ब्रेकिंग न्यूज़

लेख

१९७१ च्या युद्धातील ‘आभासी भूत!’

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) पाकिस्तानवरील देदीप्यमान विजयाला नुकतीच ४७ वर्षे पूर्ण झाली. या प्रदिप्त विजय गाथेमध्ये भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सनी (एसएसएफ) मोलाची भूमिका निभावली होती. त्याचाच एक भाग असलेल्या कर्नल अभय पटवर्धनांकडून ऐका त्या विजयाची कहाणी… १९७० मध्ये झालेल्या पाकिस्तान सिनेटच्या सार्वत्रिक निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवलेल्या वंग बंधू मुजिबुर रहमान यांच्या पंतप्रधानपदाची मागणी राष्ट्रपती जनरल याह्याखान यांनी परराष्ट्र मंत्री झुल्फिकार ... Read More »

अंजदीव बेटावरची नौदलाची कारवाई

कृष्णा शेटकर (माजी नौसैनिक) गोव्याचा मुक्तिदिन नुकताच साजरा झाला. गोवा मुक्त करण्यात भारतीय लष्कराबरोबरच नौदलाचेही महत्त्वाचे योगदान होते. अंजदीव बेटावरच्या मोहिमेत भाग घेतलेले गोमंतकीय नौसैनिक कृष्णा शेटकर सांगत आहेत त्या थरारक मोहिमेची कहाणी.. १९५५ साली भारताच्या विविध भागांतून हजारो जण गोवा पोर्तुगिजांपासून मुक्त करण्याकरिता सत्याग्रही म्हणून गोव्यात आले. पूज्य ना. ग. गोरे, सुधाताई जोशी, मधु दंडवते, मोहन रानडे यांच्यासारखे भारतीय ... Read More »

कुलभूषण जाधवच्या आडून पाकिस्तानची खेळी

शैलेंद्र देवळाणकर पाकिस्तानने भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी व उद्योगपती कुलभूषण जाधव यांची त्यांच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणली आहे. मात्र, यामागेही त्याचा कुटिल डाव आहे आणि तो ओळखून भारताने सावध राहिले पाहिजे… भारताचे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव काही महिन्यांपूर्वी व्यवसायानिमित्त इराणमध्ये गेले असता तेथून पाकिस्तानमधील आयएसआय या गुप्तचर संस्थेकडून त्यांचे अपहरण कऱण्यात आले. त्यांना गुप्तहेर ठरवून पाकिस्तानने मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची ... Read More »

भाजपाचा गुजरातमधील ‘चिंताजनक’ विजय

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) या विजयाचे महत्त्व कमी करण्याचा माझा हेतू निश्चितच नाही, पण हा विजय असाही नाही की, त्याचे गोडवे गाऊन पक्षाने २०१८ किंवा २०१९ बाबत निश्चिंत व्हावे. आपण स्वीकारलेल्या मतदानप्रणालीमुळे या विजयाला विजय म्हणता येईल एवढेच त्याचे महत्त्व ‘शेवटी विजय हा विजयच असतो’ किंवा ‘जो जिता वही सिकंदर’ या उक्तीनुसार गुजरात विधानसभा निवडणुकीतील भाजपाचा विजय हा शंभर टक्के ... Read More »

भारतीय भाषांना अग्रस्थान मिळायला हवे

देवेश कडकडे गेल्या दोन तीन दशकांपासून भारतीय भाषांच्या अस्तित्वासाठी मोठा संघर्ष चालू आहे. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचा व्यवसाय झाला आहे. आज आपल्या भाषा तथा लिपी नष्ट तसेच भ्रष्ट करण्यासाठी मोठे सूक्ष्म अभियान चालवले आहे… लोकशाही शासनव्यवस्थेत लोककल्याण हे प्रथम उद्दिष्ट आहे. गांधीजींनी लोककल्याणाच्या ज्या संकल्पना मांडल्या, त्यात अगदी खालच्या वर्गाचे हित जपण्यास प्रमुखता होती आणि त्याच्या पूर्ततेसाठी शिक्षण आणि प्रशासनात प्रादेशिक ... Read More »

देरसे आये पर दुरुस्त आये…

ऍड. असीम सरोदे आमदार-खासदारांवरील फौजदारी खटले लवकर निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करण्याची केंद्र सरकारने प्रस्तावित केलेली योजना सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली असून येत्या १ मार्चपासून ही न्यायालये सुरू केली जावीत, असा आदेश दिला आहे. त्यानिमित्ताने… देशामध्ये १९९० च्या दशकामध्ये कलंकित लोकप्रतिनिधींबाबत काही तरी इलाज करायला हवा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली होती. १९९६ च्या निवडणुकीमध्ये एकूण १.३७ लाख ... Read More »

‘आयसिस’विरुद्धचा संघर्ष संपला, युद्ध कायम

शैलेंद्र देवळाणकर इराकने आयसिसविरुद्धचे युद्ध संपले असल्याचे जाहीर केले आहे. ही बाब आशादायक असली तरी आयसिसचा धोका अद्यापही कायम आहे. इराकनंतर ही संघटना अन्यत्र आपला मोर्चा वळवेल यात शंका नाही… इराकचे पंतप्रधान हैदर अलाहाबादी यांनी इराक हा देश आयसिस मुक्त झाल्याची घोषणा नुकतीच केली आहे. ही ऐतिहासिक स्वरुपाची घोषणा आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेला हा संघर्ष आता संपुष्टात आल्याचे ... Read More »

पोर्तुगीजधार्जिण्यांना पार्सल बॉम्ब पाठवणारे पॉली

ऍड. पांडुरंग नागवेकर गोव्याच्या मुक्तीलढ्यात असंख्य ज्ञात अज्ञात वीरांचे योगदान राहिले आहे. पोर्तुगीजधार्जिण्यांना पुस्तकातून बॉम्ब असलेली पार्सले पाठवून जरब बसवणारे चिंचोणे येथील पॉलीकार्पो दा सिल्वा हे असेच एक वीर. आजच्या गोवा मुक्तिदिनानिमित्ताने त्यांचे स्मरण – आंतोनियो रुझारिओ पॉलिकार्पो तेओदोसिओ दा सिल्वा ऊर्फ पॉली हे चिंचोणे या गावचे सुपुत्र. मोठ्या कर्तृत्वामुळे ते गोमंतकाचे व भारतमातेचे सुपुत्र बनले. त्यांचे पूर्वज चिंचोणे गावचे ... Read More »

एक्झिट पोल किती विश्वसनीय?

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) पोलचे निष्कर्ष आपल्या पक्षाला अनुकूल असले तर राजकीय पक्ष ते लगेच मान्य करतात अन्यथा ते फेटाळण्याचीच वृत्ती अधिक दिसते. अर्थात ते अंदाजच असल्याने एक्झिट पोलचे निष्कर्ष चुकतातही… गुरुवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकींच्या एक्झिट पोल्सचे निष्कर्ष जाहीर झाले असले तरी या निवडणुकींचे निकाल मात्र आज सोमवार दि. १८ डिसेंबर रोजी लागणार असल्याने या निष्कर्षावर चर्चा ... Read More »

एका गोमंतकीय विद्यार्थ्याची कैफियत

शशिकांत अ. सरदेसाई मुंबईत इव्हेंट मॅनेजमेंटचे उच्च शिक्षण घेणारा माझा नातू गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाचा अनुभव घेण्यासाठी गोवा मनोरंजन संस्थेकडे आला, परंतु त्याला आलेला अनुभव मात्र कटू होता… अठ्ठेचाळीसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता झाली आणि त्या महोत्सवाच्या आयोजनातील त्रुटींबाबत वेगवेगळ्या माध्यमांतून अनेक मंडळांनी आपली नाराजी व्यक्त केली. सदर चित्रपट महोत्सव गेली चौदा वर्षे गोव्यात होत आहे. एव्हाना या ... Read More »