लेख

स्वच्छतालयांचा अक्राळविक्राळ प्रश्न

> देवेश कु. कडकडे आज अनेक कार्यालयांत आणि कार्यक्रमांच्या ठिकाणी सभागृहात शौचालयाची सोय नसते. खासगी आणि सरकारी कार्यालयांत येणार्‍या नागरिकांची यामुळे गैरसोय होते, कारण यातील शौचालये ही कर्मचार्‍यांसाठी असतात. आज अनेक स्त्री पुरुषांचे कामानिमित्त घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मलमूत्र विसर्जन ही नैसर्गिक बाब आहे. दर दोन तासांनी मूत्रविसर्जन करावे, हा सर्वसाधारण वैद्यकीय नियम आहे. नैसर्गिक विधींना प्रतिबंध केल्याने घातक ... Read More »

बंदूक संस्कृतीचे बळी…

शैलेंद्र देवळाणकर लास वेगासमध्ये झालेला हल्ला हा अमेरिकेच्या इतिहासातील बंदुकीचा वापर करून झालेला सर्वांत भीषण हल्ला आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली असली तरी मूळ प्रश्‍न अमेरिकेतील गन कल्चरचा आहे. अमेरिकेतील सर्वात मोठा पर्यटकांचा राबता असणार्‍या आणि गॅम्बलिंग सिटी नावाने ओळखल्या जाणार्‍या लास वेगास या शहरामध्ये नुकताच भीषण हल्ला झाला. या शहरात एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान स्टिङ्गन पॅडॉक नावाच्या व्यक्तीने अंदाधुंद ... Read More »

मुंबई दुर्घटनेला जबाबदार कोण?

असीम सरोदे आपल्या धार्मिक भावना ज्या तीव्रतेने आणि सहजतेने ‘दुखावतात’, त्या सहजतेने अशा दुर्घटना घडून माणसे मेल्यावर आपल्या मानवी संवेदना का दुखावत नाहीत? मुंबईत एलङ्गिन्स्टन येथे झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये २२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अशा घटनांची जबाबदारी कोणाची यावरून वादही सुरू आहेत. याबाबत सरकारवर ङ्गौजदारी खटला दाखल करण्याची मागणी होत आहे. मुळातच आपल्याकडे इमारती कोसळणे, पूल कोसळणे यांसारखे सरकारी ... Read More »

संघर्षाच्या मुशीत घडलेले बहुपेडी व्यक्तिमत्त्व ः ह. मो.

डॉ. सोमनाथ कोमरपंत संघर्षाच्या मुशीतून घडलेले बहुपेडी व्यक्तिमत्त्व’ ही ह. मो. मराठेंची खरी ओळख आहे. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वातील पत्रकार मोठा की साहित्यिक मोठा असा संभ्रम कोणाच्याही मनात निर्माण होईल… सिद्धहस्त पत्रकार, प्रख्यात कथाकार आणि कादंबरीकार ह. मो. मराठे यांचे काल दि. २ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणे चार वाजता निधन झाले. हे ऐकून अतिशय दुःख झाले. त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी मनात जाग्या ... Read More »

रोहिंग्यांना भारतात आश्रय देणे घातक ठरेल

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) जगात ५७ मुस्लीम देश आहेत. त्या सगळ्यांनी रोहिंग्यांना आश्रय देण्यास नकार दिला आहे. मतपेटीसाठी भारताला शरणार्थ्यांची धर्मशाळा बनवून भविष्य काळात म्यानमारसाख्या संकटात झोकण्याचा तथाकथित बुध्दिवादी, मानवाधिकारवादी यांचा हा प्रयत्न एक राष्ट्रघाती पाऊल आहे. म्यानमार ब्रिटिश साम्राज्याचा हिस्सा असल्यापासून रोहिंग्या मुसलमान तेथे राहाताहेत. दुसर्‍या महायुद्धात जपानने ब्रम्हदेशावर आक्रमण केल्यावर इंग्रजांनी त्यांच्यांशी लढण्यासासाठी रोहिंग्यांना हत्यारबंद केल. पण जपानी ... Read More »

रणरागिणींचा विजयोत्सव ः दसरा

प्रकाश क्षीरसागर पुराणकाळापासून आज एकविसाव्या शतकापर्यंत रणरागिणींचा लढा सुरूच आहे. त्यात त्यांनी अनेक विजयही प्राप्त करून घेतले आहेत. शेवटी काहीच आधार नसल्यावर महिला शक्तीच कामी येते. या सर्व महिला शक्तीला विजयादशमीनिमित्त मानवंदना.   दसरा हा भारतीय परंपरेतील एक महत्त्वाचा सण. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मानाचा मुहुर्त. दसर्‍याच्या दिवशी सुरू केलेले काम फत्तेच होते असा लोकांचा विश्‍वास आहे. पराक्रमाचा आणि विजयोत्सवाचा ... Read More »

पार्किंग समस्या देशासमोरील महासंकट

देवेश कु. कडकडे पार्किंगच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी प्रशासन अपेक्षित प्रयत्न करताना दिसत नाहीत. ते समस्येप्रती गंभीर नसल्याचे दिसते. वाहतूक खात्याने कडक धोरण अवलंबले तरच लोकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण होईल. गोव्यातील महामार्ग मृत्यूचे सापळे बनले आहेत. वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. पार्किंग व्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि युवा वर्गाकडून होणारी बेशिस्त वाहतूक ही सर्वांसाठी आज मोठी डोकेदुखी बनली आहे. ... Read More »

रस्त्यांवरील खड्डे आणि मानवाधिकार

>> ऍड. असीम सरोद रस्ते हा विकास मार्गातील महत्त्वाचा घटक असला तरी खड्डेयुक्त रस्त्यांमुळे मानवी जीवन सुकर होण्याऐवजी कष्टप्रद होते. दरवर्षी रस्तेनिर्मितीवर स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकारे आणि केंद्र सरकार हजारो कोटी रुपये खर्ची करत असतात. असे असूनही आज नागरिकांना रस्त्यांवरुन आरामदायी प्रवास करता येत नाही हे वास्तव आहे. शासनाच्या तिजोरीतील खडखडाटामुळे पीपीपी मॉडेलचा अवलंब करत अनेक राज्यांमध्ये खासगी क्षेत्राची ... Read More »

स्वच्छता मोहिमेद्वारे ‘स्वच्छ भारत’ ला चालना

नीरज वाजपेयी गेल्या तीन वर्षांत स्वच्छता व चांगल्या आरोग्य सवयींवरील विश्वास ग्रामीण पातळीवरील मागासलेल्या भागात देखील वाढीस लागला आहे. यामुळे सध्या देशभरात राबवल्या जात असलेल्या स्वच्छता चळवळीला वेग मिळाला आहे… २०१४ मध्ये गांधी जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘स्वच्छ भारत’ या महत्वाकांक्षी योजनेच्या याशोगाथांचा पाऊस पडत असताना, स्वच्छ शौचालये व सुरक्षित पिण्याच्या पाण्याविषयीची जागरुकता आणि मागणी वाढत आहे. ... Read More »

देशाच्या संरक्षणाला नवे आयाम…

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) भविष्यात शत्रूने एखादे क्षेपणास्र मुंबईसारख्या शहरावर अथवा अणुप्रकल्पावर डागले तर त्यातून होणारी हानी किती भयानक असेल याची कल्पनाच केलेली बरी. अशी घटना घडल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेवर ताशेरे ओढण्यापेक्षा पूर्वखबरदारी घेणे सूज्ञपणाचे आहे… अलीकडील काळात भारताला शेजीराल राष्ट्रांकडून आणि दहशतवादी संघटनांकडून असणारा धोका वाढत चालला आहे. एका बाजूला सीमेवर पाकिस्तानकडून होणारा गोळीबार, दहशतवादी हल्ले वाढत चाललेले असतानाच अधूनमधून ... Read More »