कुटुंब

तरुणाईवर श्रमसंस्कार

युवाशक्तीच्या मनातील अस्वस्थतेला रचनात्मक अभिव्यक्ती देणारी सोमनाथची ‘श्रमसंस्कार छावणी’ यंदाच्या मे महिन्यात भरेल आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी सुरू केलेला हा सेवायज्ञ पुन्हा धगधगेल. गेली ४८ वर्षे अखंड सुरू असलेल्या या मोहिमेचा हा आढावा. बाबा आमटे यांनी अमर्याद श्रमातून जीवनात काहीही आशा शिल्लक नसलेल्या कुष्ठरुग्णांसमवेत काटेरी झाडाझुडपांनी भरलेल्या माळरानावर ‘आनंदवन’ उभारले. एकेकाळी निराशेच्या गर्तेत स्वतःचा गळा घोटून घेणारे हात ... Read More »

गोव्यातील मुखवट्यांची परंपरा

– राजेंद्र केरकर   जीवनात वेगवेगळ्या प्रसंगी माणूस मुखवटे धारण करून जगत असला तरी शिगम्यातले मुखवटे हे समाजात रूढ असलेल्या नाना प्रवृत्तींचे दर्शन घडवत असतात. पूर्वीच्या काळी शिगम्याच्या दिवसांत निरनिराळ्या प्राण्यांचे तसेच राक्षसांचे मुखवटे घालून ‘शबय’ मागण्याची प्रथा गोव्याच्या विविध भागात रूढ होती. बाजारात त्या काळी कागदाच्या मुखवट्यांची चलती असायची. आज ती जागा प्लास्टिकने घेतलेली आहे. कागदाचे मुखवटे असूनही शिगमा ... Read More »

जावईबापू

> लाडोजी परब   ‘कारभारी दमानं…’ हे गाणं ऐकलंय ना तुम्ही? उभ्या आयुष्यात त्याला दमानच घ्यावं लागतं. कुटुंब व्यवस्थेत जावयबापूला महत्त्व फार! मुली सासरी जाताना आई बाबांचा कंठ दाटतो. माप ओलांडल्यावर मात्र मुलीला कंठ सुटतो. एक जावई असा निघाला, मुलीच्या घराकडून मिळतं म्हणून घेत राहिला. आणि एवढा आळशी बनला की आपसूकच घरजावई बनला. आता फावल्या वेळात सासरी शेतीची कामे, नाही ... Read More »

श्रीरामनवमी : एक चिंतन

– उदयबुवा फडके आज श्री रामांचा वाढदिवस, जन्मदिवस, रामनवमी. संतांचे, देवांचे वाढदिवस आपण जन्मोत्सव म्हणून साजरे करतो. रामनवमी हा तसा संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा उत्सव. बर्‍याच ठिकाणी हा उत्सव चैत्र नवरात्रोत्सव म्हणून साजरा केला जातो. आपण सारे भारतीय उत्सवप्रिय असल्याने वेगवेगळ्या निमित्ताने उत्सव साजरे करतो. अर्थात या जन्मोत्सवासाठी असं विधान करणं तसं चुकीचं ठरेल. कारण श्री रामांच्या बाबतीत बोलायचं ... Read More »

‘माज’ विरोधी लस!

– सौ. मीरा प्रभूवेर्लेकर अधिकाधिक सुखसोयी पुरवल्या की मुलांचं जीवन समृद्ध होईल असा समज बाळगणारे आई-बाबा नव्हे मॉम-डॅड आजकाल समाजात दृष्टीस पडतात. आपण ज्याला ज्याला बालपणी वंचित झालो ते ते मुलांना मिळवून देण्यासाठी त्यांचा आटापिटा चाललेला असतो. श्रीमंतांच्या मुलांना मिळणार्‍या सुखसोयी आपल्याही मुलांना काही प्रमाणात तरी मिळाव्यात यासाठी मध्यमवर्गीय आई-बाबांची ही धडपड असते. आर्थिक समतोलता नसलेली मुलं शाळेमध्ये एकमेकांच्या सहवासात ... Read More »

मनाचं मोकळं आकाश…

– श्रेयस सू. गावडे, मडगाव ‘‘फिटे अंधाराचे जाळे…. झाले मोकळे आकाश… दरी खोर्‍यातून वाहे… एक प्रकाश प्रकाश….!’’ सुधीर मोघे यांनी लिहिलेलं अन् सुधीर फडके यांनी गायिलेलं हे गीत ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं एक चित्र… पावसाळा सुरू आहे… आकाश ढगांनी गच्च भरलंय… सूर्य दिसेनासा झालाय… पण सूर्य दिसेनासा झाला तरी ढगांच्या कडा अन् त्यावरची चंदेरी झालर (सिल्व्हर बॉर्डर) आपल्याला प्रकाशाच्या ... Read More »

जीवोध्दारक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी

– महंत श्री प्रज्ञासागर बाबा महानुभाव संपादक : ‘महदंबा’ मासिक, श्रीक्षेत्र खणेपुरी जेव्हा काळरात्र होऊन सर्वत्र काळोख दाटतो व या काळोखात सकल प्राणिमात्र चाचपडायला लागतात, तेव्हा त्या काळोखाचा अंत करण्यासाठी क्षितिजावर सहस्त्रावधी प्रकाशकिरणांची उधळण करीत सूर्यबिंब उदयाला येते. त्याप्रमाणे अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाला परमेश्वर भक्तीचा प्रकाश देऊन त्याचा उद्धार करण्यासाठी १२ व्या शतकात महाराष्ट्राच्या क्षितिजावर परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री ... Read More »

आवाज ऽऽ!

– शैला राव, फोंडा ‘ममाई ऽ ऽ ऽ सिंपली वंडरफूल! आजचा बँड सूपर्ब! तू असतीस ना तिथं, तर तुला देखील…’ आमचा कैवल्य रात्री दहाला घरात शिरता शिरता माझ्याकडे पाहत तारस्वरात आपला आनंद व्यक्त करीत म्हणाला. दमयंतीने मुलाला दटावीत म्हटले, ‘अरे! किती मोठ्याने बोलतोयस्! शेजारच्यांना सुद्धा दचकायला होईल. आणि काय रे…’ तिच्या पुढच्या बोलण्याची कल्पना येऊन मी म्हटले, ‘तुझा बँड तुलाच ... Read More »

स्त्री अजूनही अनभिज्ञच…!

– सौ. नीता शि. फळदेसाई, पर्वरी  मागच्या आठवड्यात जागतिक महिला दिन साजरा केला गेला. आपल्या आईच्या स्मृतीसाठी लेकीने चालविलेल्या लढ्याला एक दिन म्हणून साजरा करण्याचा सन्मान या दिनाला मिळाला व तेव्हापासून स्त्रियांमध्ये असलेल्या अनेक गुणांचा महिमा वर्णिला जातो. अगदी पुरातन काळापासून ते आजच्या प्रगत युगात स्त्रीशक्तीविषयी सार्थ अभिमान बाळगून स्त्रियांबद्दल गौरवोद्गार काढले जातात. स्त्रीला वंदनीय मानले जाते. आई, बहीण, पत्नी, ... Read More »

बोलणं रुपेरी… पण मौन सोनेरी!

– श्रेयस गावडे आज पुन्हा एकदा शाळेच्या वर्गात जाऊया… आठवा बरं ते दृश्य… वर्गात शिक्षिका येण्यापूर्वीचा गोंधळ! अन् त्यावेळी जवळजवळ सर्व शिक्षकांचं ठरलेलं सनातन वाक्य म्हणजे- ‘वर्ग आहे का मासळी बाजार?’ अन् त्याहूनही भयंकर म्हणजे रागावलेली शिक्षिका हातातला डस्टर समोरच्या टेबलवर जोरात वाजवून अन् त्याहूनही जोराच्या आवाजात म्हणते कशी- सायलऽ ऽ ऽ ऽन्स! कित्ती विसंगती आहे ना, शिक्षिकेने केलेल्या कृतीत ... Read More »