बातम्या

राज्यपाल मृदुला सिन्हा राष्ट्रपती, पंतप्रधानांना भेटल्या

गोव्याच्या राज्यपाल मुदुला सिन्हा यांनी काल दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. दि. ३१ ऑगस्ट रोजी गोव्याच्या राज्यपाल म्हणून श्रीमती सिन्हा यांचा शपथविधी झाला होता. त्यानंतरची त्यांची ही पहिलीच दिल्ली भेट आहे. Read More »

केंद्रीय पर्यटन खात्याकडून काश्मीरला १०० कोटी

नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाणार्‍या जम्मू काश्मीरला मदतीचा ओघ सुरू झाला आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने १०० कोटींची विशेष मदत निधीची घोषणा केली आहे. केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांनी हा निधी जम्मू काश्मीरमधल्या शासकीय पर्यटन सुविधेसाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले. Read More »

संपूर्ण कर्जाची जबाबदारी सरकारवर नाही

मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण : खाण अवलंबितांना ३५ टक्के मदतीच्या योजनेत बदल नाही खाण अवलंबितांच्या संपूर्ण कर्जाची जबाबदारी सरकार घेऊ शकत नाही. बोट दिले म्हणून संपूर्ण हातच गिळंकृत करण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगून ट्रक मालक, बार्ज मालक व मशिन मालकांना दिलासा देण्यासाठी सरकारने एक रकमी कर्ज फेडीसाठी ३५ टक्के मदत देण्याची जी योजना राबविलेली आहे, त्यात कोणताही बदल करणार नसल्याचे मुख्यमंत्री मनोहर ... Read More »

भरकटलेल्या ट्रॉलरवरील ३१ मच्छीमारांना जीवरक्षकांनी वाचविले

मच्छीमारी ट्रॉलर मिरामारनजीक रुतला इंजिन बंद पडल्यामुळे मंगळवारी मध्यरात्री समुद्रातून भरकटत मिरामार किनार्‍याजवळ आलेल्या एका मच्छीमारी ट्रॉलरवरील ३१ मच्छीमारांना किनार्‍यावरील जीवरक्षकांनी बुधवारी सकाळी सुरक्षित समुद्रातून बाहेर काढले. मच्छीमारीसाठी गेलेल्या या ट्रॉलरचे इंजिन अचानक बंद पडले व वादळी वार्‍यामुळे भरकटत तो मिरामार किनार्‍यानजीक रुतला. यावेळी या ट्रॉलरवर ३१ मच्छीमार होते. संकटात सापडलेल्या या मच्छीमारांनी मदतीसाठी आरडाओरडा केली असता बुधवारी सकाळी ७ ... Read More »

काश्मीरमधील ७६ हजारहून अधिक लोक सुखरुप स्थळी

भारतीय सशस्त्र दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये युद्ध पातळीवर सर्वात मोठे मदत आणि बचाव कार्य सुरू केले असून आतापर्यंत ७६,५०० लोकांना सशस्त्र दल आणि एनडीआरएफने सुखरुपस्थळी पोचवले आहे. भारतीय हवाई आणि लष्कराने ७९ विमाने आणि हेलिकॉप्टर्स मदत कार्यासाठी पाठवली. लष्कराने सैन्यदलाच्या २४४ तुकड्या श्रीनगरमध्ये तर ८५ तुकड्या जम्मू परिसरात तैनात केल्या आहेत. त्यांनी ८,२०० ब्लॅकेट्‌स आणि ६५० तंबूचे वाटप केले. तसेच दीड लाख ... Read More »

केरळात बारचे परवाने रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाची मनाई

केरळात बारचे परवाने तूर्त रद्द करू नयेत असा मनाई आदेश सर्वोच्च न्यायालयाने जारी केला. दरम्यान, यासंबंधी केरळ बार असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेवर गुरूवारी (आज) सुनावणी घेणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. Read More »

ढवळीकरांकडून बांधकाम खाते काढून घ्यावे : कॉंग्रेस

भ्रष्टाचार चालू असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम खात्यात भ्रष्टाचार चालू असून या खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडून हे खाते काढून घ्यावे, अशी मागणी काल कॉंग्रेस प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी काल पत्रकार परिषदेत केली. Read More »

हळर्णमध्ये दोन गव्यांची हत्या

बेकायदा वीज तार शेतात नेऊन केलेला प्रकार विजेचा शॉक देऊन हळर्ण-पेडणे येथे दोन गव्यांची हत्या करण्याचा प्रकार घडला असून त्याबाबत पर्यावरणप्रेमीतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. Read More »

डिसेंबरपर्यंत राज्याचे प्रशासन अधिक सक्रीय : पर्रीकर

आपल्या सरकारने परवा मंगळवारी अडीच वर्षे पूर्ण केली. पत्रकारांसह सर्व घटकांच्या मदतीने या काळात कोलमडलेले प्रशासन सावरण्याचे बरेचसे काम झाले आहे. येत्या डिसेंबरपर्यंत ते अधिक सक्रीय होऊ शकेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला. Read More »

सरकारस्थापनेसंबंधी पत्र मागे घेण्याची ‘आप’ची मागणी

भाजपला दिल्लीत सत्तास्थापनेचे निमंत्रण देण्याकरिता नायब राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे परवानगी मागणारे पत्र लिहिले आहे, ते पत्र मागे घेण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी काल नायब राज्यपालांकडे केली. Read More »