कुटुंब

अग्निज्वालांमधून फुललेले काव्यपुष्प

– डॉ. सोमनाथ कोमरपंत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मरण करताना प्रथमतः उभे राहते ते आपल्या राष्ट्रासाठी त्यांनी वाहिलेले समग्र जीवन. समर्पणशीलतेचा मानबिंदू म्हणूनच त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा विचार करावा लागतो. त्यांच्या कृतीशील जीवनाला अनेक मिती होत्या. या मितींमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला भव्यता, उदात्तता आणि मांगल्य प्राप्त झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मरण करताना प्रथमतः उभे राहते ते आपल्या राष्ट्रासाठी त्यांनी वाहिलेले समग्र जीवन. समर्पणशीलतेचा मानबिंदू ... Read More »

खोट्याची दुनिया!

(खुळ्यांचो बाजार ) – लाडोजी परब कधी कधी खरं बोलण्यानं माणसं दुखावतात. मग काय, खर्‍याच्या जात्यावर खोटं भरडणं सुरू! नाम्याची पिंकी बरोबर रोज कुणीतरी असायचा. एक दिवस बापानं विचारलं, ‘पिंकी तुझा कुणाबरोबर लफडा नाय मगो? आताच सांग, माझ्या कानार इला सगळा, आमचा नाक कापशील मग!’ पिंकी काय बोलणार ‘नाय बाबा’ एवढंच उत्तर. बापानं विश्‍वास ठेवून लग्न जुळवलं. पिंकीचं लग्नही पार ... Read More »

अवतार बदलला पण ‘दशा’ तीच!

– लाडोजी परब नाटक झालं की, सकाळी कलावंत घराच्या दिशेने सुटतो. बायका पोरं वाट बघत असतात. घरी गेल्यावर झोपायला तरी मिळतं? नाही, चला शेतात! दिवसा काबाडकष्ट आणि रात्री कलावंत साकारणे असा त्याचा दिनक्रम. कलेप्रमाणे पैसे मिळतात. दशावतारी कलेला राजाश्रय सोडाच पण राजाचा मान द्या. त्यांची कुटुंबे खंबीरपणे उभी राहतील अशी साथ द्या. दशावतारी कलावंतांच्या जीवनाच्या स्टोरीचा शेवटही भयानक होतो. रंगभूमीची ... Read More »

बुद्धं शरणं गच्छाऽमि

– प्रा. रमेश सप्रे आपलं देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून असलेलं ‘अणुशक्तिविषयीचं धोेरण’… आपला तेव्हापासून ध्यास आहे … शांततेसाठी अणुशक्ती (ऍटम्स फॉर पीस) विध्वंसासाठी नव्हे तर देशाच्या विकासासाठी अणुशक्ती! अन् हाच तर बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा किंवा शिकवणुकीचा गाभा आहे. बुद्धाला शरण जाऊ या. त्याहीपेक्षा बुद्धाच्या तत्त्वांना शरण जाऊया. ‘युद्ध नको असेल (जे रात्रंदिन, आत बाहेर चालूच आहे) तर बुद्ध हवा’ असं म्हणून चालणार ... Read More »

गोड, गोजिरं आजोळ!

– लाडोजी परब मायेने पाठीवर हात फिरवणारे आजी-आजोबा नसले तरी श्री देवी माउली हेच माझं सध्याचं आजोळ! देवळात जातो, ओटी भरून परततो. आठवणी काही पाठ सोडत नाहीत. भग्न आजी-आजोबांच्या घराकडे जरा फेरफटका मारून येतो. सगळी नवीन माणसं दिसतात ‘ह्यो पावनो कुठल्या गावाचो’ म्हणणारी! मग ओळख सांगावी लागते. पण लहानपणीची ओळख काळाआड झालीय, असेच क्षणभर वाटते. माझं आजोळ, विलवडेला! आठवणींनी भरलेलं. ... Read More »

शाळकरी मुले, नोकरदार आई!

– डॉ. स्वाती अणवेकर मुलाला शाळेत घातले आणि आपण एका जबाबदारीतूव मुक्त झालो असे कोणत्याही सूज्ञ मातेला वाटणे शक्यच नाही. तर शाळेत घातल्यावर आपली आपल्या मुलाप्रती असलेली जबाबदारी अजूनच वाढली आहे आणि आपण ती अधिक दक्षतेने… एक आई म्हणून पूर्ण करणे गरजेचे आहे हाच विचार सर्वप्रथम त्या स्त्रीच्या मनात येणार हे काही वेगळे सांगायला नको!! सेजलच्या मनात घालमेल सुरू होती. ... Read More »

म्युच्युअल फंड ः योग्य पर्याय

– विनोद आपटे, (विजयनगर, खोर्ली) फंड मॅनेजर गुंतवणूकदारांच्या पैशांचे व्यवस्थापन करतो व त्यासाठी त्यांच्या हाताखाली काही तज्ज्ञ किंवा अनुभवी माणसे असतात. म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले म्हणजे फायदा नक्की होणार असे मुळीच नसते. फक्त आपण अनुभवी माणसाच्या हातात पैसे देत आहोत एवढेच काय ते समाधान!  आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला चार पैसे मिळावेत म्हणून आपण सर्वजण राबत असतो व आपल्या कष्टाच्या ... Read More »

चित्रनगरी ‘हैदराबाद’!

– प्रा. रामदास केळकर गिनीज बुकमध्ये नोंद झालेले पक्षीही इथे पहायला मिळतात. इथल्या पक्ष्यांना उन्हाची झळा बाधू नये म्हणून पंखे, वाळ्याचे पडदे टांगलेले आहेत. दर तासागणिक ते पाण्याने ओले केले जातात. संपूर्ण स्टुडीओ बघता यावा यासाठी रेल्वे पद्धतीची वाहतूक उपलब्ध आहे. पर्यटनाबरोबर शैक्षणिक दौर्‍याचे ङ्गोरमतर्ङ्गे प्रत्येक वर्षी आयोजन केले जाते. प्रत्येक दौर्‍याचा अनुभव वेगवेगळा असतो कारण प्रत्येकवेळी ठिकाणे बदलत जातात. ... Read More »

सोहळ्यांची शालीनता हरवतेय!!

– ओंकार व्यं. कुलकर्णी खडपाबांध, फोंडा लग्न हा फक्त एक संस्कार नसून त्या पलीकडे बरंच काही आहे.., किंबहुना आपण ते करून ठेवलं आहे. काहीतरी वेगळं दाखविण्याच्या नादात आपण त्या संस्काराची, सोहळ्याची शालीनताच गमावून बसलोय, असं वाटतं बर्‍याचवेळी!! हुश्श! लग्नाचा हंगाम संपला (एकदाचा)! मसालेदार जेवण, झगझगीत कपडे, कलकलाट-गोंगाट, डोळे दीपविणारी रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि असं बरंच काही. निदान या हंगामापुरतं तरी ... Read More »

रोमिंग फ्री…… मृत्योर्मा अमृतं गमय!

  – भ्रमिष्ट मृत्यू हे खरंच जन्माचं जीवनाचं ध्रुवसत्य आहे. मृत्यू बनतो आनंद सोहळा… आनंदोत्सव… आनंदयात्रा! या संदर्भात म्हटला जाणारा ‘मृत्युंजय मंत्र’ हा मरणार्‍या व्यक्तीसाठी नसून तो म्हणणार्‍या जिवंत (पण मरत असलेल्या) व्यक्तीसाठी असतो… ‘जीवन ‘सुगंधिं पुष्टिवर्धनम्’ असं हवं इतरांचं पोषण करणारं… कीर्तीचा सुगंध असलेलं हवं…   रेल्वे स्टेशन.. त्यावरचे लांबच लांब फलाट.. अनेक पायर्‍यांचे जिने.. शेजारील क्रमानं चढत वा ... Read More »