ब्रेकिंग न्यूज़

लेख

एक देश, एक निवडणूक ः चर्चा का गरजेची?

शैलेंद्र देवळाणकर निवडणूक आयोगाने जरी २०१९ मध्ये ‘एक देश एक निवडणूक’ ही संकल्पना अमलात आणणे शक्य नसल्याचे सांगितले असले तरी यानिमित्ताने देशभरात चर्चा होणे आवश्यक आहे. कारण भारतीय स्वातंत्र्यानंतर घडणारी ही सर्वांत मोठी निवडणूक सुधारणा असेल. म्हणूनच यासाठी राष्ट्रीय सहमती तयार करणे अत्यंत गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक देश एक निवडणूक’ या संदर्भात चर्चा होऊन राष्ट्रीय पातळीवर या ... Read More »

भारतापुढील समस्या आणि आव्हाने

  देवेश कु. कडकडे (डिचोली) आपण अजूनही रूढवादी मान्यता, प्रथांचा नकारात्मक दृष्टीकोन फेकून देऊन समानता आणि बंधुभावाच्या सिद्धांन्तावर विश्‍वास ठेवत नाही. आज आपल्या देशाला सर्वात जास्त आवश्यकता आहे ह्या भावनात्मक शुद्धीकरणाची. पंतप्रधान मोदींनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून देशवासियांना संदेश देताना आपल्या साडेचार वर्षांच्या कारकीर्दीचा लेखाजोगा मांडला. भविष्यातील आव्हानांचा आलेख मांडताना रोजगार, महिला सुरक्षा, देशातील अंतर्गत सुरक्षा, काश्मीर प्रश्‍न, यावर भर ... Read More »

अजातशत्रू अटलजी

अशोक टंडन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी भारताच्या इतिहासातील एक महान नेते होते. अत्यंत हुशार, संवेदनशील, मृदुस्वभावी आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांची ओळख देशाला आहे. संघ परिवारापलीकडे अनेक विचारांच्या, अनेक पक्षांच्या नेत्यांशी वाजपेयी यांची घट्ट मैत्री होती. अटलजींनी आपल्या वर्तनातून मैत्री कशी असावी याचा आदर्श अनेक रूपांत ठेवला आहे. भारतीय राजकारणातील अटलजींचे स्थान ... Read More »

अटलबिहारी वाजपेयी ः एक असामान्य नेतृत्व

शेषाद्री च्यारी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत आणि बाहेर, गद्यात आणि पद्यात, देशांतर्गत आणि पररष्ट्र व्यवहारात प्रत्येक ठिकाणी न पुसता येणारा ठसा उमटवला. संसदेत प्रवेश झाल्यापासून, वाजपेयींच्या विचार करायला लावणार्‍या आणि विनोदप्रचुर भाषणांनी संसदेतील वरीष्ठ सदस्यांची मने जिंकली. वाजपेयींसारखे नेते कोणत्याही नेहमीच्या व्याख्यांमध्ये बसत नाहीत. तेच नेतृत्वाची व्याख्या असतात… भारतीय जनता पक्षाचा सत्तेपर्यत पोहोचण्याचा इतिहास अटलबिहारी ... Read More »

कलम ३५ अ ः फेरविचाराची गरज का?

शैलेंद्र देवळाणकर भारतीय राज्यघटनेतील कलम ३५ (अ) हे केवळ भारतीय नागरिक व काश्मिरी निवासी यांच्यातील भेदाभेद करणारे नाही तर खुद्द काश्मिरमधील निवासी लोकांनाच असमानतेची वागणूक देणारे व विषमतेवर आधारित आहे. या कलमामुळे काश्मीरमधील निवासी महिला, तेथील मागासवर्गीय वाल्मिकी समाज व पंजाबी अल्पसंख्यांक यांच्यावर अन्याय होत असल्यामुळे या कलमावर पुनर्विचार होणे गरजेचे आहे. काश्मीरसंदर्भात लागू करण्यात आलेले कलम ३५ (अ)े वगळायचे ... Read More »

तत्त्वनिष्ठ राजकारणी सोमनाथ चटर्जी

सुहास साळुंखे साधेपणा आणि कर्तव्याप्रती प्रामाणिकता ही सोमनाथ चटर्जी यांच्या व्यक्तिमत्त्वाची मुख्य वैशिष्ट्ये होती. तत्त्वनिष्ठ राजकारणी असा त्यांचा लौकीक होता. त्यांनी तत्त्वासाठी कधीही तडजोड केली नाही. वेळोवेळी विरोधकांवर कडक टीका करतानाही त्यांनी विरोधकांशी कधी कटूता निर्माण होऊ दिली नाही. त्यांच्या जाण्यानं आपण एका उत्तम, कर्तव्यकठोर तसंच तत्त्वनिष्ठ राजकारण्याला मुकलो आहोत. माजी लोकसभाध्यक्ष सोमनाथ चटर्जींच्या निधनानं एक उत्तम लोकसेवक गमावल्याची भावना ... Read More »

न्यायपालिकेतील आणखी एक निरर्थक विवाद

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) प्रश्न फक्त एवढाच आहे की, न्यायपालिकेने आपले अंतर्गत मतभेद कसे हाताळावेत? आपापले निर्णय देण्यात तर ही मंडळी पूर्णपणे मोकळी आहेत. सरन्यायाधीशाशी त्यासंदर्भात असलेली मतभिन्नता तर ते निर्णयातूनच नोंदवू शकतात व त्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. मुंबई येथील सी.बी.आय. न्यायालयाचे दिवंगत न्यायाधीश बी.एच. लोया यांच्या तथाकथित हत्येचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या कसोटीवर निकालात काढल्यानंतरही भारताच्या न्यायपालिकेला बदनाम ... Read More »

विधानसभेतील मंथन आणि चिंतन…

शंभू भाऊ बांदेकर जेव्हा जनता ‘सरकार शिरजोर अन् विरोधक कमजोर’ असे दृश्य बघते, तेव्हा जणू जनतेच्या पायाखालची जमीन हलू लागते. त्याच्यात शिक्षण, आरोग्य, उद्योग, नोकर्‍या आणि प्रादेशिक आराखडा असे जनतेच्या जीवनात प्रत्यक्ष डोकावणारे विषय असतील तर ती अधिक सतर्क असते. जुलै महिन्यातील एक महत्त्वाची राजकीय घटना म्हणजे लोकसभेत नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात मांडला गेलेला अविश्‍वास ठराव ही होय. तसा तो ... Read More »

घुसखोरांना कठोर संदेश

– शैलेंद्र देवळाणकर नॅशनल रजिस्टर ऑङ्ग सिटीझन्सच्या दुसर्‍या यादीमध्ये आसाममधील ४० लाख जणांना बाहेर ठेवण्यात आल्यामुळे सध्या बराच गदारोळ माजला आहे. हा मुद्दा प्रामुख्याने बांगलादेशी घुसखोरीशी निगडित असून तो राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा आहे. कारण या निर्वासितांना भारतात घुसवण्यात ङ्गार मोठी भूमिका पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयची आहे. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित कऱणे गरजेचेच बनले आहे. ३१ जुलै रोजी ... Read More »

मराठा आरक्षणाच्या मागणीमागचे वास्तव

ऍड. असीम सरोदे आपण खाजगी नोकर्‍या तयार करु शकलो नाही. नोकर्‍यांचे प्रमाण आणि शक्यता वाढवल्या नाहीत आणि त्याच वेळी सरकारी नोकरीत असलेल्या कामाच्या प्रमाणापेक्षा जास्त पगार देण्याची पद्धती स्वीकारली. सरकारी कर्मचार्‍यांचे लांगूलचालन सर्वांनीच केले आहे. त्यातूनच नवे प्रश्‍न जन्माला आले असून ते जटिल बनत चालले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन निघालेल्या मोर्च्यांना झालेली गर्दी विचारात घेता हा प्रश्‍न म्हणून खूप महत्त्वाचा ... Read More »