बातम्या

गोव्याच्या किनार्‍यांवर आढळणार्‍या डांबरगोळ्यांमागे तीन शक्यता : जावडेकर

गोव्यातील समुद्रकिनार्‍यांवर पावसाळ्यात आढळून येणारे काळे डांबरगोळे हे समुद्रतळातील नैसर्गिक प्रक्रियेमुळे, समुद्रातील तेल विहिरींमुळे किंवा समुद्रातून ये – जा करणार्‍या जहाजांमुळे आलेले असू शकतात, अशा शक्यता केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली. Read More »

स्कूलबस-रेल्वे अपघातात १८ ठार

तेलंगणमधील दुर्घटना : रेल्वे खात्यास दोष तेलंगणमधील मेडक जिल्ह्यातील एका रेल्वे क्रॉसिंगवर एका स्कूल बसला रेल्वे धडकून झालेल्या भीषण अपघातात काल किमान १६ विद्यार्थ्यांसह १८ जण ठार झाले. तसेच १६ जण जखमी झाले. या अपघातात बस ड्रायव्हरही ठार झाला. ७ ते १४ वयोगटातील जखमी मुलांना इस्पितळात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दुर्घटनाग्रस्त स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन तूपरन येथील शाळेला निघाली होती. ... Read More »

स्वस्त दरात मासळी योजना ऑक्टोबरपर्यंत

४५ लाख रु.ची तरतूद लोकांना स्वस्त दरात मासळी देण्याची योजना येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू करण्यात येईल, असे मच्छिमारी मंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी काल विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. या योजनेसाठी ४५ लाख रु.ची तरतूद करण्यात आल्याचेही मंत्र्यांनी सांगितले. Read More »

खाणप्रश्‍नी चर्चेस मुख्यमंत्री अनुकूल

राज्यातील खाणींच्या प्रश्‍नावर विधानसभेत चर्चा घडवून आणण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल अनुकूलता दर्शविली. या प्रश्‍नावर विधानसभेत एका तासाची चर्चा घडवून आणावी अशी मागणी आमदार प्रमोद सावंत यांनी केली होती. नीलेश काब्राल व अन्य काही आमदारांनीही चर्चा घडवून आणण्याची मागणी यावेळी केली. Read More »

अल्जियर्सला निघालेले विमान नदीत कोसळले

११६ जण मरण पावल्याची भीती एअर अल्जिरी कंपनीचे प्रवासी विमान काल आफ्रिकेतील नायगर नदीत कोसळल्यामुळे त्यातील एकूण ११६ जण बुडून मरण पावल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. बुर्किना फासोजची राजधानी औगाडौगू येथून वरील दुर्दैवी विमानाने उड्डाण केल्यानंतर ५० मिनिटांनी या विमानाचा रडार यंत्रणेशी असलेला संपर्क तुटला होता. Read More »

विमा क्षेत्रात ४९ टक्के एफडीआय गुंतवणुकीस केंद्राची मान्यता

विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) ४९ टक्केपर्यंत वाढविण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली. यासंबंधीचे विधेयक आता केंद्र सरकार बुधवारी संसदेत मांडणार आहे. आधीच्या २६ टक्क्यावरून ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या सुधार कार्यक्रमाला गती देण्याचा एक भाग म्हणून मोदी सरकारने याबाबत पाऊल उचलले आहे. Read More »

विधानसभा वृत्त

अर्थसंकल्पातील आश्‍वासनांचा  कृती अहवाल देणार : मुख्यमंत्री चालू वर्षीच्या अर्थसंकल्पातून आपण जनतेला १८० प्रकारची आश्‍वासने दिली होती. त्यापैकी किती आश्‍वासने पूर्ण केली व कोणकोणती कामे केली याचा कृती अहवाल आपण सादर करणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर परींकर यांनी काल विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी सांगितले. Read More »

संपादित करायच्या भूखंडाची माजी मंत्र्याकडूनच खरेदी

मडकईकर यांच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश सन २००४ मध्ये जुने गोवे पोलीस स्थानकासाठी तत्कालीन मंत्री व कुंभारजुवेचे विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांनी सुचविलेल्या जमिनीचे संपादन करण्यास आपण तात्काळ मान्यता दिली होती. त्यावेळी तो भूखंड धुमे नामक व्यक्तीच्या मालकीचा होता. मात्र, आता तो मडकईकर बिल्डर्सच्या मालकीचा असल्याचे आढळून आले आहे. हा भूसंपादन कायद्याचा सरळसरळ गैरवापर असून भ्रष्टाचाराचाच प्रकार आहे. त्यामुळे भ्रष्टाचारविरोधी पोलिसांकरवी ... Read More »

‘जायका’ प्रकल्पामुळे सरकारी तिजोरीला फटका

महालेखापालांच्या अहवालात साबांखावर ताशेरे जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका) तर्फे राज्यात सन २००९ ते २०१३ या काळात राबवण्यात आलेल्या प्रकल्पांवरील ३२९.०१ कोटी रुपयांचा भांडवली खर्च राज्य सरकारच्या खर्चात दाखवलाच गेला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजना राबवण्याचा खर्च आणि त्यातून मिळालेला महसूल यांच्यात सन २००८ ते १३ या काळात तब्बल ४८०.५० कोटींची तफावत राहिली असल्याचा निष्कर्ष महालेखापालांनी आपल्या अहवालात काढला आहे. Read More »

भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्यास कारवाई : मुख्यमंत्री

मडगाव परिसरात सुमारे ४ हजार बिगर गोमंतकीय वेगवेगळ्या घरांमध्ये भाडेकरू म्हणून राहात असल्याचे आढळून आले आहेत. त्यांची पार्श्‍वभूमी कुणालाही माहीत नाही. या भाडेकरूंची संबंधितांनी पोलिसांना माहिती पुरविलेली नाही, नवा पोलीस कायदा आल्यानंतर यापुढे ओळख न ठेवता भाडेकरूना ठेवून घेणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. Read More »