कुटुंब

साहित्याचा स्नेहोत्सव

सोनाली शेणवी देसाई इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझातर्फे फर्मागुडीच्या आवारात दोन दिवसांचा साहित्यिकांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. या स्नेहमेळाव्यात विविध साहित्यिक कार्यक्रमांसोबतच इतर सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. या साहित्यिक मेळाव्याचा हा थोडक्यात आढावा. शनिवार दि. १० आणि रविवार दि. ११ मार्च असे दोन दिवस इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझातर्फे कवी-लेखक साहित्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मला सगळ्यांसोबत बसगाडीने जाता ... Read More »

दहावीनंतर काय?

– प्रा. रामदास केळकर उद्या काय? ह्याची उत्सुकता, चिंता वृत्तपत्र अन्य मीडियासकट सर्वांनाच असते. म्हणून तर जगण्यात, जीवनात मजा असते. पण करिअरमध्ये मात्र हा प्रश्‍न खरोखरीच चिंतेचा असतो. खास करून जिथे सरकारी नोकरीचे दरवाजे जवळजवळ बंद होत आलेले, खाण उद्योगाला घरघर लागलेली, त्यात बाहेरील उमेदवारांची दिवसेंदिवस वाढत गेलेली संख्या. अशा अनेक समस्यांना तोड देत पुढच्या पिढीला आपले करिअर करायचे आहे. ... Read More »

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क

– माधवी भडंग आमच्याकडे सफाईसाठी येणार्‍या एका महिलेचा मुलगा रोज तिच्यासोबत कामावर यायचा. तो ७ वर्षांचा असूनही त्याला तिनं शाळेत घातलं नव्हतं. घरी त्याला एकटं ठेवणं अशक्य होतं. तिला मी अनेकवेळा म्हणाले की, ‘मुलाला शाळेत घाल. तो तुला त्रास देणार नाही. शिवाय तो थोडंफार लिहिणं वाचणं शिकेल. हवं तर मी येते शाळेत. त्याला आपण घालूया शाळेत.’ तिनं माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष ... Read More »

शिवरायांचा आठवावा प्रताप!

– भाग्यश्री केदार कुलकर्णी (पर्वरी) ‘निश्चयाचा महामेरू… बहुत जनांसी आधारू … अखंड स्थितीचा निर्धारू… श्रीमंतयोगी…!!’ जो श्रीमंत आहे, सर्व ऐहिक सुखांचा मालक आहे. तरीही एखाद्या योग्याप्रमाणे दैदिप्यमान अशा ध्येयासाठी बद्ध आहे. ज्याचा निर्धार अखंड आहे. ज्याचा निश्चय मेरू पर्वताइतकाच विराट आहे आणि म्हणूनच त्याच्या या भव्य अस्तित्वाचा सगळ्यांना आधार वाटत होता. उदे गं अंबे उदे, हे चंडमुंडभंडासुरखंडिनी, जगदंबे, महिषासुरमर्दिनी दुर्गे, ... Read More »

संवाद

 सौ. माधवी भडंग   अंहकार, विभक्त कुटुंबपध्दती, पिढीचा मानसन्मान कमी, सर्वात महत्त्वाचं कारण टेक्नॉलॉजीचा अती वापर, त्यामुळे सहजता गेली, संवाद हरवला, नात्यात कृत्रिमता आली. जग जवळ आलं पण मनं दुरावलीत. दोन महिन्यांपूर्वी शाळेत मुलांशी चर्चा करायला गेले असता लक्षात आलं की, मुलं संवादात कमी पडत आहेत. यापूर्वी याच विषयावर वाचलेली एक गोष्ट आठवली. गोष्टीचा आशय असा- मुलं आजी-आजोबांकडे आईवडिलांसह दोन ... Read More »

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने….

प्रा. रमेश सप्रे विज्ञान दिवसाचा सर्वोच्च उद्देश असतो – वैज्ञानिक दृष्टी – वैज्ञानिक वृत्ती – वैज्ञानिक कृतीचा उदय. यातूनच निर्माण होते वैज्ञानिक मनोवृत्ती नि जीवनशैली (सायंटिफिक टेंपर). विशेष म्हणजे आपण शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावरच्या अभ्यासक्रमाची दशसूत्री पाहिली तर त्या दहा तत्त्वात एक महत्त्वाचं सूत्र आहे ही वैज्ञानिक दृष्टि नि वृत्ती. ‘सायन्सला आहेस ना? संशोधन क्षेत्रात पुढचा अभ्यास नि काम करणार आहेस ... Read More »

‘सूर जहॉं’ – संगीताची आगळी पर्वणी

नितिन कोरगावकर गोवा शासनाच्या संस्कृती संचालनालयाने कला अकादमी गोवा व बांगला नाटक डॉट कॉम यांच्या सहयोगाने अकादमीच्या मा. दिनानाथ कला मंदिरात आयोजित केलेल्या सूर-जहॉं विश्‍वशांती संगीत महोत्सवात पहिल्या दिवशी फिलंड येथील चार महिला कलाकारांनी सादर केलेला तुलेतार व हंगेरीच्या कलाकारांच्या मुझसिकास कार्यक्रमाने रंग भरला. तुलेर फिनीश पुराणातून आले आहे. हा गानवृंद फिलंडच्या चार महिलांनी २०१२ मध्ये सुरू केला व त्या ... Read More »

विद्यार्थ्यांनो… खिंड लढवा…

– प्रा. विद्या प्रभुदेसाई   आनंदी राहून आपण प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास ठेवून सकारात्मक वृत्तीने परीक्षा दिली पाहिजे. आपण केलेल्या अभ्यासाचे मूल्यमापन आपणच करावे. आत्मविश्वास ढळू न देता परीक्षेची खिंड लढवा… जय आपलाच होईल.. अशी आशा ठेवा. मोठ्यांचे आशीर्वाद आणि समवयीनांच्या शुभेच्छा आपल्या मागे आहेतच. ईश्वर समस्त विद्यार्थी वर्गाला परीक्षेबरोबरच भावी आयुष्यातही यशस्वी करो ही सदिच्छा! सामान्यपणे मूल दोन ... Read More »

अवती-भवती ही वाट दूर जाते….

– अंजली आमोणकर जगाच्या दृष्टीने ते वाट चुकलेले वाटसरू असतात. पण त्यांच्या स्वतःच्या दृष्टीने त्या अचूक वाटा असतात. आपल्याला भरकटवणारी, वाईट वळण लावणारी ‘वाट’ नसते. ते आपले ‘मन’च असते. आपण मात्र वाटेवर ठपका ठेवतो; तिच्यावरच्या वळणांना नावं ठेवतो. गडगडाट वाढून पाऊस चारही अंगांनी धो..धो.. कोसळू लागला. आभाळ काळेकुट्ट झालेलेच होते. सोसाट्याचा वारा सुटला व काहीच उमगेना. ओळखीच्या खुणा नजरेस पडेनात. ... Read More »

समर्थ रामदास आणि आपलं जीवन

– प्रा. रमेश सप्रे दासबोधात समर्थांनी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श केलाय. आजचा काळ त्यावेळच्या मानानं खूप खूप बदललेला असला तरी समर्थांचं मार्गदर्शन आजही कालसंगत वाटतं. ‘स्वगुणपरीक्षा’ नावाचे चार समास त्यांनी लिहिले आहेत. त्यात जन्मपूर्व गर्भवासापासून जीवनातील सर्व अवस्थांचं प्रत्ययकारी वर्णन आहे. त्यावेळेसारखी परिस्थिती समाजात जरी बदललेली वाटली तरी कुटुंब – त्यातील व्यक्ती व त्यांची मनोवृत्ती यात विशेष बदल झाला नाही ... Read More »