कुटुंब

भेट त्याची!

– अपूर्वा बेतकेकर निसर्गाला जवळून पाहायची इच्छा खूप दिवसांपासून होती. लवकरच नेत्रावळी येथील सावरी धबधबा पाहायला जाण्याची संधी चालून आली. सांगे तालुक्यातील हा छोटासा गाव. वनराईने पूर्णपणे आच्छादलेला. त्यातील डोंगरमाथ्यावरून हा सावरी धबधबा वाहातो. त्याला भेट द्यायला गेले त्यावेळी बरोबर महाविद्यालयीन विद्यार्थीही होते. आधीच निसर्ग मुग्ध आणि सोबत त्याच्या एवढेच मनाला भूरळ घालणारे तरुण म्हणूनच कदाचित त्याक्षणी निसर्गाला आव्हान करण्याची ... Read More »

शंभरी भरली!

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे आठवतोय… महाभारतातील तो राजदरबार… राजाने भगवान श्रीकृष्णाची स्तुती करून मानाने त्याला स्थान दिले होते. त्याची पाद्यपूजा पण केली होती. इतक्यात शिशुपाल दरबारात प्रवेश करता झाला. त्याने गवळ्याचा पोर म्हणत श्रीकृष्णाची अवहेलना केली होती. शिशुपालची शिवीगाळ चालूच होती. श्रीकृष्ण त्याचे अपराध मोजत राहिले. शंभर अपराध भरताचक्षणी सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला. त्याची शंभरी भरली होती. हा ... Read More »

बैलगाडी

– संदीप मणेरीकर ‘माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो कशी दौडत दौडत येई हो मला आजोळी घेऊन जाई हो’ परवाच या गाण्याच्या ओळी कानावर पडल्या आणि मन गावाकडच्या बालपणीच्या मधूर आठवणींत रममाण झालं. ‘बैलगाडी’! एकेकाळी या बैलगाडीचा डामडौल काय वर्णावा असा होता. आज चारचाकी गाड्यांनाही एवढा भाव नाही तेवढा त्या काळी या बैलगाडीला होता. पूर्वीच्या काळी ... Read More »

जीवनाचं गणित सोडवू

– रश्मिता राजेंद्र सातोडकर, शासकीय महाविद्यालय, साखळी   जन्माला आलोच आहोत, जगू अखेरच्या श्‍वासापर्यंत जीवन नावाचं गणित सोडवू अखेरच्या श्‍वासापर्यंत… जन्माला आलेला प्रत्येकजण कधी ना कधीतरी मरणारच असतो. त्याचे मरण आयुर्मान पूर्ण होऊन झालेले असेल किंवा नैसर्गिकरित्या किंवा त्या व्यक्तीने आत्महत्या केलेली असेल तर. पण जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करून स्वत:चे जीवन संपवते तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातील जीव नावाचे ... Read More »

गोमंतकाचा भूतकालीन शैक्षणिक आढावा

– भिकू ह. पै आंगले श्री शांतादुर्गा शिक्षण समिती या संस्थेने आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात जे काही अभिनवसंपन्न उपक्रम आयोजित केले आहेत त्यात दोन दिवसांच्या १३ आणि १४ सप्टेंबर या काळात शैक्षणिक आणि सामाजिक बांधीलकी राखून त्याचे लोण अखिल गोमंतकात व इतरत्र पोचवावे यासाठी संयोजित केलेली परिषद अनेक शैक्षणिक विषयांच्या माध्यमातून बदलत्या काळाचा वेध घेण्यास संयुक्तिक ठरेल यात तिळमात्र संदेह नाही. Read More »

मूल्यधारित शिक्षणाची गरज

– शिरीषकुमार आमशेकर गेल्या दोन दशकांत आपल्या देशात खूप प्रगती झाली. अविकसित देश – विकसनशील देश ते आता आपण विकसित देशांच्या यादीमध्ये गणले जावू लागणार अशी चिन्हे दिसत आहेत. आपल्या देशाचा स्वत:चा महासंगणक डॉ. विजय भटकरांच्या नेतृत्वाखाली तयार करून अमेरिकन संगणक क्षेत्रातील शास्त्रज्ञ व देशासमोर एक मोठे आव्हान आपण ऊभे केले तसेच अवकाशात अत्यावश्यक असणारे क्रायोजिनीक तंत्रज्ञानही आपण विकसित केले. ... Read More »

शिक्षण आणि समाज – निर्मिती

– प्रा. भूषण भावे शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानले गेले आहे. शिक्षणामुळे समाजात शांतीयुक्त क्रांती निर्माण होते. आजच्या प्रचलित शिक्षण पद्धतीत बदल घडला पाहिजे, याविषयी सर्वांचेच एकमत आहे. हे परिवर्तन घडत असताना भारताचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा, इतिहास, ज्ञान-परंपरा यांच्या बरोबरीनेच आधुनिक जगातील वैज्ञानिक प्रगती आणि भविष्यकाळाची आव्हाने यांचाही समग्रतेने विचार होण्याची आवश्यकता आहे. केवळ एकांगी विज्ञान-शिक्षण देऊन शिक्षणाचे ... Read More »

शिक्षण आणि कौशल्यविकास

– विवेक पेंडसे काळाप्रमाणे शिक्षणपद्धती जाऊन ब्रिटीशांनी सुरू केलेली शिक्षण पद्धती भारतात लागू झाली. या पद्धतीमध्ये शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमधील खास कौशल्यांचा विचार झाला नाही. सर्वांना समान पद्धतीचे शिक्षण दिले गेले. यातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्यांचा विकास झाला नाही. यासाठी आता शिक्षणतज्ज्ञांनी विचार करून सर्वांगीण आणि सातत्याने मूल्यमापन करण्याची पद्धती लागू करण्यात आली. Read More »

शिक्षक कोण?

– ललिता जोशी ‘शिक्षण’ हा शब्द उच्चारला की लगेच त्याचा संबंध शाळा, कॉलेज आणि अशाच सारख्या इतर शिक्षण संस्थांशी जोडला जातो. साहजिकच शिक्षणाच्या दर्जाची आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची जबाबदारीही फक्त शिक्षण संस्थांचीच असते असे सर्रास गृहीत धरले जाते. याचे कारण आपण ‘शिक्षण’ या शब्दाची व्याख्या खूप संकुचित केली आहे. खरं तर शिक्षण ही संकल्पना खूप व्यापक आहे. आणि शिक्षण संस्थांनी दिलेल्या ... Read More »

विविध परंपरा, विधींनी समृद्ध गोव्यातली चवथ!

– राजेंद्र पां. केरकर चैत्र कालगणनेतील भाद्रपद हा कृषी संस्कृतीचा अधिष्ठात्रा देव म्हणून ओळखल्या जाणार्‍या गणपतीच्या उत्सवाचा महीना असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भाद्रपदातील शुक्ल पक्षातील चतुर्थी ही गणपतीची विशेष आवडीची असली तरी त्या दिवसापासून दीड, पाच, सात, नऊ, अकरा तर काही ठिकाणी तब्बल हा उत्सव चक्क एकवीस दिवसही चालतो. गोव्याची भूमी भौगोलिक आकाराने अगदी छोटीशी असली तरी प्रांत ... Read More »