ब्रेकिंग न्यूज़

लेख

रोहिंग्यांची ऐतिहासिक परत पाठवणी…

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने एक ऐतिहासिक स्वरुपाचा निर्णय घेत म्यानमारमधून येऊन भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्‍या ७ रोहिंग्या मुस्लिमांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला. ही घटना ऐतिहासिक मानण्याचे कारण म्हणजे पहिल्यांदाच भारताने अशा प्रकारे रोहिंग्यांना परत पाठवले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी भारत सरकारने म्यानमार शासनाकडे सातही जणांची माहिती पाठवली होती आणि त्यांचे वास्तव्य म्यानमारमध्येच असल्याची खातरजमा केली होती. म्यानमार सरकारने ... Read More »

सायबर गुन्हे, कायदे आणि आपण

इंटरनेट-डिजिटल क्रांतीमुळे एका क्लिकवर सर्व जग सामावले गेले आहे. मित्र, नातेवाईकांशी चॅटिंग करण्याबरोबरच खरेदी, बॅकिंग व्यवहार या सर्व गोेष्टी एका बटणावर सामील झाल्या आहेत. मात्र जगाला कवेत घेणारे इंटरनेट हे आपले जगही बदलू शकते. सोशल मीडियावर केलेली गडबड आपल्या अंगलट येऊ शकते. या गोष्टींबाबात आजही वापरकर्ते अनभिज्ञ आहेत. आज सायबर गुन्हे वेगाने वाढत असताना नागरिक मात्र त्याकडे कानाडोळा करताना दिसून ... Read More »

शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते सुदृढ हवे

 देवेश कु. कडकडे (डिचोली) पावित्र्य, सदाचार, विश्‍वास, ज्ञान, सुख आदी सगळ्या शब्दांचा पर्याय हा शिक्षकच आहे. नैतिकता आणि चारित्र्य हेच शिक्षकांचे खरे भांडवल असते. तेच संपन्न असले पाहिजे. उद्याच्या शिक्षक दिनानिमित्त – भारताचे माजी राष्ट्रपती, थोर तत्वज्ञ आणि शिक्षकांचे आदर्श डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती उद्या ५ सप्टेंबरला ‘शिक्षक दिन’ म्हणून देशात सर्वत्र साजरी केली जाते. खरा आदर्श शिक्षक कसा ... Read More »

नवज्योतच्या गळाभेटीने पेटवली संतापाची ज्योत!

शंभू भाऊ बांदेकर पाकिस्तानशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत असे वाटणार्‍या भारतीयांची व भारताशीही मैत्रिपूर्ण वातावरण निर्माण व्हावे असे वाटणार्‍या पाकिस्तानी नागरिकांची संख्याही बरीच मोठी आहे. पण ते संबंध लष्करप्रमुखांशी गळाभेट घेऊन कसे दूर होतील, हे मात्र न सुटणारे कोडे आहे क्रिकेटमधून निवृत्त होऊन राजकारणात प्रवेश केलेल्या इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर आरूढ होऊन आता आपली सक्रिय राजकीय इनिंग सुरू केली ... Read More »

काश्मीरमधले नवे आव्हान

शैलेंद्र देवळाणकर जम्मू-काश्मीरमध्ये सत्यपाल मलिक यांनी नवे राज्यपाल म्हणून कार्यभार हाती घेतला असला तरी ताज्या दोन घटनांमुळे त्यांच्यापुढील आव्हानांमध्ये भर पडली आहे. बकरी ईदच्या दिवशी श्रीनगरमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये इस्लामिक स्टेटचे झेंडे ङ्गडकावले गेले. हा पाकिस्तानचा सुनियोजित कट असून भारताला बदनाम करण्याचा डाव आहे. त्याचा मुकाबला करावा लागेल. ही नक्कीच चिंताजनक बाब आहे. काश्मिरसंदर्भात गेल्या काही दिवसांमध्ये तीन अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी ... Read More »

पर्यावरणाचा मान राखलाच पाहिजे

देवेश कु. कडकडे (डिचोली) आपण यशस्वी पर्यायी विकासाचा वेध न घेता पर्यावरणाच्या हानीकडे दुर्लक्ष करून अल्पवेळात ज्या क्षेत्रातून पैसा खुळखुळतो तेच क्षेत्र निवडण्याकडे भर देतो. हे असेच चालू राहिले तर निसर्गाच्या हिरव्यागार सान्निध्यात मिळणारी सुख, शांती आणि गारवा हरवून बसू. मानवी जीवनात पर्यावरणाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे, याची आपल्याला आता विविध घटनांमधून जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अनेक संस्था ... Read More »

मयुरेश वस्त ः विसरू म्हणता विसरेना…

तबलावादक, प्रतिभासंपन्न संगीतकार मयूरेश वस्त याची स्मृती जागवणारा ‘मयुरेश स्मृती विशेष’ हा कार्यक्रम सम्राट क्लब, पर्वरी आणि मयूरेशच्या मित्रमंडळीतर्फे दि. २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ३ वा. पासून कला अकादमी येथे होणार आहे. त्यानिमित्त मयूरेशचा जवळून सहवास लाभलेल्या कलाकारांनी जागविलेल्या या आठवणी… हरहुन्नरी प्रतिभाशाली युवा कलाकार मयुरेश वस्त १२ जुलै रोजी आम्हाला एकाएकी सोडून गेला. त्याचे जाणे एवढे धक्कादायक होते की, ... Read More »

वाजपेयी आणि मोदी

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) दोन व्यक्तींची तुलनाच होऊ शकत नाही. अटलजी आणि मोदीही त्याला अपवाद असू शकत नाही. त्याचे कारण त्यांची योग्यता हे नाही. योग्यता कमी जास्त असू शकते पण त्यांच्या कार्यकाळातील परिस्थितीत प्रचंड अंतर हे त्यामागील कारण असते. दोन व्यक्तींची तुलना होऊ शकत नाही आणि कोणी तसे करण्याचा प्रयत्न केला तर ते चुकीचेच नव्हे तर हास्यास्पदही ठरते, असे माझे ... Read More »

का गेले आहेत सैनिक न्यायालयात?

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) अफस्पा कायद्यांतर्गत दहशतवादी किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांविरुद्ध कारवाई केल्यास जबाबदार सेनाधिकारी आणि जवानांच्या मागे सीबीआय आणि राज्य पोलिसांच्या एफआयआर आणि न्यायालयीन खटले यांचा ससेमिरा लागत आहे. या कारवाईमुळे सैनिकांना घटनेने प्रदान केलेल्या मूलभूत अधिकारांवर गदा आली आहे. ते अधिकार परत मिळवण्यासाठी सैनिक सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत… १५ ऑगस्ट २०१८ रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या आपल्या भाषणात पंतप्रधान ... Read More »

केरळची पुनरावृत्ती गोव्यात नको असेल तर…

शंभू भाऊ बांदेकर केरळ राज्याची जी दयनीय अवस्था झाली आहे, त्यातून योग्य तो बोध घेऊन भविष्यात ‘देव करो नि केरळची पुनरावृत्ती गोव्यात होऊ नये’ यासाठी आवश्यक ते सर्व उपाय केले पाहिजेत. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांच्या भल्यासाठी गोवा राज्याचा जुगार मांडू नका गेल्या पंधरा दिवसांपासून केरळ राज्यामध्ये पावसाने जे थैमान घातले आहे, त्यामुळे तेथे अविरत सुरू असलेली अतिवृष्टी व त्यामुळे ... Read More »