ब्रेकिंग न्यूज़

लेख

पुन्हा घुमू देत मराठीचा हुंकार

– ऍड. शिवाजी देसाई, ब्रह्माकरमळी – सत्तरी वाळपईच्या आमशेकर सभागृहात मराठी राजभाषेच्या मागणीसाठी नुकतीच एक बैठक झाली. मराठी अकादमीचे माजी पदाधिकारी गो. रा. ढवळीकर यांच्या पुढाकाराने ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुन्हा एकदा मराठी ही गोव्याची राजभाषा व्हावी म्हणून हुंकार देण्याचे धोरण या बैठकीत आखण्यात आले. वास्तविक, गोव्यात मराठी राजभाषेचा प्रश्न जोपर्यंत मराठी राजभाषा होत नाही तोवर सुटणार नाही. ... Read More »

महान स्वातंत्र्यसैनिक, थोर लेखक पं. जवाहरलाल नेहरू

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव जवाहरलाल नेहरू सन १९१२ च्या सप्टेंबरमध्ये आपले शिक्षण संपवून विदेशातून हिंदुस्थानात परतले. त्यावेळचा हिंदुस्थान म्हणजे एक थंड गोळा होऊन पडला होता. लोकमान्य टिळक तुरुंगात होते. जहाल पुढार्‍यांची मुस्कटदाबी करण्यात आली होती. नेमस्तांनी सरकारशी सहकार्य केलेले होते. कॉंग्रेसमध्येही नेमस्तांचा वरचष्मा असून जहालांना त्यांनी जणू नेस्तनाबूत केले होते. त्याच वर्षीच्या डिसेंबरमध्ये भरलेल्या बंकीपूर कॉंग्रेसला जवाहरलाल एक प्रतिनिधी ... Read More »

कृषी व निसर्ग पर्यटनास सत्तरीत वाव

– उदय रामा सावंत बंद झालेला खाण व्यवसाय व त्यामुळे निर्माण झालेल्या अनेक स्वरुपाच्या अनाकलनीय समस्या यावर सरकार सध्या पर्यटनाचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी सरकारचे संबंधित मंत्री, अधिकारी, राज्यातील पर्यटन व्यवसाय बहरावा म्हणून परदेशवार्‍या करीत तेथे गोव्याच्या पर्यटनाचा जागर करीत आहेत. गोवा राज्याचे पर्यटन हे फक्त समुद्रकिनारे व आपली सागरी संस्कृती यांच्या चौकटीतच आहे, असा जर सरकार विचार ... Read More »

नव्या मुख्यमंत्र्यांसमोरील आव्हाने!

– गंगाराम म्हांबरे गोव्याचा खाणप्रश्‍न अद्याप सुटलेला नाही, प्रादेशिक आराखड्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, ‘इफ्फी’ जवळ येऊन ठेपला आहे, त्यातच जुने गोव्याचे शवप्रदर्शन होत आहे. प्रशासकीय पातळीवर वेगवान निर्णय घेण्यात अधिकारी कमी पडत आहेत. कुळ कायद्याच्या सुधारित स्वरूपाबाबत जनतेत नाराजी आहे. पोलिस खात्यात भ्रष्टाचार वाढला आहे, गोवा शेतीप्रधान करण्याची योजना प्राथमिक स्तरावरच आहे, अशा स्थितीत गेली अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी ... Read More »

नव्या संरक्षणमंत्र्यांसमोरील आव्हाने

– कर्नल अनिल आठल्ये (निवृत्त) गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू होती. अखेर त्याला मुहूर्त मिळाला. त्यामुळे आता नव्याने मंत्रीपदाची शपथ घेणार्‍यांसमोर विशेषत: संरक्षण मंत्र्यासमोर कोणती प्रमुख आव्हाने आहेत याचा विचार करावा लागणार आहे. याच संदर्भात एका प्रसिध्द हिंदी चॅनेलवर भाष्य करताना एका प्रतिष्ठित पत्रकाराने माजी पंतप्रधान नरसिंहरांवांची एक आठवण सांगितली. ते म्हणाले की, नरसिंहराव म्हणत ... Read More »

आकाशी झेप घे रे मनोहरा!

– रमेश सावईकर गोव्याचे तडफदार मुख्यमंत्री म्हणून देशभर नावलौकिक मिळविलेले मनोहर पर्रीकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून स्थान मिळणे ही तमाम गोमंतकीयांना भूषणावह व अभिमानास्पद बाब आहे. देशाचे संरक्षणमंत्री बनण्याचा मान गोव्यासारख्या चिमुकल्या राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या राजकीय व्यक्तीला मिळाला याचा सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह विरोधी कॉंग्रेस पक्षालाही सार्थ अभिमान वाटायलाच हवा. राज्याचे विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे आणि गोवा प्रदेश कॉंग्रेस ... Read More »

पर्रीकरांचा निरोप घेताना…

– नीना नाईक, पणजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पणजीच्या सर्व कार्यकर्त्यांना महालक्ष्मी ट्रस्टमध्ये ६ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजता भेटतील, असा साधा एसएमएस आला. शंकेची पाल चुकचुकली. इतके दिवस येणार्‍या बातम्या अफवा नव्हत्या, त्यात तथ्य होते. पर्रीकर केंद्रात जाणार यात वाद नव्हता. फक्त क्षण महत्त्वाचा होता निरोपाचा. पणजीच्या सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. गोव्याचा आधारस्तंभ, कार्यकर्त्यांचा कणा विशेष कामगिरीसाठी ‘राष्ट्र’ प्रथम ... Read More »

कूळ – मुंडकारांना वार्‍यावर सोडू नये

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव गोव्यात जमिनीचे हक्क मिळविण्यासाठी आतापर्यंत अर्ज केलेल्यांपैकी सुमारे साडे तीन हजार मुंडकार प्रकरणे आणि अंदाजे तीन हजार कूळ प्रकरणे संयुक्त मामलेदार, उपजिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित आहेत. या शिवाय अद्यापही हजारो कुळ व मुंडकार यांनी जमिनीचे हक्क मिळविण्यासाठी अर्जही केलेले नाहीत. या सार्‍या गोष्टींचा अभ्यास करून सरकारने महसुली खटले निकालात काढण्यासाठी १४ मामलेदारांची फक्त याच कामासाठी म्हणून ... Read More »

एका विद्वान गुरूचे पुण्यस्मरण

– सुरेश बांदेकर, अडवलपाल, अस्नोडा गुरूर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरूर्देवो महेश्‍वरः| गुरू साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः| हे गुरुचे वर्णन यथार्थपणे लागू होते अशी व्यक्ती कोण बरे? तर ते होते वेदशास्त्रसंपन्न आणि काव्यतीर्थ गजानन सहकारी. डिचोलीतील श्री शांतादुर्गा देवीचे पुजारी आणि शहरातील काही कुटुंबांचे पुरोहित. केवळ भिक्षुकीच त्यांच्याकडे होती असे नाही तर त्यांनी मिळवलेले अगाध ज्ञान, गाठीला असलेले अनुभव, दानी वृत्ती ... Read More »

सगळेच गतिमान, तर शाश्‍वत काय?

– प्रकाश आचरेकर, मुंडवेल, वास्को आपल्या भोवती असलेल्या निसर्गाच्या वस्तू, त्यांचे रहस्य व कारण जाणून घेण्याची माणसाची हजारो वर्षांपासूनची धडपड चालू आहे. प्राचीन काळी म्हणा अथवा थोड्याच वर्षांपूर्वी विज्ञानातील गंध माहीत नसलेल्या गावांतील माणसे विचार करीत असत की, सूर्य पूर्वेला उगवतो व पश्‍चिमेला मावळतो, मग पाताळात जातो आणि ताजातवाना होऊन नंतर तो पूर्वेला उगवतो. म्हणून सूर्य-चंद्र हे दोन्ही गोल या ... Read More »