राजेश पाटणेकरांच्या प्रचारसभेत बोलताना केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख. बाजूस उपस्थित जनसमुदाय. (छाया : विशांत वझे)
अहवाल देण्यास सरकारला फर्मावले
शनिवारी कारोणा-हळदोणे येथील कालवी नदीत बस पडून झालेल्या भीषण अपघाताची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गांभीर्याने स्वेच्छा दखल घेतली असून गोवा सरकारच्या वाहतूक व्यवस्थापनाविषयी प्रतिज्ञापत्राद्वारे संपूर्ण अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने सरकारला दिला आहे. त्यामुळे वाहतूक खात्याचीही झोप उडाली आहे. अहवाल सादर करण्यासाठी सरकारला चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी खंडपीठाने ऍमिकस क्युरि म्हणून ऍड. सतिश सोनक यांची नियुक्ती केली आहे.
भारत हा तरुणांचा देश असून ६० टक्के तरुण कॉंग्रेसकडे नव्या आशेने पहात असून त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याचे सामर्थ्य या पक्षात आहे. गोव्यात कॉंग्रेसने तळागाळापर्यंत विकास साधलेला असून गोव्याचे वैभव टिकवण्यासाठी कॉंग्रेस हाच एकमेव पर्याय असल्याचे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी डिचोली येथील कॉंग्रेस उमेदवार राजेश पाटणेकर यांच्या प्रचार सभेत सांगितलेे. शिरोडकर सभागृहात आयोजित या सभेला प्रचंड प्रतिसाद लाभला.




