ब्रेकिंग न्यूज़

कुटुंब

रथसप्तमी सूर्योपसानेचा प्रारंभ

– राधिका कामत-सातोस्कर, साखळी हिंदू धर्मात अनेक सण साजरे होतात. इंग्रजी वर्षाच्या प्रारंभी मकर संक्रांतीनंतर आठ-दहा दिवसांनंतर येणार्‍या रथसप्तमीला अनन्य साधारण महत्त्व आहे. सूर्यदेवाला नमन आणि त्याची पूजा या दिवशी केली जाते. सूर्य मकर राशीत या दिवसापासून मार्गक्रमण करतो. उगवत्या सूर्याला नमस्कार करून दिवसाचा प्रारंभ करणे इष्ट मानले जाते. अशा सूर्यदेवाच्या रथसप्तमीविषयी थोडक्यात जाणून घेऊया. Read More »

‘नो फेल…!’

– सौ. ममता खानोलकर अस्नोडा-बार्देश ‘‘आठवीपर्यंत पास, नववीत जास्तीत जास्त विद्यार्थी नापास’’! जेव्हा चौथीपर्यंत पास होतं तेव्हा पाचवीत विद्यार्थी नापास होत असत. खरंच, असं होऊ शकते का? मूल जन्माला आल्यापासून त्याची शिकण्याची क्रिया चालूच असते. शाळेतल्या चार भिंतीत पाच तास बंदिस्त ठेवलं तरी ती शिकणारच! शंभर टक्के विद्यार्थी शंभर टक्के ज्ञान ग्रहण करणार असंही होऊ शकत नाही. प्रत्येकाची आकलन शक्ती, ... Read More »

‘‘रस्ता सुरक्षा सप्ताह’’ सुरक्षा कोणाची (?)

– गुरुदास दामोदर जुआरकर, (निवृत्त जिल्हा पोलीस उपअधीक्षक) ट्राफिक किंवा वाहतूक हा विषय फार मोठा आहे. या विषयाचे अनेक पैलू आहेत, अनेक बारकावे आहेत त्याबद्दल माहिती किती जणांना असते? फक्त चौकात उभे राहून वाहनांना दिशा दाखवणे म्हणजे वाहतूक नियंत्रण करणे नव्हे. पोलिसांचे काम एवढे सोपे नाही. अनेक वर्षांपासून ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ साजरा केला जातो. तुम्हाला कुणाची सुरक्षा अपेक्षित आहे? रस्त्याची… ... Read More »

कृष्णधवल टीव्ही

– संदीप मणेरीकर रविवारची सकाळ. सकाळचे नऊ वाजलेत आणि लोकांची गडबड एकदम थांबते. लोक बोलता बोलता एकदम गप्प होतात आणि ‘महाभारत…. महाभारत… महाभारत… कथा है पुरुषार्थ की, है स्वार्थ की परमार्थ की…’ असं हिंदी टायटल सॉंग सुरू होतं. दिल्ली दूरदर्शनवरून ‘महाभारत’ ही चोप्रा बंधूंची मालिका सुरू होते आणि संपूर्ण विश्‍वच जणू काय थांबल्याचा भास होतो. बर्‍याच ठिकाणी रस्त्यांवरची गर्दी कुठेतरी ... Read More »

गाभार्‍यातील समई : मंदाताई

– सौ. शरयु जोग मनात शांती, तृप्ती, आनंद व श्रेय असताना आणि ओठात हसू असताना मृत्यू आला तर स्वर्गप्राप्ती होते असं म्हणतात. स्व. मंदाताई यांच्या बाबतीत असं निश्‍चितच झालं आहे. त्यांचा शांत, समाधानी चेहरा बघितला आणि मनातलं सर्व कुठेतरी बोलावं असं वाटलं कारण शब्द हेच जीवन!शब्दांचं सामर्थ्य अपरंपार आहे. शब्द हे आपल्या जवळील धन आहे जे कोणीही कधीही चोरून आणि ... Read More »

मालवण समुद्रात किल्ला…!

– गौतमी चोर्लेकर, शेळप बुद्रूक, वाळपई ऐकिवात आलेले एक गीत… मालवण समुद्रात किल्ला शिवाजी आत कसा शिरला…! खूप दिवसांची मनीषा होती, मालवणातअसलेला अरबी समुद्रातील हा किल्ला बघायची, अन् ती मनीषा पूर्ण झाली. अंदाजे तीन तासांचे अंतर कापून मजल.. दरमजल.. करत गेलो. खरेच, तेथे जाताच अन् महाराजांच्या त्या अप्रतिम कृतीचे दर्शन होताच डोळ्यांचे पारणे फिटले! मालवणचं सौंदर्य तर मालवणच्या वेशीपासूनच आमच्या ... Read More »

उत्तम वकील होण्यासाठी…

– ओंकार व्यंकटेश कुलकर्णी, खडपाबांध, फोंडा ‘जीआरके टॉक्स’ या कारे कायदा महाविद्यालयाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफण्यासाठी गोवा राज्य सरकारचे ऍडव्होकेट जनरल श्री. आत्माराम नाडकर्णी आले होते. प्रसंगी कारे महाविद्यालयात ‘ई-सेल’ व ‘आय-सेल’चे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना खर्‍या जगातील कायद्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी यांचे प्रयोजन करण्यात आले. ‘सेंटर फॉर इन्क्युबेशन अँड बिझिनेस एक्सलरेशन’ या संस्थेमार्फत ‘ई-सेल’ हाताळले जाईल. या सेल ... Read More »

चायनीज विज्डम्

– कु. श्रेयस गावडे ‘चायना’ हा शब्द कानावर पडल्यावर पहिलाविचार आपल्या डोक्यात येतो तो म्हणजे‘मेड इन चायना’चा टॅग किंवा डिलिशियस ‘चायनीज फास्ट फूड’! हो ना? आज एका अर्थानं जगावर राज्य करणार्‍या या दोन चायनीज संपत्ती आहेत. आणि सामाजिक जीवनात हे अगदी खरंय… दुसर्‍यासाठी भेटवस्तू खरेदी करताना आपल्याला ‘मेड इन चायना’ हा टॅग चालतो! गमतीचा भाग सोडा, पण वैयक्तिक जीवनात स्वतःला ... Read More »

मकर संक्रांतीचे पुण्यपर्व

– सौ. पौर्णिमा केरकर हृदय व बुद्धी यांची पूजा करणारी आपली संस्कृती आहे. भावना, संवेदना, निर्मळ ज्ञान, समाजभान, ज्ञानविज्ञान यांची जोड देऊन केलेली कृती ही सर्वांगसुंदर अशीच असते. विरोधातून विकास, विकारातून विवेकशील आचरणाकडे मार्गक्रमण करणे त्यामुळेच साध्य होते. अशा काही नैतिक मूल्यांसाठी, चांगल्या वर्तणुकीसाठी व एकमेकांप्रतीची आत्मीयता, स्नेहभावना वाढीस लागावी यासाठी काही व्रतवैकल्ये, पूजा-अर्चा, सण-समारंभ, उत्सव यांची रचना समाजमनाने पूर्वीपासूनच ... Read More »

आकाशवाणी अर्थात रेडिओ

– संदीप मणेरीकर ‘कौसल्या सुप्रजा रामपूर्वा संध्या प्रपद्यते…. उत्तिष्टो उत्तिष्ट गोविंद गरुडध्वज… श्री व्यंकटेश दैवे तव सुप्रभातम्’ किंवा ‘आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे’ किंवा पहाटे सातच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणार्‍या प्रादेशिक बातम्या असोत वा त्याहीपूर्वी पहाटे साडेपाच वाजता ‘तव सुप्रभातम्’ असे स्वर मी शाळेत जात असताना कानावर पडत होते. प्रभातीचे रंग, शेतकर्‍यांसाठी हवामानविषयक अंदाज, प्रभातगीते, असे ... Read More »