे वृत्तवाहिन्यांना लागली आहे. अहवालाच्या मसुद्यास अंतिम स्वरूप मिळण्यापूर्वीच अर्धकच्च्या माहितीला चव्हाट्यावर आणण्याच्या या वृत्तीमुळे संबंधित अहवालांचे गांभीर्यच हरवते याचेही भान अशावेळी ठेवले जात नाही. गोव्यातील बेकायदेशीर खनिज व्यवसायाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या न्या. शहा आयोगाचा अहवाल तयार होण्यापूर्वीच अशा रीतीने फोडला गेला आहे. बेकायदा खनिज उत्खननासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या अत्यंत गंभीर प्रश्नावरील न्या. शाह यांची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. गोव्यातील सुनावण्या त्यांनी पूर्ण केलेल्या असल्या, तरी ओरिसासारख्या इतर खाणबहुल राज्यांमध्ये ते अद्याप पोहोचलेले नाहीत. अशा स्थितीत गोव्यासंदर्भात त्यांनी नोंदवलेली कथित निरीक्षणे प्रसारमाध्यमांपर्यंत कशी पोहोचली हा प्रश्न उपस्थित होतोच. जी निरीक्षणे न्या. शाह आयोगाने नोंदवल्याचे सांगितले जाते, ती खरी असतील तर आयोगासमोर बेकायदेशीर खनिज उद्योगाचे जे भेसूर चित्र आले, त्यामुळेच त्यांनी एवढी कठोर भूमिका घेतली असे म्हणावे लागेल. राज्यातील पन्नास टक्के खाणी बेकायदेशीर असल्याचे शाह यांचे निरीक्षण असल्याचे सदर वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे. ‘बेकायदेशीर’ याची शाह आयोगाच्या दृष्टीने नेमकी व्याख्या काय, हे स्पष्ट झाल्याखेरीज त्यांना या विधानातून नेमके काय म्हणायचे आहे हे स्पष्ट होणार नाही.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नौकाविहार

Story Summary: 

वाळवंटीकाठचा नौकाविहार : काल त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त साखळी येथे दत्तमंदिरानजीक वाळवंटी नदी किनारी स्पर्धेत सहभागीसाठी आलेल्या आकर्षक नौका. (छाया : संतोष मळीक)

आराखड्यात आता बदल नाही

Story Summary: 

‘सेटलमेंट झोन’ वाढवणे अशक्य : मुख्यमंत्री

समाजाच्या प्रत्येक घटकाला विश्‍वासात घेऊनच व्यवसायिक तज्ज्ञांच्या मदतीने सरकारने २०२१ प्रादेशिक आराखडा तयार केला आहे. देशात यापूर्वी असा उपक्रम कोणीही हाती घेतला नाही. वरील आराखडा अधिसूचित झाल्याने त्यात नजरचुकीने किरकोळ त्रुटी राहिल्याचे दिसून आल्यास त्या दुरुस्त केल्या जातील, परंतु या आराखड्यात अन्य कोणताही बदल केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगतिले. काही मंत्री व आमदारांनी आराखडा रद्द करण्यासाठी केलेल्या मागणीवर त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला.

वरील आमदार मंत्री का विरोध करीत आहेत हे सांगणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. एखाद्या व्यक्तिने ‘सेटलमेंट झोन’ वाढवून देण्याची मागणी केल्यास ती पूर्ण करणे कसे शक्य आहे, असा प्रश्‍न करून सर्व घटकांना विश्‍वासात घेऊनच आराखडा तयार करण्यात आल्याचे ते म्हणाले.

गोव्यातील ५० % खाणींवर नियमांच्या उल्लंघनाचा ठपका?

Story Summary: 

न्या. शाह आयोग अहवालात उल्लेख असल्याचा वृत्तवाहिनीचा दावा

न्या. एम. बी. शहा आयोगाने गोव्याच्या खाणींविषयी अहवाल तयार केला असून तो केंद्रीय खाण मंत्रालयास लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने म्हटले आहे. या अहवालात गोव्यातील सध्या चालू असलेल्या ५० टक्के खाणींकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद केले असल्याचा दावाही वृत्तवाहिनीने केला आहे. वृत्तवाहिनी म्हणते त्याप्रमाणे, शाह आयोगाला वाटते की चीनच्या बाजारपेठेतील भरमसाठ खनिज मागणीमुळे बेकायदेशीरपणा बोकाळला आहे. त्यामुळे खाण उत्खनन व निर्यात यंत्रणा व्यवस्थित होईपर्यंत निर्यात बंद करावी असेही आयोगाला वाटते.

परवानगीपेक्षा अधिक उत्खनन करणे, पर्यावरण व वन्यजीव परवान्यांसाठी आवश्यक बाबींना धाब्यावर बसवणे अशा प्रकारचे नियमांचे उल्लंघन केल्याचा उल्लेख अहवालात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कसाबला फासावर लटकवा : पाकिस्तान

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाब हा एक दहशतवादी आहे तो कुठल्याच देशाचा होऊ शकत नाही, तो फासावर चढविण्यासच पात्र आहे, असे पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी सांगितले.

भारत - पाक संबंधांच्या ‘नव्या अध्यायाचे’ संकेत

भारत - पाकिस्तान यांच्यातील परस्पर संबंधांचा ‘नवा अध्याय’ लिहिण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काल सांगितले. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग व पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यात काल झालेल्या चर्चेवेळी पाकिस्तानने बहाल केलेला उद्योगासाठीचा खास दर्जा भारताने स्वीकारायचे ठरविले आहे. या अंतर्गत दोन्ही देशांमधील परस्पर व्यापारावरील जकात कर २०१६पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्णपणे संपुष्टात येणार आहे.

विहंगम नौकाविहाराने भारावले प्रेक्षक

वाळवंटीकाठचा त्रिपुरारी उत्सव

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त येथील विठ्ठलमंदिरानजीक वाळवंटीकिनारी आयोजित नौकानयन स्पर्धा बहारदार झाली. देशीविदेशी पर्यटकांच्या उपस्थितीत वाळवंटीच्या लखलखत्या पात्रात तरंगण्यासाठी नौका सोडल्या गेल्या आणि प्रेक्षकांच्या ताळ्यांचा कडकडाट झाला. नौकाविहाराने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

५ पैसे वाढवून देण्याची बस संघटनांची मागणी

अखिल गोवा खाजगी बस मालक संघटना वगळता राज्यातील अन्य सर्व म्हणजे पाच संघटनांनी वाहतूक खात्याकडे प्रत्येक किलोमीटरसाठी ६५ पैसे पर्यंत वाढ देण्याची मागणी केली आहे. सध्या प्रत्येक कि. मी. साठी ६० पैसे निर्धारित केले आहेत. या संघटनांनी बसगाड्यावर जाहिरातीसाठी परवाने देण्याची गरज नसल्याचे खात्याला स्पष्टपणे सांगितले आहे, असे वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी सांगितले.

मशीनद्वारे रेती उत्खननास मनाई

केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने गोव्यात नदीतून रेती उत्खनन करण्यास परवानगी दिली आहे.

मात्र नदीतून रेती उत्खनन करू इच्छीणार्‍यांना पारंपरिक पद्धतीचा अवलंब करावा लागेल. नदीतून मशीनद्वारे रेती काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

गोव्याच्या शिक्षण प्रसारातले अग्रणी ऍड. दत्ता फळदेसाई

- डॉ. जिबलो म. ना. गावकर

गोवा मुक्तीनंतरच्या पन्नास वर्षांत शिक्षण क्षेत्रात या प्रदेशाने एवढी प्रगती केली आहे, की केवळ साक्षरतेचे प्रमाण ऐशी टक्क्यांवर गेलेले नाही तर बहुतेक सर्वच क्षेत्रातले उच्च शिक्षण गोव्यात उपलब्ध आहे. पोर्तुगीज काळात मात्र पैसेवाल्या मोजक्याच आणि विशेषतः उच्चवर्गीय मुलांना गोव्याबाहेर बेळगाव, पुणे, मुंबई येथे जाऊन शिकणे शक्य होत असे. ती मुलेही बहुतेक शहरी भागातली. अशावेळी काणकोणसारख्या ग्रामीण आणि जंगलांनी वेढलेल्या प्रदेशात तर शिक्षणाची कल्पनाच करता येणे शक्य नव्हते. शाळा तर नव्हत्याच पण रस्ते आणि वाहतुकीची पुरेशी साधनेही नव्हती. तशाही परिस्थितीवर मात करीत काही विद्यार्थी दिवसातून एक दोनदा येणार्‍या कार्रेरमधून मडगावला शिकायला यायचे. काही विद्यार्थी काणकोणहून कुंकळ्ळीपर्यंत चालतही जायचे.

तृणमूलचे हसे

पेट्रोल दरवाढीविरुद्ध राणा भीमदेवी थाटाच्या गर्जना करणार्‍या तृणमूल कॉंग्रेसने अखेर शेवटच्या क्षणी शेपूट घातले. पुन्हा अशी दरवाढ झाली तर सरकारमधून बाहेर पडू असा इशारा त्यांनी आता दिलेला असला, तरी ही दरवाढ का सहन केली गेली या प्रश्नाचे उत्तर त्यांच्यापाशी नाही. लोकसभेतील आपल्या १८ सदस्यांच्या जोरावर तृणमूलने ही राजकीय दंडेलशाही चालवली असली, तरी त्यामागे जनहित किती आणि स्वतःचे वजन वाढवण्याचा प्रयत्न किती याबाबतही साशंकता आहे. जनहित नजरेसमोर असते, तर सरकारला ही दरवाढ मागे घेण्यास लावण्याइतके राजकीय बळ त्या पक्षापाशी नक्कीच आहे. परंतु केवळ ‘आम्ही मारल्यासारखे करतो, तुम्ही रडल्यासारखे करा’ असा पोरखेळ चालवून ममता बॅनर्जी यांनी राजकीय नौटंकीच चालवली. सरकारी तेल कंपन्यांचे एकंदर व्यवहार पाहिले, तर आपला सारा तोटा स्वतः किंचितही काटकसर न करता पूर्णपणे ग्राहकांच्या खिशातून वसूल करण्याची त्यांची वृत्ती स्पष्ट दिसते.

50% of mines in Goa guilty of committing irregularities, says Shah Commission, recommends nationwide ban on ore exports

NGOs dissatisfied with the draft regional plan 2021; PCF demands scrapping while GBA insists on corrections to the existing plan

पत्रकार परिषदेत बोलताना जगमितसिंग ब्रार

Story Summary: 

पत्रकार परिषदेत बोलताना जगमितसिंग ब्रार. सोबत चर्चिल आलेमाव, वालंका आलेमाव, रवी नाईक, प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, सुधारक रेड्डी, मुख्यमंत्री दिगंबर कामत, उपसभापती मावीन गुदिन्हो व विजय सरदेसाई.(छाया : गणादीप शेल्डेकर)

राष्ट्रवादी व मगोशी कॉंग्रेसची युती पक्की

Story Summary: 

जागा वाटपाबाबत सामोपचाराने निर्णय : ब्रार

गोवा विधानसभेच्या निवडणुका फेब्रुवारी वा मे २०१२ मध्ये होणार असून निवडणूक आयोग, गोवा सरकारच्या सूचनेनुसार त्या ठरवतील. पण गोव्यात आतापासून कॉंग्रेसने तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मगोशी युती कायम राहणार आहे. जागांबाबत केंद्रीय पक्षश्रेष्ठी व गोवा प्रदेश कॉंग्रेस पक्षसमित्या निर्णय घेतील. त्याबाबत चर्चेने तो निर्णय घेतला जाणार असल्याचे गोवा प्रभारी जगमितसिंग ब्रार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

बाणावली येथील ताज एक्झॉटिका हॉटेलात घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी सरचिटणीस सुधाकर रेड्डी, मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, उपसभापती माविन गुदिन्हो, बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव, गृहमंत्री रवी नाईक, सरचिटणीस विजय सरदेसाई व वालंका आलेमाव उपस्थित होत्या.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी संयुक्तपणे करणार उमेदवारांची निवड

Story Summary: 

भारती चव्हाण यांची माहिती

१२ जागांवर दावा कायम

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निवडणूकपूर्वी युतीसंबंधी काल दक्षिण गोव्यात झालेल्या बैठकीतील चर्चा सकारात्मक झाली असून चाळीस मतदारसंघातील उमेदवारांची निवड करताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांना विश्‍वासात घेऊनच ती करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या गोवा प्रभारी भारती चव्हाण यांनी दिली

आपल्या पक्षाने १२ जागांसाठी केलेला दावा कायम आहे. त्यामुळे बाराही मतदारसंघातील उमेदवारांच्या बाबतीत आढावा घेण्याचे काम चालू असून निवडणुकीनंतर सरकार स्थापन करायचे असल्याने जिंकून येण्याची क्षमता पाहूनच उमेदवार निवडण्यावर काल बैठकीत चर्चा झाली.

आराखडा रद्द करण्याची कॉंग्रेस आमदारांची मागणी

Story Summary: 

गोव्याचे कॉंग्रेस प्रभारी जगमितसिंग ब्रार व सुधाकर रेड्डी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीवेळी काही कॉंग्रेस आमदार-मंत्र्यांनी प्रादेशिक आराखडा २०२१ रद्द करण्याची मागणी केली. नव्या आराखड्यामुळे हितसंबंधांना बाधा येत असल्यानेच तो रद्द करण्याची मागणी झाल्याचे कळते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमांव, हळदोण्याचे आमदार दयानंद नार्वेकर, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील कृतीदलाने बनविलेला हा आराखडा रद्द करावा अशी मागणी केली आहे.

आज साखळीत ‘त्रिपुरारी’ची धूम

येथील दत्त मंदिरानजीक वाळवंटी नदीकिनारी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव आज होत आहे.

सकाळी पिंपळपेड येथे पूजा, संध्याकाळी ५ वा. मिरवणूक, ७ वा. विठ्ठल मंदिर परिसरात नौकांचे परीक्षण, संध्याकाळी ७.३० वा. श्रीकृष्णाचे वाळवंटी नदीच्या पात्रात प्रस्थान असा कार्यक्रम असेल. रात्री ११.३० पर्यंत चालणारा नदीच्या पात्रातील नौकांचा विहार या उत्सवाचे खास आकर्षण असते.

टॅक्सी व रिक्षाच्या भाडेवाढीस मान्यता

पेट्रोल व डिझेलच्या दरात झालेली वाढ लक्षात घेऊन सरकारने टॅक्सी, ऑटोरिक्षा व मोटरसायकल टॅक्सीच्या भाड्यात १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून सदरवाढ आज गुरुवार दि. १० पासून लागू होणार आहे.

मलेरिया सेवकांचे पुन्हा आमरण उपोषण सुरू

सेवेत कायम करण्यात चालढकल

आमरण उपोषणानंतर सेवेत कायम करण्याचे आश्‍वासन देऊनही ते पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ आरोग्य खात्यातील ६८ मलेरिया सेवकांनी कालपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले.

माझी मुलगी ‘त्या’ पदासाठी पात्र : क्रीडामंत्री आजगावकर

नियुक्ती नियमबाह्य असल्याचे सिद्ध करा

मीता आजगावकर ही आपली कन्या असली तरी क्रीडा खात्यातील ज्युनियर सायंटिफीक ऑफिसरची तिची झालेली नियुक्ती कायदेशीर असून मीता त्या पदासाठी पात्र असल्याचे क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

भाषणबाजीने भ्रष्टाचार मिटणार नाही

सोनियांचा टोला

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या आरोपांना टाळत आलेल्या यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपले मौन काल सोडले. भ्रष्टाचार केवळ भाषणबाजी करून मिटू शकत नाही असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे अण्णांना लगावला.

जुवारी पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज

सार्वजनिक बांधकाम खात्याचे सरकारला पत्र

जुवारी पूल मोडकळीस आलेला असून त्याची दुरुस्ती करण्याचे काम हाती घ्यावे, अशी सूचना करणारे एक पत्र सार्वजनिक बांधकाम खात्याने सरकारला पाठवले असल्याचे खात्यातील सूत्रांनी काल सांगितले.

सरदारपुरा जळीतकांड; ३१ जणांना जन्मठेप

गोध्रा जळीतकांडानंतर उसळलेल्या दंगलीवेळी सरदारपुरा येथे अल्पसंख्य समुदायाच्या ३३ लोकांना जीवंत जाळल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने काल ३१ जणांना जन्मठेप सुनावली. याप्रकरणी ११ जणांना पुराव्यांअभावी व ३१ जणांना संशयाचा फायदा देऊन असे एकूण ४२ जणांना कोर्टाने मुक्त केले.

दीप दान आनंद स्वरूपी : त्रिपुरारी पौर्णिमा

- रमेश सावईकर

‘त्रिपुरारी पौर्णिमा’ हा उत्सव भारतात आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा संबोधले आहे. या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या दैत्याच्या नाश करून त्याने तयार केलेली तीन नगरे (त्रिपुरी) उद्ध्वस्त केली. देवादिकांना नामोहरम करून सोडणार्‍या त्रिपुरासूराचा वध केल्याचा आनंद दिवे लावून व प्रज्वलित दीप नदीच्या पाण्यात सोडून (दीपदान) व्यक्त करण्यात आला. तेव्हापासून त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले.

आदर्श आराखडा

बेसुमार वाहने, वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्येने ग्रस्त झालेल्या राजधानी पणजीची वाहतुकीची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने चार्ल्स कुरैया फाऊंडेशनच्या तज्ज्ञांनी अनेक मौलिक सूचना महापालिकेला केल्या आहेत. अर्थात, या सूचनांवर सर्व संबंधित घटकांकडून चर्चा होणे, आवश्यक त्या यंत्रणांची त्यांना मान्यता मिळणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जवाहरलाल नेहरू शहरी पुनर्निर्माण योजनेखाली या नियोजित आराखड्यासाठी निधी उपलब्ध होणे अशा अनेक अडथळ्यांना पार करूनच या कल्पनांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. ही सर्व प्रक्रिया कालापव्यय करणारी असली, तरी पणजी शहराच्या मूलभूत अशा समस्येचे निराकरण भविष्यवेधी दृष्टिकोन बाळगून करणारी ही योजना असल्याने ती जास्तीत जास्त निर्दोष होण्यासाठी त्यावर सखोल विचारमंथन व्हायलाच हवे. अनेक घटकांचे हितसंबंधही या योजनेमध्ये गुंतलेले असतील, ज्यांचा विरोध होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे सर्व मत-मतांतरांमधून मार्ग काढून सुवर्णमध्य गाठणे आवश्यक ठरणार आहे. चार्ल्स कुरैया फाऊंडेशनने केलेल्या काही सूचना लक्षणीय आहेत.

मडगाव मोर्चा

Story Summary: 

मडगावात मोर्चात सहभागी झालेले कामगार. (छाया : गणादीप शेल्डेकर)

महागाईविरोधात पणजी-मडगावात कामगारांचा महामोर्चा

Story Summary: 

३ हजार जणांनी करून घेतली अटक

इंधन दरवाढ मागे घ्यावी तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणावेत या मागणीसाठी गोवा कामगार महासंघाच्या झेंड्याखाली सुमारे ४ हजार कामगारांनी पणजी शहरातून भव्य मोर्चा काढला. यावेळी सुमारे ३ हजार कामगारांनी स्वतःला अटक करून घेतली. मडगावातही मोर्चा काढण्यात आला.

आयटक, इन्टक, भारतीय मजदूर संघ, हिंद मजदूर सभा, अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना, वीज कर्मचारी संघटना, अखिल गोवा पंचायत कर्मचारी संघटना, अखिल गोवा नगरपालिका कर्मचारी संघटना, सरकारी कर्मचारी समन्वय समिती संघटना व गोवा राज्य कामगार महासंघ यांनी यावेळी सरकारच्या कामगार व लोकविरोधी धोरणांचा निषेध केला.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी युतीचा निर्णय आज शक्य

Story Summary: 

ब्रार, रेड्डी, भारती चव्हाण दाखल

अ. भा. कॉंग्रेस सरचिटणीस तथा गोव्याचे कॉंग्रेस प्रभारी जगमितसिंग ब्रार व सचिव सुधाकर रेड्डी यांचे काल संध्याकाळी गोव्यात आगमन झाले असून आज कॉंग्रेस व राष्ट्रवादीची युती संबंधीची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी गोव्याच्या प्रभारी भारती चव्हाण यांचेही आगमन झाले आहे.

आजच्या बैठकीत युतीसंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे. उपसभापती माविन गुदिन्हो यांनी परवा राष्ट्रवादीला फक्त सात जागा देण्यास तयार असल्याचे विधान केले आहे.

बाबू आजगावकर यांच्या मुलीची क्रीडा खात्यात नियुक्ती नियमबाह्य

Story Summary: 

अधिकारांचा गैरवापर करीत असल्याचा भाजपचा आरोप

सर्व नियम धाब्यावर बसवून क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी आपली कन्या मीता आजगावकर हिच्यासाठी क्रीडा खात्यात तयार केलेले ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर पद रद्द करण्याची जोरदार मागणी भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी काल पत्रकार परिषदेत केली.

वरील प्रकारामुळे क्रीडा खात्यातील ज्येष्ठ अधिकार्‍यांवरही अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या एप्रिल महिन्यात नियमांचे उल्लंघन करून वरील पद तयार केले होते. क्रीडा खात्यात अशा पदांची गरज का भासली, याचीही चौकशी करण्याची मागणी आर्लेकर यांनी केली आहे.

पुन्हा दरवाढ झाल्यास यूपीएतून बाहेर पडू : ममता

तेलाच्या आणि स्वयंपाक गॅसच्या किमतीत पुन्हा वाढ केली गेली तर यूपीए सरकारमधून बाहेर पडणार असल्याचे यूपीएचा मोठा घटकपक्ष असलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

कदंबांची राजधानी चांदरमधील प्राचीन अवशेष उपेक्षित स्थितीत

सर्वत्र गवत वाढलेले, उत्खनन पुन्हा मातीखाली

गोव्याच्या पोर्तुगीजपूर्व इतिहासाचा धांदोळा घेतला तर भोज आणि कदंब राजवंशांची राजधानी असलेल्या चंद्रपूरचे किंवा आजच्या चांदोरचे महत्त्व कळून चुकते. याच चांदरमध्ये फादर हेरास यांनी मौलिक संशोधन करून गोव्याच्या कदंबकाळाच्या सुवर्णयुगाची ओळख जगाला घडवली. मात्र, कदंबकालीन अवशेषांकडे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या अधिकार्‍यांनी आज पूर्णपणे दुर्लक्ष केले असून तेथील उत्खननाच्या ठिकाणी पूर्णपणे वाताहत झाली आहे. चांदोरमधील प्राचीन शिवमंदिराच्या ठिकाणी सर्वत्र गवत वाढले असून उत्खनन करून वर आणलेले पाषाणी अवशेष पुन्हा मातीखाली गाडले गेले आहेत.

दिंडी उत्साहात

‘ज्ञानबा तुकाराम’, ‘जय जय विठ्ठल रखुमाई’च्या जयघोषात श्री हरिमंदिरातील दिंडीने मडगाव शहरात आसमंत भक्तीमय वातावरणाने भरून गेला.

यानिमित्त काल सायंकाळी ७ वाजता श्री हरिमंदिराबाहेर प्रख्यात गायक रामदास कामत, नीलाक्षी पेंढारकर व आनंद भाटे यांच्या भक्तीगीत व भावगीतांची मैफल झाली. शेकडो भाविकांनी श्रीचे दर्शन घेतले.

१५०००: सचिनच्या विक्रमात आणखी एक मैलाचा दगड

आपल्या क्रिकेट कारकिर्दीत शानदार खेळीने नवनवीन विक्रम प्रस्थापित करीत आलेल्या भारतीयांच्या लाडक्या सचिनने काल विक्रमांचा आणखी एक टप्पा पार केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात १५ हजार धावा पार करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

पणजीत फ्लॅट फोडून ६.५० लाखांचे दागिने चोरले

सांतइनेज, पणजी येथील मॉडेल्स एक्झोटिक या इमारतीतील आपला ७/टी-१ क्रमांकाचा फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यानी ५० हजार रु. रोख व सोन्याच्या बांगड्या, बाजूबंद, मास्कत, कर्णफुले, सोनसाखळ्या, सोन्याची नाणी, हिर्‍यांचा सेट, असे साडेसहा लाख रु.चे दागिने लांबवल्याची तक्रार आदित्य गुरुदास कामत बांबोळकर यांनी पणजी पोलिसात नोंदवली आहे.

थिंक! थिंक!! थिंक, ’बाबा’, थिंक....!!!

- दिलीप बोरकर

गेले काही दिवस गोव्यात बांबोळीतील एका तारांकित हॉटेलात ‘तेहेलका’ ने ‘थिंक फेस्टीव्हल’चे आयोजन केले होते. देश-विदेशातील प्रसिद्धीमूल्य असलेल्या कित्येक व्यक्ती सदर फेस्टीव्हलला आवर्जुन उपस्थित होत्या, अथवा त्यांना आवर्जुन आमंत्रित करण्यात आले असावे. चार-पाच दिवस चाललेल्या या महोत्सवात वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावलेल्या प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींची उपस्थिती होती, त्यात चित्रपट कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, साहित्यिक, राजकारणी, विचारवंत, उद्योजक यांचा भरणा होता. ज्यांच्या अवतीभवती ‘ग्लॅमर’चे वलय सतत फिरत असते, अशा लोकांची ही उपस्थिती झगमगाटात दिसत होती.

अक्षम्य अनास्था

ज्या राजवटीने गोव्याला सुवर्णकाळ प्राप्त करून दिला, त्या कदंबांच्या पाऊलखुणा इतिहास आणि पुरातत्त्व या विषयी आज दिसणार्‍या सार्वत्रिक अनास्थेतून हळूहळू मिटत चालल्या आहेत. राज्यातील इतिहासप्रेमींसाठी ही वार्ता कटु असली तरी सत्य आहे. इसवी सनाच्या तिसर्‍या व चौथ्या शतकापासून अगती अकराव्या - बाराव्या शतकापर्यंत भोज आणि कदंब राजवंशाची राजधानी म्हणून दिमाखाने मिरवणार्‍या चंद्रपूर म्हणजे आजच्या चांदरमधील त्यांच्या पाऊलखुणा आज अत्यंत उपेक्षित स्थितीत आहेत. ज्या ठिकाणी उत्खनन केल्यावर इतिहासाचे जिगसॉ कोडे जुळवणारी मौलिक साधने मिळाली, त्या गावातील महत्त्वपूर्ण ठिकाणी, म्हणजे ‘कोटा’त सर्वत्र गवत वाढले आहे. उत्खननात आढळलेले अत्यंत प्राचीन शिवमंदिराचे अवशेष पुन्हा मातीखाली गाडले गेले आहेत. तेथील कित्येक शतकांपूर्वीच्या समृद्ध संस्कृतीची आठवण जागवीत उभा आहे तो कधीकाळी बाटवाबाटवीच्या धुमश्चक्रीत मस्तक फोडला गेलेला भव्य दगडी नंदी आणि इतिहासातील त्या स्थानाचे पावित्र्य आणि महत्त्व अधोरेखित करणारा पुरातत्त्व खात्याचा निर्जीव फलक. स्थानिक भाविकांमध्ये मात्र त्या पवित्र स्थानाविषयीची श्रद्धा पोर्तुगिजांनी केलेल्या जुलमांनंतरही टिकून आहे आणि आजही तेथे भक्तिभावाने त्या एकमेव खुणेभोवती म्हणजे तेथील नंदीभोवती पणत्या लावल्या जातात, फुले वाहिली जातात.

योगमार्ग - राजयोग (सत्य - २६)

- डॉ. सीताकांत घाणेकर

जगाकडे चौफेर नजर फिरवली तर लक्षात येते की असत्य सत्यावर विजय मिळवीत आहे. ह्याची कारणे अनेक आहेत. मुख्य कारण म्हणजे नियमित सत्याच्या मार्गाने जाण्याची इच्छा ठेवणारे त्या मानाने थोडेच असतात. त्यातील जे जाऊ इच्छितात त्यांना तेवढे धैर्य, सामर्थ्य नसते. ते सहसा एकत्र येत नाहीत. तर काही वेळा त्यांची बुद्धी भ्रष्ट होते व ते कळत-नकळतच असत्य, अधर्माच्या मार्गाने जातात.

पोरीच्या जातीत का जन्मलीस...?

- प्रा. रमेश सप्रे

पा चवीसाठी मुलांना प्रवेश देण्याचं काम सुरू होतं. दरवाजा ढकलून एक मध्यमवयीन इसम आत शिरला. त्याच्या आधी आत शिरला तो दारूचा दर्प... ओकारी आली. त्याला म्हटलं, ‘तुम्ही बाहेरच थांबा. आम्ही तुमच्या मुलीशीच बोलतो.’ त्याच्यामागून डोकावणारी एक चटपटीत, चुणचुणीत मुलगी लक्षात आली. तिचा बाप लडखडत बाहेर गेला. जाताना तिच्या पाठीत एक धपाटा मारून, शिवी देऊन दरडावून गेला, ‘सही सही जवाब देना|’ तिची देहबोली एखाद्या घाबरलेल्या कोकरासारखी कावरीबावरी...सर्वत्र भिरभिरत होती.

तुलसी विवाह कार्यक्रम

Story Summary: 

काल संपन्न झालेल्या तुलसी विवाह कार्यक्रमावेळी जोडव्या पेटविण्यात सहभागी सुहासिनी. (छाया : अनंत मांजरेकर)

विमानतळासाठीच्या जमिनीची अधिसूचना मागे घेण्यात घोटाळा

Story Summary: 

भाजपचा आरोप

दाबोळी विमानतळाच्या विस्तारासाठी अधिसूचित केलेल्या सर्वे क्र. ४/१, ४१/१ व १६२/१ मधील ३६८०० चौ. मीटर जमिनीची अधिसूचना मागे घेण्यात घोटाळा असून यात मुख्यमंत्री दिगंबर कामत, महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा, उपसभापती माविन गुदिन्हो, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजप अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल पत्रकार परिषदेत केला.

याबाबत रेईश मागुस येथील एक नागरिक ऍडविन फर्नांडिस यांनी वास्को पोलिसात एफ्‌आयआर् नोंद केली असल्याचे ते म्हणाले.

जमीन मालक बेर्नाद डिकॉस्टा यांच्याशी संगनमत करून सार्वजनिक कामासाठी काढण्यात आलेली अधिसूचना रद्द केल्याचा आरोप पार्सेकर यांनी केला.

फोंड्यात खून उघडकीस

Story Summary: 

चोरीचा आळ कारणीभूत

वरचा बाजार येथे एका खोलीत दि. २ रोजी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून त्याच्या मित्राला काल अटक केल्यानंतर त्यानेच खून केल्याचे उघड झाले आहे.

मयताचे नाव भिमा एडीगर (४०) असून तो गुलबर्गा कर्नाटक येथील आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव केदार असनवर (४७) असून तो खानापूर कर्नाटक येथील आहे. पैशांच्या देवाण घेवाणीतून हा खून झाल्याचा संशय आहे. पोलीस आरोपीला आज कोर्टात सादर करून रिमांड घेणार असल्याचे सांगण्यात आले.

कॉंग्रेस स्वबळावर निवडणूक लढविण्यास सक्षम : मावीन

Story Summary: 

कुणाशीही युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवून बहुमत मिळवण्यास कॉंग्रेस पक्ष सक्षम असल्याचा पुनरुच्चार पक्षाचे प्रवक्ते, उपसभापती व कुठ्ठाळी मतदारसंघाचे आमदार माविन गुदिन्हो यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला.

तीन-चार जागा जिंकण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने १०-१२ जागांची मागणी करणे हे योग्य नसल्याचे ते म्हणाले. मात्र, युती करायची की नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार असल्याचे ते म्हणाले. धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या लोकांच्या मतांची विभागणी होऊ नये यासाठी युती होणे आवश्यक आहे असे जर पक्षश्रेष्ठींना वाटत असेल तर युतीचे स्वागतच करावे लागेल, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.

तिकीट दरवाढीस भाजपचा विरोध

बस तिकीट दरवाढ करण्यापूर्वी कॉंग्रेस सरकारने आम आमदमीचा विचार करायला हवा होता अशी टीका काल भाजपचे प्रदेश अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यानी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली.

कॉंग्रेसची अट राणे व आलेमांवना लागू नाही

एकाच कुटुंबातील दोघा जणांना तिकीट द्यायचे नाही हे कॉंग्रेस पक्षाचे धोरण असले तरी येणार्‍या निवडणुकीत सभापती प्रतापसिंह राणे व त्यांचे पुत्र व आरोग्यमंत्री विश्वजित राणे तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमांव व त्यांचे बंधू असलेले मच्छीमारीमंत्री ज्योकीम आलेमांव या द्वयींना कॉंग्रेस पक्षातर्फे उमेदवारी देण्यात येणार असल्याचे कॉंग्रेस प्रवक्ते माविन गुदिन्हो यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

गुळे येथे ट्रकाखाली सापडून दोघे ठार

क्रिकेटचा खेळ संपवून घरी परतत असताना गुळे येथे एका लोखंड वाहक ट्रकाखाली सापडून गोकुल्डे येथील अशोक गावकर याचे जागीच तर त्यांचा शेजारी असलेल्या अंकेश गावकर या बालकाचे इस्पितळात निधन होण्याची घटना ६ रोजी रात्री घडली. या अपघातातील बिंदेश उर्फ कमलेश गावकर याला जखमी अवस्थेत इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

तृणमूल कॉंग्रेसचे खासदार आज पंतप्रधानांना भेटणार

पेट्रोल दरवाढीबाबत नाराजी

पेट्रोल दरवाढीनंतर केंद्रातील सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिल्यानंतर तृणमूल कॉंग्रेसचे खासदार या प्रश्‍नावर आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, केंद्र सरकारनेही उद्याच पश्‍चिम बंगालच्या आर्थिक स्थितीवर चर्चेसाठी बैठक ठेवली आहे. ही बैठक कोलकाता येथे राजभवनवर केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात होईल. यामुळे श्रीमती बॅनर्जी पंतप्रधानांच्या भेटीसाठी येणार्‍या शिष्टमंडळात नसतील.

फुकुशिमासारखा अपघात तामीळनाडूत टाळता येईल

अब्दुल कलाम यांचे मत

सध्या विरोध सुरू असलेल्या कुडनकुलम येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पात फुकूशिमासारखा अपघात टाळता येईल असे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी काल सुरक्षा उपायांकडे निर्देश करीत सांगितले.

त्रिपुरारी पौर्णिमेची जय्यत तयारी

स्पर्धेसाठी नौका सज्ज

प्रतिपंढरपूर म्हणून श्रद्धा असलेल्या विठ्ठलापूर साखळी येथी श्री विठ्ठल मंदिरासमोरील वाळवंटी नदीकिनारी साजर्‍या होणार्‍या त्रिपुरारी पौर्णिमेला मोठी परंपरा लाभली आहे. दीपावली उत्सव समिती, विठ्ठलापूर, कला संस्कृती संचालनालय, पर्यटन विकास महामंडळ यांनी या उत्सवास झळाळी आणली आहे.

गाभा समितीची फेररचना होणार

अण्णांची माहिती

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या गाभा समितीची फेररचना करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी केला सांगितले. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांच्या प्रतिनिधींना सामावून घेण्यासाठी हा बदल करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

मोर्ले येथे बसला अपघात

पर्ये सत्तरी येथे बस आणि खडीवाहू ट्रक यांच्या अपघात होऊन तीन बसप्रवासी जखमी झाले.

काल सकाळी ७.५० वा. विर्डी दोडामार्ग येथून होंडा येथे कंपनीच्या कर्मचार्‍यांना घेऊन बस जात असताना पर्ये येथील वळणावर समोरून येणार्‍या भरधाव वेगातील ट्रकाची धडक बसला बसली.

आल्मेदा हायस्कूल : एक उज्ज्वल यशोगाथा

- सतीश दत्ताराम दळवी, पराग हाउसिंग को - ऑपरेटीव्ह सोसायटी, शांतीनगर, फोंडा

दि. २ ऑक्टोबर २०११ या दिवशी गोवा विद्याप्रसारक मंडळ आणि ए. जे. दी आल्मेदा विद्यालय, फोंडा यांना शंभर वर्षे पूर्ण झाली. शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या एका संस्थेला आणि त्यांनी चालवलेल्या शाळेला शंभर वर्षे पूर्ण होणे, ते सुद्धा शंभर वर्षांत सहा पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा, पाच माध्यमिक शाळा, एक उच्च माध्यमिक आणि दोन महाविद्यालये एवढा मोठा वृक्ष तयार करणे, त्यांना गोव्यातच नव्हे तर देशात व देशाबाहेरही मानाचे स्थान प्राप्त करून देणे हे संस्थाचालक व त्यात काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना भूषणावह आहे.

युवराज येत आहेत...

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची छबी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या या कार्यकाळात कधी नव्हे एवढी काळवंडली असल्याने भावी पंतप्रधान कोण या प्रश्नाने राजकीय वर्तुळात उचल खाल्लेली दिसते. कॉंग्रेसचे वाचाळ प्रवक्ते द्गिविजयसिंह यांनी त्याचे उत्तर देऊनही टाकले. ‘राहुल गांधी यांनी मुख्य प्रवाहात यावे’ अशी जोरदार मागणी त्यांनी नुकतीच केली. राहुल यांनी ‘भाग्यविधाते’बनावे अशी आरतीही त्यांनी ओवाळली. राहुल यांना खरोखरच कॉंग्रेसच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हालचालींनी दिल्लीत वेग घेतला आहे अशा बातम्या थडकत आहेत. पक्षाची आणि सरकारची प्रतिमा सावरण्यासाठी राहुल हा हुकुमी एक्का ठरेल असे राजकीय निरीक्षकांना वाटते आणि त्यामुळे त्यांना आपल्या आईकडून पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यास राजी करण्याची धडपड सुरू झाली आहे. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी आपल्या मंत्रिमंडळात देऊ केलेले स्थान नाकारून राहुल यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडे स्वतःचे लक्ष केंद्रित केले होते. त्यांच्याकडे जी युवक कॉंग्रेस आणि एनएसयूआयची जबाबदारी पक्षाने सोपवली, ती व्यवस्थित पेलत त्यांनी युवक कॉंग्रेसच्या निवडणूक प्रक्रियेत शिस्त आणि पारदर्शकता आणून वाहवा मिळवली. त्यामुळे आता त्यांच्याकडे पक्षाची महत्त्वाची जबाबदारी सोपवायला काही हरकत नाही असे ढोल पिटायला बडव्यांनी सुरूवात केली आहे.

थिंकफेंस्टमध्ये आमीर खानचे किस्से

Story Summary: 

आमीर खानशी संवाद साधताना तरूण तेजपाल

मुख्यमंत्री बंगल्यावरील युतीसंबंधी बैठकीत मगोला निमंत्रण नाही

Story Summary: 

युतीविषयी चर्चेसाठी मगोची १९ रोजी बैठक

युतीच्या प्रश्‍नावर निर्णय घेण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक दि. ९ रोजी सकाळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या आल्तिनो येथील निवासस्थानी होणार आहे. या बैठकीचे मगोला अद्याप निमंत्रण मिळाले नसल्याचे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाकडे युती करावी, यावर विचारविनीमय करण्यासाठी १९ नोव्हेंबर रोजी मगोच्या केंद्रीय समितीची बैठक होणार असल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली.

‘तारे जमीन पर’ प्रदर्शित करू नये असा सर्वांचा सल्ला होता

Story Summary: 

थिंकफेंस्टमध्ये ङ्गचाकोरीबाहेरफच्या आमीर खानचे किस्से

चाकोरीबाहेरचे चित्रपट देऊन प्रत्येकवेळी काहीतरी वेगळे दाखवण्याचा प्रयत्न आमीर खानने केल्याने तो हल्लीच्या वर्षात सातत्याने चर्चेत राहिला. विशेष म्हणजे सहसा कोण जवळ करीत नाही अशा विषयांची निवड करूनही प्रेक्षक आवर्जून त्याच्या चित्रपटांना येत असतात. थिंकफेस्टमध्ये आमीरच्या या ‘वेगळेपणा’विषयी तरुण तेजपाल यांनी त्याच्याशी संवाद साधला.

यावेळी आमीरने आपल्या चित्रपटांविषयी अनेक किस्से सांगितले.

‘लगान’वेळी तो चालणार नसल्याची खात्री ठेवावी असे आपणास सर्वजण पटविण्याचा प्रयत्न करीत होते. ‘तारे जमीन पर’ तयार झाला व काही निकटवर्तीय मित्रांना दाखवला तेव्हा तर त्यांनी ‘हा काय माहितीपट बनवलास’ अशी टिप्पणी करून चित्रपट प्रदर्शित करण्याच्या भानगडीत पडून नकोस असा सल्ला दिला होता, असे आमीर म्हणाला. मात्र हेच चित्रपट जेव्हा चालतात तेव्हा आपणास ‘दिग्दर्शनात लुडबुड करणारा’ म्हणून नाव ठेवले जाते.

म्हादई अभयारण्यात शस्त्रे जप्त; दोघे ताब्यात

Story Summary: 

म्हादई अभयारण्याच्या क्षेत्रात वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी गेल्याप्रकरणी दोघांना वन खात्याच्या अधिकार्‍यांनी शिताफीने ताब्यात घेण्यात यश मिळविले असून त्यांच्याकडून बंदुक, सुरे व इतर शस्त्रे ताब्यात घेण्यात आली असल्याचे वन खात्याचे अधिकारी विश्‍वास चोडणकर यांनी सांगितले.

‘टीम’च्या चौकशीसाठी अण्णा स्थापणार समिती

निवृत्त न्यायमूर्तींना विनंती करणार

टीम अण्णामधील महत्त्वाच्या सदस्यांवर आरोप वाढू लागल्याची दखल आता खुद्द अण्णा हजारे यांनी घेतली असून यासंबंधी चौकशीसाठी येत्या पंधरा दिवसांत एक समिती स्थापन केली जाणार आहे. चौकशी करण्याचे काम स्वीकारावे यासाठी निवृत्त न्यायमूर्तींना विनंती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. निवृत्त न्यायमूर्तींनी समितीवर यावे याचे निमंत्रण देण्याची जबाबदारी प्रशांत भूषण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

तिकीट दरवाढीमुळे‘कदंब’ पेचात

खाजगी बस मालकांनी प्रवाशांकडून जुन्या दरातच तिकीट आकारण्याचे चालू केल्याने त्याचा कदंब महामंडळावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दिंडीवेळी मडगावचे पेट्रोल पंप बंद ठेवण्याचे आदेश

उद्याच्या दिंडीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था

मडगाव येथील हरिमंदिरातील दिंडी उत्सवाच्यावेळी सुरक्षेसाठी मिरवणुकीच्या वेळी मडगाव बाजारातील पाच पेट्रोल पंप बंद ठेवण्याच्या आदेश जिल्हाधिकारी संदीप जॅकिस यांनी दिला आहे.

मध्यवर्ती वाचनालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन १९ डिसेंबरला

पंतप्रधानांना निमंत्रित करणार

पाटो प्लाझा येथे उभारण्यात आलेल्या आधुनिक सुविधापूर्ण अशा मद्यवर्ती ग्रंथालयाच्या प्रकल्पाचे काम जवळजवळ पूर्ण होत आले असून येत्या १९ डिसेंबर या गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सव दिनी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्याची सरकारने तयारी केली आहे.

विद्युत दाहिनीचा प्रस्ताव शीतपेटीत

परवडणारा नसल्याचे मत

नगर विकास प्रशासनाने सांतइनेज स्मशानभूमीत विद्युत दाहिनी उभारण्याच्या प्रस्तावावर अभ्यास सुरू केला असला तरी महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येचा विचार केल्यास विद्युत दाहिनी प्रकल्प उभारणे कठीण असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

४१ ‘बालरथां’चे लवकरच वितरण

समाज कल्याण खात्याने इंदिराबालरथ योजनेखाली अतिरिक्त ४१ नव्या बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच वरीलबस गाड्या अनुदानप्राप्त विद्यालयांना वितरीत करणार असल्याची माहिती खात्याचे उपसंचालक सांतान फर्नांडिस यांनी दिली.

नायजेरियात रक्तपात

‘थिंकफेस्ट २०११’

Story Summary: 

शेखर सिंग, अरविंद केजरीवाल, शोमा चौधरी.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी युतीबाबत मंगळवारी बैठक

Story Summary: 

आगामी विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेस-राष्ट्रवादी युतीसंबंधीची बैठक मंगळवार दि. ९ रोजी सकाळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या आल्तिनो येथील निवासस्थानी होणार असून राष्ट्रवादीतर्फे चर्चा करण्यासाठी गोव्याच्या प्रभारी भारती चव्हाण दि. ८ रोजी गोव्यात येणार आहेत.

दरम्यान, अ. भा. कॉंग्रेस सरचिटणीस तथा गोव्याचे प्रभारी जगमितसिंग ब्रार व राष्ट्रीय सचिव सुधाकर रेड्डी उद्या दि. ७ रोजी रात्री गोव्यात येणार आहेत. युती संबंधीचीही दुसर्‍या फेरीतील बैठक असून या बैठकीत राष्ट्रवादी १२ जागांसाठी दावा करण्याची शक्यता आहे. सरकारला प्रत्येक निर्णयात राष्ट्रवादीला विश्‍वासात घेतलेच पाहिजे, या मुद्यावर तडजोड न करण्याचे राष्ट्रवादीने ठरविले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस कामत सरकारचा घटक आहे, असे असतानाही कॉंग्रेसने राष्ट्रवादीला विशेष महत्त्व दिले नाही, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भावना आहे.

जनतेच्या अपेक्षांमुळे जबाबदारी वाढलीय : केजरीवाल

Story Summary: 

‘अण्णांपेक्षा देश मोठा’ हे मान्य

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने जनतेच्या अपेक्षा जागवल्या आहेत. लोक या चळवळीकडे आशेने पाहात आहेत, साहजिकच आमच्या खांद्यावरील जबाबदारी वाढली आहे, अशी कबुली अण्णांचे सहकारी व माहिती हक्क चळवळीतील अग्रणी अरविंद केजरीवाल यांनी काल ‘थिंकफेस्ट २०११’ या वैचारिक महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलात आयोजित कार्यक्रमात दिली.

‘तहलका’ आणि ‘न्यूजवीक’ या दोन नामांकित नियतकालिकांनी आयोजित केलेल्या ‘थिंकफेस्ट २०११’च्या दुसर्‍या दिवशीही काल विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मांदियाळी सहभागी झाली होती. नोबेल विजेते लीमा गोबी, अमेरिकेचे टॉम फ्रीडमन, अण्णा हजारे यांचे सहकारी अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, जम्मू व काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, अभिनेता अभय देओल, अशा अनेकांनी विविध सत्रांमधून आपले विचार मांडले.

मालेगाव स्फोट प्रकरण : सर्व नऊ आरोपींना जामीन मंजूर

Story Summary: 

सन २००६ साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व नऊ आरोपींना काल शनिवारी जामीन मिळाला. या प्रकरणाचा तपास करणार्‍या राष्ट्रीय तपास संस्थेने ठोस पुरावे नसल्याने जामीनास विरोध केला नाही. मात्र, मुंबईत सात जुलै रोजी झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोटांतील आरोपी असलेला महंमद अली आणि आसिफ खान हे दोघे तुरुंगातच राहतील. इतर सर्वांची मंगळवारी सुटका होऊ शकेल.

सन २००६ बॉम्बस्फोट प्रकरणी सुनावणी करणार्‍या मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयात आरोपींच्या जामीन अर्जास आपला विरोध नसल्याचे एनआयएच्या वकिलांनी सांगितले. मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झालेल्या स्वामी असीमानंद याने सदर स्फोटात उजव्या शक्तींचा हात असल्याची कबुली दिल्याने महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने तसेच सीबीआयने पूर्वी गोळा केलेल्या पुराव्यांची पडताळणी करणार असल्याचे एनआयएच्या वतीने न्यायालयास सांगण्यात आले.

विख्यात गायक भूपेन हजारिका यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

ख्यातनाम गायक व दिग्दर्शक डॉ. भूपेन हजारिका यांचे काल मुंबईत कोकिळाबेन इस्पितळात निधन झाले. ते गेल्या २९ जूनपासून सदर इस्पितळात उपचार घेत होते. ‘रुदाली’ सारख्या चित्रपटाचे त्यांचे संगीत अजरामर झाले आहे.

सरकारने दिलेल्या तिकीट दरवाढीच्या अंमलबजावणीस बसमालकांचा नकार

वाहतूक खात्याने जारी केलेल्या १५ टक्के बसभाडेवाढीच्या अधिसूचनेचे पालन न करता पूर्वीच्या दरातच प्रवाशांना सेवा देण्याचा निर्णय अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेने घेतला आहे. संघटनेच्या काल झालेल्या बैठकीनंतर संघटनेचा सदस्यांनी काल येथील आझाद मैदानावर वरील अधिसूचनेची होळी केली.

गांधीजींच्या विचारांतच देशाचे हित आहे : सिब्बल

मडगावात पुरुषोत्तम काकोडकर स्मृती व्याख्यान

एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाने जगात एकमेकांशी तात्काळ संपर्क साधता येतो. संगणकाच्या आजच्या युगात भरीव प्रगती साधली गेलेली असली, तरी महात्मा गांधीजींचे विचार व तत्त्वज्ञान, शांती, अहिंसा, सत्याचा मार्ग अवलंबिल्यासच देशाचे हित आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी काल मडगावात व्यक्त केले.

इन्स्टिट्यूट मिनेझिसच्या नूतनीकरणात पोलीस खात्याचा अडथळा

ट्रान्स्फॉर्मर बसवण्यास हरकत

इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझाच्या वातानुकुलीत यंत्रणेचा ट्रान्स्फॉर्मर बसविण्यास पोलीस खात्याने अडथळा आणल्याने वातानुकुलीत यंत्रणा सुरू करण्यास अडचण निर्माण झाली आहे. संस्थेच्या अधिकार्‍यांनी वरील विषय मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यापर्यंत नेला आहे.

‘शुद्ध हेतू नि शुद्ध आहार’युक्त योजनेची गरज!

- रमेश सावईकर

शालेय विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या माध्यान्ह आहार योजनेत सुधारणा करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा व सकस-पौष्टिक आहार पुरविण्यात येईल असे सरकारने आश्‍वासन दिले आहे. गरीब विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार दिल्याने त्यांच्या कुटूंबियावरचा आर्थिक खर्चाचा भार कमी होईल नि गरीब विद्यार्थी शाळेत येण्यास आकर्षित होतील असा हेतू ठेवून ही योजना सरकारने लागू केली. शिक्षणाचा प्रसार वाढावा, सुशिक्षिताचे प्रमाण ग्रामीण भागात वाढावे म्हणून सरकारने विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह आहार योजना लागू करून कार्यवाही सुरू केली.

ईशान्येचा कंठमणी

गेले जवळजवळ अर्धशतक ईशान्य भारताचे कंठमणी ठरलेले गायक - संगीतकार भूपेन हजारिका यांची प्राणज्योत अखेर शनिवारी मालवली. ईशान्य भारताचा हा सांस्कृतिक राजदूत अभिमानाने पूर्वांचलाच्या आदिम संस्कृतीचा वारसा अभिमानाने मिरवीत आपल्या गीत - संगीतातून जगापुढे मांडत आला होता. ब्रह्मपुत्रेच्या शांत, संथ प्रवाहाची गूढ खोली त्यांच्या आवाजात जन्मतःच होती. तो आवाज एकदा कानी पडला की विस्मृतीत जाणे सर्वथा अशक्य आहे. ‘रुदाली’ तले ‘दिल हूँ हूँ करे’ भूपेनदांच्या प्रतिभेची साक्ष द्यायला पुरेसे आहे. एक गायक, संगीतकार म्हणूनच नव्हे, तर गीतकार, कंपोजर, निर्माते, अभिनेता अशा सर्व अंगांनी स्वतःच्या अजोड प्रतिभेचा ठसा उमटवणार्‍या या अवलियाने ईशान्य आणि पूर्व भारताचे संगीत आणि चित्रपटजगत समृद्ध करून ठेवले आहे. ते मूळचे आसामी असले, तरी बंगाली जनतेमध्ये तितकेच प्रिय होते. अगदी बांगलादेशमध्येही त्यांचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. ईशान्येकडील राज्यांचे निसर्गसौंदर्य, तेथील जीवनाची अकृत्रिमता, निर्मळता त्यांच्या गीत - संगीतामध्ये दृगोच्चर होते.

हाय-टेक रथातला एक तास...

- प्रमोद आचार्य

आता त्याला ‘रथ’ म्हणणं धाडसाचं ठरेल.

संपूर्ण वातानुकूलित कोच. फ्लॅट स्क्रीन टीव्ही, व्हीसीडी प्लेयर, म्युझिक सिस्टम, टॉयलेट, पॅन्ट्री आणि उपलब्ध असलेलं प्रत्येक उपकरण चालवण्यासाठी दरेका सीटपाशी अत्याधुनिक कंट्रोल पॅनल.

भारतीय जनता पक्षाचे पुढारी लालकृष्ण अडवाणींच्या जनचेतना यात्रेच्या रथात चढण्याचा आम्हाला मान मिळाला आणि आतमधील वातावरण बघून आम्ही थक्क झालो.

‘‘काय हाय-टेक आहे याच्यात... सगळं साधंसुधं आहे... तुम्हीही हलताय, मीही हलतोय, तुमचा कॅमेरामनही हलतोय... मग कसलं आलंय हाय-टेक?’’ चढताक्षणीच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते रविशंकर प्रसादांशी वाद सुरू झाला.

भक्तिसुगंधाची वारी कार्तिकी एकादशी

- सौ. पौर्णिमा केरकर

वाटबा दुलबा राणे मोर्लेकर हे नित्यनेमाप्रमाणे पंढरपूरला जायचे. त्यांच्या सोबत विठ्ठलभक्त असायचे. कालांतराने शरीर वृद्धत्वाकडे झुकले. शेकडो मैलाचा प्रवास करून पंढरपुरी येणे शक्य होईनासे झाले. भाविक मनात म्हणाला, ‘देवा ही बहुधा शेवटची भेट आणि शेवटची वारी’ त्याबरोबर विठ्ठलाने आपल्या परमप्रिय भक्ताला आपणास नेण्यास दृष्टांत दिला. पंढरपूरचा विठ्ठल, रुक्मिणी, सत्यभामा विठ्ठलापूरचे आराध्य दैवत बनले. आषाढी - कार्तिकी एकादशीला जाणार्‍या भाविकाच्या हाकेसरशी श्रीविठ्ठल पंढरपूरहून कारापूराला आला.

निवेदक गोविंद भगत

- आर. बी. फडते

गेल्या दहा - पंधरा वर्षात गोव्यातील हौशी रंगभूमीवरील नाटके कमी झाली. एका गावात जत्रा, कालोत्सव, शिमगोत्सवाच्या निमित्ताने कमीत कमी आठदहा नाटके व्हायची. त्यांची संख्या कमालीची घटली आहे. त्याची कारणेही अनेक आहेत. या नाटकांच्या जागी दोन तासांची निखळ मनोरंजन करणारी कोकणी नाटके, ऑर्केस्ट्रा तसेच एखाद्या आकर्षक शीर्षकाखाली भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीतांचा समावेश असलेले वेगवेगळे सुगम संगीताचे कार्यक्रम होऊ लागले आहेत. प्रस्थापित संगीतकारांच्या बरोबरीने अनेक तरुण संगीतकारांनी मराठी चित्रपटांना एका वेगळ्या धर्तीचे संगीत दिलेल्या गीतांनी अफाट लोकप्रियता मिळवलेली आहे. हे संगीतकार तसेच गायक अधूनमधून आपले अल्बमही प्रकाशित करत असतात. या चित्रपटांतील तसेच अल्बममधील उत्तमोत्तम भावगीते, भक्तिगीते, दूरदर्शनवरील सारेगमपसारख्या रिएलटी शोमधून रसिक श्रोत्यांच्या कानावर नेहमी पडत असतात. शंभरी उलटली तरी मराठी अभिजात संगीत नाटकातील पदांची मोहिनी प्रेक्षकांवर आजही कायम आहे. आर्थिक सुबत्ता आल्यामुळे आज गोव्यात ठिकठिकाणी देवालयांचा जीर्णोद्धार होऊ लागला आहे.

‘थिंकफेस्ट २०११’

Story Summary: 

एका चर्चासत्रावेळी राम जेठमलानी, शोमा चौधरी, बेनअमी.

कामत सरकार बरखास्त करूनच खाण घोटाळ्याची चौकशी करा

Story Summary: 

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची मागणी

खनिज घोटाळ्यात गुंतलेले राजकारणी सत्तेवर असताना न्यायमूर्ती एम. बी. शहा आयोगाला योग्य पध्दतीने या प्रकरणाची चौकशी करणे शक्यच नाही. त्यामुळे केंद्र सरकारने मुख्यमंत्री दिगंबर कामत सरकार त्वरित बरखास्त करून चौकशी सुरू करावी, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काल पत्रकार परिषदेत केली. येत्या संसदेच्या अधिवेशनात गोव्यातील कॉंग्रेस सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

गोव्यात ४४ बेकायदेशीर खाणी असून करोडो रुपयांच्या खनिजाची बेकायदेशीरपणे निर्यात केली आहे. केंद्रीय खाण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक, नगरविकासमंत्री ज्योकी आलेमांव, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर, आमदार शाम सातार्डेकर, प्रताप गावस यांचा थेट संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रपतीनाही यासंबंधीचे निवेदन सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

‘थिंकफेस्ट २०११’ : आगळ्यावेगळ्या वैचारिक पर्वणीस गोव्यात प्रारंभ

Story Summary: 

नोबेल आणि पुलित्झर विजेत्यांची मांदियाळी दाखल; वैचारिक अग्निहोत्र प्रज्वलित

‘तहलका’ आणि ‘न्यूजवीक’ या दोन नियतकालिकांनी आयोजित केलेला ‘गोवा थिंकफेस्ट २०११’ हा वैचारिक महोत्सव काल अनेक नामांकित वक्त्यांच्या मांदियाळीनिशी ‘ग्रँड हयात’ मध्ये सुरू झाला. लायबेरियाचे नोबेल शांती पुसस्कार विजेते लीमा बोवी, नोबेल विजेते सर व्ही. एस. नायपॉल, ओंकोलॉजिस्ट सिद्धार्थ मुखर्जी, जयराम रमेश, शशी थरूर, कपील सिब्बल, भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी, अभिनेता आमीर खान, अरविंद केजरीवाल, सॅम पित्रोदा, सुधीर ककर, अभिनेता अभय देओल असे असंख्य मान्यवर या महोत्सवात कालपासून तीन दिवस सहभागी होत आहेत.

कालच्या पहिल्या दिवशी ‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांच्या बीजभाषणाने या महोत्सवाची सुरूवात झाली. विविध सत्रांतून व्यापक वैचारिक मंथन होताना पाहण्याची अपूर्व संधी गोमंतकीयांना लाभली आहे.

५० रुपयांवरून खून

Story Summary: 

इग्रामळ-केपे येथील प्रकार उघडकीस

केवळ ५० रुपयांसाठी झालेल्या बाचाबाचीतून खून करण्याची घटना इग्रामळ केपे येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महादेव लक्ष्मण चौगुले (४०) यास अटक केली. त्याने खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

मयत रामा पाटील (५०) मूळ अथनी महाराष्ट्र व महादेव चौगुले मूळ मंगळवेढा सोलापूर हे दोघे मजूर एका कंत्राटदाराकडे कामाला होते. त्यांनी गुरुवार दि. ३ नोव्हेंबर रोजी कंत्राटदाराकडून रु.५०० घेतले होते. त्यातील रु.३००चे सामान व दारु विकत घेतली. राहिलेल्या २०० रुपयांतील १५० रु. रामा पाटीलने स्वत:कडे ठेवले व ५० रु. महादेवाच्या हातावर ठेवले. महादेवने दोघांमध्ये प्रत्येकी १०० रु. वाटून घेण्याची मागणी केली मात्र रामाने नकार दिला. त्यावरून दोघांत वाद होऊन महादेवने रामाच्या डोक्यावर दंडुका घालून खून केला व मृतदेह राहत्या खोलीपासून दूर नेऊन टाकला.

लोकायुक्त विधेयक राज्यपालांकडे

गोवा विधानसभेच्या गेल्या अधिवेशनात संमत केलेल्या लोकायुक्त विधेयकास मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मान्यता दिली असून ते पुढील सोपस्करांसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात आले आहे.

‘आधार’असेल तरच गॅस सिलिंडर मिळणार

यापुढे आधार कार्ड क्रमांक नसलेल्यांना एलपीजी गॅस सिलिंडर उपलब्ध होणार नाही. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार येथील नागरी पुरवठा खात्याने अधिसूचना जारी करून पुढील तीन महिन्यांच्या आत आधार कार्ड क्रमांक संबंधित गॅस विक्रेत्या संस्थेकडे नोंद करण्याचे आवाहन केले आहे.

जहाजाचे अपहरण आणि कारवाईचा थरार...

‘मिरामार परिसरातील खोल समुद्रात एम. व्ही. मिरामार जहाजाचे आठ दहशतवाद्यांकडून अपहरण’ वृत्त मिळताच तटरक्षक दल, नौदल आणि पोलिसांची धावपळ. जहाज ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखण्यास आरंभ..... इतक्यात दहशतवाद्यांचा वाटाघाटीसाठी फोन शेवटी कारवाईनंतर दुपारी १२ वाजता तटरक्षक दलाचा अपह्रत जहाजावर ताबा.

तेल दरवाढ : मित्रपक्ष यूपीएवर नाराज

सातत्याने होत असलेल्या तेलदरवाढीवर आता केंद्रातील यूपीए सरकारमधील घटक पक्षांना चिंता होऊ लागली आहे.

यूपीएतील दुसरा सर्वात मोठा यूतीपक्ष असलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी तर या प्रश्‍नावर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा काल दिला. नॅशनल कॉन्फरन्स आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही तेल दरवाढीचा फेरविचार व्हावा अशी मागणी केली आहे. खुद्द कॉंग्रेस पक्षानेही घटक पक्षांच्या भावनांचा विचार व्हावा असा सल्ला सरकारला दिला आहे.

रत्नाकर मतकरींचा सार्थ सन्मान

- दीपक विष्णू ङ्गडके, आंबेगाळ- पाळी- गोवा

विष्णूदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक. १८४३ साली त्यांनी ‘सीतास्वयंवर’ हे नाटक सर्वप्रथम रंगमंचावर आणले. अशा या मराठी रंगभूमीचा पितामह असलेल्याच्या नावे सांगली येथील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने दरवर्षी प्रतिष्ठेचा विष्णूदास भावे गौरव पदक ज्येष्ठ रंगकर्मीला ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनी देण्यात येते. आजपर्यंत रंगभूमीची विविध माध्यमांद्वारे सेवा बजावलेल्यांना हे मौल्यवान पदक लाभले. त्यात बालगंधर्व, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे आदींचा समावेश आहे. अगदी अलीकडचेच सांगायचे झाल्यास रामदास कामत, सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर, नाटककार शं.ना. नवरे आदींना भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. यंदा तो मान सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक तथा रंगकर्मी रत्नाकर रामकृष्ण मतकरी यांच्या वाट्याला आला आहे.

पणजीकरांना दिलासा

पाणीपुरवठ्यापासून पार्किंगपर्यंत आणि वाहतूक कोंडीपासून कचर्‍याच्या विल्हेवाटीपर्यंत असंख्य समस्यांनी ग्रासलेल्या गोव्याच्या राजधानी पणजीच्या पाणी समस्येच्या निराकरणासाठी अखेर केंद्राने १६८ कोटी मंजूर केले आहेत. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण योजना या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेखाली पणजी महापालिकेला पाण्याच्या समस्येच्या सोडवणुकीसाठी हा निधी मिळणार आहे. अर्थात, केवळ निधी मंजूर होणे आणि तो मिळणे पुरेसे नसते. कागदावरची कामे प्रत्यक्षात साकारणे महत्त्वाचे असते. या बाबतीतही ही कामे प्रत्यक्षात वेग घेतील आणि पणजीकरांची पाण्याची ददात कायमची मिटेल अशी आशा करूया. पणजी महानगरपालिकेने सदर योजनेखाली विकासकामे करण्यासाठी आजवर अनेक प्रस्ताव केंद्राला दिले. परंतु गेली तीन वर्षे केंद्र सरकारने महापालिकेच्या तोंडाला पानेच पुसली. शेवटी एकदाचा एक प्रकल्प मंजूर झाला. आता शहराची पाणी समस्या सोडवायची म्हणजे अगदी ओपा पाणी प्रकल्पात केवळ पणजीला पाणीपुरवठा करणारा स्वतंत्र प्रकल्प उभारण्यापासून तेथून पणजीपर्यंत मोठ्या क्षमतेची जलवाहिनी टाकण्यापर्यंत आणि खुद्द पणजी शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलून त्या नव्या घालण्यापर्यंत, अधिक क्षमतेच्या नव्या टाक्या उभारण्यापर्यंत असंख्य कामे करावी लागणार आहेत.

भाजप शिष्टमंडळ

Story Summary: 

राष्ट्रपतींना भेटायला गेलेले भाजप शिष्टमंडळ : डावीकडून गोविंद पर्वतकर, श्रीपाद नाईक, वासुदेव गावकर, नितीन गडकरी, मनोहर पर्रीकर, फ्रान्सिस डिसोझा, आरती मेहरा, लक्ष्मीकांत पार्सेकर.

पाकिस्तानी क्रिकेटपटूंना कारावास

Story Summary: 

स्पॉट फिक्सिंग

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पाकिस्तानी क्रिकेटपटूंना येथील साऊथवॉर्क क्राऊन कोर्टाने कारावास सुनावला. माजी पाकिस्तानी कर्णधार सलमान बट्ट याला अडीच वर्षे, द्रुतगती गोलंदाज मोहंमद असिफ याला एका वर्ष, १९वर्षीय मोहंमद अमिर याला सहा महिने तुरुंगवास सुनावण्यात आला. फिक्सिंग करणारा दलाल मझर मजीद याला सगळ्यात जास्त दोन वर्षे आठ महिने तुरुंगवास सुनावण्यात आला. फिक्सिंग प्रकरणात कारावास झालेले हे क्रिकेट इतिहासातील पहिलेच खेळाडू ठरले आहेत.

फिक्सिंग प्रकरणाचा खटला साऊथवॉर्क क्राऊन कोर्टात तीन आठवडे झाला. चौघांनाही अपिल करण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, अमिरला कारागृहात न ठेवता युवा गुन्हेगारांच्या केंद्रात ठेवण्यात येणार आहे.

‘सागर कवच’ कवायती सुरू

Story Summary: 

नाकाबंदी, वाहन तपासणी; तीन दिवस चालणार

सागरी सुरक्षेसाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काल भारतीय तटरक्षक दल व नाविक दलाने काल ‘सागर कवच’ सुरक्षा कवायतीला प्रारंभ केला. ही मोहिम पुढील तीन दिवस चालणार असल्याचे सांगण्यात आले. तटरक्षक दल, नौदलाच्या बोटी व विमानांनी या कवायतींत भाग घेतला होता. सागरी सुरक्षेचा आढावा घेण्याासाठी अशा कवायती आखण्यात येतात असे सूत्रांनी सांगितले.

सागरी मार्गाने दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करू शकतात असे दिसून आल्याने सुरक्षेची तयारी म्हणून अशी मोहीम राबवली जाते. सागरी सुरक्षा सांभाळणार्‍या वेगवेगळ्या संस्थांना अशावेळी एकामेकाशी समन्वय साधून काम करण्याची संधी मिळते. गेल्या मे महिन्यामध्येही अशा कवायती घेण्यात आल्या होत्या. दरम्यान, कवायतींचा भाग म्हणून राज्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली.

खाण घोटाळ्याबाबत भाजपचे राष्ट्रपतींना साकडे

Story Summary: 

चौकशीचे आदेश देण्याची विनंती

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली काल गोव्यातील भाजप नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन गोव्यातील २५ हजार कोटींच्या खाण घोटाळा चौकशीसाठी विशेष चौकशी पथकाकडे अथवा सीबीआयकडे देण्याचे निर्देश केंद्राला द्यावेत, तसेच या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी पथक स्थापन करावे व यात दोषी असलेल्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना करावी, अशी मागणी केली. भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

याप्रकरणी काल दुपारी १२ वा. राष्ट्रपतींची भेट घेतलेल्या शिष्टमंडळामध्ये भाजपच्या गोवा प्रभारी आरती मेहरा, भाजपचे गोवा अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्तर गोवा खासदार व ज्येष्ठ भाजप नेते श्रीपाद नाईक, विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर, आमदार फ्रान्सिस डिसोझा, वासू मेंग गावकर, भाजपचे सरचिटणीस गोविंद पर्वतकर व भाजपचे राष्ट्रीय सचिव किरीट सोमय्या तसेच राज्य सरचिटणीस नरेंद्र सावईकर, कोषाध्यक्ष संजीव देसाई यांचा समावेश असल्याचे आर्लेकर यांनी सांगितले.

युतीबाबत अद्याप निर्णय नाही : शिरोडकर

काल झालेल्या कॉंग्रेस आमदार व पक्ष कार्यकारिणी यांच्या संयुक्त बैठकीत काहींनी आगामी विधानसभा निवडणुकीत अन्य पक्षांबरोबर युती करण्याचा तर काहींनी युती न करण्याची मते व्यक्त केली. असे असले तरी पक्षाने अद्याप कोणत्याही पक्षाबरोबर युती करण्याचा निर्णय घेतलेला नाही. डिसेंबर पर्यंत निर्णय होऊ शकेल, असे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

१४ नोव्हेंबरपासून कॉंग्रेसची पदयात्रा

गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्याच्या मुक्तीसाठी देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू व अन्य स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या योगदानाची दखल म्हणून दि. १४ नोव्हेंबर पासून ९ डिसेंबरपर्यंत ३० मतदारसंघातून यात्रा काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

टूजी घोटाळा प्रकरण : कनिमोझीसह सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले

११ नोव्हेंबरपासून सुनावणी सुरू

टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी व द्रमुकच्या नेत्या कनिमोझी यांच्यासह सर्व आठ आरोपींचे जामीन अर्ज काल विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळून लावले. येत्या ११ नोव्हेंबरपासून या खटल्याची पुढील सुनावणी सुरू होईल असेही न्यायमूर्तींनी जाहीर केले. जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्तींनी तीन कारणे दिली. ‘‘केलेला गुन्हा जाणूनबुजून केलेला गुन्हा आहे, आर्थिक स्वरूपाचा गुन्हा आहे आणि अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे’’ असे मत न्यायमूर्ती ओ. पी. सैनी यांनी जामीन अर्जावर निवाडा देताना व्यक्त केले.

पेट्रोल महागले

तेल कंपन्यांनी काल मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या किमतीत रु. १.८० पैशे वाढ केली. रुपयाचे मूल्य घसरल्याने कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे ही वाढ केली असल्याचे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे. या वाढीनंतर दिल्लीत आता पेट्रोल रु. ६८.६४ प्रति लि. दराने मिळणार आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा कमी काळात झालेली ही दुसरी वाढ आहे. महागाईचा दर आधीच भरमसाठ वाढलेला असताना ही वाढ करण्यात आली आहे.

पणजीत मिळणार २४ तास पाणी

मतदारच जबाबदार आहेत

- कॅजिटन परेरा, म्हापसा

आता जनआंदोलनाचे चित्र स्पष्ट झाले आहे. अण्णा हजारेंच्या चळवळीबद्दल सरकारला आस्था राहिलेली नाही. लोकांची नाराजी नको म्हणून कधीतरी सरकार लोकपाल विधेयक मंजूर करील. परंतु, अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकार्‍यांना अपेक्षित असलेले ‘लोकपाल’ असणे असंभव! त्यातही अण्णा टीमचा हेतू एका विशिष्ट राजकीय पक्षाला पराभूत करणे हा असेल तर तो पक्ष अण्णांना हवा तेवढा मजबूत कायदा का आणील? समजा, अण्णांना हवे तसे कडक लोकपाल विधेयक मंजूर करण्यात आले तर, सरकार आणि सर्व राजकीय पक्ष ‘गाढव’ आहेत असाच त्याचा अर्थ होईल. घटनाबाह्य असलेल्या संस्थांचे ऐकून कायदा मंजूर करण्याची आपली रीत नाही. कोणीतरी लोकांचा एक ‘गट’ सरकारला नमवून त्यांना हवा तसा कायदा करीत असेल तर संसदेची आवश्यकताच संपून जाते. भ्रष्टाचार अतिप्रमाणात वाढत आहे हे सर्वच राजकीय पक्षांनी मनोमन मान्य केल्यामुळे लोकपालाचा कायदा हवा हा विचार बहुतेक राजकीय पक्षांनी अण्णांशी बोलताना मान्य केला आहे. लोकपाल नावाच्या एका उच्चाधिकार्‍याच्या कह्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सर्व मंत्री, राज्यपाल आणि न्यायाधीश आणून त्यांच्यावर कारवाई करावयाची अशी लोकपाल विधेयकाची रचना असेल तर, वरील सर्व घटनात्मक संस्था आणि व्यक्ती त्वरित मोडीत काढाव्या लागतील. न्यायालयेही असा कायदा आवाहन केल्यास फेटाळून लावतील.

प्रतिमा सुधारा

गोव्याचा पर्यटन हंगाम सुरू झालेला असल्याने लक्षावधी पर्यटकांची पावले आता गोव्याकडे वळत आहेत. या पार्श्वभूमीवर बागा - कळंगूट येथे पर्यटक विद्यार्थ्यांना पोलिसांनीच लुटण्याचा जो काही प्रकार घडला, तो गोव्याची आणि आपल्या पोलीस दलाची नाचक्की करणारा आहे. पोलिसांकडून यापूर्वी सरेआम अमली पदार्थांची विक्री झाली, अधिकार्‍यांची ड्रग माफियांशी हातमिळवणी उजेडात आली, पकडलेल्या तरुणीवर पोलीस स्थानकात लैंगिक अत्याचार झाले, असहाय्य विवाहितेवर बलात्कार झाला, अजून पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगणारे काय काय प्रकार करायचे बाकी आहेत? हे सगळे एवढे सातत्याने घडते आहे की अनुशासन नावाचा प्रकार राज्याच्या पोलीस दलात अस्तित्वातच नाही की काय असा प्रश्न पडतो. गृहमंत्री रवी नाईक हे मुख्यमंत्री असताना गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरले होते. गुंडपुंडांच्या संघटना मोडीत काढून, बड्या गुन्हेगारांना ‘आत’ टाकून, मवाल्यांचे केस भादरून पोलीस दलाचा एक दरारा राज्यात निर्माण करण्यात त्यांना यश आले होते याची आठवण आजही गोव्याची जनता काढते.

हुतात्मांना श्रद्धांजली

Story Summary: 

लालकृष्ण अडवाणी यांनी काल आझाद मैेदानावर जाऊन हुतात्मांना श्रद्धांजली वाहिली. (छाया : नंदेश कांबळी)

कांदोळीत कुख्यात गुन्हेगारांची टोळी गजांआड

Story Summary: 

कर्नाटकात १५०पेक्षा जास्त गुन्हे दाखल

गेल्या वर्षभरापासून गोव्यात वास्तव्य

बंगलोर व गोवा पोलिसांची कारवाई

बंगलोर पोलिसांनी कळंगुट पोलिसांच्या सहकार्याने काल सुझावाडा - कांदोळी येथून सहा जणांच्या टोळीला ताब्यात घेऊन अटक केली. कर्नाटकातील विविध पोलीस स्थानकांवर त्यांच्याविरुद्ध १५० हून अधिक गुन्हे नोंद असल्याचे सांगण्यात आले.

चोर्‍या, दरोडे व तोतया पोलीस बनून लुटल्याप्रकरणी ते हवे होते. पकडलेले सर्वजण इराणी असून भारतात ते मुंबई येथील रहिवासी आहेत. गेल्या वर्षभरापासून ते आपल्या परिवारासोबत कांदोळी येथे राहत असल्याचे उघड झाले आहे.

पर्यटक विद्यार्थ्यांना गोव्यात पोलिसांनीच लुटले

Story Summary: 

बागा येथील प्रकार; वरिष्ठांकडे तक्रार दाखल

दोघे पोलीस निलंबित

दिवाळीच्या सुटीत गोव्यात सहलीवर आलेल्या बंगलोरच्या काही मुलांना बागा बीचवर पोलिसांनीच लुटण्याची घटना घडली असून या घटनेची तक्रार केली तर गुन्हा नोंदवून कोठडीत डांबण्याची धमकी आपल्याला दिली गेली असे या मुलांचे म्हणणे आहे. दरम्यान या प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आल्याचे कळते.

बंगलोर येथील हनीम मोईद्दिन आणि त्याचे काही मित्र गेल्या २८ ऑक्टोबर रोजी गोव्यात आले होते. बागा येथील एका हॉटमलमध्ये ते राहिले व रात्री चांदण्यात फिरायला बाहेर पडले होते. आपल्याजवळ सिगारेट किंवा दारू असे काहीही नव्हते, तरी पोलिसांनी वाटेत अडवले. आमच्याजवळ काही आढळून न आल्याने त्यांनी पैशांची मागणी केली.

भारतीयांचा विदेशी बँकांतील काळा पैसा ग्रामीण विकासासाठी गुंतवा : अडवाणी

Story Summary: 

वेगवेगळ्या आर्थिक घोटाळ्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. भारतीयांचे सुमारे २५ लाख कोटी रुपये विदेशी बँकांमध्ये असून हा पैसा ग्रामीण भारतात गुंतविला गेला पाहिजे, त्यासाठी आपला पक्ष प्रयत्न करीत असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी काल पणजीत पत्रकार परिषदेत सांगितले.

या देशातील एकही गांव, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण सुविधेविना असता कामा नये, वरील पैसा या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्याचे आवाहन अडवाणी यांनी केले. आपल्या जनचेतना यात्रेतील हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे ते म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्यापासून आजवरचे विद्यमान सरकार हे सर्वाधिक भ्रष्ट सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘भ्रष्टाचार आटोक्यात येण्यासाठी वेळीच आवाज उठविण्याची गरज’

गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या चर्चासत्रातील सूर

स्वच्छ चारित्र्याच्या व निष्कलंक लोकांना निवडून दिले व भ्रष्टाचार झाल्यास त्याविरुद्ध लोकांनी जर वेळीच आवाज उठवला तसेच भ्रष्टाचाराला थारा द्यायचा नाही असे ठरवले तर भ्रष्टाचार आटोक्यात येण्यास वेळ लागणार नसल्याचे मत काल गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रिजने काल येथे ‘भ्रष्टाचार व आतंकवाद’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना वक्त्यांनी व्यक्त केले.

काही लोक पोर्तुगीज संस्कृती गोव्यावर लादत आहेत : भेंब्रे

युगांक व राजदीप यांना अस्मिताय पुरस्कार

पोर्तुगीजांनी गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य करून येथील जनतेवर अत्याचार केला. आज तेच लोक आपली संस्कृती गोव्यावर पुन्हा लादू पहात आहेत त्यास स्वाभिमानशुन्य लोक मदत करीत आहेत ही चिंतेची बाब असल्याचे अस्मिताय प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. उदय भेंब्रे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सरकारवरही टीका केली.

इंधन पुरवठा सुरळीत

सर्रास बजावले जाणारे काही ‘जन्मसिद्ध हक्क’!

- डॉ. राजीव कामत, खोर्ली - म्हापसा.

काही वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांनी ‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळविणारच’’ अशी घोषणा करून ती खरीही करून दाखविली होती. त्यानंतर आम्हाला स्वराज्य मिळाले खरे, पण त्या स्वराज्याच्या जोरावर अनेकांनी आपले वेगवेगळे जन्मसिद्ध हक्क प्रस्थापित करून त्याची कार्यवाही आपल्या दैनंदिन जीवनातून करायला प्रारंभ केला आहे. आणि हे हक्क बजावताना त्यांना कोणी आडकाठी आणली तर हे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. वानगीदाखल मी पुढील काही स्वयंघोषित जन्मसिद्ध हक्क आपणापुढे ठेवीत आहे -

युरोपवरचे कृष्णमेघ

तीन वर्षांपूर्वी आर्थिक संकटाने अमेरिका हादरली आणि आता ग्रीस देशाच्या दिवाळखोरीने युरोपीय अर्थव्यवस्थेवर संकटांचे ढग पसरू लागले आहेत. त्याचा परिणाम म्हणून भारतासह जगभरातील शेअर बाजारांवर काल परिणाम दिसून आला. ग्रीसला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी युरोपीय संघाच्या १७ राष्ट्रांनी एकत्र येऊन १०० अब्ज युरोची मदत जाहीर केलेली असताना ग्रीसचे पंतप्रधान जॉर्ज पापांद्रू यांनी ही मदत स्वीकारण्याआधी जनमत कौल आजमावण्याची घोषणा केल्याचा हा परिणाम आहे. ग्रीस देशाची आर्थिक स्थिती गेली काही वर्षे बिकट आहे हे जगजाहीर आहे. पापांद्रू दोन वर्षांपूर्वी तेथे सत्तेवर आले, तेव्हा त्या आधीच्या सरकारने जाहीर केलेली सहा टक्के आर्थिक तूट प्रत्यक्षात त्याच्या दुप्पट असल्याचे त्यांना आढळून आले होते. या वर्षअखेर तर ग्रीसची आर्थिक तूट ही राष्ट्रीय उत्पन्नाच्या १६० टक्के असणार आहे. ३५७ अब्ज युरोंचे कर्ज ग्रीसच्या डोक्यावर आहे. गेली तीन वर्षे सतत पंधरा टक्के आर्थिक तूट त्या देशाला सोसावी लागली आहे. तेव्हापासून ग्रीसला सावरण्यासाठी युरोपीय संघ प्रयत्नशील आहे.

लालकृष्ण अडवाणी

Story Summary: 

कुडचडे येथील जाहीर सभेत बोलताना लालकृष्ण अडवाणी. (छाया : गणादीप शेल्डेकर)

भ्रष्टाचारामुळे देश पिछाडीवर : अडवाणी

Story Summary: 

म्हापसा येथील जाहीर सभेत व्यक्त केली खंत

देश आर्थिकरित्या प्रगती करीत असल्याचे केंद्रातील कॉंग्रेसप्रणित सरकारकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात भ्रष्टाचारामुळे देश पिछाडीवर जात असल्याची खंत लालकृष्ण अडवाणी यांनी म्हापसा येथील जाहीर सभेत व्यक्त केली.

जनचेतना यात्रेंतर्गत श्री. अडवाणी गोव्यात आले असून काल संध्याकाळी म्हापसा टॅक्सी स्टँडवर त्यांची जाहीर सभा झाली. देशाची समृद्धी भ्रष्टाचार निर्मुलनातूनच होऊ शकते असे सांगून प्रत्येकाने लाच न देण्याचा व लाच न घेण्याचा संकल्प करावा असे आवाहन त्यांनी केले.

पेट्रोल पुन्हा महागणार

Story Summary: 

तेल कंपन्यांना प्रति लिटर १ रू. ८२ पैशांचा तोटा

पेट्रोलच्या दरांत लिटरमागे पाच रुपयांची दरवाढ करून दोन महिने उलटायच्या आतच पुन्हा एकदा पेट्रोलियम कंपन्यांनी सरकारपुढे आणखी दरवाढ करायचा धोशा लावला असून पेट्रोलच्या दरात लिटरमागे १ रूपया ८२ पैशांची वाढ करावी अशी त्यांची मागणी आहे. रुपयाचे अवमूल्यन आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाचे वाढलेले दर यामुळे ही दरवाढ आवश्यक असल्याचे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे. या पंधरवड्यातच दरवाढ केली जाईल असे सूतोवाचही तेल कंपन्यांनी केले आहे.

‘‘आजपासून पेट्रोलवर आम्हाला वाढीव तोटा सोसावा लागत आहे. तो भरून काढण्यासाठी आम्हाला दरवाढ करणे भाग आहे’’ असे हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपनीचे आर्थिक संचालक बी. मुखर्जी यांनी काल पत्रकारांना सांगितले.

इंधनवाहू जहाजे मुरगाव बंदरात

Story Summary: 

पुरवठा आजपासून सुरळीत होण्याची आशा

राज्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर आपण आयओसी, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल कंपन्या तसेच मुरगाव बंदराच्या संबंधित अधिकार्‍यांशी बोलणी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळपर्यंत राज्यातील डिझेल व पेट्रोल पुरवठा सुरळीत होईल, असे नागरी पुरवठा खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा असलेले अरुण देसाई यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

गेले तीन दिवस राज्यात इंधन टंचाई निर्माण झाली. सरकारने परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न चालूच ठेवले होते. मुरगाव बंदरावरील ८ क्रमांकाच्या धक्क्याच्या दुरुस्तीचे काम चालू होते. त्यामुळे वरील कंपन्यांना इंधन घेऊन आलेल्या बोटी मंगळूरकडे वळविल्याची माहिती आहे. त्याचाही परिणाम राज्यातील इंधन पुरवठ्यावर झाल्याचे ते म्हणाले.

मांद्य्रात व डिचोलीत घरफोडी

सहा लाखांचा ऐवज चोरीला

मधलामाज मांद्रे येथील नीता प्रकाश रेगे पै तसेच सुधा कॉलनी डिचोली येथील संध्या पेंडसे निगळ्ये यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून चोरी केल्याच्या तक्रारी अनुक्रमे पेडणे व डिचोली पोलीस स्थानकात नोंदवण्यात आल्या आहेत. मांद्रे येथील चोरीत तीन लाखांचा तर डिचोलीतील चोरीत तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.

‘पेड न्यूज’बाबत गोवा एडिटर्स गिल्डही चिंतित

प्रसारमाध्यमांतून ‘पेड न्यूज’ प्रसिद्ध करण्यात येत असल्याबद्दल जी चिंता व्यक्त केली जात आहे, ती रास्त असल्याची प्रतिक्रिया गोवा एडिटर्स गिल्डचे अध्यक्ष व दैनिक नवहिंद टाइम्सचे संपादक श्री. अरुण सिन्हा यांनी एका पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. गोवा श्रमिक पत्रकार संघटनेनेही यापूर्वी ‘पेड न्यूज’ प्रकरणांबाबत चिंता व्यक्त केली होती.

तोतया पोलीस अजूनही कार्यरत

पुन्हा दागिने लांबविले

तोतया पोलिसांनी काल कळंगुट येथे रत्नाबाई पालयेकर या महिलेचे ८० हजार रु.चे दागिने लांबवण्याची घटना घडली. मोटारसायकलवरून आलेल्या अंदाजे २० ते २५ वर्षे या वयाच्या दोघा युवकांनी आपण पोलीस असल्याचे सांगून बसची वाट पहात उभी असलेल्या रत्नाबाई हिला अंगावरील सोनसाखळी व बांगड्या काढायला लावल्या. चोर फिरत असून ते तुझ्या अंगावरील दागिने पळवतील.

पक्ष कुठले, ह्या तर टोळ्या!

- दिलीप बोरकर

गोवा राज्याची विधानसभा निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपलेली असताना गोव्यातील राजकीय पक्षात उलथापालथ चाललेली दिसून येते. एका पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आपला पक्ष त्यागून दुसर्‍या पक्षात शिरतात, तर दुसरा पक्ष इतर पक्षांतील विद्यमान आमदारांना निरनिराळी आमिषे दाखवून आपल्या पक्षात आणतात. ज्यांना आमदार बनून आपले कर्तृत्व गाजवायचे आहे, असे कित्येक जण निरनिराळ्या पक्षात डोकावून आपले राजकीय भवितव्य पडताळून पाहू लागले आहेत. यांचा हा सगळा खेळखंडोबा पाहता या लोकांना पक्ष म्हणजे काय याचा अर्थ तरी लागतो का असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.

परत फिरा रे...

चांगला पगार, उत्तम सोयीसुविधा आणि उत्कर्षाच्या संधी यासाठी विदेशांत, विशेषतः पश्‍चिमेकडील विकसित देशांत धाव घेण्याची जी अहमहमिका आपल्याकडील तरुणाईमध्ये गेली अनेक वर्षे लागली होती, ती हळूहळू संपुष्टात येत आहे आणि उलट विदेशांत जाऊन स्थायिक झालेल्या भारतीयांना आता मायदेशी परतण्याचे वेध लागले आहेत, असे एक सर्वेक्षण ‘केली सर्व्हिसेस’ या त्या क्षेत्रातल्या एका विश्वसनीय संस्थेने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. या संस्थेच्या मते, येत्या तीन - चार वर्षांतच किमान तीन लाख अनिवासी भारतीय आपल्या मायदेशी कायमच्या वास्तव्यासाठी परतणार आहेत. त्यांच्या माघारी येण्याची अनेक कारणे आहेत. सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे विदेशांतील बदललेली परिस्थिती. जागतिक आर्थिक मंदीनंतर अमेरिकेसारख्या देशामध्ये जे काही घडले, त्यातून तेथील नोकरदारांचा एकूण व्यवस्थेवरील विश्वास ढासळला. आपल्या नोकरीबाबतच्या अशाश्‍वततेचे दर्शन प्रथमच त्यांना घडले. कित्येकांनी एका रात्रीत नोकर्‍या गमावल्या, तर अनेकांना भविष्यात त्या गमावण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली.