ब्रेकिंग न्यूज़

लेख

औरंगाबाद दंगलीचा बोध

ऍड. असीम सरोदे औरंगाबादमध्ये नुकत्याच झालेल्या दंगलीमुळे पुन्हा एकदा सामाजिक एकोप्यावर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. विविध जातींचे, धर्मांचे लोक तेथे एकोप्याने राहात असताना कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारे कोणते समाजघटक अचानक निर्माण होत आहेत आणि समाजात ङ्गूट पाडणारे हे समाजकंटक सातत्याने यशस्वी का होताना दिसताहेत असे प्रश्‍न या घटनेच्या निमित्ताने निर्माण झाले आहेत. मराठवाड्याचे प्रवेशद्वार आणि अलीकडील काळात औद्योगिक क्षेत्रासाठी पसंती ... Read More »

खाणींच्या लिलावाचा २०२० सामना व सरकार

विजय कुमार लिलावाच्या दृष्टीने आजवर झालेला विलंब पाहता आणि ज्यांचा लिलाव झालेला आहे ती खाण लीजेस सुरू होण्यातील विलंब पाहता, असे दिसते की सरकारे जणू २०२० चा सामनाच खेळत आहेत… सध्या क्रिकेटचा सर्वत्र हंगाम आहे. त्यामुळे सगळे काही क्रिकेटच्या परिभाषेत मांडणे अधिक सयुक्तिक ठरेल. दुर्दैवाने सरकारला (राज्य आणि केंद्र) जाणीव नाही की ही २० – २० मॅच आहे. अक्षरशः! सरकारकडून ... Read More »

विधान परिषद निवडणुकांचे अर्थकारण

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) आज विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदानाची पध्दत रुढ आहे. तेथे पक्षाच्या आदेशाला महत्व दिलेले नाही आणि आदेश पाळला की, नाही हे तपासण्याची व्यवस्थाही नाही. ती जर झाली तर निवडणूक पर्यटनाला व त्यावर होणार्‍या अमाप खर्चाला आळा बसण्याची शक्यता आहे. सन २००१ मध्ये गोव्यात असतांना एका रात्री काही वाहनचालकांची मदत घेण्याची गरज पडली. त्यांनीही तत्परतेने ती देऊ ... Read More »

अवास्तव आंतरराज्य बस तिकीट दराला चाप

ऍड. असीम सरोदे उन्हाळी सुट्‌ट्या आणि गर्दीच्या हंगामात प्रवाशंाची अडवणूक करून अवास्तव प्रवास भाडे आकारणार्‍या खासगी बस वाहतूकदारांना आता उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चाप लावला जाणार आहे. खासगी बस वाहतूक कंपन्यांना यापुढे प्रवाशांकडून त्याच तुलनेत तिकीट दर आकारणे बंधनकारक राहील ही समाधानाची बाब आहे. या यशाचे खरे मूल्यमापन मात्र या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात होईपर्यंत करता येणार नाही़ प्रवाशांकडून अवास्तव तिकीट ... Read More »

सलाम सफल युद्धाभ्यासाला!

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) ‘ऑपरेशन गगन शक्ती २०१८’ हा भारतीय वायुसेनेचा मागील तीन दशकांमधला सर्वांत मोठा युद्धाभ्यास होता. माध्यमांनी याकडे ङ्गारसे लक्ष दिलेले नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नुकत्याच झालेल्या चीन भेटीमध्ये चीनी राष्ट्रपती शी जिनपिंगनी त्यांना दिलेली शाही वागणूक या युद्धाभ्यासाचा परिपाक होती असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. १०ते २३ एप्रिल,२०१८ दरम्यान संपन्न झालेले ‘ऑपरेशन गगनशक्ती २०१८’ ... Read More »

युवकांनो, स्वच्छ भारत इंटर्नशीपमध्ये सहभागी व्हा!

नरेंद्र मोदी (भारताचे पंतप्रधान) भारत सरकारच्या क्रीडा, मनुष्यबळ विकास, पेयजल विभाग या तीन-चार मंत्रालयांनी एकत्र येऊन ‘स्वच्छ भारत ग्रीष्मकालीन इंटर्नशिप २०१८’ उपक्रम सुरू केला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, एनसीसीचे, एनएसएसचे तरुण, नेहरू युवा केंद्रातील तरुण, या सर्वांसाठी ही एक संधी आहे माझ्या प्रिय देशबांधवांनो ! नमस्कार, मागील महिन्यात ‘मन की बात’ मध्ये मी देशवासियांना विशेषतः आपल्या युवकांना फिट इंडियाचे आवाहन केले होते ... Read More »

आयसिसचा मोर्चा आता अफगाणिस्तानकडे

शैलेंद्र देवळाणकर इराक आणि सिरियामध्ये नाटो आणि अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमध्ये हजारो योद्धे मारले गेल्यानंतर आयसिसने आता योद्ध्यांचा शोध सुरू केला असून त्यांनी आपला मोर्चा अङ्गगाणिस्तानकडे वळवला आहे. काबूलमध्ये झालेला ताजा बॉम्बस्ङ्गोट हे आयसिसयचे शक्तीप्रदर्शन आहे. इराक आणि सीरियामध्ये इसिसच्या साम्राज्याला उतरती कळा लागली आहे. मोसूलचा पाडाव झाला तेव्हापासून आयसिसच्या साम्राज्याची घसरण खर्‍या अर्थाने सुरू झाली. आजघडीला ही संघटना आखाती प्रदेशात ... Read More »

फाशीसंबंधीचा अध्यादेश अतार्किक

ऍड. असीम सरोदे विशिष्ट वयोमर्यादेपर्यंतच्या मुलींवरील बलात्कारासाठी ङ्गाशीची शिक्षा आणि त्यानंतरच्या वयोगटातील मुलींसाठी-महिलांसाठी वेगळी शिक्षा यामागचा हेतू न उलगडणारा आहे… कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणांनंतर केंद्र सरकारने अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटनांची अत्यंत गंभीर दखल घेत दोषींना कठोर शिक्षा होऊन कायद्याची जरब बसावी, यासाठी पाऊल उचलले आहे. पोक्सो, भादंवि, फौजदारी दंड संहिता व भारतीय पुरावे कायद्यात दुरुस्ती करून नराधमांना कमाल शिक्षा ... Read More »

राजकीय क्षेत्रात गुन्हेगारांचा शिरकाव

देवेश कु. कडकडे कातडी बचाव भूमिका आणि आपल्या नकारात्मक दृष्टीकोनातून आणि राजकारणापासून अलिप्त राहण्याच्या भूमिकेमुळे या अशा लोकांच्या पथ्यावर पडते आणि समाजाला फार मोठी किंमत मोजावी लागते. महात्मा गांधी एकदा म्हणाले होते, मी राजकारणात आहे कारण मी ईश्वराचा उपासक आहे. ईश्वराची उपासना समाजाच्या सेवेखेरीज करता येत नाही आणि समाजाची सेवा राजकारणाखेरीज करता येत नाही. गांधीजींचे हे विचार आज गुंड, मवाली, ... Read More »

महाभियोग हवाच कुणाला?

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) ते उपरोक्त सर्व आयुधांचा उपयोग करीत आहेत याचे अर्थ दोनच. एक म्हणजे २०१९ पर्यंंत मोदीविरोधी वातावरण तापवत ठेवणे आणि दुसरे म्हणजे सरन्यायाधीश मिश्रा यांना अयोध्याप्रकरणी निर्णय देण्यापासून रोखणे. महाभियोग प्रस्तावाचे काहीही झाले तरीही आपली ही दोन उद्दिष्ट्‌ये पूर्ण होतातच याची त्यांना खात्री वाटते.. कॉंग्रेससहित सात पक्षांनी भारताचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्या विरोधात उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू ... Read More »