लेख

आधुनिक जिहादचा संभाव्य आयाम

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) लास वेगासमध्ये पॅडॉकने केलेल्या हल्ल्यामुळे दहशतवादाच्या एकांड्या शिलेदारांना त्याची नक्कल करण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे. हल्ल्याच्या सफलतेला मिळणार्‍या प्रसिद्धीमुळे अशा एकांड्या जिहादी हल्ल्यांची पुनरावृत्ती सर्वदूर होऊ शकते. लास व्हेगासमधील रॉक कन्सर्टमध्ये हॉटेलच्या ३२ व्या मजल्यावरून अंदाधुंद गोळीबार करून ५९ लोकांचे प्राण घेणारा आणि ५७० हून जास्त लोकांना गोळीबाराद्वारे गंभीर जखमी करणारा स्टिफन पॅडॉक आमचा असल्याचे आयसिसने ... Read More »

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भवितव्य काय?

ल. त्र्यं. जोशी शिवसेना काय किंवा मनसे काय, त्या अर्थाने राजकीय पक्षच नाहीत. त्या आहेत कौटुंबिक आणि राजकीय पक्षांच्या रूपातील मालमत्ता. पण राजकीय पक्ष होण्यासाठी कायद्याने निश्चित केलेले निकष ते दोन्ही पक्ष पाळत असल्याने त्यांना राजकीय पक्ष म्हणायचे एवढेच. शिवसेनेने मुंबई महापालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक फोडल्यामुळे त्या महानगरातील राजकारणात कोणता फरक पडेल, ठाकरे बंधूंपैकी कुणाची सरशी होईल हे प्रश्न औत्सुक्याचे ... Read More »

गरज पाकिस्तानविरुद्ध धाडसी कारवाईची

शैलेंद्र देवळाणकर अमेरिकेतील सत्तांतरानंतर पाकिस्तान काहीसा बिथरला आहे. याचे कारण डोनाल्ड ट्रम्प यांची मुस्लिम राष्ट्रांसंदर्भातील भूमिका. अलीकडेच त्यांनी पाकिस्तानवर थेट नामोल्लेख करून दहशतवादाचा पाठिराखा म्हणून टीका केली आहे. इतकेच नव्हे तर जोपर्यंत पाकिस्तान हक्कानी नेटवर्क आणि अन्य दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत आर्थिक मदत स्थगित केली आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान काही नाट्यमय घडामोडी घडताना ... Read More »

ड्रग्जविरोधी बुलंद आवाज हीच काळाची गरज

सुशांत द. तांडेल याच बक्कळ धनाच्या उन्मादाने निर्माण होत असलेल्या देशी-विदेशी दुर्योधनांना वेळीच लगाम घालणे ही काळाची गरज आहे. या दुष्ट दुर्योधनांच्या मोहजाळ्यात अडकलेल्या सामान्यांना मात्र आवरण्या व सावरण्यासाठी पुरेशी संधी देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभल्याने देशी-विदेशी पर्यटकांना अगदी मोहवून टाकणारे आपल्या चिमुकल्या गोव्याचे नयनरम्य समुद्रकिनारे व त्यामुळेच जगभर सुपरिचित झालेले येथील ‘किनारी पर्यटन’ हे आज ‘ड्रग्ज’(मादकपदार्थ) सारख्या ... Read More »

गरज फटाक्यांवरील कायमस्वरुपी बंदीची

ऍड. असीम सरोदे फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आणि देशभरात फटाक्यांविषयीची चर्चा सुरू झाली. मुळात न्यायालयाने केवळ विक्रीवर बंदी न घालता फटाके उडवण्यावरच बंदी घालणे आवश्यक होते… दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआरमध्ये ङ्गटाकेविक्रीला ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदी घालण्याचे आदेश नुकतेच दिले. वस्तुतः हा आदेश मुळात चुकीच्या वेळी दिला गेला आहे. लोकांना सर्वच गोष्टी व्यवस्थापित कऱण्यासाठी वेळ देणे ... Read More »

मालिकांमधून चांगला बोध घेणे गरजेचे

देवेश कु. कडकडे १९७२ साली मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाले. आणि तेव्हापासून दूरदर्शनवर मनोरंजनाची मालिका सुरू झाली. भारतात तेव्हा दूरदर्शनच्या आगमनाने सर्वत्र एक नवीन चैतन्य निर्माण झाले. मोजक्याच घरात दूरदर्शन संच दिसू लागले. त्यामुळे तिथे संध्याकाळी, शेजार्‍यापाजार्‍यांची कार्यक्रम बघण्यास प्रचंड गर्दी लोटायची. चित्रपटगृहात उडणारी झुंबड तिकिटांसाठी लांबलचक रांगा, कधीकधी त्यावरून वादावादी, हणामारी यामुळे प्रेक्षकांना मनस्ताप व्हायचा. त्यावेळी चित्रपट बघणे हा ... Read More »

ओबीओआर आणि भारत

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) भारताने बीजिंग परिषदेवर बहिष्कार टाकण्यामागे काही प्रमुख कारणे होती. १) चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी प्राचीन आर्थिक तज्ञ झांग क्विआनच्या चीनला सेंट्रल आशिया आणि अरबस्तानशी जोडणार्‍या २००० वर्षे जुन्या सिल्क रोडला पुनर्जिवीत करण्यार्‍या ‘वन बेल्ट वन रोड प्रॉजेक्ट’ची घोषणा केली त्यावेळी चीनच्या सांस्कृतिक व व्यापारिक वारस्याला नव्या स्वरुपात पेश करण्याच्या या मनिषेमध्ये चिनी विस्तारवादाची झलक दिसून ... Read More »

अस्तित्वासाठीच कॉंग्रेसचे नवे पिल्लू…

ल. त्र्यं. जोशी मतदान प्रणालीचा पुनर्विचार होऊ शकतो. पण कॉंग्रेस पक्षाच्या अस्तित्वासाठी तो होणार असेल तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही. अशा पध्दतीने कोणतीही प्रणाली आली तरी ती शेवटी गाजराची पुंगीच ठरणार आहे… सव्वाशे वर्षांहून अधिक वय असलेला आणि स्वातंत्र्योत्तर काळात सर्वांत जास्त वेळा देशाची सत्ता उपभोगणारा कॉंग्रेस पक्ष आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असल्याचा अभिप्राय त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ... Read More »

सर्जिकल स्ट्राईकची वर्षपूर्ती ः काय साधले?

शैलेंद्र देवळाणकर उरीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांनी भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला एक जोरदार तडाखा दिला. या कारवाईला नुकतेच एक वर्ष झाले; मात्र या वर्षभरात दहशतवादी हल्ले, त्यामध्ये शहीद होणार्‍या जवानांची संख्या, घुसखोरीच्या घटना यांमध्ये वाढच झाल्याचे दिसत आहे. यावरुन हे पाऊल असङ्गल ठरले असा सूर उमटत आहे. तो कितपत खरा आहे? २८ आणि २९ सप्टेंबर २०१६ रोजी ... Read More »

डिजिटल पोलीस पोर्टल आहे तरी काय?

दीपक राझदान गृह मंत्रालयाने गुन्ह्यांच्या तपासासाठी एक क्रांतिकारी योजना तयार केली आहे. त्यासाठी सरकारने डिजिटल पोलीस पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलच्या सहाय्याने गुन्हे आणि गुन्हेगारांचा तपास करणे, त्यांचे जाळे कसे काम करते, हे शोधणे सोपे होणार आहे.. देशात गुन्ह्यांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करीत आहेत. त्यामुळे गुन्ह्यांचा तपास करणे आणि गुन्हेगारांचा शोध ... Read More »