बातम्या

मृत्यूनंतर नेत्रदानासाठी १४०० जण इच्छुक

सर्वांकडून त्याविषयी गोमेकॉला पत्र राज्यातील १४०० जणांनी आपल्या मृत्यूनंतर डोळे दान करण्यासंबंधीचे पत्र गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला दिल्याचे सांगून आतापर्यंत मृत झालेल्यांचे डोळे काढून दोघांना दृष्टी दिल्याची माहिती आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली. Read More »

पोलिसांच्या पारदर्शक कारभारासाठी प्रत्येक पोलीस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरा

पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांची माहिती तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकावर जाणार्‍यांशी पोलिसांचे कसे वर्तन असते, याची माहिती मिळावी, तसेच अन्य सर्व कारभार पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देऊन ऑक्टोबर अखेरपर्यंत गुन्हेगारी जाळे पद्धती (क्रिमिनल नेटवर्क सिस्टम) विकसित करणार असल्याची माहिती राज्याचे पोलीस महारनिरीक्षक सुनील गर्ग यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. Read More »

अर्धफोंड चेकनाक्याजवळ अपघातात युवती ठार

मडगाव कारवार महामार्गावरील अर्धफोंड येथील वनखात्याच्या चेक नाक्याजवळ मेंगलोर येथून लाकूड घेऊन आलेल्या केए ०१ बी ७३२२ या ट्रकाने दिलेल्या जीवघेण्या धडकीमुळे बसची वाट पाहत उभी असलेल्या प्रिस्का फर्नांडिस (२४) या युवतीचा अंत झाला. प्रसंगावधान पाहून पळून गेल्यामुळे दोन युवती बचावल्या. Read More »

बलात्कार प्रकरणी कुडचड्यातील दोन युवकांना अटक

एका २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून केपे पोलिसांनी कुडचडे येथील दोन युवकांना काल संध्याकाळी अटक केली. केपेचे पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दांडो-सांगे येथे राहणार्‍या मूळ आमडई-सांगे येथील एका २३ वर्षीय तरुणीला बुधवार दि. २४ रोजी मळकर्णे येथे नेऊन तिच्यावर दोघांनी बलात्कार केला असल्याची तक्रार काल संध्याकाळी नोंद करण्यात आली. Read More »

‘कोळसा’ रद्दचा गोव्यावर परिणाम नाही : पर्रीकर

गोव्याचा छत्तीसगड येथील कोळसा साठा रद्द झाल्याने आपल्या सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. गरज भासल्यास कोळसा आयात करण्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणे पडून आहेत. सरकारला या प्रकरणांचा निकाल लागलेला हवा. कोळसासाठ्याच्या बाबतीत निकाल लागला. केंद्र सरकार पुढील महिनाभरात या विषयावर योग्य तो निर्णय घेईल. Read More »

बनावट दाखल्यांद्वारा मालमत्ता विक्री प्रकरणी एकास अटक

विदेशात स्थायिक झालेल्या जुझे आवितो पिंटो यांचे २००२ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या नावावरील सुकूर येथील मालमत्ता बोगस दाखले करून जुझे आवितो पिंटो यांनीच विकल्याचे भासविण्याच्या प्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाने संशयित आरोपी इस्तेव्हन एलविस डिसोझा याला पोलिसांनी बांबोळी येथे अटक केली. Read More »

पणजी पोलीस स्थानकावरील हल्ला प्रकरण

Read More »

मंगलदिन आला…

भारताचे ‘मंगलयान’  मंगळाच्या कक्षेत; पहिल्याच प्रयत्नात झगमगते यश अवकाश संशोधनाच्या इतिहासात काल भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. भारताचे ‘मंगलयान’ यशस्वीरित्या मंगळाच्या कक्षेत जाऊन पोचले. आजवर केवळ अमेरिका, रशिया आणि युरोपची अंतराळयाने मंगळापर्यंत पोहोचली आहेत. पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत जाणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. ‘अनेक संकटे होती, पण आम्ही टिकलो’, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन ... Read More »

२१४ कोळसा खाणींचे वाटप अखेर रद्द

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश १९९३ सालापासून विविध कंपन्यांना वितरित झालेल्या २१८ कोळसा साठ्यांपैकी २१४ कोळसा साठ्यांचे वितरण सर्वोच्च न्यायालयाने काल रद्द ठरवले. कॉर्पोरेट उद्योग जगताला हा मोठा धक्का म्हणून पाहिले जात आहे. सुमारे २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या साठ्यांत झाली असल्याचा दावा आहे. Read More »

छाप्याच्या वृत्ताने लोकमान्य पतसंस्थेच्या ठेवीदारांत घबराट

पैसे काढण्यासाठी गोव्यातही ठेवीदारांच्या रांगा लोकमान्य मल्टिपर्पज संस्थेच्या गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रातील शाखांवर आयकर विभागाने मंगळवारी छापे टाकल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यावर या पत संस्थेच्या ठेवीदारांचे धाबे दणाणले. परिणामी काल आपले पैसे बँकेतून काढण्यासाठी ठेवीदारांनी राज्यभरातील सर्व शाखांत रांगा लावल्या होत्या. Read More »