लेख

गोमंतकाशी समरस झालेले माधव गडकरी

– वामन प्रभू (ज्येष्ठ पत्रकार) ‘गोमन्तक’ची किंमत फक्त दहा पैसे होती, त्या काळात माधवराव गडकरी यांच्या ‘गोमन्तक’च्या टीममध्ये माझा प्रवेश झाला. राखीव खेळाडू वा प्रशिक्षणार्थी म्हणून खुद्द गडकरी यांनीच माझी निवड केली होती. दिवस आणि वर्ष सांगायचे झाल्यास २७ ऑक्टोबर १९६९. साडेचार दशकांचा काळ आता उलटला आहे. ज्यांनी मला पत्रकारितेच्या या अथांग दर्यात पोहायला शिकवले, त्या माधवराव गडकरी यांच्या आठवणींचा ... Read More »

व्युत्पन्न, रसज्ञ आणि मर्मज्ञ प्रा. शंकर वि. वैद्य

‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ या गाजलेल्या गीताचे रचनाकार, मराठी साहित्य क्षेत्रात ‘सर’ म्हणून ओळखले जाणारे प्रा. शंकर वैद्य यांचे काल मुंबईत वृद्धापकाळाने ८६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या साक्षेपी, कृतिशील व समर्पित जीवन-साहित्य-कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्त्वाचा ज्येष्ठ समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी घेतलेला आढावा. मराठी साहित्यविश्‍वात कविता, कथा आणि काव्यसमीक्षा या क्षेत्रांत तेजस्वी नाममुद्रा निर्माण करणारे प्रा. शंकर वि. वैद्य ... Read More »

आम्ही आणि धर्मकारण

– शरद दळवी (उत्तरार्ध) मंदिरे आणि भक्तांच्या गर्दीचे कारण म्हणजे समज वाढलेल्या माणसाला आपल्या दोषांची वाढती जाण किंवा टोचणी आहे. या गर्दीचे कारण वाढती श्रद्धा किंवा भक्ती नसावे. अर्थात काही अपवाद असतीलही. आपल्या धर्मात बाह्यपूजेला ‘पार्थिव पूजा’ असा शब्द आहे. पार्थिव म्हणजे प्राणहीन किंवा मृत. याचा बडीवार धर्माच्या मक्तेदारांनी स्वार्थसाधनेसाठी वाढवला. अर्थात मक्तेदारी ही धर्मात असो, राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणात वगैरे ... Read More »

आम्ही आणि धर्मकारण

– शरद दळवी (पूर्वार्ध) आम्ही म्हणजे आम्ही भारतीय. गेल्या साठ – पासष्ट वर्षांत आम्ही असे सुस्त झालो होतो की, जिवंतपणाचे लक्षणच दिसत नव्हते. मुळच्या टंगळवादात (टाळण्याच्या वृत्तीत) पाश्‍चात्य चंगळवादाची भरसुद्धा पडली. त्यामुळे आम्ही कमालीचे आत्मकेंद्रित बनलो होतो. गेल्या अवघ्याच महिन्यांत अचानक आमची अजगरी वृत्ती सोडून चलन-वलन करू लागलो. त्याची सुरवात राजकीय क्षेत्रापासून झाली. Read More »

गोव्याच्या शिरपेचात ‘इफ्फी’चा तुरा!

– रमेश सावईकर गोवा हे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कायमस्वरूपी केंद्र असेल अशी घोषणा केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी हल्लीच आपल्या गोवा भेटीत केली. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात गोव्यासाठी हा मानाचा तुरा म्हणावा लागेल. दरवर्षी ‘इफ्फी’च्या आयोजन केंद्राबाबत अनिश्‍चितता असायची. ती आता दूर झाली आहे. गोव्याशी कायमस्वरूपी इफ्फी केंद्र म्हणून समझोता करार झाल्याने आता दरवर्षी करार करावा लागणार ... Read More »

सर्वांत ‘पुढे’ आहे..ऽऽ!

– प्रा. किरण पाठक, डिचोली ‘‘सर्वांत पुढे आहे ऽ हा महाराष्ट्र माझा ऽ…’’ ही जाहिरात रोज टीव्हीवर ऐकू येते आणि कान अगदी तृप्त होतात. तशा टीव्हीवर अनेक अफलातून जाहिराती पाहायला मिळतात. पण त्यातले ‘सत्य’ आपण गृहित धरलेले असते. उदा. काही साबणांनी लिंबाचा ताजेपणा अनेक वर्षें धारण केला होता. लिंबू या नैसर्गिक, स्वादवर्धक, रसमय, औषधी फळाचा वापर अनेक उत्पादनांत इतका केला ... Read More »

कॉंग्रेसमध्ये दुफळीची चिन्हे

– गंगाराम म्हांबरे देश पातळीवर कॉंग्रेसमध्ये ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या धुसफुशीने सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात अधिक तीव्र स्वरुप धारण केल्याचे पाहायला मिळाले. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर, पक्षात निर्माण झालेली अस्वस्थता आणि असंतोष रोखण्यासाठी किंवा नियंत्रणात आणण्यासाठी पक्षनेतृत्वाने जे धैर्य आणि संयम यांचे दर्शन घडवायला हवे होते, त्याचा मागमूसही कुठे दिसला नाही. याचाच परिणाम म्हणून जसजसे दिवस जाऊ लागले, तसतसे आवाज ... Read More »

बायंगिणी कचरा प्रकल्पाची ऐशीतैशी

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव गोव्याच्या भाजपा आघाडी सरकारने नुकतेच आपल्या अडीच वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीचे गोडवे गायिले. विरोधी पक्षनेते प्रतापसिंह रावजी राणे यांनी आपल्या सौम्य भाषेत या ढोल-ताशांचा समाचार घेताना अडीच वर्षांत त्यांनी काही भरीव काम केले नाही, तरी उरलेली अडीच वर्षे आपण वाट पाहू, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी तर भाजपाला आपल्या वक्तव्यातून ... Read More »

नरेंद्र मोदींचे एक प्रिय नेते ः कै. अनंतराव काळे

– सु. ह. जोशी, पुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे एक अद्वितीय, अद्भुत, असामान्य व्यक्तित्व, असेच म्हटले पाहिजे. या चमचमणार्‍या हिर्‍याला पैलू पाडण्याचे काम अनेकांनी केलेले आहे, त्यातील मा. मधुकरराव भागवत, मा. लक्ष्मणराव इमानदार, मा. केशवराव देशमुख, सर्वश्री गजेंद्रगडकर, चिपळूणकर, भगत आदींची थोडी फार माहिती वृत्तपत्रे, साप्ताहिके, दूरचित्रवाणी आदींवर येऊन गेली. नरेंद्र मोदी ह्या सर्वांप्रती अत्यंत कृतज्ञ आहेत. पण या सूचित ... Read More »

स्पर्धांच्या परीक्षणाबाबत थोडेसे

– डॉ. राजीव कामत, खोर्ली – म्हापसा सध्या गोवाभर विविध देवस्थानांत पूजाआर्चा जोरात चालू आहेत. हे उत्सव साजरे करताना धार्मिक कार्यांबरोबर भजन, कीर्तनादी संगीताचे कार्यक्रमसुद्धा देवाची सेवा म्हणून (की केवळ लोकरंजनास्तव) विविध ठिकाणी साजरे केले जातात. या उत्सवांचा फायदा घेऊन काही संस्था संगीताच्या विविध स्पर्धा आयोजित करतात. यात प्रामुख्याने ‘भजनी स्पर्धा’ फारच लोकप्रिय आहेत व सरकारी पातळीवरूनही त्या घेतल्या जात ... Read More »