लेख

कॉंग्रेसचे ‘बुरे दिन’कधी संपतील?

– गंगाराम म्हांबरे केंद्रात स्पष्ट बहुमत मिळवून भाजपाप्रणित रालोआ सरकार सत्तेवर येऊन शंभर दिवस पूर्ण होत असतानाच, देशात मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी प्रसारमाध्यमांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. काही वृत्तवाहिन्यांनी तर सर्वेक्षणाचे घोडे पुढे दामटले आहे. या स्पर्धेत एकच प्रश्‍न जोरकसपणे विचारला जात आहे की, जनतेला ‘अच्छे दिन’ कधी येतील? खरे तर हा प्रश्‍न वर्षभर प्रतीक्षा केल्यानंतरच विचारणे संयुक्तिक ठरेल. ... Read More »

नियोजन आयोग कालबाह्य झाला का?

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या ६८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेले उत्स्फूर्त भाषण असंख्यांच्या पसंतीस पडले. या भाषणात त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला. त्यापैकी केंद्रातील नियोजन आयोग बरखास्त करणारी त्यांची घोषणा सर्वार्थाने चर्चेचा विषय ठरला. मत-मतांतरे स्पष्ट झाली. वृत्तपत्रांतून ही बातमी पहिल्या पानावर झळकलीच. पण संपादकीयांमधूनही त्यावर भाष्य करण्यात आले. या ... Read More »

कुठे मिळेल सुखी माणसाचा सदरा?

– सौ. संगीता प्र. वझे, बोरी – फोंडा ‘सुखी माणसाचा सदरा’ या नावाची बोधकथा लहानपणी आपण सर्वांनीच वाचलेली वा ऐकलेली आहे. पण आजूबाजूला पाहताना विचार येतो की, कोठे असतील अशी सुखी माणसे आणि त्यांचा तो सदरा कोठे असेल? आपल्याला कधी मिळणार? संतांनी तर आपल्या ग्रंथात लिहूनच ठेवलेय, ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूचि शोधुनि पाहे.’ या जगात ... Read More »

खाण उद्योगाचे भवितव्य अधांतरीच…?

– रमेश सावईकर गोव्यातील खाण उद्योग क्षेत्रात बेकायदेशीर खनिज उत्खनन व निर्यात प्रकरणी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे शहा आयोगाने चौकशी अहवालात स्पष्ट केल्याने सप्टेंबर २०१२ मध्ये गोव्यातील खाणी बंद ठेवण्यात आल्या. जवळजवळ दोन वर्षे पूर्ण होत आली तरी खाण बंदी उठून पूर्ववत खाण उद्योग सुरू होण्याची नजीकच्या काळांत शक्यता दिसत नाही. Read More »

श्रीगणेश महिमा वर्णावा किती!

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव आपले सगळेच देव तसे पाहू जाता समाजधुरीण आहेत, मानवजातीचे कल्याण व्हावे अशी इच्छा बाळगणारे आहेत आणि या बाबतीत श्रीगणपती बाप्पा सगळ्यांत पुढे आहे. गणपती किंवा श्रीगणेश म्हणजे गणांचा स्वामी. गण म्हणजे समुदाय अथवा जमात. वेदांच्या संहिता, ब्राह्मणग्रंथ यामध्ये गणपती ही स्वतंत्र देवता म्हणून कुठेही निर्देश केलेला नाही. गणपतीच्या मूर्तीचे वर्णन ‘तत्पुरूष’, ‘वक्रतुंड’, आणि ‘दंती’ या ... Read More »

सार्वजनिक गणेशोत्सव :  चित्र बदलायला हवे!

– अजित पैंगीणकर गोव्यात मुक्तीनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापन झाली. पणजी – म्हापसा – मडगावसारख्या शहरांत केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पूर्वी होती, परंतु अवघ्या पन्नास वर्षांत या मंडळाची संख्या झपाट्याने वाढत आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ज्या उद्देशाने या उत्सवाची सुरुवात केली, तो उद्देश आज सफल होत आहे का? उलट एखाद्या मंडळामध्ये धुसफुस झाली की लगेच दुसर्‍या ... Read More »

इंग्रजीसमोर सारेच नतमस्तक

– गंगाराम म्हांबरे मराठी अथवा कोकणी या भाषा पूर्वप्राथमिकपासून सक्तीच्या असतील, असे सांगण्याऐवजी प्राथमिक स्तराचे माध्यम फक्त मातृभाषाच राहील व सोबत इंग्रजीही असेल, असे सांगण्याचे धैर्य आज सत्ताधार्‍यांजवळ नाही, हेच नव्या शैक्षणिक माध्यम धोरणाने उघड केले आहे. इंग्रजीचे महत्त्व नाकारण्यात अर्थ नाही, मात्र ही भाषा प्राथमिक स्तरावर आणून देशी भाषांचे थडगेच सरकार बांधत आहे, हे स्पष्ट दिसते आहे. जगाचे सोडा, ... Read More »

कोळसा घोटाळ्यातील काळेबेरे

१९९२ नंतरचे कोळसा साठ्यांचे वितरण रद्द करण्याचा निवाडा काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. या घोटाळ्याच्या घटनाक्रमाचा व प्रमुख मुद्द्यांचा हा वेध काय आहे घोटाळा ? कोळसा साठ्यांच्या सरकारने केलेल्या वितरणात खासगी कंपन्यांच्या फायद्याचा विचार झाला असल्याची शक्यता भारताच्या महालेखापालांनी आपल्या अहवालात २०१२ साली वर्तवली आणि घोटाळ्याच्या प्रकरणाला तोंड फुटले. कॅगच्या मते २००४ ते २००९ पर्यंत चुकीच्या वितरण पद्धतीने १.८६ लाख कोटी ... Read More »

विकलांगांसाठीच्या शाळेची जन्मकहाणी

ज्यांच्या मूकबधीर मुलाची कहाणी ऐकल्यावर स्व. नारायण आठवले यांनी विकलांग मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न समजून घेऊन लोकविश्वास प्रतिष्ठान या आजच्या प्रथितयश संस्थेची मुहूर्तमेढ रोवली, त्या या संस्थेच्या मूकबधीर शाळेच्या पहिल्या शिक्षिका सौ. वीणा सोवनी नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. निरोप समारंभात त्यांनी आपल्या भाषणातून आठवणींना उजाळा दिला… लोकविश्वास प्रतिष्ठानच्या शाळेच्या जवळजवळ ३३ वर्षांच्या कालखंडानंतर आपला निरोप घेताना असंख्य आठवणी मनात दाटून येत आहेत. ... Read More »

मयेवासियांना आता प्रतीक्षा मालकी हक्काची

– रमेश सावईकर गोवा मुक्त होऊन तब्बल अर्धशतक उलटून गेले तरी मये गांव मुक्त झाला नव्हता. स्थलांतरितांच्या मालमत्तेतील लोकांना त्यांच्या घरांचे नि जमिनींचे मालकी हक्क न मिळाल्याने त्यासाठी लढा द्यावा लागला. मये भू-विमोचन नागरिक कृती समिती स्थापन करून आपली मागणी धसास लावण्यात मये ग्रामस्थांना अखेर यश आले. Read More »