ब्रेकिंग न्यूज़

कुटुंब

असे का बरे घडते?

– डॉ. राजेंद्र साखरदांडे समोरच्या रस्त्यावरून ती चालत जात होती. बुटकी वाळलेली, गोरी कात जळून (उन्हाने बहुदा) काळी सावळी झालेली. चेहरा काळवंडून गेला होता. ती माझ्या नजरेला नजर लावत नव्हती. तिच्या नजरेत कारुण्य, अगतिकता, लाज, विवशता ठायीठायी दिसत होती. सर्वांना बरोबर घेत ओढतच ती जात होती. Read More »

माझा गुरु माझी आई

– अनुराधा गानू प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही रूपं बघतो. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये आपण गुरुला साक्षात परब्रह्म मानले आहे. तसा गुरु मला माझ्या आईमध्ये मिळाला. Read More »

‘फ्रेंड’ नावाची ‘शिप’

– ममता दीपक वेर्लेकर, द्वितीय वर्ष – कला, सेंट झेवियर्स कॉलेज, म्हापसा मैत्रीचे नाते हे काही आपल्यासाठी नवीन नाही. यार, दोस्त, फ्रेंड, बडी ही याच नात्याची दुसरी नावे. पण, बदलत्या काळात हे नाते बदलले, त्याचे स्वरूप बदलले आणि त्याचबरोबर हे नाते निभावण्याची पद्धतही बदलली. पण, मैत्रीबद्दलची आमची व्याख्या काय? तर मैत्री म्हणजे, ‘माझी एक मैत्रीण असते. ती माझ्याबरोबर घरी येते. आम्ही बसची ... Read More »

बिबट्या-मानव संघर्ष (?) व्यवस्थापन हवे!

 – नीला भोजराज श्रीमती विद्या अत्रेय यांच्या म्हणण्यानुसार मुळात खरंच मानव आणि बिबट्या यांच्यामध्ये संघर्ष आहे का? संघर्ष हा शब्द नकारात्मक अर्थाचा आहे. त्याऐवजी संवाद हा शब्द वापरणे योग्य होईल असे त्या म्हणतात. कारण जोपर्यंत या पृथ्वीवर मानव आणि प्राणी आहेत तोपर्यंत त्यांच्यात संवाद होतच राहणार. पण मध्यंतरी प्रसारमाध्यमांनी त्याचा बागुलबुवा बनवल्यामुळे याविषयी चर्चेला उधाण आले. वन्य प्राणी मानवाला शत्रूसमान ... Read More »

भेट त्याची!

– अपूर्वा बेतकेकर निसर्गाला जवळून पाहायची इच्छा खूप दिवसांपासून होती. लवकरच नेत्रावळी येथील सावरी धबधबा पाहायला जाण्याची संधी चालून आली. सांगे तालुक्यातील हा छोटासा गाव. वनराईने पूर्णपणे आच्छादलेला. त्यातील डोंगरमाथ्यावरून हा सावरी धबधबा वाहातो. त्याला भेट द्यायला गेले त्यावेळी बरोबर महाविद्यालयीन विद्यार्थीही होते. आधीच निसर्ग मुग्ध आणि सोबत त्याच्या एवढेच मनाला भूरळ घालणारे तरुण म्हणूनच कदाचित त्याक्षणी निसर्गाला आव्हान करण्याची ... Read More »

शंभरी भरली!

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे आठवतोय… महाभारतातील तो राजदरबार… राजाने भगवान श्रीकृष्णाची स्तुती करून मानाने त्याला स्थान दिले होते. त्याची पाद्यपूजा पण केली होती. इतक्यात शिशुपाल दरबारात प्रवेश करता झाला. त्याने गवळ्याचा पोर म्हणत श्रीकृष्णाची अवहेलना केली होती. शिशुपालची शिवीगाळ चालूच होती. श्रीकृष्ण त्याचे अपराध मोजत राहिले. शंभर अपराध भरताचक्षणी सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला. त्याची शंभरी भरली होती. हा ... Read More »

बैलगाडी

– संदीप मणेरीकर ‘माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो कशी दौडत दौडत येई हो मला आजोळी घेऊन जाई हो’ परवाच या गाण्याच्या ओळी कानावर पडल्या आणि मन गावाकडच्या बालपणीच्या मधूर आठवणींत रममाण झालं. ‘बैलगाडी’! एकेकाळी या बैलगाडीचा डामडौल काय वर्णावा असा होता. आज चारचाकी गाड्यांनाही एवढा भाव नाही तेवढा त्या काळी या बैलगाडीला होता. पूर्वीच्या काळी ... Read More »

जीवनाचं गणित सोडवू

– रश्मिता राजेंद्र सातोडकर, शासकीय महाविद्यालय, साखळी   जन्माला आलोच आहोत, जगू अखेरच्या श्‍वासापर्यंत जीवन नावाचं गणित सोडवू अखेरच्या श्‍वासापर्यंत… जन्माला आलेला प्रत्येकजण कधी ना कधीतरी मरणारच असतो. त्याचे मरण आयुर्मान पूर्ण होऊन झालेले असेल किंवा नैसर्गिकरित्या किंवा त्या व्यक्तीने आत्महत्या केलेली असेल तर. पण जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करून स्वत:चे जीवन संपवते तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातील जीव नावाचे ... Read More »

गोमंतकाचा भूतकालीन शैक्षणिक आढावा

– भिकू ह. पै आंगले श्री शांतादुर्गा शिक्षण समिती या संस्थेने आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात जे काही अभिनवसंपन्न उपक्रम आयोजित केले आहेत त्यात दोन दिवसांच्या १३ आणि १४ सप्टेंबर या काळात शैक्षणिक आणि सामाजिक बांधीलकी राखून त्याचे लोण अखिल गोमंतकात व इतरत्र पोचवावे यासाठी संयोजित केलेली परिषद अनेक शैक्षणिक विषयांच्या माध्यमातून बदलत्या काळाचा वेध घेण्यास संयुक्तिक ठरेल यात तिळमात्र संदेह नाही. Read More »

मूल्यधारित शिक्षणाची गरज

– शिरीषकुमार आमशेकर गेल्या दोन दशकांत आपल्या देशात खूप प्रगती झाली. अविकसित देश – विकसनशील देश ते आता आपण विकसित देशांच्या यादीमध्ये गणले जावू लागणार अशी चिन्हे दिसत आहेत. आपल्या देशाचा स्वत:चा महासंगणक डॉ. विजय भटकरांच्या नेतृत्वाखाली तयार करून अमेरिकन संगणक क्षेत्रातील शास्त्रज्ञ व देशासमोर एक मोठे आव्हान आपण ऊभे केले तसेच अवकाशात अत्यावश्यक असणारे क्रायोजिनीक तंत्रज्ञानही आपण विकसित केले. ... Read More »