ब्रेकिंग न्यूज़

कुटुंब

खेडेकर कुटुंबियांचा गणेशोत्सव

जपला परंपरेचा वारसा! – शैलेश खेडेकर (सावईवेरे) कुठेही असले तरी चतुर्थीच्या दिवशी जुन्या घरी येऊन चतुर्थी आनंदाने साजरी करतात. पाच, सात किंवा नऊ दिवसांचा गणपती असेल तर वाड्यावरचे लोक येऊन आरत्या, भजने करतात. सर्व पै पाहुण्यांना आग्रहाचे निमंत्रण दिले जाते. घरी आलेले पाहुणे हे सर्वांचे पाहुणे असतात व त्यांचे स्वागत व आदरातिथ्य सर्व कुटुंबियांतर्फे केले जाते. अंत्रुज महालातील सावईवेरे गावात ... Read More »

हे विघ्नहर्ता, हे गणेशा!

– सौ. ममता खानोलकर आमच्या गोमंतभूमीचा ‘गोमंत गौरव’ विशेषांक तू वाचला असशीलच. जागतिक कलाकारांची भूमी गोवा – तिच्यावर असाच वरदहस्त ठेव! चांगलं असतं तिथे थोडं वाईटही असतंच. ते सोडा! तुझ्या आगमनासाठी उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे, तर पावसाने त्यावर विरजण घालायला नको. निदान तुझ्या येण्याच्या दिवशी तरी त्याला थोपवून धरता येतं तर बघ.  ‘विघ्नहर्ता’ तुझ्या आगमनाची तयारी आता जवळ जवळ ... Read More »

हरितालिका – गवराई

– पौर्णिमा केरकर गोव्यातील बर्‍याच भागातील महिषासूर मर्दिनीलाही पार्वतीच्याच रूपात अनुभवता येते. डिचोलीतील कुडणे गावात बदामी चालुक्याच्या काळात सुमारे सातव्या शतकाशी नाते सांगणारी उमासहित शंकराची मूर्ती कुडणेश्‍वराच्या मंदिरात आढळली होती. गोवापुरीलगतच्या आगशीलाही अशा मूर्ती आढळलेल्या होत्या. धरित्री सजीव सृष्टीला धारण करणारी- विश्‍वाची जननी, अधिष्ठात्री त्यामुळे तिची आराधना करणे लोकमनाने आपले कर्तव्यच मानले. शिवाय ‘पार्वती’ कष्टकरी मालनीना सदैव प्रेरणादायीच वाटत आलेली ... Read More »

बाजार …

– गौरी भालचंद्र कुलकर्णी (मालपे-पेडणे) ‘‘दानसुद्धा गुप्त असावं म्हणतात. पण काहीजण आपण देवाला किती दिलं याचा हिशेब जगाला सांगत फिरतात. अरेऽऽ हे सारं त्या परमेश्‍वराचंच आहे. त्याला आपण त्याने दिलेल्यातलेच काही दिले तर कसला आलाय मोठेपणा? करायचीच तर माणसातल्या देवाला मदत करावी… विना मोबदला..!’’ साहेब तळमळीने बोलत होते. … आणि आजही शामू रंगू पानवाल्याच्या टपरीवर उभा राहून पेपर वाचीत होता. ... Read More »

आत्महत्या थांबवा ना!

– प्रतिमा गावणेकर वर्तमानपत्रातील आत्महत्यांच्या बातम्या वाचून मनात एक प्रश्‍न येतो, तो म्हणजे समोर आयुष्याचा प्रचंड मोठा पट असताना, ज्यांना आयुष्य म्हणजे काय हेच उमगलेले नसते, अशा वयातील मुले आत्महत्या का करत आहेत? आजकाल रोज एक तरी आत्महत्येची बातमी वर्तमानपत्रामध्ये असतेच. वाचून अंगावर काटा येतो. परीक्षा दिली आहे आणि पेपर कठीण गेलाय, नापास होऊ आपण, या भीतीने आत्महत्या करणे कितपत ... Read More »

सुजाण पालकत्व

– म. कृ. पाटील यश आणि अपयश एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हीचे दायित्व स्विकारण्यासाठी मन खंबीर ठेवण्यासाठी आपण साहाय्य करा. आपल्या अपत्याना कोणत्याही गोष्टी तर्कशुद्ध, ज्ञानरचनात्मक वृत्तीने आत्मसात करण्यास प्रोत्साहन द्या. आपल्या जीवनशैलीला अनुसरून केलेला सारासार विचार व अनुभव यातून सुजाण पालकत्व स्वीकाराल अशी अपेक्षा आहे. प्रत्येक मातापित्याना आपल्या मुलामुलींचे चांगले व्हावे, अशी अपेक्षा असते. आपली मुले स्वस्थ, निरोगी, ... Read More »

माझी अर्धश्रद्धा?

– सौ. मीरा निशीथ प्रभुवेर्लेकर … त्यांनी स्वानुभवावर आधारित लिहिलेल्या अनेक गोष्टी, त्यावरून उद्भवलेले प्रश्न, एखाद्या वकिलाप्रमाणे मांडलेली तर्कशुद्ध कारणमिमांसा हे सगळं वाचून निरीश्वरवादी विचारांचा पक्का पगडा बसला नसला तरी त्या विचारप्रवाहाच्या दिशेने माझे विचार वळू लागले. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्‍न आणि त्यावरची प्रामाण्यवादी उत्तरं मनाला खरोखरच पटण्यासारखी होती.  वर्षानुवर्षें देवकृत्यांचा ससेमिरा चालणार्‍या सश्रद्ध घरांत मी जन्मले आणि वाढले. या ... Read More »

उंच उंच कडे .. उत्तुंग सुळके …

रोमिंग फ्री… – भ्रमिष्ट इथं स्त्री आणि पुरुष या व्यक्ती नाहीत तर वृत्तीप्रवृत्तींचं प्रतीक आहेत. दोन्हीही आवश्यक असतं. आपलं विश्‍व साकारताना नि शाकारताना बाहेरच्या विशाल विश्‍वाशी नातं घट्ट असायला हवं. घरट्याचं घरकुल नि घरकुलाचं घर करत राहिलं पाहिजे. नाहीतर सध्या येतो तो अनुभव येणं अनिवार्य असतं. ‘अवर् हाऊसेस आर् गेटिंग वेलएक्विप्ड अँड वेलफर्निश्ड; बट् अवर् होम्स आर् गेटिंग डिस्ट्रॉइड.’ वेळीच ... Read More »

चिंधी बांधते द्रौपदी …

– ओंकार व्यंकटेश कुलकर्णी (खडपाबांध-फोंडा)   झालेला प्रकार नारदांच्या तोंडून ऐकून आणि नारदांच्या हातातली चिंधी पाहून कृष्णालाही अतीव आनंद झाला. मुनींनी मग कृष्णाच्या बोटावरील जखमेवर तो लेप लावला व त्यावर द्रौपदीने दिलेली तिच्या शेल्याची फाडलेली चिंधी बांधली. आणि काय आश्चर्य!! रक्ताच्या धारा वाहणं थांबलं!  ‘ना ऽ रा ऽ य ण… ना ऽ रा ऽ यण!’ चिपळ्यांच्या नादात हे शब्द ऐकून ... Read More »

नाती जपताना….

– मनोहर द. कोरगांवकर (पर्वरी)   दुर्दैवाने या वगळलेल्या यादीत आपले नातेवाईकच जास्त असतात. दुसरा एक भाग म्हणजे अशा समारंभाला हजेरी लावणे हा एक सोपस्कार असल्याप्रमाणे उरकून टाकला जातो. अशावेळी दोन्ही घटकांनी दुसरा काही विचार करता येईल का हे पाहणे आजच्या काळात अधिक जरूरीचे वाटते. आपल्या घरचा हा समारंभ ही एक सर्व नात्यांना अधिक मजबूत करण्याची सुसंधी आहे असा विचार ... Read More »