लेख

‘बेळगाव मार्ग’ अधिवेशनाच्या निमित्ताने…

– गुरूनाथ केळेकर प्रत्येक गोष्ट सरकारने करावी अशी नागरिकांची इच्छा असते, पण ते शक्य नसते. किमान परिसर स्वच्छता, पर्यावरणाचे संरक्षण, शिस्त, बंधुभाव जोपासणे हे नागरिकांच्या हाती आहे. याबाबत त्यांना जाणीव करून देण्याची गरज आहे. हे काम गोव्यात ‘गोवा मार्ग’ ही समाजसेवी संघटना गेली पंधरा वर्षे करीत आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन बेळगावात दोन वर्षांपूर्वी ‘बेळगाव मार्ग’ या संघटनेची स्थापना झाली. Read More »

अनुवाद व्हायला हवेत, पण…

– रिदम ठाकूर, वेळगे- पाळी कोणत्याही वाचकाला सगळ्या भाषा येत नाहीत. सर्वसाधारण गोमंतकीय वाचकाला मराठी, कोकणी, इंग्रजी, हिंदी, पोर्तुगीज या भाषा येतात. येथे स्थायिक झालेल्यांना आपापल्या मातृभाषा येतात. वाचकाला इतर भाषांतले साहित्य वाचावयास मिळावे व प्रकाशकाला व्यवसाय मिळावा यासाठी पुस्तकांचे अनुवाद होऊ लागले. तसे अनुवादाला अनन्यसाधारण महत्त्व आहेच. सगळ्या भाषांमध्ये सातत्याने अनुवाद होत असतात. मराठीमध्ये तर इंग्रजी पुस्तक प्रकाशित झाल्यावर ... Read More »

अलौकीक योगसाधकाचा अस्त

– डॉ. अनुराधा ओक पुण्यातील कबीरबाग योगसंस्थेचे डॉ. करंदीकर हे माझे वडील १९७८ मध्ये प्रथम बी. के. एस. अय्यंगार यांच्याकडे म्हणजे गुरुजींकडे गेले होते. स्वत: डॉक्टर असणार्‍या बाबांना गुरुजींनी योगाच्या माध्यमातून विकार बरे करता येतील असे सांगितले. तो सल्ला प्रमाण मानून बाबांनी योगाभ्यासास सुरुवात केली. गुरुजींनी बाबांना सल्ला दिला की, ‘तू डॉक्टर आहेस. यापुढे व्याधीग्रस्तांसाठी योगोपचाराचे काम सुरू ठेव’. त्यानुसार ... Read More »

दाभोळकरांचा खुनी सापडणार कधी?

– देवेंद्र कांदोळकर आज २० ऑगस्ट. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी याच दिवशी नित्यनियमाप्रमाणे सकाळच्यावेळी फिरायला गेले असता त्यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी जीवनमूल्ये स्वीकारून शोषणरहित समाजरचना निर्माण व्हावी म्हणून जीवनभर संघर्ष करीत असलेला एक समाजवादी सेनापती मारला गेला. Read More »

बिकिनीला विरोध केला तर काय चुकले?

– हरी दाणी, वेलिंग अलीकडेच एका वक्त्याने केलेल्या पब संस्कृती, रेव्ह संस्कृती व पोषाख यावरून एका वादाला सुरुवात झाली आहे. प्रत्येकाला आचार, विचार, उच्चाराचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे हे मान्य. पण त्या स्वातंत्र्यालाही काही मर्यादा असतातच. त्या एका अज्ञात शक्तीने पृथ्वीवर प्राण्यांची निर्मिती केली आणि अस्तित्वात असलेल्या- निर्माण केलेल्या प्राण्यांत मनुष्य हा सर्वश्रेष्ठ प्राणी निर्माण केला. मनुष्याची निर्मिती ही त्या चित्‌शक्तीची ... Read More »

स्वराज्य संस्थातील स्थित्यंतरांना ‘लगाम’ हवाच!

– रमेश सावईकर गोवा राज्यातील पंचायती व नगरपालिका या स्वराज्य संस्था आहेत, पण त्या स्वराज्य संस्था म्हणण्यापेक्षा ‘राजकीय’ संस्था बनत आहेत, ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ताधारी राजकीय पक्ष आपला अंकुश ठेवण्याच्या इराद्याने निवडून आलेल्या पंच सदस्यांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करून राज्य पातळीवरचे राजकारण तळागाळापर्यंत नेत आहे. त्याचे परिणाम चांगले होण्याऐवजी वाईटच झालेले दिसून येतात. Read More »

आणीबाणी आणि पत्रकारिता

– दत्ता भि. नाईक, ज्येष्ठ विचारवंत २५ जून १९७५ ची ती मध्यरात्र देशाच्या एका काळ्या कालखंडाची सुरुवात करणारी रात्र होती. त्यावर्षीच्या २६ जूनचा दिवस उजाडला तो काळ लोकशाहीप्रधान देशात झोपी गेलेल्या लोकांनी स्वप्नातही कल्पना केलेली नसेल अशा हुकूमशाहीमध्ये घेऊन जाणारा होता. सामान्य माणसाला सरकारने कोणते धुडगूस घातले याची कल्पनाच नव्हती. लोक स्तब्ध आणि हतप्रभ झाले होते. सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना ... Read More »

आजच्या स्त्रियांनी रणरागिणी व्हायला हवे..!

– देवेश कुसुमाकर कडकडे, डिचोली भारत देशाला अलीकडच्या काळात घडलेल्या किळसवाण्या घटनांमुळे सार्‍या जगात ‘बलात्कार्‍यांचा देश’ म्हणून हिणवले जाऊ लागले आहे. बलात्कार हा आता वय, वेळ, नाते यापैकी कुठल्याही पातळीवर अवलंबून राहिलेला नाही. अशा कृत्यांना बळी पडणार्‍या निरागस अल्पवयीन मुली आयुष्यभर हा काळाकुट्ट डाग बरोबर बाळगून जगतात, तसेच या घटनेमुळे त्यांच्यात सतत असुरक्षिततेची भावना प्रबळ होत जाते. का होतात अशी ... Read More »

नव्या माध्यमांची दुनिया

– परेश वासुदेव प्रभू , संपादक, दैनिक नवप्रभा गेल्याच आठवड्यातील गोष्ट. विद्यार्थी परिषदेचे काही जुने – नवे कार्यकर्ते हैदराबादहून आलेल्या एका मित्राच्या निमित्ताने एकत्र आले होते. एका नव्या कार्यकर्त्याच्या मोबाईलमधील व्हॉटस् ऍपवर त्या दिवशीच्या सदस्यता नोंदणीचे अपडेट्‌स येत होते. ‘‘आजची यांची विद्यार्थी आंदोलनेही व्हॉटस् ऍपवरच होत असावीत…’’ कोणी तरी टिप्पणी केली आणि हशा पिकला! या हशाला कारण होते. जुन्या कार्यकर्त्यांना ... Read More »

माध्यमांचे कॉर्पोरेटायझेशन आणि वाचक

– प्रकाश कामत, ज्येष्ठ प्रतिनिधी, द हिंदू व्यावसायिकता आणि अति-व्यापारीकरण यांच्या गर्तेत आजची प्रसारमाध्यमे व पर्यायाने पत्रकारिता सापडली आहे, याविषयी शंका नसावी. तरीही अजून या क्षेत्राच्या दडपणाखालीही लोकशाहीचा चौथा स्तंभ आपली कर्तव्ये समर्थपणे बजावण्याचे कामही करीत असल्याचे बरेच आशादायी चित्र दिसते, हेही तितकेच खरे आहे. पत्रकारितेचे ‘लोकहित’ हे पारंपरिक स्वरूप आजच्या खुल्या अर्थव्यवस्थेच्या जगात दिसणे मुश्कील बनत चालले आहे, त्यामुळे ... Read More »