ब्रेकिंग न्यूज़

कुटुंब

‘गाढवावरचा’ शहाणा…!

– राजेंद्र रामचंद्र साखरदांडे दोन बाया नेहमीप्रमाणे मोठ्याने बोलत होत्या. बाया बोलताना मोठ्यानेच कां बोलतात…(?) कारण त्यांचे बोलणे दुसर्‍यांनी ऐकावे म्हणून..! कारण त्यांचे ते बोलणे त्यांच्यासाठी नसतेच, ते दुसर्‍याकरिता असते.. व दुसर्‍यांनी ते मुद्दामच ऐकावे असे त्यांना वाटते. ‘‘काय गं बाई, आमचे हे, दिवसभर मोबायलवरच असतात. मी जवळ गेले तर जे ते बघत असतात ते बंदच करतात. काय बाई बघत ... Read More »

जाळे

– वासुदेव नरहरी कारंजकर त्या घाणेरड्या चाळीच्या वरच्या मजल्याच्या वर्‍हांड्यात उभी असलेली सरस्वती कोळ्याच्या जाळ्यात सापडलेल्या लहानशा पिवळ्या फुलपाखरासारखी दिसत होती. तिने लिंबू रंगाचा चुडीदार घातला होता. मुंबईची हवा तिला बिलकुल मानवली नव्हती. सगळीकडे घाण, घाण आणि घाण! इथून, या वर्‍हांड्यातून तरी काय वेगळे दिसत होते? समोर माहीमची अथांग झोपडपट्टी पसरली होती. खाडीचा कुबट वास; मलमुत्राचा, कचर्‍याचा वास यामुळे सगळ्यांने ... Read More »

ग्रामीण उन्नतीचा उत्सव रवींद्र महोत्सव

– गोपीनाथ वि. गावस ग्रामीण जीवन उन्नतीच्या दिशेने नेण्याचे स्वप्न पाहणार्‍या, कलेचा आविष्कार करत कलाकारांची आदर्श जीवनाकडे सांगड घालणार्‍या, मातीची नाळ माणसाकडे जोडणार्‍या, ग्रामीण विकास हेच माझे कूळ आणि मूळ सांगण्यासाठी तरुणांना ‘जागे व्हा..’ म्हणून हाक मारणार्‍या साखळी रवींद्र भवनाने आपले प्रथम वर्धापनरुपी महोत्सवी वर्ष २७ आणि २८ डिसेंबर २०१४ रोजी उत्साहाने साजरे केले असे म्हटल्यास वावगे ठरु नये. Read More »

विहिरीवरील रहाट

– संदीप मणेरीकर आमच्या घरी पाण्याची विहीर आहे. पूर्वी विहिरीचं पाणी हाताने ओढून काढावं लागे. पाणी ओढण्यासाठी विहिरीवर लोखंडी चाक आहे. तिला गाडी असं म्हणतात. त्यात जाड दोरी म्हणजे राजू घालायचा, त्याला एक फास तयार करायचा, तो फास कळशीला बांधायचा. कळशी पाण्यात सोडायची व नंतर भरली की बाहेर खालून वर ओढून काढायची. आणि मग ते पाणी घरी नेऊन हंड्यात भरायचं.  Read More »

प्रवासातील सोबती…

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे ‘‘आजचे जेवण बरे नव्हते. काय तो सूप… खायच्या लायकीचा नव्हता. भात तर शिजलाच नव्हता, वगैरे दूषणे देत, ढेकर देत स्वारी उठली. त्याच्या ढेकरांसमोर माझ्या ढेकरांनी बाहेर पडायचे धाडसही केले नव्हते. माझ्या नावडत्या शाकाहारी जेवणाने मला ढेकरच येणार नव्हता. सौ.कडे बघत मी तोंड कडू केले. ती तर मनातल्या मनांत हसत असणार चांगली.. खोडे घडणार ह्यांना म्हणून! ... Read More »

मोहमयी मायानगरी!

– सौ. बबिता बाबलो गावस ‘…पण ठाणेकर साहेब मला तुमचा मुख्य मुद्दाच समजला नाही. कृपया मला सविस्तर सांगता का?’ वामनरावांनी ठाणेकरांना विनंती करत म्हटलं. ‘हो.. हो.. वामनराव, सांगतो ना. आता असं बघा… तुम्ही रुपये पाच लाख जर आमच्या बँकेत ठेव म्हणून ठेवलेत तर तुम्हाला दहा टक्के व्याज दर महिन्याला मिळेल.. म्हणजे रुपये पन्नास हजार! या पन्नास हजारात तुम्ही मची महिन्याची ... Read More »

एकजुटीचा संदेश देणारा पारंपरिक धालो

– रश्मिता राजेंद्र सातोडकर आपल्या गोव्याला लोकसंस्कृतीचा मौल्यवान असा खजिनाच लाभलेला आहे, ज्यात आहे गोव्याची नैसर्गिक संपत्ती, लोकगीतांच्या कहाण्या, धालो, फुगडी यासारखी संस्कृती आजवर आपल्या पूर्वजांनी जपून ठेवली आहे आणि याच पारंपरिक लोकसंस्कृतीत पौष महिन्यात भर पडते धालोत्सवाची! आला आला ग पौषाचा महिना धालो पौर्णिमा आली गं धालो पौर्णिमा आली ग… असे म्हणत प्रत्येक गावा-गावात धालो खेळले जातात. धालोंमधून आपल्याला ... Read More »

संकल्प २०१५

सध्या माझ्याकडे ‘आयुष’ मंत्रालयाची जबाबदारी आहे. आयुष म्हणजे आयुर्वेद, योग, युनानी, सिद्धयोग व होमिओपॅथी या पाच भारतीय पद्धतींचा समावेश आहे. या पद्धती प्रखर होत्या. तसेच यामध्ये शस्त्रक्रियासुद्धा केल्या जातात. परंतु गतकाळामध्ये या सर्व पद्धती दाबल्या गेल्या होत्या. ऍलोपॅथीलाच जास्त महत्त्व दिले गेले होते. पण या ऍलोपॅथीच्या औषधांचे दुष्परिणाम खूप असून त्यामुळेच भरपूर आजार आज डोके वर काढून आहेत जसे मधुमेह, ... Read More »

बेळगावातील ‘संकल्पभूमी’ : खाणीवरचा स्वर्ग

– बबन भगत काळ्या पाषाणी दगडांची एक भव्य मोठी खाण. दगड काढून झाल्यावर टाकून देण्यात आलेली. निरुपयोगी, कुणीही त्या खाणीकडे पाहून नाक मुरडावं अशी, ओंगळवाणी, वाळवंटासारखी. पण त्या खाणीवर साक्षात स्वर्गच उभा रहावा अशी जणू ईश्‍वराची इच्छा होती. अन् देवाच्या इच्छेनुसार ते घडावं यासाठी एका अवलियाची त्या खाणीशी गाठ पडली. अन् त्या खाणीचं नशीब उजळलं. ज्या खाणीवर साधं एक रोपटं ... Read More »

प्रवासातील सोबती…

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे नेहमीच आम्ही दुसर्‍यांचे निरीक्षण करतो.त्यांच्या छोट्या छोट्या हालचाली, बोलणे-चालणे बघतो व त्यावरून तो माणूस स्वभावाने कसा असेल याचा निष्कर्ष काढतो. लक्षात ठेवा कुणीतरी कोपर्‍यावरून तुमचेही निरीक्षण करत असणार! एकदा मी माझ्या इतर डॉक्टर मित्रांबरोबर ड्युटीवर होतो. जागा होती डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. पेशंट नव्हते. संध्याकाळचे सहा वाजलेले. गप्पागोष्टी चाललेल्या. बोलता बोलता आमची चर्चा ‘‘देहबोली’’वर येऊन थांबली. माणसाची ... Read More »