कुटुंब

जल्लोष काणकोणच्या पारंपरिक शिगमोत्सवाचा

– अजित पैंगीणकर फाल्गुन महिना सुरू झाला की शिगम्याचे वेध सुरू होतात. या शिगम्याला कधी सुरुवात झाली याचा अंदाज नाही. ज्या काळात समाज एकत्रित राहायला लागला, अन्न शिजवून खायची कला त्याला अवगत झाली आणि अन्न तयार करण्याचे ज्ञान त्याने संपादन केले. समूहमनाची स्पंदने ज्यावेळी जाणवायला लागली. देव ही संकल्पनाच ज्यावेळी निर्माण झाली नव्हती त्याच काळात मानवाला मनोरंजनाची जाणीव व्हायला लागली. ... Read More »

गोमंतकाची परंपरा जपणारा शिगमोत्सव

– नारायण विनू नाईक, मंगेशी गोमंतकात सार्वजनिक स्वरूपात जे उत्सव साजरे केले जातात त्यात भारतीय संस्कृतीचे दर्शन हे केवळ ग्रामीण भागात साजर्‍या होणार्‍या उत्सवातूनच पहायला मिळते. विविध धर्माचे उत्सव मग ते ख्रिश्चन, मुस्लिम व हिंदू असो, दरवर्षी ठरावीक वेळी साजर्‍या होणार्‍या या उत्सवाच्या वेळी त्यांचे सम्मीलन घडते. गणेश चतुर्थी, दिवाळी, नाताळ, कार्निव्हल, ईद व शिगमोत्सव हे गोमंतकीयांचे काही प्रमुख सण. ... Read More »

जाहिरात आणि प्रदर्शन

– शैला राव, फोंडा ‘नमस्कार! टीचर ओळखलं की नाही?’ असे विचारीत दोन तरुण घराच्या दारात उभे राहिले. पटकन ओळखू न शकल्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे हसत हसत म्हटले, ‘माझं कॉलेज आणि तुमचा युनिफॉर्म दोन्ही नसल्यामुळे पटकन ओळखणं कठीण जातं बघ!’ मुद्याचं बोलू लागताच त्यांचा स्थानिक संघ स्मरणिका काढणार होता, तेव्हा देणगीसाठी आले आहेत, हे कळताच खूपशा शुभेच्छा आणि छोटीशी देणगी देऊन त्यांची ... Read More »

सेतुबंधन : अध्यात्म-विज्ञानाचं!

– प्रा. रमेश सप्रे दोन मित्रांची एक मार्मिक गोष्ट आहे. ‘रामलक्ष्मण’च म्हणायचे सगळे लोक त्यांना. सर्व गोष्टी दोघेही बरोबरच करायचे. शिक्षण-लग्न-नोकरी-मुलं सारं दोघांचं बरोबरीनं चाललं होतं. जणु समांतर रेषाच. एका बाबतीत मात्र दोघांची मतं अगदी उलटी. उत्तर-दक्षिण ध्रुवांसारखी. त्यांच्यात त्या गोष्टीवरून वाद व्हायचा. प्रचंड वाद. मुद्दे संपले नाहीत तरी गुद्दे सुरू व्हायचे. त्यांची मतं ऐकायला गावातली मंडळी जमायची. त्यांना दोघांचीही ... Read More »

माझ्या बाबांचे लपलेले प्रेम!

कृतिका दीपक मांद्रेकर, सेंट झेवियर कॉलेज, म्हापसा स्वतःची स्वप्ने विसरून, आपल्या मुलांची स्वप्ने आपले मानून जगणारे ते भोळे वडील..! आपली प्रत्येक लहान-थोर गरज मागे टाकून आपल्या मुलांसाठी धडपडणारे ते निःस्वार्थी वडील..! अशा या वडिलांच्या जराशा कठोर स्वभावामागे लपलेले त्यांचे ते अथांग प्रेम, ते मायेने भरलेले हृदय, वात्सल्याचे तेज असलेले त्यांचे ते डोळे कधी कुणाच्या नजरी पडलेच नाही. Read More »

एक बोट दुसर्‍याकडे… चार बोटं आपल्याकडे…

– श्रेयस गावडे, मडगाव एकदा बाबू आपल्या बाबांना विचारतो, ‘‘बाबा, अंगठ्याजवळच्या बोटानं देवाला गंध लावायचं नाही असं आजोबा का म्हणतात? आणि जपमाळ ओढतांनाही ते कधी त्या बोटाने मणी ओढत नाहीत, मी पाहिलंय.. असं का?’’ नऊ वर्षाच्या बाबूचं हे अचूक निरीक्षण पाहून बाबा मनात प्रसन्न झाले अन् म्हणाले, ‘‘अरे त्या बोटानं श्राद्ध वगैरे करताना गंध लावतात. कारण ते बोट पूर्वजांचं मानलं ... Read More »

परीक्षा शिक्षा नव्हे….वळण लावणारी दीक्षा!

– प्रा. रामदास केळकर आली लग्न घटी समीप… असे वाक्य म्हणावे ती परीक्षा घटी समीप आलेली आहे. कोण दहावीच्या तर कोण बारावीच्या परीक्षेला आपल्या वर्षाच्या मेहनतीची शिदोरी घेऊन सज्ज झालेले आहेत. परीक्षेचे स्वरूप थोडेङ्गार बदलत जात असले तरी शेवटी परीक्षा ही परीक्षाच. आणि त्याचे थोडेङ्गार दडपण येणे स्वाभाविक. पण अनुभवाने असे दिसून येते की विद्यार्थ्यापेक्षा जास्त दडपण हे चक्क पालकावर ... Read More »

‘त्या’ काळातला पाऊस

– संदीप मणेरीकर ‘त्या काळातला पाऊसच वेगळा होता आईसारखी माया तर करायचाच पण कधी मधी बाबांसारखा रागवायचा देखील पण कसाही असला तरी खूप लडिवाळा होता त्या काळातला पाऊस खूप वेगळा होता’ आता ही कविता आजच्या मुलांनी वाचली तर तीमुलं म्हणतील, काय त्या पावसातही वेगळेपण आहे? पावसासारखा पाऊस तो, उभ्या रेषांसारखं आभाळातून धारांनी कोसळणारं पाणी म्हणजे पाऊस. तसा तो आताही कोसळतोय ... Read More »

पोटापुरते…

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे माझा नारळाचा धंदा आहे. मला नारळ रिवणहून आणावे लागतात. मी टेंपो घेऊन तिथे जातो. स्वतः गाडी चालवतो. मग ते नारळ गावोगावी विकतो. तेव्हा हा माझा पोटापुरता धंदा.. कसे ऽ बसे ऽ चालते! माझे लक्ष त्याच्या पोटाकडे गेले… त्याचे पोट तर गलेलठ्ठ होते! दुपारची पावणेतीनची वेळ. डोळ्यावर झापड आली होती. दुपारी दीडला जेवण झाल्यावर थोडा वेळ ... Read More »

मायेची सावली!!

 – रश्मिता राजेंद्र सातोडकर आज माझं शालेय जीवन जगत असताना मी खूप भाग्यवान आहे असंच वाटतं आहे. कारण शालेय जीवनातच एखादं सामाजिक कार्य करायला मिळणं ही माझ्या जीवनातील एक पवित्र गोष्टच आहे असं समजता येईल. याचं सर्व श्रेय मी केरी-सत्तरीतील विवेकानंद प्रेरणा प्रतिष्ठान, या संस्थेला देऊ इच्छिते. या संस्थेमुळेच आज मला समाजामध्ये वावरण्याची व समाजात मिसळण्याची संधी मिळते आहे. यातीलच ... Read More »