कुटुंब

महिला संमेलनाचे शिवधनुष्य पेलण्याचे बळ

– चित्रा प्रकाश क्षीरसागर स्व. माधवी देसाई यांच्या प्रेरणेने सुरू झालेले अखिल गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे यंदाचे हे तप:पूर्ती साहित्य संमेलन आहे. माधवीताईंचा आशीर्वाद या रूपाने हे संमेलन श्री तुळशीमाता पांडुंरग महिला मंडळातर्फे आम्ही पणजी शहरात घेत आहोत. हे संमेलन भरविताना आम्हांला आनंद तर होत आहेच, परंतु त्यासाठी गेले वर्षभर राबताना झालेले श्रम या संमेलनाच्या यशस्वीतेने दूर होत आहेत, हेही ... Read More »

गोमंतक महिला साहित्य संमेलन सृजनशक्तीचे व्यासपीठ

– प्रा. सुनेत्रा कळंगुटकर साहित्य संमेलन हा ऊर्जेचा उत्सव असतो. लेखक, वाचक, रसिक यांना ऊर्जा देणारे ते एक केंद्र असते. संमेलनातील कार्यक्रमांतून मिळणारी ऊर्जा साहित्यरसिकांना चैतन्य प्राप्त करून देते. भाषेचे, साहित्याचे संवर्धन करते. सृजनशक्तीला आवाहन करणारी ही संमेलने म्हणजे साहित्यिकांसाठी, साहित्यप्रेमींसाठी पर्वणीच ठरते. Read More »

पत्र

– संदीप मणेरीकर प्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी यांची कविता… पत्र लिहायला तुला घेतले जे जे स्मरले ते, ते लिहिले लिहिण्याजोगे सर्व संपता पत्राखाली ‘तुझीच’ लिहिता थरथरला का हात असा पण पुलकित झाला तो हळवा क्षण! एकेकाळी या पत्राचा असा दिमाख, तोरा होता. पत्र घेऊन पोस्टमन आला की, तो कुणाचं पत्र घेऊन आलाय, कोणाला, कसलं? असले नानाविध प्रश्‍न मनात हिंदकळून जातात. ... Read More »

स्त्रीमना कणखर बन!

– बबीता बाबलो गावस स्त्रीला सलाम करावा एवढी तू पुढे गेली आहेस. शिकली-सवरली आहेस. महिन्याला पाच आकडी पगार तू घेते आहेस. पुरुषांबरोबर कमावते आहेस. चूल आणि मूल एवढंच काम स्त्रीचं हे ब्रीदवाक्य तू खोडून काढलं आहेस. अनेक जबाबदार्‍या तू अकलेने म्हणा किंवा आपल्या हुशारीने पार पाडते आहेस आणि तरीही तू अबलाच आहेस? समाजाला ताठ मानेने सामोरे जायला तुला झेपलेलं दिसत ... Read More »

परतीचा पाऊस!

– गौतमी गोपाळ चोर्लेकर सृष्टीचे ऋतूचक्र कायम फिरत राहते. कालचक्राच्या बरोबरीने आपणही गती धरते आणि सृष्टीच्या सौंदर्यात वेगवेगळ्या छटांनी भर घालत राहते. उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा, हिवाळ्यानंतर पुन्हा उन्हाळा… ह्या तीनही मोसमात सजलेली सृष्टी, तिची वेगवेगळी रूपे, तिचे बदलणारे सौंदर्य… सारेच कसे अप्रतिम… अद्भुत… सुंदर! ह्या मुळातच लावण्यवती असलेल्या सृष्टीचे सौंदर्य वाढू लागते ते पावसाळ्यात. अन् आभाळाचे लेणे घेऊन तृप्त ... Read More »

स्वप्न!

– दुर्गाश्री सरदेशपांडे,  जीव्हीएम्स उच्च माध्य., फोंडा आज दुपारी सहज मी डायरीची पाने चाळत बसले होते. रिमझिम बरसणार्‍या त्या पावसाळी वातावरणात, हा एकमेव पर्याय शिल्लक होता. बस्स! त्या एका पानावरून मात्र नजरच हटत नव्हती. कदाचित जे मी पाहिलं ते तुमच्यासाठी विशेष नसेल; पण माझ्यासाठी ती अविस्मरणीय घटना आहे. त्या पानावरती प्रसिद्ध लेखक उत्तम कांबळे यांचा ऑटोग्राफ होता. Read More »

‘रोम वॉझ् नॉट  बिल्ट इन अ डे’

– श्रद्धानंद वळवईकर इंग्रजीत एक प्रसिद्ध म्हण आहे – रोम वॉझ नॉट बिल्ट इन अ डे. होय! कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आवश्यकता असते ती ठराविक वेळ, मनातील तीव्र इच्छाशक्ती आणि जिगरबाज प्रवृत्तीची. याच्याच जोडीला जग जिंकण्याचा आत्मविश्‍वासही एखाद्या माणसाला कणखर बनवितो. दक्षिण कोरियात नुकत्याच संपन्न झालेल्या १७ व्या ‘इंचिऑन एशियाड’मध्ये भारतीय ऑलिंपिक संघटनेचा (आयओए) चमू सर्वंकष विजेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने उतरला ... Read More »

शेतातला माळा

– संदीप मणेरीकर ‘काय रे, माळ्याक जावक इलंय?’ आजीने कोणाला तरी विचारलं. मी बाहेर जाऊन पाहिलं तर आमच्याच आवाठातला गंगाराम हातात कंदील, काठी व दुसर्‍या हातात अंथरूणाची वळकटी व काखेला एक पिशवी, तीत चार सेलची झगझगीत उजेड पडणारी अशी बॅटरी एवढी सामग्री घेऊन पायरीवर उभा होता. ‘बस रे, जरा भाकरी खातय!’ आतून दादांनी (माझ्या बाबांनी) सांगितलं आणि गंगाराम आमच्या घराच्या ... Read More »

प्रवेशाचा पडदा

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे बिल्वदलचे आभार मानायचे तेवढे थोडेच! अगदी ऐन श्रावणात त्यांनी संगीताची मेजवानी घडवून आणली होती… शुद्ध शाकाहारी! शाकाहारी जेवणाची लज्जत काय असते ते फक्त मांसाहारी लोकांनाच विच्चारायला हवे. अस्मादिक स्वत: पूर्णपणे मांसाहारी आहेत. पक्के गोवेकरी आहेत. विषय वेगळाच आणि आपण मेजवानीवरच बोलायला लागलोय. अहो राव, थांबा! श्रावण चालू आहे. ही होती संगीताची मेजवानी. एक नव्हे, दोन ... Read More »

लेख…!

– अखिल सावंत, जीव्हीएम्स उच्च माध्यमिक, फर्मागुडी सकाळ झाल्याची चाहूल लागली. पूर्वेकडून नुकतेच तांबडे फुटत होते. सूर्यदेव जागा होत होता. सूर्यकिरणे सोनेरी कुंचल्याचे फटकारे ओढीत फांद्यांच्या पानांमधून हळूच डोकावित होती. त्यातली काही किरणे माझ्या पायांच्या तळव्यांवर गुदगुल्या करण्यात गुंतलेली. गरमी वाढलेली असली तरी सकाळच्या गारव्यामुळे तो उबदार स्पर्श मोठा गोड वाटत होता. Read More »