ब्रेकिंग न्यूज़

लेख

हे अपमान का सोसले जातात?

– डॉ. राजीव कामत, खोर्ली-म्हापसा दि. २४ जुलैच्या विविध वर्तमानपत्रांतून चीनमध्ये चालू असलेल्या बास्केटबॉल स्पर्धेत भारताच्या दोन शिख खेळाडूंची पगडी उतरवली गेल्याची अपमानास्पद अशी बातमी वाचून मन खिन्न झाले. त्याचबरोबर देशाभिमान कसा बाळगावा याचा सतत डोस पाजणारे आपले राजकारणी कसे दांभिक आहेत, याचेही यथावकाश दर्शन घडले. खेळाबरोबरच अन्य कितीतरी आघाड्यांवर आपला सतत अपमान होऊनसुद्धा आपण फक्त मूग गिळून स्वस्थ बसत ... Read More »

वेध एशियाडचे लक्ष्य तलाशाचे

– श्रद्धानंद वळवईकर विहंगम समुद्रकिनारे आणि या सुपीक प्रदेशातील ग्राम तथा शहरांना आल्हाददायक किनार देणार्‍या नद्या देशी तथा विदेशी पर्यटकांनाच नव्हे तर स्थानिक गोमंतकीयानाही आकर्षित करतात. येथील सुंदर मंदिरे, चर्चेस प्रसिध्दीच्या प्रवाहात आघाडीवर असली तर खळखळत्या नद्या, समुद्रकिनारे हे गोमंतकीय भूषण बनले आहेत. म्हणूनच एकाअर्थी पश्‍चिमी किनारपट्टीला सुशोभित करणारा हा अद्भूत प्रदेश जलक्रीडा स्पर्धा आणि जलतरणपटूंच्या नैसर्गिक विकासाचे एक मुख्यस्रोत ... Read More »

लोकमान्य : तव स्मरण स्फुरणदायी…

– ग. ना. कापडी, पर्वरी एक ऑगस्ट जवळ येऊ लागला की नरकेसरी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची स्मृती प्रकर्षाने जागृत होते. लोकमान्यांना जाऊन आज ९४ वर्षांचा काळ लोटला आहे, तरी आजही ते सद्यपरिस्थिती समर्थपणे हाताळण्यास हवे होते असे वाटते, श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच टिळकांचे गुणगान अखिल राष्ट्रीय स्तरावर होते. या नरपुंगवाच्या हाती इंग्लिश सत्तेविरुद्ध लढण्यासाठी ‘केसरी’ हे शस्त्र ... Read More »

भूस्खलनाचा धडा घेणार कोण?

– अनिलराज जगदाळे, भूकंपतज्ज्ञ आजकाल आपण नैसर्गिक आपत्तीचे ङ्गटके सातत्याने पाहत आहोत. अशा आपत्ती येणार असल्याची पूर्वकल्पना नसल्याने अनेक लोकांचा नाहक बळी जातो. महाराष्ट्रात काल पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भीमाशंकरजवळ माळीण गावात घडलेली ताजी दुर्घटना त्याचेच प्रतीक आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम होऊन तेथील डोंगराची दरड कोसळली आणि त्याखाली तब्बल ४० घरे दबून ... Read More »

आत्महत्या हा मानसिक ताणावर उपाय नव्हे

– उदय सावंत आत्महत्येच्या प्रकरणांनी सध्या सत्तरी तालुका पूर्णपणे हादरून गेला आहे. तसे पाहायला गेलो तर अनेक ठिकाणी आत्महत्या होतात, मात्र तीन महिन्यांत सत्तरीतील तीन महिलांनी केलेल्या आत्महत्या खरोखरच खोलवर विचार करायला लावणार्‍या आहेत. यामध्ये पिसुर्लेतील उपसरपंच सौ. वैभवी यांनी विषप्राशन करून, मासोर्डे येथील वेदश्री हिने आपल्या चार वर्षीय मुलीसोबत नदीत उडी टाकून व मोर्ले-सत्तरी येथील नीता गावस व सुजाता ... Read More »

साजिरा, गोजिरा श्रावण आला

– विजय प्रभू पार्सेकर देसाई श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे| क्षणात येई शिरशिर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे| असा हा श्रावण महिना नुकताच सुरू झाला आहे. श्रावण महिन्यात अनेक व्रते, सण असतात. त्यामुळे हा महिना महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक दिवस हा देव-देवतांच्या पूजे-अर्चेचा असल्यामुळे साहजिकच रविवार हा आदित्य (सूर्यदेवाच्या) पूजनाचा, सोमवार शंकराचा, मंगळवार हा एरवी गणपतीचा, मात्र श्रावण महिन्यात ... Read More »

वाढती गुन्हेगारी कशी रोखणार..?

– रमेश सावईकर गोवा हे छोटे राज्य. पण या राज्यातील विविध समस्या व प्रश्‍न मात्र बेसुमार वाढत आहेत. त्यावरती उपाययोजना करणे हे सरकारला एक आव्हानच आहे. राज्यातील गुन्हेगारीही दिवसेंदिवस वाढते आहे. खून, घरफोड्या, चोर्‍या, दरोडे, खुनी हल्ले, बलात्कार, अपहरणे यांच्या संख्येत होणारी वाढ ही चिंतेची बाब ठरली आहे. वाढत्या गुन्हेगारीला अनेक कारणे आहेत. गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणेला येणारे अपयश ... Read More »

वंश-वृक्षाची जोपासना आवश्यक

– सौ. संगीता प्र. वझे, बोरी – फोंडा एकदा सहज घरच्यांबरोबर एका संमेलनाला जायचा योग आला. मी कधीही कुठल्याही संमेलनाला गेले नव्हते. त्यामुळे माझा हा पहिलाच अनुभव. आम्ही तिथे वेळेतच पोचलो. बघता बघता शे-दीडशे माणसे जमली. त्यातली काही माणसे माझ्या ओळखीतली होती. मला खरेच प्रश्‍न पडला की एका माणसापासून एवढा मोठा कुटुंब-वृक्ष कसा तयार होऊ शकतो? आणि मग आठवले, आई ... Read More »

कशाला हवी ती पब संस्कृती?

– सौ. लक्ष्मी जोग सध्या वृत्तपत्रे, टी.व्ही. चॅनल इतकेच नाही तर अनेक संघटना व घराघरांतून एकाच मुद्यावर तावातावाने चर्चा केलेली ऐकू येते आहे. मुद्दा खराच वादग्रस्त असला तर चर्चा होणे आवश्यकच होते. पण साबांखा मंत्री श्री. सुदिन ढवळीकरांनी स्त्रियांच्या पोशाखाविषयी एक योग्य व स्तुत्य विधान केले आणि चर्चेला ऊत आला. ते विधान आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीला धरूनच होते. ते विधान ... Read More »

संत शिरोमणी नामदेव महाराज

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ म्हणून पंजाब राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातील ‘घुमान’ हे गाव निश्‍चित झाले. संत नामदेवांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या गावात त्यांचे स्मृतीमंदिरही उभारण्यात आले आहे. अशा या संताची आषाढ वद्य १३, शके १२७२ ही पुण्यतिथी. या तिथीला वयाच्या ८० व्या वर्षी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात ते समाधिस्त झाले. अशा या श्रेष्ठ ... Read More »