कुटुंब

गावरान कोंबडा

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे रामभाऊ नेहमीप्रमाणे लांब टांगा टाकत बाजाराला चालले होते. स्वत:शीच पुटपुटत, काहीसे वैतागलेले, हातातल्या सामानाच्या यादीकडे नजर टाकत होते. घरात सगळी मंडळी तापाने फणफणत होती. काही खोकत होती तर काहींचे डोके ठणकत होते. रामभाऊंचेही सर्वांग दुखायला लागले होते. तापाची चाहुल लागली होती. Read More »

त्यांनाही प्रेम हवंय…!

– अंतरा भिडे फेसबुकवर कुणीतरी एक पोस्ट शेअर केला होता. एका माणसानं आपल्या पाळीव कुत्र्याला कित्येक महिने उपाशी ठेवलं होतं. त्याच्या अंगावर फक्त हाडं आणि कातडीच दिसत होती. बिचारा कुत्रा केविलवाण्या नजरेनं बघत होता. पुढं काही दिवसांत तो गेला. त्या क्रूर माणसाच्या (की जनावराच्या?) विरोधात कुणीतरी कोर्टात केस ठोकली, आणि तीतून तो सहीसलामत सुटलाही. Read More »

दूधसागर : गोव्याचा मानदंड

– दादू मांद्रेकर सूर्यापासून कधीकाळी सुटलेल्या तप्तलाल वस्तुमानाचे आज दिसणारे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, शनी, गुरु, युरेनस आणि नेपच्यून हे आठ ग्रह म्हणजे भाग आहेत. परस्पर गुरुत्वाकर्षण बलामुळे त्या वस्तुमानाला प्रचंड गती लाभल्याने प्रत्येकाला लाभलेले गोलीय स्वरूप आणि त्याचवेळी ते वस्तुमान थंड होत जाताना प्रत्येक घटकाचा आकुंचन होत गेलेला पृष्ठभाग हा जर डोंगर-दर्‍यांनी व्यापला नसता तर पृथ्वी म्हणजे चेंडूच्या पृष्ठभागासारखा ... Read More »

धबधब्यांचा घाट

– गोपिनाथ विष्णू गावस आमची सासाय म्हादय माये, आमचां दायज म्हादय माये आमची माय म्हादय माये, आमची साथ म्हादय माये… गोंयची जीव जीवावळ, नमन तुका गाये… म्हादय माये… म्हादय माये… म्हादय माये… या म्हादय गीतातून कवीने म्हादईच्या परिसरातील दर्‍या-खोर्‍यांचे, ओहळ-झर्‍यांचे, घसघसणार्‍या धबधब्यांचे, नदी-नाल्यांचे, झाडा-पेडांचे आणि गगनाला गवसणी घालणार्‍या पश्‍चिम घाटातील डोंगरांचे चित्र डोळ्यांसमोर ऊभे केले आहे. या पश्‍चिम घाटाला चोर्ला ... Read More »

मैनापी आणि सावरी धबधब्यांचे लावण्य!

– प्रा. राजेंद्र पां. केरकर डोंगर माथ्यावरून किंवा एखाद्या उंचवट्यावरून कोसळणारा पाण्याचा प्रवाह जेव्हा प्रपाताचे अथवा धबधब्याचे रूप धारण करतो तेव्हा तो निसर्गप्रेमींना नेत्रसुखद असा अनुभव प्रदान करतो. मानवी जीवनाला ज्या नैसर्गिक सौंदर्याने भारावून टाकलेले आहे त्यात धबधब्यांचे स्थान उल्लेखनीय असेच आहे. काही धबधबे बारामाही कोसळत असले तरी त्यांचा उत्स्फूर्त आविष्कार अनुभवायचा असेल तर पावसासारखा अन्य मोसम नाही. मान्सूनचा पाऊस ... Read More »

चतुरस्त्र अभिनेत्री

स्मिता तळवलकर गेल्या. गेली चाळीस वर्षे रंगभूमी, चित्रपटसृष्टी गाजविणार्‍या स्मिताताई हे जग सोडून गेल्या. गेली सहा वर्षे त्या कर्करोगाशी झगडत होत्या. मध्यंतरी त्यांनी त्यावर मात केल्यासारखीही वाटत होती. ‘दुर्गाबाई जरा जपून’ या अशोक पाटोळे लिखित नाटकात त्यांनी रंगभूमीवर मोठ्या थाटात पुन:पदार्पणही केले होते. या नाटकात त्यांची व सतीश पुलेकरांची जोडीही चांगलीच जमली होती. त्याचबरोबर मृणाल कुलकर्णी दिग्दर्शीत ‘प्रेम म्हणजे प्रेम ... Read More »

अजुनी यौवनात मी!

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे मधुकरराव बिछान्यावर पडल्या पडल्या आराम करत होते. अंग नुसते ठणकत होते. रात्री ताप भारी चढलेला. चक्कर पण आली होती. मालतीबाईंनी सकाळीच डॉक्टरांना घरी बोलावून घेतले. डॉक्टरांनी इंजेक्शन देऊन गोळ्या, औषधे लिहून दिली. Read More »

 काळोखी रात्र…!

– सुशीला सगुण मातोणकर, ज्ञानप्रकाश उच्च माध्यमिक, मुळगाव ती काळोखी रात्र आजही आठवली की अंगावर काटा उभा राहतो. काय झालं असतं तर? आम्ही१७ ऑक्टोबर २०१२ सालची गोष्ट. त्यावेळी मी दहावित होते. शाळेत शेवटचं वर्ष असल्याने दिवाळीच्या सुट्टीत पिकनिकला जायचं निश्‍चित झालं आणि आम्हा सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तसं पाहिलं तर मुलांना आपल्या मित्रांबरोबर बाहेर हिंडायला खूप मजा वाटते. पीकनिकला जायचं; ... Read More »

ध्येयवेड्या कलाकाराची  ‘द क्रिएटीव्ह जर्नी’

– मुलाखत : महेश गावकर * आपला जन्म ग्रामीण भागात झाला. तिथे अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा नसताना चित्र, रंग यात जीवन घडविणे तसे फारच खडतर. आपल्या प्राथमिक शिक्षण तसेच चित्रशिक्षणाच्या प्रवासाविषयी थोडक्यात… – माझा जन्म माशेल येथील जुवे – सांत इस्तेव या गावी झाला. तेथील सरकारी प्राथमिक शाळेत सुरूवातीचे शिक्षण आणि गावातीलच सेंट तेरेझा हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. चित्रकलेत शालेय ... Read More »

ती तिथेच उभी!

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे बघायला तिथं जागाच नव्हती. गावातल्या नाक्यावरचा तो एक बसस्टॉप होता. कामावर जाताना मला दोन मुख्य नाके भेटत. पहिला – जिथे महाभयंकर गर्दी असायची. कुणाकडेही लक्ष द्यायचे भान पण राहत नसे. भराभरा गाड्या लागायच्या… धावत धावत लोक चढायचे. दुसर्‍या स्टॉपवर गर्दी नसायची. सकाळी जवळच्या कॉलेजची मुले, चाकरमानी, फॅक्टरीत काम करणारी माणसे, त्यांत मठ्ठ चेहर्‍याची दोन वयस्कर ... Read More »