बातम्या

मद्यपान करून वाहन चालविणार्‍या ५९४ जणांवर कारवाई

मोहीम चालूच राहणार मद्यपान करून वाहने चालवून जीवघेणे अपघात करणार्‍या वाहनचालकांविरुद्ध वाहूतक पोलीस विभागाने मोहीम उघडलेली असून गेल्या २६ दिवसांत राज्यभरात या नियमाचे उल्लंघन करणार्‍या ५९४ वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. Read More »

पेडणे महाविद्यालयाला संत सोहिरोबानाथ आंबियेंचे नाव

मान्यवरांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा संपन्न विर्नोडा, पेडणे येथील सरकारी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे संत सोहिरोबानाथ आंबिये कला व वाणिज्य सरकारी महाविद्यालय असे नामकरण काल खास सोहळ्यात करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सभापती राजेंद्र आर्लेकर, कला व संस्कृतीमंत्री दयानंद मांद्रेकर, आरोग्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, कला संस्कृती खात्याचे प्रसाद परब, कोरगाव जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर, शिक्षण संचालनालयाचे संचालक भास्कर नाईक, ... Read More »

बेकायदेशीर जमीन विक्री प्रकरणांच्या चौकशीसाठी आयोग स्थापण्याची मागणी

कूळ कायदा, मुंडकार कायदा, कोमुनिदाद कायदा आदी कायद्यांचा भंग करून गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यात बेकायदेशीर जमीन विक्रीचे प्रकार चालू असून त्याची चौकशी करण्यासाठी चौकशी आयोगाची स्थापना केली जावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत केली. Read More »

भेसळयुक्त माल प्रकरणी दोन बेकरींवर कारवाई

गोठणीचा व्हाळ करासवाडा व धुळेर म्हापसा येथे अन्न व औषध प्रशासन खात्याने दोन बेकरींवर छापा टाकून आरोग्यास अपायकारक असणारा फरसाण आणि भेसळयुक्त जिलेबी मिळून अंदाजे ५० हजार रुपयांचा माल जप्त केला व बेकरी मालकांवर गुन्हा दाखल केला. Read More »

पंतप्रधानांहस्ते आयएनएस कोलकाता नौदलाच्या ताब्यात

पूर्णतः भारतीय बनावटीची आयएनएस कोलकाता ही युद्ध नौका काल एका समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. संरक्षण मंत्री अरुण जेटली तसेच नौदल प्रमुख ऍडमिरल आर. के. धोवन हेही यावेळी उपस्थित होते. या युद्धनौकेच्या बांधणीत सहभागी असलेल्या सर्वांचे मोदी यांनी अभिनंदन केले. Read More »

कळंगुट समुद्रात दोघा पर्यटकांचा बुडून मृत्यू

पर्यटन म्हणून गोव्यात आलेल्या आणि एकत्र काम करणार्‍या सात जणांचा गट दोन दिवसांपूर्वी कळंगुट येथे आला होता. शुक्रवारी सायंकाळी ६.३० वा. बागा समुद्रात त्यातील दोन युवक व एक युवती गेली असता त्यातील दोन युवक बुडून मरण पावले. Read More »

मोदी-चव्हाण यांच्यात मुंबईत शाब्दीक चकमक

महाराष्ट्रातील दोन कार्यक्रमांदरम्यान काल पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. मोदी यांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन केले. त्याआधी चव्हाण यांनी अप्रत्यक्षरित्या मोदी यांच्यावर टीका केली होती. कोळसा व गॅस (वायू) च्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प व्यवस्थित चालत नसल्याचा चव्हाण यांच्यासमोर उल्लेख केला होता. Read More »

नियोजन आयोग रद्द करणार : पंतप्रधान

नियोजन आयोगाची स्थापना तत्कालीन परिस्थितीला अनुसरून करण्यात आली होती. मात्र वर्तमान स्थितीत या आयोगाची गरज राहिलेली नाही. त्यामुळे नियोजन आयोग रद्द करून त्या जागी वेगळी संस्था स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लाल किल्ल्यावर प्रथमच ध्वजारोहण केल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणात केली. नियोजन आयोगाची निर्मिती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात परिस्थितीत बदल झाला आहे.त्यामुळे हा आयोग रद्द करून त्याची ... Read More »

नवप्रभा ४४ व्या वर्धापनदिनी शुभेच्छांचा वर्षाव

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आदींसह असंख्यांची उपस्थिती दैनिक नवप्रभाचा ४४ वा वर्धापनदिन काल उत्साहात साजरा झाला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, सभापती राजेंद्र आर्लेकर, उपसभापती अनंत शेट, आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उद्योगमंत्री महादेव नाईक, खासदार नरेंद्र सावईकर, आमदार विष्णू सूर्या वाघ, रोहन खंवटे, प्रमोद सावंत, ग्लेन टिकलो आणि विविध क्षेत्रांतील असंख्य मान्यवरांनी याप्रसंगी आवर्जून उपस्थिती लावून नवप्रभेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त ... Read More »

अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना सावरण्यासाठी वेगळी यंत्रणा

वर्षअखेरीस खाण व्यवसाय सुरू : मुख्यमंत्री पायाभूत सुविधा विकास व सामाजिक प्रगती म्हणजे विकास नव्हे. मानवी विकास अत्यंत महत्वाचा असतो. त्यामुळे अडचणीत सापडणार्‍या कुटुंबांना मुक्त करण्यासाठी वर्षभरात वेगळी यंत्रणा उभारण्याचा विचार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल जुन्या सचिवाल इमारतीसमोर आयोजित देशाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ध्वजारोहरण केल्यानंतर बोलताना सांगितले. चालू वर्ष अखेरपर्यंत खाण व्यवसाय पूर्ववत सुरू होईल असेही ते म्हणाले. Read More »