ब्रेकिंग न्यूज़

लेख

मुफ्तींपासून भाजपने मुक्तीच घ्यावी

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव सध्या चालू असलेल्या संसदेच्या दोन्ही सभागृहांत देशद्रोह तसेच अनेक गुन्ह्यांप्रकरणी तुरुंगात असलेल्या मसरत आलम याची जम्मू-काश्मीर सरकारने सुटका केल्याप्रकरणी प्रचंड गदारोळ माजला व कामकाज तहकूबही करण्यात आले, त्यामुळे हा विषय देशभर चर्चेचा झालेला विषय आहे. लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही विरोधकांच्या तीव्र व तडाखेबाज विरोधामुळे निवेदन करणे भाग पडले. असे असले ... Read More »

निवृत्ती वेतनधारकांसाठी योजना व उपक्रम

केंद्र सरकारच्या कर्मचारी, सार्वजनिक गार्‍हाणी व निवृत्ती वेतन या कामासाठी एक विशेष विभाग वर्ष १९८५ पासून कार्यरत आहे. केंद्र सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्ती लाभासंबंधी धोरणे ठरविणे व त्यातील लाभाबाबत समन्वय घडवून आणणे ही कामे या विभागातर्फे केली जातात. आज निवृत्तीधारकांची संख्या ५५ लाखांपेक्षा जास्त आहे. ती कर्मचार्‍यांच्या एकूण संख्येपेक्षा जास्त आहे. या विभागाने अलीकडेच काही नवे उपक्रम निवृत्ती वेतनधानकांसाठी सुरू केले. ... Read More »

कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी प्रदेशाध्यक्षांच्या शोधात

राज्यात सध्या कॉंग्रेसला अधिकाधिक वाईट दिवस येत आहेत. ज्या पद्धतीने पक्षाची यंत्रणा काम करीत आहे, ते पाहता पक्ष संघटना मजबूत होण्याची स्वप्नेच पक्षनेत्यांना पाहावी लागतील असे वाटते. आपल्याला पक्षातून काढून टाकण्यात येत नाही म्हणून दुःख होत आहे अशी प्रतिक्रिया सांताक्रूझ मतदारसंघाचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी व्यक्त करून कहरच केला. अखेर त्यांची इच्छा सफल झाली. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सहा ... Read More »

सीमासुरक्षेबाबत हवे गांभीर्य

भारत-बांगलादेश सीमेची पश्‍चिम बंगालमधील लांबी २२१६ किमी, आसाममधील लांबी २६३ किमी, मेघालयमधील लांबी ४४३ किमी त्रिपुरामधील लांबी ८५६ आणि मिझोराममधील लांबी ३१८ किमी आहे. ही सीमा बंदिस्त करणे ङ्गार कठिण आहे. कारण काही ठिकाणी डोंगराळ भाग आहे, त्याची उंची १००० ङ्गुटांपासून ३५०० हजार ङ्गुटांपर्यंत आहे. काही ठिकाणी घनदाट जंगले आहेत. तसेच एक तृतियांश सीमा नदी, नाले आणि ओढ्यांनी भरलेली आहे. ... Read More »

‘वंदे मातरम्’ : कौतुक आणि सूचनाही!

– चिंतामणी रा. केळकर, आसगाव ‘कृतार्थ’ म्हार्दोळ या संस्थेची ‘वंदे मातरम!’ ही महानाट्यनिर्मिती अतिशय उत्कृष्ट वाटली. या महानाट्याचे ‘कृतार्थ’ ने पेललेले शिवधनुष्य गोमंतकाचे नाव जगभर करील. ‘जाणता राजा’ या महानाट्याची स्फूर्ती घेऊन गोव्यात ‘संभवामि युगेयुगे’ अवतरले. मध्यंतरी साईबाबांवरील महानाट्य गोमंतकातील रसिकांना पाहण्याचे भाग्य लाभले. ‘अथपासून इतिपर्यंत सर्वांगसुंदर महानाट्याविष्कार’ असे वर्णन ‘कृतार्थ’च्या ‘वंदे मातरम’बद्दल करावेच लागेल. आदित्य जांभळे या साधारण बाविशी ... Read More »

डॉक्टरऐवजी सॉफ्टवेअर

नवे वर्ष सुरू होऊन पाहता पाहता दोन महिने उलटले. तरीही गेल्या वर्षात काय घडले आणि नवीन वर्षात काय घडणार ह्याबाबतची चर्चा आणखी काही काळ चालू राहीलच. तांत्रिक प्रगतीच्या संदर्भात, ङ्गक्त २०१५ मध्येच नाही तर, एकंदरीत नजीकच्या भविष्यात – म्हणजे येत्या दशकात – काय घडू शकेल ह्याचा अंदाज घेण्याच्या प्रयत्नांकडे आपण एक नजर टाकू. अर्थात ‘तांत्रिक प्रगती’ हा ङ्गारच सर्वसमावेशक शब्दप्रयोग ... Read More »

धार्मिक सहिष्णुता एकतर्फी नसावी

 – मारूती अवदी, पणजी एकविसाव्या ख्रिस्ती शतकात ख्रिस्ती सत्ताधीश आणि धर्माधीश हिंदू समाजाला सर्वधर्मसमभावाचे आणि धार्मिक सहिष्णुतेचे उपदेश करतात आणि आपल्या राष्ट्रातील धूर्त धर्मनिरपेक्ष त्यांच्यापुढे नंदीबैलांप्रमाणे माना हलवतात. जगातील ख्रिस्ती आणि मुस्लिम राष्ट्रांत सर्वधर्मसमभाव आणि धार्मिक सहिष्णुता अस्तित्वात आहेत का? प्रत्यक्षात ख्रिस्ती आणि मुस्लीम राष्ट्रांचे धार्मिक धोरण काय आहे? धर्माचा जागतिक इतिहास दोन मुद्दे स्पष्ट सांगतो. जगात अनेक धर्म आहेत, ... Read More »

उदयपूरच्या ज्येष्ठ नागरिक अधिवेशनाच्या निमित्ताने

– म. कृ. पाटील, साखळी आपल्या देशातील पर्यटकांचे आकर्षण असलेले राज्य म्हणजे राजस्थान. राजस्थान राज्याचे नंदनवन, पर्यटकांचा स्वर्ग, सरोवरे, तलावांची नगरी आणि पर्वतराजीने युक्त स्वर्गभूमी अशा विविध विशेषणांनी अलंकृत नगरी म्हणजे ‘उदयपूर’. एकेकाळी मेवाडची राजधानी असलेले हे शहर. ‘मेवाड’ हा शब्द उच्चारताच मनचक्षूंसमोर महाराणाप्रताप, त्यांचा अश्‍व चेतक आणि हळदीघाटीच्या रणसंग्रामाचे चित्र साकारते. ऐतिहासिक महान परंपरांची पार्श्‍वभूमी आणि प्राकृतिक सौंदर्याची किनार लाभलेल्या ... Read More »

पारंपरिक स्वरूप हरवलेला शिगमोत्सव!

गोवा राज्यात साजर्‍या होणार्‍या प्रमुख उत्सवांपैकी शिगमो हा एक उत्सव. वर्षभर कष्ट करून थकल्या-भागल्यानंर उसंत घेऊन मौज-मजा करण्याचा कष्टकरी लोकांचा उत्सव. कष्ट करून धान्य घरात आल्यामुळे उदर भरण्याची चिंता मिटलेली असते. त्यामुळे आनंदी होऊन मनसोक्तपणे सर्वजण एकत्र येऊन गावात उत्साही वातावरण निर्मिती करणारा असा हा शिगमोत्सव! लवकरच येणार्‍या वर्षा ऋतूची चाहूल देणारा! निसर्गामध्ये होणार्‍या ऋतू बदल, वातावरण हवामान बदलामुळे माणसाच्या ... Read More »

संरक्षण सिद्धतेला बळ देणारा अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात संरक्षण खात्यासाठीची तरतूद जवळपास १२ टक्क्यांनी वाढल्याचे दिसत आहे. जुलै २०१४ मध्ये जेटली यांनी जो अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता, त्यातील संरक्षण खात्याची तरतूद पाहिल्यावर या अर्थसंकल्पात संरक्षणासाठीची तरतूद भरीव म्हणजे ११ ते १२ टक्क्यांनी वाढली आहे. या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठीची तरतूद २ लाख ४६ हजार ७२७ कोटी एवढी आहे. अर्थसंकल्प हा केंद्र सरकारच्या ... Read More »