बातम्या

नवी मराठी अकादमी सर्वसमावेशक

अस्थायी समितीच्या बैठकीत ग्वाही; जनतेला आवाहन गोवा सरकारच्या वतीने स्थापन करण्यात येत असलेली गोवा मराठी अकादमी जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला जाईल व त्यामध्ये सर्व मराठीप्रेमींना स्थान असेल अशी ग्वाही गोवा मराठी अकादमीच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल गजानन सामंत यांनी काल पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना दिली. Read More »

महायुतीबाबत अद्याप ठोस काहीच नाही

भाजप-शिवसेना महायुतीला संकटातून सावरण्यासाठी आता भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पुढाकार घेत आपल्या पक्षाच्या मागणीत ५ जागांची कपात केल्याचे वृत्त आहे. शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याशी शाह या संदर्भात बोलल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. Read More »

वापराविना ठेवलेल्यांचे भूखंड जीआयडीसी ताब्यात घेणार

महामंडळाकडून संबंधितांना नोटिसा आमदार चंद्रकांत कवळेकर यांच्या कारकीर्दीत भूखंड खरेदी करून त्याचा औद्योगिक प्रकल्पासाठी वापर न केलेल्यांना गोवा औद्योगिक विकास महामंडळाने (जीआयडीसी) कारवाईसाठी नोटिसा बजावल्याने संबंधित भूखंडधारकांची तारांबळ उडाली आहे. अशा लोकांच्या ताब्यात असलेले भूखंड पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचे महामंडळाने ठरविले आहे. Read More »

उद्धव ठाकरे यांच्या डावपेचांमुळे भाजप संतप्त

शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे माजी नेते व आताचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते असलेले छगन भुजबळ यांनी थंड डोक्याचा राजकारणी असे संबोधले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. Read More »

मेरूचे मांस विक्रीस आणणार्‍यांना अटक

वनअधिकार्‍यांनी पाठलाग करून चोपडे येथे पकडले पेडणे वनखात्याने शिवोली-चोपडे पुलावर काल सकाळी ११ वाजता वाहनांचा पाठलाग करून साडे तेहत्तीस किलो मेरूचे मांस, स्वीफ्ट कार, मोबाईल संच जप्त करण्याबरोबरच अमोल गणेश नाईक (२३), (कातोडवाडा-तुये), शांताराम सुभाष नाईक (कातोडवाडा-तुये) व आशिष अशोक बांदेकर (माऊसवाडा-पेडणे) या तिघांना अटक केली. त्याना दोन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. Read More »

प्लॅस्टिकपासून रेतीच्या संशोधनास आजपासून गोव्यात प्रारंभ

मये तंत्रनिकेतनचे ४० विद्यार्थी काम करणार गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या (जीसीसीआय) समाजसेवा विभाग व मये येथील तंत्रनिकेतनने ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ बाथ’ च्या सहकार्याने प्लास्टिकपासून रेती बनविण्याच्या प्रकल्पावर संशोधन करण्याचे ठरविले असून आजपासून त्याविषयीच्या संशोधनास प्रारंभ होईल, अशी माहिती मांगिरीश पै रायकर, तंत्रनिकेतनचे प्राचार्य सुभाष बोरकर, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. पूर्णानंद सावईकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. Read More »

लाडली लक्ष्मीचे धनादेश तीन महिन्यात अर्जदाराकडे

सरकारच्या लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी येणार्‍या अर्जांवर आता लवकर म्हणजे तीन महिन्यांच्या आत प्रक्रिया पूर्ण होऊन धनादेश संबंधितांपर्यंत पोचत असल्याची माहिती महिला आणि बालक कल्याण खात्याचे संचालक विकास गावणेकर यांनी दिली. Read More »

मंगळाच्या गुरुत्वाकर्षण प्रभाव क्षेत्रात मंगळयान

भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेले मंगळयान काल मंगळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण प्रभाव क्षेत्रात दाखल झाले. हे यान नियोजित कार्यक्रमानुसार प्रत्यक्ष मंगळ ग्रहाच्या कक्षेत दि. २४ रोजी प्रवेश करणार आहे. दरम्यान, काल भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) मंगळयानाच्या मुख्य इंजीनची चाचणी केली ती यशस्वी ठरली. Read More »

१५ दिवसांनंतर होणार खनिज मालाचा ई-लिलाव

गोव्यातील विविध जेटींवर असलेल्या खनिज मालाचा पाचव्या टप्प्यातील ई-लिलाव येत्या १५ दिवसांनंतर करण्यात येणार असल्याचे खाण खात्याचे उपसंचालक पराग नगर्सेकर यांनी सांगितले. पाचव्या टप्प्यातप १५ लाख टन एवढ्या खनिजाचा ई-लिलाव करण्यात येणार असून त्याद्वारे सुमारे १०० कोटी रु. मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Read More »

सिने अभिनेते शशी कपूर इस्पितळात दाखल

सुप्रसिद्ध अभिनेते शशी कपूर यांना छातीत जंतू संसर्ग झाल्यामुळे येथील कोकिलाबेन अंबानी इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. काही वर्षांपूर्वी शशी कपूर यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली होती. Read More »