बातम्या

कर्नाटककडून सहा धरणांच्या प्रस्तावामुळे दूधसागरास धोका

कर्नाटकाने दूधसागर धबधब्याला येऊन मिळणार्‍या नद्यांवर सहा धरणांचा प्रस्ताव म्हादई जल लवादाकडे नव्याने सादर केला असून तो मान्य झाल्यास दूधसागरावर संकट ओढवणार आहे. आता ३ सप्टेंबर रोजी म्हादई जल लवादासमोर सुनावणी असून यावेळी त्यावेळी गोव्याकडून या प्रस्तावास विरोध करण्याची मागणी पर्यावरणवादी करीत आहेत. Read More »

यंदा ४० लाख पर्यटक येणार !

पर्यटन खात्याला अपेक्षा : देशभरात प्रचार यंदाच्या वर्षी सुमारे ४० लाख पर्यटक गोव्याला भेट देतील अशी अपेक्षा राज्याच्या पर्यटन खात्याला आहे. हा आकडा गेल्या वर्षी भेट दिलेल्या पर्यटकांपेक्षा १५ टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी सुमारे ३१.३० लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली होती. यंदा त्यात १५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. गोव्याने पर्यटनाच्या प्रसारासाठी विशेष पुढाकार घेतला असून कार्निव्हल, शिगमो, वारसा ... Read More »

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचे ५० बळी

उ.प्र., बिहारात पुराचा कहर उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा कहर कालही चालूच राहिला. अतिवृष्टीमुळे पू आणि दरडी कोसळून मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या ५० झाली आहे. दरम्यान, हरिद्वार येथे गंगा नदीच्या पाण्याच्या पातळीने धोक्याची पातळी ओलांडली असून सरकारकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पावसामुळे चारधाम यात्रा थांबवण्यात आली. दरडी कोसळल्यामुळे गंगोत्रीला गाणारा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. Read More »

सहारनपूर दंगल अहवालात भाजपला ठरवले जबाबदार

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील धार्मिक हिंसाचाराची चौकशी करणार्‍या मंत्री शिवपाल यादव यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीने या प्रकरणी प्रशासकीय हलगर्जीपणा असल्याचे सांगतानाच भाजपची भूमिका असल्याचा संशयही व्यक्त केला. दंगलीत तिघांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हा राजकीय फायदा उठविण्याचा समाजवादी पार्टीचा डाव असल्याचे सांगून भाजपने कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. Read More »

विदेश सचिव बोलण्यांआधी पाकची फुटीरतावाद्यांशी चर्चा

भारत – पाकिस्तान दरम्यानच्या विदेश सचिव स्तरावरील बोलण्यांची तारीख जवळ असतानाच काल पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी काश्मीरी फुटीरतावादी नेत्यांना दिल्लीत चर्चेसाठी बोलावले. याबाबत भाजपने तीव्र नापसंती व्यक्त केली तर कॉंग्रेसनेही ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. Read More »

भारत-पाक सैन्यात गोळीबार

जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यानंतर भारत व पाकिस्तानच्या सैनिकांदरम्यान, बराचवेळ गोळीबार झाला.लष्कर प्रवक्त्याच्या माहितीनुसार राजौरी जिल्ह्याच्या हमीरपूर भागात पाकिस्तानी लष्कराने भारताच्या बाजूने बेधुंद गोळीबार सुरू केला. Read More »

मुंबई येथे काल आयएनएस कोलकाता ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे समर्पित करण्यासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी नौदल अधिकार्‍यांसमवेत.

Read More »

पुढील चार महिन्यांत खाण व्यवसाय सुरू करणार

मुख्यमंत्री पर्रीकरांकडून ग्वाही पुढील चार महिन्यात राज्यातील खाण व्यवसाय सुरू करण्याची हमी आपण देत असून त्या दृष्टीने सर्व तयारी आपण सुरू केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल येथे एका समारंभात बोलताना दिली. Read More »

येडीयुरप्पा, नक्वी भाजपाचे उपाध्यक्ष

अमित शहांनी केली नव्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची नियुक्ती भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल आपली ४७ जणांची नवी टीम जाहीर केली असून या नव्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांमध्ये त्यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांची उपाध्यक्षपदी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राम माधव यांची सरचिटणीस म्हणून वर्णी लावली आहे. विशेष म्हणजे खासदार तथा माजी सरचिटणीस वरुण गांधी यांना कोणतेही ... Read More »

भारतातील शंभर शहरांच्या विकासासाठी सिंगापूरचे सहकार्य

सुषमा स्वराज यांचा सिंगापूर दौरा भारतातील १०० शहरांच्या विकासासाठी आता भारताने या क्षेत्रात विशेष तज्ज्ञ असलेल्या सिंगापूरचे सहकार्य मिळवले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी २४ तासांच्या आपल्या वेगवान दौर्‍यात यासंदर्भात सिंगापूरकडून होकार प्राप्त केला आहे. देशातील १०० शहरांच्या विकासासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात सात हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. Read More »