कुटुंब

मायभूमीत कलाकौशल्य साकारण्यास अत्यानंद : सुशांत तारी

– मुलाखत : महेश गावकर ष् महोत्सव म्हटला की सजावट ही हटकून असतेच. उत्सवानुरूप केलेली आकर्षक सजावटीमुळे पाहुण्यांचे मन प्रसन्न होते. इफ्फी अर्थात आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा गोव्याची शान वाढविणारा महोत्सव आहे. या महोत्सवाच्या सजावटीची जबाबदारी आपल्यावर सोपविल्यानंतर कसे काय वाटले? – खूप अत्यानंद झाला. खरं सांगू, कलावंत आपली कलाकृती साकारत असतो. त्यात रमत असतो. गमत असतो. जगण्यातले अनुभव आपल्या ... Read More »

विचार-नवनीतासाठी समुद्रमंथन

सुरश्री केसरबाई केरकर स्मृती संगीत समारोह – २०१४ – जनार्दन वेर्लेकर गायन-वादनाची मैङ्गल ऐन रंगात आलेली असताना कलाकार अशी एखादी अनपेक्षित हरकत -जागा घेतो तेव्हा रसिकांची कळी खुलते आणि तो उत्स्फूर्तपणे उद्गारतो – क्या बात है| आपल्या अदाकारीतून – बोलण्यातून नव्हे कलाकार अशी बात पैदा करीत असतो. अभिषेकीबुवा म्हणायचे – गायकाने ङ्गार बोलू नये. जे काय सांगायचे-मांडायचे ते आपल्या स्वरसंवादातून! ... Read More »

प्रारब्ध

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे अंग नुसते गार पडले होते. पहाटे आणि एवढी थंडी, तीही पावसाळ्यात! माझे अंग नेहमीच घामाने भिजून जाते. बाहेरून घरी परतल्यावर कधी एकदा अंगावर पाणी टाकतो असे होते. मग दिवसा मी कितीदा आंघोळ करतो असे कुणी मला विच्चारत पण नाही. उन्हाळ्यात तर चार-पाच वेळा तरी आंघोळ घ्यावीच लागते. अगदी झोपण्यापूर्वी रात्री बारालाही, नाहीतर झोप येत नाही. ... Read More »

अन्नदाती चूल

– संदीप मणेरीकर ग्रामीण भागात मग तो कोकण असो वा गोमंतक अथवा घाटमाथ्यावरचा कोणताही गाव, त्या गावात चूल नाही असा गाव शोधूनही सापडणार नाही, अशी एकेकाळी परिस्थिती होती. स्वयंपाक करण्याची खोली, त्या खोलीत ओटा असेल नसेल, पण चूल होतीच. तशीच न्हाणीघरातही एक चूल होती. त्यावर भलामोठा बहुतेक तांब्याचा हंडा ठेवलेला असायचा व खाली विस्तव ढणढणत असायचा. बहुतेक घरांमध्ये दोन चुली ... Read More »

पर्यावरणरक्षण आपले आद्य कर्तव्य

– म. कृ. पाटील एकविसाव्या शतकात वैश्‍विक उष्णता हवामानात बदल, बेभरवशाचा नैऋत्य-इशान्य मोसमी पाऊस, बर्फ खंड वितळणे, समुद्राच्या जलस्तरात वाढ, पर्यावरणाचा र्‍हास, निसर्ग सान्निध्यात सेकंड होम, त्सुनामी, ढगफुटी, महत्त्वाच्या शहरात पाणी तुंबणे, रेल्वेचा मेगा ब्लॉक, दरडी कोसळणे, महापुराने जीवीतहानी, नदी-नाल्यांनी दिशा बदलणे ही आणि अशा प्रकारच्या वाक्यांनी दूरदर्शन पटल व वर्तमानपत्रांचे रकाने भरतात. त्यावर अनेक विचारवंत, पत्रकार, समाजसेवक, पर्यावरणप्रेमी, राजकीय ... Read More »

अंगणातील माटव

– संदीप मणेरीकर पाहुण्यांचे पहिले स्वागत दारातील मंडप करीतो नंतर उंबर्‍यावरील यजमान दिलखुलासपणे हसतो कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर पहिल्यांदा उभा रहातो दोन्ही हातांनी भरभरून देणारा निसर्ग. उतरत्या छपराची घरं, चारी बाजूंनी निसर्गानं ओतलेला समृद्ध खजिना. घराच्या पाठीमागे झुळूझुळू बारामाही पाण्यानं वाहणारा पाट, घरासमोर विशाल अंगण आणि त्या अंगणात उभा असलेला माड आणि पोफळींच्या झावळांचा (चुडतांचा) मंडप किंवा माटव. संपूर्णपणे निसर्गातून ... Read More »

बातमी

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे वर्तमानपत्रातील बातमी वाचली ना? नाही वाचली तरी चालेल. लगेचच ती बातमी (ताजी) सोशल नेटवर्कवर आलीच म्हणून समजा. वाचून थोडे शांत झाले. कारण बायकांचा सल्ला ऐकणारे ते, मग ऍटेकने मरणार नाही याची त्यांना खात्री झाली. थोडे साशंक झाले. वाटले आता आपली वाचण्याची धडकत नाही. कारण आपण आपल्या बायकोचेच कशाला कुणाही बायकांचे ऐकत नाही. ऐकले तरी मान्य ... Read More »

सासर झालं माहेर

– संकेत शशिकांत फडके ‘‘माधुरी, ए माधुरी, अजून आवरलं नाही तुझं? अगं अजय व त्याच्या घरची मंडळी थोड्यावेळाने पोहचणार!’’ असं म्हणत माधुरीची आई आपल्या कामात गुंतली. आज माधुरीला पहायला येणार होते. अजय व माधुरी दोघंही एकाच ऑफीसमध्ये कामाला होते. सुरवातीला मैत्री जडली आणि हळूहळू प्रेमात रूपांतर कधी झाले कळलेच नाही. शेवटी घरच्याना सांगितल्यानंतर त्यांनीही होकार दिला. Read More »

जीवन सुंदर आहे!

– संगीता गावडे जीवन सुंदर आहे. अनुभव तुम्हास येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका; मार्ग तुम्हांला सापडत जाईल. जीवन ही रंगभूमी आहे. जीवन म्हणजे दोन घडीचा डाव आहे. जीवन हा एक संघर्ष आहे. जीवनाच्या अनेक व्याख्या थोर पुरुषांनी केल्या आहेत. आपले जीवन हा एक अनुभवप्रवाह आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत हे त्याला स्वत:ला येणार्‍या अनुभवांवर अवलंबून असते. जीवनात चढउतार हे ... Read More »

कोंकणी नाट्यसंमेलन; एक ऐतिहासिक क्षण

– अन्वेषा सिंगबाळ नोव्हेंबर १ व २ रोजी फोंडा येथील श्री गोपाळ गणपती देवस्थानाच्या सभागृहात झालेले पहिले कोंकणी नाट्य संमेलन म्हणजे एक ऐतिहासिक क्षण. एका शतकाची नाट्य परंपरा असलेल्या गोव्यात आजपर्यंत एकही नाट्यसंमेलन न होणे म्हणजे आश्‍चर्य. शेवटी ही कमी भरून काढून नाट्य संमेलनाची नांदी वाजली व दोन दिवसांत असंख्य नाट्य कलाकार व नाट्य रसिकांच्या हजेरीत पहिले नाट्यसंमेलन यशस्वीरित्या पार ... Read More »