ब्रेकिंग न्यूज़

लेख

डिचोलीची शान ः नूतन वाचनालय

देवेश कु. कडकडे (डिचोली) रविवार दि. १२ ऑगस्ट हा ग्रंथपाल दिन म्हणून साजरा झाला. गोव्यामध्ये शहरा-शहरांतून शतकमहोत्सव पार केलेली समृद्ध ग्रंथालये आहेत. शतकोत्तर वाटचाल समर्थपणे करीत आहेत. याच परंपरेतील एक आहे डिचोलीचे नूतन वाचनालय. त्याची ही यशोगाथा – शंभर वर्षांपूर्वी डिचोली परिसरात वाचनालयाच्या अभावामुळे वाचकांना पुस्तकांसाठी शहराबाहेर जावे लागायचे. ज्ञान आत्मसात करण्याबरोबरच फावल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी वाचन हे महत्त्वाचे साधन ... Read More »

२०१९ च्या भुताचा राजकारण्यांमध्ये संचार

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) हे घुसखोर बांगलादेश सीमेला लागून असलेल्या राज्यांतच नव्हे तर संपूर्ण देशातच पसरलेले आहेत. त्यांना हुडकून काढून ते मतदानात भाग घेऊ शकणार नाहीत, या देशाच्या संसाधनावर डल्ला मारु शकणार नाहीत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणतेही अराष्ट्रीय कृत्य करु शकणार नाहीत एवढी काळजी तर कुठल्याही सरकारने घ्यायलाच हवी. २०१९ ची लोकसभा निवडणूक व्हायला अद्याप नऊ महिन्यांचा अवधी आहे. ... Read More »

पंतप्रधानपदाचा प्रश्न मोकळा, कॉंग्रेसचा सापळा

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) एखाद्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देऊन सरकार चालविण्यात मात्र असहकार करायचा हे कॉंग्रेसचे जुनेच धोरण आहे आणि त्या धोरणाचा सूत्रपात इतर कुणी नव्हे तर पक्षाच्या सर्वांत शक्तिशाली नेत्या म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या स्व. इंदिराजींनीच केला आहे. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाची संयुक्त उमेदवारी आणि कोणत्याही स्थितीत मोदींचा पराभव यापैकी कशाला प्राधान्य द्यायचे ... Read More »

मिलिटरी कॅन्टोन्मेंटस् बंद करावीत का?

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) देशातील सर्व मिलिटरी कॅन्टॉनमेन्टसचे उच्चाटन करून त्या जागेच्या विक्रीतून येणारी रक्कम स्थलसेनेच्या आधुनिकीकरणासाठी देण्यात यावी अशी विनंती सेनेने संरक्षण मंत्रालयाला केली आहे. या बातमीमुळे निवृत्त सैनिक व उर्वरित स्थलसेनेत वादळ निर्माण झाले आहे. राजनेते, राजकारणी आणि बिल्डर माफियांचे संगनमत आणि सांगडीमुळे भूतकाळातही असे प्रयत्न झाले होते. पण ते हाणून पाडण्यात आले. यावेळीही असेच होईल का? प्लासीची ... Read More »

त्यांचा माणूस म्हणून विचार व्हावा…

देवेश कु. कडकडे (डिचोली) समज – गैरसमजांची किल्मिषे दूर झाली तरच समाजाची स्वीकृती मिळते. या वेगळे जीवन जगणार्‍या समाजाने, माणसानी माणसांशी माणसांसारखे वागावे एवढी माफक अपेक्षा एका मोठ्या समाजाकडून बाळगणे गैर नाही. सध्या भारतासह संपूर्ण जगात समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता देण्यासंबंधी चळवळ जोर धरत आहे. याला विरोध करणारा मोठा वर्ग कडाडून टीका करीत आहे, तर समलिंगी समुदाय आपला मानवी हक्क ... Read More »

मोदींच्या आफ्रिका दौर्‍याचे महत्त्व

शैलेंद्र देवळाणकर संपूर्ण जगाचे लक्ष आङ्ग्रिकेकडे लागलेले आहे. आङ्ग्रिकेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जगातील मोठ्या देशांत स्पर्धा सुरू आहे. आज चीन हा आङ्ग्रिकेचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार असला तरी या देशांना भारताविषयी आदरभाव आहे. अनेक वर्षांपासून भारताचे आङ्ग्रिकेशी सौहार्दपूर्ण संबंध आहेत. याचा ङ्गायदा भारताने करून घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सध्याचा आफ्रिका दौरा महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ... Read More »

माहिती अधिकाराची धार बोथट करण्याचा प्रयत्न

ऍड. असीम सरोदे माहितीचा अधिकार या कायद्यात बदल करण्याचा सरकारचा विचार असून त्यासंबंधीचे दुरुस्ती विधेयक सर्व प्रक्रियांना वळसा घालत संसदेच्या ताज्या अधिवेशनात पटलावर मांडण्यात येणार आहे. ही पावले धोक्याची सूचना देणारी आहेत. मुळातच ज्यामध्ये चर्चा करावी लागणार नाही अशीच प्रक्रिया हे सरकार वापरत आहे. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात माहितीच्या अधिकार कायद्यात दुरुस्ती सुचविणारे विधेयक केंद्र सरकारतर्फे मांडण्यात आले. अधिवेशनाच्या कामकाजाची यादी ... Read More »

न विसरता येणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विष्णू सूर्या वाघ

अवधूत शिरोडकर (कार्मीभाट – मेरशी) अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे श्री. विष्णू सूर्या वाघ गेली दोन वर्षे आजारी आहेत. त्यातून ते हळूहळू सावरत आहेत. वाघ पुन्हा पूर्णपणे बरे व्हावेत आणि साहित्य, संस्कृती, राजकारण, समाजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्यांची तोफ धडधडावी अशीच गोमंतकाची इच्छा आहे. आज २४ जुलै हा वाघ यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृती जागविणारा लेख – आपले सर्वांचे जिवाभावाचे सांत आंद्रे मतदारसंघाचे ... Read More »

कारगिल ः युद्ध आणि प्रश्न

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) कारगिल विजय दिनाचा १९ वा वर्धापन दिन येत्या २६ जुलै रोजी साजरा केला जाईल. या युद्धात भारताचे ४७४ सैनिक धारातीर्थी पडले आणि ११०९ गंभीर जखमी झालेत. पाकिस्तानची हानी यापेक्षा कितीतरी जास्त होती. तथापि, या युद्धादरम्यान निर्माण झालेले काही प्रश्‍न आजही अनुत्तरितच राहिले आहेत. पाकिस्तानला योग्य धडा शिकवून काश्मीर प्रश्‍नाचे आपल्याला हवे असलेले उत्तर शोधण्याची हाती आलेली ... Read More »

भटका समाज बनतोय झुंडशाहीचा बळी

देवेश कु. कडकडे (डिचोली) व्हॉटस्‌ऍप, फेसबुक, ट्विटरवर पसरणारी सर्व माहिती खरीच असते हा समज आपला समाज आज अपरिपक्व असल्याचे लक्षण आहे. जमावाची असुरक्षिततेची भावना इतकी तीव्र असते की, त्यातून विवेकशक्ती क्षीण होऊन आपल्या कचाट्यात सापडलेल्या संशयिताला पोलिसांच्या स्वाधीन न करता हिंसक मार्ग अवलंबून एका झटक्यात न्यायनिवाडा करतात.. आज सर्वत्र सवार्र्ंच्या मनात असुरक्षिततेच्या भावनेने धडकी भरली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे परप्रांतियांच्या येणार्‍या ... Read More »