ब्रेकिंग न्यूज़

कुटुंब

मंदाताई बांदेकर स्मृती ‘नक्षत्रांचे देणे’

मंदाताई या स्वतः शास्त्रीय संगीत शिकल्या होत्या. त्यांना शास्त्रीय , उपशास्त्रीय, अभिजात गीतांच्या मैफलींचा आस्वाद घेण्यात आनंद वाटायचा. वास्को येथे षड्‌ज गंधार संगीत अकादमी स्थापन करुन त्यांनी होतकरु तरुणांना शास्त्रीय गायन – वादन शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. त्याची स्मृती जागविण्यासाठी ‘सूरईश’ ही संस्था २०१७ पासून अशा प्रकारची मैफल आयोजित करते व मंदा व नारायण बांदेकर चॅरिटेबल ट्रस्ट ती प्रस्तुत करते. ... Read More »

एक सर्वांगसुंदर कार्यक्रम ः ‘सृजनसंगम’

सृजनसंगम हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे, ज्यामध्ये मुलं मजा-मस्ती करतातच, पण या व्यतिरिक्त मुलं ज्ञानाचा साठा घेऊन जातात. हा कार्यक्रम कलागुणांना उत्स्फूर्त प्रतिसाद देतो. आताची मुलं सोशल मिडियावर आपला मौल्यवान वेळेचा गैरवापर करून नको त्या गोष्टींमागे पळतात व खरं जीवन जगण्याचं विसरून जातात. त्यांना बरोबर वळणावर येण्याचं मार्गदर्शन आम्हांला ‘सृजनसंगम’सारख्या कार्यक्रमात मिळतं. हे मार्गदर्शन आपल्या जीवनात आवश्यक आहे कारण आताचा ... Read More »

कर्तव्याची जाग असावी

समाजाप्रति असलेली जबाबदारी, कर्तव्य भावनेची जाग माणसाच्या जीवनाला सार्थकी लावण्यास सहकारी बनते. आपण ज्या समाजात वावरतो, ज्या समाजाने आपल्याला घडवले आहे त्या समाजाप्रति आपण काहीतरी देणे लागतो, हे भान जर माणसाला असले म्हणजे मग ती व्यक्ती समाजात गणली जाऊ लागते, नावारूपाला येते. त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवूनच मग पुढची पिढी आपले भवितव्य घडवत असते. आपल्या पूर्वजांनी ज्या परंपरा, जे संस्कार आपल्यापर्यंत ... Read More »

‘अंदमान सेल्युलर जेल‘ ः एक अनुभव

इतिहास हा माझा आवडता विषय. लहानपणी महाभारत, रामायण, शिवराय, ब्रिटिश व क्रांतिकारक यांच्या कथा वाचण्यात आल्या. त्यानंतर भारतातील प्रत्येक स्थळाला स्पर्श करणे, त्याबद्दल खूप वाचणे, पाहणे झाले. अयोध्या, कुरुक्षेत्र, द्वारका, गंगोत्री, गड, किल्ले, जालियनवाला बाग, पोरबंदर, शांतिनिकेतन, साबरमती, जोरासोका, लो. टिळक, सुभाषचंद्र बोस ते स्वा. सावरकरांनी लिहिलेले ‘माझी जन्मठेप’ आत्मवृत्तातील प्रसिद्ध अंदमान बेटावरील सेल्युलर जेल पाहिले व धन्य झालो. गोवा ... Read More »

चमत्कार निसर्गाचा

आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला ‘कोजागिरी पौर्णिमा’ म्हणतात. शरद पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा अशा अनेक नावांनी तिला सगळे ओळखतात. आश्विन पौर्णिमेस होणार्‍या प्राचीन लोकोत्सवास वासायनाने ‘कौमुदी जागर’ व वामन पुराणाने ‘दीपदान जागर’ म्हटले आहे. बौद्ध काळातही हा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा होत असे. त्याचे वर्णन ‘उन्मादपंती’ जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी, असे वामन पुराणात सांगितले आहे. या दिवशीच्या व्रतात, रात्री लक्ष्मीची ... Read More »

‘वाचू तेही आनंदे’

१३ ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून महाराष्ट्र राज्याने जाहीर केला आहे. माजी राष्ट्रपती वैज्ञानिक डॉ अब्दुल कलाम यांचा हा जन्म दिवस. एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा हा स्मृतिदिन आहे. त्यांनी स्वप्ने पाहिली भारताच्या युवकांसाठी. आजकाल मुले वाचत नाहीत ही तक्रार साधारण सर्वसामान्य पालक/शिक्षक करतात (त्यातील किती जण स्वत: काही वाचतात हे अलाहिदा). तरीही ही तक्रार मात्र खरीच आहे. नव्या पिढीला ... Read More »

माहिती, शक्ती आणि प्रेम

माणसाचे जे ठरावीक जीवन असते, त्या जीवनात तो प्रत्येक क्षणाला अनेक अनुभवातून जातो. प्रत्येक क्षणाला माणसाच्या हातून बर्‍याच चांगल्या गोष्टी घडतात तर काही वाईटही. पण माणसाने एकदा कुठली चूक केली तर ती चूक म्हणून पचून जाते. परंतु तीच चूक परत-परत आपल्या हाताने तो करीत सुटला तर मात्र ती चूक नाही, ती त्याची मस्ती ठरते. आमची जी जगण्याची ठरावीक पद्धत असते ... Read More »

पर्यावरण संरक्षण ः ई-कचरा नियम

मधुरानं तिच्या घरातले वापरात नसलेले, खराब झालेले चार्जर्स, लॅपटॉप, पॉवर बँक्स, मोबाइल, टॅब असा अनेक ई-कचरा बाहेर काढला. ‘लिलाव केला तर थोडाफार पैसा येईल’, असं गंमतीनं ती म्हणाली. लक्षात घेता मधुराच्या घरच्या परिस्थितीसारखीच काहीशी परिस्थिती आपल्या घरीपण असते. आपल्या घर्‍ीही माणसापरत्वे किमान एक मोबाइल असतोच. शिकणारी मुलं, काम करणार्‍या व्यक्तींजवळ तर कमीत कमी दोन इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या असतातच. थोडक्यात, व्यक्ती ... Read More »

सण विजयादशमीचा!

आश्विन शुद्ध दशमीला ‘दसरा’ हे नाव दिले आहे. या तिथीला ‘विजयादशमी’ असेही म्हटले जाते. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच हा दिवस येतो. म्हणून त्याला नवरात्रीच्या समाप्तीचा किंवा पारण्याचा दिवस असेही म्हणतात. काही कुटुंबातले नवरात्र नवमी तिथीस तर काही कुटुंबांचे दशमीच्या दिवशी विसर्जित केले जाते. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजन व शस्त्रपूजा ही चार कृत्ये केली जातात. दसरा हा भारतातील सर्व राज्यांमध्ये ... Read More »

नारी… नारायणी..!

माणसांच्या गर्दीत हरवलेला माणूस वाट शोधत असतो नवीन वळणाची. कदाचित अशाच एका वळणावर पुन्हा दिसेल नवीन मार्ग नव्याने चालण्यासाठी. माणूस चालत असतो. चालतच असतो नव्या दिशेने जोपर्यंत भेटत नाही योग्य मार्ग. मग सांगा अशा स्थितीत अवघडलेली संवेदनशील नारी तिची काय असेल व्यथा. ती तर संघर्षाचा महामेरू पार करीत आपल्या जीवनाला योग्य वळत देते. नव्याने जगण्यासाठी. नारी, नारायणी… महाशक्तीचा अंश असते ... Read More »