बातम्या

विधानसभेचे कामकाज प्रश्‍नोपनिषद ते शून्य प्रहर

– विष्णू सुर्या वाघ प्रश्‍नोत्तराच्या तासाची प्रक्रिया कशी चालते ते आपण पाहिले. प्रत्येक सदस्याला त्या दिवसांसाठी नेमून दिलेल्या खात्यांसंदर्भात तीन तारांकित आणि पंधरा अतारांकित प्रश्‍न विचारता येतात. पण त्याने विचारलेले सर्वच प्रश्‍न स्वीकारले जातील याची मात्र खात्री देता येत नाही. प्रश्‍नांची निवड करण्याचा अंतिम अधिकार सभापतींचा असतो. त्यासाठी विधानसभेच्या कामकाज नियमावलीत काही निकष आखून दिले आहेत. सार्वजनिक महत्त्वाच्या अथवा प्रशासकीय ... Read More »

पं. जितेंद्र अभिषेकीबुवा संगीत महोत्सवात नृत्याविष्कार

Read More »

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे गोव्यात आगमन

Read More »

शिवसेनेकडून भाजपची गोची

युती टिकवण्याची आमची मनस्वी इच्छा : उध्दव शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपसमोर काल नवा व शेवटचा प्रस्ताव दिला. मात्र या प्रस्तावामुळे सत्ता काबीज करण्यासह मुख्यमंत्रिपदासाठी आसुसलेल्या भाजपासमोरील पेच कायम असल्याची चर्चा आहे. शिवसेनेने आपल्यासाठी १५१ जागा ठेवून भाजपाला ११९ जागा देण्याच्या या नव्या प्रस्तावामुळे शिवसेनेच्या १८ जागा कमी होणार आहेत. मात्र युती टिकवण्याचा फैसला शिवसेनेने भाजपवर सोपवला आहे. Read More »

खाण धोरण ठरल्यानुसारच : पर्रीकर

खाण धोरण आपण ठरल्यानुसार तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले. आपल्या निर्णयाला आव्हान देऊन ‘गोवा फाऊंडेशन’सारखी बिगर सरकारी संघटना न्यायालयात गेली म्हणून खाण धोरणावर परिणाम होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारच आपण खाण धोरण तयार करण्याचे काम हाती घेतले असल्याचे ते अनौपचारिकपणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. Read More »

किनारी व्यावसायिक कुटुंबियांच्या बांधकामांचे प्रश्‍न सुटणे लांबणीवर?

केंद्र सरकारचा कल पाहता राज्यातील किनारी भागातील पारंपरिक व्यवसाय करणार्‍या कुटुंबांच्या बांधकामांसंबंधीचे प्रश्‍न लवकर सुटण्याची शक्यता नसून ते किमान सहा महिने तरी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Read More »

सौर उर्जा प्रकल्प उभारणार्‍यांच्या मदतीस सरकार तयार : मुख्यमंत्री

आय्‌आय्‌टीसारखी एखादी संस्था जर गोव्यात सौर उर्जेसंबंधीचा एखादा प्रकल्प उभारण्यासाठीचा प्रस्ताव घेऊन आली तर गोवा सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले. अशा प्रकारचे छोटे प्रकल्प उभारण्याची सरकारची तयारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. Read More »

वीज धक्क्याने म्हापशात युवक ठार

मुड्डावाडा-आसगांव येथे झाडाची फांदी तोडताना ती फांदी तुटून वीजेच्या वायरवर पडली आणि ती वायर झाडाची फांदी तोडणारा सोनू रमेश चव्हाण (२२) या युवकाला लागल्याने त्या वीजेच्या स्पर्शाने तो जागीच ठार झाला. ही घटना काल २१ रोजी संध्याकाळी ४ वा. घडली. सदरच्या झाडाची फांदी ही जवळच असलेल्या जीवंत वीजेच्या तारांवर पडली आणि ती वायर झाडावर असलेल्या सोनू चव्हाण याला स्पर्श झाल्याने ... Read More »

मावळिंगेत कोल्ह्याच्या  हल्ल्यात दोन मुले जखमी

वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष विकोपाला जाऊ लागलेला असून रविवारी भराडे-मावळिंगे येथे एका कोल्ह्याने दोन लहान मुलांवर हल्ला करून त्याना जखमी करण्याची घटना घडली. दोन्ही मुलांना उपचारासाठी म्हापसा आझिलो इस्पितळात हलवण्यात आले आहे. सदर घटना काल सकाळी ९ च्या सुमारास घडली. भराडे-मावळिंग येथे घराबाहेर असलेले संजय देवारकर (१२) व सिध्दार्थ देवारकर (७) या दोन मुलांवर कोल्ह्याने हल्ला केला.सदर कोल्हा गवताच्या ... Read More »

मुंबई-गोवा महामार्गावर बस अपघातात ५ ठार

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीतील आसुर्डे गावाजवळ काल पहाटे खासगी बस झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ५ प्रवासी ठार झाले. तसेच २५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या वृत्तानुसार साईपूजा ट्रॅव्हल्सची सदर बस मुंबईहून सिंधुदुर्गकडे येत होती. Read More »