कुटुंब

उन्हाळी शिबिरांतून मिळावा… ‘संस्कारांचा’ गारवा!

पौर्णिमा केरकर गोव्यात अलीकडे विविध सामाजिक, सांस्कृतिक तसेच सरकारी संस्था मुलांसाठी उन्हाळी शिबिरांचे आयोजन करतात. प्रामुख्याने ही शिबिरे शहरी भागात असल्याने त्याचा लाभ शहरी मुलांना होतो. गावात शिकणारी व गावातच राहणार्‍या मुलांना उन्हाळी शिबिरांपासून वंचित रहावे लागते. यावर उपाय म्हणून ग्रामीण भागातूनही काही संस्थांनी मुलांसाठी असे उपक्रम राबवावेत, जेणेकरून शहरी मुलांना गावातील लोकमानसांची जीवनशैली अनुभवता येईल. कधी एकदा आपली परीक्षा ... Read More »

हेडगेवार विद्यालयातील मुलांच्या कुंचल्यातून साकारली ‘चित्रपालवी’

नितीन कोरगावकर डॉ. केशव बळीराम हेडगेवार विद्यालयाने आत्तापर्यंत अनेक स्तुत्य उपक्रम राबवून आदर्शवत अशी कामगिरी बजावलेली आहे. मग ते ऐतिहासिक विषयावरील महानाट्य असो, किंवा संपूर्ण वंदेमातरम् सारखी देशप्रेम जागविणारी आगळी स्पर्धा असो. हेडगेवार विद्यालयाच्या उपक्रमांचे अनुकरण होते, यातच सर्व आले. असे उपक्रम हे सहज जाता जाता होत नाहीत. त्यामागे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचेही योगदान असते. परस्पर सहकार्यानेच हे उपक्रम यशस्वी ... Read More »

‘विकृत’ नजर… ‘संस्कृती’ची शिकार!

सौ. स्वाती अणवेकर, म्हापसा अत्याचार करावासा वाटणे ही मानसिकताच मुळात विकृती आहे. अल्पवयीन मुलांपेक्षा मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण अधिक आहे. इथे भावनांचे बंध तुटलेले आहेत. माणुसकीचा रंग उडालेला आहे, अन् नात्यांच्या गोतावळ्यात आपलेपणा हरवलेला आहे. कोवळ्या वयातच वासनेचा विषारी डंख होतोय. जगातील एकूण लोकसंख्येपैकी ११ टक्के मुली युवावस्थेत गरोदर राहतात. जगात दरवर्षी ३० लाख अल्पवयीन मुलींचा गर्भपात होतो. भारतात हे ... Read More »

चतुरंगची अभिजात शास्त्रीय संगीताची ‘शोधयात्रा’

डॉ. दत्ताराम देसाई (चतुरंग कार्यकर्ता) चतुरंग प्रतिष्ठान या संस्थेने महाराष्ट्र व गोव्याच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्याच्या दालनात अनेक नवीन पायंडे पाडले आहेत. सुरवातीच्या काळात संस्थेचे मार्गदर्शक सोळंकी मास्तर यांनीच कार्यकर्त्यांना ‘रुळलेल्या वाटेवरून न जाता स्वतःची नवीन पायवाट निर्माण करा’ असा कानमंत्र दिला होता. त्यानुसार एखादा लोकप्रिय उपक्रमसुद्धा ठरावीक काळानंतर थांबवणे संस्थेने उचित मानले होते. रंगसंमेलन, जीवनगौरव पुरस्कार, त्यासाठीची जनक योजना, ... Read More »

हे निसर्गराजा…

 कालिका बापट निसर्गराजा तुझ्या कुशीत पुन्हा पुन्हा जन्मा येणे हा मानवाचा ध्यास असतो. परंतु जन्म सफळ बनविणे हा तुझ्या असण्याचा साक्षात्कार असतो. तुझ्यातच जगणे, तुझ्यातच रूजणे आणि शेवटी तुझ्यातच विलिन होणे हेच तर सत्य आहे. ज्याची जाणीव तू मानवाला सदोदित करीत असतो. तुझ्या कुशीत पुन्हा पुन्हा जन्मा येणे हे प्राणीमात्रांचे परमभाग्य. तुझ्या सौंदर्याच्या वेडाने चराचराला पडलेली भूल तुझ्याकडे परत येण्याचे ... Read More »

माहेरवाशीण चैत्रगौरी

–  सौ. दीपा जयंत मिरींगकर चैत्र महिना म्हणजे वसंतोत्सव. झाडांवेलींवर येणारी पोपटी पालवी, जवळूनच ऐकू येणारी कोकिळेची कुहुकुहु, तर कुठे लेकुरवाळा फणस. जंगलातील चारा आणि चुन्नांचा, काळ्या मैनेचा म्हणजे करवंदांचा मेवा. सगळा निसर्ग आपले नवरंग, नवचैतन्य फुलवत जणू नव्या सृष्टीसाठी तयार होत असतो. याच वेळी रस्त्यावर फुललेला सोनपिवळा सोनबहावा आणि लालूस पलाश, त्याचबरोबर लाल केशरी गुलमोहर असा सारा रंगपसारा लेऊन ... Read More »

संभ्रमामि युगे युगे…

अंजली आमोणकर चाणक्यनीतीमध्ये राजकारणात, अर्थकारणात, समाजकारणात यशस्वी होण्याचे जे नुस्खे- जे फॉर्म्युले (नीती, नियम वा सूत्र) दिले आहेत, त्यात ‘फोडा वा जोडा’ प्रमाणे ‘संभ्रम’ निर्माण करा वा जिंका, हा फॉर्म्युलाही दिला आहे! सोप्या भाषेत शंका! एकदा का मन ‘शंकित’ झालं की चलबिचल, अविश्‍वास, संशय अशी स्टेशनं घेत-घेत गाडी पुढे सरकते. शेवटचं स्टेशन हे अर्थातच खोल खड्‌ड्यात किंवा गर्तेत पडणं हेच ... Read More »

महापराक्रमी तरीही विनम्र ः हनुमान

सौ. मेघना देवारी (पर्वरी) सप्तचिरंजीवात ज्याची गणना होते, त्या हनुमंताला रुद्राचा अवतार मानले जाते. या पृथ्वीवर जोपर्यंत रामकीर्ती असेल तोपर्यंत हनुमान जिवंत राहील असा वर सीतामाईंनी हनुमंताला दिलेला आहे. त्या हनुमंताचा चैत्र पौर्णिमेस प्रतिवर्षी आपण जन्मोत्सव साजरा करतो त्या निमित्ताने हा लेखप्रंपच. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् | वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरण प्रपद्ये ॥ मारुती, अंजनेय, महावीर, महाबली, हनुमान ... Read More »

शेतकर्‍यांसाठी सर्वंकष धोरण हवे

 देवदास गावडे (कुडाळ) देशातील शेतकरी विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. याचे ना शासनाला ना लोकप्रतिनिधींना सोयर सुतक आहे. यासाठी शेतकर्‍यांसाठी सर्वकष धोरणाची गरज आहे. भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो; परंतु त्याच देशातील शेतकरी सुखी आहे की, नाही याचे निरीक्षण करण्याची गरज आहे. देशातील शेतकरी विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. याचे ना शासनाला ना लोकप्रतिनिधींना सोयर सुतक आहे. यासाठी शेतकर्‍यांसाठी सर्वकष ... Read More »

रामरक्षा ः एक अद्वितीय स्तवन

– भाग्यश्री केदार कुलकर्णी (पर्वरी गोवा) रामरक्षा हे स्तोत्र आहे की मंत्र? असा प्रश्न बर्‍याच लोकांना पडतो. तर सर्वप्रथम रामरक्षा हे अद्वितीय स्तुती/स्तोत्र/स्तवन आहे. अभेद्य कवच आणि महामंत्रदेखील आहे. कारण ते सगळ्याच दृष्टीने आपले रक्षण करते. म्हणून त्याला गर्भकल्याणमंत्रदेखील संबोधतात. तसं पाहिलं तर याचक आणि दानी यांचं नातं फार दुर्मिळ असे आहे. असं म्हणतात याचक हा चातकासारखा असावा आणि दानी हा ... Read More »