बातम्या

पाकिस्तानी सैनिकांकडून पुन्हा शस्त्रसंधी उल्लंघन

अल्प काळाच्या खंडानंतर पाकिस्तानने काल पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेनजीकच्या भारतीय चौक्यांना पाक सैनिकांनी लक्ष्य केले. भारतीय सैन्याच्या प्रतिहल्ल्यांचा त्यांना सामना करावा लागला. Read More »

मडगाव रेल्वे स्टेशनवर बॉम्बच्या अफवेने धावपळ

मडगाव रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याच्या वृत्ताने काल पोलिसांची, रेल्वे कर्मचारी व प्रवाशांची भीतीने धावपळ उडाली. काल दुपारी हे वृत्त येताच मडगाव पोलीस, रेल्वे पोलिसांनी स्टेशनवर जाऊन पहाणी केली. तसेच बॉम्ब शोधक श्‍वान पथक आणून सर्वत्र कसून तपासणी केली. Read More »

भारत-पाकला शांततेचे नोबेल

कैलाश सत्यार्थी व मलाला युसुफजाई मानकरी बाल हक्क क्षेत्रात कार्यरत असलेले भारताचे कैलाश सत्यार्थी व पाकिस्तानची मलाला युसुफजाई यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. Read More »

इफ्फीसाठी ५४१२ प्रतिनिधींची नोंदणी

१५ हजारांचे उद्दिष्ट यंदाच्या इफ्फी महोत्सवासाठी शुक्रवारपर्यंत ५४१२ प्रतिनिधींची नोंदणी झालेली असून प्रतिनिधींची संख्या १५ हजारांवर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे गोवा मनोरंजन सोसायटीचे सरव्यवस्थापक श्रीपाद नाईक यांनी काल सांगितले. Read More »

केंद्र सरकारचे वागणे कुंभकर्णासारखे

सर्वोच्च न्यायालयाकडून ताशेरे महाराष्ट्र व हरयाणातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभांच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यस्त असतानाच सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात मोदी सरकारवर कडक ताशेरे ओढले असून हे सरकार कुंभकर्णासारखे वागत आहे असे मतप्रदर्शन केले आहे. Read More »

वेश्या व्यवसायप्रकरणी ५ जणांना अटक

दुसरा विमानतळ परवडणारा नाही गोव्याची अस्मिता व संस्कृती यांच्या रक्षणासाठी गोव्याला विशेष दर्जाची आवश्यकता असून त्यासाठीची संधी गोव्याने अजून गमावलेली नसून प्रयत्न केल्यास हा दर्जा अजूनही गोव्याला मिळू शकतो, असे नवे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी गुरुवारी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. Read More »

बेकायदा गुरांच्या कत्तलप्रकरणी तिघा संशयितांना अटक

वाळपईत ईद सणाच्या निमित्ताने गुरांची मोठ्या प्रमाणात कत्तल करून त्यांचे अवयव वेळूस नदीत फेकून दिले होते. त्याअनुसरून वाळपई पोलिसांनी कारवाई करताना काल सकाळी उस्मान खान वाळपई तर सायंकाळी गुरुसाब बेपारी (मोती डोंगर-मडगाव) व महबुबसाब बेपारी (खांडेपार) या तिघांना अटक केली. त्यातील उस्मान खान याला डिचोली न्यायालयाने सात दिवसाचा रिमांड दिला. तर अन्य दोघांना उद्या न्यायालयात हजर केले जाईल. Read More »

विशेष राज्य दर्जा : अजूनही गोव्याला संधी : लुईझिन

दुसरा विमानतळ परवडणारा नाही गोव्याची अस्मिता व संस्कृती यांच्या रक्षणासाठी गोव्याला विशेष दर्जाची आवश्यकता असून त्यासाठीची संधी गोव्याने अजून गमावलेली नसून प्रयत्न केल्यास हा दर्जा अजूनही गोव्याला मिळू शकतो, असे नवे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी गुरुवारी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. Read More »

दोन चोर्‍यांमध्ये ११ लाखांचा ऐवज पळविणार्‍या टोळीस अटक

म्हापसा, कोलवाळमधील चोरीचा मालही जप्त म्हापसा पोलिसांनी येथील मार्केटमधील मोबाईलचे दुकान फोडून ४ लाख ५० हजार रुपयाचे किंमतीचे मोबाईल संच आणि मुशीर-कोलवाळ येथील राजाराम भट यांच्या घरातील मोबाईल, रोकड व लॅपटॉप व इतर वस्तू मिळून ६ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या वस्तू चोरणार्‍या चोरांच्या टोळीला अटक करून त्यांच्याकडील सुमारे ११ लाख रुपये किंमतीचा ऐवज ताब्यात घेतला. Read More »

हुडहुड वादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर

‘हुडहुड’ वादळाचे रुपांतर आता विनाशकारी चक्रीवादळात झाले असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे प्रमुख एल. एस. राठोड यांनी काल दिली. ताशी १०० ते ११० कि. मी. वेगाच्या वार्‍यासह आंध्र प्रदेश व ओडिशाच्या किनारी प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. चक्रीवादळ वरील प्रदेशांत रविवारपर्यंत थडकणार असल्याचे ते म्हणाले. Read More »