कुटुंब

झिम्माड पाऊस…

– पौर्णिमा केरकर या गावांचे अनोखे लावण्य पावसाळी रानवाटांनी रानफुलांनी सजलेले पाहण्यासाठी एखादी तरी पावसाळी रात्र तीव्रतेने मनाला खुणावत असते. सूर्लाच्या विस्तीर्ण खडकाळ पठारावर चालत जायचे तर सोबतीला मुसळधार पाऊस हवाच! वाटावाटाना बिलगलेले धुके, गवतावरील हिरव्या लाटा, टपटपणारे पानावरचे थेंब ही दृश्ये अनुभवताना पावसाळी करवंदांचा आस्वादही तेवढाच आठवतो. मृगाचा पाऊस सुरू झाला की आकाशात काळ्याभोर ढगांची दाटी होऊ लागते. भरून ... Read More »

कॉलेज कुमारी आणि पालक

– डॉ. स्वाती आणवेकर मुली जेव्हा नुकत्याच तारुण्यात पदार्पण करतात त्या वेळेस त्यांची मानसिक स्थिती अगदीच गुंतागुंतीची झालेली असते म्हणूनच कदाचित ‘सोळावं वरिस …’ अशी उपमा या वयोगटाच्या मुलींना देण्यात आली असेल बहुदा! या वयोगटातील मुली या बर्‍याच शारीरिक व मानसिक स्थित्यंतरांमधून जात असतात, म्हणूनच एक स्त्री म्हणून तिने स्वतःला या काळात जपणे नितांत गरजेचे असते. शीतलचा कॉलेजचा आज पहिलाच ... Read More »

सफर चोर्ला घाटाची!

– रश्मिता राजेंद्र सातोडकर (शिरोडवाडी-मुळगाव) क्षणभर डोळे बंद केले आणि पूर्ण निसर्ग आपल्याला आयुष्याचा प्रवास करायला शिकवतो, याची जाणीव झाली. माझ्या बंद डोळ्यांना गरज होती ती भावनिक सुखाची. उघड्या डोळ्यांना वरवरचं दिसतं, पण… बंद डोळ्यांना भावना समजतात. ते क्षण अवर्णनीयच राहतील आणि या गोड आठवणी बंद डोळे आयुष्यभर अनुभवतील!! आपला गोवा भौगोलिकदृष्ट्या आकाराने जरी लहान असला तरी आपल्या गोमंतभूमीला निसर्गाचं ... Read More »

बियरीश एन्गल्फिंग पॅटर्न…

– सुधाकर ना. गावडे (सी. ए.) जेव्हा मार्केट तेजीत असते तेव्हा ते वर वर जात असते. एखाद्या विशिष्ट पातळीवर गेल्यावर जेव्हा आपल्याला बियरीश एन्गल्फिंग पॅटर्न दिसतो तेव्हा तो मार्केटचा ट्रेंड बदलणार याचा संकेत देतो. अशा वेळी आपल्याकडे असलेल्या शेअर्सना विकून फायदा कमवून द्यायचा असतो. मित्रहो, आज आपण बियरीश एन्गल्फिंग म्हणजे काय… हे समजून घेऊ. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसेच ... Read More »

हॉटेल उद्योगातील करिअर्स…

– नागेश एस. सरदेसाई हॉटेल्समध्ये तसेच इतर सेवा क्षेत्रांत मार्केटिंग आणि सेल्स एक्झिक्युटिव्हज् म्हणून काम करणे हा दुसरा पर्याय आहे. जर कुणामध्ये शिकवण्याची उत्तम कला असेल तर त्याला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये किंवा फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूटमधील शाखेत शिकवण्याची संधी मिळू शकते. ‘स्किल इंडिया’ कार्यक्रमाद्वारे कुणीही व्यवसाय करून स्वयं-रोजगाराची संधी मिळवू शकतो. अनेक दशकांपासून पर्यटनाच्या क्षेत्रात सतत वाढ होताना जाणवते आहे ... Read More »

गोव्यातल्या जंगली भाज्यांचे वैभव

– राजेंद्र केरकर पावसाचा मौसम हा जंगलातल्या नानाविध भाजीपाल्यांच्या बहाराचा कालखंड असतो. या भाज्या पौष्टिक तत्त्वांबरोबर मानवी समाजाला औषधी गुणधर्माचा पुरवठा करत असतात. आमच्या पूर्वजांनी आम्हांला दिलेला हा महत्त्वाचा नैसर्गिक वारसा आज लोप पावण्याच्या वाटेवर आहे. आज मानवी जीवन दिवसेंदिवस परावलंबी होत असून, त्याचे जगणे बाजारात उपलब्ध असलेल्या गोष्टींवर अवलंबून राहिलेले आहे. जीवनातला धकाधकीपणा इतका वाढलेला आहे की त्यामुळे फुरसतीचे ... Read More »

प्रकाशाचे सूर…

– दासू शिरोडकर (तरवळे-शिरोडा) अंधार… अंधार! काळाकुट्ट अंधार! साम्राज्यावर तयाच्या करीत बेधुंद प्रहार एक स्वप्नवेडा होऊनी स्वार वायुवर घेत शोध प्रकाशाचा करी संचार निरंतर! भटकंती ही अनंत विश्‍वाची दिन, मास अन् युगायुगाची घेऊनी वेदना अश्‍वत्थाम्याची अखंडित अन् अनंताची! मध्येच भेदूनी अंधार विवर वाटे चकाके काही दूरवर उठले अंतरंगी रोमांच क्षणभर वेड्या आशेची वेडी हुरहुर! वास्तवात, असे तो आभास धुक्याचा निरर्थक फसवा ... Read More »

पावसाचा पहिला दिवस!

– रश्मिता सातोडकर कित्येकांच्या नव्या आयुष्याची साक्ष म्हणजे हा पाऊस तर काहींच्या दुःखावर पांघरूण ओढणारा हा पाऊस. नव्या जिवाला पालवी देऊन, अंकुर आणणारा हा पाऊस सर्वांना लाभदायी ठरो हीच इच्छा! या पावसात प्रत्येक मन आनंदानं उभारी घेऊ दे आणि पुढच्या पिढीला तरतरी येण्यासाठी या पावसात, एक तरी झाड लावू दे…  वैषाखातल्या उन्हाचे चटके सोसून सारी धरती सुसज्ज होते आणि आतुरतेने ... Read More »

रोमिंग फ्री… मैत्र जीवांचं!

भ्रमिष्ट फुलं तोडून, त्यांचा कलात्मक गुच्छ बनवून तो जर फुलदाणीत (फ्लॉवर पॉट) ठेवला तर एक-दोन दिवसात कोमेजतो. पाण्यात ठेवला नि वरून फवारा मारला तरीही.. कारण पोषण करायला मुळंच नसतात. समाजातील बंधुभाव, एकोपा.. सहिष्णुता ही अशी मूळं मातृभूमीशी.. मातृभाषेशी.. इथल्या मातीतल्या संस्कृतीशी जोडलेली असली पाहिजे. प्रीतिसंगम. शब्दच किती कर्णमधुर वाटतो नाही! त्या गावाचं ते वैशिष्ट्य होतं. दोन नद्यांचा संगम. समोरासमोरून वाहत ... Read More »

संपली सुट्टी…

– पौर्णिमा केरकर शाळा-कॉलेजमधून शिकविणार्‍या शिक्षकांनी स्वतः सतत प्रयोगशील राहायला हवे. त्याचे ते स्वतःसाठीचे नव्याने जगणे असते. असे ताजे टवटवीतपणाने जगण्याचे क्षण शिक्षकी पेशातच येतात कारण शिक्षकांचं नातं एकाच वेळी असंख्य संवेदनशील मनाशी जोडले जाते.  तुझ्या यशापेक्षाही सर्व गुणदोषांसकट तू माझी… तू माझा आहेस… माझं तुमच्यावर प्रेम आहे… ही भावना वाढीस लावताना श्रमातून, ध्यासातून शिकणं होतं, यशाची पायरी गाठता येते ... Read More »