बातम्या

अखेर महायुती तुटली

शिवसेना व भाजप या बड्या पक्षांनी समाधानकारक जागा सोडण्यास नकार दिल्याने अखेर काही दिवसांच्या तर्क-वितर्कांनंतर काल शिवसेना-भाजप व मित्रपक्षांची महायुती तुटली. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाजपक्ष आणि शिवसंग्राम या तीन पक्षांनी या महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. Read More »

जीटीडीसीच्या हॉटेल्सचे १८ कोटी खर्चून नूतनीकरण

सुमारे १८ कोटी रु. खर्च करून पर्यटन विकास महामंडळ जीटीडीसी पणजी, कळंगुट व जुने गोवे येथील आपल्या रेसिडन्सींचे नूतनीकरण करीत असून कळंगुट रोसिडेन्सीमध्ये तर विवाह सोहळेही करता येतील यासाठीची सोय करण्यात येणार असल्याचे पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनी काल सांगितले. Read More »

आंतरराष्ट्रीय लेखक-वाचक महोत्सवाचे पणजीत आयोजन

गोवा कला अकादमी संकुलात येत्या दि. ४ ते ६ ऑक्टोबर अशा तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय लेखक आणि वाचक महोत्सवाचे आयोजन केले असून या महोत्सवात देशी-विदेशी साहित्यिक सहभागी होतील, अशी माहिती महोत्सवाचे संचालक अहलम अनिल कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. गोव्यात कोकणी, मराठी, इंग्रजी, कानडी, इंग्रजी, पोर्तुगीज अशा सहा भाषांतून साहित्य निर्मिती होते. त्यामुळे या महोत्सवासाठी गोव्याची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. Read More »

पणजीतील पे पार्किंग अंमलबजावणी बाबत संभ्रम

पणजी शहरातील पे पार्किंग प्रश्‍नावर महापौर नगरसेवक व आयुक्त यांच्यात तीव्र स्वरूपाचे मतभेद असून काल पार्किंग विषयावर चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीत शहरात पे पार्किंग निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून सुरू करावी यावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही. महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या विषयावर एकही शब्द बोलण्यास तयार नसल्याचे पत्रकारंना सांगितले. Read More »

विनावापर शाळा इमारती समाजोपयोगी कामांसाठी वापरणार

विनावापर पडून असलेल्या सरकारी शाळांच्या इमारती अंगणवाडी तसेच अनुदान प्राप्त तसेच अन्य संस्थांना सांस्कृतिक शैक्षणिक कारणांसाठी वापरण्यास देण्यासंबंधीच्या प्रस्तावावर पुढील पंधरा वीस दिवसात निर्णय होऊ शकेल, असे शिक्षण खात्याच्या सूत्रांनी सांगितले. ग्रामीण भागातील अनेक सरकारी शाळा बंद पडल्या आहेत. Read More »

कला-संस्कृती खात्यातर्फे पाच पुस्तकांचे उद्या प्रकाशन

गोवा राज्य कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे छापण्यात आलेल्या नाट्य, लोककला आणि संगीतविषयक पाच पुस्तकांचे प्रकाशन येत्या शुक्रवारी दि. २६ रोजी खात्याच्याच संस्कृती भवन सभागृहात संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून कला आणि संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होईल. कला-संस्कृती सचिव फैजी हाश्मी आणि मुंबई स्थित ज्येष्ठ रंगकर्मी तथा सामाजिक ... Read More »

विराट कोहली एफसी गोवाचा सहमालक

मुंबईतील सोहळ्यात घोषणा प्रतिष्ठेच्या इंडियन सुपर लीगबाबतची उत्सुकता वाढलेली असून गोमंतकीय फ्रँचाइज एफसी गोवाने काल भारताचा भावी कर्णधार विराट कोहलीला सहमालक तथा अँबासडर घोषित केले. येथील पल्लाडियम हॉटेलमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात एफसी गोवातर्फे विदेशी प्रशिक्षक झिको आणि खेळाडू रॉबर्ट पीरिस यांनाही सादर केले. संघाच्या आदिदास कीटचेही यावेळी अनावरण करण्यात आले. फुटबॉल स्पोर्टस फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, निता अंबानी, अखिल भारतीय फुटबॉल ... Read More »

शिवसेना-भाजप युती कायम राहणार

भाजपला १३० जागा देण्यास मान्यता महायुतीबाबत अद्याप स्पष्टता नाही महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपला १३० जागा देण्यास शिवसेनेने काल मान्यता दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी बैठक घेऊन नंतर एका पत्रकार परिषदेत युती कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, भाजप-शिवसेना व अन्य मित्रपक्ष यांच्या नेत्यांची महायुतीसाठीची बैठक रात्री उशिरापर्यंत चालू होती. या बैठकीत शिवसेनेने १५० जागांवरून खाली यावे अशी मागणी घटक पक्षांनी ... Read More »

गौतम खैतानना अटक

चॉपर खरेदी गैरव्यवहार प्रकरण तीन हजार सहाशे कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड चॉपर खरेदी गैरव्यवहार प्रकरण काल उद्योजक गौतम खैतान याना काल अटक करण्यात आली असून त्यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या ७ दिवसांच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. संचालनालयाने त्यांच्या कोठडीची गरज असल्याचा दावा केल्यानंतर दिल्लीतील न्यायालयाने त्यासाठी मान्यता दिली. Read More »

अमिताभ बच्चनहस्ते इफ्फीचे उद्घाटन

आतापर्यंत २२३७ प्रतिनिधींची नोंदणी पणजी (न. प्र.) नोव्हेंबर महिन्यात गोव्यात होणार्‍या इफ्फी महोत्सवाचे उद्घाटन दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याहस्ते होण्याचे जवळ जवळ निश्‍चित झाले असल्याचे गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. Read More »