बातम्या

मुलकी सेवा प्राथमिक परीक्षा आज ठरल्यानुसार

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलकी सेवा प्राथमिक परीक्षा आज ठरल्यानुसार होत आहेत. परीक्षा पुढे ढकलण्यास काल सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. परीक्षार्थींनी इंग्रजी मजकुराबाबत उपस्थित केलेल्या आक्षेपाचे निराकरण झाल्याने परीक्षा स्थगित करण्याचा प्रश्‍न उद्भवत नसल्याचे कोर्टाने सांगितले. Read More »

पाकिस्तानात राजकिय तिढा कायम

पाकिस्तानात सुरू असलेला राजकीय संघर्ष संपण्याची चिन्हे नाहीत. विरोधी नेते इम्रान खान व धर्मगुरू ताहीर उल कादरी यांनी पंतप्रधान नवाज शरीङ्ग हे पदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत बोलणी करणार नसल्याचे सांगितले आहे. Read More »

राणे पिता-पुत्रास अटकपूर्व जामीन

खाण पर्यावरण परवान्यासाठी सहा कोटींची खंडणी मागितल्याचा कथित आरोप असलेले विरोधी पक्ष नेते प्रतापसिंह राणे व आमदार विश्‍वजित राणे यांना काल सीबीआय कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. १ लाख रु. हमी तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोव्याबाहेर जाऊ नये या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला. Read More »

‘इबोला’ रोखण्यासाठी विमानतळावर व्यवस्था

इबोला या घातक रोगाची लागण झालेले रुग्ण गोव्यात येत आहेत की काय यावर दाबोळी विमानतळावर असलेल्या आरोग्य अधिकार्‍यांनी बारीक लक्ष ठेवलेले असून ज्या आफ्रिकी देशात हा जीवघेणा रोग पसरलेला आहे त्या नायजेरिया, लिबेरिया, गिनीया व सियारा लिऑन या देशांतून गोव्यात दाखल होणार्‍या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचे आरोग्य खात्याचे डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी काल माहिती देताना सांगितले. Read More »

ज्ञानपीठ विजेते लेखक अनंतमूर्ती यांचे निधन

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ख्यातनाम कन्नड लेखक यू. आर. अनंतमूर्ती यांचे काल येथील खासगी इस्पितळात ह्रदयविकारामुळे निधन झाले. कन्नड साहित्य क्षेत्रात त्यांना मानाचे स्थान होते. देशातील महत्त्वाच्या लेखकांपैकी ते एक होते. ८२ वर्षीय अनंतमूर्ती गेल्या दहा दिवसांपासून इस्पितळात उपचार घेत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी इस्तेर तसेच एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. किडनीच्या आजारामुळे गेली काही वर्षे अनंतमूर्ती डायलीसीस ... Read More »

डबल डेकर रेल्वे सुरू

मुंबईहून काल कोंकण रेल्वे मार्गावरून पहिली डबल डेकर रेल्वे गोव्यात दाखल झाली. या रेल्वेतून ४० प्रवासी आल्याचे कोकण रेल्वेसूत्रांनी सांगितले. Read More »

जैविक विविधतेचे पणजी मनपातर्फे ‘रोड मॅपिंग’

पर्यावरण चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन पणजीतील जैविक विविधता नष्ट होत चालली आहे, त्यादृष्टीने पणजी महापालिकेतर्फे ‘रोड मॅपींग’ करण्यात येणार आहे व आवश्यक झाडे लावली जातील, असे पणजी पालिका आयुक्त संजीत रॉड्रीग्स यांनी सांगितले. ‘कलाकृती’तर्फे कला अकादमीत आयोजित केलेल्या पर्यावरण चित्रपट महोत्सवाचे शुक्रवारी उद्घाटन झाल्यानंतर ते बोलत होते. Read More »

केरळमध्ये बार बंद करणार

मद्य फक्त पंचतारांकित हॉटेलांत सर्व रविवार ‘ड्राय डे’ केवळ पंचतारांकित हॉटेलांत मद्य उपलब्ध करण्याच्या व इतर सर्व बार बंद करण्याचे धोरण केरळ सरकारने काल मंजूर केले. यामुळे हॉटेलना जोडलेले सुमारे ७०० बार बंद करण्यात येणार आहेत. शिवाय दारुवर अतिरिक्त पाच टक्के अधिभार लावण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. येत्या दहा वर्षांपर्यंत केरळ राज्य दारू मुक्त करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. Read More »

गोव्यात मद्यबंदी अशक्य : मिश्किता

मद्य हा गोव्याच्या संस्कृतीचा एक भाग आहे. ख्रिश्‍चन असो किंवा हिंदू असो त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणार्‍या स्वागत सोहळ्यांनाही मद्याचा वापर होत असतो. त्यामुळे गोव्यात त्यावर बंदी घालणे शक्यच नाही, असे प्रदेश भाजपचे प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिश्किता यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. Read More »

शांतादुर्गा शिक्षण समितीतर्फे शिक्षण परिषदेचे आयोजन

शांतादुर्गा शिक्षण समिती, कवळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षण आणि समाज या विषयावर १३ व १४ सप्टेंबर रोजी कला अकादमी, पणजी येथे महत्वपूर्ण शिक्षण परिषद भरविण्यात येणार असून उद्घाटन सत्रात ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून तर समारोप सत्रात विख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे प्रमुख पाहुणे असतील व त्यांची प्रमुख भाषणे होणार आहेत. Read More »