बातम्या

काळा पैसा आणण्याबाबत सरकारकडून विलंब : शांताराम

केंद्रातील भाजप सरकारला देशाबाहेर असलेला काळा पैसा परत आणण्यात रस नसल्याचा आरोप राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी काल पत्रकारांशी बोलताना केला. देशाबाहेर नेऊन ठेवलेला काळा पैसा परत आणणार असल्याच्या वल्गना भाजप लोकसभा निवडणुकीपूर्वी करत होता. पण आता जाणीवपूर्वक त्यासाठी विलंब केला जात असल्याचे नाईक म्हणाले. Read More »

रिक्षाला धडक; कारचालक ठार

सिल्वावाडो असोळणा येथे उभी असलेल्या मालवाहू रिक्षाला फियाट कारची धडक बसून कारचालक बोनिफासियू कारिदास फर्नांडिस (८४) हा वृध्द ठार तर रिक्षाचालक पिंटू जखमी झाला. काल जीए- ०५ टी- ३३५४ क्रमांकाची मालवाहू रिक्षा वेर्णाहून पिंटू असोळणा येथे माल घेऊन गेला होता. Read More »

पाच पर्यावरण कायद्यांचा आढावा

केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने माजी कॅबिनेट सचिव टी आर एस सुब्रह्मण्यम यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या पाच पर्यावरण संबंधी कायद्यांचा आढावा घेऊन दुरुस्ती सुचविण्यासाठी समिती स्थापन केली आहे. Read More »

वीज यंत्रणा बिघडल्याने मुंबई अंधारात

मुंबईला वीज पुरवठा करणार्‍या टाटा पावर कंपनीच्या वीज निर्मिती प्रकल्पात बिघाड झाल्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या अनेक भागांना खंडित विजेचा सामना करावा लागला. Read More »

रहिवाशांचे मुरगाव नगरपालिकेसमोर मुलांसोबत धरणे

Read More »

राज्याच्या नोकरशाहीत फेरबदल

नवीन आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती; मामलेदार, संयुक्त मामलेदार, कनिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवरील अधिकार्‍यांच्या बदल्या घडवून आणताना काल सरकारने बदली झालेले उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांच्या जागी जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती नीला मोहनन् (आयएएन) यांची नियुक्ती केली. तर पर्यटन खात्याचे संचालक म्हणून निखिल देसाई यांच्याकडे असलेला अतिरिक्त ताबा काढून घेताना त्या जागी अमेय अभ्यंकर (आयएएस) यांची नियुक्ती केली. तुरुंग ... Read More »

जपानची बुलेट ट्रेनसाठी मदत

अणू करार नाही; आर्थिक गुंतवणूक दुप्पट जपान व भारता दरम्यान, अपेक्षित नागरी अणू करार होऊ शकला नाही मात्र भारतात खासगी व सार्वजनिक मिळून ३४ अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याची घोषणा जपानने दिली. येत्या पाच वर्षात ही गुंतवणूक करण्यात येणार असून आतापर्यंतच्या गुंतवणुकीपेक्षा त्यात दुपटीने वाढ झाली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीही जपान मदत करणार आहे. Read More »

नवाज शरीफांना लष्कराचा राजीनाम्याचा सल्ला?

पाकिस्तानात सरकारविरोधी आंदोलन तीव्र बनत असल्याच्या पार्श्वभूमीवर काल पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना भेटून चर्चा केली. त्यांनी यावेळी सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. लष्करप्रमुखांनी पंतप्रधान शरीफ यांना राजीनाम्याचा सल्ला दिला असल्याचे सूत्रांकडून समजते. Read More »

म्हादईप्रश्‍नी उद्यापासून पुढील सुनावणी

गोव्याची तहान भागवणार्‍या म्हादई नदीचे पाणी वळवण्यासाठी २००६ सालापासून कर्नाटकाने चालवलेल्या अरेरावी प्रयत्नांना प्राथमिक स्तरावर लगाम घालण्यात गोव्याला खडतर प्रयत्नानंतर यश आलेले असले तरी आता बुधवार ३ सप्टेंबर पासून म्हादईच्या अस्तित्वाची नवी लढाई सुरू होत आहे. म्हादई जललवादाच्या त्रिसदस्यीय समितीसमोर ३ सप्टेंबर रोजी नव्याने सुनावणी सुरू होणार आहे. Read More »

आज पाचव्या टप्प्यातील ई-लिलाव

गोव्यातील विविध जेटींवर असलेल्या मालाचा ५व्या टप्प्यातील ई-लिलाव आज होत आहे. यात १९ लाख दशलक्ष टन खनिजांचा लिलाव होईल. Read More »