ब्रेकिंग न्यूज़

लेख

ट्रम्प – पुतीन भेटीच फलित काय?

शैलेंद्र देवळाणकर अमेरिका आणि रशिया या जागातिक स्तरावरील बलाढ्य सत्ता. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर रशियाची शकले झाली तरी डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून अमेरिका ज्या पद्धतीने जागतिक राजकारणातून अंग काढून घेत चालली आहे, त्यामुळे रशियाचे महत्त्व वाढत चालले आहे. ब्लादीमिर पुतिन आणि ट्रम्प यांच्यातील ऐतिहासिक शिखर परिषद या पार्श्‍वभूमीवर घडून आली आहे. ही परिषद रशियाचे वाढते महत्त्व अधोरेखित करणारी आहे. दि. १६ ... Read More »

दिल्लीच्या निकालाचा अन्वयार्थ

ऍड. असीम सरोद दिल्लीमध्ये नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांच्यातील संघर्षाची मागील तीन वर्षांपासून चर्चा होत होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या संघर्षनाट्यावर पडदा टाकला आहे. राजकीय पक्ष आणि पक्षाशी संबंधित महत्त्वाकांक्षा घेऊन जर कोणी यंत्रणेलाच प्रभावीत करत असेल, वेठीस धरत असेल तर त्यांच्यापेक्षा व्यवस्थाच नेहमी महत्त्वाची आहे हे यानिमित्ताने समजून घेतले पाहिजे. भारतात दिल्ली हा राजकीयदृष्ट्‌या अत्यंत महत्त्वाचा प्रदेश ... Read More »

जगाने अनुभवला विश्वचषक फुटबॉल महासंग्राम

शंभू भाऊ बांदेकर २०१८ चा हा विश्‍वकरंडक महासंग्राम सुमारे साडेतीनशे कोटी लोकांनी पाहिला व त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. असंख्यांचे जगज्जेतेपदासाठी कोणत्या दोन संघांमध्ये सामना होणार याचे अंदाज चुकले. असंख्यांना बाद फेरीपासूनच उपांत्य फेरीपर्यंतच्या सामन्यांमध्ये अनेक देशांच्या अनेक संघांनी कधी गोड तर कधी कडू अनुभव चाखायला लावले… तब्बल महिनाभर चाललेला ‘फिफा २०१८’चा फुटबॉल विश्‍वचषक महासंग्राम नुकताच संपुष्टात आला. जगातील २११ देशांतील ... Read More »

न्या. चेलमेश्वर यांची निवृत्तीही वादळीच

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) सर्वोच्च न्यायालयातील क्रमांक दोनचे न्यायमूर्ती चेलमेश्वर कार्यरत असतांना त्यांनी १२ जानेवारी २०१८ रोजी अभूतपूर्व पत्रकार परिषद घेतल्याने तर ते वादळी व वादग्रस्त ठरलेच होते पण आता २२ जून रोजी निवृत्त झाल्यानंतरही वादग्रस्त ठरले आहेत. कारण त्यांनी काही माध्यमांना मुलाखती देऊन आणि एका ठिकाणी भाषण देऊन न्यायिक क्षेत्राला न पचणारी विधाने केली आहेत. खरे तर सर्वोच्च न्यायालयातील ... Read More »

थायलंडमधील थरार ः शोध आणि बोध

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) थायलंडच्या थाम लुआंग गुहेमध्ये अडकलेल्या ङ्गुटबॉल टीमला यशस्वीपणे आणि सुखरूप बाहेर काढण्याची घटना प्रशंसनीय तर आहेच; पण त्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा थरारही जाणून घेण्यासारखा आहे. तसेच या सर्व व्यवस्थापनातून अनेक धडे आपण घेण्याची गरज आहे. ङ्गुटबॉलचा वर्ल्ड कप रशियामध्ये सुरू असतानाच २३ जून रोजी उत्तरी थायलंडच्या चिरांग राई प्रांतातील मू पा (वाईल्ड बोअर) फुटबॉल टीम आपली मॅच ... Read More »

सावधान ! अमली पदार्थ बनतोय गोव्याची संस्कृती

शंभू भाऊ बांदेकर पंजाब राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंत्रिमंडळ बैठक घेऊन अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी दोषी ठरवलेल्या गुन्हेगारांना मृत्युदंड ठोठावण्याची शिफारस केंद्र सरकारला पाठविली आहे. स्तुत्य असाच हा निर्णय असून कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ड्रग्ससंबंधित दोषींना नेस्तनाबूत करण्याचा मार्ग सुचवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीही असा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे ठेवून संमत करून केंद्राकडे पाठवावा. पूर्वी गोवा आणि आसपासचे ... Read More »

व्यापार महायुद्धाकडे…

शैलेंद्र देवळाणकर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे सध्या जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. अलीकडेच त्यांनी चीनमधून आयात होणार्‍या वस्तूंवर अतिरिक्त करआकारणी सुरू केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकन वस्तूंवरील कर वाढवला. यातून दोन्ही देशांत व्यापारयुद्धाचा भडका उडाला. आता यामध्ये युरोपियन समूह, मेक्सिको आणि कॅनडा यांसारखे देश उतरले आहेत. भारतही त्यामध्ये आहे. अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सध्या व्यापार युद्धाचा ... Read More »

गुन्हेगारी वृत्तीचे उदात्तीकरण नको

देवेश कु. कडकडे (डिचोली) आम्ही फक्त अमक्या तमक्याचा चित्रपट पाहायला जातो, या सर्व सबबी तकलादू आहेत. मुख्य प्रश्‍न आहे, आपण यातून समाजविघातक कृत्यांना एका तर्‍हेने समर्थन देत असतो आणि हीच दृष्कृत्ये वाढीला लागून आपल्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाहीत. खंडणी, हत्या, दहशतवाद, हवालाकांड, संघटित गुन्हेगारी यात सहभागी असलेल्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट निर्’ाण होऊन त्यांना नायकाच्या रुपात सादर केले जाते. यात ... Read More »

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) युती तोडण्यासाठी मेहबूबांनी पहिले पाऊल उचलले असते तर त्याचा त्यांना राजकीय लाभ झाला असता. ती संधी भाजपाने त्यांना का द्यावी? म्हणून त्याने स्वत:च सरकार पाडण्याचे पहिले पाऊल उचलले. जम्मू काश्मीरमधील मेहबुबा सरकारचा पाठिंबा काढून घेऊन तेथे राज्यपाल राजवटीचा मार्ग प्रशस्त करणे हा भाजपाचा निर्णय असला व त्यामुळे त्याला ‘भाजपाचा मास्टरस्ट्रोक’ म्हणण्याचा मोह आवरत नसेल तर मला ... Read More »

तीव्र गरज लढाऊ विमानांची…

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) एकीकडे भारतापुढे असलेला संरक्षणधोका वाढत चाललेला असतानाच युद्धसज्जतेसाठी आवश्यक असणार्‍या उणिवा भरून काढण्याच्या दिशेने सरकारदरबारी ङ्गारशी गतिमानता दिसून येत नाही. याचे मोठे उदाहरण म्हणजे भारतीय वायुसेनेत सध्या असणारी लढाऊ विमानांची फार मोठी कमतरता. भारतीय वायुसेनेत सध्या लढाऊ विमानांची (फायटर/इंटरसेप्टर्स) फार मोठी कमतरता आहे आणि भविष्यात ती अधिकच भीषण होत जाणार आहे. ही कमी पूर्ण करण्यात होत ... Read More »