ब्रेकिंग न्यूज़

लेख

आणीबाणी आणि पत्रकारिता

– दत्ता भि. नाईक, ज्येष्ठ विचारवंत २५ जून १९७५ ची ती मध्यरात्र देशाच्या एका काळ्या कालखंडाची सुरुवात करणारी रात्र होती. त्यावर्षीच्या २६ जूनचा दिवस उजाडला तो काळ लोकशाहीप्रधान देशात झोपी गेलेल्या लोकांनी स्वप्नातही कल्पना केलेली नसेल अशा हुकूमशाहीमध्ये घेऊन जाणारा होता. सामान्य माणसाला सरकारने कोणते धुडगूस घातले याची कल्पनाच नव्हती. लोक स्तब्ध आणि हतप्रभ झाले होते. सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना ... Read More »

आजच्या स्त्रियांनी रणरागिणी व्हायला हवे..!

– देवेश कुसुमाकर कडकडे, डिचोली भारत देशाला अलीकडच्या काळात घडलेल्या किळसवाण्या घटनांमुळे सार्‍या जगात ‘बलात्कार्‍यांचा देश’ म्हणून हिणवले जाऊ लागले आहे. बलात्कार हा आता वय, वेळ, नाते यापैकी कुठल्याही पातळीवर अवलंबून राहिलेला नाही. अशा कृत्यांना बळी पडणार्‍या निरागस अल्पवयीन मुली आयुष्यभर हा काळाकुट्ट डाग बरोबर बाळगून जगतात, तसेच या घटनेमुळे त्यांच्यात सतत असुरक्षिततेची भावना प्रबळ होत जाते. का होतात अशी ... Read More »

नव्या माध्यमांची दुनिया

– परेश वासुदेव प्रभू , संपादक, दैनिक नवप्रभा गेल्याच आठवड्यातील गोष्ट. विद्यार्थी परिषदेचे काही जुने – नवे कार्यकर्ते हैदराबादहून आलेल्या एका मित्राच्या निमित्ताने एकत्र आले होते. एका नव्या कार्यकर्त्याच्या मोबाईलमधील व्हॉटस् ऍपवर त्या दिवशीच्या सदस्यता नोंदणीचे अपडेट्‌स येत होते. ‘‘आजची यांची विद्यार्थी आंदोलनेही व्हॉटस् ऍपवरच होत असावीत…’’ कोणी तरी टिप्पणी केली आणि हशा पिकला! या हशाला कारण होते. जुन्या कार्यकर्त्यांना ... Read More »

माध्यमांचे कॉर्पोरेटायझेशन आणि वाचक

– प्रकाश कामत, ज्येष्ठ प्रतिनिधी, द हिंदू व्यावसायिकता आणि अति-व्यापारीकरण यांच्या गर्तेत आजची प्रसारमाध्यमे व पर्यायाने पत्रकारिता सापडली आहे, याविषयी शंका नसावी. तरीही अजून या क्षेत्राच्या दडपणाखालीही लोकशाहीचा चौथा स्तंभ आपली कर्तव्ये समर्थपणे बजावण्याचे कामही करीत असल्याचे बरेच आशादायी चित्र दिसते, हेही तितकेच खरे आहे. पत्रकारितेचे ‘लोकहित’ हे पारंपरिक स्वरूप आजच्या खुल्या अर्थव्यवस्थेच्या जगात दिसणे मुश्कील बनत चालले आहे, त्यामुळे ... Read More »

आणीबाणी, पत्रकारिता आणि वर्तमान

– सीताराम टेंगसे, ज्येष्ठ पत्रकार ४० वर्षांपूर्वी भारतीयांनी एक दुःस्वप्न पाहिले. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अंतर्गत आणीबाणी जारी करून लोकांचे सर्व अभिव्यक्ती स्वातंत्र्य व नागरी हक्क हिरावून घेतले व संपूर्ण देश एक भला मोठा तुरुंग बनविला, हेच ते भयावह दुःस्वप्न! लोकशाही मार्गाने सत्ता हाती आल्यानंतर लोकशाही गुंडाळून ठेवून हुकुमशहा बनलेले व जनतेचे कर्दनकाळ ठरलेले जगाच्या एकंदर शंभर वर्षांच्या इतिहासात ... Read More »

‘ब्रोकन’न्यूजचे संकट

– प्रमोद आचार्य संपादक, प्रुडण्ट मीडिया ओव्हरहर्ड न्यूजरूम नावाचे ट्विटरवर एक हँडल आहे. पत्रकार आणि वृत्तपत्र – वृत्तवाहिन्यांच्या न्यूजरूममध्ये होणाऱी विनोदी संभाषणे हे हँडल आपल्या फॉलोअर्सना पाठवते. त्यातलाच चटकन् लक्षात रहावा असा हा किस्सा – या संभाषणातून प्रतीत होणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘सोशल मीडिया एडिटर’ नावाचे पद आता बहुतेक प्रसारमाध्यमांत तयार झाले आहे. का? काही वर्षांआधी प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात फेसबुकवर ... Read More »

विधानसभा वृत्त

तेरेखोल पुलासाठी आवश्यक परवाने घेतले : मुख्यमंत्री एनडीझेड विभागात पुलांच्या बांधकामास परवानगी आहे. त्यामुळे तेरेखोल पुलासाठी आवश्यक ते सर्व परवाने सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत आमदार ऍलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर दिली. मेसर्स एस. एन. भोबे आणि असोसिएशन प्रा. लिमिटेड ही या पुलासाठी सल्लागार संस्था म्हणून नियुक्त केल्याची माहिती त्यांनी दिली. हा पूल जनतेसाठी महत्वाचा ... Read More »

अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे –

– डॉ. सचिन कांदोळकर गोमंतकातील थोर संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांचे हे त्रिशताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने सरकारी पातळीवरून राज्यात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जिथे ज्ञान आहे तिथे अज्ञान असूच शकत नाही, असे म्हणणार्‍या पेडण्यातील या थोर संतकवीचे पेडण्याच्याच महाविद्यालयाला नाव देऊन या कार्यक्रमाची सुरवात होत आहे. पालये गावच्या या संतकवीचा १७१४ मध्ये जन्म झाला. बांदा येथेही त्यांचे वास्तव्य होते. ‘अंतरीचा ... Read More »

बरे झाले!.. भंगारअड्डे हटणार!

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव माझी ‘भंगार’ नावाची एक कविता आहे ती अशी : गणू माझा वर्गमित्र शाळा सुटली; घरी पाटी – पुस्तके ठेवली की तो अर्ध्या चड्डीत धाव मारायचा भंगार गोळा करायचा. रविवार तर त्याचा खास भंगार गोळा करायचा दिवस त्या पैशांनी मग वही, पेन्सिल जुनी पुस्तके खरेदी करायचा दोन पैसे उरलेच तर चणे, कुरमुरे खायचा आज गणू भंगाराचा मालक ... Read More »

आता प्रतीक्षा चौथ्या पुस्तकाची!

– गंगाराम म्हांबरे लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसला अतिशय वाईट दिवस आले आहेत. सत्ताधारी भाजप पक्ष अथवा रालोआच्या घटक पक्षांनी कॉंग्रेसवर संकट लादले आहे किंवा चौकशीचा ससेमिरा लावला आहे, असे मात्र कुठे दिसत नाही. ज्यांना संपुआ सरकारने अथवा गांधी कुटुंबाने आपले स्नेही मानले, हितचिंतक मानले अशाच व्यक्तींनी अलीकडे आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून कॉंग्रेस नेत्यांवर केलेले आरोप पराभवातून न सावरलेल्या कॉंग्रेसवर आणखी आघात करणारे ... Read More »